Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3761

मूळगावचा पूल पाण्याखाली : कोयना धरणाचे दरवाजे 9 फूटांवर, विसर्ग वाढविला

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

कोयना धरणाचे गुरूवारी सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे 9 फुटांने उचलून 49 हजार 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होवू लागली आहे. कोयना नदीवरील मूळगाव पुलावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली शहरातील पाणीपातळी वाढणार आहे.

पाटण तालुक्यातील कोयना धरणात 105 टीमसी साठवण क्षमता आहे. सध्या धरणात 90.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी थांबलेला नाही, त्यामुळे पाण्याचे नियमन करण्यासाठी गुरूवारी सकाळी सुरू असलेला 5 फुट 6 इंच वरील दरवाजे 9 फुटांवर नेण्यात आले आहेत. सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 33 हजार 45 क्युसेक्स विसर्ग चालू होता त्यामध्ये वाढ करून तो 49 हजार 300 करण्यात आला आहे.

कोयना नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे कोयना-कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण होत आहे, तर पाटण तालुक्यातील मूळगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे.

खळबळजनक ! औरंगाबादेतील पोलिस कॉन्स्टेबलचा ठाणे शहरात फुटपाथवर आढळला मृतदेह

death
death

औरंगाबाद | औरंगाबादमधील एका पोलिस कॉन्स्टेबलचा ठाणे शहरात फूटपाथवर मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बळीराम मोरे (वय 40) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, बळीराम मोरे हे औरंगाबाद येथील पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बळीराम मोरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते आजार पणाच्या सुट्टीवर होते. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

ठाणे पोलिसांच्या बिट मार्शल टीममधील पोलिस नाईक महाले आणि थविल यांना बळीराम मोरे हे फूटपाथवर आढळून आले होते. दरम्यान, बळीराम मोरे हे रजेवर असल्याने ते ठाण्यात कसे आले आणि फूटपाथवर त्यांचा मृतदेह कसा आढळून याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

औरंगाबादचे सायकल ट्रॅक देशात ‘टॉप पंधरामध्ये’

Aurangabad cycle track
Aurangabad cycle track

औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावरील सायकल फॉर चेंज यांच्या अनोख्या स्पर्धेत औरंगाबादने स्मार्ट सिटी मध्ये समावेश झालेल्या देशभरातील शहरांमधून पहिल्या पंधरामध्ये स्थान पटकावले आहे मुख्य म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई व इंदूर सारख्या बड्या शहरांना मागे टाकत औरंगाबाद शहर पुढे आले आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनतर्फे सायकल फॉर चेंज चॅलेंजरचे आयोजन केले आहे. याअंतर्गत स्मार्ट सिटी मिशनचा यादीतील शहरांना सायकल ट्रॅक तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले 117 शहरांची नोंदणी केली होती. या शहरांनी कमीत कमी एक सायकल ट्रॅक प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात औरंगाबादने क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा सायकल ट्रॅक तयार केला.

सोबतच सिडको येथे सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांनी क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन सायकल ट्रॅकचा विशेष उल्लेख करत पहिल्या शहरांमध्ये औरंगाबादचे नाव असल्याचे जाहीर केले. ही औरंगाबादकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे अस्तिक कुमार पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.

 

सेव्हन हिल परिसरात भर दुपारी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

Gharfodi
Gharfodi

औरंगाबाद | चोरट्यांनी शिक्षकेचे घर फोडून चांदीचे दागिने 30 ते 35 हजार रुपये लांबावल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सेव्हन हिल परिसरात घडली आहे. रजनी मुकुंद वाटवे (50 रा. मोगरा अपार्टमेंट राणा नगर )असे शिक्षकाचे नाव आहे त्या बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने अपार्टमेंटमध्ये शिरुन चोरी केली.

रजनी वाटवे या कुटुंबियासह 3 जुलै रोजी पुण्याला गेले होत्या. त्यानंतर बुधवारी सकाळी त्या घरी पोहोचल्या त्यावेळी गॅलरीच्या दरवाजातून आत शिरलेल्या चोराने प्रत्येकी एक किलोची चांदीची दोन ताटे, वाट्या, पूजेचे साहित्य, कुंकवाचा करंडा, लहान मुलाच्या वाळा, आणि तीस ते पस्तीस हजाराची रोकड असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुंडलिक नगर पोलिसांना माहिती दिली.

यानंतर सपोनि घनश्‍याम सोनवणे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राणा नगरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी वाटवे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांकडून भास्कर जादहव यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर तिया केली जात आहे. दरम्यान आता भास्कर जाधव यांनीही राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्म घेऊ नये अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे

राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात,मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं त्यांना नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंना माध्यमांनी मोठं केलं. त्यांचा काहीही करिष्मा नाही. त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वतःच्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

“मुली रात्रीच्या वेळी समुद्र किनार्‍यावर का जातात”? दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याबद्दल गोवा मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

पणजी । अलीकडेच गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”अंधार झाल्यानंतर आपली मुले रात्री समुद्र किनार्‍यावर का फिरतात याबद्दल पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”

मुख्यमंत्री प्रमोद सावंत बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देत होते. 24 जुलै रोजी दक्षिण गोव्यातील लोकप्रिय कोळवा समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यावर आमदारांनी गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला होता.

सीएम प्रमोद सावंत म्हणाले,”दहा मुले बीचवर पार्टी करण्यासाठी जातात. 10 पैकी 6 घरी परततात. उर्वरित दोन मुले आणि दोन मुली रात्रभर समुद्रकिनार्‍यावर थांबतात. जेव्हा एक 14 वर्षांची मुलगी समुद्राकाठी रात्र घालवते, तेव्हा पालकांना देखील आत्मपरीक्षण करावे लागेल. त्यांनीही याची काळजी घेतली पाहिजे.”

ते म्हणाले,”ही जबाबदारी आपलीही आहे. कारण मुले त्यांच्या पालकांचे ऐकतच नाहीत, मात्र आपण सर्व जबाबदारी पोलिसांवर ठेवू शकत नाही.” बलात्कारावरील मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई म्हणाले की,”गोव्याची अशी ब्रँड इमेज आहे की कोणीही रात्री उशिरापर्यंत सुरक्षितपणे फिरू शकेल.” दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आसिफ हातेली, राजेश माने, गजानंद चिंचणकर आणि नितीन याब्बल अशी त्यांची नावे आहेत.

दररोज किती कोरोना प्रकरणे झाली कि तिसर्‍या लाट आल्याचे मानले जाईल ? तज्ञांचे मत जाणून घ्या

corona

नवी दिल्ली । भारतातील कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील नवीन रुग्णांची संख्या आता दररोज 42 हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोविडच्या 43 हजाराहून अधिक नवीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशात तिसरी लाट ठोठावण्याची शक्यता निर्माण आहे.

कोरोनाची ही वाढती आकडेवारी पाहता लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे की, कोरोनाची तिसरी लाट तर आली नसेल ना ?. काही महिन्यांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट जुलै आणि ऑगस्टमध्येच आल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले गेले होते, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे नवीन लाटेचा संशय निर्माण झाला आहे. मात्र, तज्ञांच्या मते, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी, देशात ठराविक संख्येने रुग्ण दिसणे आवश्यक आहे.

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ. एमसी मिश्रा यांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की, प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर काही लोकांकडून असे म्हटले जात आहे की, तिसऱ्या लाटेने भारताचे दार ठोठावले आहे. असे म्हटले जात आहे कारण सातत्याने घट झाल्यानंतर प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. असे सांगणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नसले तरी प्रकरणांमध्ये किंचित बदल होऊ शकतात.

दुसर्‍या लाटेच्या सर्वाधिक प्रकरणांपैकी एक तृतीयांश असणे आवश्यक आहे.
डॉ. मिश्रा म्हणतात की,” देशातील कोविडच्या तिसर्‍या लाटेची पुष्टी पूर्वीच्या दुसर्‍या लाटेच्या म्हणजेच कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्याशिवाय करता येणार नाही. मार्च 2121 नंतर भारतात दुसरी लाट सुरू झाली हे असे समजू शकते. या दरम्यान, एकाच दिवसात दररोज कोरोनाचे साडेचार ते साडेचार लाख केसेस आढळतात. दुसर्‍या लाटेची ही सर्वाधिक संख्या होती.

अशा परिस्थितीत जर आता भारतात दररोज एक लाख ते सव्वा लाख प्रकरणे येऊ लागली, म्हणजेच दुसर्‍या लाटेच्या सर्वाधिक संख्येच्या एक तृतीयांश दैनंदिन घटना घडल्या तर असे म्हणता येईल की, भारतात तिसरी लाट आली आहे. पण जर देशात दोन-पाच हजार किंवा 10-20 हजार प्रकरणे वाढली किंवा कमी झाली तर तिसरी लाट आली आहे असे म्हणता येणार नाही. ती फक्त दुसरी लाटच असेल.

यामुळे वाढत आहेत प्रकरणे
डॉ. मिश्रा यांचे म्हणणे आहे की,” देशातील कोरोना प्रकरणात दररोज होणाऱ्या बदलांमागील काही नवीन कारणे असू शकतात. चाचण्यांची संख्या वाढणे, कोरोनाच्या रूग्णांशी संपर्क वाढल्याने लोक पॉझिटिव्ह बनतात किंवा दक्षिणेकडील राज्ये, महाराष्ट्र किंवा ईशान्येकडील राज्यांमधील कोरोनाचे आधीच प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच वेळी, कोरोनाच्या व्हेरिएन्ट मध्ये बदल देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतो.”

कोरोनाचे एकही प्रकरण नसले तरी लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे
एम्सचे माजी संचालक म्हणतात की,” कोरोनाची तिसरी लाट अद्याप आलेली नाही, दुसरी लाट चालू आहे. या व्यतिरिक्त, कोरोनाची प्रकरणे काही राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत परंतु उर्वरित भारतात कमी झाली आहेत, म्हणून याचा अर्थ असा नाही की,आपण सर्व सुरक्षित आहोत. हा धोका कोणत्याही वेळी आपल्या डोक्यावर येऊ शकतो. म्हणूनच, आजूबाजूला एकही कोरोना रुग्ण नसेल, तरीही लोकांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे चालूच ठेवावे, मास्क लावावा, सोशल डिस्टंसिंग राखले पाहिजे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळले पाहिजे. मुलांना जागरूक करा आणि आता बाहेर जाणे थांबवा.”

डॉ. मिश्रा म्हणतात की,” केवळ सरकारवर अवलंबून राहून कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, परदेशी सरकारने देखील व्यवस्था केली होती, परंतु तेथे अडचणी देखील होत्या, म्हणून केवळ व्यवस्थांवर अवलंबून राहू नका. 2020 मध्ये स्वीकारलेले कोविडचे नियम आणि उपाययोजना करत रहा. सुरक्षित रहा.”

PNB ग्राहक सावधान ! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक(PNB-Punjab National Bank) ने आपल्या ग्राहकांना फिशिंग घोटाळ्यांपासून सावध रहायला सांगून बँकिंग घोटाळ्यांबाबत अलर्ट जारी केला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणूकीबद्दल इशारा देत आहेत. SBI नंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी बँकिंग घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या अलर्टचा उल्लेख केला आहे. यासह सावधगिरी बाळगण्याचे एक ट्विटही देण्यात आले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर बनावट प्रोफाइलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हँडलची नीटपणे पडताळणी केल्याशिवाय कोणतेही बाह्य सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका किंवा आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

यापूर्वीही बँकेने बनावट कॉलसंदर्भात सतर्क राहण्यास ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. खरे तर काही लोकं बँक कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कॉल करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. फोनवर, त्यांना त्यांच्याकडे बँक खात्याविषयी भीती दाखवून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत PNB ने बँकेच्या ग्राहकांनी कोणत्याही जाळ्यात अडकू नये, असा इशारा दिला आहे.

बँक फसवणूक कशी टाळावी ?
1 OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करू नका.
2 बँक खात्यातून पैसे काढल्यास काय करावे.
3 फोनवर बँकिंग माहिती कधीही सेव्ह करू नका.
4 एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका.
5 बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही.
6 ऑनलाइन पेमेंट बाबत सावधगिरी बाळगा.
7 तपासणीशिवाय सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका.
8 अज्ञात लिंक तपासा.
9 स्पायवेअरपासून सावध रहा.

आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही; रोहित पवारांच्या चिपळूण दौऱ्यावरून सदाभाऊंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रशासनावर ताण पडत असल्याने राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांत दौरे टाळावेत अस आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केल्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली आहे.

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत, असं आजोबांनी सांगितलं….. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही… कर्जत-जामखेडचे आमदार चीपळूणच्या दौऱ्यावर…. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

रोहित पवार कोकण दौऱ्यावर

कोकणात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी कोकणचा दौरा केला. या संकटात उध्वस्त झालेले संसार नव्याने उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांना मदतीचं आवाहन केलं.

काही लोक नुकसानीची पाहणी करायला येतात कि अधिकाऱ्यांना बघायला; अजित पवारांचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची नुकतीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना आपल्या दौऱ्यावेळी गैरहजर राहिल्याबाबत चांगलेच झापले होते. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे. “काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र, काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे,” असे म्हणत पवार यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

भाजपनेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा कोकण दौरा व त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर केलेली आगपाखड यावरून आता भाजपवर महाविकास आघाडी सरकारमधून टोलेबाजी केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला लगावला. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना केलेल्या दमबाजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र, अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून दौरा करीत असून त्यांना याची माहितीही देणार असल्याचे सांगितले होते. त्यात मंत्री राणेंच्या दौऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारीही गैरहजर राहिल्याने मंत्री राणे चांगलेच संतापले होते.