Friday, December 26, 2025
Home Blog Page 443

सणासुदीच्या काळात रेल्वे चालवणार 6,000 विशेष गाड्या : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

railway for diwali

सध्या दाणासुदीचा हंगाम जवळ येत आहे. येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे. तर त्यानंतर लगेचच वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी सुद्धा येतो आहे. या काळात कामानिमित्त्त बाहेरगावी वसलेले अनेक लोक आपल्या घरी जात असतात. त्यापैकी बहुतांश लोक रेल्वेचे बुकिंग करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, भारतीय रेल्वेने दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सणांसाठी एक कोटीहून अधिक प्रवाशांना घरी पोहोचवण्यासाठी जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “ 6,000 विशेष गाड्या तर आहेतच याशिवाय, 108 गाड्यांना अतिरिक्त सामान्य डबे जोडण्यात आले आहेत आणि सणांच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन 12,500 डबे मंजूर करण्यात आले आहेत,” असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अनेक रेल्वे मार्ग, विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसाठी ठरलेल्या मार्गांवर दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रचंड गर्दी असते.

पुढे बोलताना वैष्णव म्हणाले की, यंदाच्या सणाच्या हंगामासाठी आतापर्यंत एकूण 5,975 विशेष गाड्या अधिसूचित करण्यात आल्या आहेत, गेल्या वर्षी 4,429 गाड्या होत्या. “यामुळे या पूजेच्या गर्दीत एक कोटीहून अधिकप्रवाशांना घरी जाण्याची सोय होईल,” ते म्हणाले. 9 ऑक्टोबरपासून दुर्गापूजा सुरू होईल, दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी होईल, तर छठ पूजा 7 आणि 8 नोव्हेंबरला होणार आहे.

बांधकाम कामगारांची दिवाळी होणार आणखी गोड; सरकारने प्रतिदिन वाढवले ‘एवढे’ वेतन

Minimum Wage Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे देशातील सर्व सामान्य जनतेचा नेहमीच विचार करत असतात. आणि त्या जनतेचा विचार करून त्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. अशातच आता मोदी सरकारने देशातील कामगारांची दिवाळी आणखीन आनंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी महागाई भत्ता म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे. आणि त्यांना देण्यात येणारे वेतन हे प्रतिदिन 1035 रुपये करण्याची घोषणा देखील केली आहे. आता या घोषणेनंतर कामगारांना नक्की किती पैसे मिळतील याची माहिती आपण जाणून घेऊया.

नुकतेच 26 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बैठक झाली. आणि या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली. अनेक कामगारांच्या वेतनामध्ये लक्षणीय वाढ देखील करण्यात आलेली आहे. यावेळी या निर्णयाची माहिती देताना कामगार मंत्रालयाने सांगितले की कामगारांच्या राहणीमानातवाढ करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बांधकाम खाणकाम आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 1 ऑक्टोबर पासून त्यांची वेतन वाढ मिळणार आहे. सुधारित नियमानुसार आता पुढील महिन्याच्या एक तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून हे नियम लागू होतील.

वाढत्या महागाईच्या काळात कामगारांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक 2.40 अंकांनी वाढलेला आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणारे अंकुशल कामगारांसाठी किमान वेतन हे 783 रुपये प्रति दिन आणि 20358 रुपये प्रति महिना एवढे झालेले आहे. तसेच अर्धकुशल कामगारांसाठी हे वेतन 68 रुपये प्रति दिन म्हणजेच 22568 रुपये प्रति महिना जर कुशल आणि काम गार कोणी कामगारांसाठी हे वेतन प्रति दिन 954 रुपये म्हणजेच महिन्याचे 24804 एवढे असेल.

सरकारने घेतलेला या निर्णयामुळे कामगारांच्या वेतनात वाढ होणार आहे. यामुळे त्यांचे जीवनमान देखील उंचावणार आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधांचा लाभ देखील मिळणार आहे. या आठवड्यातच हजारो कामगारांनी देशभरात निषेध केला होता. तसेच त्यांच्या वेतनात वाढ व्हावी आणि चार कामगार कायदे रद्द करण्याची मागणी देखील केली होती. आता याच पार्श्वभूमीवर सरकारने हे मोठे निर्णय घेतलेले आहेत.

ट्रेनमध्ये हवी आहे खालची सीट ? कशा प्रकारे कराल तिकीट बुकिंग ?

lower birth

ट्रेन मध्ये प्रवास करीत असताना अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर बसून प्रवास करण्याऐवजी झोपून आरामदायी प्रवास केला जातो तीही व्यवस्था रेल्वे मार्फत केली सुद्धा जाते. मात्र बऱ्याचदा रेल्वे बुकिंग मध्ये आपल्याला वरची बर्थ मिळते. मात्र अशावेळी जर तुमच्यासोबत वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना वरच्या बर्थ वर चढताना त्रास होतो. जर तुम्हाला रेलवे मध्ये खालची सीट हवी असेल तर कशा प्रकारे बुकींग कराल ? आजच्या लेखात जाणून घेऊया…

लोअर बर्थ सीट कशी बुक करावी

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक नियम केले आहेत, जेणेकरून त्यांचा प्रवास सुकर करता येईल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली आहे. रेल्वेने सांगितले की, जर तुम्ही जनरल कोट्यात तिकीट बुक केले तर सीट असेल तरच तुम्हाला सीट अलॉटमेंट मिळते. आसन नसेल तर मिळणार नाही. जर तुम्ही रिझर्व्हेशन चॉईस बुक अंतर्गत फक्त लोअर बर्थ अलॉट केल्यावर बुक केले तर तुम्हाला लोअर बर्थ मिळेल.

तुम्हाला खालची सीट कशी मिळेल?

रेल्वेतून दररोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात, अशा परिस्थितीत प्रत्येकाला लोअर बर्थची सीट मिळणे शक्य नसते. त्यामुळे सामान्य कोट्यातील बुकिंग करणाऱ्यांना जागा असतानाच कमी जागा दिल्या जातात, असे रेल्वेने म्हटले आहे. या जागा “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या” तत्वावर उपलब्ध आहेत.

क्या बात ! Apple आणणार स्वस्तात AI iPhone ; किती असेल किंमत ?

मोबाईलच्या दुनियेत मोबाईचा राजा म्हणून मिरवणाऱ्या Apple चा पुढचा फोन iPhone SE 4 बाजारात येण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्ट नुसार Apple च्या नव्या फोनमध्ये Apple Intelligence फिचर असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

यापूर्वी आयफोनच्या Apple iPhone 16 सिरीज साठी ग्राहकांनी अक्षरशः झुंबड लावल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र आता iPhone SE 4 ला देखील यशस्वीपणे पुढे आणू इच्छित आहे. रिपोर्टनुसार Apple चा नवा आयफोन iPhone SE 4 हा दिसायला कसा असेल? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर iPhone14 आणि iPhone 15 सारखाच हा फोन दिसेल. यात फक्त एक कॅमेरा असेल आणि हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतो ही यातली जमेची बाजू असणार आहे. जर हा फोन iPhone१५ सारखा दिसत असेल तर अनेकांना तो विकत नक्कीच घ्यावासा वाटेल.

iPhone 15 च्या बाबतीत बोलायचं झालं तर आयफोन 15 ची किंमत कमी झाली असून हा फोन केवळ 69 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येतो. मात्र iPhone 15 च्या रेग्युलर मॉडेलमध्ये एआय फीचर दिलेलं नाही. हे फीचर फक्त आयफोन 15 प्रो आणि Apple iPhone 16 या सिरीज मध्ये उपलब्ध आहे जर का Apple ची नवी सिरीज कमी किमतीत आणि AI फीचर्स उपलब्ध करून दिलेली असेल तर हमखास लोक विकत घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Swiggy | Swiggy ने सादर केले IPO कागदपत्र; उभारणार 3750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स

Swiggy

Swiggy | ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने IPO लॉन्च करण्यासाठी मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला आहे. DRHP च्या मते, कंपनी या IPO साठी 3,750 कोटी किमतीचे नवीन शेअर जारी करेल. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 18.5 कोटी शेअर्स विकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्केट रेग्युलेटरकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी या वर्षी नोव्हेंबरमध्ये IPO लॉन्च करू शकते.Accel, Coatue, Alpha Wave, Elevation, Norwest आणि Tencent यासह अनेक गुंतवणूकदार OFS द्वारे त्यांचे स्टेक विकतील आणि स्विगीमधील त्यांची मालकी कमी करतील. याशिवाय, एलिव्हेशन कॅपिटल, डीएसटी ग्लोबल, नॉर्वेस्ट, कतार गुंतवणूक प्राधिकरण (क्यूआयए), सिंगापूरचे जीआयसी हे कंपनीचे इतर भागधारक आहेत.

फूड डिलिव्हरीमध्ये कंपनीची झोमॅटो आणि स्विगीशी मुख्य स्पर्धा 2014 साली सुरू झाली. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर देशभरातील 1.50 लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स सूचीबद्ध आहेत. खाद्यपदार्थ वितरणाव्यतिरिक्त, कंपनी द्रुत वाणिज्य व्यवसायात देखील आहे. स्विगीचा (Swiggy) क्विक कॉमर्स व्यवसाय इन्स्टामार्टच्या नावाखाली चालतो. फूड डिलिव्हरीसाठी कंपनीची मुख्य स्पर्धा झोमॅटोशी आहे. त्याच वेळी, इन्स्टामार्टच्या व्यवसायात झोमॅटोच्या उपकंपन्या ब्लिंकिट आणि झेप्टो यांच्याशी स्पर्धा आहे.

2030 पर्यंत भारतातील अन्न वितरण बाजार 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. स्विगी आणि झोमॅटोचे 90 टक्क्यांहून अधिक खाद्य उद्योगावर नियंत्रण आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की झोमॅटोचे शेअर्स 2021 मध्ये सूचीबद्ध झाले होते. जानेवारी 2022 मध्ये कंपनीने शेवटचा निधी उभारला तेव्हा त्याचे मूल्य 10.7 अब्ज होते. तथापि, सूत्रांनुसार, गेल्या काही महिन्यांत, बँकर्सनी विश्वास व्यक्त केला आहे की स्विगीचे बाजार भांडवल/मूल्यांकन सुमारे10-13 अब्ज डॉलर्ससह सूचीबद्ध केले जाऊ शकते.

स्विगीच्या IPO ची तयारी नोव्हेंबर २०२३ च्या सुमारास सुरू झाली आणि त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. स्विगीने गोपनीयपणे त्याचे IPO पेपर्स मार्केट रेग्युलेटरकडे दाखल केले आहेत. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, जेफरीज इंडिया, एव्हेंडस कॅपिटल, जेपी मॉर्गन इंडिया, बोफा सिक्युरिटीज इंडिया आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांना इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.

विरोधक लाडकी बहीण योजना बंद करणार? अजितदादा म्हणाले, भगिनींनो आता तुम्हीच निर्णय घ्या..

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. आत्तापर्यंत या योजेनचे एकूण २ हप्ते महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले असून महिलावर्गात मोठया आनंदाचे वातावरण आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने या योजनेत खोडा घालण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार ( Sunil Kedar) यांनी तर आमचं सरकार आल्यानंतर हि योजनाच बंद करू असं विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच भगिनींनो आता तुम्हीच ठरवा कि कोणाला साथ द्यायची असं म्हणत अजितदादांनी महिलांना आवाहन केलं आहे.

अजित पवार यांनी याबाबत आपल्या ट्विटर हॅन्डल वर ट्विट करत म्हंटल, महाराष्ट्राची ही निवडणूक स्त्रीशक्तीची निवडणूक आहे. यावेळी आमच्या माय माऊली महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील. महायुतीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या पक्षांनी स्पष्ट केले आहे की ते ही योजना बंद करतील. आता महाराष्ट्राच्या बहिणींनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला साथ द्यायची की त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करू पाहणाऱ्या विरोधकांना साथ द्यायची आहे? असा सवाल करत एकप्रकारे आम्हालाच साथ द्या असं आवाहन अजित पवार यांनी महिलावर्गाला केलं आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद करू या सुनील केदार यांच्या विधानाने महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सुनील केदार यांच्या या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ भविष्यात महाभकासचं सरकार जर आलं तर काँग्रेसचे भ्रष्ट नेते सुनील केदार ती बंद करणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातील चांगल्या योजनांना कायम विरोध करणारा हा आहे लाचार काँग्रेसचा खरा चेहरा, अशी टीकेची झोड शीतल म्हात्रे याची उठवली आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनीही सुनील केदार यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हंटल कि, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री भेटी देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसला आधीच अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली असल्याची टीकाही निरूपम यांनी केली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला जनतेचं समर्थन; मविआ घटनेचं राजकारण करतेय??

