Thursday, December 25, 2025
Home Blog Page 448

Fungal Infection | मृत्यूचे दुसरे नाव म्हणजे फंगल इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणे आणि प्रकार

Fungal Infection

Fungal Infection | आपण बुरशीजन आजारांकडे म्हणजेच फंगल इन्फेक्शनकडे (Fungal Infection) अनेक वेळा कानाडोळा करत असतो. परंतु हेच इन्फेक्शन पुढे जाऊन तुमचे जीव घेऊ शकते. आणि एक गंभीर असे रूप धारण करू शकते. या फंगल इन्फेक्शनमध्ये सुरुवातीला आपल्या शरीराला खाज सुटते. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच घरच्या घरी काहीतरी उपचार करतो. परंतु मोठ्या स्वरूपात त्यावर कोणत्याही प्रकारचे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत नाही. आणि याचमुळे हा आजार एक गंभीर रूप धारण करत आहे. आणि कितीतरी लोकांचा जीव घेत आहेत. या बुरशीजन्य संसर्गामुळे आज काल मृत्यूंची संख्या वाढताना दिसत आहे.

‘मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या फंगल इन्फेक्शन (v) ग्रुप’नुसार, दरवर्षी 38 लाख लोकांना या संसर्गाचा त्रास होतो. ही संख्या एकूण मृत्यूच्या 6.8 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आजकाल लोक बुरशीजन्य संसर्गाबाबत सावध होत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये लोक हा रोग ओळखू शकत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बुरशीजन्य संसर्गामध्ये, बहुतेक लोकांचा मृत्यू Candida बुरशीमुळे होतो. कॅन्डिडा बुरशीमुळे दरवर्षी लोक मरतात.

candida काय आहे? | Fungal Infection

जेव्हा कॅन्डिडा नावाची बुरशी मानवी शरीरावर हल्ला करते तेव्हा कॅन्डिडिआसिस होतो. ही बुरशी प्रथम त्वचेमध्ये प्रवेश करते आणि नंतर त्वचेद्वारे तोंड, घसा, आतडे आणि खाजगी भागात प्रवेश करते. जेव्हा ते रक्तात प्रवेश करते तेव्हा ते मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूवर देखील हल्ला करते, ज्यामुळे बर्याच समस्या उद्भवतात.

कँडिडिआसिसचे प्रकार

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, कँडिडिआसिसचे अनेक प्रकार आहेत. योनिमार्ग, तोंडी, तोंड, मान आणि कॅन्डिडा ग्रॅन्युलोमा प्रमाणे, आक्रमक कँडिडिआसिस म्हणजे जेव्हा कॅन्डिडा बुरशी रक्ताद्वारे शरीरात पोहोचते.

कँडिडिआसिसची लक्षणे

कॅन्डिडिआसिस तोंड, घसा आणि मान, आतडे, मूत्रपिंड, त्वचा, हृदय तसेच मेंदूपर्यंत पोहोचते. जरी ते त्वचेपासून सुरू होते. म्हणून जेव्हा कँडिडिआसिस होतो. यामुळे त्वचेवर पुरळ उठू शकतात. त्याची सुरुवातीची लक्षणे अशी असू शकतात की त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेवर जळजळ होणे, योनीतून स्त्राव होणे, तोंडात फोड किंवा पांढरे चट्टे येणे, चव कमी होणे, वेदना होणे, सूज येणे. पाहिले जाऊ शकते.

Sepsis | सेप्सिस म्हणजे काय? यामध्ये तुमचे अवयव होतात निकामी

Sepsis

Sepsis | आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आजार आलेले आहेत. ज्याची लागण लोकांना होत आहे. यातच एक नवीन रक्त संक्रमणाचा आजार आलेला आहे. त्याला सेप्सीस (Sepsis) असे म्हणतात. तसेच त्याला सेप्टीसिमिया असे देखील म्हणतात. हा एक अत्यंत धोकादायक असा संसर्गजन्य आजार आहे. जी संसर्गाचा सामना करण्यासाठी रक्तात विरघळले जातात. त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये जळजळ होते सूज उर्ये आणि आपल्याला सेप्सीस होतो. यामध्ये अनेक प्रकारचे बदल शरीरात घडतात. शरीराचे अनेक भाग खराब देखील होऊ शकतात. अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी 195 देशातील वैद्यकीय तपासणी केली आहे. यावेळी त्यांनी 10.9 कोटी लोकांच्या मृत्यूची माहिती दिलेली आहे. यातील 1.1 कोटी लोक हे सेप्सीसमुळे मृत्यू पावले आहेत.

