Thursday, December 18, 2025
Home Blog Page 3918

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलवलं ; मंत्रिपद निश्चित??

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना अचानकपणे दिल्लीला बोलवण्यात आलं असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे.

दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान खुद्द राणे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.

Tata Steel चे कच्च्या स्टीलचे उत्पादन जूनच्या तिमाहीत 43 टक्क्यांनी वाढले, विक्रीही वाढली

नवी दिल्ली । 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा स्टीलचे कच्चे पोलाद उत्पादन 43 टक्के वाढून 79.4 लाख टनावर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचे उत्पादन 55.3 लाख टन्स एवढे होते. टाटा स्टीलने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीच्या एकत्रित आधारावर विक्री 35 टक्क्यांनी वाढून 71.4 लाख टनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही कंपनी 53.3 लाख टन होती.

या तिमाहीत कंपनीचे उत्पादन 55 टक्क्यांनी वाढून 46.2 लाख टन झाले आहे. जो मागील वर्षीच्या समान तिमाहीत 29.9 लाख टन राहिला. टाटा स्टीलचा पुरवठा 42 टक्क्यांनी म्हणजेच 29.3 टनांनी वाढून 41.5 लाख टन झाला आहे.

टाटा स्टील युरोपचे पोलाद उत्पादन 27 टक्क्यांनी वाढून 27.3 लाख टनांवर गेले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत ते 21.5 लाख टन्स होते. या काळात कंपनीचा पुरवठा 19.8 लाख टनांवरून 19 टक्क्यांनी वाढून 23.6 लाख टन झाला आहे.

टाटा स्टील दक्षिण-पूर्व आशियाचे उत्पादन 49 टक्क्यांनी वाढून 3.9 लाख टनांवरुन 5.9 लाख टनांवर गेले. या कालावधीत पुरवठा 4.2 लाख टनांवरून 50 टक्क्यांनी वाढून 6.3 लाख टन झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीत दिलासा ! आजच्या नवीन किंमती जाणून घ्या

नवी दिल्ली |  पेट्रोलच्या दरात आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज कोणत्याही प्रकारे इंधनाचे दर वाढवले ​​नाहीत. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर आहेत. याशिवाय अनेक दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणताही बदल दिसून येत नाही.

4 मेपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. सन 2021 मध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील 11 राज्यांत पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि लडाख या 11 राज्यांच्या यादीत आहेत. देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये उपलब्ध आहे.

यावर्षी किंमतींमध्ये 15% वाढ झाली आहे
सन 2021 मध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान किंमतींमध्ये स्थिरता होती. तेव्हापासून तेथे सतत वाढते आहे. एका वर्षात पेट्रोलच्या दरात 19.43 रुपयांनी वाढ झाली आहे.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 99.86 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.36 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 105.92 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.91 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 100.75 रुपये तर डिझेल 93.91 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 99.84 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर आहे.

>> जयपुर मधील पेट्रोल 106.64 रुपये आणि डिझेल 98.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

विवाहितेला जबरदस्तीने विषारी औषध पाजले, पतीसह सासू व दिरावर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील कालेटेक येथे विवाहितेला मारहाण करून तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी हिना सर्फराज शेख (वय 25 रा. कालेटेक ता. कराड) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी सासू, पती, दिरावर गुन्हा नोंद झाला आहे.

याबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिना शेख हिचा सन 2015 साली कालेटेक येथील सर्फराज शेख यांच्याशी विवाह झाला आहे. एक वर्षापुर्वी भांडणामुळे हिना आपल्या मुलीसह माहेरी रहायला गेल्या होत्या. 4 जुलै रोजी त्यांना पती सर्फराज यांचा फोन आला. आपण स्वतंत्र राहू असे म्हणत समजूत काढली. त्यामुळे हिना या भावासह कालेटेक येथे सासरी आल्या. हिनाला सोडून भाऊ परत सातारला गेला. दरम्यान रात्री पुन्हा सासरच्या लोकांनी हिनाशी वाद घातला. सासू व पतीने मारहाण करायला सुरूवात केली. तुला इथे रहायचे असेल तर आमच्या मनाप्रमाणे रहावे लागेल असे सांगत त्यांंनी हिनाला पकडून नाक दाबत तिला विषारी औषध पाजले असे फिर्यादीत म्हटले आहे.

हिनाला घराच्या बाहेर ढकलून देत शिवीगाळ केली. हिना हिने तत्काळ पोलीस स्टेशनला फोन करून घडला प्रकार सांगितला. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी शेख यांच्या घराकडे धाव घेतली. इतर नातेवाईकांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलवून हिनाला खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हिना शेखने दिलेल्या जबाबावरून सासू, पतीसह दिरावर गुन्हा दाखल झाला आहे.

आदेशाचे उल्लघंन : भिडे गुरुजींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 80 धारकर्‍यांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासह 70 ते 80 धारकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 5 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे  उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली व मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदीरात प्रवेश केला. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

भिडे गुरुजींसह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिडीं काढून जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. परंतु ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लघंन करुन आषाढी वारीसाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. शासनाने बंडातात्या कराडकर यांच्यासह वारकर्‍यांना वारीसाठी परवानगी द्यावी. या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास  संभाजी भिडे गुरुजी दत्त चौक कराड येथे आले. यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या 70 ते 80 धारकरी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परवागनी न घेता, जमाव जमवून मोटर सायकल रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकर्‍यांनी विना मास्क शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा भगवा झेंडा हातात घेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणा बाजी करत पायी चालत जात तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या साठी ग्रामपंचायतीला शाळेच्या अखत्यारीतील पालकांशी चर्चा करून ठराव मंजूर करावा लागणार आहे.

शाळेत टप्या टप्याने बोलवण्यात येणार आहे. कोविड संबंधी नियमांचे पालन करणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक असणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार आहे. तसेच दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या असणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे याचे पालन करावे लागणार आहे.

या दरम्यान कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येईल आणि त्याची लगेच कोरोना चाचणी करण्यात येईल. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

टोक्यो ऑलम्पिकमध्ये ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार ध्वजवाहकाचा मान

Olympics

टोक्यो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्तीचे प्रयत्न करून ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा केली आहे. तसेच भारताने देखील आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या ऑलम्पिकच्या उद्घाटनावेळी ध्वजवाहकाचा मान दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना देण्यात आला आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कुस्तीपटू बजरंग पुनिया यालादेखील 8 ऑगस्ट रोजी टोक्यो ऑलम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच एक नाही दोन ध्वजवाहक
ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असणार आहेत. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा याला मान देण्यात आला होता.

भारतासाठी ऑलम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला
दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. मेरी कोमने 2012 साली ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. 38 वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदके मिळवून दिली आहेत. तिचे वय लक्षात घेता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणार हे नक्की.

वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच – बंडातात्या कराडकर

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी कराडकर म्हणाले कि, “हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज माझ्या भेटीला आले होते. वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच आहे. आणि तो सर्वधर्म समाजाचाहीआहे. त्यामुळेच शिवप्रतिष्ठान या हिंदू संघटनेला वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही. या भावनेतूनच भिडे गुरुजींनी आपली भेट घेतली आहे.”

भिडे गुरुजी यांनी सोमवारी कराड तालुक्यातील करवडी येथे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वारकरी व शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान बंडातात्या कराडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये राक्षसी पद्धतीने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत मला स्थानबद्ध केले आहे. हा समस्त वारकऱ्यांवर झालेला अन्याय असून तो योग्य नसल्याची समाजभावना निर्माण झाली आहे. याच भावनेतून संभाजी भिडे (गुरूजी) यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक असून यामागे अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा व संस्कृती एकप्रकारे खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधाला न जुमानता आम्ही पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आंदोलन करीत पंढरपूरच्या दिशेने पायी चाललो असताना पोलिसांनी मला स्थानबद्ध केले. पायी वारीच्या परंपरेत खंड पडू नये, म्हणून चाललेल्या आमच्या प्रयत्नांबद्धल श्री भिडे गुरूजींनी आमच्याप्रती अभिमान व्यक्त केला. तसेच या भेटीप्रसंगी गुरुजींनी आम्हाला शिदोरी म्हणून संदेश दिला असून त्यांनी व्यक्त केलेली सहानभूतीची भावना आम्ही स्वीकारली असल्याचेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.

हृदयद्रावक ! एकाच दिवशी मायलेकी झाल्या विधवा

Accident

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात जावयाचासुद्धा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने मायलेकी विधवा झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण
हिरापूर येथील रहिवासी असणारे किसन चिडांम यांचा शनिवारी सायंकाळी शेतावर काम करताना अचानक मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत किसन चिडांम यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर नातेवाईक गावातील एक पिकअप वाहन भाड्याने घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते.

या दरम्यान चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चालकासह वाहनातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर गोमा खंडाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर बाकी जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.