MPSC Krushi Seva Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो असतो. अनेक लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अशातच आता MPSC कृषी सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत उपसंचालक कृषी तालुका कृषी अधिकारी /तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 258 जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करायचे आहेत. 27 सप्टेंबर 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 17 ऑक्टोबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | MPSC Krushi Seva Bharti 2024
या भरती अंतर्गत उपसंचालक कृषी तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
पदसंख्या
या भरती अंतर्गत तब्बल 258 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख
27 सप्टेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
17 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पदसंख्या | MPSC Krushi Seva Bharti 2024
उपसंचालक कृषी – 48 पदे
तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी – 53 पदे
कृषी अधिकारी कनिष्ठ आणि इतर – 157 पदे
अर्ज कसा करावा?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ म्हणजे मोदी सरकारचा महत्तवाकांक्षी प्रकल्प. खूप आरामदायी आणि विमानांप्रमाणे प्रिमिअम गाडीला प्रवाशांनी उचलून धरले. मात्र देशातील या लक्झरी रेल्वे बाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक मार्गांवर एका मागोमाग एक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मात्र या व्हीआयपी ट्रेनला काही मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र काही मार्गावर आहे त्या सीट्स सुद्धा भरता येत नाहीत अशी स्थिती आहे.
ट्रेनचं भाडं सामान्यांना न प्रवडणारं
संपूर्ण देशाचा विचार करता जवळपास 66 मार्गावर प्रीमियम ट्रेन सुरू करण्यात आले आहेत परंतु या ट्रेनचा भाडंच एवढं आहे की ही ट्रेन सर्वांना परवडणारी नाही. त्यामुळेच काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत.
रेल दुनिया या वेबसाईटवर याबाबतचे माहिती सांगण्यात आली आहे. देशभरातील काही भागांमध्ये वंदे भारताला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर भुवनेश्वर विशाखापट्टणम, टाटानगर- ब्रह्मपूर, रीवा- भोपाळ, कलबुर्गी- बंगळुरू,उदयपूर- आग्रा/ जयपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, नागपूर- सिकंदराबाद आदि मार्गावर निम्म्यापेक्षा जास्त सीट हा रिकाम्या राहू लागल्याची माहिती आहे. या ट्रेनची सेवा ही विमानासारखी प्रीमियम सेवा आहे. अगदी पुणे मुंबई असा वंदे भारतचा प्रवास करायचा विचार केल्यास तिकीट उपलब्ध असतात. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोयीची आहे. बहुतांश वेळा प्रवाशांनी ही ट्रेन भरलेली असते.
11 मार्गांवर प्रवासीच नाहीत
मात्र 11 मार्ग असे आहेत जिथे प्रवासी मिळत नाहीत. यामध्ये नागपूर ते सिकंदराबाद ट्रेनमध्ये एकूण 1328 सीट्स उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश वेळा सरासरी1118 या रिकाम्याच असतात. तर दुसरीकडे भुवनेश्वर विशाखापट्टणमची ट्रेन 1076 पैकी 934 जागा रिकाम्या ठेवून धावत असते. अशीच परिस्थिती इतर काही ट्रेन्स ची सुद्धा आहे. या ट्रेनला निम्म्या जागाही भरताना नाकी नऊ येत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन तिकीट दर कमी करणार की तोटा सहन करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात असे जगामध्ये विविध धरणे आहेत. परंतु त्यातील सगळ्यात मोठे धरण हे चीन या देशामध्ये आहे. केवळ जगातीलच नाही, तर चीनमधील हे धरण सध्या पृथ्वीवरील सगळ्यात मोठे धरण बनलेले आहे. चीनमधील या धरणाचे नाव ओझ थ्री गॉर्जेस डॅम असे आहे. परंतु आता हेच धरण पृथ्वीसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. याबाबत नासाच्या संशोधकांनी एक मोठा अलर्ट देखील दिलेला आहे.
नासा संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील या धरणामुळे आता पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झालेला आहे. आणि एका दिवसाचा वेळ 0.06 मायक्रो सेकंदांनी वाढलेला आहे. याचे कारण म्हणजे या धरणात सध्या खूप जास्त प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. या धरणात इतके पाणी आहे की, पृथ्वीच्या जडत्ववर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात जाऊन या धरणामुळे पृथ्वीवर अनेक संकट देखील येऊ शकतात.
या धरणाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 125 मीटर उंच असे आहे. या धरणामध्ये 42 ऑब्जेक्ट एवढे पाणी आहे. या धरणाच्या परिसरात जवळपास 6,400 वनस्पतींच्या प्रजाती 3400 कीटकांच्या प्रजाती तसेच 300 माशांच्या प्रजाती आहेत. तर त्याचप्रमाणे 500 पेक्षा जास्त स्तरीय पृष्ठवंशीय प्रजाती यात आढळतात. परंतु यातील पाणी पातळी वाढल्यामुळे या सगळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे. आणि अनेक रोगराई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
या धरणामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे. या धरणामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे आपल्या ठराविक ठिकाणावरून प्रत्येकी 2 सेंटीमीटर पुढे गेलेले आहे आणि पृथ्वी देखील या ध्रुवावर थोडीफार सपाट झालेली दिसत आहे.
नासाचे संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील या धरणामुळे पृथ्वीची फिरण्याची गती खूप मंदावलेली आहे. शास्त्रज्ञांनी 2005 मध्ये थ्री गॉर्जेस या धर्मामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आणि यामुळेच दिवस हा 0.06 मायक्रो सेकंदांनी वाढलेला आहे. हे धरण इतके मोठे आहे की जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प याच धरणावर आहेत. तसेच या धरणावर 2 मोठ्या फोल्ट लाईन देखील बांधलेले आहेत त्यामुळे इथे अनेक मोठ्या प्रमाणात भूकंप देखील होतात. परंतु याची एवढी मोठी पावर पाहून संशोधक देखील घाबरलेले आहेत. आणि त्यांनी भविष्यात जाऊन पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो असे वक्तव्य केलेले आहे.
मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणेकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एवढेच नाही तर विऱोधकांकडूनही टीका करण्यात आल्या. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
कशी असेल नवी मेट्रो
नव्या मेट्रोसाठी स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ अशी तीन स्थानक असतील. हे पूर्ण अंतर 3.34 किलोमीटर असेल. संपूर्ण भूमिगत ही मेट्रो असून याच्या स्थानकांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. याशिवाय प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक देखील कामे पूर्ण झाली असून स्वारगेट स्थानक ते पीपीपी तत्त्वावरील मल्टी मॉडेल हव्या इमारतीचं काम मात्र अजून बाकी आहे. या नव्या मेटोमुळे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ दहा मिनिटांमध्ये करता येणार आहे. सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रोस्थानक 853 मीटर, कसबा पेठ ते मंडई मेट्रोस्थानक अंतर एक किलोमीटर आणि मंडई ते स्वारगेट मेट्रोस्थानक अंतर 1.48 किलोमीटर इतके आहे सिविल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोस्थानक एकूण अंतर 3.34 किलोमीटर इतके आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सप्टेंबर महिना संपत आला असून लवकरच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक आर्थिक नियम बदलन्यात येणार आहेत. तसेच या महिन्यात सुद्धा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. ऑक्टोबर मध्ये अनेक सण आणि शनिवार रविवार पकडून तब्बल 15 दिवस बँका बंद राहतील. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत आदेश जारी करत माहिती दिली आहे.
आजकाल अनेक व्यवहार बँकांच्या (Bank) स्वरूपातच चालतात. या महिन्यात बँकांना सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे . १५ दिवसांच्या सुट्ट्यामध्ये आठवड्यातील प्रत्येक रविवार , दुसरा आणि चौथा शनिवार तसचे अनेक सणांचा समावेश असणार आहे . त्यामध्ये गांधी जयंती , दुर्गापूजा , विजयादशमी , दिवाळी अशा सणांमुळे सुट्यांचा जणू वर्षावच पडणार आहे . त्यामुळे बँकेत तुमची काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी बघूनच बँकेत जावा.
कोणत्या तारखांना बँका बंद ? |Bank Holiday
१ ऑक्टोबर -जम्मू-कश्मीरमधील आगामी काळात विधानसभेच्या निवडणूकीमुळे १ ऑक्टोबर रोजी बँकांना सुट्या असणार आहेत .
२ ऑक्टोबर – गांधी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये बँकांना तसेच अनेक सरकारी कामे बंद असणार आहेत.