सेप्सिसची लक्षणे | Sepsis

प्रतिकारशक्ती म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे बाहेरचे आजार शरीरावर आक्रमण करत नाहीत. सेप्सिस दरम्यान, ते कमी-प्रतिक्रिया किंवा अति-प्रतिक्रियामुळे खराब होते. सेप्सिसमुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका लक्षणीय वाढतो. पण हे इतर अनेक संसर्गामुळे होते. हे शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. किरकोळ जखम आणि ओरखडे यांमुळेही सेप्सिस होऊ शकतो. त्यांना न्यूमोनिया, मूत्रमार्गाचा संसर्ग, एम्फिसीमा आणि मेंदुज्वर अशा अनेक गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे सेप्सिसचा धोका वाढतो. कॅथेटर, सर्जिकल चीरे, अल्सर आणि बॅक्टेरियामुळे सेप्सिस होऊ शकते.

सेप्सिस कोणत्याही संसर्गामुळे होऊ शकते. परंतु काही प्रकारच्या संक्रमणांमध्ये सेप्सिसचा धोका जास्त असतो. ज्याचा समावेश आहे. न्यूमोनिया, पोटाचा संसर्ग, किडनी संसर्ग आणि रक्तातील विषबाधा. सेप्सिसची लक्षणे समाविष्ट आहेत. ताप किंवा हायपोथर्मिया थरथरणे किंवा थंडी वाजून येणे गरम किंवा चिकट/घामलेली त्वचा गोंधळ किंवा अस्वस्थता हायपरव्हेंटिलेशन (जलद श्वासोच्छवास) किंवा धाप लागणे अत्यंत वेदना किंवा अस्वस्थता पुरळ लघवीच्या समस्या कमी ऊर्जा जलद हृदय गती. सेप्सिस ही एक जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे जी एखाद्या संसर्गावर तुमच्या शरीराच्या अतिप्रतिक्रियामुळे उद्भवते.

सेप्सिस ही तुमच्या शरीराची एखाद्या संसर्गावर तीव्र प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्हाला संसर्ग होतो, तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करते. परंतु काहीवेळा तुमची रोगप्रतिकारक प्रणाली संक्रमणाशी लढणे थांबवते आणि तुमच्या सामान्य ऊतींना आणि अवयवांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये असामान्य साखळी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. हे तुमच्या शरीराच्या विविध भागांमध्ये रक्त प्रवाह कमी करते आणि लक्षणीय नुकसान किंवा अपयश देखील होऊ शकते.

सेप्सिसचे तीन प्रकार

सेप्सिस, गंभीर सेप्सिस आणि सेप्टिक शॉक. आता, ते ही परिस्थिती अधिक द्रव प्रमाणात ओळखतात. संक्रमण आणि बॅक्टेरेमिया (तुमच्या रक्तप्रवाहातील बॅक्टेरिया) पासून सेप्सिस आणि सेप्टिक शॉकपर्यंतचे प्रमाण. यामुळे अनेक अवयवांचे कार्य बिघडू शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

Weather Update | आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्याला दिला रेड अलर्ट

Weather Update

Weather Update | गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस(Weather Update) पडताना दिसत आहे. काही भागांमध्ये उघडझाप तर काही लोक काही भागांमध्ये मात्र चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी काही दिवस हा पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजे 25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कसे हवामान असणार आहे? याची माहिती दिलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सह इतर काही जिल्ह्यांमध्ये आज वादळीवाऱ्यासह वीजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने मुंबई तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी विजांच्या कडकडाटसह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सोमवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. याआधी अनेक ठिकाणी कडाक्याचे ऊन पाहायला मिळालेले आहे. परंतु आता पुन्हा एकदा सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि अनेक ठिकाणी पाऊस देखील पडत आहे. हवामान विभागाने उद्या म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी पालघरसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात व सरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. यासह गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर देखील पाऊस पडणार आहे तसेच ईशान्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात देखील हा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात देखील हा पाऊस पडेल. तसेच केरळ दक्षिण उत्तर कर्नाटक या ठिकाणी देखील हा परतीचा पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

राज्यातील 40 हजार शाळा आज राहणार बंद; पावणे 2 लाख शिक्षकांनी पुकारले आंदोलन

ZP School Teachers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या पालकांची मुले मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत. त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विविध कारणास्तव राज्यातील प्राथमिक शिक्षक हे आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी एका दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत. आणि आंदोलनावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील जवळपास पावणे दोन लाख शिक्षक रजा घेणार आहेत. त्यामुळे आज राज्यातील जवळपास 40 हजार शाळा बंद राहणार आहेत. याआधी नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीची निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला. परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सरकारने घेतलेले निर्णयानुसार जर सुधारित शिक्षक संघ मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29000 पेक्षा जास्त शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. शासनाने घेतलेले हे दोन्ही निर्णय लवकरात लवकर रद्द करावेत. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी त्या एकवटलेल्या आहेत. या संदर्भात आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील सकारात्मक चर्चा करत आहेत. परंतु याबाबत अजून कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या आंदोलनात 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शिक्षक हे रजा टाकणार आहेत. आणि मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. असे त्यांनी आवाहन दिलेले आहे. शिक्षकांचा हा मोर्चा नगरपरिषद गांधी विद्यालय भंडारा येथून 12 वाजता निघणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यानंतर पोहोचणार आहे.

ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या कमी आहे, त्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती करणे विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारे प्रशासकीय कामे या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आज शिक्षक हे आंदोलन करणार आहेत. आणि या आंदोलनामुळेच राज्यातील अनेक शाळा आज बंदर राहणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हाट्सअप ग्रुप लेफ्ट होणे, तसेच काळी फीत लावून काम करणे. अशा प्रकारचे विरोध दाखवण्यात आले होते. परंतु याचा काही परिणाम न झाल्याने आता पुन्हा एकदा शिक्षकांनी एका दिवसाची रजा घेऊन आंदोलन पुकारले आहे.

यामध्ये शिक्षकांनी सांगितले आहे की, 15 मार्च 2024 संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा तसेच विद्यार्थ्यांना आधार कार्ड संबंधाने अडचण लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण रद्द करावे. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावण्यासाठी जास्त उशीर करू नये. तसेच मोफत गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना राबवू नये. ज्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाले नाहीत त्यांना स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. तसेच प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी. शिक्षकांना आश्वासन प्रगती योजना लागू करावी यांसारख्या अनेक मागण्याचा समावेश आहे.

Saamana Editorial on Akshay Shinde Encounter : एका शिंद्याचे एन्काऊंटर… ; सामनातून सरकारवर गंभीर आरोप

Akshay Shinde Encounter saamana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जसे लिंगपिसाट आहेत तसे सत्तापिसाटही आहेत. लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट खोक्यांवर उभे राहून सरन्यायाधीशांशी हास्यविनोद करतात. कायद्याची भीती राहिलेली नाही व न्यायदेवता खोकेबाजांची बटीक बनली आहे. महाराष्ट्रातील एकूणच माहोल विद्यमान सत्ताकाळात बिघडला आहे. जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीसांच्या खुर्चीखाली वात पेटवली आहे. जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित करण्यासाठी बदलापूरच्या आरोपीस गोळया घातल्या, पण गृहमंत्र्यांचे संरक्षण असलेले सूत्रधार आपटे, कोतवाल, आठवले मात्र मोकळेच राहिले! असं म्हणत सामना अग्रलेखातून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘एका शिंद्याचे एन्काऊंटर!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. (Saamana Editorial on Akshay Shinde Encounter)

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

सरन्यायाधीश चंद्रचूड हे मुंबईत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत असतानाच बदलापूर बलात्कार कांडातील मुख्य आरोपी अक्षय शिंद हा पोलीस चकमकीत मारला गेल्याचे वृत्त आले. त्याआधी या शिंदेने पोलिसांच्या हातातले शस्त्र हिसकावून आत्महत्या केली असे सांगण्यात आले, पण लगेच पटकथेत बदल केला व शिंदेला पोलिसांनी मारले. त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी शिंदेला मारले, असा रहस्यमय सिनेमा पडद्यावर आला. बलात्कार कांडातील आरोपींना अशाच प्रकारची कठोर शिक्षा व्हायला हवी. खटलेबाजी, तारखांवर तारखा, फास्ट ट्रकची नाटके या घोळात न अडकता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा झटपट न्याय व्हायलाच हवा. बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींच्या बाबतीत जे घडले, त्यामुळे देश हादरला. पीडित मुलींच्या आईंची तक्रार घ्यायला बदलापूरचे पोलीस तयार नव्हते. जनता रस्त्यावर उतरली, रेल्वे बंद केली, मंत्र्यांना अडवले तेव्हा कोठे ‘वर्षा’वरील शिंद्यांनी बलात्कारी शिंदेवर कारवाई केली. आरोपीला आमच्या हातात द्या, आम्हीच त्याला फासावर लटकवतो, अशी मागणी आंदोलकांची होती. मिथे सरकारने अशा शेकडो आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करून त्यांची धिंड काढली. आंदोलकांच्या घरात पोलीस घुसवले. आता पोलिसांनी अक्षय शिंदेला न्यायालयीन कोठडीतून बाहेर काढून चकमकीत उडवले आहे. जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असे शिंदे – फडणवीस तेव्हा का बोंबलत होते? त्यामुळे बदलापुरातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यायला हवेत.

मुळात अक्षयची ‘चकमक’ वगैरे नेहमीप्रमाणे संशयास्पद आहे. गृहमंत्री फडणवीस व त्यांच्या मिंध्यांना या बलात्कार कांडातील मुख्य सूत्रधारांना वाचवायचे आहे. ज्या शैक्षणिक संस्थेत हे अधम कृत्य घडले त्या शाळेचे संचालक आपटे, कोतवाल वगैरे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. अक्षय शिंदे याने त्याच्या जबानीत नक्की काय सांगितले व त्यातले किती पोलिसी कागदावर आले हे गुलदस्त्यात आहे. पुन्हा या शाळेतील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले आहे आणि ते काही अक्षय शिंदेने केले नाही. त्यामुळे शिंदे याच्यामागचे सूत्रधार या सरकारने सुरक्षित केले. पुढे जनतेच्या दबावानंतर संस्था चालक, कर्मचारी यांच्यावर ‘पोक्सो’ कायद्याखाली गुन्हे दाखल झाले, मात्र त्यांना फडणवीस-शिंदे कृपेने अटक झाली नाही. त्यांना अटक झाली असती ती अक्षय शिंदेंच्या जबानीवर…. आता त्या अक्षय शिदलाच ठार करून आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचविण्यात आले. हे आपल्या राज्यातील कायद्याचे धिंडवडे आहेत असं म्हणत सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर घणाघात करण्यात आला आहे.

निम्म्या किंमतीत घरी आणा Google चा पॉवरफुल फोन ; Flipkart ची डील उघड

google

Flipkart Big Billion Days Sale 2024 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि हळूहळू या सेलमध्ये उपलब्ध सर्व डील उघड होत आहेत. सेलमध्ये, बजेट ते प्रीमियम सेगमेंटपर्यंतचे फोनही खूप चांगल्या ऑफर्ससह उपलब्ध करून दिले जात आहेत.दरम्यान, एक विशेष ऑफर देखील समोर आली आहे ज्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

आजच्या लेखात फोन Google Pixel 8 वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल जाणून घेऊया, ज्याचे बॅनर फ्लिपकार्टवर लाइव्ह झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलमध्ये फोन 75,999 रुपयांऐवजी केवळ 31,999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो.

या दिलेल्या किंमतीमध्ये बँक ऑफर, कॅशबॅक आणि EMI पर्याय समाविष्ट आहेत. फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक 5,554 रुपये प्रति महिना EMI पर्याय निवडू शकतात. विचार करा, गुगलचा फोन एवढ्या स्वस्तात मिळत असेल तर ही डील एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. या फोनचे सर्व फीचर्स जाणून घेऊया.


Google Pixel 8 मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.2-इंच OLED पॅनेल, 120Hz चा रीफ्रेश रेट आणि 2,000 nits ची कमाल ब्राईटनेस आहे. Pixel 8 ला समोर आणि मागे Gorilla Glass Victus संरक्षण आहे, तर Pixel 8 Pro मध्ये Victus 2 ग्लासचा थर आहे. दोन्ही फोनला IP68 रेटिंग मिळते.

