Friday, December 26, 2025
Home Blog Page 440

BSNL चा 345 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 60 दिवसांची व्हॅलिडिटी अन बरंच काही…

BSNL Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अलीकडेच देशातील एअरटेल, जिओ, वोडाफोन- आयडिया सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. या परिस्थितीत स्वस्तात मस्त रिचार्ज साठी प्रसिद्ध असलेल्या BSNL आपल्या यूजर्ससाठी नवीन नवीन प्लॅन घेऊन येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये सेवा मिळतील . आज सुद्धा आम्ही तुम्हाला BSNL च्या अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत ३४५ रुपये असून या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा डेटा, आणि कमी खर्चात जास्त फायदे मिळत आहेत. चला तर मग या रिचार्ज प्लॅन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात .

स्वस्त आणि स्पर्धात्मक प्लॅन-

BSNL च्या या ३४५ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ही 60 दिवसांची असून त्यामध्ये दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, आणि रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. हा रिचार्ज फक्त 345 रुपयांत असल्याने या प्लॅनचे दिवसाचे गणित केल्यास दररोजचा खर्च फक्त 5.75 रु इतका असणार आहे. या प्लॅनची सर्वात जबदस्त सेवा म्हणजे दररोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट सेवा सुरू राहील, पण स्पीड मात्र 40 Kbps इतकी कमी होईल.ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी स्वस्त दरात हि सेवा मिळणार आहे. BSNL चा नवीन प्लॅन त्याच्या दररोजच्या खर्चाच्या दृष्टीने तसेच खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे.तो सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल असा आहे . ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त आणि उत्कृष्ट सेवा मिळेल.

BSNL चा 150 दिवस व्हॅलिडिटीचा प्लॅन –

याशिवाय बीएसएनएनलचा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे तो म्हणजे 397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. होय, BSNL ग्राहकांसाठी 150 दिवस व्हॅलिडिटीचा प्लॅन घेऊन आली आहे, तो प्लॅन 397 रुपयांचाअसून 30 दिवसांपर्यंत अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS उपलब्ध असणार आहे. तसेच डेटा संपल्यानंतरही 40 Kbps स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लॅनमध्ये संपूर्ण देशभरात फ्री रोमिंगची सेवा प्रदान करण्यात आली आहे . 397 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन जास्त कालावधीसाठी फायदेशीर आहे.

BOI Special FD Scheme | बँक ऑफ इंडियाकडून विशेष FD योजना; मिळणार 8.10 % व्याजदर

BOI Special FD Scheme

BOI Special FD Scheme | आजकाल महागाईचा आणि भविष्याचा विचार करून आर्थिक स्थैर्य मिळवणे खूप गरजेचे असते.यासाठी आपण आत्तापासूनच गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. लोक शेअर मार्केट म्युच्युअल फंड बँकेचे सारख्या अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. परंतु जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीचा चांगला पर्याय हवा असेल, तर तुम्ही बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता. कारण बँकांची FD योजनाअत्यंत सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा गुंतवणुकीची योजना आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक विशेष एफडी योजना सुरू केली आहे. यावर तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळणार आहे. आता आपण या एफडी योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.

बँक ऑफ इंडियाने 400 दिवसांची एक चांगली एक विशेष योजना आणलेली आहे.यावर सर्वात जास्त म्हणजे 8.10% एवढे व्याजदर आकारले जाते. या योजनेसाठी ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक शाखेमध्ये जाऊन गुंतवणूक करू शकतात. याशिवाय डिजिटल चैनल इंटरनेट बँकिंगद्वारे देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. नवीन दर हे 27 सप्टेंबर 2024 पासून लागू झालेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही गुंतवणूक करू शकता.

किती व्याजदर मिळणार

बँक ऑफ इंडियाच्या या विशेष एफडी योजनेअंतर्गत तुम्ही 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या बँकेद्वारे सुपर जेष्ठ नागरिकांना एडी योजनेवर 8.10% एवढे व्याजदर मिळणार आहे. जेष्ठ नागरिकांना 7.95% व्याजदर मिळेल, तर सामान्य नागरिकांना 7.45% एवढे व्याजदर मिळणार आहेत.

या बँकेने त्यांच्या एक निवेदन जाहीर केलेले आहे. आणि या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, “देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सणासुदीची भेट म्हणून ही योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये तुम्ही तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकता. आणि आकर्षक व्याजदर मिळू शकते. ही मुदत ठेव योजना चारशे दिवसांसाठी असणार आहे.

त्यामुळे तुम्ही या बँक ऑफ इंडियाच्या विशेष FD योजननेमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही जास्त रकमेची एकच एफडी न करता वेगळ्या रकमेची एफडी करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यातून खूप चांगला परतावा मिळेल.

