Thursday, December 25, 2025
Home Blog Page 449

फक्त 2 रुपयात घेऊ शकता अनलिमिटेड जेवण आणि गेमिंगची मजा; जाणून घ्या ठिकाण

Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी विका घ्यायचे, म्हटलं तरी त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. परंतु जर तुम्हाला सांगितले की, तुम्ही दोन रुपयांमध्ये हवे तितके अन्न खाऊ शकतात.तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढेच नाही, तरी यामध्ये तुम्ही अनेक गेम खेळण्याचा आनंद देखील घेऊ शकता. असे एक ठिकाण आहे तिथे केवळ दोन रुपयांमध्ये हवे तितके जेवण मिळेल, तसेच तुम्हाला ड्रिंक्स आणि गेम खेळण्याचा आनंद देखील मिळणार आहे. आता हे ठिकाण नक्की कुठे आहे हे आपण जाणून घेऊया.

नुकतेच दिल्ली विमानतळावर एक नवीन रूपे लाउंज उघडले आहे. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जर चुकून तुमची फ्लाईट उशीरा झाली आणि तुम्ही विमानतळावर असाल, तर या वेळात तुम्ही या दिल्ली विमानतळाच्या लाउंजमध्ये जाऊन बसू शकता. परंतु या लाऊंजमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे रुपये कार्ड असणे गरजेचे आहे. तुम्हाला केवळ दोन रुपयांमध्ये हा अनुभव घेता येणार आहे.

दिल्ली विमानतळ T3 मध्ये रुपे लाउंज

तुम्ही दिल्ली विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनल 3 (T3 RuPay लाउंज) च्या गेट क्रमांक 41 मधून प्रवेश करू शकता. रुपे क्रेडिट कार्डद्वारे प्रति व्यक्ती 2 रुपये दराने प्रवेश करता येईल. प्रवेशासाठी तुम्हाला RuPay क्रेडिट कार्ड स्कॅन करावे लागेल. प्रवेश केल्यावर तुम्हाला दिसेल की लाउंज चार प्रकारे विभागलेला आहे. एक लाउंजिंग क्षेत्र, एक रेस्टॉरंट क्षेत्र, एक बार आणि एक गेमिंग रूम आहे.

रात्री उशिरापर्यंत ओपन

RuPay लाउंज नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्री उशिरा जेवण देते. हे विश्रामगृह दुपारी साडेचार वाजेपर्यंत खुले असते. तुम्ही कधीही दिल्ली विमानतळ टर्मिनल 3 ला भेट दिल्यास, RuPay लाउंजमध्ये तुमचे 2 रुपये खर्च करा आणि अमर्यादित अन्न, पेये आणि खेळांचा आनंद घेऊ शकता.

तरुणांना IT मध्ये काम करण्याची संधी; या नामांकित कंपन्या घेणार कॅम्पस इंटरव्ह्यू

Job Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून आपल्या आपण भारतातून अनेक आयटी कंपन्या बंद झाल्याच्या किंवा कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या बातम्या ऐकलेल्या आहे. त्यामुळे अनेक इंजिनियर्स सध्या बेरोजगार घरी बसलेले आहेत. अशातच आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आयटी क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. भारतातील आयटीआय कंपन्या लवकरच आता फ्रेशर्सला नोकरीची संधी देणार आहेत. आणि त्यांच्याकडून कॅम्पस कॅम्पस इंटरव्यू घेण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आयटी कंपन्या या क्लाऊड कम्प्युटिंग डेटा आणि AI क्षेत्रात ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना संधी देत आहेत.

आयटी (IT) क्षेत्रातील अनेक कंपन्या या भरती प्रक्रिया बाबत घेणार आहेत. त्यामध्ये सध्या आयबीएम इनफॉईसिस टीसीएस, एलटीआय माईंडट्री या कंपन्या लवकरच कॅम्पस इंटरव्यू घेणार आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नामांकित कॉलेजला भेट देखील दिलेली आहे. आणि त्यांची निवड प्रक्रिया देखील होणार आहे.परंतु या आयटी कंपन्या केवळ काही निवडक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणार आहे. या फ्रेशर्स विद्यार्थ्यांना 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिलेली दिले जाणार आहे. अशी माहिती या कंपन्यांनी जाहीर केलेली आहे.

