Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 3910

मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी अगोदर असलेल्या काही नेत्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या विस्ताराच्या मंत्रिमंडळात देशासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी नव्या मंत्रिमंडळातील सुमारे २२ मंत्री शपथ घेतील.

मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सध्या पाहिल्यास मोदिंच्या मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असणे आवश्यक आहे. तर सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. ती भरून काढण्यासाठी आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

10 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडले

औरंगाबाद | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना पकडले आहे. सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे हा प्रकार घडला. आदिवासी वस्तीसाठी मंजूर झालेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामचा धनादेश देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री रंगेहात पकडले. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र कृष्णराव भोपे वय 48 वर्षे असे या आरोपीचे नाव आहे. गजानन नगर येथे तो राहत होता.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा याठिकाणी आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसाठी मंजूर मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा उर्वरित तीन लाखाचा धनादेश मिळावा यासाठी तक्रारदार भोपे यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी 15 हजार रुपये लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीसोबत सोमवारी सायंकाळी त्यांच्यासोबत दोन पंच पाठवले. आणि झालेल्या लाचेच्या मागणीची तपासणी केली. यानंतर भोपे यांनी तडजोड करत 15 हजारांवरून 10 हजार रुपयांपर्यंत लाच घेण्याची तयारी दर्शवली.

रात्री सात वाजेच्या सुमारास लाचेची रक्कम घेऊन उल्कानगरी येथील चेतक घोडा चौकात येण्यासाठी सांगितले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत द्वारे, संदीप राजपूत, हवालदार बाळासाहेब राठोड, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी केली.

मोदी सरकारची गाडी कर वसुलीवर चालते ; राहुल गांधींची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारकडून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात विरोधकांसह नागरिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून दरवाढीबाबत मोती सरकारवर टीका केली आहे. गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार हे कर वसुलीवर चालते,” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

मोदी सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जात असल्याने काँग्रेसने राज्यात आंदोलनही केले होते. काँग्रेसकडून दरवाढीचा मुद्दा उचलत मोदी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. आता पुन्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टार्गेट केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करीत म्हंटले आहे कि, आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल व डिझेलच्या किमतीती वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दिल्लीतील किमती पाहिल्यास १००. २१ तर डिझेलच्या प्रति लिटर किमत ही ८९.५३ रुपये इतकी आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटला भाजपकडून आता काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जोहान्सबर्गहून पोटात लपवून आणले 7 कोटी 36 लाख रुपये किंमतीचे drugs, 106 कॅप्सूल्समध्ये भरली होती हेरोईन

नवी दिल्ली । देशाची राजधानी दिल्लीच्या कस्टम टीमने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) परदेशी नागरिकाला ट्रॅप केले. हा नागरिक झांबियाचा रहिवासी आहे. तो जोहान्सबर्गहून दिल्लीला आला. येथे संशयास्पदरित्या वावरत असल्याने कस्टम टीमने त्याला विमानतळावरच रोखले. त्यानंतर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्याचा एक्स-रे केला आणि त्यामध्ये त्याच्या पोटात हलके पिवळ्या रंगाचे कॅप्सूल्स दिसून आले. मग डॉक्टरांनी औषधाद्वारे ते काढून टाकले, त्यानंतर एकूण 106 कॅप्सूल बाहेर काढले गेले, ज्यामध्ये 1052 ग्रॅम पावडर आढळली.

विभागीय चौकशी दरम्यान ते हीरोइन असल्याचे निष्पन्न झाले. कस्टमनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 7 कोटी 36 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या परदेशी नागरिकाविरूद्ध NDPS कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करुन पुढील कारवाई केली जात आहे. तस्करीच्या या पद्धतीने अधिकाऱ्यांनाही चकित केले आहे. ड्रग्ज डीलर वेगवेगळ्या प्रकारे देशात तस्करी करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये, तपास पथकाच्या कृतीमुळे मोठा खुलासा होतो. हीरोइन तस्करीचे हे प्रकरणही अशाच प्रकारे पाहायला मिळत आहे.

तस्करांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे
असे म्हणतात की, मादक द्रव्यांच्या तस्करांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. ड्रग्ज, हीरोइन, ब्राउन शुगर, स्मॅक आणि इतर पदार्थ येथे मोठ्या प्रमाणात पुरवले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील औषध विक्रेते या कामांमध्ये सामील आहेत. कस्टमने अटक केलेल्या या परदेशी नागरिकांच्या चौकशीत मोठा खुलासा होणे अपेक्षित आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

UIDAI च्या कोट्यावधी युझर्सना धक्का ! आधारशी संबंधित ‘या’ 2 सेवा झाल्या बंद, त्याविषयी जाणून घ्या का

Aadhar Card

नवी दिल्ली । आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. UIDAI ने आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. त्याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर दिसून येईल. UIDAI ही आधार कार्ड देणारी संस्था आहे आणि वेळोवेळी त्यास संबंधीत अनेक सेवा सुरू करतात, परंतु यावेळी 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या गेल्या आहेत.