Google Pixel 8 मध्ये एक नवीन आणि सुधारित प्राथमिक कॅमेरा आहे, जो 50 मेगापिक्सेल Samsung ISOCELL GN2 सेन्सरने सुसज्ज आहे. Google Pixel 8 मधील प्राथमिक कॅमेरामध्ये 12-मेगापिक्सेलची अल्ट्रावाइड लेन्स आहे. Pixel 8 Pro वर तापमान सेंसर आहे. या दोन्ही फोनमध्ये 10.5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

पिक्सेल 8 सीरिजच्या दोन्ही फोन्सना पॉवर करत, Google ची नवीन Tensor G3 चिप प्रदान करण्यात आली आहे जी Titan M2 सह-प्रोसेसरसह येते. पॉवरसाठी, Pixel 8 मध्ये 4575mAh बॅटरी आहे, जी 27W फास्ट चार्जिंग आणि 18W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह बॅकअप देते.

ठरलं ! नवी मुंबई विमानतळावर ‘या’ दिवशी होणार विमानाची पहिली टेस्टिंग

navi mumbai

मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. लवकरच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतची मोठी अपडेट आता हाती आली असून येत्या 5 ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एका मराठी माध्यमाला शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सध्याचा विचार करता नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे या विमानतळाची पाहणी आमदार संजय शिरसाट यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,5 तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो. शिवाय विमानतळाच्या कामावर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे. दरम्यान 19 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत.

‘या’ विमानतळावर धावरणार देशातील सर्वात पहिली ‘एअर ट्रेन’ ; काय आहे प्रकल्प ?

air railway

विमानतळांवर एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत जाण्यासाठी बस ची सोया उपलब्ध करून दिलेली असते. मात्र पहिल्यांदाच देशात एअर ट्रेनसुरु केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार असून एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत सहज पोहचता येणार आहे. चला जाणून घेऊया याबाबत …

भारतातील पहिली एअर ट्रेन किंवा ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) प्रणाली लवकरच दिल्ली विमानतळावर सुरू केली जाणार आहे, जी टर्मिनल 1, 2, 3, एरोसिटी आणि कार्गो सिटीला जोडेल. यामुळे प्रवाशांना अखंड प्रवास करता येईल आणि शटल बसची गरज कमी होईल.हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ऑटोमेटेड पीपल मूव्हर (एपीएम) बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.

ही APM प्रणाली T1 आणि T3/2 दरम्यान जलद, अखंड आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी देईल. APM दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 आणि T2 दरम्यान एका बाजूला आणि T1 दरम्यान कार्यरत असेल. एअर ट्रेनला चार थांबे असतील – T2/3, T1, एरोसिटी आणि कार्गो सिटी. एअर ट्रेन 2027 पर्यंत धावण्याची शक्यता आहे. एअर ट्रेन ट्रॅकची एकूण लांबी 7.7 किलोमीटर असेल.

भारतातील पहिला हवाई रेल्वे प्रकल्प

हा भारतातील पहिला हवाई रेल्वे प्रकल्प आहे. निवड प्रक्रिया बोलीदाराचे खर्च आणि महसूल वाटणी मॉडेल किंवा प्रकल्पासाठी देऊ केलेली आर्थिक मदत विचारात घेईल. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की,“जर सर्व काही योजनेनुसार झाले तर या आर्थिक वर्षाच्या अखेरीस निविदा काढता येतील. प्रकल्पाचे बांधकाम 2027 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 2,000 कोटी रुपये असेल. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी विकास शुल्क आकारले जाणार नाही, असे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. DIAL ने नियोजित केलेल्या पहिल्या हवाई ट्रेनला सहा थांबे होते. सरकारने DIAL चा हा प्रस्ताव स्वीकारला नाही कारण यामुळे T1 आणि T2/3 दरम्यान प्रवासाचा वेळ वाढला असता.

