Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3750

चिनी कंपनी दीदी ग्लोबलने शेअर बायबॅक योजनेचा रिपोर्ट नाकारला

नवी दिल्ली । चिनी कंपनी दीदी ग्लोबल इंकने शुक्रवारी वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट नाकारला की,” जूनमध्ये अमेरिकेच्या IPO नंतर मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यावर ते शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहे.” वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की,”दीदी आणि तिचे बँकर्स गुंतवणूकदारांच्या तक्रारी दूर करण्यासाठी शेअर्स परत खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.”

चीनी सरकारने डेटा सिक्युरिटी आणि परदेशातील शेअर्सच्या लिस्टिंगच्या मुद्द्यावर देशातील मोठ्या कंपन्यांना इशारा दिला होता. 30 जून रोजी अमेरिकन बाजारात लिस्टेड झाल्यापासून दीदीचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले आहेत, कारण कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यात आले होते आणि त्याविरोधात डेटा सिक्युरिटीविरोधात तपास सुरू करण्यात आला होता.

“कंपनी पुष्टी करते की, वरील माहिती (वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट) अचूक नाही,” दीदीने आपल्या वेबसाइटवर सांगितले. सायबर सिक्युरिटी समीक्षेमध्ये चीनच्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Edible Oil Prices : जुलैमध्ये खाद्यतेलंच्या किमती झाल्या दुप्पट, किरकोळ किमती 52% वाढल्या; सरकारची यासाठी काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती जुलैमध्ये एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अधिकृत आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की,”कोविड -19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर डाळी आणि खाद्यतेलांसारख्या अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले आहेत.”

कोणत्या तेलाची किंमत किती वाढली ते जाणून घ्या
मंत्र्यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जुलै दरम्यान शेंगदाणा तेलाच्या सरासरी मासिक किरकोळ किमतीत 19.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोहरी तेलामध्ये 39.03 टक्के, व्हेजिटेबल 46.01 टक्के, सोया तेल 48.07 टक्के, सूर्यफूल तेल 51.62 टक्के आणि पाम तेल 44.42 टक्के वाढले आहे. ही ताजी आकडेवारी 27 जुलै 2021 ची आहे.

शुल्कामध्ये कपात
चौबे म्हणाले की,” खाद्यतेलांच्या किंमती कमी करण्यासाठी क्रूड पाम ऑइल (CPO) वरील शुल्क 30 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 5 टक्क्यांनी कमी केले आहे. या कपातीमुळे CPO वरील प्रभावी टॅक्स रेट आधीच्या 35.75 टक्क्यांवरून 30.25 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त, रिफाइंड पाम तेल/पामोलिनवरील शुल्क 45 टक्क्यांवरून 37.5 टक्के करण्यात आले आहे.”

ते पुढे म्हणाले की,”रिफाइंड ब्लीचड डिओडराइज्ड (RBD) पाम ऑइल आणि RBD पामोलिनसाठी सुधारित आयात धोरण 30 जून 2021 पासून लागू करण्यात आले आहे, ज्या अंतर्गत या वस्तू प्रतिबंधित पासून मुक्त श्रेणीमध्ये हलविण्यात आल्या आहेत.”

एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी नारायण ज्योती म्हणाल्या की,”सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन, इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्यूसर्स असोसिएशन आणि सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन कडून निवेदन मिळाले आहे, त्यात म्हटले आहे की, नेपाळमधून पाम आणि सोयाबीन तेलाची आयात फ्री आहे. व्यापार करार (FTA) तरतुदींचे कथित उल्लंघन किंवा गैरवापर केल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारत आपल्या एकूण खाद्यतेलाच्या आवश्यकतेपैकी 60-70 टक्के आयात करतो.

पाॅझिटीव्ह रेट 7 टक्के : सातारा जिल्ह्यात 842 नवे कोरोना बाधित तर गुरूवारी 41 जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 842 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 700 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 12 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 842 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 18 हजार 167 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 4 हजार 652 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 281 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 41 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण अद्यापही कमी होताना दिसत नाही. तर मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण 13 लाख 97 हजार 276 नमूने घेण्यात आले आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी होत नसल्यानेच अनलाॅक जिल्हा कधी होणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

सफारी पार्कच्या लांब भिंतींचे काम पंधरा महिन्यात होईल पूर्ण

Safari park

औरंगाबाद | मिटमिटा या ठिकाणी होत असलेल्या सफारी पार्कच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. आता या पार्कसाठी 100 एकर जागेच्या संरक्षणासाठी चार किलोमीटर लांबीची आणि 12 फूट उंचीची कंपाउंड वॉल बांधण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत अर्धा किलोमीटर एवढे काम पूर्ण झाले आहे. ही पूर्ण भिंत बांधण्यासाठी पंधरा महिने लागतील.

