Friday, December 26, 2025
Home Blog Page 439

मोबाईलचा नाद कमी करायचाय ? तर करा ‘या’ सेटिंगचा वापर

Mobile Habbit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच मोबाईलचे व्यसन लागलेलं आहे. त्यामुळे अनेक सामाजिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना भिडणे कठीण झाल आहे. स्मार्टफोन लत एवढी वाढली आहे कि, लोकांना आता नोमोफोबिया (नो मोबाइल फोन फोबिया) हा आजार होत आहे. या आजारारमध्ये लोकांना फोनशिवाय राहण्याची भीती किंवा अस्वस्थता जाणवते. या आजारापासून वाचण्यासाठी तसेच वेळ बचत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करता येणार आहेत. तर आज आम्ही अशाच एका सेटिंग बदल सांगणार आहोत.

अ‍ॅप्सवर टाइमर कसा सेट करावा –

आपण फोन हातात घेतला कि, कधी दोन ते तीन तास होतात हे लक्षातच येत नाही . त्यामुळे अनेक कामे रखडली जातात . त्याच बरोबर सततच्या नोटिफिकेशन्समुळे चिंता आणि ताण वाढू शकतो. त्यासाठी पुढील प्रोसिजर फॉलो करा. सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावा. तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामधील डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोल या पर्यायावर क्लिक करा. काही स्मार्टफोनमध्ये अँप्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यानंतर स्क्रीन टाइम या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रोज तुम्ही कोणत्या अँपसाठी किती वेळ घालवला आहे याची माहिती मिळेल . तसेच ती एका चार्ट द्वारे दाखवली जाईल. तुम्हाला ज्या ज्या अँप्सना टाइम सेट करायचा आहे . त्या अँप्स निवडा. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर अँप टायमर यावर क्लिक करा . त्यावर सेट अँप लिमिट असं दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या अ‍ॅपसाठी दिवसातून किती वेळ वापरायचा आहे ते ठरवा, आणि टाइमर सेट करा. तुम्ही तो टाइम 5 मिनिटांपासून ते अगदी खूप तासासाठी सेट करू शकता.

नोटिफिकेशन सुद्धा मॅनेज करता येतील-

जशी अँपला प्रॉसिजर सांगितली त्याच प्रमाणे नोटिफिकेशनला आहे . फक्त अँप टायमर हा पर्याय न निवडता मॅनेज नोटिफिकेशन या ऑपशनवर क्लिक करा. पर्याय निवडल्यानंतर ऑल चॅट्स , ग्रुप असे अनेक नोटिफिकेशनचे पर्याय दिसतील. जी नोटिफिकेशन बंद करायची आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेली प्रक्रिया पूर्ण होईल.

कुंभमेळ्यासाठी रेल्वे विभाग सज्ज ! चालवल्या जाणार 992 विशेष गाड्या

mahakumbh 2025

भारतात कुंभमेळा मोठ्या उत्सहाने पार पडतो. यासाठी संपूर्ण देशभरातून साधू संतांसह भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एवढेच नाही परदेशातूनही पर्यटक हा मेळा पाहण्यासाठी येत असतात. जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज इथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रेल्वे विभाग देखील सज्ज झाला असून त्यासाठी 992 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

पायाभूत सुविधांसाठी 933 कोटी

प्रयागराज इथं जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुसज्य व्यवस्था करण्यावर रेल्वे मंत्रालय काम करत असून त्यासाठी 992 विशेष गाड्या चालवण्याची योजना आहे असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी 933 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.

रेल्वे रुळांचं दुहेरीकरण

12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी हाताळण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठक घेतली जलद वाहतुकीसाठी प्रयागराज विभाग आणि लगतच्या भागात 3700 कोटी रुपये खर्चून रेल्वे रुळांचं दुहेरीकरण युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

2019 मध्ये चालवल्या होत्या 694 विशेष गाड्या

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कुंभ मिळाला 30 कोटी ते 50 कोटी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे 6580 नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त 992 विशेष गाड्या चालवणार आहे. 2019 मध्ये 24 कोटींहून अधिक लोक कुंभमेळायला उपस्थित होते आणि त्यावेळी 694 विशेष गाड्या चालवल्या होत्या त्या अनुभवाच्या आधारे विशेष गाड्यांची संख्या ही 42 टक्क्यांनी वाढ होऊन ती 992 पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आला आहे

मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! सलग 5 दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार

local mumbai

मुंबईची जीवन वाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. दररोज लाखो लोकलने प्रवास करतात. चाकरमान्यांचे जीवन हे लोकलवर अवलंबून आहे. मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाळ्यापासून लोकलची सेवा थोडीशी खोळंबलेली पाहायला मिळत आहे. अशातच मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे बातमी आता समोर येत आहे. येत्या 4 ऑक्टोबर पर्यंत 150 लोकल रद्द होणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे . चला जाणून घेऊया.

पश्चिम रेल्वे वरील लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं काम पश्चिम रेल्वे मार्फत हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले. रेल्वे कडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यापैकी अजून 128 तासांचे काम बाकी आहे. म्हणूनच रेल्वेच्या माहितीनुसार चार ऑक्टोबर पर्यंत 150 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किलोमीटर प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जाणार आहेत. याचा परिणाम दिवसभरातील वेळापत्रकावर होणार असल्याची माहिती आहे.

गोरेगाव फास्ट लोकल रद्द

माहितीनुसार मालाड स्थानकात ब्लॉगच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे. त्यामुळे मालाड स्थानकातील सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन हा प्लॅटफॉर्म क्रमांक चार म्हणून ओळखला जाईल. शिवाय सहाव्या लाईनचे काम जसं जसं पूर्ण होणार आहे तशी वेग वरील मर्यादा हटवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळच्या वेळी पीक आवर्स मध्ये गोरेगाव वरून चार फास्ट लोकल चालवल्या जातात त्या चार लोकल मेजर ब्लॉकच्या काळात लूप लाईन उपलब्ध नसल्यामुळे बंद राहणार आहेत.

सहाव्या लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मेल एक्सप्रेस साठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार सहावी लाईन डिसेंबर 2024 पर्यंत बोरीवली पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे चर्चेत ते बोरिवली पर्यंत लोकल सेवेमध्ये सुधारणा होईल.

मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरा धावणार

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट लाईन आणि मालाड अप आणि डाऊन फास्ट ट्रॅक आणि स्लो ट्रॅकवर घेतला जाईल. सोमवारी रात्री 12.30 वाजता ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजतेपर्यंत म्हणजेच चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार या कालावधीत लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली पर्यंत चालवल्या जातील. या काळात मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक संदर्भात मोठी अपडेट ! खंडाळा घाटात उभा राहिला 180 मीटर उंच स्टेड पुल

missing link road

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. मात्र त्याच्या आधी एक मोठी अपडेट या मार्गाबाबत आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल उभा राहिलाय. या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालं असून लवकरच हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहे.

सध्याच्या घडीला पाहायला गेले तर मुंबई ते पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असते. रहदारी ही जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गावर लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार ? असा सवाल तुमच्या डोक्यात आला असेल तर हा प्रकल्प डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे एम एस आर डी सी चे नियोजन आहे. खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. यातला सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किलोमीटर आहे. या दोन्ही बोगद्यांचा 98% काम पूर्ण झालय. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी आल्या होत्या. मात्र आता पावसाळा संपत आल्यामुळे या कामाने वेग धरला आहे

मिसिंगलिंग च्या बाबतीत सांगायचं झालं तर मिसिंग लिंक हा मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये करेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाचे अंतिम मुदत ही मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 2024 ला हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता मात्र मार्च 2025 पर्यंत मिसिंग लिंक खुला केला जाऊ शकतो.

तिरुपती बालाजी लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; संपूर्ण देशाचे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती मंदिरातील (Tirupati Balaji Temple Prasad) प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशाचे ऑइल असल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली होती. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात हे सर्व घडत होते असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं. आज या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य असेल.

अधिवक्ता सत्यम सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत, म्हंटल आहे कि, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्टच्या गुन्हेगारी कटाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशी करण्यात यावी. तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचे तेल आणि इतर मांसाहारी घटकांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. हे कृत्य हिंदू धार्मिक प्रथांचे घोर उल्लंघन तर आहेच, शिवाय असंख्य भाविकांच्या भावनाही यामुळे दुखावल्या आहेत. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ करणे हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम 25 चे गंभीर उल्लंघन आहे असेही सदर याचिकेत म्हटले आहे.

सरन्यायाधीशांनी तिरुपती मंदिराला भेट दिली

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी रविवारी तिरुमला येथील भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांच्या नातेवाईकांसह गर्भगृहात प्रार्थना केली. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर, चंद्रचूड आणि त्यांच्या नातेवाईकांनी रंगनायकुला मंडपम येथे मंदिराच्या पुजाऱ्यांकडून वैदिक आशीर्वाद घेतले. यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी श्री व्यंकटेश्वर स्वामी आणि तीर्थ प्रसादम यांचा फोटो सरन्यायाधीशांना सादर केला.

90 KM रेंजसह येतेय BMW ची इलेक्ट्रिक स्कुटर; किंमत किती?

BMW Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच बघायला मिळत आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल टाकायची झंझट नसल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढत्या पसंतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणीही वाढली आहे . त्यामुळे देशात नवनवीन गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी BMW आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. BMW CE 02 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून ती ऑक्टोबर मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 किलोमीटर अंतर पार करेल असं बोललं जातंय. आज आपण BMW च्या या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

BMW ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर, BMW CE 02 येत्या १ ऑक्टोबर 2024 रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्कूटरमध्ये आधुनिक डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. खासकरून शहरातील प्रवासासाठी ही इलेक्ट्रिक स्कुटर डिझाइन केली गेली आहे. BMW ने TVS मोटर्स बरोबर पार्टनरशिप करून हि इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 तयार करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्लॅट सीट देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की स्कूटरच्या पुढील भागात प्रीमियम घटक म्हणून USD वापरण्यात आले आहेत. मागे एक मोनोशार्क स्थापित आहे. या स्कूटरमध्ये 14 इंची चाके लावण्यात आली आहेत.

रेंज किती?

BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 2 kWh लिथियम-आयन असून, त्याचसोबत 15 BHP इलेक्ट्रिक मोटर आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 90 किमी एवढे अंतर आरामात कापू शकते. यावेळी गाडीचे टॉप स्पीड 95 किमी प्रतितास इतकं राहील. ही स्कूटर बेल्ट ड्राईव्ह तंत्रज्ञानावर चालणार आहे.

अन्य फीचर्सबाबत सांगायच झाल्यास यामध्ये यात फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स, ABS, USD फॉर्क आणि मोनोशॉक , राइडिंगसाठी मल्टिपल मोड, एलईडी हेडलाइट, रिव्हर्स गियर, की-लेस राइड, तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 इंचचा TFT डिस्प्ले आणि USB-C पोर्टद्वारे स्कूटरवर स्मार्टफोन चार्ज करण्याची सुविधा आहे. तसेच ब्लूटूथ इंटरफेसही उपलब्ध आहे, ज्यामुळे राइडरला स्मार्टफोनचा वापर करून नेव्हिगेशन साठी उपयोग करता येईल.

किंमत किती?

BMW ने अजून तरी CE 02 च्या किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण या EV ची किंमत CE 04 पेक्षा खूपच कमी असू शकते. BMW CE 04 ची किंमत 14.90 लाख रुपये होती मात्र BMW CE 02 ची किंमत अंदाजे 4 लाख ते 5 लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे

पुणे आणि मुंबईपासून जवळ असणाऱ्या या हिल स्टेशनला एकदा नक्की भेट द्या; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेक लोक जसे पावसाळ्यात फिरायला जातात. तसे हिवाळ्यात देखील ते फिरायला जाण्याचे अनेक प्लॅन करत असतात. जर तुम्हीही हिवाळ्यात कुठेही फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मुंबई आणि पुण्याजवळील एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा हिल स्टेशनची माहिती देणार आहोत.

