Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3737

करमाड रेल्वे स्थानकावर मराठवाडा एक्सप्रेस थांबवा; रेल्वे राज्यमंतत्र्यांकडे मागणी

Marathwada Express

औरंगाबाद । औरंगाबादहुन जवळच असलेले, व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रगतशील गाव म्हणून करमाड प्रसिद्ध आहे. याठिकाणी डीएमआयसी प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे करमाड औरंगाबादकडे जाणारी मराठवाडा स्पेशल रेल्वे करमाड स्थानकावर थांबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

करमाड येथे एमायडिसी हा प्रकल्प उभा राहत आहे. शैक्षणिक तसेच. शैक्षणिक तसेच नोकरी निमित्ताने औरंगाबाद असा प्रवास करणारे शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. मराठवाडा स्पेशल रेल्वे गाडी नंबर 07788 ही सकाळी साडेनऊ वाजता तर संध्याकाळी गाडी नं. 07787 हि 6 वाजून 23 मिनिटांनी या परिसरातून जाते. या दोन्ही वेळी करमाड स्थानकावर सदरील रेल्वे गाडी थांबत नाही. सदरील रेल्वे गाडी करमाड येथे थांबल्यास हजारो मजूर विद्यार्थी व नोकरदार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

त्यामुळे मराठवाडा स्पेशल रेल्वे करमाड स्थानकावर थांबविण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मिकी जाधव, भास्कर शेठ वानखेडे, एकनाथ डोके बाबासाहेब शिंगारे, अजय शेरकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देणार; निलेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी उडाली आहे. शिवसेना भवन फोडण्यासाठी दोन पायांवर याल पण जाताना खांद्यावरून जाल असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावरच जाण्याची वेळ येईल. त्यास ‘येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!

व्यापाऱ्यांना मोठा दिलासा ! 5 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले GST रिटर्न करू शकतात Self Certify, आता CA ची गरज नाही

नवी दिल्ली केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेले GST करदाते त्यांचे वार्षिक रिटर्न Self Certify करू शकतील आणि त्यांना चार्टर्ड अकाउंटंटकडून अनिवार्य ऑडिट सर्टिफिकेशन घेण्याची आवश्यकता राहणार नाही. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात CBIC ने या संदर्भात निर्देश जारी केले आहेत.

GST अंतर्गत, 2020-21 साठी, 2 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या वगळता सर्व घटकांना वार्षिक रिटर्न -GSTR-9/9A- भरणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त, 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना GSTR-9C स्वरूपात सामंजस्य तपशील सादर करणे आवश्यक होते. ऑडिटनंतर चार्टर्ड अकाउंटंटद्वारे या तपशीलाची पडताळणी केली जाते.

अधिसूचनेद्वारे GST नियमांमध्ये सुधारणा
CBIC ने अधिसूचनेद्वारे GST नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना वार्षिक रिटर्नसह Self-Certify समाधान तपशील सादर करावा लागेल. यासाठी CA च्या सर्टिफिकेशनची आवश्यक नाही.

करदात्यांना दिलासा
एएमआरजी आणि असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की,”सरकारने व्यावसायिक पात्र चार्टर्ड अकाउंटंटकडून GST ऑडिटची आवश्यकता पूर्ण केली आहे. आता करदात्यांना स्वत: ची पडताळणी करून वार्षिक रिटर्न आणि समेट तपशील सादर करावा लागेल. ते म्हणाले की,”यामुळे हजारो करदात्यांना अनुपालनाच्या आघाडीवर दिलासा मिळेल परंतु जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे वार्षिक रिटर्नमधील चुकीच्या विधानांचा धोका वाढेल.”