महापालिकेच्या सिद्धार्थ गार्डन येथे प्राण्यांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे मिटमिटा येथे प्राण्यांसाठी सफारी पार्क बांधण्याची आणि त्या ठिकाणी सर्व प्राणी स्थलांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. यापूर्वी सेंट्रल प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) प्राण्यासाठी महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात पुरेशी जागा कमी असल्याचे सांगून आक्षेप नोंदविला होता. यानंतर दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे निवृत्त संचालक बी आर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) यांची मास्टर प्लान तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. हा प्लॅन मंजूर केल्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या उणीवा दूर केले असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.

सफारी पार्कसाठी अतिरिक्त 58 हेक्टर जमीनीचा प्रस्ताव तयार केला जात असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ASCDCL) स्मार्ट सिटी मिशन यांच्या वतीने या कामासाठी 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कडून सफारी पार्क जमिनीचे सपाटीकरण संरक्षण भिंतीच्या 4 हजार 250 मीटर बांधकामाला सुरुवात झाली असून या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची 12 फूट उंच भिंत बांधण्यात येणार आहे. त्यावर तारेचे कुंपण लावण्यात येईल. सध्या एक किलोमीटर फिटिंगचे काम आणि अर्धा किलोमीटरचे भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या कामासाठी 15 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

मोहम्मद रफी श्रद्धांजली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘या’ महान गायकाला काही मजेदार प्रसंगांतून समजून घेउयात

नवी दिल्ली । मोहम्मद रफीला एका घटनेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 1981 मध्ये ‘कुदरत’ हा चित्रपट आला. चित्रपटाची सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. दिग्दर्शक चेतन आनंद यांची इच्छा होती की, रफी साहेबांने यातील एक गाणे गावे. त्यांचा असा विश्वास होता की, केवळ रफी साहेबच या गाण्याला योग्य न्याय देऊ शकतील. तर, RD बर्मनला ते एका नवीन गायकाकडून गाऊन घ्यायचे होते. RD बर्मनला दोन कारणांसाठी असे करत होते. एक तर चित्रपटाची इतर सर्व गाणी किशोर कुमारने गायली होती, त्यामुळे त्यांना फक्त एकाच गाण्यासाठी रफीना बोलावण्यास संकोच वाटला. आणि दुसरे म्हणजे, ते एका नवीन गायकाला संधी देण्याचा प्रयत्न करत होते.

RD च्या विनंतीवरून चेतन आनंदने नवीन गायकाचे ऐकले आणि त्याच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करण्याची परवानगी दिली. गाणे रेकॉर्ड करण्यात आले आणि सर्वांना आवडले. चेतन आनंद अजूनही म्हणाले,”हे गाणे फक्त रफी साहेबांच्याच आवाजात रेकॉर्ड करा.” कोणताही पर्याय नव्हता, म्हणून RD ने रफी ​​साहेबांना विनंती केली. रफी साहेबांनी RD ला सहज होकार देऊन दिलासा दिला. गाणे रेकॉर्ड केले गेले. तीसरा अंतरा रेकॉर्ड केला गेला. टी ब्रेकमध्ये माहित नाही कसे की, नवीन गायकाचे रेकॉर्ड केलेले गाणे रफींच्या मायक्रोफोनमध्ये ऐकले गेले. रफींनी टेक्‍नीशियनला बोलावून विचारले की,”हे गाणे आधी कोणी गायले आहे का?”

टेक्‍नीशियन म्हणाला,”होय, कोपऱ्यात बसलेला दाढीवाला व्यक्ती, त्याने गायले आहे, तो एक चांगला गायक आहे.” रफी साहेब म्हणाले,”काय मस्त गाणे आहे.” मग रफी साहेबांनी सिंगर केबिनमध्ये पंचम दाला बोलावले आणि म्हणाले,”पंचम, खरं सांग, हे गाणे आधी कोणाकडून रेकॉर्ड केले आहे.” रफींचा राग पाहून पंचम दाने ईमानदारीने पूर्ण किस्सा सांगितला. मग रफी रागाने म्हणाले,”पंचम, तू माझ्या हातून एका नवीन कलाकाराचे आयुष्य का उध्वस्त करतोयस.” त्यानंतर पंचम दाने रफी ​​साहेबांना गाणे पूर्ण करण्यासाठी खूप आग्रह केला, पण रफी साहेबांनी हे मान्य केले नाही आणि रेकॉर्डिंग मध्येच सोडले.

अशा प्रकारे नवीन आणि प्रतिभावान गायकाचे गायन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले गेले. नंतर, मजबुरीने, चौथ्या अंतराला त्या नवीन गायकाच्या आवाजास जोडण्यात आले. रफी साहेबांच्या आवाजात फक्त तीन अंतरे उपलब्ध होते. पुढे तो गायक मराठी चित्रपटसृष्टीतील मोठा गायक बनला. त्याचे नाव होते चंद्रशेखर गाडगीळ. रफींबद्दल आदर व्यक्त करत आणि भावनिक होत, चंद्रशेखर म्हणतात आणि चौथा अंतरा गायला गेला नाही. अशाप्रकारे, रफीसोबत एक अंतरा गाऊन चंद्रशेखर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव बनले. कातील शिफाईने लिहिलेले ते गाणे होते ‘सुख-दुख की हरेक माला कुदरत ही पिरोती है.’तर असे होते मोहम्मद रफी साहेबांचे पात्र. खूपच सरळ, दयाळू आणि कोणाच्याही हक्कांचा बळी जाऊ देत नसत. ते महान गायक होते, मात्र त्याच्यापेक्षा चांगले माणूस होते.

आणखी एक किस्सा अमिताभकडून ऐका… एकदा दोन दिवसांचा कार्यक्रम होता. रफीनी पहिल्या दिवशीच गायले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कळले की, ज्या गायकाचा कार्यक्रम आज आहे तो येणार नाही. रफी साहेब विमानतळावर गेले होते. आम्ही विमानतळाच्या दिशेने धावलो. विमान नुकतेच उड्डाण करणार होते. विमानतळाच्या अधिकाऱ्याला विनंती करून विमानात पोहोचलो आणि रफीना समस्या सांगितली. रफी साहेब काही न बोलता लगेच आमच्या बरोबर खाली आले. अशा प्रकारे आम्ही अडचणीत येण्यापासून वाचलो. रफी साहेब यांना अमिताभचा दिवार खूप आवडला होता.

हे जाणून घेणे मनोरंजक आहे की, बालपणातही रफीनी कार्यक्रमाच्या आयोजकांना अशाच गोंधळातून वाचवले आहे. हि गोष्ट खूप जुनी आहे. रफी तेव्हा लहान होते. लाहोर, अविभाजित भारतामध्ये केएल सहगल यांची मैफल होती. रफी हा तेरा वर्षांचा मुलगाही तो कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या भावासोबत तिथे पोहोचला. कार्यक्रम सुरू होणारच होता, की लाईट गेली. आता अशा परिस्थितीत सेहगलला माईकशिवाय गाता येत नव्हते, म्हणून तो हॉटेलमध्येच थांबला.

घाईघाईने आणि चिंताग्रस्त जनतेच्या गर्दीला कसे शांत करावे हे आयोजकांना समजत नव्हते. मग रफीचा मोठा भाऊ हमीद आणि त्याचे संगीत गुरु अब्दुल वाहिद खान यांनी आयोजकांना विनंती केली की, रफीला रंगमंचावर गाण्याची संधी द्या. आयोजकांकडे पर्याय नव्हता, म्हणून तो मुलगा गाण्यासाठी स्टेजवर पोहोचला. लहानग्या रफीने असे गायन केले की, लोकं टाळ्या वाजवू लागले. इथेच त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार श्याम सुंदर जी देखील प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यांनी रफीचे गाणे ऐकले आणि त्यांना केवळ रफीच्या प्रतिभेची खात्रीच पटली नाही तर त्याला गाण्याची संधी देखील दिली.

तुम्ही विचार करत असाल की, आयोजकांनी तेरा वर्षांच्या मुलावर एकदम विश्वास कसा ठेवला. त्यामागेही एक गमतीदार कथा आहे. रफीच्या भावाच्या दुकानाजवळ एक फकीर सकाळी लवकर जात असे. तो अतिशय मधुर आवाजात गाणी म्हणत असे. तो जिथे जायचा तिथे रफी ​त्याच्या मागोमाग जात आणि त्याच्या मागे फिरत असे जोपर्यंत तो त्यांचा भाग सोडत नसे. त्यांनी त्याचे गाणेही खूप मेहनतीने ऐकले. दुकानात परत आल्यावर तो त्याच मधुर आवाजात ते गाणे गाऊन दाखवायचा . ही रोजचीच गोष्ट होती. त्याच्या या अद्भुत गुणवत्तेचा प्रतिध्वनी आणि त्याच्या आवाजाचा गोडवा दूरवर पसरू लागला. मग त्याच्या मोठ्या भावाने उस्ताद अब्दुल वहीद खान यांच्याकडे त्याला संगीत शिकण्यासाठी पाठवले. रफीची चर्चा संपूर्ण लाहोरमध्ये होऊ लागली. यामुळे त्याला सहगलच्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली. नंतर ते मुंबईत आले. हे स्वातंत्र्यापूर्वी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

