Friday, December 26, 2025
Home Blog Page 445

दुर्गा देवीची ही मंदिरे आहेत विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध; एकदा अवश्य भेट द्या

durga devi temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला देखील भेट देण्याची इच्छा होईल. (Famous Temples to Visit)

1) ज्वाला देवी मंदिर –

ज्वाला देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर डोंगर भागातमध्ये आहे. ज्वाला देवी तीर्थक्षेत्र 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. असे म्हणतात की, या देवीची जीभ अग्नीच्या ज्वालासारखी आहे. त्यामुळे तिला ज्वाला देवी असे म्हणतात. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक जगभरातून हिमाचल प्रदेशात जात असतात.

2) करणी माता मंदिर –

राजस्थानच्या बिकानेरपासून 30 किमी अंतरावर जोधपूर रोडवरील देशनोक गावाच्या हद्दीत करणी माता मंदिर आहे. हे मंदिर उंदीर मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात उंदरांची पूजा केली जाते. तुम्ही जर या मंदिराला भेट देण्यासाठी गेला तर तुम्हाला संपूर्ण मंदिरामध्ये उंदीर दिसून येतील. अनेक भक्त लोक तरी या मंदिरात फक्त उंदरांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.

3) दक्षिणेश्वर काली मंदिर

दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकातामधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम 1847 मध्ये करण्यात आले होते. हे मंदिर 25 एकरमध्ये परिसरात आहे. या मंदिरामध्ये दक्षिणेश्वर मातेची मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून जातात, दक्षिणेश्वर काली लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना आशीर्वाद देते अशी येथील लोकांची मान्यता आहे.

4) श्रीसंगी कालिका मंदिर

श्रीसंगी कालिका मंदिर देवी कलिलाला समर्पित मंदीर आहे. हे मंदीर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.येथे दुर्गा देवीच्या काळ्या रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद श्रीसंगी कालिका देवी देते, असा विश्वास स्थानिक व्यक्त करतात. त्यामुळे अनेक जण या मंदिराला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून जात असतात.

5) दंतेश्वरी मंदिर

दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. सुंदर लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप जुने आहे. असे म्हणतात की, याठिकाणी सतीचा दात पडला होता. त्यामुळे या परिसरात दंतेश्वरी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर त्याच्या कलाकृतीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे.

Navratri 2024 : तुम्हीसुद्धा नवरात्रीत उपवास करता? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; अजिबात थकवा जाणवणार नाही

Navratri 2024 । यावर्षी 3 ऑक्टोबर पासून या नवरात्रीच्या सणाला सुरुवात होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. जर तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर उपवास करत असाल तर या काळात तुम्हाला अशक्तपणा जाणवू नये म्हणून संपूर्ण नऊ दिवस आहाराची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी या उपवासाच्या दिवसात काय खावं की ज्यामुळे आपणास अशक्तपणा येणार नाही याबाबत जाणून घेऊया.

भरपूर फळे खा-

नवरात्री उपवासाच्या संपूर्ण ९ दिवस फळे खाण्यावर जोर द्या. तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात. जर तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक ठेवायचे असेल तर या काळात सफरचंद, केळी, संत्री यासारखी फळे खा. यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, काकडी यांसारख्या पदार्थांचेही सेवन करू शकता.

भरपूर पाणी प्या-

उपवासाच्या काळात शक्य होईल तेवढे जास्त पाणी पिण्यावर भर द्या. महत्वाचे म्हणजे या काळात आपले शरीर नेहमी हायड्रेटड राहिले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे कारण उपाशीपोटी डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते.

दुग्धजन्य पदार्थ-

नवरात्री उपवासाच्या काळात आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश करा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, पनीर, चीज, पांढरे लोणी, तूप, मलाई यासारखे पदार्थ खावेत. यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

ड्राय फ्रूटसचे सेवन करा-

नवरात्री उपवासाच्या काळात आपल्या शरीराला सतत एनर्जेटिक ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खा. ड्राय फ्रूटसचे सेवन केल्याने अशक्तपणा जाणवत नाही. तुम्ही तुमच्या आहारात मनुका, काजू, पिस्ता आणि बदाम यांसारखे ड्राय फ्रूट्स स्मूदी आणि शेकमध्ये मिक्स करून घेऊ शकता.