पुढील आदेश येईपर्यंत UIDAI ने Address Validation Letter द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. याशिवाय जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची सेवाही बंद करण्यात आली आहे.

1. Address Validation Letter :
पुढील आदेश येईपर्यंत UIDAI ने Address Validation Letter द्वारे आधार अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. भाडेकरू किंवा इतर आधार कार्डधारक याद्वारे आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकत होते. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून Address Validation Letter शी संबंधित पर्यायही काढून टाकला आहे.

UIDAI ने यासंदर्भात माध्यमांना सांगितले की, आपण अपडेट करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. इतर वैध अ‍ॅड्रेस पुरावांच्या https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या लिस्ट मधून आपण कोणत्याही पत्त्याच्या पुराव्यद्वारे आपला पत्ता अपडेट करू शकता.

त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ?
त्याचा परिणाम भाड्याने राहणाऱ्या लोकांवर होईल. आधार कार्डचा पत्ता अपडेट करण्यात या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, ज्या लोकांकडे पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट नाही त्यांनादेखील अडचणी येऊ शकतात.

2. Aadhaar Card Reprint शी संबंधित सेवाही थांबली
याशिवाय UIDAI ने जुन्या शैलीमध्ये Aadhaar Card Reprint ची सेवाही बंद केली आहे. पूर्वी UIDAI लांब रुंद आधार कार्ड जारी करत असत आणि त्याला Reprint करण्याची सुविधा देखील देत असे, परंतु आता त्याऐवजी ते प्लास्टिकचे PVC कार्ड देतात. हे कार्ड डेबिट कार्डच्या आकाराचे आहे. हे सहजपणे खिशात आणि वॉलेटमध्ये घेता येऊ शकते. यामुळे, UIDAI ने जुन्या शैलीचे कार्ड बंद केले आहे.

ट्विटरवर युझर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना Aadhaar Help Centre ने ट्विट केले की, “प्रिय रहिवासी, Aadhaar Card Reprint सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही आधार PVC कार्ड ऑनलाईन मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ई-आधारचे प्रिंट आउटही घेऊ शकता आणि कागदाच्या स्वरूपात ठेवू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

डॉ भागवत कराड होणार केंद्रीय मंत्री; अशी चर्चा मराठवाड्यात सुरु

Dr. Bhgwat karad MP

औरंगाबाद : भाजपचे विधानपरिषद खासदार डॉ. भागवत कराड यांचीकेंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारल्या जाणार अशी चर्चा सुरु आहे. जेष्ठ नेते नारायण राणे व त्याच बरोबर आता डॉ. कराड यांचेही नाव देखील या चर्चेत आहे.

याआधी देखील महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी डॉ. कराड यांची वर्णी लागली होती. महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा समाजच्या आरक्षणाचा प्रश्न जोर धरत आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांची कोंडी करण्यासाठी या दोन नावांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे ? का असा प्रश्न निर्माण होत आहे. डॉ. कराड हे ओबीसीचा मोठा चेहरा आहे व तसेच गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर ओबीसी समाजाला संतोष मिळेल त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते.

केंद्रीय मंत्रिमंळडात जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. मात्र, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्याचे केंद्रातील स्थान कमी झाले आहे. त्यात डॉ. कराड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तर मराठवाड्याला पुन्हा एकदा ओबीसी नेतृत्त्व मिळेल. सध्यातरी कराड यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

हॉटेल मालकांना धक्का ! NCLAT ने दिली OYO ची दिवाळखोरी कारवाई मागे घेण्याची परवानगी, हे प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनलने (NCLAT) बुधवारी OYO च्या अर्जावर दिवाळखोरीची कार्यवाही मागे घेण्यास परवानगी दिली. OYO हॉटेल्सच्या सहाय्यक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणाऱ्या अनेक हॉटेलवाल्यांना हा मोठा धक्का बसला आहे. हॉटेलवाल्याच्या वकिलाने सांगितले की, “OYO च्या अर्जास परवानगी देण्यात आली आहे आणि आमचे हस्तक्षेप अर्ज नाकारले गेले आहेत.” तथापि, यासह कंपनीच्या क्रेडिटर्सनाही थोडा दिलासा मिळाला आहे. तोडगा काढण्यासाठी त्यांना OYO कडे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे प्रकरण हॉटेलवाल्यांशी सोडवायचे की नाही ते कंपनीवर अवलंबून असेल.

नक्की काय प्रकरण आहे ?
मूळ पार्टी आणि गुरुग्राम हॉटेल मालक राकेश यादव यांच्यासमवेत OYO ने कोर्टबाहेर सेटलमेंट केली आहे. यादव यांनी NCLAT मध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. OYO ला दोन वर्षांपूर्वी यादव यांच्या वतीने नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLAT) OYO ग्रुपची सहाय्यक कंपनी ओयो हॉटेल्स अँड होम्स प्रायव्हेट लिमिटेडविरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याची विनंती मान्य केली होती.

