Friday, December 26, 2025
Home Blog Page 442

BSNL Recharge Plan : BSNL ग्राहकांसाठी खास ऑफर; या प्लॅनमध्ये मिळतेय जास्त इंटरनेट

BSNL Recharge Plan extra data

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) हि भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी आहे, जी 2000 साली स्थापन करण्यात आली. BSNL देशभरात दूरसंचार सेवा प्रदान करते, ज्यात मोबाईल सेवा, लँडलाईन, ब्रॉडबँड, इंटरनेट सेवा, आणि इतर टेलिकॉम सेवा समाविष्ट आहेत. एकीकडे देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जीओने मोबाईल रिचार्जच्या प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा बीएसएनएलकडे वळत आहे. कंपनी सुद्धा ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगनार आहोत ज्यामध्ये बदल करत कंपनीने ग्राहकांना जास्तीचे इंटरनेट देण्याची सुविधा केली आहे. हा प्लॅन कोणता आहे? ग्राहकांना काय फायदा मिळेल? हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात…

आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनलचा 80 दिवसांचा रिचार्ज प्लॅन…. या प्लॅनसह काही नवीन ऑफर घेऊन BSNL आपल्या युजर्सना अधिक सेवा आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहे. 151 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 80 दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 2GB डेटा रोज ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी पूर्वीच्या प्लॅन मध्ये बदल करून आता हि सेवा देण्यात आली आहे . आधी या प्लॅनमध्ये युजर्सना 1.5GB डेली डेटा मिळत होता. आता त्यात वाढ करून दररोज 2GB इंटरनेट डेटा ग्राहकांना देण्यात येईल. ही ऑफर BSNL युजर्ससाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे, ज्यामुळे युजर्सना कमी खर्चात अधिक इंटरनेट आणि कॉलिंग सुविधांचा लाभ घेता येईल.

काही प्लॅन जसेच्या तसेच उपलब्ध –

BSNL ने अनेक प्रीपेड प्लॅन्समध्ये बदल जरी केले असले तरी काही ठराविक प्लॅन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये 108 रुपयाचा कमी कालावधीचा प्लॅन आणि 1999 रू तसेच 2999 रुपयाच्या जास्त कालावधीचा प्लॅन जसेच्या तसे आहेत. त्यामध्ये बदल केला नसून ग्राकाना ते आधीसारखे वापरण्यास मिळतील. त्याचबरोबर सोबत मिळणारे 100 मोफत SMS तसेच राहतील.

दरम्यान, मागील काही महिन्यापासून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे

दसऱ्यात हे मुस्लिम कुटुंब 5 पिढ्यांपासून बनवतात रावणाचा पुतळा; दीड महिना वर्ज करतात मांसाहार

Ravan Dummy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. आणि भारतात प्रत्येक जाती धर्माचा सण हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, सगळे लोक मिळून एकत्र हे सण साजरे करतात. ईद असो दसरा असो किंवा दिवाळी असो सगळेजण एकत्र मिळून सहभाग घेतात. नुकतेच आता दसरा तोंडावर आलेला आहे. आणि या दसरा दिवाळीच्या निमित्ताने सगळेच जण आनंदाने रावणाचे दहन करत असतात.

एक मुस्लिम कुटुंब पाच पिढ्यांपासून रावणाचा पुतळा बनवत आहे. हे कारागीर मथुरेहून पुतळे बनवण्यासाठी येतात. यानंतर ते दीड महिना येथे राहून पुतळा बनवतात. यावेळी 105 फुटांचा रावण बांधण्यात येत आहे. याशिवाय कुंभकर्ण 90 फूट उंच असेल. पुतळा बनवणारे कारागीर मोहम्मद राजा खान यांनी सांगितले की, सुमारे वीस लोकांची टीम पुतळा बनवण्यासाठी दररोज 16 तास काम करत आहे. त्यांचे कुटुंब पाच पिढ्यांपासून दसऱ्याच्या वेळी पुतळे बनवत आहे. या काळात तो हिंदूंचे अनेक नियम पाळतो.

मोहम्मद राजा खान यांनी सांगितले की, ते कुटुंबासह मथुराहून जयपूरला येतात. या काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब राम मंदिरात असते. सकाळी उठून आंघोळ केल्यावरच तो पुतळा बनवायला सुरुवात करतो. तसेच या काळात ते सात्विक अन्नाचे सेवन करतात. मंदिराच्या आवारात आयोजित रामलीला पाहण्यासाठीही तो जातो. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलांना रामलीला दाखवून ते त्यांना चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करतात.

मुस्लीम कुटुंबांनी पुतळे बनवण्याचे काम ६८ वर्षांपूर्वी सुरू केले होते. तेव्हापासून या मैदानात रावण दहन केले जात आहे. पुतळा बनवणाऱ्यांपैकी चांद मोहम्मद यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी 1966 मध्ये पहिल्यांदा वीस फुटांचा पुतळा बनवला होता. त्यावेळी त्यांना मजुरी म्हणून 250 रुपये मिळाले होते. याशिवाय चांगले काम केल्याबद्दल दहा रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत हे काम पुढे नेत आहेत.

Cotton Farming | महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार सरकारी कापूस खरेदी केंद्र; उच्च न्यायालयात दिली माहिती

Cotton Farming

Cotton Farming | कापूस हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे असे पीक आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कापसाच्या पिकाची लागवड केली जाते .कापूस एक नगदी पीक आहे. खास करून उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. कापसाला बाजारात पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना कापसाचे पीक घेण्यासाठी देखील परवडत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

सध्या कापूस हंगामातील वेचणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बाजारात देखील विक्री सुरू झालेली आहे. या कापसाला (Cotton Farming) बाजारात सध्या सव्वा 7 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव अजूनही कापसाला मिळत नाही. अशातच दसरा तोंडावर आलेला आहे. आणि दसऱ्यानंतर महाराष्ट्रात दरवर्षी कापसाची आवक वाढत असते. अशातच महाराष्ट्रातील सगळ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही अलेलो आहोत.

ती म्हणजे आता शेतकऱ्यांकडे कापूस दिवाळी पूर्वीच खरेदी केला जावा. यासाठी पण ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटन श्रीराम सातपुते यांनी याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर न्यायालयात देखील सुनावणी झालेली आहे. अशातच आता भारतीय कापूस महामंडळाने उच्च न्यायालयात सरकारी कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार आहे. याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.

त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात पासून महाराष्ट्रात जवळपास 110 कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहे. अशी माहिती महामंडळाने दिलेली आहे. तसेच ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणातील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात जाहीर केली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू होते. त्यामुळे खाजगी व्यावसायिक त्याचा फायदा उचलतात असा आरोप देखील केला जात आहे. परंतु आता महामंडळ आहे. ऑक्टोबर महिन्यात कापूस खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु आता नक्की पुढील महिन्यातच कापसाचे केंद्र सुरू होणार आहे का? हे पाहणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

12GB RAM आणि 50MP कॅमेरासह लाँच झाला Redmi Note 14 5G

Redmi Note 14 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Redmi ब्रँडने भारतीय बाजारात अनेक वर्षवर्षांपासून लोकप्रियता मिळवली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध असल्याने रेडमीच्या मोबाईलला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. वाढती मागणी पाहता कंपनी सुद्धा सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असेल स्मार्टफोन बाजारात आणत असते. आताही रेडमीने आपला Redmi Note 14 5G नावाचा मोबाईल जागतिक बाजारात लाँच केला आहे. 12GB RAM आणि 50MP कॅमेरा यासारखे अनेक दमदार फीचर्स या स्मार्टफोन मध्ये देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे मोबाईलची किंमतही सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. आज आपण रेडमीच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..

Redmi Note 14 5G चे नवीन फीचर्स –

Redmi Note 14 5G मध्ये 6.67 इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे , जो 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 100 निट्स की पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या मध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर बसवला आहे ज्यामुळे याची कार्यक्षमता जास्त चांगली झाली आहे. रेडमीचा हा मोबाईल एंड्रॉयड 14 वर आधारित Xiaomi HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 12GB + 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi Note 14 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा असून 2MP डेप्थ सेन्सर वापरण्यात आला आहे.सेल्फीसाठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5,110mAh ची बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45W चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी बदल सांगायच झाल तर या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, आणि Bluetooth 5.3 उपलब्ध आहे.

किंमत-

चीनमध्ये Redmi Note 14 5G च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 1199 युआन (अंदाजे 14,300 रुपये) आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 1,399 युआन (अंदाजे 16,700 रुपये) आहे. 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1,499 युआन (अंदाजे रु. 17,900) आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 1,699 युआन (अंदाजे रु. 20,300) आहे.