लिंबू पाणी प्या-

उपाशीपोटी लिंबू पाणी घेतल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे नवरात्री उपवासाच्या काळात लिंबू पाणी पिल्याने आपली प्रतिकारक शक्ती चांगली होते.

Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या

Navratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवरात्र उत्सव म्हणजे दुर्गा देवीच्या 9 अवतारांचा जागर होय. या 9 दिवसांच्या काळात दुर्गा देवी ची पुजा केली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांमध्ये तर नवरात्र उत्सव मोठया धुमधडाकात साजरी केला जातो. त्यामुळे नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपिठांवर प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रात महालक्ष्मी मंदिर, रेणुकादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सप्तशृंगीदेवी मंदिर म्हणजेच ही साडेतीन शक्तिपीठे  खूप प्रसिद्ध आहेत. या शक्तिपीठांमागे मोठा इतिहास आहे. तसेच त्यांना धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. आज आपण याचं शक्तीपिठांविषयी जाणून घेणार आहोत.

महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर हे पुराणातील 108 आणि महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक आहे. या मंदिराला कर्‍हाड येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे अशी मान्यता आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे आजवर सापडलेले नाहीत. मात्र असेही म्हणतात की, कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. त्यांना देवीचा वरप्रसाद देखील मिळाला होता. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून आजवर हे मंदिर त्याच ठिकाणी स्थित आहे. या मंदिरात देवीचे दर्शन हजारो भाविक येत असतात.

रेणुकादेवी मंदिर

साडेतीन पीठांपैकी एक देवता रेणुकादेवी मंदिर आहे. खरे तर, साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ आहे. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची रेणुकादेवी कुलदेवता आहे. रेणुका देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर नांदेड जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे. एकेकाळी परशुरामाला डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून माहूरला मातापूर म्हणले जात होते. असे म्हणतात कि, रेणुकादेवीसमोर मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे भाविक खूप लांबून दर्शन घेण्यासाठी येत असतात.

तुळजाभवानी मंदिर

तुळजाभवानी मंदिर देखील साडेतीन शक्तीपीठांमधील एक आहे. तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामीनी म्हणले जाते. तुळजाभवानी ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता होती. या मंदिराची स्थापना सतराव्या किंवा अठराव्या शतकात केली असावी अशी मान्यता आहे. मात्र याबाबत देखील कोणताही ठोस पुरावा नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुलदेवता म्हणून तुळजाभवानी देवीला मान दिला जातो. नवरात्र उत्सवाच्या मंदिरात मोठया उत्साहात आणि भक्ती भावाने देवीची आराधना केली जाते.

सप्तशृंगीदेवी मंदिर

सप्तशृंगीदेवीला साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे स्थान आहे. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप मानले जाते. पौराणिक कथेनुसार, शुंभनिशुंभ व महिषासुराचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. तसेच , सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे देखील आहेत, ज्यामुळे गडाचे नाव सप्तशृंगगड असे पडले. या गडावर दरवर्षी चैत्र महिन्यात यात्रा भरते. भाविक मोठया श्रद्धेने गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

Navratri 2024 | मध्यप्रदेशातील ‘या’ मंदिरात प्रत्येक इच्छा होते पूर्ण; नवरात्रीत भाविकांची असते तुफान गर्दी

Navratri 2024

Navratri 2024 | आपल्या भारतामध्ये सगळे सण उत्सव हे अत्यंत आनंदाने आणि तितक्याच भक्तिभावाने देखील साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे एक इतिहास आहे, एक श्रद्धा आहे. त्यामुळे भारतातील सगळे लोक हे खूप श्रद्धेने देवाची आराधना करतात. सध्या भारतामध्ये सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसत आहे. गणपती झाल्यानंतर आता नवरात्रीचा सण देखील येत आहे. नवरात्रीचा (Navratri 2024) सण हा खूप पवित्र असून मानला जातो. यामुळे यातील नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांचे यांना नऊ दिवसात पूजा केली जाते. असे म्हणतात की, या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर राहत असल्याने आपल्या भक्तांचे रक्षण करत असते. त्यामुळे सगळेजण दुर्गा मातेची खूप सेवा करतात, जागरण करतात. यावर्षी 3 ऑक्टोबर पासून या नवरात्रीच्या सणाला सुरुवात होत आहे.

