Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3738

Economic Recovery: मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने जुलैमध्ये घेतला वेग, 15 महिन्यांनंतर पुन्हा तीव्र झाली भरती

नवी दिल्ली । मागणी सुधारणे आणि कोविड -19 च्या स्थानिक निर्बंध कमी केल्याच्या दरम्यान भारताच्या उत्पादन क्षेत्रातील घडामोडीत जुलै 2021 मध्ये गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक वाढ झाली आहे. एका मासिक सर्वेक्षणाने सोमवारी ही माहिती दिली.

हंगामी समायोजित IHS मार्किट Manufacturing Purchasing Managers’ Index, (PMI), जूनमध्ये 48.1 वरून जुलैमध्ये 55.3 पर्यंत वाढला, जो तीन महिन्यांतील सर्वात मजबूत विकास दर आहे. PMI अंतर्गत 50 पेक्षा जास्त स्कोअर घडामोडीमध्ये विस्तार दर्शवतो, तर 50 पेक्षा कमी स्कोअर आकुंचन दर्शवतो.

रिकव्हरीमध्ये वाढ झाली
IHS मार्किटमधील अर्थशास्त्राचे सहसंचालक पोलियाना डी लिमा म्हणाल्या, “भारतीय उत्पादन उद्योग जूनमधील घसरणीतून सावरताना पाहणे उत्साहवर्धक आहे. उत्पादन वेगाने वाढले आणि एक तृतीयांशपेक्षा जास्त कंपन्यांनी मासिक उत्पादनात वाढ झाल्याचे सांगितले.”

लिमा पुढे म्हणाले की,”2021 च्या कॅलेंडर वर्षात औद्योगिक उत्पादन वार्षिक 9.7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.” त्या म्हणाल्या की,”जुलैमध्ये रोजगार आघाडीवरही परिस्थिती थोडी सुधारली आहे, जरी याबद्दल ठोस काहीही सांगणे फार घाईचे ठरेल.”

जुलैमध्ये GST ने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला
जुलै महिन्यात एकूण 1,16,393 कोटी रुपयांचा GST महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे 33 टक्के अधिक आहे. जुलै 2020 मध्ये GST कलेक्शन 87,422 कोटी रुपये होते.

यापूर्वी, गेल्या महिन्यात म्हणजे जून, 2021 मध्ये GST संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे 92,849 कोटी रुपये होते. मंत्रालयाने म्हटले आहे की,” GST कलेक्शनची आकडेवारी अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा दर्शवते.”

जलद सुधारणा
यामध्ये CGST 22,197 कोटी, SGST 28,541 कोटी, IGST 57,864 कोटी (मालाच्या आयातीतून 27,900 कोटी रुपये जमा) आणि SES 7,790 कोटी (वस्तूंच्या आयातीतून 815 कोटी रुपये जमा झाले). ही आकडेवारी 1 जुलै ते 31 जुलै 2021 दरम्यान दाखल केलेल्या GSTR-3B रिटर्नमधून मिळालेल्या GST कलेक्शनवर आधारित आहे. त्यात IGST आणि त्याच कालावधीत आयातीतून मिळणारा SES देखील समाविष्ट आहे.

चालकाचा ताबा सुटला : मलकापूर हद्दीत चारचाकी गाडीचा अपघात ; तिघेजण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मलकापूर हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर नटराज टॉकीज हद्दीत चालकाचा गाडी चालवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात गाडीमधील चालक सागर वसंत शिंदे (वय 30), भरत अनुते (वय 38) कृष्णा काशिनाथ कगदे (वय 38) (तिघेही रा. कासारवाडी पिंपरी, जिल्हा पुणे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील मलकापूर येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नटराज टॉकीज परिसरात सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने पिकअप गाडी (क्रमांक एमएच १४ ईएम ५८४५) वरील चालक सागर वसंत शिंदे (वय 30, रा. कासारवाडी, पिंपरी पुणे) हे जात असताना मलकापूर हद्दीत आले. यावेळी चालक सागर वसंत शिंदे यांचा डोळा लागल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर त्यांची गाडी नटराज टॉकीज हद्दीत असलेल्या महामार्गालगतच्या सुरक्षा रेलिंगला धडकली. गाडीचा वेग इतका होता कि, गाडीने सुरक्षा रेलिंग तोडून त्यापलीकडील नाल्यात गाडी गेली.