Railway Recruitment 2024 | रेल्वेअंतर्गत 3115 पदांसाठी भरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वेमध्ये आता दहावी पास असणारे उत्तीर्ण देखील अर्ज करू शकतात. कारण आता रेल्वेने एक भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या जागा भरल्या जाणार आहेत. शिकाऊ उमेदवार या पदाच्या एकूण 3115 जागांची भरती केलली जाणार आहे. 24 सप्टेंबर 2024 पासून हे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 23 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्या भरतीची आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Railway Recruitment 2024

या रेल्वे भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती अंतर्गत फिटर, टर्नर, मशीन इलेक्ट्रिशियन, पेंटर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, सुतार, रेफ्रिजरेटर, एसी मेकॅनिक इत्यादी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत 3115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

24 सप्टेंबर 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

23 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज कसा करावा ? | Railway Recruitment 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 23 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

VI Recharge Plan | VI ने लॉन्च केला 26 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार हे फायदे

VI Recharge Plan

VI Recharge Plan | जुलै महिन्यापासून देशातील तीन मोठ्या खाजगी लोकप्रिय कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया (VI Recharge Plan) यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेले आहे. या रिचार्जमध्ये जवळपास 15 पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झालेली होती. आणि अनेक ग्राहक हे बीएसएनएल या कंपनीकडे वळाले आहे. परंतु अशातच वोडाफोन आयडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन डेट सादर केलेला आहे. हा प्लॅन केवळ 26 रुपयाचा आहे. याआधी एअरटेलने देखील त्यांचे 26 रुपयाचे वाउचर प्लॅन लॉन्च केले होते. पण त्यामुळे आता वोडाफोन आयडियाने देखील केलेले आहे. वोडाफोन आयडिया ही देशातील सगळ्यात मोठी तिसरी दूरसंचार सेवा कंपनी आहे. याद्वारे ही कंपनी त्यांच्या युजर्सला 1.5 जीबी अतिरिक्त डेटा देते.

वोडाफोन आयडियाचा (VI Recharge Plan) हा रिचार्ज प्लॅन एक महिन्याचा आहे. हे दिवस संपल्यानंतर हा प्लॅन बंद होतो. हा केवळ एक डेटा वाउचर प्लॅन आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला कॉलिंग एसएमएस किंवा इतर कोणत्याही फायदे घेता येणार नाही. जर तुमचा दैनंदिन डेटा संपला असेल आणि तुम्हाला अतिरिक्त डेटाची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत खास आहे.

वोडाफोन आयडिया आणि एअरटेलने त्यांचे 26 रुपयाचा डेटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची सगळी वैशिष्ट्ये बऱ्यापैकी सेमच आहे. तुमचा जर दैनंदिन डेटा संपला असेल, तर तो डेटा वापरण्यासाठी तुम्ही हा प्लॅन वापरू शकता. परंतु यासाठी तुमचा बेस्ट प्लॅन सक्रिय असणे गरजेचे आहेत. ज्यामध्ये तुमची कॉलिंग आणि एसएमएसची सेवा उपलब्ध असतात.

जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर्स असेल आणि तुमचा दैनंदिन डेटा संपला असेल आणि तुम्हाला कामासाठी अधिक डेटाची आवश्यकता असेल, तर हा 26 रुपयाचा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही या प्लॅनचा वापर करून अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकता.

Rule Change From 1 October | 1 ऑक्टोबरपासून LPG सिलेंडरसह बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार अतिरिक्त ताण

Rule Change From 1 October

Rule Change From 1 October | सप्टेंबर महिना संपण्यास अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना चालू होईल. दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल होत असतात. आर्थिक नियमांमध्ये देखील बदल होत असतात. ऑक्टोबर महिन्यात देखील अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहे. आणि याचा सर्वसामान्य माणसाच्या खिशावर नक्कीच परिणाम होणार आहे. आता ऑक्टोबर (Rule Change From 1 October) महिन्यापासून तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींचे बजेट ठेवावे लागेल? आणि कोणत्या आर्थिक नियम बदलणार आहेत आणि त्याचा तुमच्यावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे. याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गॅस सिलेंडर | Rule Change From 1 October

एलपीजी सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलते. तेल कंपन्या घरगुती सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली होती.

शेअर बायबॅक

बाजार नियामक सेबीने शेअर बाजाराचे क्रेडिट नियम बदलले आहेत. हा बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल. नवीन नियमांनुसार, आता शेअर्स 2 दिवसांत डीमॅट खात्यात जमा होतील. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेच्या दोन दिवसांत बोनस शेअर्स मिळतील.

