Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3747

नैसर्गिक आपत्तींवर स्वतंत्र मंत्रालय हवे -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

कराड | भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीसह घटना घडत आहे. त्याचा अभ्यास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असते. काहीवेळी सरकार त्याबाबत अभ्यास गट नेमते. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालाकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. तेथे चूक होते. अशा अहवालाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे.

दोन वर्षांत राज्यावर तीनवेळा नैसर्गिक आपत्ती आली. यावरून आपत्तींचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे असं फडणवीस म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या सहाय्याने धरणे, नद्यांचे पाणी कालव्याने दुष्काळी भागांना देण्याची योजना आखली होती. ही योजना पूर्ण होण्यास सात वर्षे लागली असती. मात्र, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय सद्याच्या स्थितीत दिसत नाही. असे फडणवीस यांनी म्हंटल

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक

Corona 3rd way

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचा प्रभाव दिसत आहे. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेतील त्रुटी ओळखून तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. या तिसर्‍या लाटेत बालकांना धोका असल्यामुळे त्यादृष्टीने प्रशासनाने आयसीयु, व्हेंटिलेटर, 631 बेड, 45 व्हेंटिलेटर बालकांसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर 28 व्हेंटिलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत तीनशे डॉक्टरांना लहान बाळांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोरोनाची आढावा बैठक पार पडली. यावेळेस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगिता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलचा, डॉक्टर नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी हे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणा यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा. नागरिकांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देऊन रिक्षाचालक, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार या सुपर स्प्लेंडर असणाऱ्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच आवश्यक औषध उपलब्ध आहे की नाही याबाबत खात्री करावी. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्लांट उभारले आहेत. उर्वरित प्लांट लवकरात लवकर उभारण्यात यावे असे निर्देश चव्हाण यांनी दिले आहे.

हाजीर हो ! सोमवारपासून खंडपीठात होणार प्रत्यक्ष सुनावणी

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद | कोरोनामुळे नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज सुरू होते. त्यातही केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी काढलेल्या आदेशानुसार औरंगाबाद खंडपीठ आज सोमवार दिनांक दोन ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.

सकाळी साडेदहा ते दिड व दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत सुनावणी सुरू असणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत खंडपीठाच्या न्यायमूर्तींचे सुनावणीच्या संदर्भाने वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजात शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन केले जात होते. मात्र ऑनलाईन पद्धतीने प्रकरणावरील सुनावणीच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू होती. न्यायमूर्तींसह वकीलही ऑनलाइन पद्धतीच्या कामकाजात सहभाग घेत होते.

एसटी चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; बसमध्ये सापडलेले लाखोंचे दागिने केले परत

ST

औरंगाबाद | आजच्याघडीला जर एखाद्याला दुसऱ्याची एखादी मौल्यवान वस्तू सापडली तर बहुतांश लोकं ती वस्तू परत करत नाहीत. परंतु औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या एका चालक आणि वाहकांनी आपल्या बसमध्ये सापडलेले तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दागिने त्याच्या मूळ मालकाला परत केले आहेत. यामुळेच एसटीचा प्रवास सुरक्षित आहे, असे मानल्या जाते. एसटीच्या चालक वाहकांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून बोलठाण ते वाकला या मार्गावर मुक्कामी बस जाते. या बसमध्ये दि. १७ जुलै रोजी प्रवास करताना एका महिलेचे मौल्यवान दागिने त्यामध्ये ८० मणिचे मणिमंगळसूत्र, कानातील फुल आणि वेल यासोबत इतरही काही सामान अनावधानाने बस (एमएच २० बील ३२७१) मध्ये विसरून राहिले. रात्री आपली ड्युटी संपल्यावर बस चेक करत असताना बसचे चालक एस.एम. स्वामी आणि वाहक के.एस. तारू याना हे मौल्यवान वस्तू आढळून आल्यावर, त्यांनी त्याच्या मोहात न अडकता त्या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडे सुपूर्द केल्या. त्यांनतर आगार प्रमुखांनी सर्व बाबींची शहनिशा करत दीड लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू संबंधित महिलेला परत केल्या.

एसटीच्या चालक वाहकांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकंदरीतच त्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.

नितीन गडकरींच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज; उद्धव ठाकरेंनी केलं तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केलं. जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात होत तेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे गडकरींच्या कारकिर्दीत उभारण्यात आला याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच महाराष्ट्राला तुमची अजून गरज आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, गडकरींकडच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचं हित सांभाळात काम करायचं आहे. जे काही करायचे ते मजबूत करायचं आहे. कितीही पाऊस पडला तरीही बाधा येणार नाही, असं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे,अस उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वप्न प्रत्यक्षात आणणं यासाठी मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी करतो किंवा बघतो असं म्हटलं असतं. मात्र, तुम्ही ते करून दाखवलं.आत्ताची तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

राज कुंद्रा आणि वाझे यांच्यात काही देवाणघेवाण झाली आहे का? राम कदमांनी उपस्थित केली शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा यांनी गॉड गेम मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केला असता आरोप करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांनी आता अजुन 1 शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात काही देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाजेचे साहेब पण सहभागी आहेत का? अशा शंका राम कदम यांनी उपस्थित केल्या आहेत.

राम कदम यांनी ट्विट करून काही सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात कि, ‘४ फेब्रुवारी २०२१ मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. मुंबईतल्या मड भागात ग्रीनपार्क या बंगल्यात पॉर्न फिल्मचं चित्रीकरण होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला होता. त्यावेळी गुन्हे शाखेत सचिन वाझे हे वसुलीबाज अधिकारी होते.

तेव्हा ९ लोकांना अटक करण्यात आली होती आणि १० वा होता राज कुंद्रा. पण त्याला अटक करायला ५ महिने १५ दिवस का लागले? त्याला कोण वाचवत आहे? वाझे आणि राज कुंद्रा या दोघांच्यात काही बोलणं, भेटणं किंवा देवाणघेवाण झाली आहे का? या गोरखधंद्यात वाझेचे साहेब पण सहभागी होते का? कोणाच्याही आशिर्वादाशिवाय कुंद्रा ५ महिने १५ दिवस अटकेपासून कसा काय वाचला?’ असा सवाल आता राम कदम यांनी उपस्थित केला आहे

शासकीय कार्यालयातील लँडलाईन धूळ खात; कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अडचण

landline

औरंगाबाद | राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर टाळून लँडलाईन फोनचा वापर करावा असे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी खाजगी मोबाईल वापरत असल्यामुळे नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येते. त्याचबरोबर पैठण तालुक्यात साधारणपणे सर्वच शासकीय लँडलाईन बंद आहेत.

नागरिकांकडे शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयात छोट्या कामासाठीही यावे लागते. लँडलाईन चालू असला की छोट्या कामांसाठी ये-जा करावी लागत नाही. शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयातील दूरध्वनी कधी सुरू होतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक मोबाईलचा शासकीय कामासाठी वापर करत असल्याचे दिसून आले. लँडलाईन फोन बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीचे वाटते. मात्र सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे.

पैठण तालुक्यातील पैठण तहसील कार्यालय, नगर परिषद, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, अग्निशमन न.प., महावितरण उपविभाग कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय, कार्यकारी अभियंता पाटबंधारे जायकवाडी विभाग, सहायक कार्यकारी अभियंता दगडी धरण उपविभाग, जायकवाडी कार्यकारी अभियंता नियंत्रण व संपर्क अधिकारी, बसस्थानक पैठण आगार, मराठवाडा प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोड, आडूळ, विहामांडवा व बिडकीन, अग्निशमन एम.आय.डी.सी., वजन मापे निरीक्षक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण या कार्यालयातील लँडलाईन बंद आहेत.

Gold Price : सोने 7 हजारांपर्यंत होत आहे स्वस्त, आता खरेदी केल्यावर तुम्हाला होणार मोठा फायदा; तज्ञ काय सल्ला देत आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता सोने खरेदी केल्यास गुंतवणुकीच्या दृष्टीनेही नफा मिळू शकेल. वास्तविक, पुन्हा एकदा सोन्यातील उत्साह वाढताना दिसत आहे. शुक्रवारी, जुलैच्या शेवटच्या व्यापारी दिवशी (30 जुलै) सोने-चांदीच्याकिंमतीत वाढ झाली. दुसरीकडे, MCX वरील किंमत पुन्हा 48,000 च्या पुढे गेली आहे. तथापि, असे असूनही, सोने त्याच्या सर्वकालीन उच्च 5,6254 रुपयांपासून सुमारे 7,831 रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिवळा धातू त्याच्या सर्वकालीन उच्च पातळीवर होता. डॉलरमधील कमकुवतपणा आणि फेडरल रिझर्व्हच्या नरम भूमिकेमुळे सोन्याला आधार मिळाला आहे.

सोन्याची हालचाल पहा
COMEX वरील सोने 6 आठवड्यांच्या उच्च पातळीच्या जवळ व्यवहार करत आहे. MCX वर, सोन्याची किंमत 48,300 च्या वर गेली आहे. डॉलरची नरमाई, फेडरल रिझर्व्हची भूमिका यामुळे सोन्याला आधार मिळत आहे. दुसऱ्या सहामाहीत भारताची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. पहिल्या सहामाहीत भारताची मागणी 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा 35% कमी आहे. बाजारातील तज्ञ हे सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ सांगत आहेत, कारण दिवाळीपर्यंत सोने अधिक महाग होईल. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना फायदा होईल.

चांदीत मंदी
कालच्या जोरदार प्रवेगानंतर, वेगावर ब्रेक लावले गेले आहेत. डॉलरमध्ये कमजोरी, फेडच्या नरम भूमिकेला पाठिंबा मिळत आहे. चांदीला तेजीच्या धातूचा आधार मिळत आहे. शुक्रवारी चांदी 232 रुपयांनी वाढून 68113 रुपये झाली, तर सराफा बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 65 रुपयांनी महाग होऊन 48423 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तथापि, असे असूनही, सोने त्याच्या सर्वकालीन उच्चतम 56254 रुपयांपासून सुमारे 7831 रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात, पिवळ्या धातूने त्याच्या सर्वकालीन उच्च लेबलला स्पर्श केला.

EMI वर स्वस्त सोने खरेदी करा
जर तुमच्याकडे कमी पैसे असतील पण तुम्हाला आवडलेल्या दागिन्यांची किंमत जास्त असेल तर AGMONT- तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. AGMONT EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. यासाठी फक्त तुम्हाला सुरुवातीला 20% डाउन पेमेंट करावे लागेल. 20 टक्के पेमेंट केल्यानंतर EMI फिक्स होतो. डिलिव्हरी हरवलेल्या EMI पेमेंटच्या 10 दिवसांच्या आत आहे. AGMONT चा हा EMI पर्याय कमी उत्पन्न घेणाऱ्यांसाठी खूप चांगला आहे. यासाठी ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त किंमत मोजावी लागणार नाही.

आमची सुद्धा इच्छा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर देखील निशाणा साधला. राज्यातील विरोधी पक्ष मोकळा आहे. मोकळा माणूस असतो तेव्हा डोक रिकामं असते त्यामुळे ते असे आरोप करत असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार अंतरवादामुळे पडणार असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मात्र हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. यामुळे उरलेल्या या तीन वर्षांच्या काळामध्ये कोणी पुन्हा येण्याची शक्यता नाही अस म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला.