Saturday, December 6, 2025
Home Blog Page 5

PM Awas Yojana Home Loan Subsidy : गृहकर्जावर 4 टक्के व्याज सबसिडी; मोदी सरकारचे मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट

PM Awas Yojana Home Loan Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Awas Yojana Home Loan Subsidy । नवीन घर बांधणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु सध्याच्या या महागाईच्या काळात घर बांधणं हे काय खायचं काम नाही. वाढत्या महागाईमुळे, सिमेट, लोखंड, विट यांच्या किमती वाढल्या आहेत. साहजिकच नवीन घर बांधताना प्रचंड खर्चाला सामोरं जावं लागतंय. पण आता मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत आता व्याजदरावरही सबसिडी देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घर बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरं तर, २०२४ मध्ये सत्तेत आल्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) २.० ला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) मधील कुटुंबांना त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी व्याज अनुदान लाभ मिळतील. PM Awas Yojana Home Loan Subsidy

किती कर्जावर किती अनुदान? PM Awas Yojana Home Loan Subsidy

PMAY-U २.० व्याज अनुदान योजनेअंतर्गत (ISS) घर खरेदीसाठी घेतलेल्या परवडणाऱ्या गृहकर्जांवर सरकार अनुदान देते. अनुदानासाठी पात्र होण्यासाठी, घराची किंमत ₹३५ लाखांपर्यंत आणि कर्जाची रक्कम ₹२५ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, १२ वर्षांपर्यंत कर्ज कालावधीसह, पहिल्या ₹८ लाख कर्जावर ४% व्याज अनुदान उपलब्ध असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, यामुळे EMI चा भार कमी होईल, ज्यामुळे कुटुंबांना घर खरेदी करणे सोपे होईल. ही सुविधा विशेषतः अशा कुटुंबांसाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹9 लाखांपर्यंत आहे आणि ज्यांचे देशात कुठेही कायमचे घर नाही.

एकूण अनुदान ₹1.80 लाख

लाभार्थ्याला मिळणारे एकूण अनुदान ₹1.80 लाख असेल, जे सरकार पाच हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा करेल. लाभार्थी वेबसाइट, ओटीपी किंवा स्मार्ट कार्डद्वारे त्यांच्या अनुदान खात्याची माहिती देखील तपासू शकतात. सरकारने या योजनेसाठी एकूण ₹2.30 लाख कोटींची आर्थिक मदत वाटप केली आहे, ज्यापैकी व्याज अनुदान हा एक प्रमुख घटक आहे. पुढील पाच वर्षांत या योजनेचा फायदा 10 दशलक्ष नवीन शहरी कुटुंबांना होईल असा सरकारचा अंदाज आहे.

Dharmendra Passed Away : अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; बॉलीवूडवर शोककळा

Dharmendra Passed Away

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Dharmendra Passed Away । बॉलिवूडचा (Bollywood) ‘ही-मॅन’ (He Man) सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकृतीच्या विविध समस्यांशी सामना करत होते. अखेर 24 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या होत्या, परंतु IANSने त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना शेवटी पूर्णविराम मिळाला आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपासून तब्ब्येत बिघडली – Dharmendra Passed Away

धर्मेंद्र हे 89 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुन्हा घरी हलवण्यात आले. त्यांच्यावर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांनी अंतिम श्वास घेतला Dharmendra Passed Away. धर्मेंद्र यांच्या जाण्याने देओल कुटुंब दु:खात बुडाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता खरी दुःखद घटना घडल्याने कुटुंबीय काहीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे समजते.

चाहते मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणी, फोटो आणि त्यांचे संवाद शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. धर्मेंद्र यांच्या घराच्या बाहेरून आलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांत आधीच काळजीची भावना निर्माण झाली होती. त्या व्हिडिओत एम्ब्युलन्स घराबाहेर उभी असल्याचे दिसत होते. तसेच श्मशानभूमीच्या बाहेर अचानक वाढलेली सुरक्षा पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. अखेर अधिकृत घोषणा येताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले.

धर्मेंद्र हे बॉलीवूडचे बडे अभिनेते –

भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. चा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis On Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनचा चेहरामोहरा बदलणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis On Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis On Mumbai Local Train । मुंबईची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन, दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करत आपलं ऑफिस गाठतात. मधल्या काळात मुंबईत मेट्रो ट्रेन, मोनोरेल आल्या, तरीही लोकलची गर्दी कमी होण्याचं काय नाव नाही. मिळेल त्या जागेवर, अनेकदा उभं राहून आणि कधी कधी बाजूला लटकून, जीव टांगणीला लावून मुंबईकर लोकलने प्रवास करतो. यामुळे अनेकदा अपघात सुद्धा होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल ट्रेनबाबत एक मोठी घोषणा करत मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis On Mumbai Local Train

युनायटेड नेशन्सचे भारतीय मॉडेल (IIMUN) आयोजित युथ कनेक्ट सत्रात Involvement of Youth in Governance या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकल ट्रेनच्या होणाऱ्या कायापालटची माहिती दिली. मुंबईची जी लोकल आहे, ज्यातून साधारण ९० लाख लोक दररोज प्रवास करतात. त्यात आपण मोठा बदल करणार आहोत. आता आम्ही लोकलचे सर्व कोच हे मेट्रोप्रमाणे एअर कंडिशन करणार आहोत. त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये हा सर्वात मोठा बदल होत असला तरी सर्वसामान्य प्रवाशाला कोणताही अधिकच आर्थिक फटका बसणार नाही, कारण रेल्वेच्या तिकिटात कोणतीही वाढ होणार नाही. सध्याच्या किमतीतीच मेट्रो प्रवासाप्रमाणे अनुभव लोकल प्रवास करता येणार आहे, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. Devendra Fadnavis On Mumbai Local Train

अंडरग्राउंड बोगद्याचे जाळे –

पुढील सात वर्षांत मुंबईचा सरासरी वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचावा यासाठी मुंबई भूमिगत बोगद्यांचे एक मोठे जाळे तयार करत आहे, जे सध्या गर्दीच्या वेळी सरासरी १५ ते २० किमी प्रतितास आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. “मुंबईच्या वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही पथल लोक (भू-बोगद्यांच्या जाळ्याखाली) तयार करत आहोत. वांद्रे सी लिंकवरून, एक बोगदा तयार केला जाईल जो बीकेसीला जोडेल आणि दुसरा बोगदा जो वाहतूक थेट मुंबई विमानतळावर नेईल. “या बोगद्याचे उद्दिष्ट बीकेसीची गर्दी कमी करणे आणि लोकांना कमीत कमी वेळेत विमानतळावर पोहोचवणे आहे,” असे फडणवीस म्हणाले.

Pune Scam : भूअंकुर ऍग्रो कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली घातला 200 कोटींचा गंडा; पुण्यातील घटनेनं खळबळ

Pune Scam Bhuankur Agro Company scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Scam । भूअंकुर ऍग्रो प्राईड कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली 200 कोटींचा घोटाळा केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा, तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितके जास्त रिटर्न तुम्हाला देऊ असं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून रवी कानडजी, अरविंद चौधरी,अनुराधा आणि प्रियंका अशी आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं? Pune Scam

पुण्यातील या स्कॅमबाबत (Pune Scam) फसवणूक झालेल्या बेबी असमा अजमद असमा (वय ३५) यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्या इन्डस्ट्री कंपनीत मजुरी म्हणुन काम करतात. नवऱ्याचे निधन झाल्याने त्या त्यांच्या २ मुलांसोबत राहतात. नागराज नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला पुण्यातील प्रॉफिट ट्रेड नावाच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. ती कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असून जेवढे जास्त पैसे तुम्ही गुंतवाल तेवढा मोबदला तुम्हाला आम्ही देऊ असं अमिश दाखवण्यात आलं. यानंतर २०२३ मध्ये अनिल व्यवहारे हा प्रोफिट ट्रेड कंपनीचा माणुस हा पुण्यातून थेट फिर्यादीच्या राहत्या घरी गेला. आमची कंपनी नवीन आहे. त्यात तुम्ही पैसे गुंतवल्यास आम्ही तुम्हाला प्रत्येक महीन्याला ५ टक्के परतावा देऊ असं आश्वासन त्याने दिले.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने १४/११/२०२३ रोजी ३,००,००० रुपये सी. बी. एस. बॅक मार्फत मी ०५९७०४४८९०६९१९५००१ या प्रोफिट ट्रेड असोसियटड या कंपनीच्या अकाऊट नंबरवर पाठविले. १८-१२-२३ रोजी सी. एस. बी बँक शाखा ,मेरी कॉलेज रोड, थ्रीशूल येथून सीबीएस बँक मार्फत ०५९७०४४८९०६९१९५००१ या प्रोफिट ट्रेड असोसियटड या कंपनीच्या अकाऊटला पैसे भरले. त्यानतर फिर्यादीने प्रोपीट ट्रेड असोसियटस कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन रविद्र कानडजे यांच्याकडे आणखी ३ लाख रुपये दिले. यानंतर रविद्र कानडजे यास पैसे व त्याबदल्ल्यात देण्यात येणारा मोबदला याबाबत विचाले असता त्याने २१/०१/२०२५ रोजी भुअंकुर ॲग्रो प्राईड प्रायवेट लिमीटेड कंपनीचे खाते क्रमाक २३०२२३५४४८६५१२६६ चा ५,००,००० रुपयेचा चेक दिला आणि २१/०२/२०२५ रोजीचा भुअंकुर ॲग्रो प्राईड प्रायवेट लिमीटेड कंपनीचे खाते क्रमाक २३०२२३५४४८६५१२६६ चा तीन लाख रुपयेचा चेक दिला त्याने दिलेले दोन्ही चेक बाऊन्स झाले.

त्यानतर फिर्यादीने थेट कंपनीच्या पुण्यातील (Pune Scam) ऑफिसवर धाड टाकली, आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी विचारपूस केली असताना सदर फसवणूक करणारी टोळी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आलं. प्रॉफिट ट्रेड कंपनीने चे रविद्र कानडजे,अनिल व्यवहारे, अमोल नरवडे जयप्रकाश, अनुराधा अतुल नायक अय्याप्पा कुमार गंगारत्नमा यांनी सर्वानी मिळुन तंबाबा ८ लाख रुपयांना गंडा घातला. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शिंदेचे 35 आमदार फुटणार? भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ गेम करणार

Eknath Shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतचे ३५ आमदार फुटणार असून भाजपने त्यांचं ऑपरेशन लोटस ऍक्टिव्ह केलं असल्याचा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे. भाजपाला आता एकनाथ शिंदे नकोसे झाले असून शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले असल्याचं सामनातून म्हंटल आहे. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे.

काय म्हंटल सामना अग्रलेखात ?

महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य सुरू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, “हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही.” शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारले, “साहब, आप क्यूं हस रहे हो.” यावर शहा म्हणाले, “कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे. शिंदेजी, आप क्रोनॉलॉजी समझ लीजिए. पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका.” शहा-शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे. आता शिंदे म्हणतात, “त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द श्री. शहा यांनी दिला.” ही शिंदे यांची बतावणी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शिंदे यांची अनेक माणसे फोडली. युतीच्या राजकारणात हे शोभत नाही. भारतीय जनता पक्षाने हे असे केले तर आमचा पक्ष टिकणार नाही अशी शिंदे व त्यांच्या लोकांची चिंता आहे. रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ असे म्हणायला हवे. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी शिंदे गटास खिंडार पाडले. भारतीय जनता पक्षाचा मूळ स्वभाव ‘वापरा, फेका, नाहीतर गिळून फस्त करा,’ असाच आहे. शिंदे व त्यांच्या बरोबरचे 40 आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे.

भाजपने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत. अमित शहा यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या संगनमताने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे. शिंदे हे ठेकेदार सेना चालवतात. त्यामुळे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे शिंदे यांना लोक चिकटलेले आहेत. भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी शिंदेंसमोर मोठी गुळाची ढेप ठेवली. शिंदे यांचे मुंगळे हे भाजपच्या ढेपेवर चढले. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे. “रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली” या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे.अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; 500 फूट दरीत कार कोसळली

Tamhini Ghat Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tamhini Ghat Accident । पुणे माणगाव मार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घाटात प्रवासादरम्यान, थार कार 500 फूट दरीत कोसळली आहे. खरं तर हा अपघात मंगळवारी उशिरा रात्री घडला. तीन दिवसापूर्वी कारमधील व्यक्तींचा संपर्क तुटला होता. त्यानंतर बचाव पथकाला चार जणांचे मृतदेह सापडले असून दोन जण बेपत्ता आहेत. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ताम्हिणी घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू असल्याने सातत्याने याठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ बघायला मिळते. या घाटातून दररोज हजारो गाड्यांची ये जा पाहायला मिळते. घाटातील वळणे हि धोकादायक असल्याने वाहने सावकाश चालवा असे आवाहन सातत्याने करण्यात येत, कारण यापूर्वी सुद्धा ताम्हिणी घाटाने अनेक अपघात बघितले आहेत. त्यातच आता मंगळवारी या घाटातून प्रवास करताना एक थार ५०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात ३ लोकांचा प्राण गेला आहे. या अपघाताची वेळ रात्रीची असल्याने कोणालाही अपघाताची (Tamhini Ghat Accident) कल्पना तात्काळ आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून बचाव पथकामार्फत बचावकार्य सुरु आहे.

मृतदेहाच्या तपासणीचे काम सुरु- Tamhini Ghat Accident

कार मधील प्रवासी ३ दिवस संपर्कांच्या बाहेर असल्याने त्यांचे घरचे चिंतेत होते. कोणत्याही परिस्थितीत संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल थांबल्याचे दिसले. यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेर ड्रोन शुटमध्ये दरीत थार जिप आणि मृतदेह आढळले. सध्या या मृतदेहाच्या तपासणीचे काम सुरु आहे.

भाजप पैसे देऊन नगरसेवक फोडतंय; शिंदेंच्या तक्रारीने खळबळ

eknath shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे सत्तेतील एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप शिंदे गटातील अनेक नेत्याना स्वतःच्या पक्षात प्रवेश देत असल्याने शिंदेची शिवसेना चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचं आणि महाराष्ट्र भाजपची तक्रार केली असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी शिंदेनी ना देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांची तक्रार केली, तर त्याची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारीचा पाढा अमित शहा यांच्यापुढे वाचल्याचं बोललं जातेय.

शिंदेंची तक्रार काय?

कल्याण डोंबिवलीतील ‘ऑपरेशन लोटस’वरुन अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र ते शिवसेनेचे नगरसेवक फोडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला पोषक वातावरण असताना भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याचे शिंदे यांनी शहा याना सांगितलं. भाजप नेत्यांमुळेच महायुतीत उगाचच बिघाडी होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितल्याचे समजते. तसेच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

अमित शाह काय म्हणाले?

दरम्यान, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या सर्व तक्रारी जाणून घेतल्या. जवळपास ५० मिनिटे शिंदे आणि शाह यांच्यात बोलणं झालं. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, या संपूर्ण घडामोडींकडे माझं लक्ष आहे असं अमित शाह एकनाथ शिंदे याना म्हणाल्याचे बोललं जातंय. यानंतर मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Zoo In Jath : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत उभारण्यात येणार नवीन प्राणी संग्रहालय

Zoo In Jath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Zoo In Jath। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असताना आता याच पश्चिम महाराष्ट्रात एक नवीन प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्राणी संग्रहालयात ४०० प्रकारचे प्राणी असतील असं पडळकर यांनी सांगितलं. येव्हडच नव्हे तर जो बिबट्या लोकांना त्रास देतोय त्या बिबट्याला आम्ही आमच्या प्राणी संग्रहालय टाकणार आहोत आणि त्याच्यावर तिथे उपचारही करू असे पडळकर म्हणाले.

याबाबत गोपीचंद पडळकर यांनी माहिती देताना म्हंटल कि,पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जत तालुक्यात (Zoo In Jath) होणार आहे. जवळपास 100 एकरांमध्ये 150 कोटीचा या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव असणार आहे. या प्राणी संग्रहालयात सुमारे 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी असतील. तसेच बिबट्यांची देखील जत तालुक्यातील या प्राणी संग्रहालयात राहण्याची सोय करू. राज्य सरकारची या प्राणी संग्रहालयाला मान्यता मिळालेली असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू आणि पुढच्या दोन-तीन महिन्यामध्ये मंजूर करून घेऊ. जो बिबट्या लोकांना त्रास देतोय त्या बिबट्याला आम्ही आमच्या प्राणी संग्रहालय टाकणार आहोत आणि त्याच्यावर तिथे उपचारही करू असे पडळकर म्हणाले.

प्राणीसंग्रहालयाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव (Zoo In Jath)

हे प्राणी संग्रहालय (Zoo In Jath) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येईल. पुढील एक ते दीड वर्षात हे प्राणी संग्रहालय तयार व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. 100 एकर मध्ये प्राणी संग्रहालय असं पश्चिम महाराष्ट्रात इतर कुठेही बघायला मिळणार नाही त्यामुळे या प्राणी संग्रहालय नंतर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर याठिकाणी येथील आणि जत आणि आसपासच्या परिसराला त्यामुळे मोठी चालना मिळेल असा विश्वासही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला..

Rohit Sharma : रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार? पडद्यामागे घडतंय काय?

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma। भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्या रोहित शर्माला बीसीसीसीआयने अचानकपणे वंदे कर्णधार पदावरून काढलं होते, त्याच रोहित शर्माला आता पुन्हा कर्णधार करण्याची वेळ बीसीसीसीआयवर येतेय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. त्यातच उपकर्णधार श्रेयश अय्यर हा सुद्धा दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे कर्णधारपद कोणाकडे सोपवायचा या विचारात बीसीसीआय आहे. अशावेळी पुन्हा रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडू शकते असं बोलले जात आहे.

वृत्तांनुसार, बीसीसीआयने पुन्हा एकदा एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारण्याबाबत रोहित शर्माशी (Rohit Sharma) संपर्क साधला आहे. कारण भारतीय संघाचे नेतृत्व या मालिकेत अनुभवी खेळाडूने करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. परंतु रोहित शर्मा हे कर्णधारपद स्वीकारेल कि नाही याबाबत अजूनही स्पष्टता समोर आली नाही. कदाचित ज्याप्रकारे रोहितचे कर्णधारपद काढून घेण्यात आलं होते ते बघता रोहित पुन्हा कर्णधार होण्यास उत्सुक असेल असं वाटत नाही.

के एल राहूलचा पर्याय

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुलला सर्वात मजबूत कर्णधार पर्याय मानला आहे. केएल राहुलने यापूर्वी अनेक वेळा भारताचे नेतृत्व केले आहे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये उपकर्णधार म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे, जर रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारले नाही, तर त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधारपद दिले जाऊ शकते.

रोहित शर्माचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड– Rohit Sharma

एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा खूपच चांगला राहिला आहे. रोहितने ४६ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केलं. त्यापैकी ३४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला तर १० सामने गमवावे लागले. रोहितच्या विजयाची टक्केवारी ७५ आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने अंतिम फेरीत मजल मारली होती. यानंतर गतवर्षी पार पडलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया विजेता बनली होती.

Mumbai Airport : मुंबई विमानतळ या वेळेत बंद राहणार; समोर आली मोठी अपडेट

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport । मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या ६ तासांमध्ये सर्व धावपट्टीचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित धावपट्टी बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (MIAL) सांगितले.

विमानतळ बंद ठेवणे पूर्वनियोजित – Mumbai Airport

दरवर्षीच्या पावसाळ्यानंतरच्या देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा हा नियोजित कार्यक्रम आहे. या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने ६ महिन्यांपूर्वीच याची कल्पना सर्व विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. जेणेकरुन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. त्यानुसार, विमान कंपन्यांनी नियोजन केले आहे. परंतु रनवे काही तासांसाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीमध्ये तपासणी, धावपट्टीवरील लाइट्स, मार्किंग आणि ड्रेनेश सिस्टीमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असणार आहे.

मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ –

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दोन छेदनबिंदू धावपट्टी आहेत, मुख्य धावपट्टी ९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२, ज्याठिकाणी दररोज ९५० पेक्षा जास्त उड्डाणे होतात. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोठं आणि महत्वाचे विमानतळ म्हणून ओळखले जाते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून मुंबईकडे बघितलं जाते. दर चार मिनिटाला मुंबई विमानतळावर विमान लॅंन्ड होते आणि टेकऑफ होते. जगभरातील जवळपास सर्वच देशात मुंबई विमानतळावरून उड्डाण होते.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करेल. त्याठिकाणी सुरुवातीला दररोज २३ वेळा उड्डाणे होतील. पहिल्या महिन्यात, विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १२ तासांसाठी कार्यरत राहील, दररोज २३ वेळा उड्डाणे होतील. या कालावधीत, विमानतळ प्रति तास १० वेळा उड्डाणे करेल.