Thursday, December 25, 2025
Home Blog Page 446

उत्पन्नवाढीसाठी ST चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

ST mahamandal

राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही लालपरी म्हणजे परिवहन महामंडळाची एस.टी. आपले काम चोख बजावत आहे. राज्यातल्या दुर्गम भागात इतर वाहनांपेक्षा एसटी ने प्रवास केला जातो. मात्र मागच्या काही वर्षांपासून प्रवाशांनी एसटी कडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. एस टी चे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आता एसटीच्या प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्ट पेक्षा वाढीव उत्पन्नांपैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समसमान वाटण्यात येणार आहे. ही भत्याची रक्कम चालक वाहकांना त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्यात 16 कोटींचे उत्पन्न

राज्यभरातल्या ज्या आगारांमध्ये तोटा निदर्शनास येत आहे अशा आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी चालक आणि तांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळांना ऑगस्ट 2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा मिळवलाय उत्पन्न वाढीतील सातत्यासाठी चालक-पाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्याची कामगिरी चांगली व्हावी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता

प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तन, अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गांचा वापर केल्यास संबंधित चालक वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाहीत असेही महामंडळाने स्पष्ट करा त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक वाहकांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याचा महामंडळाचा मानस आहे.

मुंबईत विकसित होणार मरीना आणि कल्चरल प्लाझा ; MMRDA कडून सुधारित आराखडा तयार

mumbai marina

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एमएमआरडीए प्राधिकरणाची 158 वी बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे.

समुद्रात भराव करण्यात येणार

सुधारित आराखडा नुसार या भागातील विधान भवनाच्या विस्तार प्रकल्पासह नरिमन पॉईंट ते जगन्नाथ भोसले मार्ग अशा नवीन मार्गाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे त्याचबरोबर नरिमन पॉईंट ते कल्चरल क्लास मरीन प्रकल्पासह विविध सांस्कृतिक सोयी सुविधांचा ही विकास केला जाणार असून त्यासाठी समुद्रात भराव करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बॅकबे रिक्लेमेशन योजनेच्या भागात सुरू असलेल्या सरकारी आणि खाजगी संस्थांच्या प्रकल्पाच्या म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांच्या अनुषंगाने यापूर्वी आराखड्यात बदल करण्यात आला. तसेच हा मसुदा निवासी आणि व्यावसायिक अशा भागात विभागण्यात आला आहे. समुद्रकिनारी आणि खारफुटी सारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. असं मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले .

नरिमन पॉईंट जवळून जगन्नाथ भोसले मार्ग यांना जोडणी देण्यासाठी नवीन रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुटसुटीत होणार आहे.यापूर्वी या भागात सागरी सेतू उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र मच्छीमारांच्या विरोधानंतर त्यामध्ये बदल करून आता कोस्टल रोड उभारण्याचे निश्चित करण्यात आले. आता हा सुधारित प्रारूप आराखडा नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. असंही MMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

काय असतील सुविधा ?

  • मच्छीमारांच्या बोटी साठी पार्किंगची सुविधा
  • विशिष्ट थीमवर आधारित समुद्रात कारंजाची निर्मिती.
  • रेस्टॉरंट आणि अन्य सुविधांची निर्मिती.
  • आयकॉनिक शिल्पांची निर्मितीने समुद्र तटावर बसण्यासाठी पायऱ्यांची सुविधा.
  • अंडरवॉटर ओशियारीयम निर्मिती
  • कल्चरल प्लाझा जवळ पॉईंटची उभारणी.

या असतील नव्या सुविधा

खाद्यपदार्थांचे स्टॉल, फिशरमेन कॉलनी पार्क, सार्वजनिक जिम, पब्लिक स्पेस, पेट पार्क, नाना नानी पार्क, सेंड कॅसल्स उभारणी, नरिमन पॉईंट इथं मरीना प्रकल्पात बोटी आणि लोकांसाठी खास बंदराची निर्मिती आणि कल्चरल प्लाझाची उभारणे या सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत.