या अपघातात गाडीमधील चालक सागर वसंत शिंदे (वय 30), भरत अनुते (वय 38) कृष्णा काशिनाथ कगदे (वय 38) (तिघेही रा. कासारवाडी पिंपरी, जिल्हा पुणे) हे जखमी झाले. या अपघातानंतर तात्काळ नागरिकांनी तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातानंतर महामार्ग मदत विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, तानाजी जाधव, चंद्रकांत जवळगेकर, सुदेश दरडा दादा सावंत यांनी घटनस्थळी धाव घेतली. तसेच जेसीबीच्या साह्याने अपघात स्थळावरून गाडी बाजूला काढली.

धक्कादायक! अज्ञाताने चक्क एकरातील उपटला कापूस

परभणी | तालुक्यातील समसापुर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक एकर वरील कापसाची झाडे एका अज्ञाताने उपटून टाकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, परभणी तालुक्यातील समसापुर येथील शेतकरी पद्माकर शेषराव चोपडे यांच्या समसापुर शिवारातील गट नंबर – 196 मध्ये कापसाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीलाच कापसाची लागवड केल्यामुळे हे पीक अतिशय जोमात आणि होते. परंतु शनिवारी एका अज्ञाताने एक एकरवरील पूर्ण कापूस उपटून टाकल्याने शेतकऱ्यांचे अंदाचे 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांना मिळाले शिवसेना नेते संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यातील कथित कॉल रेकॉर्डिंग

sanjay rathod

पुणे । 22 वर्षीय पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात पुणे पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, मृत्यूच्या 4-5 दिवस आधी, महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय राठोड आणि मुलीमध्ये बरेच मोठे संभाषण झाले. असा दावा केला जात आहे की, एकदा या दोघांमध्ये सुमारे 90 मिनिटे एवढे संभाषण झाले. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणचा 8 फेब्रुवारी रोजी पुण्यातील हडपसर येथे एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर उद्धव सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, फोनवरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी असे दिसते की, पूजा आणि संजय राठोड यांच्यात हे संभाषण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाने त्यांचे सर्व संभाषण रेकॉर्ड केले होते. हे संभाषण बंजारा भाषेतून झाले, म्हणून सध्या त्याचे भाषांतर केले जात आहे.

फोन रेकॉर्डिंग तपासासाठी पाठवले
पूजा त्याच आदिवासी बंजारा समाजातील होती ज्यात राठोड देखील आहेत. पूजा बीडची रहिवासी होती आणि ती पुण्यात राहत होती. येथे अभ्यास करण्यासाठी तिने एका अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. पूजाच्या मृत्यूनंतर लगेचच तिचे आणि आमदारामध्ये संबंध असल्याचे आरोप झाले. सूत्रांनी सांगितले की, पूजाच्या मोबाईल फोनमधील डेटा, ज्यात तिने राठोडशी केलेल्या कथित संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे, पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (FSL) तपासणीसाठी पाठवले होते.

CCTV फुटेजमध्ये पूजा
पोलिसांनी आणखी एक पुरावा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला होता. हे CCTV फुटेज आहे. यामध्ये 6 फेब्रुवारीला यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या आवारात पूजा दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, हे मृत्यूपूर्वीच्या 24 तास आधीचे फुटेज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फुटेजमध्ये पूजा संजय राठोडचा जवळचा सहकारी अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा दुसरा सहकारी विलास चव्हाण हा पुण्यातील मोहम्मद वाडी येथील हेवन पार्कमधील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये पूजासोबत राहत होता, जिथे तिचा मृत्यू झाला.

तपास चालू
पूजाच्या फोनचा FSL रिपोर्ट आणि CCTV फुटेज गेल्याच महिन्यात पोलिसांना मिळाले. परंतु त्याने अद्याप लॅबला माजी मंत्र्यांच्या आवाजाच्या नमुन्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये आवाजाची चाचणी करण्यास सांगितले नाही. सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी CCTV फुटेज खरे असल्याची पुष्टी केली आहे. संजय राठोड यांनी सध्या यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