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत 682 रिक्त पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024

CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे. अनेक लोकांना पुण्यामध्ये येऊ नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु त्यांची ही इच्छा अनेक कारणास्तव पूर्ण होत नाही. परंतु आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण. CMYKPY पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू होणार आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिसिफिकेशन, वेल्डिंग, पेंटिंग इतर पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 682 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024

या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेंटिंग इत्यादी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 682 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावे लागेल

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेला अर्ज करा.

अर्ज कसा करावा ? | CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू
  • 30 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

RRB Technician Recruitment 2024 | रेल्वेमध्ये 14,258 पदांसाठी मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशाच काही संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. अनेक लोकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची आणि त्यांची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता RRB अंतर्गत एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड III या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांचा एकूण 14,258 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावी लागणार आहे. त्या भरतीचे अर्ज प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | RRB Technician Recruitment 2024

RRB भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड III या पदाचासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 14 हजार 298 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वेळ 18 ते 33 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 500 रुपये फी भरणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत निवड होण्यासाठी तुमची संगणक आधारित चाचणी घेतली जाईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

2 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवट तारीख

16 ऑक्टोबर 2024 ही या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

अर्ज कसा करावा | RRB Technician Recruitment 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत स्विझर्लंड आणि इंग्लंडची कॉपी; कमी बजेटमध्ये करा प्रवास

mini swizerland

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना फिरायला जाण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेक ठिकाणी फिरत असतात. परंतु सगळ्या गोष्टींचा विचार करता, त्यांना परदेशातील अनेक ठिकाणांना भेट देता येत नाही. म्हणूनच त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. परंतु आता तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण आपल्या भारतात सध्या अशी काही पर्यटन स्थळे तयार झाली आहेत, जी विदेशातील पर्यटन स्थळांना देखील मागे टाकतील. आज आपण अशी काही ठिकाणी पाहणार आहोत की, विदेशातील तुम्ही भारतामध्ये फिरू शकता.

श्रीनगर मधील ट्युलिप गार्डन म्हणजेच एम्स येथील ट्युलिप फेस्टिवल

एम्स्टरडर येथील ट्यूलिप फेस्टिवल हा संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी तुमचे आर्थिक बजेट देखील तेवढे लागते. परंतु यावेळी ऐवजी तुम्ही श्रीनगरमध्ये जाऊन याचा अनुभव घेऊ शकता.आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन या ठिकाणच्या जबरवन पर्वतराजा मध्ये आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध असलेल्या या दल सरोवर कडे हे गार्डन आहे. तसेच या बागेत 60 जाती आणि विविध रंगाच्या 15 लाखां पेक्षा जास्त ट्युलिप्स पाहायला मिळतात. मार्च महिन्यासाठी हे गार्डन खुले होते.

स्विझर्लंड ऐवजी गुलमर्ग

स्विझर्लंड हे जगातील सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु आता तुम्ही भारतातच अगदी कमी पैशांमध्ये स्वीझरलँडचे दर्शन घेऊ शकता. तुम्ही स्विझरलँड ऐवजी काश्मीर मधील गुलमर्गला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहून पाहायला मिळेल, असे म्हटले जाते काश्मीरमधील गुलमर्ग सर्वाधिक पाहिले जाणारे एक पर्यटन स्थळ आहे.

इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ऐवजी नैनीताल

भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊ या भागामध्ये नैनीताल हे एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. याला तलावाचे शहर असे देखील म्हटले जाते. या ठिकाणचा हा तलाव इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट सारखाच दिसतो. तुम्हाला जर इंग्लंडचे हे तलाव पाहायची इच्छा असेल, तर तुम्ही त्या ऐवजी नैनितालला जाऊ शकता.

अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीपेक्षा उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीमध्ये जगातील सर्वात सुंदर फुले या ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु तुम्हाला जर अमेरिकेला जाणे शक्य नसेल, तर त्याऐवजी तुम्ही उत्तराखंड राज्यातील अँटीलोप व्हॅली ऑफ फ्लावर्सला भेट देऊ शकता. हे एक उंचावर असलेले कुरण आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत 100 पेक्षा जास्त प्रकारची फुले तुम्हाला या ठिकाणी दिसतील.

तांदळाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांवर होणार असा परिणाम

Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार सामान्य जनतेसाठी विविध निर्णय घेत असतात. अशातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता सरकारने बिगर बासमती असणाऱ्या पांढऱ्या पांढऱ्या तांदळाच्या निर्यात शुळकावरील संपूर्णपणे बंदी उठवली आहे. त्याचबरोबर प्रतिटन 490 डॉलर किमान निर्यात शुल्क देखील निश्चित केलेले आहे. सरकारने जुलै 2023 मध्ये तांदळाचा देशांतर्गत पुरवठा निश्चित करण्यासाठी आणि या तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही बंदी घातली होती. परंतु नुकतेच त्यांनी ही बंदी उठवलेली आहे.

या निर्णयाबाबत परकीय व्यापार महासंचालनाने म्हटले आहे की, “देशातील सरकारी गोदामामध्ये तांदळाचा पुरेसा साठा असताना आणि किमतीमध्ये नियंत्रणात असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने पांढऱ्या तांदळावरील शुल्क 10 टक्के कमी करताना बिगर बासमती पांढऱ्या तांदळाला सिर्यात शुल्कातून सुट दिलेली आहे.”

याबाबत राईस व्हीलाचे सीईओ सुरज अग्रवाल यांनी मत व्यक्त केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “बासमती नसलेल्या पांढऱ्या तांदळाच्या निर्यात वरील निबंध उठवण्याचा भारताचा धाडसी निर्णय हा कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या धोरणात्मक हालचालीमुळे केवळ निर्यातीदारांच्या उत्पादनाला चालना मिळणार नाही. तर नवीन खरीप पिकाच्या येऊ घातलेल्या आगमनाने जास्त परताव्याची अपेक्षा करणारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण देखील होणार आहे.”सरकारने तांदळावरील निर्यात शुल्क हे 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहे. अनेक लोक हे या तांदळावरील बंदी हटवण्याची मागणी करत होते. आता सरकारने तो निर्णय घेतल्यामुळे अनेक जण या निर्णयाचे कौतुक करत आहे.

Navratri 2024 | नवरात्रीत पहिल्यांदाच काशी विश्वनाथ धामच्या गर्भगृहात विराजमान होणार माता; अशाप्रकारे होणार स्वागत

Navratri 2024

Navratri 2024 | आपल्या भारतात प्रत्येक सण उत्सवाला खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. नुकतेच गणपती उत्सव पार पडलेले आहेत. आणि त्या 3 ऑक्टोबर पासून भारतात नवरात्रीला सुरुवात होणार आहे. असे म्हणतात की, या नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर उतरलेली असते. आणि नऊ दिवस ती वेगवेगळे रूप घेत असते. आणि या काळात तिच्या भक्तांच्या इच्छा देखील पूर्ण करत असते. त्यामुळे सगळेजण या नऊ दिवसात देवीची खूप भक्ती भावाने पूजा करतात. आणि हा सण थाटामाटा साजरा करतात. केवळ देवीचीच नाही तर काशी विश्वनाथ मंदिरातही यावर्षी पहिल्यांदाच नऊ दिवस वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाणार आहे. भगवान शिवाच्या नगरीतही यावर्षी नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाचा नवरात्रीच्या तयारीमध्ये खूप व्यस्त आहेत काशी विश्वनाथ मंदिरातील गाभाऱ्यामध्ये मातेला बसवले जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात कलशाची स्थापना देखील करण्यात येणार आहे.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काशी विश्वनाथ मंदिरातील मातेची भक्ति नऊ दिवस गर्भगृहात मातेचे विविध रूपाची पूजा करणार आहेत. तसेच भक्ती भावाने आराधना करणार आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच काशी विश्वनाथ मंदिरात नवरात्रीच्या काळात भक्तांना भगवान विश्वनाथांचा पार्वतीची विविध रूपे देखील पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे नऊ दिवस विविध धार्मिक विधी देखील पूर्ण होणार आहेत.

3 ऑक्टोबर रोजी कलश स्थापना | Navratri 2024

3 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि शुभ मुहूर्तावर विधीनुसार कलशाची स्थापना केली जाईल. कलशाच्या स्थापनेसोबतच देवीची दैनंदिन पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. बनारस लोकगीते पचारा, बंगाली लोकनृत्य धनुची, महिषासुरमर्दिनी स्तोत्रावरील नृत्य, राम-रावण युद्ध, रामायणातील अनेक पात्रांसह रामायणातील चौपैसांचे सादरीकरणही होणार आहे.

9 दिवसांचा कार्यक्रम असा असेल

पहिल्या दिवशी संध्याकाळी मंदिराच्या चौक आवारात भजन लोकगीताचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी रामलीला रंगणार आहे. तिसऱ्या दिवशी रावणाचा वध केला जाईल, त्यानंतर मंदिर पारिसममध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. चौथ्या दिवशी बंगाली लोकनृत्य सादर केले जाईल आणि पाचव्या दिवशी 51 मातृशक्तींद्वारे 51 शक्तीपीठांचे प्रतिबिंब ललिता सहस्त्रत्र सादर केले जाईल. सहाव्या दिवशी महिषासुर मर्दिनी स्तोत्रावर नृत्य, सातव्या दिवशी देवीचे भजन, आठव्या दिवशी देवीची नऊ रूपे दाखविली जातील, नवव्या दिवशी सकाळी हवन पूजा व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल.

