Thursday, December 25, 2025
Home Blog Page 447

Vivo V40e Launched : 8GB रॅम, 50 MP कॅमेरासह Vivo V40e ची बाजारात एंट्री; किंमत किती पहा?

Vivo V40e Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवो कंपनीने भारतीय बाजारात Vivo V40e नावाचा नवा स्मार्टफोन लाँच (Vivo V40e Launched) केला आहे. 8GB रॅम, 50 MP कॅमेरासह विवोच्या या मोबाईल मध्ये अनेक भन्नाट फिचर देण्यात आली आहेत. या मोबाईलची किंमतही बजेट मध्ये आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून ते फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल. आज आपण विवोच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन, कलर आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.77-इंच डिस्प्ले –

Vivo V40e मध्ये 120 Hz चा रिफ्रेश रेटसह 6.77-इंचाचा फुल HD प्लस 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,080 x 2,392 पिक्सेल रिझोल्यूशन आणि HDR10 Plus सपोर्ट मिळतो. खास बाब म्हणजे या डिस्प्लेला वेट टच फीचर देण्यात आलं आहे, म्हणजेच काय तर ओल्या हातांनी सुद्धा तुम्ही मोबाईल अगदी व्यवस्थित हॅन्डल करू शकता. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimension 7300 प्रोसेसर बसवला असून विवोचा हा मोबाईल Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. मोबाईलला IP64 रेटिंग मिळाले आहे, म्हजेच धुळ आणि पाण्यापासून कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Vivo V40e Launched

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V40e मध्ये पाठीमागील बाजूला ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 MP चा मुख्य कॅमेरा आणि 8 MP चाअल्ट्रा-वाइड कॅमेरा उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोर 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळतोय. या दोन्ही कॅमेराच्या माध्यमातून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल असा दावा केला जात आहे. स्मार्टफोन मध्ये 5,500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W च्या वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Vivo V40e ची च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ कलर पर्यायांमध्ये लाँच (Vivo V40e Launched) करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि विवो इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल. या मोबाईल खरेदीवर HDFC आणि SBI कार्ड वापरकर्त्यांना 10 टक्के झटपट सूट देखील दिली जाईल.

केवळ 22 मिनिटांत गाठता येणार आरे ते बीकेसी ; लवकरच सुरु होणार मुंबई अंडरग्राउंड मेट्रो

mumbai metro

मुंबईत वाहतुकीची समस्या मोठी आहे. मुंबईकर हे वाहतुकीसाठी लोकल आणि ‘बेस्ट’ चा वापर करतात मात्र अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर असून लवकरच मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो सुद्धा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो -३ कॉरिडोरची सेवा सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पहिल्या फेज साठी रोलिंग स्टॉक साठी मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर स्टेशनसाठी सीएमआरएस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच आता मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरे ते बीकेसी या मेट्रोच्या मार्गावरच्या सगळ्या स्थानकांचे काम पूर्ण झालं असून पहिल्या फेजमध्ये १२.४४ किलोमीटरच्या मार्गावर रोज मेट्रोच्या 96 फेऱ्यांचा नियोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

दर साडेसहा मिनिटाला एक मेट्रो

महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक मार्गावर साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्गावर व्यवस्थित सेवा सुरू झाल्यानंतर सहा मिनिटांचा कालावधी तीन मिनिटांवर आणण्यात येणार आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या फेजमध्ये प्रवास करण्यासाठी दहा ते पन्नास रुपये इतका खर्च होणार आहे तर मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर जर प्रवास करायचा असेल तर 70 रुपये इतका खर्च येईल. मेट्रोची ही संपूर्ण सेवा 2025 पर्यंत सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही भिडे यांनी सांगितलं.