Akshay Shinde's Encounter

Badlapur Akshay Shinde’s Encounter : बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांनी बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यांमुळे आम्हाला स्व- संरक्षणासाठी त्याला गोळी मारावी लागली असा दावा पोलिसांनी केला, मात्र या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येऊ नये म्हणून अक्षयचा मुद्दाम बळी घेण्यात आला असा आरोप करत महाविकास आघाडीने सरकारला लक्ष्य केलं आहे. मात्र अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर नंतर जनतेमध्ये मात्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट पडल्या. एक कीड ठेचून काढल्याचा आनंद आज महाराष्ट्रभरात दिसून आला. मात्र या घटनेचे राजकारण करणारे चेहरे देखील तितक्याच भेसूरपणे प्रकाशात आल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे हा तरुण सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. एक ऑगस्ट रोजी त्याची नियुक्ती झाली. आणि पंधरा दिवसात त्याने आपल्या विकृतीचे दर्शन घडवले. या शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. आपल्या नाजूक ठिकाणी वेदना होत आहेत, असे त्यांनी पालकांना सांगितले. पालकांनी शाळेवर मोर्चा नेला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र ही घटना घडताच दुसऱ्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला. हजारो लोक अचानक ट्रॅकवर जमा झाले. सुमारे नऊ तास बदलापूरहुन मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प करण्यात आली. उत्स्फूर्तपणे झालेल्या या आंदोलनात अचानक राजकीय बॅनर आले. पोलिसांवर दगडफेक झाली. शाळेची तोडफोड झाली. राजकीय प्रतिक्रिया झपाट्याने उमटू लागल्या. आणि आंदोलनाच्या मागे लोक भावना नसून राजकीय हेतू असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा आंध्रप्रदेश प्रमाणे एन्काऊंटर करण्याची मागणी केली. सुषमा अंधारे यांचीही तशीच मागणी होती. इवल्याशा जीवांना छळणाऱ्या त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मागणी करण्यात आघाडीवर होते. बालिकांच्या शोषणाची तक्रार दाखल होताच बदलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुख्य आरोपी अक्षय शिंदे जिथे राहत होता त्या गावातील नागरिकांनी त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. त्याची तीन लग्न झाली होती असे उघडकीस आले आणि विभक्त पत्नींपैकी एका पत्नीने त्याच्या विरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर विरोधक मात्र सरकारवरच आक्रमक झाले. अक्षय शिंदे बंदूक चालवूच कसा शकतो? पोलिसांनी त्याला बुरखा घातला नव्हता का? असा उलट सवाल विरोधकांनी केला. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कृतीचे ठाम शब्दात समर्थन केले. पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारच, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चकमकीतील पोलिसांना बक्षीस जाहीर केले. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पोलीस कारवाईचे समर्थन केले. पुण्यात या घटनेच्या समर्थनार्थ पेढे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह चकमकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलिसांची बाजू घेतली. सोशल मीडियावर ” देवाचा न्याय” या नावाने एक हॅशटॅग ट्रेंड झाला. पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट या अंतर्गत नागरिकांनी टाकल्या. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनमुराद कौतुक महाराष्ट्राने केले. . दोन चिमूरड्यांना न्याय मिळाल्याची भावना सामूहिक रित्या व्यक्त झाली.