येत्या वर्षात जुलै महिन्यापासून हे कॅम्पस इंटरव्यू घेतले जाणार आहेत. आणि अनेकांना यातून नोकरीची संधी मिळणार आहेत. या भरतीमध्ये टीसीएस कंपनीकडून 40 हजार जागा, इन्फोसिस कंपनीकडून 20000 तर विप्रो कंपनीकडून 10 हजार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. या कंपन्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. आणि आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू होणार आहे. या हायरिंग मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची मर्यादा ही 60 टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. त्यामुळे आता सध्या जे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्यांना इंटरव्यूसाठी इतर कुठेही जायची गरज नाही. त्यांचे कॅम्पस इंटरव्यू कॉलेजमधूनच त्यांची निवड होणार आहे.

मी विराटला विकेन, धोनीला खेळवेन आणि रोहितला…; मायकल वॉन काय बोलला?

Michael Vaughan VIRAT DHONI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) … आयपीएल इतिहासातील टॉप ३ खेळाडू… तिन्ही खेळाडू एकमेकांच्या तोलामोलाचे असल्याने ते एकाच कोणत्या तरी संघातून खेळणं शक्यच झालं नाही. पण तुम्हाला जर विचारलं कि या तिन्ही पैकी कोणत्या एका खेळाडूला तुम्ही सांगता ठेवाल ? कोणाला बाहेर काढाल? तर तुमचीही अडचण होईल… मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने Cricket.com शी संवाद साधताना आपण एकवेळ विराटला संघातून काढेन पण धोनीला नक्कीच खेळवेन असं म्हणत कॅप्टन कुल माहीचे कौतुक केलं आहे. तर रोहित शर्मा हा माझ्या संघातील राखीव खेळाडू असेल असेही मायकल वॉन म्हणाला.

मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला, मला वाटते कि मी महेंद्रसिंघ धोनीला खेळवेन, कारण मला वाटत नाही कि त्याच्यापेक्षा कोणी चांगला खेळाडू नाही. एवढच नव्हे तर एमएस धोनी माझ्या संघाचा कर्णधार असेल असेही वॉनने स्पष्ट केलं. यानंतर जेव्हा मायलक वॉनला रोहित किंवा विराट कोहलीपैकी एकाला विकण्यास सांगितलं तेव्हा त्याने विराटचं नाव घेतलं. मी विराटला कंटाळलो आहे, त्याच्या संघाने अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही म्हणून मी त्याच्याऐवजी रोहितची निवड करेन. रोहित शर्माने सहा वेळा आणि एमएसने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मी धोनीला खेळवेन, विराटला विकेन आणि रोहित शर्मा माझ्या संघातील राखीव खेळाडू असेल. विराटला विकल्यामुळे मला भरपूर पैसे मिळतील आणि त्यालाही दुसऱ्या संघात जास्तीचे पैसे मिळतील असं मायकल वॉनने सांगितलं.

दरम्यान, विराट कोहली हा २००८ पासून म्हनजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा भाग आहे. कोहली असा एकमेव खेळाडू आहे जो आत्तापर्यंत एकाच आयपीएल फ्रेंचायजी कडून क्रिकेट खेळला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सुद्धा विराटच्या नावावर आहे. मात्र इतकं सगळं करूनही रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या संघाला अजून एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात कोहलीला यश मिळालेले नाही. तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार मानले जातात.

पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनल वर चहा आणि पाणी मिळणार स्वस्तात

pune airport

विमानतळा सारख्या मोठ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्ही तिथे खाणं पिणे लोक शक्यतो टाळत असल्याचे पाहत असाल. कारण कोणत्याही पदार्थाचा दर हा अव्वाच्या सव्वा आकारला जातो. त्यामुळेच प्रवासी तेथील खाणपिण टाळतात. मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल वर याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे विमातळाच्या नव्या टर्मिनल वर चहा आणि पाणी स्वस्त मिळणार आहे.

लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल मधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे १०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६०/८० रुपयांना विकत घ्यावी लागते अशातच पुणे विमानतळ नव्या टर्मिनल वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.

विमानतळावर विकल्या जाणाऱ्या चहा,कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा आणि कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण होत आहे त्यानुसार आता चहा आणि पाणी वीस रुपयात मिळणार आहे. प्रशासन नवीन टर्मिनल वर एक छोटासा स्टॉल सुरू करणार आहे त्यामुळे आता सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या स्टॉलवर कमी दरात चहा आणि पाणी उपलब्ध होणार आहे.

विमानतळावर चहा कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी उडान योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत काही प्रवाशांना कमीत कमी दरात चहा कॉफी उपलब्ध होणार आहे. उडान अंतर्गत आता चहा पाणी 20 रुपयात विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनल वर एक छोटासा स्टॉलवर सुरू करून सुविधा देणार आहे.