200 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दावा
त्याचबरोबर वकील कीर जगदीशभाई शाह यांना अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्त केले गेले आणि कंपनीच्या इतर क्रेडिटर्सना दावा दाखल करण्यास सांगितले. IRP ने क्रेडिटर्सनी केलेले दावे उघड केले नाहीत. हा दावा 200 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. OYO ने या आदेशास NCLAT मध्ये आव्हान दिले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची हत्या

murder
murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची काल रात्री हत्या करण्यात आली. वसंत विहारमधील त्यांच्या घरी हि हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर बाकी २ जणांचा शोध चालू आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना मंगळवारी रात्री घडली. किट्टी कुमारमंगलम दिल्लीतील वसंत विहार परिसरात राहत होत्या. ६७ वर्षांच्या किट्टी कुमारमंगलम यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हि घटना घडली तेव्हा किट्टी यांच्यासोबत त्याची मोलकरीण होती. मोलकरणीने सांगितले कि, मंगळवारी रात्री धोबी आला, त्याने दरवाजा उघडला आणि तिला पकडून ओढत शेजारच्या खोलीत घेऊन गेला आणि बांधून ठेवले. यानंतर दोन तरुण घरात घुसले आणि उशीने किट्टी यांचे तोंड दाबले आणि त्यांची हत्या केली.

यानंतर मोलकरणीने स्वतःची सुटका करून आरडाओरडा केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. मोलकरणीने सांगितल्यानुसार तिला ज्या धोब्याने बांधले त्याचे नाव राजू आहे. तो वसंत विहारच्याच भंवर कॅम्पमध्ये राहतो. पोलिसांनी सध्या त्याला अटक केली आहे. हत्या करणाऱ्या अन्य दोन आरोपींची ओळख पातळी असून त्यांचा शोध सुरु आहे.

उद्योग मंत्रालयातून अर्थ मंत्रालयात 36 हून अधिक कंपन्या झाल्या सामील, आता त्यांचे सहजपणे खाजगीकरण होणार

modi and shah

नवी दिल्ली । आजचा दिवस खूप महत्वाचा असेल. कारण आज अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, मोदी मंत्रिमंडळाकडून (Modi Cabinet) दोन मोठ्या बातम्या समोर येत आहेत. एक, आज मंत्रिमंडळात मोठे बदल होणे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर निर्गुंतवणुकीचा (Disinvestment) मार्ग सुलभ करण्यासाठी सरकारने 36 पेक्षा जास्त कंपन्या अर्थ मंत्रालयाकडे (Finance ministry) ट्रान्सफर केल्या आहेत. आता या 36 कंपन्यांपेक्षा अधिक अर्थ मंत्रालयात असतील, यापूर्वी या कंपन्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात (Ministry of Commerce and Industry) होत्या.

‘या’ कंपन्या लिस्टमध्ये आहेत
या ट्रान्सफर लिस्ट मध्ये BHEL,HMT, Scooters India आणि Andrew Yule यांची नावे समाविष्ट आहेत. यामुळे कंपन्यांचे धोरणात्मक निर्गुंतवणुक सोपी होईल. सरकारने मोक्याच्या विक्रीसाठी जवळपास 35- CPSE ची निवड केली आहे. यामध्ये एअर इंडिया, पवन हंस, बीईएमएल, स्कूटर्स इंडिया, भारत पंप कंप्रेशर्स आणि सेलच्या भद्रावती, सालेम आणि दुर्गापूर या प्रमुख स्टील कंपन्यांचा समावेश आहे.

हिंदुस्तान फ्लोरोकार्बन्स, हिंदुस्तान न्यूजप्रिंट, एचएलएल लाइफ केअर, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स, ब्रिज अँड रूफ इंडिया, एनएमडीसीचा नगरनर स्टील प्लांट आणि सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आयटीडीसीच्या युनिट यांचा देखील समावेश आहे.

या मंत्रालयांमध्ये कोणताही बदल होणार नाही
दुसरीकडे मोदी सरकारच्या दुसर्‍या डावातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता शपथविधीनंतर टीम मोदीचा चेहरा मोठ्या प्रमाणात बदलेल, 20 नवीन चेहरे मंत्रिमंडळात येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, तर काही मंत्र्यांचे पोर्टफोलिओही बदलू शकतात. या मंत्रिमंडळात 20 नव्या चेहर्‍यांचा समावेश करता येईल. सिंधिया आणि सोनोवाल कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. अर्थ, परदेशी, संरक्षण आणि गृह मधील बदल कमी होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त प्रभाव असलेल्या मंत्रालयांना नवीन चेहरे मिळू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सहकार मंत्रालय तयार केले गेले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group