विरोधकांच्या उलट प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी मात्र जनभावनेच्या उलट प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी आंदोलन करणाऱ्या सुषमा अंधारे या पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप करीत आहेत. अक्षय शिंदे याला अन्यत्र देण्यात गृह खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मविआचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पोलिसांवर संशय व्यक्त करणाऱ्या आहेत. यामुळे चार वर्षांच्या बालिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अक्षय शिंदे च्या प्रकरणात सुद्धा विरोधक राजकारण शोधत आहेत, असा आरोप असंख्य लोक सोशल मीडियावर करीत आहेत. तसेच बलात्काऱ्याला पाठीशी घालणारे आणि त्याची बाजू घेणारे राजकारणांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही अशा हजारो प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

Samsung Galaxy M15 5G | नवीन फिचर्ससह Samsung Galaxy M15 5G Prime Edition लॉन्च ; जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy M15 5G

Samsung Galaxy M15 5G | हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन आधुनिक युगामध्ये अनेक लोक फोनकडे आकर्षित होत आहेत. त्यामध्ये बाजारात कोणता मोबाईल लाँच झाला आहे याकडेच सर्वांचे लक्ष असते . सॅमसन कंपनीने ग्राहकांसाठी Samsung Galaxy M15 5G Prime Edition फोन बाजारात लॉन्च केला असून , त्याच्या फिचर्सने अनेक लोक भारावून गेले आहेत . अगदी कमी किंमतींमध्ये हा फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे . सॅमसनने लाँच केलेल्या Samsung Galaxy M15 5G Prime Edition या मोबाईला 8GB ची रॅम असुन 6000mAh ची बॅटरी पाहायला मिळणार आहे . OS उत्पादक आणि पाच वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळणार आहेत .

सॅमसन स्मार्ट फोनची फिचर्स | सॅमसन स्मार्ट फोनची फिचर्स

  • डिस्प्ले- या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टच्या सोबत 6.5 इंच फुल HD प्लस सुपर एमोलेड स्क्रीन असणार आहे .
  • प्रोसेसर- 6100 प्लस प्रोसेसरचा वापर केला गेला आहे .
  • ऑपरेटिंग सिस्टम- हा स्मार्ट फोन 4 बेस्ट वन UI 6.0 वर काम करत आहे .
  • कॅमेरा सेटअप – फोनच्या मागच्या बाजूला 50 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असून त्याच्यासोबत 5 मेगापिक्सल सेकंडरी आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर दिला आहे. तसेच सेल्फीसाठी फ्रंट 13 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.
  • बॅटरी – 6000mAh ची बॅटरी आहे .
  • सिक्युरिटी- सिक्युरिटीसाठी पावर बटन मध्ये फिंगर प्रिंट सेन्सर दिले गेले आहे .
  • कनेक्टिव्हिटी – या फोनची कनेक्टिव्हिटी 4G LTE, डुअल 5G, GPS , यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ वर्जन 5.3 आणि 3.5 मिलीमीटर ऑडिओ जॅक वापरलेला आहे .
  • वजन,लांबी ,रुंदी – सॅमसन या फोनचे वजन 217 ग्राम असून त्याच बरोबर 160.1 x 76.8 x 9.3mm लांबी आणि रुंदी आहे.

Samsung Galaxy ची किंमत

Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशन तीन रंगामध्ये उपलब्ध असून , ब्लू टोपाझ, सेलेस्टीर ब्लू आणि स्टोन. त्याचा बेस 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 13,499 रुपये आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजसह टॉप फोन हा किंमत 16,499 रुपये असून ग्राकांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत होणार मोठा बदल; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता अनेक महिला या तिसऱ्या त्याची वाट पाहत आहे. अशातच आता पात्र असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेबाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहणी योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) ही महाराष्ट्र सरकारने आणलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. सुरुवातीला ऑगस्ट महिन्यापर्यंत या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत होती. परंतु सरकारने पुन्हा ही मुदत वाढून 30 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख घेतलेली आहे. परंतु अशातच हाती आलेल्या माहितीनुसार सर्वसामान्य जनतेतील सगळ्यांना फायदा होण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या 30 सप्टेंबर 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार असल्याची चर्चा देखील चालू आहे. ही अंतिम मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंत असू शकते. असा दावा देखील केला जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले आहे. आणि सप्टेंबर अखेर पर्यंत ही संख्या आणखीनच वाढणार आहे. जर सरकारने ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली, तर ही संख्या 3 कोटींच्या वर देखील जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्या जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच 29 सप्टेंबरला पात्र महिन्याच्या खात्यात तिसरा हप्ता येणार असल्याची माहिती देखील हाती आलेली आहे. आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकर जमा होणार आहे.