३ ऑक्टोबर – जयपूरमध्ये नवरात्री आणि महाराजा अग्रसेन जयंती यामुळे काही बँकांना सुट्ट्या राहतील .
६ ऑक्टोबर – या दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील .
१० ऑक्टोबर – आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता येथे महा सप्तमीच्या सणामुळे बँकांना सुट्टी दिली आहे .
१२ ऑक्टोबर – अनेक राज्यामध्ये महानवमीमुळे बँका बंद राहतील . याच दिवशी दुसरा शनिवास आहे .
१३ ऑक्टोबर – रविवार असल्यामुळे खाजगी तसेच सरकारी बँका बंद राहतील.
१४ ऑक्टोबर – दसऱ्यामुळे बँकांना सुट्टी राहील .
१६ ऑक्टोबर – यादिवशी लक्ष्मी पूजन आहे .
१७ ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी जयंती हि शिमला, बंगलोर, गुवाहाटी येथे असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे .
२० ऑक्टोबर – आठवड्याचा रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील .
२६ ऑक्टोबर – ऑक्टोबर २६ हा जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निर्णायक दिवस ठरला, कारण या दिवसामुळे जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला. विलीनीकरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. महिन्याच्या २६ तारखेला बँकेचा चौथा शनिवार आहे .
२७ ऑक्टोबर – रविवार असल्यामुळे सुट्टी राहील .
३१ ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच दिवाळीच्या सणामुळे बँक बंद राहतील.
Monkey Pox |आज काल वेगवेगळ्या आजारांची उत्पत्ती होत आहे. अशातच काही संपूर्ण आफ्रिका देशामध्ये मंकीपॉक्स या आजाराची खूप मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली. संपूर्ण आफ्रिका देशामध्ये मंकीपॉक्स ने अक्षरशः थैमान घातलेले आहे भारतात. यातील एक संशयित रुग्ण भारतात आढळलेला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. सगळेजण चिंतेत आहे. त्याला विलगीकरणात देखील करण्यात आलेले आहे. मंकीपॉक्स आफ्रिका देशात मोठ्या प्रमाणात वेगाने प्रसारित झालेला आहे. आता हा प्रसार भारता होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. तसेच सर्व नागरिकांना काळजी घेण्याच्या आदेश देखील दिलेले आहेt.
सरकारने सगळ्या राज्यांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यानुसार त्या संशयित रुग्णाचे विलगीकरण करण्यात यावे. तसेच सर्व राज्यातील नागरिकांमध्ये मंकी बॉक्स विषयी जागरूकता वाढावी, तसेच त्यांना रोगाची माहिती मिळावी. लोकांना जागृत करावे. प्रशासनाला आरोग्य यंत्रणेची पाहणी करून ती सुसज्ज करावी. तसेच संशय रुग्ण आढळला, तर त्याला विलगीकरन करावे. तसेच त्यांच्यासाठी ने आण करण्याची सुविधा करावी. तसेच त्या रुग्णांचे नमुने कार्य प्रयोगशाळेत पाठवावे. या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच देशभरात 36 प्रयोगशाळा आणि3तीन पीसीआर किटस तपासणीसाठी मान्यता देखील कोणत्या सरकारकडून देण्यात आलेली आहे.
हा आजार मंकी पॉक्स (Monkey Pox) नावाच्या व्हायरसमुळे होते त्याला स्मॉल बॉक्स कारणीभूत असलेल्या वायरसच्या जाती कुळातील आहे. हा आजार झाल्यावर रुग्णांच्या अंगावर काही चट्टे आणि पुरळ येतात. हा आजार प्राण्यांशी मानवाचा संपर्क आल्याने जास्त प्रमाणात पसरतो. आफ्रिका देशात या व्हायरसची खूप मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे. परंतु आफ्रिकामध्ये अनेक लोक येता करत असतात. त्यामुळे जागतिक आरोग्य म्हणून संघटनेने मंकी पॉक्स बाबत आणीबाणी घोषित केलेली आहे. आणि त्यानंतर आता भारतात देखील हा रुग्ण सापडला आहे. या आजारावर अजून कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. हा आजार प्राण्यांपासून होत असला, तरी माणसापासून दुसऱ्या माणसात पसरत आहे. त्यामुळे सगळ्यांना काळजी घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले आहे. तुम्हाला मंकीपॉक्सशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळली तर लवकरात लवकर तपासणी करून घ्या.