IPL Retention Rule : BCCI चा मोठा निर्णय!! IPL 2025 साठी 5 खेळाडू रिटेन करता येणार; RTM चाही वापर होणार

IPL Retention Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या ५ खेळाडूंना कायम (IPL Retention Rule) ठेवू शकते.तसेच तब्बल 6 वर्षांनंतर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची परवानगी सुद्धा संघाना मिळणार आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे संघांना प्रमुख खेळाडू आपल्या ताफ्यात कायम करता येतील.

75 कोटी रुपये मोजावे लागणार- IPL Retention Rule

सहापैकी पाच खेळाडू हे कॅप्ड म्हणजे राष्ट्रीय संघासाठी खेळलेले असणं अनिवार्य आहे. तर केवळ दोनच खेळाडू अनकॅप्ड म्हणजेच राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले असू शकतात. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या ५ खेळाडूंना रिटेन केल्यानंतर एक आरटीएम कार्ड सुद्धा फ्रेंचायजीना वापरता येणार आहे. म्हणजेच एकूण ६ खेळाडू रिटेन करता येऊ शकतात. (IPL Retention Rule)

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये मॅच फी मिळेल. हे त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. कोणत्याही परदेशी खेळाडूला मोठ्या लिलावासाठी नोंदणी करावी लागेल. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरेल.तसेच जर एखादा खेळाडू लिलावात निवडला गेला आणि नंतर त्याने खेळण्यास नकार दिला तर त्या खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल आणि खेळाडूंच्या लिलावातही 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.

आणखी एक निर्णय म्हणजे एखादा कॅप्ड केलेला भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल जर खेळाडूने संबंधित हंगामाच्या आधीच्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी सामने, एकदिवसीय, T20I) सहभाग घेतला नसेल किंवा त्याच्याशी केंद्रीय करार नसेल. बीसीसीआय हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल. महेंद्रसिंग धोनी या नियमात बसत आहे.

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे. रविवारी (29) शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उदघाटन होणार आहे.

हा सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे . या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

क्या करण्यात आले बदल ?

  • स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग परिसरातील जमनालाल बजाज पुतळा परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • आवश्यकतेनुसार जेधे चौक ते जमनालाल बजाज पुतळा दरम्यान दुहेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येईल.
  • आवश्यकतेनुसार या भागातील वाहतूक बंदही ठेवण्यात येईल.
  • वाहनचालकांनी जेधे चौकातून व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
  • सातारा रस्त्याने उड्डाणपुलावरुन सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.
  • शिवाजीनगर न्यायालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
  • छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्ता परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक मार्ग आवश्यकता भासल्यास दुहेरी करण्यत येईल.

काय सांगता ! MHADA देणार ठाण्यात 20 लाखात घर घेण्याची संधी ?

सध्याच्या महागाईच्या काळात हक्काचं घर घ्यायचं म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही. शहरांमध्ये तर घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. अशा स्थितीत आपल्या हक्काचे घर घेणाऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’. म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात निघाली आहे. मात्र लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या रिपोर्ट नुसार कोकण मंडळाच्या वतीनं सुमारे 8 हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं दसऱ्याच्या आधीच अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील घरं

म्हाडाकडून 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील 213 घरांची प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात जारी केली जाण्याची शक्यता आहे. यानंतर 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील 7 हजार घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या या सोडतीमध्ये खासगी बिल्डरमार्फत मिळालेल्या 993 घरांचा समावेश असेल. या घरांपैकी बहुतांश घरं वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील. या घरांच्या किमती 20 लाखांपर्यंत असल्यामुळं ही सोडत अनेकांसाठीच मोठी मदत करताना दिसेल.

सध्या म्हाडाच्या वतीनं 2030 घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानचा तिथं कोकण मंडळांनंही सोडतीची तयारी केली असून, म्हाडाची घरं, रहिवाशांच्या तक्रारी या सर्व परिस्थितीचा आढावा घेत म्हाडानं हे सर्व प्रश्न विचाराधीन घेतले आहेत. म्हाडाच्या वतीनं ठाणे, वसई आणि टिटवाळा येथे सोडत जाहीर केली जाणार असल्यामुळं कमी उत्पन्न असणाऱ्या तरीही हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी मदत होणार आहे.