घाटीतील संरक्षण भिंतीचे काम जानेवारीत होणार सुरु

Ghati hospital
Ghati hospital

औरंगाबाद | घाटी परिसरामध्ये सतत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते. याचा रुग्णावर परिणाम होतो. म्हणून या घाटी परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आता जानेवारीनंतर ही भिंत बांधण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षापासून घाटी प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घाटी परिसरात 1,600 मीटर भिंत बांधण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत होते. म्हणून आता संरक्षण भिंतीसाठी 3 कोटी 86 लाख 85 हजार 557 रुपये तर घाटीतील ट्रेनिंग साठी चार कोटी 21 लाख 13 हजार 372 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर साडेतीन किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे. हा प्रस्ताव 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी मंजूर केला असल्याचे सांगितले आहे. हा निधी बांधकाम विभागाच्या बजेटमध्ये डिसेंबरच्या शेवटी येईल त्यानंतर टेंडर काढण्यात येणार असून जानेवारीमध्ये हे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ड्रेनेजची पाइपलाइन अद्याप बदलण्यात आलेली नाही. सुरुवातीला टाकण्यात आलेली ही पाइपलाइन चार ते सहा इंच एवढी आहे. ही पाइपलाइन बऱ्याच ठिकाणी फुटलेली असल्यामुळे आता 12 इंच पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. नवीन ड्रेनेज मूळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद यांनी सांगितले. याबाबत सतीश चव्हाण शासनाकडे पाठपुरवठा करत आहे.

आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली. यापूर्वी भाजप मध्ये उपन्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे अशी टीका राऊतांनी केल्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संज्या मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संज्या काय सांगतो अस ट्विट निलेश राणे यांनी केले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे.असे संजय राऊत यांनी म्हंटल होते

नवीन रुग्णालयात होणार एमसीएच विंग- राजेश टोपे

MCH Wing

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेत घाटीतील रद्द झालेली एमसीएच विंग पुन्हा मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी अमित देशमुख यांना एम सी एच विंग ची सर्व कागदपत्रे सादर केली होती. परंतु आता हे एमसीएच विंग घाटीत होणार नसून नवीन रुग्णालयात होणार आहे.

शासकीय दूध डेअरी जवळ नव्याने एमसीएच म्हणजे माता व बाल संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे. परंतु हे केंद्र परत मिळवण्यासाठी घाटीकडून प्रयत्न केले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडून 200 बेडचे केंद्र नवीन रुग्णालयातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या केंद्राच्या बांधकामासाठी निधी देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.घाटी रुग्णालयात दरवर्षी 19 हजार प्रसूती होतात. परंतु सध्या सुविधांचा अभाव आणि आणखी उत्तम उपचार मिळण्यासाठी तीन वर्षापूर्वी केंद्र समितीकडून एमसीएच विंग उभारण्याची सूचना देण्यात आली होती. याबाबत प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. परंतु काही त्रुटी अभावी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.

या केंद्राबाबत बरेच वादविवाद समोर आले होते. म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला असून एमसीएच विंग घाटीत होणार नसून नवीन रुग्णालयात होणार आहे. ‘एनआरएचएम’ ने वैद्यकीय विभागाला एमसीएच मंजूर केली होती त्यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला यांचे महत्त्व समजलेच असे नाही. त्याचबरोबर वारंवार त्रुटी काढत हा प्रकल्प लांबवत गेला. शेवटच्या टप्प्यात पुन्हा याबाबतचे प्रस्ताव वैद्यकीय संचालकांनी दोन दिवसांपूर्वीच आघाडीकडून मागवण्यात आले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. असे राजेश टोपे यांनी सांगितले.

ढेबेवाडी विभागातील वरेकरवाडीतील तलाव फुटण्याची भीती

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

अतिवृष्टीचा फटका सातारा जिल्ह्याला चांगलाच बसला आहे. अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी, पाणी पुरवठा योजना यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. त्यांचे पंचनामे लघु पाटबंधारे विभागाकडून केले जात आहेत. पाटण तालुक्यातील वरेकरवाडी परिसरातील तलावाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे याकडे लवकर लक्ष न दिल्यास तलाव फुटण्याची भीती स्थानिक ग्रामसंस्थांतून व्यक्त केली जात आहे. तलाव फुटून नुकसान होण्यापूर्वी संबंधित विभागाने आवश्यक पावले उचलून संभाव्य नुकसान टाळावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात डोंगरावर वरेकरवाडी हे गाव वसले आहे. या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे. या तलावाचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या तलावाच्या खालच्या बाजूला झरा व पाण्याचे चेंबर तसेच काही अंतरावरच सार्वजनिक विहीर देखील आहे. या तलाव शेजारून नेहमी ग्रामस्थांची ये-जा होत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव, विहिरी या तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. तर या अतिवृष्टीचा फटका काही तलाव, पाणी पुरवठा योजनांना बसला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात असलेल्या काही तलावांच्या भिंती खचलया आहेत.