पावसातही मेट्रोपर्यंत पाणी येणार नाही

मुंबईत जराजरी पाऊस पडला तरी वाहतुकीची दणादान होते. रस्त्यांवर पाणी साचते तर लोकलची सेवा सुद्धा पावसामुळे ठप्प होते. मात्र अंडरग्राउंड मेट्रोच्या बाबतीत असं होणार नाही असं भिडे यांनी सांगितला आहे. गेल्या 100 वर्षातील पावसाचा अभ्यास करून मेट्रो तीनचे काम करण्यात आले आहे. अभ्यासानुसार पाणी बाहेर पडण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतो पण मेट्रो पर्यंत पावसाचे पाणी येणार नाही मेट्रो तीन कॉरिडोर शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. ही संपूर्ण लाईन सुरु झाल्यामुळे रस्त्यावरील साधारणपणे साडेसहा लाख वाहनांचा भार कमी होणाऱ्या मेट्रोवन आणि मेट्रो सेवन कनेक्ट झाल्यामुळे इतर मार्गावरील प्रवाशांना प्रवास करणं सोयीच होईल असं भिडे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड; भाजपची कबुली

Ladki Bahin Yojana Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला खुश करण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आल्याचा आरोप एकीकडे विरोधक करत असताना आता खुद्द भाजप आमदाराने सुद्धा असच काहीसे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे आम्ही मतांसाठी केलेला जुगाड आहे असं भाजपचे आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) यांनी म्हंटल आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबतचा व्हिडिओ सुद्धा ट्विटर हॅन्डल वर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओत?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना टेकचंद सावरकर म्हणाले, आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली? इमानदारीने सांगा कशासाठी केलं? अंत:करणाने सांगा बरं हे का केलं? कारण जेव्हा तुमच्या घरासमोर निवडणुकीची मतदानाची पेटी येईल. तेव्हा माझ्या या लाडक्या बहीणी कमळाला मत देतील, यासाठी तर हा जुगाड केला आपण,” असं आमदार सावरकर भाषणात म्हणतात. तसेच पुढे बोलताना, “इतर लोक खोटं बोलत असतील पण मी खरं बोलतोय. माझं म्हणणं खरं आहे का नाही सांगा?” नाहीतर लायचं एक आणि करायचं एक असे प्रकार करायला आम्ही काय रामदेव बाबाचे कार्यकर्ते आहोत का? असा सवालही टेकचंद सावरकर यांनी केला. हाच विडिओ वडेट्टीवार यांनी शेअर करत महायुती सरकारवर घणाघात केला आहे.

अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या डोक्यात होतं तेच या आमदाराच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; समाजाला केलं ‘हे’ आवाहन

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आज आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस होता, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती, अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एकाही नेत्याच्या सभेला, प्रचाराला जाऊ नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माता माऊली आणि माझे बांधव यांनी मला विनंती केली, सलाइन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी उपोषणाला जे बसले आहेत त्यांनीही उपोषण सोडा . मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आाहे. मला 10- 12 दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू.

आरक्षण मिळवल्याशिवाय (Maratha Aarakshan) आपण शांत बसायचं नाही. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, त्यांचा शेवट आम्हीच करणार असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकार मला बदमान करू शकते पण ते मला मॅनेज करू शकत नाहीत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राहूद्या, आपण आपले लोक सत्तेत पाठवू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा करताच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठीची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रात सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला ; कुठे घडली घटना ?

देशभरात रेल्वे अपघातांच्या अनेक घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातूनही आणखी एक बातमी समोर येते आहे. रेल्वेच्या रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता मात्र सुदैवाने अपघात टळला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लाडगाव- करमाड या भागात घटना घडली.

नक्की काय झाले?