Weather Update | आठवडाभरापासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. आणि हा पाऊस आणि जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडताना दिसत आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड मध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. बुधवारी अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडला. परंतु गुरुवारी दिवसभर पाऊस थांबला असला, तरी सायंकाळच्या सुमारे पुन्हा एकदा पावसाने सर्वत्र थैमान घातलेले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. याबद्दलची माहिती हवामान खात्याने देखील वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्राने कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये थोडासा कमी असला, तरीही पावसाचे चित्र सर्वत्र पाहायला आपल्याला मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये जगबुडी नावाची एक नदी आहे. आणि या नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदीत खूप जास्त पाणी झालेले आहे. त्यांच्या अगदी मच्छी मार्केटमध्ये देखील पुराचे पाणी गेलेले आहे. परंतु आता या नदीची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने तेथील आजूबाजूच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी असले, तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
अनेक शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके काढण्यास आलेली आहे. परंतु पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे. सगळीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच नागपूर देखील पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणत जरी विरोधकांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खिजवण्याचा प्रयत्न केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा काळ महाराष्ट्रासाठी सर्वार्थाने वेगळा होता. पायाभूत सुविधांच्या अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस यांनी गती दिली. महत्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होऊ देता मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग असे अनेक प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी लीलया मार्गी लावले. मागील त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अशा योजना राबवून शेतीसाठी भरीव काम केले. उद्योग, शिक्षण, विदेशी गुंतवणूक, सिंचन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राने फडणवीस यांच्या कार्यकाळात मोठी प्रगती केली. विशेषतः विविध समाजाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी असेच होते. स्वतःची शैक्षणिक संस्था नाही, साखर कारखाना नाही, सूत गिरणी नाही, उद्योग नाही आणि म्हणूनच व्यक्तिगत हितसंबंध नाही. त्यामुळेच फडणवीस यांचे राजकारण नेहमीच राज्याच्या हिताचे आणि लोककल्याणकारी निर्णयांचे राहिले आहे.
मराठा समाजासाठी भरीव काम
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात आले आणि फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करून फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. ते आरक्षण कोर्टात देखील टिकले. मात्र महाविकास आघाडीच्या काळात या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आणि हे आरक्षण रद्द झाले. मात्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळवून दिले आणि त्यातून आतापर्यंत साडेचार हजार मराठा युवकांना नोकरी मिळाली आहे. सरकारी नोकरीच्या संधी कमी आहेत त्यामुळे मराठा समाजाला शेती आणि उद्योगाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करून देणे आवश्यक आहे,याची जाणीव फडणवीसना होती म्हणूनच त्यांनी मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणली. मराठा तरुणांना 77 कोटी 38 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले शिवाय 638 कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळवून दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेल्या मराठा समाजातील तरुणांची संख्या मोठी आहे.
सनदी सेवांमधील मराठा तरुणांचे प्रमाण वाढविण्यासाठी ….
शिक्षण क्षेत्रात मराठा समाज मागे राहू नये म्हणून राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून 649 लाभार्थ्यांना 13 कोटींचा व्याज परतावा मिळवून देण्यात फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. सनदी सेवांमध्ये मराठा समाजातील तरुणांचे प्रमाण वाढावे यासाठी सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेला फडणवीस यांनी गती दिली. याच योजनेतून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 51 विद्यार्थी यशस्वी झाले. यात 18 आयएएस, 18 आयपीएस, आठ आय आर एस तर 12 विद्यार्थी अन्य सेवांत आहेत. राज्य लोकसेवा आयोगात तीनशे चार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या योजनेत एकूण 2109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षेद्वारे 11400 विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये किमान कौशल्य प्रशिक्षणासाठी देण्यात आले आहेत तर सारथीतर्फे 35 हजार 726 विद्यार्थ्यांना किमान कौशल्याचे धडे देण्यात आले आहेत.