दरवर्षी हिवाळ्याच्या सीजनमध्ये अनेक लोक हिल स्टेशनला जात असतात. परंतु जर तुम्ही इतर दिवसांमध्ये पिकनिकचा प्लॅन करत असाल, तर रायगड जिल्ह्यातील माथेरान हे हिल स्टेशन तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय असणार आहे. माथेरान हे आशिया खंडातील असे एक मात्र हिल स्टेशन आहे, जिथे वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन पैकी एक आहे. या ठिकाणी दररोज हजारो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.

राज्यातील कन्या कोपऱ्यातून तसेच इतर राज्यातून देखील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. माथेरान आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. माथेरान हे मुंबई आणि पुणे या दोन मेट्रो शहरांजवळ आहे. हे हिल स्टेशन मुंबई पासून केवळ 90 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून केवळ 120 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईची माणसे या ठिकाणी अत्यंत सहज पद्धतीने जाऊ शकतात.

या ठिकाणी जाण्यासाठी नेरळ हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे. माथेरान पासून हे फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे परंतु याच्यापुढे गाड्यांना प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला तिथून प्रवास किंवा पायी करावा लागतो. या ठिकाणी घोड्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन देखील उपलब्ध आहे. तुम्ही ट्रेनमध्ये बसून देखील माथेरानला जाऊ शकतो. टॉय ट्रेनचा प्रवास आणि अनुभव खूप मस्त आणि मजेशीर आहे अनेक लोक हे टॉय ट्रेनने जात असतात.

यावर्षी हिवाळ्यामध्ये जर तुम्ही माथेरानला जाण्याची तयारी करत असाल, तर त्यासाठी तुम्ही नेरूळ या स्थानकावर उतरून टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. तुम्ही तुमच्या परिवारासोबत तसेच मित्रांसोबत देखील जाऊ शकता. पुण्यात आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक दोन दिवसाची ट्रिप करायची असेल, तर माथेरान हे अत्यंत चांगले असे स्थळ आहे.

Mukhymantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्यातील पैसे मिळण्यास सुरुवात; अशाप्रकारे पहा तुमचे नाव

Mukhymantri Ladki Bahin Yojana

Mukhymantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhymantri Ladki Bahin Yojana) योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता तिसरा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज म्हणजे 29 सप्टेंबर पासून तिसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अशी माहिती केंद्र सरकारने दिली होती. आणि आता काही महिलांच्या बँकेत पैसे देखील केला जात आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अति तटकरे यांनी दिलेली आहे.

सुरुवात झालेली आहे 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584 पर्यंत लाभ हस्तांतरित करण्यात आलेला आहे. आता बाकीच्या बहिणींना हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित महिलांना या महिन्याच्या अखेरपर्यंत तिसऱ्या हप्त झाला मिळणार आहे. ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले नव्हते. त्यांना देखील आता सगळे पैसे मिळणार आहेत.

सरकारने जुलै महिन्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात पाठवले होते. परंतु अर्जात अनेक अडचणी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळाले नाहीत. आता त्यांच्या अर्जातील अडचणी दूर केलेल्या आहेत. अशा महिलांना या तीन हफ्त्यांचे एकूण 4500 रुपये दिले जाणार आहे. एक सप्टेंबर पासून अर्ज केलेल्या महिलांना फक्त एकाच महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही याची माहिती.

अनेक महिलांनी अर्ज केले. परंतु या अर्जात अनेक अडचणी होत्या. तसेच काही कागदपत्रांची पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. तसेच अनेक महिलांचे बँक खाते हे आधार क्रमांक परंतु ज्यांच्या खात्यात अजून एकही हप्ता आलेला नाही. त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार कार्डची संलग्न करून घ्या.