नवरात्रीच्या (Navratri 2024) या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक हे मंदिरांमध्ये मोठी गर्दी करतात. देवीचे दर्शन घेण्यासाठी ते अनेक ठिकाणी जात असतात. आता मध्यप्रदेशमध्ये देवीची काही मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात येतात. आणि या देवी त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण करते. असे देखील मानले जाते. ही काही मंदिरे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे .परंतु इतर सगळ्या राज्यांमध्ये ही मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत. येथे 9 दिवसांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अनेक लोकांची या देवीवर खूप जास्त श्रद्धा आहे. तसेच या 9 दिवसांमध्ये पृथ्वीवर देवीचा वास असल्याने देवी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. म्हणून अनेक लोक यांना दिवसात वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. आता आपण मध्यप्रदेशातील या मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत.

मैहर धाम | Navratri 2024

मध्यप्रदेशातील मैहर जिल्ह्यात असलेले माँ शारदाचे मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात मैहर धाम या नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरावरील लोकांची श्रद्धा इतकी अतूट आहे की केवळ नवरात्रीच नव्हे तर सामान्य दिवशीही येथे दर्शनासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. येथे माता सतीचा हार पडला होता त्यामुळे याला ‘मैहर’ असे म्हणतात. चित्रकूटच्या डोंगरावर वसलेल्या या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. मैहर मातेच्या मंदिरात केलेल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते.

माँ पीतांबरा (पीतांबरा पीठ)

दतिया जिल्ह्यात ‘राज्यशक्तीची देवी’ म्हणून प्रसिद्ध असलेले पितांबराचे मंदिर आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधींपासून ते सध्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत लोक येथे दर्शनासाठी आले आहेत, यावरून मातेच्या चमत्काराचा अंदाज लावता येतो. या मंदिरात राजकीय पार्श्वभूमीचे लोक येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून गुप्त पूजा करतात, असे सांगितले जाते. नवरात्रीच्या काळात हजारो भाविक माँ पितांबराच्या दरबारात दर्शनासाठी पोहोचतात.

उज्जैनचे हरसिद्धी मंदिर (माँ हरसिद्धी धाम) | Navratri 2024

देशातील ५२ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या हरसिद्धी शक्तीपीठात शारदीय नवरात्रीदरम्यान भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. येथे दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर शिप्रा नदीच्या पूर्वेला प्रसिद्ध राजा विक्रमादित्यने बांधले होते. हरसिद्धी मंदिर या नावाने देशभरात प्रसिद्ध असलेल्या महाकाल नगरीत माता सतीच्या उजव्या हाताचा कोपरा पडला होता असे मानले जाते.

बाथरूम मधल्या बकेटवरील जिद्दी डाग करा चुटकीसरशी चकाचक ; वापरा ‘या’ ट्रिक्स

आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या वारंवार साफ ठेवाव्या लागतातच. यापैकी एक गोष्ट म्हणजे बाथरूम मधल्या वस्तू. बाथरूम मध्ये वापरण्यात येणारे बादली, मग , आणि इतर साहित्य वारंवार पाण्यात राहून त्यावर डाग पडतात . काही डाग तर किती घासले तरीही निघत नाहीत. विशेषतः प्लास्टिक वस्तुंना जास्त डाग पडतात आणि बराच काळ ते तसेच राहतात. म्हणूनच आजच्या लेखात प्लास्टिक बादली ,मग अशा वस्तू कशा साफ करायच्या जाणून घेऊया…

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

प्लास्टिकचे बकेट आणि मग वरील चिकट पिवळे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समप्रमाणात मिक्स करून घ्या. पेस्ट तयार करा नंतर ही पेस्ट बकेट आणि मगावरून डागांवर लावून काही वेळ ठेवा त्यानंतर ते स्वच्छ करा.