त्यामध्ये पाटण तालुक्यातील वरेकरवाडी येथील तलावाचाही समावेश आहे. या तलावाच्या भिंतीचा भाग खचून त्याला मोठ्या भेगा पडल्याने तलाव फुटण्याची भीती आहे. तलाव फुटल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीसह विहीर, चेंबर व पाइपलाइनचेही नुकसान होऊ शकते. या परिसरातील यादववाडीत लगत असलेल्या पठारावरील पिण्याच्या पाणी पुरवठ्याची बंदिस्त विहीर, मोटार, पत्रे तसेच पाइपलाइनचीही हानी झाली आहे.

FPI ने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत काढले भारतीय बाजारपेठेतून 6,105 कोटी रुपये

नवी दिल्ली । परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) चालू आर्थिक वर्षात भारतीय भांडवली बाजारातून 6,105 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम काढली आहे. महामारी आणि देशाच्या विविध भागांमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून माघार घेत आहेत.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै दरम्यान बीएसईचा 30-शेअर सेन्सेक्स 3,077.69 अंक किंवा 6.21 टक्क्यांनी वाढला आहे. 16 जुलै 2021 रोजी सेन्सेक्सने 53,290.81 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. 15 जुलै रोजी तो 53,158.85 अंकांच्या ऑल टाईम हाय पातळीवर बंद झाला होता.

डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, FPI ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत इक्विटीमधून निव्वळ 6,707 कोटी रुपये काढले. या दरम्यान, त्याने कर्ज किंवा बॉण्ड मार्केटमध्ये निव्वळ 602 कोटी रुपये ठेवले. अशा प्रकारे त्याची निव्वळ रक्कम 6,105 कोटी रुपये झाली आहे.

FY22 मध्ये जून वगळता सर्व महिन्यांत विक्री
आकडेवारी दर्शवते की परदेशी गुंतवणूकदारांनी जून वगळता आर्थिक वर्षाच्या सर्व महिन्यांत विक्री केली. जूनमध्ये त्यांनी 13,269 कोटी रुपये जमा केले. एप्रिलमध्ये त्यांनी 9,435 कोटी रुपये काढले होते. त्याचबरोबर त्यांनी मे महिन्यात 2,666 कोटी आणि जुलैमध्ये 7,273 कोटी रुपये काढले.

नवीन गुंतवणूकदारांची नोंदणी वार्षिक आधारावर 2.5 पट वाढली
एस रंगनाथन, प्रमुख (संशोधन) LKP सिक्युरिटीज म्हणाले, “उत्साहवर्धक गोष्ट अशी आहे की, देशातील नवीन गुंतवणूकदारांची नोंदणी पहिल्या चार महिन्यांत दरवर्षी 2.5 पट वाढली आहे.”

मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (मॅनेजर रिसर्च) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की,”स्थानिक पातळीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन जूनपासून उठवणे सुरू झाले आहे. कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांची भावना सुधारली आहे.” ते म्हणाले की,”FPI ने जूनच्या मध्यापासून भारतीय शेअर बाजाराच्या दिशेने सावध पवित्रा घेणे सुरू केले. जुलैमध्येही त्यांची भूमिका कायम राहिली.”

प्राध्यापकेच्या पर्सची चैन काढून लांबवले पैसे; दोन महिलांना पोलिस कोठडी

औरंगाबाद | पडेगाव येथे 31 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका प्राध्यापिकेचेच्या पर्स चिचेन उघडून दोन हजारांची रोकड लांबवली होती. ही घटना 31 जुलै रोजी घडली होती. याबाबत प्राध्यापिकेने दोन महिलेवर संशय व्यक्त केला होता.

यावरून कर्नाटक राज्यातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोन महिलांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दीपा आणि सुनीता अशी त्यांची नावे आहेत. पैठण येथील जीवी जोसेफ चिट्टायत, वय – 52 (रा.शशी विहार) या धुळ्याच्या शिरपूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सकाळी नऊच्या सुमारास त्या औरंगाबाद धुळे बसने शिरपूरकडे जात होत्या.

त्यावेळी सहप्रवासी म्हणून त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोन महिलांसह त्यांच्या काही साथीदारांनी यांच्या पाठीमागील जिवी यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील दोन हजार रुपये चोरले. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आणि सुनीता यांना पकडण्यात आले.