भारत लवकरच ठेवणार शुक्रावर पाऊल; PM मोदींनी सोशल मीडियावर दिली माहिती

Venus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतीच भारताची चंद्रयान 3 ही मोहीम फत्ते झालेली आहे. भारताने चंद्र, मंगळ यांसारख्या अनेक मोहिमा केलेल्या आहेत. आणि आता भारत हा शुक्र या ग्रहावर जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. शुक्र ग्रहावर असलेली माहिती मिळवण्यासाठी आता केंद्रीय कॅबिनेटने चार अवकाश प्रोजेक्ट्सला मंजुरी देखील दिलेली आहे. आणि या शुक्र ग्रहाची एक मोहीम आहे. या मोहिमेला त्यांनी ऑर्बिटर मिशन असे नाव दिलेले आहे. पीएम मोदी यांनी सोशल मीडिया X वर ही माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की, भारत मार्च 2018 पर्यंत हे मिशन लॉन्च करणार आहे. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अस्तित्वात आणणार आहे. भारत तब्बल 1236 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात 824 कोटी रुपयांचा स्पेसक्राफ्टरचा खर्च येणार आहे. आता हे मिशन काय आहे? यावेळी काय सिद्ध करायचे आहे ? आणि यात काही खासियत असणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

स्पेस क्राफ्टर हे एक प्रकारचा आहे. या मिशनच्या माध्यमातून प्रेस क्राफ्ट शुक्र ग्रहाच्या कक्षेत पोहोचणार आहे. परंतु त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरणार नाही हे अशा पद्धतीने डिझाईन करण्यात येणार आहे की, पृष्ठभागाच्या वर असतानाच यातील सर्व प्रयोग केले जातील. म्हणून त्याला स्पेसक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. याबद्दलची माहिती इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, शुक्र ग्रहाची निवड का केली तर पृथ्वीला शुक्रबाबत विविध माहिती समजेल. आणि अजून चांगल्या प्रकारे माहिती घेत आहे. असे म्हटले जाते की, हा ग्रह कधी राहण्या योग्य होता. परंतु आता शुक्र या ग्रहावर कोणकोणते बदल झालेले आहे? याचा अभ्यास देखील करता येईल. त्याचप्रमाणे शुक्र हा पृथ्वी सारखा मानला जातो. शुक्र आणि पृथ्वीला सिस्टर प्लॅनेट असे म्हणतात. या दोन ग्रहांनी खूप जास्त प्रगती केलेली आहे. त्यामुळे शुक्र मिशन मधून आता वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात लाडूच्या प्रसादात आढळला उंदीर? भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

Siddhinivayak Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बालाजीच्या प्रसादामध्ये भेसळ आढळल्यानंतर संपूर्ण देशभर हा मुद्दा खूपच उचलून घेतला गेलेला आहे. अशातच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सिद्धिविनायक प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उभे करण्यात आलेला आहे. सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद जिथे ठेवला होता. त्या ठिकाणी उंदराची पिल्ले आढळलेली आहेत. त्यामुळे येथील प्रसाद आणि आसपासच्या परिसरात स्वच्छ ठेवले जात नाही. असा आरोप करण्यात आलेला आहे. आणि या संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे सगळ्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. या ठिकाणी महाप्रसाद म्हणून लाडू ठेवला जातो. त्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आता आढळलेली आहेत. त्यामुळे आता या लाडूच्या शुद्धतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. या व्हायरल होणारे व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका ट्रेमध्ये प्रसादाचे लाडू ठेवण्यात आलेले आहे. आणि त्यात मेलेला उंदीर असल्याचे आढळून आलेले आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव विना पाटील यांनी हे आरोप सगळे फेटाळून लावलेले आहे. त्यांनी वायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओ तपासलेले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्याकडचा परिसर खूप स्वच्छ असतं. असे इथे कधीच घडणार नाही. उकरड्यावर काहीतरी फेकले असेल आणि त्याचा हा फोटो आणि व्हिडिओ घेतलेला आहे .असे आम्हाला वाटते परंतु ज्यावेळी ही माहिती मिळाली. त्यावेळी आम्ही सगळे कॅमेरे बसले. तेव्हा आम्हाला काही आढळले नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फेक आहे. कोणाची तरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे. ज्यांनी हे केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असे त्यांनी सांगितलेले आहे.”