Sanjay Raut Jail : संजय राऊतांना पुन्हा तुरुंगवास!! या प्रकरणी कोर्टाची कारवाई

Sanjay Raut Jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले असून त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार आहे. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर हि सुनावणी सोमय्या यांच्या पत्नीने जिंकली आणि संजय राऊतांना कोर्टाने शिक्षा ठोठावली.

मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता. मेधा सोमयय्या यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या निकालाची सुनावणी आज पार पडली असता न्यायालयाने संजय राऊत हे याप्रकरणी दोषी असल्याचा निकाल दिला. कोर्टाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोर्टाच्या या निकालानंतर मेधा सोमय्या यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एक सामान्य गृहिणी कशी लढते, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला, असे वाटते. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे कारण अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.

Adam Gilchrist : ‘तो’ कॅच सुटला अन निवृत्ती जाहीर केली; गिलख्रिस्टचा मोठा खुलासा

Adam Gilchrist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) ,…. ऑस्ट्रलियन संघाचा महान विकेटकिपर बॅट्समन … आणि तेवढाच आक्रमक फलंदाज… विकेटकिपिंग कशी करावी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲडम गिलख्रिस्ट… आत्तापर्यंत विकेटच्या पाठीमागे तब्बल ६०० च्या आसपास शिकार केलेल्या ॲडम गिलख्रिस्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली. मात्र एक सोप्पा कॅच सुटल्यामुळेच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याचा खुलासा गिलख्रिस्टने केला आहे. 2008 मध्ये भारताविरुद्धच्या ॲडलेड कसोटीच्या मध्यावर गिलख्रिस्टने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र अचानक निवृत्तीमागचं कारण त्याने आता सांगितलं आहे.

क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना मी व्हीव्हीएस लक्ष्मणचा सोप्पा झेल सोडला आणि तेव्हाच माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आम्हाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी जाताना कदाचित ९९ कसोटी सामने माझ्या नावावर असत्या. आणि मी १०० कसोटी खेळणारा खेळाडू सुद्धा बनू शकलो असतो. मात्र त्याच दरम्यान मी व्हीव्हीएस लक्ष्मणचा झेल सोडला. तो एक सोपा झेल होता. चेंडू जमिनीवर आदळला. यानंतर माझा सुटलेला झेल मैदानावरील स्क्रिन वर तब्बल 32 वेळा दाखवला गेला.

गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, यानंतर मी मॅथ्यू हेडनकडे गेलो आणि त्याला म्हणालो माझी वेळ संपली आहे. हातातील ग्लोव्जला लागलेल्या चेंडूपासून गवतावर पडलेल्या चेंडूपर्यंत, एका क्षणात मला कळले की आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. त्यावेळी मॅथ्यू हेडनकडे मला खूप समजवले. इतका कठोर निर्णय लगेच घेऊ नको असं हेडन सातत्याने मला सांगत होता, मात्र मी त्याच काहीही ऐकलं नाही आणि निवृत्ती जाहीर केली असं ॲडम गिलख्रिस्टने सांगितलं.

खुशखबर ! कोल्हापूरातून केवळ दीड तासात गाठता येणार अहमदाबाद

kolhapur news

कोल्हापूरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरातून थेट गुजरात गाठता येणार आहे. कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवा येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरहून गुजरातला जाणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

व्यापाऱ्यांना होणार फायदा

ही सुविधा आठवड्यातील चार दिवस म्हणजेच सोमवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी असणार आहे. याबाबत माहिती देताना महाडिक म्हणाले की, कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी जात असतात. त्यामुळे कोल्हापूर वरून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.

50 आसनक्षमतेचे विमान घेणार उड्डाण

कोल्हापुरातून तिरुपती विमान सेवा सुरू झाल्यानंतर नागपूर आणि गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी पूर्ण होणार असून कोल्हापुरातून अहमदाबाद या मार्गावर स्टार एअरलाईन कंपनीचे 50 आसनक्षमतेचे विमान उड्डाण करणार आहे. या सेवेमुळे गुजरात सह राजस्थान आणि उत्तर भारताशी कोल्हापूर हवाई सेवेन जोडले जाणार आहे अशी माहिती महाडिक यांनी दिली.