मोदींच्या हस्ते झाले पुण्यातील भुयारी मेट्रोचे लोकार्पण; जाणून घ्या तिकिटाचे दर

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भुयारी मेट्रो मार्गाचे काम चालू झालेले आहे. आणि अशाच आता पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू झालेला आहे. स्वारगेटचा ट्रो मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील पुण्यात उपस्थित राहणार आहे. या मेट्रो मधून सगळ्यात आधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित नेते महिला तसेच लहान मुले प्रवास करणार आहे. आणि आज दुपारी 4 वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झालेले आहे. त्यामुळे आता दुपारी चार वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा भुयारी मार्ग जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा असणार आहे. पुण्यातील हा पहिला भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय कसबा पेठ मंडई स्वारगेट ही चार मेट्रो स्थानके आहेत. आता या मार्गावरील तिकिटाचे दर कसे असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

तिकिटाचे दर कसे असणार ?

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 10 रुपये एवढे तिकीट असणार आहेत. जिल्हा न्यायालयाचे मंडळी पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे. स्वारगेट ते मंडईपर्यंत तुम्हाला 10 रुपये तिकीट लागणार आहे. त्याचप्रमाणे स्वारगेट ते कसबा पेठपर्यंत 15 रुपये तिकीट असणार आहे. आणि स्वारगेट ते जिल्हा न्यायालय पर्यंत तुम्हाला 15 रुपये तिकीट असणार आहे.

या आधी नरेंद्र मोदींचा पुण्यात पुण्यामध्ये 26 सप्टेंबर रोजी दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु पुण्यामध्ये तसे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला.आणि नरेंद्र मोदींचा हार दौरा रद्द करण्यात आला होता. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवून या मेट्रोचे लोकार्पण केलेले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील स्वतः उपस्थित होते.

Drone Didi Scheme | ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 8 लाख रुपयांचे अनुदान; असा मिळणार लाभ

Drone Didi Scheme

Drone Didi Scheme | सरकार सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. त्यातही स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून ते वेगवेगळ्या योजना आणत असतात. स्त्रियांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रयत्न करत असतात. अशातच आता केंद्र सरकारने ड्रोन दीदी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक अनोखा उपक्रम केला जाणार आहे. सरकारने बचत गटाशी संबंधित जवळपास 3000 महिलांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या उपक्रमांतर्गत महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहेत. आणि दहा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. सरकारच्या या ड्रोन दीदी योजनेचा (Drone Didi Scheme) लाभ हा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकरी महिलांना मिळणार आहे. आता हा उपक्रम नक्की कसा असणार आहे? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

8 लाख रुपयांपर्यंत सबसिडीची सुविधा | Drone Didi Scheme

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी महिलांना कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्राकडून ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय शेतीच्या कामासाठी ड्रोन खरेदी करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत अनुदान आणि कर्ज अशा दोन्ही सुविधा मिळणार आहेत ड्रोनच्या बाजारभावाच्या 80 टक्के (8 लाख रुपये) पर्यंत सबसिडी असेल. उर्वरित रकमेसाठी महिलांना AIF योजनेअंतर्गत 3 टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा मिळेल.

या सुविधा ड्रोन किटमध्ये उपलब्ध

ड्रोनचा वापर शेतीपासून इतर कामांपर्यंत अनेक प्रकारच्या कामांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे, जर आपण शेतीबद्दल बोललो तर ते नॅनो खते, कीटकनाशके इत्यादी फवारणीसाठी मदत करते. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिलांना देण्यात येणाऱ्या ड्रोन किटमध्ये ड्रोन बॉक्स, चार बॅटरी आणि चार्जिंग हब आदी गोष्टी देण्यात येणार आहेत.

नियोजनासाठी आवश्यक निकष

  • उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महिला नागरिकांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
  • योजनेत स्वारस्य असलेल्या महिलांनी स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यत्वाशी जोडले पाहिजे.
  • याशिवाय महिलांकडे शेतीसाठी स्वतःची जमीन असावी.
  • लक्षात ठेवा की अर्जदार महिलांचे वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे.
  • या योजनेत काम करण्यास इच्छुक महिलांना 15,000 रुपये दिले जातील.
  • महिलांचा एक क्लस्टर तयार केला जाईल, जो 10-15 गावांमध्ये समान असेल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Drone Didi Scheme

अर्ज करण्यासाठी शेतकरी महिलांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. जे असे काही आहे. जसे- आधार कार्ड, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, फोन नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि SHG ओळखपत्र इ.