या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही. त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. परंतु सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत. आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सहभाग घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार, अविवाहित या सगळ्या महिलांना लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहेत, परंतु तिने जर महाराष्ट्र राज्यात लग्न केले असेल, तरी देखील तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Success Story | बांबूच्या शेतीतून ‘हा’ शेतकरी कमावतो लाखो रुपये; शासनाकडून मिळालेत 30 पेक्षा जास्त पुरस्कार

Success Story

Success Story | आजकाल शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. अनेक तरुण मुले देखील नोकरी व्यवसाय करण्यापेक्षा शेतीमध्ये कष्ट करत आहेत. आणि त्यातून चांगल्या पद्धतीने पिकं घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधून वेगवेगळे पीक घेत आहेत. आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका धुळ्यातील प्रगतशील शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्यांनी बांबूची शेती केली आणि हा शेतकरी दर वर्षाला 25 लाख रुपये कमावतो. हे शेतकऱ्याकडे 49 एकर जमीन आहे. आणि त्यातील जवळपास 25 एकर जमिनीवर त्यांनी बाबूंची शेती केलेली आहे. या बांबूच्या उत्पन्नामुळे या शेतकऱ्याला राज्य शासनासह अनेक जागतिक दर्जाचे 30 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत.

यशस्वी कहाणी (Success Story) महाराष्ट्रातील धुळे येथील शेतकऱ्याची आहे. या शेतकऱ्याचे नाव शिवाजी राजपूत असे आहे. शिवाजी यांनी एकूण 25 एकर जमिनीवर शाश्वत बांबूची लागवड केलेली आहे. आणि यातून ते दर वर्षाला 25 लाख रुपये एवढे उत्पन्न घेतात. शिवाजी हे देखील आधी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक शेती करत होते. परंतु अतिवृष्टी कधी कधी दुष्काळी या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या पिकांवर खूप परिणाम होऊ लागला. आणि त्या सगळ्यांना काही फायदा होत नव्हता. त्यांनी खूप जास्त भांडवल लावून देखील त्यांना काहीच फायदा न झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवाजी राजपूत यांनी बांबूची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात जवळपास 19 विविध जातींचे बांबू लावलेले आहेत. ज्यामध्ये अगरबत्ती, कोळसा आणि बायोगॅस ऊर्जा उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंच्या जातींचा देखील समावेश आहे. बांबूचे खोड, पान आणि पावडर पासूनही उत्पादने तयार होतात.

बांबूच्या शेतीकडे आजकाल एक प्रगतशील शेती म्हणून बघितले जाते. यासाठी सरकार देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे. शिवाजी राजपूत यांनी सांगितल्याप्रमाणे 136 जाती आहेत. त्यांनी ठिबक सिंचनासारखे आधुनिक तंत्रे वापरली आणि ही शेती केलेली आहे. या बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहे. जर तुम्हाला अगरबत्तीच्या बाजारात प्रवेश करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट जातीच्या बांबूची लागवड करावी लागेल. तसेच फर्निचर आणि बायोगॅसच्या उत्पादनासाठी वेगळ्या प्रकारच्या बांबूची जात लागते. त्यामुळे आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. यासाठी बांबूची जात काळजीपूर्वक निवडणे खूप गरजेचे आहे.

आजकाल आधुनिक शेती तंत्रज्ञानाने जे शेतकरी शेती करतात. तेच चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. आणि यातील ठिबक सिंचनाचा वापर करून केलेली शेती खूप फायदेशीर ठरते. यामुळे शेती पद्धतीने त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की, या शेतीसाठी जास्त खर्च लागत नाही. त्यांनी तीन दशकांत पेक्षा जवळपास 7 लाख झाडे लावलेली आहेत. आणि 25 एकरमध्ये त्यांनी बांबूचे जंगल तयार केलेले आहे. ज्यातून त्यांना खूप चांगला फायदा होतो.