दरम्यान सध्या कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर -बंगळूर, कोल्हापूर- हैदराबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरुपती या मार्गावर विमान सेवा सुरू केल्या आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. त्यानंतर आता कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा अंतिम होण्याच्या टप्प्यात आहे लवकरच ही विमान सेवा सुद्धा सुरू होईल

काय असेल वेळापत्रक

कोल्हापूरहून सकाळी 11 वाजता विमान अहमदाबाद साठी उड्डाण करणार आहे. तर बारा वाजून वीस मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचणार आहे. तसंच अहमदाबाद वरून बारा वाजून 45 मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि दोन वाजून पाच मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल, त्यासाठी तिकिटाचे बुकिंग सुरू असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे

देशात परवडणाऱ्या घरांच्या यादीत पुण्याला अव्वल स्थान ; काय सांगतो हौसिंग रिपोर्ट

real estate pune

मागच्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथा पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रॉपर्टीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं की घरांची किंमत ही कोटींच्या दारात जाऊन पोहोचली आहे. अशातच पुण्यासाठी एक दिलासादायक अहवाल आता समोर आला आहे. सीआरइ मॅट्रिक्स आणि क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर 2024 आला असून यामध्ये पुणे शहर हे संपूर्ण देशामध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे चला जाणून घेऊया या अहवालाबद्दल अधिक माहिती

मागच्या सहा महिन्यातली आकडेवारी पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर 2024 मध्ये समोर आली असून पुण्यात विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही 71 लाख रुपये इतकी ठरली आहे. तुम्हाला ही रक्कम जास्त वाटत असली तरी देशातल्या मोठमोठ्या शहरांच्या यादीतील परवडणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये ही किंमत सर्वात कमी आहे. म्हणजेच पुणे हे परवडणाऱ्या घरांच्या यादीमध्ये देशात अव्वल ठरले आहे.

वार्षिक 16 टक्के वाढ

अहवालात दिलेल्या माहितीनुसार यावर्षीच्या पहिल्या सहामाही मध्ये पुण्यात 31 हजार कोटी रुपये मूल्याची चाळीस हजार घरांची विक्री झाली आहे यानुसार एकूण घरांच्या विक्री मूल्यांमध्ये वार्षिक 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एवढेच नाही तर ग्राहकांनी मोठ्या आकाराचे घर घेण्याला अधिक पसंती दिल्याचे देखील या अहवालातून समोर आले आहे. पुण्यामध्ये 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा पहिल्या सामाईक घरांची विक्री हे 36 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार इतर शहरांच्या तुलनेत पुणे आज देखील परवडणारे शहर आहे.

पुण्यातील या भागात सर्वाधिक घरांची विक्री

  • अहवालानुसार महाळुंगे, पाषाण, हिंजवडी, बाणेर, ताथवडे आणि वाकड यामध्ये पुण्यातील एकूण घरांच्या विक्रीच्या 60 टक्के घरांची विक्री झाली आहे.
  • कोथरूड बावधन वारजे आणि आंबेगाव या भागांमध्ये 2020 च्या तुलनेनुसार बघितलं तर 2024 च्या पहिल्या सामायिक घरांच्या किमतीमध्ये तब्बल 44 टक्के वाढ झाली आहे.
  • शहरातील रोजगाराच्या स्थितीमध्ये मागच्या पाच वर्षांपासून आठ टक्के वाढ झाली असल्यामुळे घरासोबतच ऑफिसेस साठी आवश्यक असलेलया जागा आणि वेअर हाऊस इत्यादींच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली असून पुढेही भाव वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune Police Vacancy 2024 | पुणे पोलीस अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Pune Police Vacancy 2024

Pune Police Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुणे पोलीस अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत सफाईगार गट क पूर्णवेळ, सफाईगार गट ड अर्धवेळ, कार्यालय प्रमुख आचारीसहाय्यक आचारी, भोजन सेवक इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 152 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अजून तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 3 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

पदाचे नाव | Pune Police Vacancy 2024

पुणे पोलीस अंतर्गत सफाईगार गट क पूर्णवेळ, सफाई गार गट क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी सहाय्यक आचारी, भोजन सेवक इत्यादी पदांचा रिक्त जागा आहेत.

रिक्त पदांची संख्या

  • या भरती अंतर्गत एकूण 152 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये
  • सफाई गारगट क पूर्णवेळ – 30 जागा
  • सफाईगार गट क अर्धवेळ – 72 जागा
  • कार्यालयीन शिपाई – 33 जागा
  • मुख्य आचारी – 1 जागा
  • सहाय्यक आचारी – 7 जागा
  • भोजन सेवक – 9 जागा

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुण्यामध्ये नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरती अंतर्गत अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

3 ऑक्टोबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ? | Pune Police Vacancy 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा.
  • अर्जासोबत सगळे आवश्यक कागदपत्र जोडा.
  • तीन ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; नव्या महामार्गाच्या अहवालाला मान्यता

mumbai news

राज्यभरामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत असून प्रामुख्याने मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यापासून ते अगदी उपनगरांपासून मुख्य शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंतच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची नवी मुंबई आणि मुंबईला थेट जोडणी करण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. मंगळवारी एमएमआरडीए च्या 158 व्या प्राधिकरण बैठकीमध्ये राज्य सरकारने बदलापूर ते विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाच्या प्राथमिक आखणी अहवालाला मान्यता दिली आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…

केवळ 20 मिनिटात मुंबई

बदलापूर नवी मुंबई विमानतळ प्रवास अति वेगवान आणि सुकर होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बदलापूर नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा प्रवेश नियंत्रण मार्ग म्हणजेच एक्सेस कंट्रोल रोड या नव्या प्रकल्पाची योजना आखली आहे. यासाठी 10.83 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर बदलापूर नवी मुंबई अंतर हे केवळ 20 मिनिटात पार करता येणार आहेत. म्हणजे या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या शहरांमधून मुंबईत येण्यास लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात 60 मिनिटांची म्हणजेच एक तासाचे तर नवी मुंबई पर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत अर्धा तासाचे म्हणजेच 30 मिनिटांची बचत होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एनएआयएन शी कनेक्टिव्हिटी करून देईल. तसंच ठाणे आणि जवळपासच्या मार्गावरील वाहतूक कोंडी देखील यामुळे कमी होणार आहे.

कसा असेल मार्ग

बदलापूर नवी मुंबई हा प्रस्तावित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे मुंबई -बदलापूर आणि विरार- अलिबाग असा प्रवासही या मार्गामुळे करता येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येणार आहे प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर पाच वर्षात पूर्ण करण्याचा एमएमआरडीए चे नियोजन आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  • हा मार्ग आठ लेनचा असेल शिवाय मार्गीका विभाजित असतील आणि सर्विसरोडही असतील.
  • या मार्गावर 80 किलोमीटर प्रति तासाचा वेग कायम ठेवता येणार आहे
  • प्रमुख मार्गांशी जोडण्यासाठी मोठ्या इंटरचेंजचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात मुंबई-वडोदरा स्पर, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोड यांचा समावेश आहे.

SBI SO Recruitment 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1511 जागांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SO Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँके अंतर्गत दरवर्षी अनेक पदे भरली जातात. यावर्षी एसबीआयने तब्बल 1511 जागांसाठी जाहिरात काढलेली आहे. त्यामुळे इच्छुकानी पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज करा. 4 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

पदाचे नाव आणि पदसंख्या | SBI SO Recruitment 2024

  • डेप्युटी मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी – 187 जागा
  • डेप्युटी मॅनेजर इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाऊड ऑपरेशन – 412 जागा
  • डेप्युटी मॅनेजर नेटवर्किंग ऑपरेशन्स – 80 जागा
  • डेप्युटी मॅनेजर आयटी आर्किटेक – 27 जागा
  • डेप्युटी मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी -7 जागा
  • असिस्टंट मॅनेजर – 798 जागा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे.

नोकरीच्या ठिकाणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क | SBI SO Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये फी आहे, तर इतर उमेदवारांना फी नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

PM मोदींचा मोठा विजय; जपान- रशियाला मागे टाकत भारत बनला आशियातील तिसरी महासत्ता

India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता भारत हा आशिया खंडात तिसरी महासत्ता बनलेला आहे. नुकताच एक अहवाल जाहीर झालेला आहे. आणि या अहवालात तसे सांगितले आहे की, ऑस्ट्रेलियन जाहीर केलेले एशिया पॉवर इंडेक्सच्या या क्रमवारीत भारत आता महत्त्वाच्या स्थानावर पोहोचलेला आहे. यानुसार अमेरिका आणि चीननंतर भारत हा तिसरी महासत्ता बनलेला आहे. भारताने चक्क रशिया आणि जपान यांना देखील मागे टाकलेले आहे. आणि आता भारत तिसऱ्या स्थानावर आलेला आहे. सध्या भारताचा स्कोर हा 39.1 आहे, तर जपानचा स्कोर 38.1 एवढा आहे. त्यामुळे जपान आता चौथ्या स्थानावर गेलेला आहे. आणि भारताने आता या क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे. परंतु पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट आहे. आशियामध्ये सध्या अमेरिका आणि चीन यांची सगळ्यात मोठी सत्ता आहे. आणि भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहोचलेला असला, तरी भारताकडे आताही खूप मोठी संधी आहे.

सध्या आठ पैकी सहा शक्तींच्या पॅरामीटर्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे. पण भारताची स्थिती सध्या सुधारत आहे. परंतु आता भारताने हा एक चांगला विजय मिळवलेला आहे. भारताने या क्रमवारी तिसरे स्थान पटकावले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचे जे वर्चस्व वाढलेले आहे. त्याचे सर्व श्रेय त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहे. नरेंद्र मोदी यांचा दूर दृष्टीकोण तसेच राजकीय रणनीती या सगळ्यामुळे एक भारताला हे स्थान मिळालेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच भारत हा राजनैतिक स्थितीत मजबूत करत आहे. अशी माहिती देखील एका अहवालातून समोर आलेली.

ऑस्ट्रेलिया थिंक टॅंक यांनी एक अहवाल सादर केलेला आहे. यानुसार त्यांनी असे म्हटले आहे की, भारताचे सामर्थ्य हे सध्या त्यांची लोकसंख्या आणि त्यांची अर्थव्यवस्था ही खूप वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे ते या क्रमवारी तिसरे स्थान पटकावू शकले आहे. भारताची आर्थिक क्षमता ही 4.2 अंकांनी वाढलेली आहे. भारतातील तरुणांची लोकसंख्या ही येत्या दशकामध्ये भारताला खूप पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि आर्थिक दृष्ट्या भारत आणखी मजबूत होईल असे देखील सांगण्यात आलेले आहे.

भारत आशियातील खास देश

सध्या आशियातील सत्ता जरी अमेरिका आणि चीन या देशांकडे असली, तरी आता भारत हा देखील आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश बनलेला आहे. असे अहवालात म्हटलेले आहे. भारत देखील त्यांच्या आर्थिक सामर्थ्य हळूहळू वाढवत आहे. लष्करी सामर्थ्य वाढवत. आहे आणि त्यांच्या राजनीती देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भविष्यात जाऊन भारत हा नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. असे देखील या अहवाला सांगितलेले आहे. परंतु पाकिस्तान देशाची स्थिती खूपच कमी झालेली आहे. या यादीत पाकिस्तानचा 14. 4 या क्रमांकासह 16 व्या स्थानावर गेलेला आहे.

भारताला हे एक चांगले स्थान मिळाल्यामुळे आता भारत आणखीन प्रगती करेन आणि देशाला एका नवीन दिशेने पुढे नेण्याची प्रयत्न करेल असे सांगण्यात आलेले आहे. भारतामध्ये झालेला हा बदल केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण आशिया खंडासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.