Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3748

आमची सुद्धा इच्छा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर देखील निशाणा साधला. राज्यातील विरोधी पक्ष मोकळा आहे. मोकळा माणूस असतो तेव्हा डोक रिकामं असते त्यामुळे ते असे आरोप करत असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार अंतरवादामुळे पडणार असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मात्र हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. यामुळे उरलेल्या या तीन वर्षांच्या काळामध्ये कोणी पुन्हा येण्याची शक्यता नाही अस म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला.

पॉर्न स्टारच्या मुलाने आपल्या समस्या लोकांना सांगितल्या, शाळेत मुले दाखवतात आईचे अश्लील फोटो

नवी दिल्ली । काही काळापूर्वी काही पॉर्न स्टार्सनी एडल्ट फिल्म इंडस्ट्रीच्या काळ्या जगाबद्दल खुलासा केला होता. पॉर्न स्टार डिप्रेशन (Dark Secrets Of Porn Industry) मध्ये कसे जातात हे त्यांनी शेअर केले. फिल्मचे चित्रीकरण केल्यानंतर त्यांना एकटेपणा आणि समाजातून निंदा मिळते. दरम्यान, आता सोशल मीडियावर, एका एडल्ट स्टारच्या 13 वर्षांच्या मुलाने इतर मुलांनी त्याच्या आईमुळे त्याला शाळेत कसा त्रास दिला हे शेअर केले आहे. त्याने सांगितले की, त्याच्या आईमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येत आहेत.

या मुलाची आई एका एडल्ट वेबसाइटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. मुलाला त्याची आई प्रत्यक्षात काय करते हे माहित नव्हते. जेव्हा मुलाच्या शाळेतील मित्रांनी त्याला त्याच्या आईची अश्लील छायाचित्रे दाखवून त्याला चिडवण्यास सुरुवात केली तेव्हा हे वास्तव समोर आले. मुलाने ऑनलाईन सांगितले कि, जेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला त्याच्या आईचे फोटो दाखवले तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकजण तिला चिडवू लागला आणि शाळेत त्याच्या आईचे नग्न फोटो शेअर करू लागला.

आईने स्पष्ट केले

जेव्हा ही छायाचित्रे मुलाच्या शाळेत व्हायरल झाली तेव्हा मुलाने त्याच्या आईला त्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले. मात्र, त्याच्या आईने आपल्या सेक्स वर्कची तुलना सुपरमार्केटमध्ये काम करण्याशी केली. त्याच्या आईने सांगितले की,”तो या प्रकरणावर ओव्हर रिएक्ट करत आहे.” मुलाने सोशल मीडिया साइट Reddit वर आपली समस्या शेअर केली. त्याने लिहिले की,’तो 13 वर्षांचा आहे आणि त्याची आई 33 वर्षांची आहे. पण त्याची आई पॉर्न स्टार आहे. यामुळे, आता त्याचे आयुष्य खूप बदलले आहे.’

शाळेत मुले हसतात 

पॉर्न स्टारच्या मुलाने सांगितले की,”त्याच्या आईमुळे त्याला शाळेत खूप लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्याचे वर्गमित्र त्याला त्याच्या आईचे नग्न छायाचित्रे दाखवतात. त्याला आता जगायचे नाही. तो अनेक दिवसांपासून शाळेतही गेलेला नाही. तो शाळेत जातो तेव्हा प्रत्येकजण त्याला चिडवतो. काही शाळेतील काही मुले त्याच्या आईला फॉलो करतात. पण या मुलाची सर्वात मोठी समस्या अशी आहे की, जेव्हा त्याने आपली समस्या त्याच्या आईला सांगितली तेव्हा त्याच्या आईने त्याला ओव्हरड्रामा म्हटले. त्याची आई सांगते की, सेक्स वर्कर असणे आणि सुपरमार्केटमध्ये काम करणे या एकसारख्याच गोष्टी आहेत.

लोकांनी मुलाला सपोर्ट केला

सोशल मीडियावर त्यांचे दु: ख शेअर केल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट केली. अनेक लोकांनी लिहिले की, त्याने धैर्याने राहणे आवश्यक आहे. लोकांनी त्याला आत्महत्या करू नकोस असे सांगितले. त्यांनी लिहिले की, ही वेळही निघून जाईल. त्याच वेळी, अनेक लोकांनी मुलाच्या आईला बरेच काही सांगितले. 13 वर्षांच्या मुलाला ज्या गोष्टीचा सामना करावा लागतो त्याबद्दल बहुतेक लोकांनी त्याच्या आईला दोष दिला.

कुठेही गेला तरी तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तुम्ही कुठेही गेला तरी तुमची ओळख ही शिवसैनिकच आहे. हा नारायण राणे…हा अमुक तमुक अस कोणी म्हणत नाही. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला. ते अहमदनगर येथे बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, शिवसैनिक हेच पद पक्षातील सर्वश्रेष्ठ पद आहे असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही कुठेही गेला तरी तुमची ओळख ही शिवसैनिकच आहे. हा नारायण राणे…हा अमुक तमुक अस कोणी म्हणत नाही अस म्हणत राऊतांनी राणेंवर निशाणा साधला.