सिद्धिविनायक या मंदिरात दररोज 50 हजार लाडू बनवले जातात. आणि एका पाकिटमध्ये 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात या लाडवांना बाहेर खूप जास्त मागणी असते. भाविक भक्तांची देखील खूप गर्दी होते. त्यामुळे या लाडूंची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. प्रयोगशाळेचे चाचणीमध्ये असेच आढळून आले आहे की, हा लाडू सात ते आठ दिवस साठवून ठेवता येतो. तो अजिबात खराब होत नाही. परंतु या लाडवांच्या ट्रेमध्ये उंदीर असल्याचे सुटेस समोर आल्यानंतर मंदिराच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेले आहे.

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सुरु होणार साखर हंगाम; अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहे. राज्यात आपण कृषी क्षेत्राबद्दल विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता जे साखर कारखाने आहेत त्यांना चांगला ऊस मिळावा आणि हा हंगाम पूर्ण कालावधीत सुरू व्हावा अशी मागणी अनेक लोकांची होती. यासाठी कर्नाटक प्रमाणे राज्यातील साखर हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे

यावर्षीचा साखर हंगाम हा मागील वर्षाच्या तुलनेत 15 दिवसांनी उशिरा सुरू होणार आहे. त्यामुळे कारखाने देखील दिवाळीनंतर चालू होणार आहे. परंतु त्यापूर्वी उसाची तोडणी, ओढणी यंत्र आणून नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे. यावर्षी मागील वर्षाच्या पाऊस देखील खूप जास्त झालेला आहे. त्यामुळे पिकं देखील खूप चांगली वाढलेली आहे. परंतु संपूर्ण राज्यात काही ठिकाणी अजूनही पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस या पिकाला आणखी ओलावा मिळेल आणि ऊस तोडणीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

पावसाचा आणि उसाच्या पिकाचा अंदाज घेताआता ऊस तोडणी ही दिवाळीनंतर सुरू करावी, अशी मागणी साखर उद्योगाची असलेल्या संघटनेने केली होती. आणि आता याच मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 नोव्हेंबर नंतर हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच इतर लोकांनी देखील याला मान्यता दाखवली आहे.

आपल्या महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्र खूप जास्त प्रमाणात असते. आणि ऊस देखील चांगल्या प्रमाणात तोडला जातो. परंतु यावर्षी उसाचे क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता कारखान्यांना देखील चांगला ऊस मिळावा. अशी अनेक उद्योगांची उद्योगाची मागणी होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी कर्नाटकात जात असतो. त्यामुळे कर्नाटक सरकारने देखील यावर्षीचा ऊस हंगाम 15 नोव्हेंबर नंतर सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारला देखील दिलेली आहे.

संपूर्ण हवामानाचा आणि उसाच्या पिकाचा अंदाज घेता. ऊस हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरु करावा, अशी मागणी बैठकीत होती. आणि ती मागणी मंजूर झालेली आहे. या बैठकीत साखर आयुक्त कुणाल खेमनार आणि सहसंचालक मंगेश हे देखील उपस्थित होते. तसेच या बैठकीला अनेक लोक उपस्थित होते आणि त्यांच्या सहमतानेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Tecno POP 9 5G : अवघ्या 9,499 रुपयांत खरेदी करा 5G मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

Tecno POP 9 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि खिशाला परवडणारा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. मोबाईल निर्माता ब्रँड टेक्नोने भारतीय बाजारात नवा 5G मोबाईल लाँच केला आहे. Tecno POP 9 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून त्याची किमंत अवघी 9,499 रुपये ठेवण्यात आली आहे. स्वस्त किमतीत उपलब्ध असूनही या मोबाइल मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आली आहे. टेक्नोचा हा मोबाईल मिडनाईट शॅडो, अझूर स्काय आणि अरोरा क्लाउड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच झाला आहे.

डिस्प्ले –

Tecno POP 9 5G स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1612 x 720 पिक्सेल रिझोल्युशन मिळते. कंपनीने या मोबाईल मध्ये Octa Core MediaTek Dimensity 6300 6nm प्रोसेसर बसवला असून त्यानुसार हा मोबाईल 4GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा – Tecno POP 9 5G

मोबाईल घेत असताना आपण नेहमीची त्याची कॅमेरा क्वालिटी चेक करत असतो. टेक्नोच्या या स्मार्टफोन मध्ये 48MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा एलईडी फ्लैश सह येतो, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये पॉवरसाठी ५०००mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत आणि ऑफर-

या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या मोबाईलची किंमत 9,499 रुपये ठेवली आहे तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. पहिल्या सेल मध्ये ग्राहकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे म्हणजेच तुम्ही अवघ्या 8,499 रुपयांत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. ग्राहक 499 रुपयांमध्ये या मोबाईलचे परी बुकिंग करू शकतात.

अधिक वेग असल्यास आता आपोआपच थांबणार ट्रेन; ‘या’ मार्गावर बसवण्यात आली कवच प्रणाली

मागच्या काही दिवसांमध्ये ट्रेन अपघातांच्या संख्येत लक्षणीय रित्या वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेलवे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे ट्रॅक वर कवच प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत देशात पहिल्यांदाच एका मार्गावर ही कवच प्रणाली बसवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया…

देशातील पहिला कवच ट्रॅक

सवाई माधवपूर आणि कोटा दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आता अपघात रोखणारे कवच नियंत्रण बसवण्यात आले आहे. रेल्वेने येथील स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम कवच 4.O स्थापित केल्याने असे कवच लावलेला रेल्वेचा हा देशातील पहिलाच ट्रॅक ठरलाय.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन 4.O प्रणालीची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः चाचणी घेणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्री आज मंगळवारी सवाई माधवपुर ते समीर गंज मंडी असा प्रवास करणार आहेत. 4.O ही पूर्णपणे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहे जी रेल्वे अपघात रोखण्यासाठी जीवन रक्षक ठरणार आहे. ट्रेनच्या सुरक्षित संचलनासाठीही याचा उपयोग होईल 108 किलोमीटर अंतरावर ही सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे.

या प्रणालीकरिता या मार्गावर 130 टॉवर उभारण्यात आले आहेत. ऑप्टिकल फायबर केबर टाकण्यात आली आहेत . 178 सिग्नलिंग इंटरफेस आणि एस पी एल एस नेटवर्क तयार करण्यात आले4.O निर्दोष ऑपरेशनसाठी अनेक चाचण्या देखील घेण्यात आल्यात. तसेच 78 कवच भवनची निर्मिती देखील करण्यात आली आहे.

नेमके काय होणार

आता तुम्ही विचार करत असाल ट्रेनचा वेग अधिक असल्यास ट्रेन आपोआप कशी काय थांबणार? तर याचे उत्तर जाणून घेऊया… ट्रेनचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा दोन किलोमीटर प्रतितास आणि ओलांडल्यास कवच ओवर स्पीड अलार्म वाचवेल ट्रेनचा वेग तशी पाच किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर आपोआप ब्रेक लावले जातील आणि तशी नऊ किलोमीटरचा वेग असेल तर इमर्जन्सी ब्रेक लावले जातील.

कवच इंटरलॉकिंग सिस्टीम मधून पुढील सिग्नल वाजेल आणि तो रेडिओ लहरीद्वारे इंजिन वर दिसेल त्यामुळे पायलेटला 160 किलोमीटर वेगाने सिग्नल वाचण्याची सोय होईल. त्याला लाईन वरील सिग्नल वर अवलंबून राहावं लागणार नाही. एवढेच नाही तर जर लोकोपायलट नेही ट्रेन चालवताना काही चूक केली तर यंत्रणा ताबडतोब अलर्ट करेल आणि आणीबाणीच्या परिस्थितीतही ब्रेक लावेल.

लोहगाव विमानतळाला मिळणार तुकोबांचे नाव ; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

pune airport

लोहगाव विमानतळ अशीच आजपर्यंत ओळख असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आता जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी होणार आहे. नामकरणाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. केंद्रीय सहकार तसेच नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा दिलेला प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात दिली होती.त्यानंतर अगदी एका दिवसातच राज्याकडून या नामकरणाचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

याबाबत एका माध्यमाला माहिती देताना मोहोळ यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव देण्याचं भाग्य मिळाले हे मोठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. लोहगाव हे संत तुकाराम महाराजांचं आजोळ होतं. त्यांच्या प्रत्येक कीर्तनात लोहगाव मधील चार टाळकरी असायचे. त्यामुळे विमानतळाचे असं नामकरण करण्यामागं औचित्य ही आहे. या विमानतळाला यातून एक वेगळी ओळख मिळणार आहे. असे मोहोळ म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ” हा प्रस्ताव मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन दिला त्यांनी याला लगेच संमती दिली. त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला आज मंजूरी मिळाली. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे जाईल. तिथेही मंजुरी मिळून लगेचच विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं प्रचलित होईल अशी माहिती मोहोळ यांनी दिली.