घरफळा, पाणीपट्टी माफीसाठी श्रीकांत घोडके यांचे कराड पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड शहरातील नागरिकांची सण २०२०-२०२१ सालची घरफाळा व पाणीपट्टी सरसकट माफ करावी अशी मागणी करीत सुधारक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत घोडके यांच्यावतीने सोमवारपासून कराड पालिकेसमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे बंद पडलेल्या उदोग धंद्यामुळे व्यावसायिक, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची पालिकेने घरफळा, पाणीपट्टी रक्कम माफ करणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे आम्ही उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत घोडके यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष घोडके म्हणाले कि, कराड शहरातील नागरिकांची सण २०२०-२०२१ सालची घरफाळा व पाणीपट्टी सरसकट माफ करावी, या मागणीचे निवेदन कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले होते. तसेच शहरात काळे झेंडे लावून आंदोलनही केले होते. मात्र, त्याबाबत पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या विरोधात आम्ही उपोषण करू असा इशाराही दिला होता. त्यानुसार आम्ही आजपासून नगरपालिकेच्या बाहेर लक्षणीय उपोषणास सुरुवात केली आहे.

आज कराड शहरात कोरोना, अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या लॉकडाउनच्या नियमांमुळे व्यापारी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही लोकांचे तर हातावरचे पोट आहे. त्यांना काम केल्यानंतर पैसे मिळतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काम नसल्याने घरखर्च भागवणे त्यांना अवघड होऊन बसले आहे. अशात कराड पालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी कशी भरायची? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे पालिकेने त्यांची तत्काळ घरपट्टी व पाणी[पट्टी माफ करावी, जोपयांत पालिकेकडून आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी घोडके यांनी दिला आहे.

राज कुंद्राच्या अटकेबद्दल शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी, म्हणाली,”गेले काही दिवस खूप त्रासदायक होते…”

Shilpa Shetty- kundra

नवी दिल्ली पती राज कुंद्रा पॉर्न फिल्मशी संबंधित प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदा तिच्या वतीने काही सांगितले आहे. शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. शिल्पा शेट्टी म्हणाली,”होय, गेले काही दिवस तिच्यासाठी खूप कठीण गेले आहेत.” गेल्या महिन्यात राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म बनवल्याबद्दल आणि काही एप्सद्वारे प्रकाशित केल्याबद्दल अटक केली आहे. राज अजूनही पोलीस कोठडीतच आहे.

शिल्पा शेट्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘होय, गेले काही दिवस माझ्यासाठी प्रत्येक प्रकारे खूप कठीण गेले आहेत. मीडिया आणि माझ्या हितचिंतकांकडून माझ्यावर अनेक आरोप आणि अफवा पसरवल्या गेल्या आहेत. अनेक लोकांनी मला ट्रोल केले आहे आणि बर्‍याच लोकांनी मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही प्रश्न विचारले आहेत. मी अद्याप यावर काहीही सांगितले नाही.’

shilpa shetty, raj kundra

शिल्पा पुढे म्हणते-“या विषयावर पुढे काहीही बोलण्यापासून मला दूर राहायला आवडेल. मी या प्रकरणावर काहीही बोलणार नाही, म्हणून कृपया माझ्या बाजूने खोट्या बातम्या पसरविणे थांबवा. एक सेलिब्रिटी म्हणून, “कधीही तक्रार करू नका, कधीही समजावून सांगू नका” या तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार करताना, मला एवढेच सांगायचे आहे की, मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या तपासावर पूर्ण विश्वास आहे.”

“एक कुटुंब म्हणून, आम्ही सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या फायद्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि तुम्हाला त्याची सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट मिळालेल्या माहितीवर कमेंट करण्यापासून दूर रहा.”

“मी एक अभिमानी कायद्याचे पालन करणारी भारतीय नागरिक आहे आणि गेली 29 वर्षे एक मेहनती व्यावसायिक आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी कधीही कोणालाही निराश केले नाही. म्हणून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी तुम्हाला विनंती करते की या काळात माझ्या कुटुंबाचा आणि ‘माझा हक्क’ प्रायव्हसीचा आदर करा. आम्ही मीडिया ट्रायल डिझर्व करत नाही. कृपया कायद्याला आपले काम करू द्या.”

सत्यमेव जयते ! सकारात्मकता आणि कृतज्ञतेसह. शिल्पा शेट्टी कुंद्रा.

दोषी आढळल्यास मोठी शिक्षा

राज कुंद्रा अजूनही पोलीस कोठडीत आहे. जर पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळला तर त्याला बराच काळ तुरुंगात काढावा लागू शकतो. कारण आपल्या देशाचा कायदा पोर्नोग्राफीबाबत अत्यंत कडक आहे. पोर्नोग्राफीच्या प्रकरणात आरोपींविरोधात आयपीसीच्या अनेक कलमांसह तसेच आयटी कायद्याखाली खटला चालविला जातो. त्याचबरोबर देशात तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रवेशामुळे आयटी कायद्यात सुधारणाही करण्यात आल्या आहेत.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आणखी कोरोना चाचण्या वाढविणार

corona test

औरंगाबाद | संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मनपा पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देणार आहे. सध्या शहरात अँटीजन व आरटीपीसीआर म्हणून अडीच हजारापर्यंत चाचण्या केला जात आहे ही संख्या पाच हजारापर्यंत लिहून सुपर स्पेडर गटांच्या चाचण्या वाढविल्या जातील अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असल्याची भीती तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे पालिकेने शहराच्या इंट्री पॉईंटवरील चाचण्या अजूनही सुरूच ठेवल्या आहेत याशिवाय आरोग्य केंद्रे 9 सरकारी कार्यालयासह विमानतळ रेल्वे स्टेशन येथे नियमित चाचण्या सुरू आहेत.

तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी सुपर स्पेडर गटातील अर्थात ज्यांचा अधिक लोकांशी संपर्क येतो कारखान्यातील कामगार दुकानदार सरकारी कर्मचारी आदींच्या चाचण्या करण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एकूण परिस्थितीचा रोज आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

पूरग्रस्तांच्या पॅकेज मध्येही वाजे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे; भाजपचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती  कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथील पूरग्रस्तांना धीर दिला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की ,म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली दिली आहे का ? पूरग्रस्तांचा पॅकेज मध्येही वाजे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की ‘घड्याळा’ची वेळ चुकलीय?

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले-

हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत. कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांसाठी जे जे करता येईल ते ते प्रामाणिकपणे मी करेन हे माझे जनतेला वचन आहे. तुम्ही सरकारला साथ द्या. आपण कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा काढू असे उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे म्हंटल

मनसेसोबत युतीसाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल- चंद्रकांत पाटील

raj thackarey chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी मनसे- भाजप युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता मनसेसोबतच्या युतीसाठी केंद्राची परवानगी लागेल अस मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. तसेच मनसेसोबत च्या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.

राज ठाकरेंच्या परप्रांतीय लोकांच्या भूमिकेबद्दलची क्लिप मी ऐकली आहे. माझ्या मनात काही शंका आहेत. त्याबाबत येत्या 2 दिवसांत मी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मुदतवाढ करूनही मोफत प्रवेशासाठी 1187 जागा रिक्त

RTE
RTE

औरंगाबाद | आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी करण्यात आलेल्या 25% जागांवरील मोफत प्रवेश आला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी तीन वेळा मुदतवाढ देऊनही 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत.

आरटीआय प्रवेशासाठी गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीनेच लकी ड्रॉ काढण्यात आला नियमांचे पालन करत दिलेल्या मुदतीत पात्र पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी आरटी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक 31 जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून तीन वेळा मुदतवाढ करूनही औरंगाबाद मध्ये 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत.

शनिवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादमध्ये 2 हजार 438 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर 1470 जणांचे तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तरीदेखील 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत. सोमवारपर्यंत प्रवेशासाठीची पुढील प्रक्रिया कळविण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.