जे लोक शिवसेना सोडून गेले ते कुठेही गेले तरी मनाने शिवसैनिक म्हणूनच राहतात. हीच बाळासाहेबांची ताकद आहे, हीच शिवसैनिकाची ताकद आहे .संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. असं संजय राऊत यांनी म्हंटल.

10 हजारापेक्षा जास्त बेकायदेशीर फार्महाऊस असल्याचा संशय- प्रशासन

Farmhause

औरंगाबाद | जिल्ह्यातील बेकायदेशीर फार्महाऊस असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून तलाठ्यांना सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला आहे. फार्महाऊस बांधण्यासाठी ‘महसूल एनए’ यापैकी कोणतीही परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बांधकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते. परंतु विनापरवानगी दहा हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असल्याचा संशय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

मागील महिन्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका फार्महाऊसवर कोरोनाचे नियम फेटाळून लावत कव्वालीचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमामध्ये खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात फार्महाऊसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. खुलताबाद, पैठण, सोयगाव, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यात भरपूर फार्म हाऊस असून ते व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फार्म हाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कुठेही परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही. काहीजणांनी या फार्महाऊसचा वापर पर्यटनासाठी केल्याचे दिसून येत आहे. या फार्महाऊस चा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागेल. त्यांनी एन ए त्या प्रादेशिक विकास आराखड्याचा विचार करून बांधकाम केले नसेल तर त्यांना दंड भरावा लागेल असे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.

केंद्राने भेदभाव न करता मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे मात्र केंद्र सरकारनेही मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे

पुणे – मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरण : रेल्वेचा शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट मोबदल्याच्या चेकचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पार्ले, बाबरमाची, सयापुर, यशवंतनगर, शिरवडे येथील शेतकऱ्यांना पुणे – मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या चेकचे वाटप करण्यात आले.

यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्प बाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटील उपस्थित होते.

गेली तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासना विरोधात लढा सुरु आहे. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दिचे खांब उभे केले होते. शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. यावेळी शेतकऱ्यांना सोबत घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांना सोबत घेवून शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केला. रेल्वेची विना मोबदला सुरु असलेली कामे सचिन नलवडे यांनी बंद केली होती. त्यानंतर तात्कालीन खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल, कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे, भुसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सातबाऱ्या प्रमाणे मोजण्याचे ठरले होते.

त्यानुनार कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनिची मोजणी करण्यात आली. मोजणीमध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनिच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले. आज वरील 5 गावातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव क्षेत्रासह बागायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळला आहे. जमिनीला 5 लाख, दीड लाख रुपये गुंठ्याप्रमाणे तर बाधित होणाऱ्या फळ झाडांना पुढील पिक गृहीत धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णयानुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय : सचिन नलवडे

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून या आंदोलनासाठी विविध गावातील जेष्ठ लोकांनी सहकार्य केले. कराड विमानतळ भुसंपादन अनुभव समोर असल्याने तूटे पर्यन्त न ताणता प्रमुख मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी भुसंपादनास सहमती दिली. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरु राहणार आहे. काही शेतकऱ्यांना जिरायती दर देण्यात आला होता, तो बागायती करण्यात आला असून अजून काही गावातील भुसंपादनात जाणारे गट रेल्वे प्रस्तावात नसल्याने ते गट घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरु असल्याचे शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी सांगितले.

कोविड रूग्ण मृत्यू दर कमी करा – जिल्हाधिकारी

sunil chavhan

औरंगाबाद | कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केलेली आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा शोधदेखील घेतलेला आहे. या अभ्यासातून आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी; त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोविड आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, कोविड-19 विषाणूच्या प्रसारामुळे अनेकजणांना कोरोना आजारामुळे जीव गमवावे लागले. कोरोना आजारावर वेळेत, योग्य उपचार घेतल्याने जिल्ह्यातील एक लक्ष 43 हजार 550 रूग्ण बरे झाले. सध्या जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होते आहे. परंतु अजूनही कोविडचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे. त्याचबरोबर प्राधान्याने लसही घ्यावी.
आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह असलेल्या कोविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा. नागरिकांच्या चाचण्या करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. रिक्षा चालक, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आदी सुपर स्प्रेडर असणाऱ्या व्यक्तींचीही चाचणी करावी. म्युकरमायकोसिसच्या आवश्यक औषधी उपलब्धतेबाबतही खात्री करावी. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी चार प्लांट उभारलेले आहेत. उर्वरीत प्लांट लवकरात लवकर उभारावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत डॉ.येळीकर, डॉ. मंडलेचा, डॉ. कुलकर्णी, डॉ. पाडळकर यांनीही कोविडबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांना करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

• डॉक्टरांना प्रशिक्षण –
संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. यामध्ये आयसीयू, व्हेंटीलेटरसह एकूण 631 बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये 45 व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून 28 व्हेंटीलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले आहेत. जवळपास 300 डॉक्टरांना लहान बालकांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत धाडसी चोरी; व्यापाऱ्यांमध्ये दहशत

Theif

औरंगाबाद | शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ तसेच नेहमी गजबजलेले असलेल्या औरंगपुरा भागातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या व्यंकटेश इलेक्ट्रीकल्समध्ये गुरुवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान धाडसी चोरी झाली. यात दिड ते दोन लाख रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक समान चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे इमारतीत लावलेले सीसीटीव्ही चोरट्यांनी वाकवून टाकले. एकंदरीतच या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहिती नुसार, औरंगपुरा भागात व्यंकटेश इलेक्ट्रीकल नावाचे संतोष जेथलिया यांचे होलसेल इलेक्ट्रोनिक पार्ट्सचे दुकान आहे. गुरुवारी नित्यव्यवसायाची रोख रक्कम दुकानात ठेवून चारच्या दरम्यान ते दुकान बंद करून घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात अंधार असल्याने चोरट्यांनी दुकानाच्या आत मध्ये स्वतःसोबत आणलेले कागद जाळले. त्यानंतर त्या प्रकाशात त्यांनी दुकानाचा गल्ला शोधून त्यातील अंदाजे दिड ते दोन लाखांची रोकड लंपास केली. तसेच इलेक्ट्रोनिकचे महागाचे साहित्य देखील चोरून तेथून पोबारा केला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याच इमारतीत असलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या लक्षात आले कि, व्यंकटेश इलेक्ट्रीकलचे शटर उघडे आहे. त्यानंतर त्यांनी जेथलिया यांना संपर्क केला. त्यांनी तात्काळ दुकानात धाव घेत, पोलिसांना बोलावले.

दरम्यान, दुकानाचे मालक जेथलिया यांनी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्यामुळे दुकानातील किती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला हे कळू शकले नाही. पोलिसांनी सुरुवातीला पाहणी करत, श्वान पथकाला पाचारण केले. श्वान इमारतीच्या मागील गेट पर्यंत जाऊन घुटमळत तेथेच थांबले. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात दोन संशयित निष्पन्न झाले असून पोलीस त्यांच्याबद्दल माहिती काढत आहे. घटनास्थळी सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, गुन्हे शाखेचे सपोनि मनोज शिंदे यांच्यासह पथकाने भेट दिली.

सातारा नगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार, 70 कर्मचाऱ्यांची टीम सज्ज

Satara Corporation

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा नगरपालिकेने पावसाळा सुरू असल्याने शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाल्यास आपत्ती निर्माण होण्याची शक्‍यता असून आपत्तीचे निवारण करण्यासाठी व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात 70 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे सातारा शहरातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत नगरपालिकेकडून योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सातारा नगरपालिकेने खबरदारी घेतलेली आहे. शहरात धोकादायक ठिकाणे तसेच कोणतीही आपत्ती येवू नये, यासाठी आराखडा तयार केलेला आहे. या कमिटीतील कर्मचारी हे नागरिकांच्या हितासाठी काम करतील, तसेच कोणतीही आपत्ती आल्यास नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

‘विज पुरवठा का खंडित केला’ म्हणत महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

Crime

औरंगाबाद | विज बिलाच्या वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिका-यांना आमचा विज पुरवठा का खंडित केला म्हणत तिघांनी मारहाण केल्याच्या दोन घटना गुरुवारी दुपारी अंबरहिल आणि माळीवाडा भागात घडल्या. विठ्ठल तुकाराम औताडे (२२, रा. हरिओमनगर), भारत साहेबराव शेजवळ (२८) आणि शरद अनिल लोखंडे (३०, दोघेही रा. माळीवाडा) अशी मारहाण करणा-या तिघांची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे (४३) हे दुपारी थकबाकीदारांकडे वसूलीसाठी गेले होते. सुर्वे हे अंबरहिलकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या औताडे याने आपला विज पुरवठा खंडीत का केला असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. तसेच सुर्वे यांच्या दुचाकीची चावी काढून घेत त्याने मारहाण केली. याशिवाय विज पुरवठा पुन्हा सुरळीत केल्यावरच दुचाकीची चावी देतो असे म्हणत वाद घातला. त्यामुळे सुर्वे यांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांनी कळवत तक्रार दिली.

दुसऱ्या घटनेत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कारभारी वाघमारे (३१) आणि दुर्योधन नारनवरे असे दोघे थकीत विज बिल वसुलीचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना भारत शेजवळ आणि शरद लोखंडे यांनी वाघमारे व त्यांचे सहकारी नारनवरे यांना मारहाण करुन धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.