सुकन्या समृद्धी योजना | Rule Change From 1 October

जर तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की 1 ऑक्टोबर 2024 पासून त्याचे नियम बदलले आहेत. जर आजी-आजोबा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने सुकन्या खाते उघडले असेल तर ते खाते पालकांच्या किंवा पालकांच्या नावे हस्तांतरित करावे लागेल. सुकन्याने खाते हस्तांतरित केले नाही तर खाते गोठवले जाईल.

पीपीएफ नियमांमध्ये बदल

केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार आता एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास कारवाई केली जाणार आहे. त्याच वेळी, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या खातेधारकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यावर व्याज मिळणार नाही. त्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजाचे क्रेडिट उपलब्ध होईल.

Aare Ware Beach Ganapatipule | गणपतीमुळे सागरी मार्गावर आहे हा सुंदर समुद्र ; डोंगराच्या दोन्ही बाजूंना दिसते नयनरम्य दृश्य

Aare Ware Beach Ganapatipule

Aare Ware Beach Ganapatipule | आपल्या महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत. जी पाहिल्यावर आपण अगदी मंत्रमुग्ध होतो. आणि अनेक लोक लांबून महाराष्ट्रात भेट देण्यासाठी येतात. कारण महाराष्ट्राला अनेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाण आहे. अशातच कोकण हा आपल्या महाराष्ट्राचा स्वर्ग मानला जातो. कोकण जितके सुंदर तितकाच इथला प्रवास देखील सुंदर आहे. चारही बाजूने कोकणाला समुद्राने वेढलेले आहे. तसेच उंच उंच सुपारीची झाडे, मंत्रमुग्ध करणारे वातावरण यामुळे सगळ्यांनाच कोकण हवाहवासा वाटतो. जर तुम्ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी मार्गाने जात असाल, तर यावर एक सुंदर असे वळण आहे. आणि त्यावर एक अथांग समुद्र दिसतो. जो पाहिल्यावर तुम्हाला खूप छान वाटेल. आता हा सागरी मार्ग नक्की कुठे आहे? याची माहिती आपण जाणून घेऊया.

कोकणात जाताना सागरी मार्गाचा आनंद घेणे, ही एक खूप मोठी अनुभूती असते. अशातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका डोंगराच्या दोन बाजूला हे समुद्र दिसतात. हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जातो. हे दृश्य पाहायला सगळ्यांनाच आवडते. तुम्ही जर आरे वारे (Aare Ware Beach Ganapatipule) रोडने प्रवास करत असाल, तर या प्रवासादरम्यान हे नयनरम्य दृश्य वाटते की, हा प्रवास कधी संपू नये असे तुम्हाला वाटेल.

या समुद्र मार्गावरून जाताना तुम्हाला डोंगराच्या माथ्यापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या सगळे सुंदर असे दृश्य पाहायला मिळेल. तसेच चमचमीत पांढरी वाळू, हिरवीगार झाडे, आकाश, आकाशात उडणारे अनेक पक्षी तुम्हाला पाहायला मिळेल. या डोंगराच्या दोन्ही बाजूंना समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जातो.

आरे आणि वारे हे दोन समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूला आहेत. यावेळी अरबी समुद्रात ही डोंगराची कड प्रवेश करत आहे. आणि त्या समुद्रकिनाऱ्यांना विभाजित करते. त्यामुळे या डोंगर माथ्यावर दोन्ही बाजूला समुद्र पाहायला मिळतो. आरे आणि वारे या दोन गावांजवळ हे दोन समुद्रकिनारे आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांना देखील आरे आणि वारे ही नाव पडलेली आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने गणपतीपुळे येथे जाणारा सागरी मार्ग आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला खूप चांगले दृश्य पाहायला मिळेल. कोकणातील सगळ्यात पर्यटन लोकप्रिय असलेले पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे जाताना हा सुंदर सागरी मार्ग तुम्हाला लागतो. यावर तुम्हाला खूप अद्भुत अशी अनुभूती येईल.

भाज्यांमध्ये तिखट झाले आहे जास्त ? ‘हा’ पांढरा पदार्थ येईल कामी

kitchen tips

जेवण चांगल्या प्रकारे बनवायचं असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. थोडीशी जरी गडबड झाली तर पदार्थाच्या स्वादावर परिणाम म्हणून पदार्थ बिघडतो. बरेचदा चुकून आपल्या हातून जेवणामध्ये तिखट जास्त पडते. मात्र त्या वेळेला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत असं जेवण खाताना त्यांना त्रास होतो. मग अशावेळी काय करायचं पदार्थासाठी कल्पना कसा कमी करायचा हे जाणून घेऊयात

डेअरी प्रोडक्ट

भाजी मधला तिखटपणा कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये दूध दही किंवा तुम्ही तुम्ही घालू शकता. डेरी प्रॉडक्ट हे फक्त तिखटपणा कमी करत नाही तर ग्रेव्ही अधिक दाट बनवतात. हे डेअरी प्रोडक्ट घालणार आहात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर असला पाहिजे.

तूप

सुक्या भाजीमध्ये जर तिखट जास्त झालं तर भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये तूप घाला आणि भाजी थोडा वेळ शिजू द्या. तूप भाजी मधला तिखटपणा कमी करेल.

साखर

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पदार्थांमधील तिखटपणा कमी करण्यासाठी साखर चांगल्या प्रकारे काम करते. तुम्ही बनवलेला पदार्थ तिखट झाला असेल तर त्यामध्ये साखरेचे पाणी घाला. पण हे घालत असताना जास्त प्रमाणात घालू नका नाहीतर पदार्थाची चव बिघडून जाईल.

रेल्वे तिकिटावर असलेल्या CNF, RLWL कोडचा अर्थ काय ? जाणून घ्या

आपण सर्वांनी कधी ना कधी ट्रेनने प्रवास केलाच असेल. असे म्हणतात की भारतातील सामान्य नागरिक रेल्वेने जातो. एका अहवालानुसार, दररोज २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रत्येक प्रवाशाला प्रवास करताना तिकीट काढावे लागते. तिकीट ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही घेतले जातात. तुमच्या लक्षात आले असेल की तिकिटावर WL, CNF, RAC, RLWL आणि PQWL असे अनेक कोड लिहिलेले असतात. तुम्हाला या कोड्सचा अर्थ माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

वेटिंग लिस्ट (WL)

WL ला भारतीय रेल्वेमध्ये प्रतीक्षा यादी म्हणतात. ज्या तिकिटांमध्ये WL चा उल्लेख आहे ते म्हणजे तुमचे तिकीट अजून कन्फर्म झालेले नाही पण या तिकिटांमध्ये कन्फर्म होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जर तुमच्या तिकिटात WL 10 लिहिले असेल, तर याचा अर्थ असा की जर 10 जणांनी त्यांचे तिकीट रद्द केले, तर या स्थितीत तिकीट कन्फर्म होईल आणि तुम्हाला जागा दिली जाईल.

कन्फर्म (CNF)

जर तुमचे तिकीट कन्फर्म झाले असेल तर तुमच्या तिकिटावर CNF लिहिलेले असते. या परिस्थितीत, तुम्हाला आसन क्रमांक आणि बर्थ क्रमांक देखील मिळतो. काहीवेळा तिकिटावर CNF लिहिलेले असते परंतु बर्थ क्रमांक आणि आसन क्रमांक दिलेला नसतो. अशा स्थितीत तुमचे तिकीट कन्फर्म होते. चार्ट तयार केल्यानंतर, तुम्हाला आसन क्रमांक आणि बर्थ क्रमांक दिला जातो.

रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL)

ज्या तिकिटांमध्ये RLWL रेकॉर्ड केले जाते ते म्हणजे रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट. ही तिकिटे ट्रेनच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानकांदरम्यान येणाऱ्या स्थानकांवरून दिली जातात. जर हे तिकीट कन्फर्म झाले नाही तर भविष्यात ते कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

रिजर्वेशन अगेंस्ट कॅन्सलेशन (RAC)

आरएसी कोड असलेल्या तिकिटांचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमची सीट इतर कोणाशी तरी शेअर करावी लागेल. अशा परिस्थितीत एका सीटवर दोन जणांना प्रवास करावा लागतो. जर आरएसी तिकीट असलेल्या व्यक्तीने आपले तिकीट रद्द केले तर अशा परिस्थितीत तुमचे तिकीट कन्फर्म होऊ शकते आणि तुम्ही त्यावर एकटे प्रवास करू शकता.

पूल्ड कोटा वेटलिस्ट (PQWL)

PQWL चिन्हांकित तिकिटे एकत्रित कोटा प्रतीक्षा यादीसाठी आहेत. जेव्हा एखादी ट्रेन लांब पल्ल्याच्या ट्रेन असते आणि एखादा प्रवासी त्या ट्रेनमध्ये कमी अंतराचा प्रवास करतो (दोन स्थानके मध्ये येतात) तेव्हा हा PQWL कोड त्या तिकिटांमध्ये टाकला जातो. RLWL प्रमाणे, या तिकिटांची पुष्टी होण्याची शक्यता देखील खूप चांगली आहे.