Friday, December 26, 2025
Home Blog Page 441

मुंबई Mhada Lottery संदर्भात आली अपडेट ; पहा किती जणांनी भरले सिक्योरिटी डिपॉजिट ?

mhada mumbai update

प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची उपलब्धता करून दिली जाते. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली आहे.

या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज भरला असेल. तर थोडं इकडे लक्ष द्या. यावेळी लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे एक लाख 34 हजार 350 अर्ज आले आहेत. असं असलं तरी केवळ एक लाख 13 हजार 811 अर्जदारांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. म्हाडाकडे सध्या पाच कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

9 ऑगस्ट पासून म्हाडाची या लॉटरी साठीची अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पर्यंत अर्ज करता येत होते. घरांची तात्पुरती यादी आज संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाईन नोंदवल्या जाणार आहेत

कधी होणार अंतिम यादी जाहीर ?

तुम्हाला सुद्धा म्हाडाच्या अंतिम यादी ची प्रतीक्षा असेल तर हे लक्षात घ्या की तात्पुरती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता वेबसाईटवर यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नरिमन पॉईंट मुंबई इथे यशवंतराव चव्हाण सेंटर इथे लॉटरी निघणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई विभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे

मुंबई नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणार भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

देशभरात मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने अनेक रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग महाराष्ट्रात तयार होत असून हा मार्ग मुंबई आणि दिल्ली या देशातल्या दोन मोठ्या शहरांना जोडणार आहे.

उद्योगधंदे आणि वाहतुकीसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा भुयारी मार्ग मुंबईच्या नॅशनल पार्क मधल्या जंगलातून जाणार आहे. या मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ 12 मिनिटात पूर्ण होणार आहे. या मार्गाची उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने पावर फायनान्स कार्पोरेशन म्हणजेच (पी एफ सी) कडून कर्ज घेतले आहे. एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून 31,673.79 कोटींचे कर्ज घेतले आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील नऊ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उभारण्याकरिता हे कर्ज घेण्यात आले आहे. 31,673.79 कोटींच्या कर्जातील सर्वाधिक निधी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरवली या प्रवासात एका तासाची बचत होणार असून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा १६,६०० कोटींचा प्रकल्पात त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून ठाणे ते बोरिवली या दुहेरी मार्ग घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे.

भारतातला हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. या प्रकल्पाचे एकूण लांबी 11.8 km आहे त्यापैकी 10.25 किलोमीटरचा बोगदा असणार आहे . दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गाने एक आपातकालीन मार्गिका असणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास विना थांबा आणि सिग्नल रहित होणार आहे. 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबईकरांनो ! आज पश्चिम रेल्वे मार्गावर तर उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मागच्या दोन तीन दिवसांत मुंबईत पाऊस झाल्यामुळे लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे लोकल विलंबाने धावत होत्या. याचा परिणाम लोकलच्या प्रवाशांवर झाला. आता उद्या म्हणजेच रविवार (२८) रोजी देखील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणाकरिता उपनगरीय रेल्वेच्या सेवा 29 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवर आज दिनांक 28 रोजी दहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी रात्री हार्बर मार्गावर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान काही लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

मेन लाईन वर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक देण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान थीम या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. परिणामी लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.

हरभर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 11-10 ते दुपारी चार-दहा वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला ते वाशी दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकावरून प्रवास करू शकतात.

रविवारी हार्बर मार्गावर 10 तासांचा पावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील सहाव्या रेल्वे मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग ची काम करण्यात येणार आहेत. यासाठी रविवारी 29 सप्टेंबर रोजी रात्री अंधेरी ते गोरेगाव दरम्यान आणि डाऊन हार्बर मार्गावर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12:30 ते सोमवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत दहा तासांचा हा ब्लॉग असणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत. रविवारी रात्री 10:54 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव करिता शेवटची लोकल चालवण्यात येणार आहे.