लिंबू

लिंबू हा किचन मधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लिंबामध्ये ॲसिड असतं त्यामुळे पाण्याचे डाग सहजपणे दूर होतात. अशातच बाथरूम मध्ये बकेट किंवा प्लास्टिकच्या वस्तू ह्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यामध्ये लिंबाचा रस या वस्तूंवर तीस मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर पाण्याने आणि ब्रशने हे दाग दूर करा.

ब्लिच

ब्लिच पाण्यात भिजवून या वस्तूंवर काही वेळासाठी ठेवून द्या त्यानंतर पाण्यांना या वस्तू धुवून घ्या. बाथरूम मधील या वस्तू चकाचक निघतील.

हायड्रोजन पेरॉक्साइड

हायड्रोजन परॉक्साईड हे सुद्धा एक प्रकारचे केमिकल असून डाग आणि चिकटपणा दूर होण्यासाठी यामुळे मदत मिळेल. एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन परॉक्साईड आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते मिक्स करा हे मिश्रण डाग असलेल्या वस्तूंवर स्प्रे करा दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुऊन घ्या.

भांडी घासण्याची पावडर

भांडी घासण्याची पावडर ही प्लास्टिक वरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल. एका भांड्यात भांडी घासण्याचे पावडर घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा. ही पेस्ट डाग असलेल्या जागांवर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटं ते तसंच राहू द्या नंतर एका ब्रशच्या मदतीने डाग घासून घ्या

पुण्यात झालेल्या पावसाने मोडला 8 दशकांचा विक्रम

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल (25) दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यातील पावसाबाबत एक नवा रेकॉर्ड झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 1938 नंतर म्हणजेच तब्बल 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील आयएमडी स्टेशनवर 131मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतांश पाऊस दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेमध्ये झाला आहे.

1938 मधील 132.3 मिलिमीटर पुण्यातील सप्टेंबर मधील सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. कारण IMD Pune यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी 133 मिमी पावसाची नोंद पुण्यात झाली आहे.

शाळा महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान मुंबई भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना वादळ आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मोदींचा पुणे दौरा रद्द

आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण,तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होता.

Flipkart सेलवर Apple iPhone 15 ची किंमत झाली सर्वात कमी ; पहा सुपर DEAL

apple i phone 15

सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ई कॉमर्स वेबसाईटस वर सुद्धा ऑफर्सचा पाऊस सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेटस साठी प्रसिद्ध असलेल्या Flpkart बद्दल सांगायचे झाल्यास बिग बिलियन डेज सेल अखेर फ्लिपकार्टवर लाईव्ह झाला आहे. काल मध्यरात्री १२ पासून प्लस आणि व्हीआयपी सदस्यांसाठी विक्री थेट सुरू झाली आहे.

यासोबतच सर्व युजर्ससाठी iPhone 15 ची विक्री किंमत देखील उघड करण्यात आली आहे. होय, फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना अगदी कमी किमतीत iPhone 15 खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टच्या उर्वरित सर्व वापरकर्त्यांसाठी, विक्री आज मध्यरात्री 12 पासून थेट होईल.

iPhone 15 ची विक्री किंमत

iPhone 15 सेल मधल्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन फ्लिपकार्ट वरून 49,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या वर्षी iPhone 15 79,990 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता अशी माहिती आहे. आता हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. कंपनीने iPhone 15 वर मिळणाऱ्या सवलतीबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

काय आहे ऑफर ?

कमी किमतीत iPhone 15 खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरची मदत घेऊ शकता. नवीन iPhone सीरीज लाँच झाल्यापासून 69,900 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करण्याची संधी होती. सेलमध्ये फोनची किंमत 54,999 रुपये झाली आहे. यानंतर तुम्ही HDFC कार्डने अतिरिक्त 2000 रुपये वाचवू शकता. बँक बंद झाल्यानंतर फोनची किंमत 52,999 रुपये होईल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. त्यानंतर ही किंमत आणखी कमी होऊन 49,999 रुपये होईल.

48,999 रुपयांमध्ये घरी आणा आयफोन

तुम्ही iPhone 15 खरेदी करू शकता आणि तो 48,999 रुपयांना घरी घेऊ शकता. ही किंमत EMI व्यवहारावर लागू होईल. 54,999 रुपयांच्या iPhone 15 च्या विक्री किंमतीवर, तुम्ही HDFC कार्डसह EMI व्यवहारांवर रु. 3000 वाचवू शकाल आणि एक्सचेंजवर रु. 3000 अतिरिक्त सूट मिळवू शकाल. एकूणच तुम्हाला फोनसाठी फक्त 48,999 रुपये मोजावे लागतील.

शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? समोर आला धक्कादायक अहवाल

shivaji maharaj statue collapse (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा असा कसा काय पडला असा सवाल करत महाराजांच्या पुतळा निर्मातीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशीची समितीची स्थापना केली होती. अखेर या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा कोसळला याचे कारण या अहवालात समोर आलं आहे.

भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. या समितीने आज आपला अहवाल सादर केला आहे. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. एकूण १६ पानांच्या या अहवालात पुतळा कोसळण्याची अनेक कारणे सांगण्यात आली आहे. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात म्हटले आहे. शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल चांगल्या पद्धतीने करता आली नाही. तसेच ज्याप्रकारेशिवरायांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आले नव्हते असेही या अहवालात म्हंटल आहे.

दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम शिल्पकार जयदीप आपटेकडे देण्यात आलं होतं. तर पुतळा आणि पायासाठी संरचना सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. तर आतामालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही अशी माहिीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

न्यायव्यवस्थेचे संघीकरण झालंय; तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले

Sanjay Raut Jail (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले आहे. कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर संजय राऊत आणखी आक्रमक झालेत. फक्त मी हा मुद्दा लोकांसमोर आणला. तर माझ्याकडून मानहानी कशी झाली? माझा काय संबंध असा सवाल करत भारतीय न्यायव्यवस्थेचे संघीकरण झालंय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली. त्यामध्ये घोटाळा, गडबड झाली असा आरोप मी केला नव्हता, तर हा आरोप सर्वात आधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता . प्रवीण पाटील यांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना पत्र लिहीलं होतं. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सुद्धा अहवाल दिला कि या भागात काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला पत्र लिहीत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यावेळी मांडली होती. तसेच याप्रकरणावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली आणि याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधानसभेत एक आदेश पारित करण्यात आला.

फक्त मी हा मुद्दा लोकांसमोर आणला. तर माझ्याकडून मानहानी कशी झाली ?, माझा संबंध कुठे आला?, मी केवळ प्रश्न विचारले. यात मी अब्रुनुकसान कुठे केली? मग पहिले अब्रुनुकसान ही प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी मीरा-भाईंदर नगरपालिकेने, तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत केली. पण मी सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, असे मला दिसल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. आज मला पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांनी मला पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलण्याचे थांबवणार नाही असं म्हणत न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे.

रस्त्यावर खाद्यपदार्थांचा स्टॉल टाकायचा आहे ? द्यावी लागणार परीक्षा, सरकारचा नवा आदेश

street food

गरमागरम वडापाव , भजीचा स्टॉल पहिला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आधी आपल्याला रस्त्यांवर काही मोजकेच खाद्यपदार्थ दिसायचे मात्र सध्या अगदी बिर्याणीपासून ते पिझ्झा पर्यंत सर्वकाही रस्त्यांवरच्या हातगाड्यांवर चाखायला मिळतं. मात्र बऱ्याचदा रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्याबद्दल तिथल्या स्वच्छतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. एवढेच नाही तर सोशलमिडीयावर सुद्धा याबाबत व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता स्ट्रीट फूड विक्रेत्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती…

गरमागरम स्ट्रीट फूड विकायचं असेल तर त्यासाठी विक्रेत्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. 50 मार्क्सची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं तसे आदेश काढले आहेत. अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र भविष्यात ती बंधनकारक होऊ शकते. हजारो लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात त्यातून आपलं कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे विक्रेत्यांनी देखील स्वागत केलं आहे. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक जण अशिक्षित आहेत त्यामुळे परीक्षा ऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करावी अशी मागणी विक्रेत्यांमधून होत आहे.