Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3751

अमित शहांनी वेळीच पावले उचलावी अन्यथा…; आसाम- मिझोराम वादावरून शिवसेनेचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोराममध्ये सीमावादावरून संघर्ष उफाळून आला. या संघर्षांच्या हिंसक ठिणग्याही उडाल्या. या हिसेंचे पडसाद संसदेतही उमटले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या दोन्ही राज्यातील वादावर चिंता व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.

हिंदुस्थानातील काही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये हिंदुस्थानच्याच नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंड हिंदुस्थान या संकल्पनांना तडा देणारे हे प्रकरण आहे. असे शिवसेनेने म्हंटल आहे.

आसाम आणि मिझोराममधील जमिनीचा वाद आज वरवर शांत दिसत असला तरी खदराद्ध कायम आहे. ही दोन्ही राज्ये संवेदनशील व देशाच्या सीमेवर आहेत. ईशान्येकडील राज्ये अशांत राहणे म्हणजे बाहय शत्रूंना वाव देण्यासारखे आहे. आसाम आणि मिझोराम ही दोन राज्ये 165 किलोमीटर सीमांचे एकत्रित धनी आहेत. हा वाद ब्रिटीश काळापासून आहे.

एका बाजूला आपण म्हणायचे की, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे, अनेकतामध्ये एकता आहे, पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? हिंदुस्थानी संस्कृतीवर चर्चा आपण करतो तेव्हा काय सांगतो? येथे केवळ दुःखं वाटून घेतली जातात. त्याच वेळी आपण जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांवरून खुनी खेळ करीत आहोत. जम्मू-कश्मीरात अशांतता आहेच. त्यात आसाम-मिझोरामच्या जमिनीच्या भांडणात रक्तपात झाला आहे. दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या. यास देशांतर्गत युद्धच म्हणावे लागेल. याचा फायदा बाजूचे शत्रू राष्ट्र उठवल्याशिवाय कसे राहतील? असा सवाल शिवसेनेने केला.

आसामविरुद्ध मिझोराम असेल, नाहीतर महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमावाद असेल. पाणीवाटपापासून जमिनीचा, जंगलाच्या भांडणाचा मुद्दा असेल, केंद्र सरकार राजकीय सोय पाहून स्वतःची कातडी वाचवत असते. कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला दमदाटया करून राजकीय माहोल निर्माण करता येतो. तसा राज्यांतर्गत प्रश्नी करता येत नाही हेच त्यामागचे कारण. प्रसंगी कटुता घेऊन न्याय करणारे रामशास्त्री बाण्याचे सरकार अजून देशात जन्माला यायचे आहे. तोपर्यंत राज्याराज्यांचे मिझोरामी झगडे सुरूच राहतील. असे शिवसेनेने म्हंटल. आसाम मिझोराम वादामुळे देशाच्या अखंडतेला तडे जातील. हे देशाला घातक आहे. गृहमंत्री शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांना नोटीसा; आयुक्तांचे आदेश

Astikkumar pande

औरंगाबाद | शहरातील टीव्ही सेंटर भारत माता क्रीडांगण जवळील दोन उंच (ईएसआर) पाण्याच्या टाक्याच्या फुटीगंचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय संतप्त झाले असून, यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेअंतर्गत टीव्ही सेंटरच्या भारत माता क्रीडांगणाच्या दक्षिणेला सुरू असलेल्या दोन उंच (ईएसआर) पाण्याच्या टाक्यांच्या पायाभरणीचे फुटींगचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिका च्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

पाणी पुरवठा व पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सोमवारी, २ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता एस.डी .पानझडे यांनी दिली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल शहरातील विविध कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी चिश्चिया कॉलनी येथे भेट दिली. तेथील रस्त्याची व ड्रेनेज ची पाहणी केली. माजी नगरसेवक अंजू नाईकवाडी यांनी त्यांच्या वार्डातील मातीच्या रस्ते ऐवजी काँक्रीट रस्त्याची मागणी केली. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त बंगला जवळील टाकीच्या फुटींगच्या कामाची पाहणी करून टीव्ही सेंटर येथील भारत माता क्रीडांगण च्या दक्षिणेस 1680 कोटी रुपयेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या दोन उंच (ईएसआर) टाक्याच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली.

पायाभरणीचे फुटिंगचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सदरील कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात खडसावून निकृष्ट दर्जाचे काम खपून घेणार नाही, असा इशारा दिला. सदरील कामाची मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गंभीर दखल घेतली असून सहा बाय सहा च्या क्यूबमध्ये स्ट्रेंथ तपासणीसाठी काँक्रीटचे नमुने घेतली असून पायाभरणीचे फुटींगचे काम सुरू असताना कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात आयुक्तांनी कडक शब्दात सुनावले असून जीवन प्राधिकरणाच्या व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कडक शब्दात पत्र देऊन समज देण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त यांनी शहर अभियंता एस.डी .पानझडे यांना दिले आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमधील सेक्सच्या बंदीनंतर वेडावले खेळाडू, गुपचूप जात आहेत गावापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दुकानात

टोकियो । व्यवसाय करणे हा प्रत्येकाचे काम नाही. त्यासाठी बाजारपेठ समजून घेणे आवश्यक आहे. टोकियोला येणाऱ्या ऑलिम्पिक खेळाडूंना क्रीडा आयोजन समितीने सेक्सयुअल एक्टिविटी (Sex Ban In Tokyo Olympics) पासून दूर राहण्यास सांगितले आहे. कोविडमुळे सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पण त्याचा खेळाडूंवर काहीच परिणाम होताना दिसत नाही. म्हणूनच ऑलिम्पिक व्हिलेजपासून 20 मिनिटांच्या अंतरावर उघडलेल्या विशेष दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दी असते. हे दुकान फक्त आणि फक्त कंडोमच विकते. मात्र यादरम्यान या दुकानदाराने मिळवलेला नफा चर्चेचा विषय बनला आहे.

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा समितीने विविध देशांतील खेळाडूंना यावेळी लैंगिक कार्यात गुंतू नये अशी विनंती केली होती. सोशल डिस्टंसिंग पाळा, खेळांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. यामुळे, ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना देण्यात येणाऱ्या कंडोमचा स्टॉक घेण्यात आला आहे. यापूर्वी दीड लाखाहून अधिक कंडोम खेळाडूंमध्ये वितरित केले जाणार होते. पण नंतर ते खेळ संपेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. आता या सेक्स बंदीनंतर, सेक्ससाठी वेडावलेले खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजपासून 20 मिनिटांच्या अंतरावर उघडलेल्या दुकानाभोवती फिरताना दिसत आहेत.

Condomania in Shibuya | Cloganese | Flickr

फक्त कंडोमचेच दुकान उघडे आहे
टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजपासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर Condomania नावाचे दुकान आहे. येथे 24 तास फक्त आणि फक्त कंडोमच विकले जातात. हे दुकान 1993 मध्ये उघडण्यात आले असले तरी आता ते चर्चेत आले आहे. येथे फक्त कंडोमच उपलब्ध आहेत. दुकान उघडण्याचे कारण देशातील HIV, AIDS आणि नको असलेली गर्भधारणा रोखणे हे होते. याशिवाय लोकांना सुरक्षित सेक्सबद्दल जागरूक करणे हे देखील कारण आहे. या दुकानाची स्वतःची वेबसाइट देखील आहे. त्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे की,’लोकांनी कोणत्याही संकोच न करता कंडोम खरेदी करण्यास सक्षम व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.’

Condomania (Harajuku branch) | Shopping in Harajuku, Tokyo

कंडोमचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत
Condomania चा लोगो पिवळ्या कंडोमवर स्मायली आहे. येथे तुम्हाला कंडोमचे अनेक प्रकार, आकार, ब्रँड, आकार आणि रंग मिळतील. याशिवाय, ते नवीन कंडोम देखील लाँच करतात ज्यात जेली कंडोमसह दुकानाला ऑनलाइन अनेक पॉझिटिव्ह रिव्यू मिळाले आहेत. दुकानात अनेक प्रकारचे सेक्स टॉय देखील उपलब्ध आहेत. दुकान जरी लहान असले तरी तुम्हाला इथे खूप काही मिळेल. सध्या खेळांच्या दरम्यान, येथील गर्दीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समृद्धी महामार्गामूळे औरंगाबाद ते शिर्डी रस्ता होणार फक्त दीड तासांचा

Samrudhi highway

औरंगाबाद | सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा समृद्धी महामार्ग माळीवाडा ते कोकमठाण पर्यंत जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. शिर्डी आणि औरंगाबाद मधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे. औरंगाबाद वरून शिर्डीला जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. समृद्धीहा मार्ग नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत पालक मंत्री प्रयत्न करत आहेत. हा समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर 117 किलोमीटरच्या मार्गाचा शिर्डीला जाण्यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले.

कोकमठाण ते शिर्डी हे अंतर सहा किलोमीटर एवढे आहे. औरंगाबाद वरून शिर्डी कडे जाणाऱ्या वाहनांना माळीवाडा पासून कोकमठाण पर्यंतच जाता येईल. यानंतर पुढे समृद्धी मार्ग सोडून जाता येईल. हा समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर शिर्डीला जाण्यासाठी फक्त सव्वा ते दीड तास लागतील. यामुळे वेळही कमी लागेल. आणि भाविक औरंगाबाद येथे एखाद्या पर्यटनस्थळी भेट देखील देऊ शकतील. असा विश्‍वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दाखवला आहे.

साडेसोळा तोळे सोने लंपास : सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातील 5 लाख 81 हजारांच्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

खटाव | खटाव तालुक्यातील मायणी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 5 लाख 81 हजार 500 रुपये किमतीच्या साडेसोळा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सरूताई मठाजवळ राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरात ही घटना घडली. या घटनेने मायणीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मायणी येथील मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावरील सरुताई मठाजवळ रहात असलेल्या सौ. सरस्वती तारळेकर (वय- 65) या सेवानिवृत्त शिक्षिका पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी दि. 26 जुलै रोजी गेल्या होत्या. शुक्रवारी दि. 30 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या पुणे येथे असताना त्यांच्या मायणी येथे शेजारी राहणाऱ्या नीलम पाटील यांनी त्यांना घराचे दार उघडे असल्याची माहिती फोन वरुन दिली.

त्यानंतर तारळेकर या पुणे येथून मायणी येथे घरी आल्या. दरम्यान, त्यांना घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. तसेच कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामध्ये ठेवण्यात आलेले तब्बल साडेसोळा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक फौजदार दोलताडे करत आहेत.

पावसाळ्यानंतर औरंगाबादेतील 39 रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रशासनाचा निर्णय

औरंगाबाद | औरंगाबाद येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्यामूळे अपघाताचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. आता महापालिका प्रशासनाने रस्ता डांबरीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतर्फे पावसाळ्यानंतर शहरातील विविध भागातून जाणारे 39 रस्ते डांबरीकरण केली जाणार आहे. याबाबत आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा मागविण्यात येणार असून या कामाची किंमत 57 कोटी रुपये असणार आहे. आणि राज्य सरकारने महापालिका तीन महापालिकेला तीन टप्प्यात निधी मंजूर केला होता. यामध्ये 24 कोटी रुपये 100 कोटी रुपये आणि टप्प्याटप्प्याने 152 कोटी रुपये जाहीर केले होते. परंतु अजूनही बऱ्याच रस्त्यांचे काम रखडले आहे. यामुळे महापालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी रस्त्यांसाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 57 कोटी रुपयांचे रस्त्याचे कामे केली जाणार आहे.

‘57 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या विकासासाठी निविदा देण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. 8-10 दिवसात निविदा मिळेल, आणि संपूर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रस्ता बांधणी सुरू केली जाईल. त्याचबरोबर 39 रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार आहे.’ असे शहर अभियंता एस.डी. पानझाडे यांनी सांगितले.

PM Kisan: 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार, ‘ही’ कागदपत्रे ताबडतोब सबमिट करा अन्यथा पैसे अडकले जातील

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, याच्या 9 व्या हफ्त्याचे पैसे 1 ऑगस्ट 2021 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात येणे सुरू होईल. आता फक्त त्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेल ज्यांच्या नावावर शेतजमीन असेल. म्हणजे, पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेतजमीन असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकेल.

पीएम किसान योजनेअंतर्गत, मोदी सरकार दरवर्षी 2000, 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपये देते. याअंतर्गत प्रत्येक वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान दिला जातो.

ही माहिती देणे आवश्यक आहे
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये भूतकाळात काही त्रुटी आढळल्या होत्या, ज्या सरकारने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणी केली आहे त्यांना आता अर्जामध्ये त्यांच्या जमिनीचा प्लॉट क्रमांक नमूद करावा लागेल. तथापि, नवीन नियमांमुळे योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर काहीही परिणाम होणार नाही.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त, आपण या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता
>> तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासह, कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे चालवावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतजमिनीशी संबंधित माहिती भरावी लागेल.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

औरंगाबाद : शहरात 12 आणि ग्रामीण मध्ये 16 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश असून 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 372 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 586 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3495 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 36 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 9 आणि ग्रामीण मधील 27 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील

घाटी 1, मिलिंदनगर 1,मुकुंदवाडी 1, बालकिशन नगर 2, बीड बायपास येथे 3 आणि इतर 4 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात शेंद्रा एमआयडीसी 1, गंगापूर 1, बजाजनगर 1,आणि इतर 13 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर लोणी वैजापूर येथील 65 वर्षीय एका महिलेचा, 45 वर्षीय पुरुषाचा गंगलवाडी पैठण, बालाजीनगर सिडको येथे 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

महिलेचा युवकास गंडा : नोकरीचे अमिष देवून दीड लाख उकळले, जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट पत्रही दिले

crime

सातारा | कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील एका युवकास पुण्यातील महिलेने मंत्रालयत नोकरीस असल्याचे सांगत दीड लाख रूपयांचा गंडा घातला आहे. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट नियुक्तिपत्रही महिलेने युवकास दिले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनिता देवानंद भिसे (रा. पुणे) हिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरंबे येथे आकाश भीमराव हुंबे राहण्यास आहेत. आकाश वाढेफाटा येथे सुरू असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पात साईट सुपरवायझर म्हणून कामास आहेत. याठिकाणी अनिता देवानंद भिसे या फ्लॅट खरेदीसाठी आल्या होत्या. वारंवार येत असल्याने भिसे आणि हुंबे यांची ओळख झाली. ओळखीनंतर भिसेंनी मी मंत्रालयात नोकरीस असून, तुला शासकीय नोकरी मिळवून देते, असे सांगितले. यानुसार 2018 पासून हुंबेने भिसे हिला दीड लाख रुपये दिले. यानंतरच्या काळात भिसे हिने हुंबे यांना हवेली तहसील कार्यालयात नेमणूक झाल्याचे पत्र दिले. या पत्रात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्यासाठीची तारीख नमूद करण्यात आली होती.

त्यानुसार हुंबे हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. याठिकाणी जाण्यापूर्वी त्यांनी भिसेला फोन केला. फोन केल्यानंतर भिसे त्याला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भेटली. हुंबेंकडील नियक्तीपत्र काढून घेत साहेबांना भेटून येते, असे सांगत भिसे तेथून निघून गेली. थोड्या वेळानंतर भिसे पुन्हा त्याठिकाणी आली व तिने शिपाईपदासाठी नियुक्ती झाली असून, त्याचा नेमणूक कालावधी सुरू होण्यास अवधी असल्याचे पुणे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र हुबेंना दिले. यानुसार पुन्हा हुंबे हजर होण्यासाठी गेले असता, साहेब बाहेर आहेत असे सांगत भिसेने वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवापुस्तिका व इतर बाबींची कागदपत्रे देत तशी तपासणी पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या डॉ. भारत शहा यांच्याकडून करून घेतली. भिसे वारंवार टाळाटाळ करू लागल्याने हुंबे यांना संशय आला.

यानंतर त्यांनी विविध ठिकाणी चौकशी केली असता आपल्याला दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हुंबे यांनी भिसेकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी आकाश हुंबे यांनी शुक्रवारी शाहपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. यानुसार अनिता भिसे हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.