ब्लॉक संपल्यानंतर सोमवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव लोकल सुटणार आहे. तर गोरेगाव स्थानकातून अपमार्गावर सीएसएमटीकडे जाण्यासाठी सकाळी 11:23 मिनिटांनी लोकल चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

विधानसभा निवडणूक कधी होणार? आयोगाकडून मोठे अपडेट

Maharashtra Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील निवडणुका कधी होणार? राज्यात मतदारांची संख्या किती आहे? मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी कशी असेल याबाबत निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राजीव कुमार म्हणाले, दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं पडलं आहे. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो सण लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. त्यामुळे साधारणतः सण-उत्सव टाळून निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहे. त्यातील पुरुष मतदारांची संख्या 4. 95 कोटी आणि स्त्री मतदारांची संख्या 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. प्रथमच मतदान करणाऱ्या नवं मतदारांची संख्याही तब्बल 19.48 लाख इतकी आहेत. शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Petrol-Diesel Price : पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त!! सरकार देणार आनंदाची बातमी

Petrol-Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मात्र मार्चपासून ते आतापर्यंत कच्चा तेलाच्या किंमतीत 19 टक्क्यांची घसरण होऊनही अद्याप तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात केलेली नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कडून पेट्रोल- डिझेलच्या किमतीत घट करण्यात येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 2 ते 3 रुपये कपात करण्याच्या विचारात आहे. असं झाल्यास आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल.

येत्या महिनाभरात निर्णय – Petrol-Diesel Price

रेटिंग एजन्सी ICRA च्या अहवालानुसार, या महिन्यात भारतात आयात केलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $ 74 वर आली आहे. मार्चमध्ये त्यांच्या किमती $83-84 होत्या. ICRA चे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश कुमार कदम म्हणाले, ‘मार्च-सप्टेंबर दरम्यान तेल विपणन कंपन्यांच्या उत्पन्नात पेट्रोलवर प्रति लिटर 15 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 ते 3 रुपये प्रति लिटरने कमी होऊ शकतात. मात्र हा निर्णय कधी घेण्यात येणार याविषयी माहिती समोर आली नाही. पण येत्या महिनाभरात असा निर्णय घेऊन सरकार सर्वसामान्य माणसाला खुश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) आंध्र प्रदेशात मिळते. तिथे पेट्रोल 108.46 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये प्रति लिटर आहे. यानंतर केरळमध्ये 107 रुपये/लिटर, मध्य प्रदेशात 106 रुपये/लिटर आणि बिहारमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये/लिटर आहे. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज ठरवतात.

Navratri 2024 | नवरात्रीत अशा पद्धतीने करा दुर्गा मातेचे स्वागत; वापरा या डेकोरेशन आयडिया

Navratri 2024

Navratri 2024 | हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाला खूप महत्त्व असते. असाच हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा शारदीय नवरात्री हा सण येत आहे. या नवरात्रीला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे.या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. जवळपास प्रत्येक घरामध्येच हा नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे म्हणतात की, या नऊ दिवसांमध्ये माता ही पृथ्वीवर उतरलेली असते आणि सगळ्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते. आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये माता राणीचे स्वागत करणार असाल, तर त्यांच्या डेकोरेशन साठी आम्ही काही मला आयडिया देत आहोत.

फुलांचे डेकोरेशन | Navratri 2024

तुम्ही जे डेकोरेशन करता, ते तुमच्या पूजेमध्ये सगळ्यात आकर्षण दिसते. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीसाठी चांगली सजावट करणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्ही फुलांचा वापर करू शकता. तुम्ही रंगीबेरंगी फुले घेऊन तोरण तयार करू शकता आणि त्या मंदिराला जाऊ शकतात. तसेच ज्या ठिकाणी देवीची पूजा करणार आहात. त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढू शकता. तसेच तांब्याचे भांडे भरून त्यात रंगीबेरंगी फुले टाकू शकता. आजूबाजूला देखील फुलांचे डेकोरेशन तुम्ही करू शकता.

रंगीबेरंगी कागदांचा वापर करून डेकोरेशन

तुम्ही घरात नवरात्रीच्या काळात ते देवीची पूजा करण्यासाठी आणि देवीचे मंदिर सजवण्यासाठी रंगबेरंगी कागदांचा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्ही कागदांचे तुकडे घेऊन सुंदर असे झालर तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फुले आणि कागदाच्या मदतीने मंदिराची सजावट करू शकता.

रांगोळी

तुम्ही दारात सुंदर रांगोळी काढू शकता. तुम्ही मंदराच्या बाहेर छान रांगोळी काढून त्यात रंग भरू शकता. यामुळे तुमचे डेकोरशन छान करू शकता. रांगोळी काढल्याने आणखी सौंदर्य वाढते.

रंगीबेरंगी दिव्यांनी मातेचा दरबार

नवरात्रीच्या दिवशी माता राणीचा दरबार उजळण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी इलेक्ट्रिक झुंबरांनी मंदिर सजवू शकता. नवरात्रीच्या दिवशी माता राणीच्या दरबाराची सजावट रंगीबेरंगी झालरांशिवाय अपूर्ण वाटते. झालरच्या रंगीबेरंगी दिव्यांनी मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढणार आहे. तुम्ही मंदिराच्या मुख्य गेट आणि माता राणी की चौकीभोवती किनारी सजवू शकता.