मोफत असेल सुविधा

जगभरातील हवाई गाड्या सामान्यत: प्रवाशांसाठी विनामूल्य असतात, परंतु विमानतळावरील पायाभूत सुविधांचा खर्च विमान कंपन्यांकडून लँडिंग आणि पार्किंग शुल्काच्या स्वरूपात किंवा वापरकर्ता विकास शुल्क (UDF) द्वारे वसूल केला जातो. अशा परिस्थितीत IGI विमानतळावरही ही सेवा प्रवाशांसाठी मोफत असेल, असा विश्वास आहे. दिल्ली विमानतळावर एअर ट्रेनची गरज अनेक दिवसांपासून जाणवत होती. याचे कारण असे की विमानतळावरील 25% प्रवासी हे ट्रान्झिट फ्लायर्स आहेत, ज्यांना एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जावे लागते.

आता पेट्रोल डिझेलचा खर्च बंद; लवकरच बटाट्याच्या तेलावर धावणार गाड्या

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. प्रत्येक घरात आपल्याला एक तरी गाडी दिसतेच. लोकांना दुचाकी तसेच चार चाकी गाडी घेण्याची खूप हौस असते. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये देखील दुचाकी आणि चारचाकीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. परंतु या चालवण्यासाठी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल लागते. आणि आज काल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. तसेच डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांमुळे वायुप्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आता खाजगी गाडी चालवणे परवडत नाही. परंतु आता लवकरच बाजारात बाकीचे तेलावर धावणारी वाहने येणार आहेत.

पोटॅटो इन्स्टिट्यूटचा अनोखा प्लॅन

बटाटा आपल्या दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बटाट्याची भाजी अनेक लोकांना आवडते. बटाटा हे एक असे कंदमूळ आहे. ज्यापासून इथेनॉल तयार केले जाते. त्यामुळे आता सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने एक नवीन प्रस्ताव आणलेला आहे. त्यासाठी त्यांनी म्हटले आहे की, जर आपल्याला इथेनॉल बनवायचे असेल तर बटाट्याची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे. बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल तयार केले जाते, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचा खर्च आपला वाचणार आहे.

पेट्रोलनंतर आता डिझेलमध्ये देखील इथेनॉल मिक्स करणार

पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवर इथेनॉल हा एक चांगला पर्याय आहे. अनेक देशांमध्ये इथेनॉल मुक्त बायो फील वापरले जाते. परंतु आपल्या भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स केले जाते. त्यामुळे आता लवकरच डिझेलमध्ये देखील मिक्स केला जाईल यावर विचार चालू झालेला आहे.

त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात भारत हा बटाट्याच्या उत्पादनातील दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या देश आहे. त्यामुळे आपण इथेनॉल तयार करण्यासाठी कुजलेल्या बटाट्यांचा वापर करू शकता. आणि जैवविविधतावर नवीन पर्याय आणू शकतो. सगळ्यात जास्त चीनमध्ये बटाट्याची लागवड केली जाते. आणि त्यानंतर भारतात केली जाते. पेट्रोल आणि डिझेलचा साठा कधीतरी संपणारच आहेत. त्यामुळे या इंधनांना पर्याय म्हणून बटाट्याकडे पाहिले जात आहे. आता पोटॅटो इन्स्टिट्यूटने जास्तीत जास्त बटाटे लागवड करण्याचा पर्याय सुचवला आहे.

Akshay Shinde Encounter : गोळ्या घालण्यापेक्षा तुडवून मारले पाहिजे; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Akshay Shinde Encounter) असं सांगण्यात येत आहे.एकीकडे या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवलं असताना भाजप खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी बेधडक प्रतिक्रिया देत अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे असं म्हंटल आहे.

लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? Akshay Shinde Encounter

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं कि लोकांना समजत कस नाही, हीच घटना जर आपल्या कुटुंबातील कोणासोबत घडलं असत तर तुमची रिअक्शन काय असती? तरीही अशा लोकांचे वकीलपत्र स्वीकारलं जाते आणि त्यांना निर्दोष करण्याचे सिद्ध केलं जाते. जर न्याय मिळत नसेल तर लोक तरी काय करणार? लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? आता गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या काळातील न्यायव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करा. कोणी बलात्कारासारखे गुन्हे केले तर त्यांना फाशी देऊन टाका, किंवा लोकांच्या ताब्यात द्या. अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे असं म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अक्षय शिंदेच्या एंकॉउंटर वरून (Akshay Shinde Encounter) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला का? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते असं म्हणत अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला ३ सवाल केले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.