ठरलेल्या वेळाप्रमाणे नंदिग्राम एक्सप्रेस रात्री संभाजीनगर येथून जालन्याकडे रवाना झाली. ही एक्सप्रेस रात्री एक वाजता लाडगाव- करमाळा या भागातील उड्डाण पुलाखालून जात असताना चालकाला रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेल्वेचा स्पीड देखील 100 किलोमीटर प्रतितास असल्यामुळे ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडवलं यावेळी जोरदार आवाज झाल्यामुळे प्रवाशांच्या मध्ये घबराहट निर्माण झाली.
त्यानंतर दगड ठेवलेल्या जागेपासून 200 मीटर वर जाऊन ही रेल्वे थांबली. धडकेमुळे रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला सिमेंटच्या दगडांचे तुकडे पडले होते याबाबत नियंत्रण कशाला माहिती दिल्यानंतर रेल्वे पुढे रवाना झाली.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, एसडीपीओ विष्णू भोई यांच्यासह करमण पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर कैलास दास यांनी दिलेल्या फिर्यादीवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास केला जात आहे.

Akshay Shinde Encounter : हा एन्काऊंटर होऊच शकत नाही; कोर्टाने पोलिसांना झापलं

Akshay Shinde Encounter Bombay high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात (Akshay Shinde Encounter) उच्च न्यायालयाने पोलिसाना चांगलंच झापलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या डोक्यात का गोळी घातली? पोलीस डोक्यात गोळी घालतात कि पायावर? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही, एन्काऊंटर करण्याची हि व्याख्या नाही असं म्हणत कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. अक्षयच्या मृत्यूनंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली होती, त्यावर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान, मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि सरकारी वकिलांना फैलावर घेतलं आहे.

अक्षय शिंदेंच्या वडिलांनी कोर्टात एकामागून एक गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधला. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज फिरत आहेत. न्यायव्यवस्थेची मग गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला. भविष्यात निवडणुका असल्याने राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. एन्काऊंटरच्या दिवशी 3.30 ते 4 वाजेच्या दरम्यान अक्षयची त्याच्या कुटुंबासोबत संवाद साधला होता. त्यावेळी त्याने आई- वडिलांना ५०० रुपये मागितले. कँटिनमध्ये हवे ते खाण्याची सुविधा मिळावी म्हणून त्याने आईवडिलांकडून पैसे घेतले होते, असं वकील कटारनवरे यांनी कोर्टाला सांगितलं. त्याच्या देहबोलीवरून तो पळून जाण्याचा विचार करत असल्याचे दिसून आले नाही अशी माहिती अक्षयचाय वकिलांनी दिली.

सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तुल फायर करू शकत नाही- Akshay Shinde Encounter

यानंतर मुंबई हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले. आरोपीवर नियंत्रण न मिळवता त्याच्यावर गोळी का चालवली? (Akshay Shinde Encounter) पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती? जरी गोळी मारायची होती तर पोलिसांनी डोक्यात गोळी का मारली? पायावर गोळी मारतात का डोक्यात मारतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. त्यावर पोलिसांनी कोर्टात सांगितलं कि आम्ही स्व संरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केला. यावर कोर्टाने पुन्हा विचारणा केली कि आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्वर कशामधून गोळी मारली? त्यावर सरकारी वकिलांनी जे उत्तर दिले ते आपल्याला पटत नसल्याचे कोर्टाने म्हंटल. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तुल फायर करू शकत नाही, सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही. तुम्ही कधी ते चालवलंय का? असे न्यायालयाने यावेळी म्हटले. तसेच जखमी पोलीस अधिकाऱ्याचे मेडीकल सर्टिफिकेट सादर करा अशी मागणीही कोर्टाने केली.

Exim Bank Bharti 2024 | एक्झिम बँकेअंतर्गत नोकरीची मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Exim Bank Bharti 2024

Exim Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि चांगल्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. याचा अनेकांना फायदा होणार आहे. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. कारण बँकेतील नोकरीही त्यांना सुरक्षित वाटते, तर त्यांच्यासाठीच एक बँकेतील नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक्झिम बँकेअंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्रशासन व्यवसाय विकास अधिकारी, अनुप पालन कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि इतर काही पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 88 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहेत. 24 सप्टेंबर 2024 पासून हे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Exim Bank Bharti 2024