Navratri 2024 | दिल्लीतील ही देवीची मंदिरे आहेत प्रसिद्ध; नवरात्रात असते लाखो भाविकांची गर्दी

Navratri 2024

Navratri 2024 | आपल्या भारतातील सण उत्सवांना खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येक सणाला एक इतिहास आणि परंपरा जोडलेली आहे. नुकताच आपल्या भारतामध्ये गणेशोत्सव साजरा झाला आणि आता काही दिवसातच नवरात्रीच्या सणाला देखील सुरुवात होणार आहे. यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी नवरात्राला सुरुवात होत आहे. तर 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये असे मानले जाते की, देवी माता ही पृथ्वीवर अवतरलेली असते. आणि यावेळी ती तिच्या सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. त्यामुळे अनेक लोक नवरात्रीच्या काळात हे अनेक देवींच्या मंदिरांना भेटी देतात. आणि देवीची आराधना करतात. आता आपण अशाच काही देवीच्या मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत.

दुर्गा मातेची अनेक मंदिरे ही भारतभरात आहेत. परंतु दक्षिण दिल्लीत असलेले माकालिकाजी हे मंदिर सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच या मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे. तेवढेच नाही तर या मंदिराचा इतिहास हा पांडवांशी जोडलेला आहे. असे म्हटले जाते या मंदिराला जयंती पीठ मनोकामना सिद्ध पीठ म्हणून देखील ओळखले जाते. असे मानले जाते की, ही देवी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे नवरात्रीच्या काळात या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते. देवीच्या दर्शनासाठी खूप दूर वरून भाविक भक्त येत असतात.

कोलकत्याच्या प्रसिद्ध दक्षिणेश्वर येथे काली मंदिर आहे. या ठिकाणी महाकालीची मूर्ती देखील बसवण्यात आलेली आहे. नवरात्रीच्या काळात या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नवरात्री उत्सवया मंदिरात मोठ्या थाटामाटात पार केला जातो. तसेच देवीच्या दर्शनासाठी येथे अनेक भाविक भक्त येत असतात. हे मंदिर 500 वर्षांपेक्षा अधिक जुने आहे. असे म्हणतात की जो भक्त या देवीची मनोभावे पूजा करतो. आराधना करतो त्या व्यक्तीला ही देवी भरभरून देत असते.

माता कात्यायलीचे मंदिर देखील खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर दिल्लीच्या छत्रपूर या भागात आहे. या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर पांढऱ्या संगमवरी वर बनवलेले आहे. हे मंदिर तब्बल 70 एकरामध्ये पसरलेले आहे. अत्यंत भव्य दिव्य आणि मोठे असणारे हे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे. वर्षभर या मंदिरात भाविक भक्तांची खूप गर्दी असते नवरात्रीमध्ये तर या मंदिरात अनेक भाविक भक्त येत असतात. आणि मनोभावे प्रार्थना करत असतात या मंदिरात पहाटे 4 वाजलेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता.

दिल्लीच्या प्रीत विहारांमध्ये देखील एक गुहा मंदिर आहे. हे मंदिर माता वैष्णोदेवीचे आहे. यामुळे यामध्ये एक लांब गुहा बनवलेला देण्यात आलेली आहे. तसेच अनेक छोट्या गुहा देखील आहेत. यामध्ये अनेक मंदिरे बांधलेली आहे. त्यामुळे या मंदिरात गेल्यावर तुम्हाला वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यासारखे वाटेल. या ठिकाणी देखील खूप भाविक भक्तांची गर्दी असते. आणि नवरात्रीच्या दिवसात अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

दिल्लीमध्ये असलेले स्थित झेंडे वाला हे मंदिर देखील एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर भाविक भक्तांची खूप गर्दी असते. नवरात्रीमध्ये जर लाखो संख्येने भाविक या मातेच्या दर्शनासाठी येतात असतात. असे म्हटले जाते की, मंदिराच्या उत्खननामध्ये एक ध्वज सापडला आहे. त्यामुळे हे मंदिर ध्वज मंदिर बनले आहे.

Navratri 2024 | नवरात्रीमध्ये या 3 मंदिरांना नक्की भेट द्या; येईल अद्भुत अनुभव

Navratri 2024

Navratri 2024 | 3 ऑक्टोबर पासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आपल्या भारतात प्रत्येक सण हा खूप मोठ्या उत्साह साजरा केला जातो. नवरात्र देखील खूप उत्सवात साजरा केला जातो. असे म्हणतात की, या नऊ दिवसांमध्ये दुर्गा माता ही पृथ्वीवर येत असते. आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देत असते. दुर्गा मातेच्या शक्तीला विजय आणि धर्माचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे या दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे या काळात देशभरातील मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्ही देखील नवरात्र उत्सवात दिल्लीतील दुर्गा दर्शनासाठी जायचं असेल, तर आम्ही तुम्हाला काही मंदिरांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुमचे दर्शन देखील चांगले होईल.

वैष्णो देवीचे गुहा मंदिर

दिल्लीत असलेले हे मंदिर माता वैष्णोदेवीच्या गुहेच्या धर्तीवर बांधले गेले आहे ज्यामुळे ते खूप खास आहे. मंदिराच्या आत 140 फूट लांबीची गुहा आहे, ज्यातून भक्त मातेचे दर्शन घेतात. गुहेच्या आत दुर्गा माँची भव्य मूर्ती स्थापित केली आहे जिची भक्त मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. मंदिरातून बाहेर पडताच भैरवबाबाही दिसतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंदिरात एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो.

छतरपूर मंदिर | Navratri 2024

नवरात्रीच्या काळात छतरपूर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. या पवित्र उत्सवादरम्यान येथे भव्य धार्मिक समारंभ आणि पूजेचे आयोजन केले जाते. मंदिराच्या आवारात दुर्गादेवीची भव्य मूर्ती स्थापित केली आहे, ज्याची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते. मंदिराची अप्रतिम वास्तुशिल्प आणि कारागिरी याला आणखी खास बनवते. नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

शितळा माता मंदिर

शितला माता मंदिर हे धार्मिक महत्त्व आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरात भाविक केवळ मातेचे दर्शन घेण्यासाठी येत नाहीत तर मंदिराच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठीही येतात. या मंदिरात माता राणीची भव्य मूर्ती बसवण्यात आली आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर, मंदिरात भक्तांची गर्दी असते आणि हे मंदिर देखील त्यापैकीच एक आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या ‘या’ खास सुविधा तुम्हाला माहिती आहेत का ?

railway news seniors

देशाची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सुविधांचा समावेश आहे. रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना आणि 58 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिक मानतात. रेल्वे आपल्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचीही पूर्ण काळजी घेते. रेल्वे प्रवासादरम्यान या वृद्ध प्रवाशांना मिळणाऱ्या अनेक सुविधांची माहिती बहुतांश लोकांना नसते. चला जाणून घेऊया ज्याचा ज्येष्ठ नागरिक प्रवासी सहजपणे लाभ घेऊ शकतात.

आरक्षणादरम्यान लोअर बर्थची सुविधा

भारतीय रेल्वेच्या काही गाड्या सोडल्या तर बहुतेक गाड्यांमध्ये दोन प्रकारचे डबे आहेत, आरक्षित आणि अनारक्षित. लोअर, मिडल आणि अप्पर असे तीन प्रकारचे बर्थ आहेत. आरक्षणादरम्यान, वृद्ध प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वे प्राधान्याने खालच्या बर्थचे वाटप करते. महिला प्रवाशांच्या बाबतीत, ही सुविधा वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिली जाते. आरक्षण करताना, त्यांना संगणकाद्वारे आपोआप लोअर बर्थ दिला जातो.

चालत्या ट्रेनमधील रिकाम्या खालच्या बर्थवर प्रथम हक्क

ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना आसन उपलब्धतेच्या आधारावर दिली जाते. त्याच वेळी, आरक्षण करताना खालचा बर्थ उपलब्ध नसल्यास, वृद्ध प्रवासी टीटीईला भेटू शकतात आणि धावत्या ट्रेनमध्ये खालचा बर्थ रिक्त ठेवण्याची मागणी करू शकतात. रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर खालचा बर्थ रिक्त राहिल्यास, मध्यम किंवा वरच्या बर्थवरील ज्येष्ठ नागरिक टीटीईला ते वाटप करण्याची विनंती करू शकतात. काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, TTE त्यांना बर्थ देईल.

स्लीपर आणि एसी कोचमध्ये वृद्ध प्रवाशांसाठी जागा

भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षित डब्यांच्या गाड्यांमध्ये काही बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात. नियमांनुसार सर्व स्लीपर कोचमध्ये सहा लोअर बर्थ आरक्षित आहेत. एसी 3 टायर आणि एसी 2 टायर कोचमध्ये प्रत्येकी तीन लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत. तथापि, गरजेनुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि गर्भवती प्रवाशांनाही या सीट किंवा बर्थवर बसवले जाते. त्याच वेळी, राजधानी एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्स्प्रेस सारख्या सर्व एसी कोच असलेल्या गाड्यांमध्ये सामान्य मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव बर्थची संख्या जास्त असते.

महानगरांच्या लोकल गाड्यांमध्येही आरक्षण

देशातील मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये रेल्वे लोकल ट्रेन खूप प्रसिद्ध आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबईत लोकल चालवतात. या दोन्ही झोनच्या लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही जागा आरक्षित आहेत. अशा बहुतांश गाड्यांमध्ये आरक्षित डब्यांमध्ये महिलांसाठीच जागा राखीव असतात. याशिवाय देशातील प्रमुख स्थानकांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर आणि पोर्टर आदी सुविधा उपलब्ध आहेत. तथापि, यापैकी, पोर्टरसाठी निश्चित शुल्क भरावे लागेल.

Turmeric Farming | हळदीच्या पिकाची शेती करून शेतकऱ्याने केला अनोखा प्रयोग; वर्षाला घेतोय एवढे उत्पन्न

Turmeric Farming

Turmeric Farming | आजकाल शेतीमध्ये सुशिक्षित तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक तरुण हे नोकरी न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत. आणि उत्पन्न देखील चांगले घेत आहेत. अशीच एक शेतकरी मित्राची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. बीडच्या एका शेतकऱ्याने अवघ्या 25 गुंठे जमिनीत आता हळदीचे उत्पन्न आहे. आणि त्यातून लाखो रुपये तो आता कमवत आहे. हळदीसोबत तो फुलपिके देखील घेत आहे.

मागील वर्षीपासून हळदीला खूप चांगला भाव मिळत आहे. हे लक्षात घेऊनच या तरुण शेतकरी मित्राने 25 गुंठ्यात हळदीचे पीक घेतलेले आहे. त्याचे नाव विजय शिंदे असे आहे. तो बीडचा रहिवासी आहे. बीडमध्ये सोयाबीन, हरभरा यांसारखी पारंपारिक पिके घेतली जातात. परंतु ही पारंपरिक पिके न घेता विजय शिंदेने हळदीची लागवड केली आहे. आणि या शेतकऱ्याला खूप चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. त्याने 25 गुंठ्यात हळदीची एक यशस्वी शेती करून दाखवलेली आहे. आणि त्याला लाखो रुपयाचा फायदा देखील होत आहे.

पाच वर्षापासून करतोय हळदीची लागवड | Turmeric Farming

बीडमधील या प्रगतशील शेतकऱ्याने चार ते पाच वर्षापासून हळद लागवड करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या शेतीच्या केवळ 25 गुंठ्यामध्ये त्यांनी हळदीची लागवड केलेली आहे. आणि तो दरवर्षाला त्यातून पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. यातून त्याला खूप चांगला नफा देखील मिळत आहे. तसेच या हळदीमध्ये त्याने मुगाचे आंतरपीक लावलेले आहे. त्यामुळे त्याला कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. आणि त्यातून त्याचा आर्थिक फायदा देखील होत आहे.

विजय शिंदेने हे हळदीचे पीक घेतलेले आहे. तो थेट बाजारात जाऊन त्याची विक्री करत आहे. तसेच पिकाला वेळच्यावेळी पाण्याचे व्यवस्थापन करणे. हळद वाढीसाठी त्याचा चांगला कसा चांगला फायदा होईल.हे पाहणे खूप गरजेचे असते त्याने 25 गुंठ्यात हळदीची शेती केली आहे. परंतु तो दरवर्षी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतो.

विजय शिंदे हा उच्चशिक्षित आहे. परंतु त्यांनी नोकरीच्या मागे न लागता घरातील शेतीकडे लक्ष देण्याचे ठरवले. आणि एक वेगळा असा प्रयोग करून त्याने दाखवला. यामध्ये त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले पीक घेतले आहे. सध्या संपूर्ण बीडमध्ये त्याच्या हळदीच्या पिकाची खूप जास्त चर्चा आहे. कारण यामध्ये तो दोन पिके देखील घेऊ शकतो. आणि घरी बसून शेती करून तो दरवर्षाला चांगले उत्पन्न कमावतो.