गणपतरावांच्या निधनामुळे जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता आपण गमावला- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जेष्ठ नेते आणि तब्बल ११ वेळा आमदारकी भूषवलेले सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी काल वयाच्या ९४ व्य वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. गणपतराव यांच्या निधनानंतर राज्यभरातून दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता आज आपण गमावला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली

शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की , कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. असे म्हणत शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली

गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले- देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जेष्ठ नेते आणि तब्बल ११ वेळा आमदारकी भूषवलेले गणपतराव देशमुख यांनी काल वयाच्या ९४ व्य वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. गणपतराव यांच्या निधनानंतर राज्यभरातून दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या

फडणवीस म्हणाले ,ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे.

गणपतराव देशमुख यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी…प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही.

गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

काय सांगता ! मयत दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल

MIDC waluj police station

औरंगाबाद | एरव्ही गुन्हा हा जिवंत व्यक्ती विरोधात दाखल होते. परंतु वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भरधाव व निष्काळजी दुचाकी चालवून स्वत:च्या मृत्युस व अन्य एकास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या मयत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, पंढरी गवई (रा. रांजणगाव) व अनिल वाघमारे (रा. सातारा परिसर) हे दोघे बांधकाम मजूर आहेत. २० जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून (एम.एच.२०, एफ.वाय. २९९६) भरधाव वाळूज एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीसमोरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंढरी गवई याचा दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या अनिल वाघमारे याच्यावर उपचार सुरू होते. या अपघातात अनिल वाघमारे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा स्मृतीभंश झाला असून, एक-दीड वर्ष उपचार केल्यानंतर त्याची स्मृती परत येण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले.

याप्रकरणी अनिल वाघमारे याचे वडील संजय वाघमारे यांच्या तक्रारीवरून मयत दुचाकीस्वार पंढरी गवई याच्याविरुद्ध स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच अनिल वाघमारे यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. ३० जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tokyo Olympics : मेरी कोमने केला छळ झाल्याचा आरोप, म्हणाली,”5 मिनिटांपूर्वी जर्सीच बदलण्यास सांगितली”

टोकियो । ऑलिम्पिकमधील काही भारतीय बॉक्सरच्या जर्सीवर त्यांचे आणि देशाचे नाव नसल्याचा वाद निर्माण झाला होता, अनुभवी एमसी मेरी कोमने (MC Mary Kom) देखील आरोप केला होता की, आयोजकांकडून योग्य स्पष्टीकरण न देता तिचा शेवटचा -16 सामना झाला त्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी जर्सी बदलण्यास भाग पाडले. जेव्हा मेरी कॉमने गुरुवारी आणि त्यानंतर शुक्रवारी लवलिना बोर्गोहेन यांनी रिंगमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या जर्सीच्या मागे त्यांचे नाव किंवा देशाचे नाव नव्हते.

प्री-क्वार्टर फायनल सामन्यात तिचा सामना २-३ ने गमावल्यानंतर मेरी कॉमने पीटीआयला सांगितले की,”थोडी त्रासदायक गोष्ट आहे की त्यांनी मला स्पर्धेच्या फक्त पाच मिनिटे आधीच माझी जर्सी बदलण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या नावाची प्रत्यक्षात घोषणा करण्यात आली होती.”

मेरी कॉमने छळ केल्याचा आरोप केला
ती म्हणाली की,”मला वाटते की, मला त्रास देण्यासाठी ही जाणूनबुजून केलेली कृती होती. मी पहिल्याच फेरीत त्याचसारख्या ड्रेसमध्ये सामना जिंकला होता. त्यावर माझे नाव मेरी कोम आणि भारत असे लिहिले होते.” भारतीय बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सँटियागो निवा यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नियम बघून वादाचे मूळ समोर आले. निवा म्हणाले की,”बॉक्सरला त्यांचे आडनाव किंवा दिलेले नाव ड्रेसमध्ये वापरण्याची परवानगी आहे. अशा स्थितीत, जर तिने आपल्या जर्सीवर कोम लावले असते तर काही अडचण आली नसती किंवा फक्त मांगटेही ठीक होते.

Lovlina साठी नवीन जर्सी आणली गेली
मेरी कोमने लिहिलेले कपडे घालण्याची परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. Lovlina च्या बाबतीतही असेच झाले. तिच्या जर्सीवर तिच्या पूर्ण नावाऐवजी बोर्गोहेन असायला हवे होते. यात कोणतीही मोठी अडचण नाही, असे निवा म्हणाले. आम्ही Lovlina साठी नवीन जर्सी आणली आहे. उपांत्य फेरीत ती तीच घालेल. मेरी कोमची तक्रार होती की, तिला कोणतेही ठोस कारण न देता सामन्यापूर्वीच जर्सी बदलण्यास भाग पाडण्यात आले. निवा म्हणाले की,”एक संघ म्हणून ही मोठी समस्या नाही.”

ते म्हणाले की,” पाहा, जोपर्यंत तुम्हाला रिंगमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात नाही, तोपर्यंत कोणतीही समस्या नाही. ड्रेसच्या संदर्भात आयओसीचे नियम असे आहेत की ‘खेळाडूच्या नाव (कुटुंबाचे नाव) ड्रेसच्या मागील बाजूस (पाठीवर) लिहिले जाऊ शकते’ आणि राष्ट्रीय ध्वज किंवा राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे चिन्ह जर्सी, शॉर्ट्स आणि स्कर्टवर निश्चित ठिकाणी वापरण्याची परवानगी आहे.

अमित शहांनी वेळीच पावले उचलावी अन्यथा…; आसाम- मिझोराम वादावरून शिवसेनेचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोराममध्ये सीमावादावरून संघर्ष उफाळून आला. या संघर्षांच्या हिंसक ठिणग्याही उडाल्या. या हिसेंचे पडसाद संसदेतही उमटले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या दोन्ही राज्यातील वादावर चिंता व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.

हिंदुस्थानातील काही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये हिंदुस्थानच्याच नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंड हिंदुस्थान या संकल्पनांना तडा देणारे हे प्रकरण आहे. असे शिवसेनेने म्हंटल आहे.

आसाम आणि मिझोराममधील जमिनीचा वाद आज वरवर शांत दिसत असला तरी खदराद्ध कायम आहे. ही दोन्ही राज्ये संवेदनशील व देशाच्या सीमेवर आहेत. ईशान्येकडील राज्ये अशांत राहणे म्हणजे बाहय शत्रूंना वाव देण्यासारखे आहे. आसाम आणि मिझोराम ही दोन राज्ये 165 किलोमीटर सीमांचे एकत्रित धनी आहेत. हा वाद ब्रिटीश काळापासून आहे.

एका बाजूला आपण म्हणायचे की, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे, अनेकतामध्ये एकता आहे, पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? हिंदुस्थानी संस्कृतीवर चर्चा आपण करतो तेव्हा काय सांगतो? येथे केवळ दुःखं वाटून घेतली जातात. त्याच वेळी आपण जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांवरून खुनी खेळ करीत आहोत. जम्मू-कश्मीरात अशांतता आहेच. त्यात आसाम-मिझोरामच्या जमिनीच्या भांडणात रक्तपात झाला आहे. दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या. यास देशांतर्गत युद्धच म्हणावे लागेल. याचा फायदा बाजूचे शत्रू राष्ट्र उठवल्याशिवाय कसे राहतील? असा सवाल शिवसेनेने केला.

आसामविरुद्ध मिझोराम असेल, नाहीतर महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमावाद असेल. पाणीवाटपापासून जमिनीचा, जंगलाच्या भांडणाचा मुद्दा असेल, केंद्र सरकार राजकीय सोय पाहून स्वतःची कातडी वाचवत असते. कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला दमदाटया करून राजकीय माहोल निर्माण करता येतो. तसा राज्यांतर्गत प्रश्नी करता येत नाही हेच त्यामागचे कारण. प्रसंगी कटुता घेऊन न्याय करणारे रामशास्त्री बाण्याचे सरकार अजून देशात जन्माला यायचे आहे. तोपर्यंत राज्याराज्यांचे मिझोरामी झगडे सुरूच राहतील. असे शिवसेनेने म्हंटल. आसाम मिझोराम वादामुळे देशाच्या अखंडतेला तडे जातील. हे देशाला घातक आहे. गृहमंत्री शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.