एक्झिम बँकेच्या भरती अंतर्गत प्रशासन व्यवसाय विकास अधिकारी, अनुपालन कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स इत्यादी पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 88 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 600 रुपये एवढे शुल्क असणार आहे तसेच एससी एसटी आणि महिला उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

24 सप्टेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ? | Exim Bank Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 14 ऑक्टोबर 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारने ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानातून केला कांदा आयात; महाराष्ट्रात संतापाची लाट

Onion Import

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय बाजारामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा कांदा घेण्यासाठी परवडत नाही. आता याच कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आता अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर आणि जालींदर या शहरांमध्ये 11 ट्रक कांदा दाखल होणार आहे. सध्या कांद्याने भरलेले 45 ते 50 ट्रक हे बॉर्डरवर उभे आहेत. आणि येत्या दोन ते तीन दिवसात हे ट्रक भारतात येणार आहे. परंतु आता अफगाणिस्तानचा कांदा हा भारतात येणार आहे. त्यामुळे देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात संपाची दिसत आहे

भारतातील कांद्याचे बाजार भाव हे नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून 5 लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यातील कांदा हा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, भुवनेश्वर या देशांमध्ये 30 ते 35 रुपये किलो प्रमाणे विक्री सुरू करण्यात आलेली आहे. परंतु भारतात कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्याने आता परदेशातून गांधी आयात करण्याचा केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पंजाबमधील अमृतसर आणि जालिंदर या शहरांमध्ये 300 टनहून जास्त कांदा दाखल झालेला आहे आणि आणखीन कांदा दाखल होणार आहे. यासाठी भारतीय सीमेवर काही ट्रक देखील उभे राहिलेले आहे. परंतु याबाबत खांदा उत्पादकांचा मोठा संताप निर्माण झालेला आहे.

यावर निवृत्ती न्याहरकर अध्यक्ष शेतकरी व बचत गट कांदा उत्पादक असे म्हणाले की, “दोन रुपये मिळतील या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेला हा कांदा आता चाळीत साठविला आहे. ढगाळ वातावरण आहे तसेच पावसामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा खराब होत आहे. यामुळे कांद्याचे उत्पादनाचा खर्च हा 20 ते 30 रुपयांपर्यंत गेला. आज रोजी कुठेतरी पाच ते दहा रुपये किलो शेतकऱ्यांना नफा मिळत असताना, परदेशातून कांदा आयात करणे हे योग्य नाही. याचे परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही.” अशा प्रकारे संताप भारतातील कांदा उत्पादक संघटना करत आहेत.

त्याचप्रमाणे कांदा निर्यातदार प्रवीण कदम म्हणाले की, “काही दिवसापूर्वी नाफेडच्या माध्यमातून नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा हा बाजारात दाखल झालेला आहे. त्यामुळे आता थोड्याफार प्रमाणात बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न होता. परंतु आता केंद्र सरकारने 24 सप्टेंबर रोजी आपला कांदा असताना देखील दोन ट्रक कांदा अफगाणिस्ताना मधून पंजाबमध्ये जालिंदर येथे आयात केलेला आहे. आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.”

Kanyadan Yojana | सरकार करणार मुलींच्या लग्नाचा खर्च; जाणून घ्या नवी योजना आणि पात्रता

Kanyadan Yojana

Kanyadan Yojana | मुलगी झाल्यावर आई-वडिलांना खूप आनंद होतो. परंतु मुलीच्या जन्मासोबतच त्यांना तिच्या लग्नाची खूप जास्त काळजी लागलेली असते. त्यामुळे मुलीचे जन्मानंतरच पालक तिच्या लग्नासाठी काही ना काही रक्कम ठेवत असतात. अगदी लहान असल्यापासूनच लग्नासाठी येणारा खर्च आणि महागाईचा विचार करता, पालक त्यांच्या मुलींसाठी काही ना काही पूंजी जपून ठेवतात. परंतु आता राज्य सरकारने समाजातील नागरिकांची ही गोष्ट लक्षात ठेवून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. आपले सरकार हे समाजातील विविध घटकासाठी नवनवीन योजना आणत असतात. ज्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो आणि आता मुलींच्या लग्नासाठी देखील सरकारने एक नवीन योजना राबवलेली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेचे नाव कन्यादान योजना( Kanyadan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या लग्नासाठी सरकारमार्फत काही आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील लोकांना मुलीच्या लग्नासाठी मधील मदत व्हावी. आणि त्यांनी जास्त भार घेऊ नये. यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. लग्नासाठीचा खर्च कमी व्हावा. यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवलेली आहे. आता या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