अन्य समाजांसाठीही भरीव योगदान
एकीकडे मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीच्या योजना साकारतानाच फडणवीस यांनी अन्य समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले. त्यांच्या काळात इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक शासकीय वस्तीग्रह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात एकूण 72 शासकीय वस्तीग्रहांमध्ये 7200 विद्यार्थ्यांच्या निवासासाठी 73 कोटी 81 लाख रुपयांच्या खर्चास फडणवीस यांच्या कार्यकाळातच मान्यता मिळाली. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहावरून पंच्याहत्तर करण्याचा निर्णय फडणवीस यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. फडणवीस यांच्या प्रयत्नातूनच शासनातर्फे ओबीसी विमुक्त जमाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील तीन लाख मॅट्रिकपूर्व आणि 90 लाख मॅट्रिक उत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
धनगर समाजासाठी 22 योजना
राज्यात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. आरक्षणासह या समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. काही विषय कायदेशीर प्रक्रियेत अडकलेले आहेत. मात्र त्यात अडकून न राहता धनगर समाजाच्या साठी विविध बावीस योजना फडणवीस यांच्या पुढाकारानेच सुरू करण्यात येत आहेत आणि त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुपालन हा धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यासाठी महाराष्ट्र शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.
विमुक्त जाती आणि भटक्या जातींसाठी ….
हक्काचा निवारा ही कोणत्याही समाजासाठी सर्वात मूलभूत गरज आहे. त्याचा साकल्याने विचार करताना फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी 25000 तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25000 घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतला यासाठी 600 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इतर मागासवर्गीय समाजातील घटकांसाठी येत्या तीन वर्षात मोदी आवास योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षात तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
दक्षिण महाराष्ट्रात लिंगायत समाज मोठ्या संख्येने राहतो. या समाजासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. या समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ तसेच राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
रचनात्मक कार्यावर भर
विविध समाजांसाठी स्थापन झालेल्या या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार, शिक्षण, उद्योग यासाठी मदत मिळते. त्यातूनच स्वावलंबी समाजाची निर्मिती होते आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचाही विकास होतो. सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्यापेक्षा रचनात्मक कार्य करण्यावर फडणवीस यांचा नेहमीच भर राहिला आहे. विविध समाजांसाठी महामंडळांची स्थापना करतानाच त्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे राहावे यासाठी फडणवीस प्रयत्नशील आहेत. म्हणूनच पायाभूत सुविधा, शेती, सिंचन अशा क्षेत्रात त्यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या योजना लोकप्रिय आणि दूरगामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. विविध समाजांसाठी स्थापन झालेली ही महामंडळ त्या त्या समाजांसाठी उद्धारक ठरतील, यासाठी फडणवीस प्रयत्न करतील यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद गेले तेव्हा ” अकेला देवेंद्र क्या करेगा” अशी चेष्टा सुप्रिया सुळे यांनी केली होती. पण हाच अकेला देवेंद्र फडणवीसांनी सर्व समाजांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसाठी पुढची पन्नास वर्ष उपयुक्त ठरेल असे काम केलं आहे.
Navratri 2024 | सध्या महाराष्ट्रात अनेक सण उत्सव चालू झालेले आहे. गणपती संपल्यानंतर मग आता सर्वत्र नवरात्रीचे धामधूम चालू झालेली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून नवरात्री या सणाला सुरुवात होते. त्यामुळे यावर्षी ही शारदीय नवरात्र गुरुवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. हिंदू धर्मानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यावेळी तिच्या जागर केला जातो.
हिंदू पुराणानुसार असे मानले जाते की, नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर निवास करत असते. आणि तिच्या भक्तांचे रक्षण करत असते. त्यामुळे नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप पवित्र असतात. अनेक लोक या नऊ दिवसांमध्ये कडक उपवास करतात. असे म्हणतात की, दुर्गा माता पृथ्वीवर असल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असते. परंतु जरी तुम्हाला उपवास करणे, शक्य नसेल तर या नऊ दिवसांमध्ये काही गोष्टी करणे टाळा. तसेच कोणत्या गोष्टी केल्याने काही गोष्टी केल्याने नवरात्रीच्या उपासनेचे तुम्हाला फळ मिळते. हे आज आपण जाणून घेऊया.
नवरात्र कधीपासून सुरू होत आहे ? | Navratri 2024
पंचांगानुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीला नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षीही तिथे 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. ही तिथी 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 12:19 पासून सुरु होईल. तर दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजून 58 पर्यंत समाप्त होईल. 3 तारखेला सुरू झालेला, हा उत्सव शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
नवरात्रीत कोणत्या गोष्टी करायला पाहिजे.
दुर्गा मातेला लाल रंग खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल रंगाची फुले अर्पण करू शकतात. तसेच लाल रंगाचे कपडे देखील अर्पण करू शकता. लाल रंग हा समृद्धी नशीब आणि शक्ती तसेच प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करा आणि दुर्गा मातेला दररोज नवीन फुले फळे आणि मिठाई अर्पण करा.
नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गादेवीच्या मंत्राचा जप करू शकता. आणि ध्यान देखील करू शकता यामुळे तुमची मनशांती वाढेल एकाग्रता वाढते आणि तुमचे कुटुंब आनंदात राहते.
ज्या दिवसांमध्ये तुम्ही गरजूंना दान देऊ शकता. तसेच सेवा करू शकता. हे एक महत्त्वपूर्ण कृत्य मानले जाते. असे केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते.
शारदीय नवरात्रात या गोष्टी करू नये | Navratri 2024
नवरात्रीच्या या दिवसांमध्ये अखंड ज्योत पेटवणे खूप चांगले मानले जाते. जर तुम्ही अखंड ज्योत लावत असाल, तर घर कधीही रिकामी ठेवू नका. अखंड ज्योत विजू देऊ नका.
नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तुम्ही तामसिक अन्न तसेच मद्याचे सेवन करू नका.
या दिवसांमध्ये तुम्ही नकारात्मकते पासून दूर राहा आणि चांगले विचारांचा स्वीकार करा. कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका भांडण करू नका.
नवरात्रीची पूजा करताना शिस्त खूप महत्त्वाची आहे. नवरात्रीच्या काळात तुम्ही वेळेवर उठणे देवीची भक्ती भावाने पूजा करणे खूप गरजेचे आहे. असे केल्याने तुम्हाला नक्कीच देवीचा आशीर्वाद लाभेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला सर्वात जास्त आणि विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गा स्वतः धरतीवर 9 रूपात अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतात. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरांना अवश्य भेट देतात. तुम्ही देखील या नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या मंदिरांना भेट देण्यासाठी इच्छुक असाल तर या मंदिरात जाणे कधीच चुकवू नका. कारण प्रत्येक मंदिराची आहे वेगळी पौराणिक कथा.
माता वैष्णो देवी मंदिर
नवरात्रीच्या काळात माता दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक वैष्णोदेवी मंदिरात दररोज येत असतात. या मंदिराची उंची जमिनीपासून 5200 फूट आहे. वैष्णोदेवीचे मंदिर हे हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. श्रद्धेनुसार, जो कोणी वैष्णो देवीचे दर्शन घेतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
मनसा देवी मंदिर
उत्तराखंडमध्ये असलेले मनसा देवी मंदिर मातेच्या भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराला देखील हिंदू धर्मात सर्वात जास्त मान्यता आहे. या मंदिरात जो भाविक मनसा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतो त्याच्या सर्व इच्छा देवी पूर्ण करते असे म्हटले जाते. हे मंदिर हरिद्वारपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवालिक टेकडीच्या बिलवा पर्वतावर बांधले गेले आहे. याठिकाणी मनसा देवीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी असते.
नैनीताल मंदिर
उत्तराखंड येथील नैनी तलावाच्या काठावर बांधलेले नैना देवीचे मंदिर भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की, देवी सतीचे डोळे ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात येऊन जो कोणी नैनीताल देवीचे दर्शन घेतो त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदते. यामुळे हजारो भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.
चामुंडा देवी मंदिर
हिमाचल प्रदेशात स्थित असलेले चामुंडा देवीचे मंदिरही माता दुर्गेच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. चामुंडा देवी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. असे मानले जाते की, मंदिराच्या आत एक तलाव आहे ज्यामध्ये स्नान केल्याने लोकांची सर्व पापे धुवून जातात. चामुंडा देवी मंदिर मुख्यतः देवी कालीला समर्पित आहे. या मंदिराला हिंदू धर्मात विशेष मान्यता आहे.
कामाख्या मंदिर
आसामची राजधानी गुवाहाटी येथील नीलाचल टेकडीच्या मध्यभागी कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामाख्या देवीचे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये स्त्रीच्या योनीची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये देवीचे मासिक पाळीचे कपडे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात. या कारणामुळेच हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये पुरुषांसह महिला जास्त प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.