कन्यादान योजना म्हणजे काय ? | Kanyadan Yojana

राज्य सरकारच्या या कन्यादान योजनेअंतर्गत नवीन लग्न झालेल्या जोडप्याला सरकारतर्फे 20 हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. मुलीच्या आई-वडिलांच्या नावाने ही मदत केली जाते. म्हणजेच तिच्या मुलीच्या आई वडील लग्नासाठी हे पैसे वापरू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत जर 20 हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या मुलाला आणि मुलीला सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न करावे लागतील. त्याचप्रमाणे सरकारी या योजनेमध्ये विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेला 4 हजार रुपये देखील देतात.

योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहे ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे वधू आणि वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे
  • तसेच नवरा किंवा नवरीपैकी एक जण हा अनुसूचित जाती जमातीचा असावा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी घराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे तर वधूचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
  • वधू आणि वरांच्या केवळ प्रथम विवाहसाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

Mumbai Water Supply | ‘या’ तारखेला मुंबईतील पाणीसाठा राहणार बंद; महानगरपालिकेने दिली सूचना

Mumbai Water Supply

Mumbai Water Supply |शहरांमध्ये पाणी येण्याची ठराविक वेळ ठरलेली असते. अनेक वेळा या लोकांना अत्यंत काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा लागतो. कारण कधी कधी पाणीपुरवठा हा बंद केला जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरेल असेच पाणी त्यांना वापरावे लागते. अशातच आता मुंबईमधील काही भागांमध्ये 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमधील करी रोड आणि त्या बाजूच्या परिसरात 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेने पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असे सांगितलेले आहे. तसेच त्या परिसरात नागरिकांना आजच पाण्याचा पुरेसा साठा करावा, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

पाणीपुरवठा बंद का होणार ? | Mumbai Water Supply

महानगरपालिकेच्या उत्तर विभागात सेनापती बापट रोडवर 1450 मिलिमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. आणि येथे 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. परंतु हे पाणी सगळ्या भागांमध्ये बंद राहणार नाही. तर काही भागांमध्ये बंद राहणार आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरवठा चांगल्या प्रमाणात करा आणि पाणी जपून काटकसरीने वापरा. अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

जी उत्तर
या भागातील सेनापती बापट रोड, वीर सावरकर रोड, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ रोड, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग या ठिकाणचा पाणीपुरवठा 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 33 टक्के बंद राहणार आहे.

जी दक्षिण | Mumbai Water Supply
यामध्ये सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव कालव मार्ग, लोवर डिझाईन मार्ग, बीडीडी चाळ यांचा पाणीपुरवठा 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4 : 3p ते पावणे 8 या वेळेत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे एन एम जोशी मार्ग, बी.डी चाळ यांचा पाणीपुरवठा दुपारी अडीच ते तीन दरम्यान बंद राहणार आहे. .

मुंबईमधील अनेक जलवाहिना दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी कपात केली जाणार आहे. परंतु दुसरीकडे पुण्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुण्यातील खडकवासला धरण या क्षेत्रातील जवळपास चार धरणे पूर्णपणे भरलेली आहेत. त्यामुळे पुण्यात पाण्याची कसलीही कमतरता भासणार नाही. तसेच पुढील चार दिवस देखील हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये पाणी क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये विसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्याला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे.