BSNL Recharge Plan । एअरटेल, जिओ आणि वोडाफोन- आयडिया सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा बीएसएनएल कडे वळला आहे. मागच्या २ महिन्यात अनेक ग्राहकांनी आपलं सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच….. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एक रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी तब्बल ५२ दिवसाची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केला कि तुम्हाला ५२ दिवस टेन्शन नाही.
298 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – BSNL Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा 298 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.. ज्या वापरकर्त्यांना कामापुरते इंटरनेट लागत त्या ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) बेस्ट पर्याय ठरेल. 298 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 1GB इंटरनेट डेटा, १०० एसएमएसची सुविधा मिळते. खास गोष्ट म्हणजे तब्बल ५२ दिवस तुम्ही या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.
जास्त व्हॅलिडिटी असलेला बीएसएनएलचा आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे ज्याची किंमत 485 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी तब्बल 82 दिवसांची आहे. या कालावधीत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डाटा, अमर्यादित कॉलिंग असेल तर 100 एसएमएस फ्री मिळतात. त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड नेटवर्क मार्फत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंग यांचा देखील समावेश असतो.
दरम्यान, मागील काही महिन्यापासून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे. 2025 च्या मध्यापर्यंत BSNL चे जवळपास एक लाख नवीन 4G टॉवर्स बसवले जाणार आहेत. तसेच या देशातील 25000 गावे याद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये देखील दूरसंचार सुविधा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. अजूनही अनेक गावांमध्ये BSNL ची सुविधा उपलब्ध नाही. परंतु 2025 च्या मध्यापर्यंत सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात Samsung Galaxy M55s 5G नावाचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 12GB रॅम, 50MP कॅमेरा सह या मोबाईल मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Samsung Galaxy M55s 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला फुल HD + रिझोल्यूशन, 2400×1080 पिक्सल रिझोल्युशन आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा मोबाईल Android 14 वर आधारित OneUI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
कॅमेरा – Samsung Galaxy M55s 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M55s 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतोय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2 सपोर्ट आहे. हा मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
Samsung Galaxy M55s 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. या किमतीत 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल मिळतो. हा मोबाईल काळया आणि हिरव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. Amazon, Samsung.in आणि Samsung Exclusive Stores वर येत्या 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. SBI क्रेडिट कार्ड वर ग्राहकांना 2,000 रुपयांची झटपट सूट मिळतेय.
देशभरात मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची मोठी महत्वाची भूमिका आहे. परिणामी उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आता पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. याच्या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया…
2633 हेक्टर जमीन संपादित करणार
या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008 च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर कर आकारण्यात येणार आहे. तर या मार्गासाठी 2633 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुण्यापासून शिरूर पर्यंत उन्नत म्हणजेच एलिव्हेटिव्ह रोड बांधण्यात येईल तो 53 किलोमीटरचा असेल आणि तो ग्रीनफिल्ड मार्गाशी जोडला जाईल. तसंच ग्रीनफिल्ड मार्ग हा छत्रपती संभाजी नगर नजीक समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
समृद्धीला जोडला जाणार मार्ग
सध्याचा जो शिरूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग आहे त्याच्या बहुतांश समांतर ग्रीनफिल्ड मार्ग असणार आहे. पण शिरूर, अहमदनगर, पैठण, बिडकीन, येथून पुढे छत्रपती संभाजी नगरच्या शेंद्रा एमआयडीसी येथे त्याचा शेवट होणार आहे. शेंद्रा एमआयडीसी मार्ग तो समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. एमआयडीसी मधील बिडकीन आणि शेंद्रा या दोन्ही औद्योगिक वसाहतींना हा महामार्ग सोडला जाणार आहे. त्यामुळे औद्योगिक प्रगतीला वाव मिळणार आहे.
7 हजार 515 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पुणे ते शिरूर हा उन्नत मार्ग सात हजार 515 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे या प्रकल्पाच्या खर्चाची 70 टक्के रक्कम वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्जाद्वारे तर 30 टक्के रक्कम ही संस्थात्मक कर्जाद्वारे उभारले जाणार आहे. याबाबतची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे.
पुण्यातून केवळ 2 तासांत संभाजीनगर
प्रस्तावित मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि संभाजीनगर या दोंन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शिवाय हा मार्ग दोन्ही शहरातल्या औद्योगिक, शेती, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे साहजीकच या दोन्ही शहरातल्या अर्थकारणावर याचा परिणाम होणारआहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व्हाव, त्यांचे सबलीकरण व्हावं, महालाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्यातील महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजना माहित असेल, परंतु या योजनेशिवाय अजूनही काही योजना महिलांसाठी राबवण्यात येत आहेत त्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. यामध्ये अन्नपूर्णा योजना, लाडकी लेक योजना, यांसारख्या योजनांचा समावेश आहे. “ज्या देशात स्त्री प्रगत असते, तो देश वेगाने प्रगत होतो”हा नियम आहे . जगभरात विकसित झालेली राष्ट्रे या नियमाचे पालन करूनच प्रगत झालेली आहेत. हे लक्षात घेऊन केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात महायुती सरकार यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाकडे, सबलीकरणाकडे आर्थिक उन्नतीकडे शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. डीबीटीमुळे ही रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा होत आहे. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून बहुसंख्य महिलांना योजनेचे पहिले दोन हप्ते प्राप्त झाले आहेत. काहीही झाले तरी ही योजना बंद केली जाणार नाही असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
आर्थिक अडचणीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने साडेसात लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागडे व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत मिळणार आहे. स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे असे पाऊल आहे. या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील मुली सुद्धा चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतील अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अन्नपूर्णेसाठी “अन्नपूर्णा”
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात सतत बदलणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरामुळे घरगुती गॅसचे दर सतत बदलत असतात. गॅसच्या किमती वाढल्या कि गृहिणीचे बजेट कोलमडत आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील महिलांना प्रतिवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. कुटुंबाची आर्थिक कसरत सांभाळणाऱ्या महिलांसाठी हा मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उज्वला योजनेचे अंतर्गत मोफत गॅस जोडणी दिल्यामुळे चुली फुंकणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी चुलीच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार होत असत. केंद्राच्या उज्वला योजनेअंतर्गत महिलांच्या घरात गॅस जोडणी देण्यात आली आणि त्यामुळे श्वसनाच्या विकारातून अनेकांची मुक्तता झाली, असे वैद्यकीय अभ्यासकांचे मत आहे . सर्वाधिक व्याजदर देणारी सुकन्या समृद्धी योजना देखील प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.
सवलती तरीही आर्थिक शिस्त
सवलती देताना राज्याची आर्थिक स्थिती बिघडणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे. कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू केला. त्यामुळे परिवहन महामंडळ तोट्यात गेले आणि तो तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारला महसुलाचे अन्य पर्याय शोधणे भाग पडले आणि त्यातून महागाईचा वरवंटा राज्याच्या जनतेवर फिरला. महाराष्ट्र सरकारने मात्र असे काही होऊ दिलेले नाही. सरकारने महिलांना 50% सवलतीच्या दरात बस प्रवास योजना सुरू केली आहे. त्याला महिलांचा मोठा प्रतिसाद ही मिळत आहे. विशेष म्हणजे अशी सवलत देऊन सुद्धा राज्य परिवहन महामंडळगेल्या नऊ वर्षात प्रथमच फायद्यात गेले आहे.
“लेक लाडकी” योजनेमुळे मुलींचा जन्मदर स्थिरावणार
महायुती सरकारची लेक लाडकी योजना ही देखील मुलींचा जन्मदर उत्तम राखण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख रुपये दिले जातात. महिलांना राजकीय क्षेत्रात संधी मिळावी यासाठी विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामुळे घर आणि संसार सांभाळणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी सभागृहात समाजाचा आवाज आणखी बुलंद करू शकतील. तसेच सरकार दरबारी पूर्ण नाव लिहिताना आईचे नाव लिहिण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या सन्मानात आणखी भर पडली आहे.
महिलांच्या आयुष्याला मिळणार स्थैर्य
मातृत्व ही महिलेला मिळालेली सर्वात मोठी नैसर्गिक देणगी आहे. यापूर्वी मातृ रजा आणि बाळंतपणात बारा आठवड्यांची सुट्टी देण्यात येत होती आता ही सुट्टी 26 आठवड्यांची करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सामान्य सामान्य वर्गातील नागरिकांना घरी उपलब्ध करून देण्यात आली. . डोक्यावर छप्पर नसणाऱ्या असंख्य कुटुंबांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आता या योजनेत एक नावा बदल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधली जाणारी घरे कुटुंबातील महिलेच्या नावाने करण्यात येत आहेत त्यामुळे महिलांच्या जीवनाला स्थैर्यआणि सन्मान देखील प्राप्त झाल्याचे मत व्यक्त होत आहे.
तिहेरी तलाकच्या जाचातून मुक्तता
केंद्र सरकारने जात-पात धर्म न पाहता महिलांच्या उद्धारासाठी आणि उत्कर्षासाठी तसेच स्थैर्यासाठी निर्णय घेतले. तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय त्यापैकीच एक आहे. पूर्वी अगदी मोबाईल वरून एसेमेस पाठवून तीन वेळा “तलाक” लिहून महिलांना वाऱ्यावर सोडले जात होते. या निराधार स्त्रियांच्या आयुष्याची पुढे होलपट होत होती. मात्र धार्मिक दबाव झुगारून केंद्र सरकारने तिहेरी त्याला रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि मुस्लिम समुदायातील महिलांची मोठ्या संकटातून मुक्तता झाल्याची भावना या वर्गातून व्यक्त करण्यात येते.
महिला हा समाजाचा सर्वात मोठा घटक आहे. एकूण लोकसंख्येचे निम्मे इतके प्रमाण असणारा हा वर्ग देशाच्या एकूण स्थितीवर मोठा परिणाम करीत असतो. रोजगाराच्या, शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी, उत्तम आरोग्य, मानसिक स्थैर्य महिलांना लाभले तर देश वेगाने प्रगती करू शकतो. जातपात धर्म अशा पारंपारिक राजकारणाला बगल देऊन केंद्र आणि राज्यातील भाजप प्रणित सरकारने महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी योजना आखल्याची भावना महिला वर्गात प्रबळ झाली आहे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडिया आजकाल इतके प्रसिद्ध झाले आहे की, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज तसेच फोटो टाकले जातात. सोशल मीडियाकडे एक मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. यातून लोक बरेच प्रसिद्ध होतात. पण प्रसिद्ध होण्यासोबत ते चांगला पैसा देखील कमवतात. अनेक लोक हे युट्युब वरूनच करोडो रुपये कमावतात. आणि आजकाल अनेक लोकांनी youtube चॅनल चालू केलेले आहेत. आणि त्या माध्यमातून ते पैसे घेतात. youtube ची संख्या आणि व्हिडिओवर दिसणाऱ्या जाहिरात किती लोकांनी पाहिली? यावर तुम्हाला किती पैसे मिळतील? ह्या अवलंबून असते. ज्यावेळी आपल्या सबस्क्राईबर वाढले जातात. त्यावेळी आपल्या youtube कडून पाच प्रकारच्या रिवॉर्ड प्लेबॅटन दिले जातात. हे रीवार्ड प्ले बटन कशा पद्धतीने दिले जातात? आणि त्यातून आपल्याला किती फायदा आहेत होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत. youtube कडून तुम्हाला सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन, डायमंड प्ले बटन, रुबी प्ले बटन आणि रेड प्ले बटन मिळतात. आता यातून युजर्स किती पैसे कमवतात? हे आपण जाणून घेऊया.
Youtube ची प्ले बटन कधी पासून दिली जातात?
Youtube मे 2010 पासून त्यांच्या युजर्सलाही प्ले बटन देण्यास सुरुवात केलेली आहे. या आधी केवळ सिल्वर आणि गोल्डन प्ले बटन दिली जात होती. परंतु हळूहळू यूजरची संख्या वाढत गेली आणि youtube ने पाच प्रकारचे रिवर बटन लॉन्च केले. आता ही बटन कधी दिली जातात हे आपण जाणून घेऊया.
सिल्वर प्ले बटन
Youtube युजर्सला सगळ्यात पहिल्यांदा हे सिल्वर प्ले बटनचा रिवार्ड दिले जाते. जेव्हा कोणताही सदस्य त्याच्या youtube चॅनेलचे 1 लाख सबस्क्राईब करून करतो त्यावेळी youtube कडून त्याला सिल्वर प्ले बटन दिले जाते.
गोल्डन प्ले बटन
गोल्डन प्ले बटन हे youtube कडून दिले जाणारे दुसऱ्या रीवार्ड प्ले बटन आहे. जेव्हा एखाद्या युट्युब चॅनेलचे 10 लाख सबस्क्राइबर पूर्ण होतात. तेव्हा हे बटन दिले जाते.
डायमंड प्ले बटन
डायमंड प्ले बटन हे youtube कडून दिले जाणारे तिसरे रिवॉर्ड प्ले बटन आहे. जेव्हा एखाद्या यूट्यूब चॅनलची सदस्यांची संख्या ही एक कोटी पर्यंत पोहोचते. तेव्हा युट्युबकडून हे बटन दिले जाते.
रुबी प्ले बटन
युट्युबकडून दिले जाणारे हे चौथे सर्वात मोठे रीवार्ड प्ले बटन आहे. जेव्हा एखाद्या youtube chanel वर पाच कोटी सबस्क्राइबर पूर्ण होतात. त्यावेळी youtube कडून हे बटन दिले जाते.
रेड प्ले बटन
रेड प्ले बटन या youtube कडून दिले गेलेले सर्वात मोठे रीवार्ड प्ले बटन आहे. जेव्हा कोणत्याही सदस्याची युट्युबवर दहा कोटी पेक्षा जास्त सबस्क्राईबर होतात. त्यावेळी youtube कडून हे सर्वात मोठे प्ले बटन दिले जाते.
पैसे कसे कमवायचे ?
यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना, जाहिराती येतच असतात. YouTube स्वतः या जाहिरातींमधून पैसे कमावते आणि निर्मात्याला काही हिस्सा देखील देते. यूट्यूबवर एक हजार लोकांनी जाहिरात पाहिली असेल तर यूट्यूब त्या निर्मात्यांना 100-200 रुपये देते. ज्या लोकांकडे सिल्व्हर प्ले बटण आहे ते दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकतात. जर सोनेरी बटण असेल तर तुम्ही आणखी कमाई कराल. तुमच्याकडे असलेल्या प्ले बटणांची संख्या वाढल्याने तुमची कमाई देखील वाढेल. जाहिरात निर्माते ब्रँड प्रमोशन, ब्रँड प्रायोजकत्व, उत्पादन प्लेसमेंट, संलग्न विपणन याद्वारे देखील कमाई करू शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. लिव्हर म्हणजेच यकृत देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. यकृत हे सामान्यता डेटिफिकेशन करण्याचे काम करत असते. आपण जे जेवण जेवतो, पाणी पितो तसेच वेगवेगळी औषधे खातो. शरीरामध्ये दररोज पचन केले जाते. म्हणजेच टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरावर टाकले जातात. आपण जे पदार्थ खातो. त्यासाठी लिव्हर आधी ते पदार्थ डिटॉक्सिफाय करतात. आणि त्यानंतर ते पदार्थ आपल्या शरीरावर टाकले जातात. परंतु जर फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या निर्माण झाल्या, तर लिव्हर त्याचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडत नाही. यामुळे शरीरातील डिटॉक्सिफाय करण्याची प्रक्रिया नीट होत नाही. आणि आपल्या शरीरासोबत मानसिक स्वास्थ देखील बिघडते.
तुमच्यामध्ये जर ऊर्जा कमी पडत असेल, तसेच तुमचे पचन नीट होत नसेल, मूड सारखा बदलत असेल तर ही सगळे लक्षणे यकृतासंबंधित असू शकतात. जळजळ यावर देखील नियंत्रित करते परंतु जेव्हा आपण जास्त ताण तणावांमध्ये असतो. तेव्हा कोर्टीसोलचे उत्पादन वाढते. आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. ज्यामध्ये यकृत देखील असते. म्हणजेच यकृत आणि नैराश्य यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते आपण जाणून घेऊया.
चयापचय
कॉर्टिसोलच्या जास्त प्रमाणात चरबी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे चयापचय प्रभावित होते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, चरबी आणि साखरेची पातळी वाढते. त्यामुळे यकृतावर चरबी जमा होऊ लागते, त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या सुरू होते.
व्यसन
तणावाखाली, लोकांना बरे वाटण्यासाठी अनेकदा दारू, सिगारेट किंवा ड्रग्सचे व्यसन लागते. त्याचा थेट परिणाम यकृतावर होतो आणि ते विषाप्रमाणे यकृतावर विष जमा करते. हे व्यसन थेट यकृताला हानी पोहोचवते आणि ते घातकही ठरू शकते.
थकवा
यकृत ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते आणि फॅटी यकृतामुळे ऊर्जा उत्पादनात अडथळा येतो. यामुळे एखाद्याला कमी ऊर्जा जाणवते, काम करण्याची इच्छा नसते, दैनंदिन कामे पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो.
हार्मोनल असंतुलन
यकृत अनेक संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करते, परंतु फॅटी यकृतामुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे तणावाची प्रतिक्रिया वाढते आणि भावनिक संतुलन बिघडते. यामुळे मूड स्विंग, चिंता आणि नैराश्य येते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या गोळीबारात एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते, तेव्हा त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या चकमकीत अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र वेगळीच शंका उपस्थित केली आहे.विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही मात्र अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा संशयास्पद आहे असं आव्हाडांनी म्हंटल. एवढच नव्हे तरं अक्षयला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असं म्हणत शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच 3 गोष्टी घडल्या.
FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
पोलिसांवर दबाव
शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न
हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो- Akshay Shinde Encounter
“या सगळ्यानंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप आव्हाडांनी केला आहे. “हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू नका,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) केला. ही लोकशाही आहे. यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत पॉलिटीकल हिरोइजम आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे,” असा आरोपही आव्हाडांनी केला आहे. “महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल.
दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला ३ सवाल केले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Weather Update | बऱ्याच काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा राज्यात जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या दोन-चार दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहेत. अशातच आता हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दिवसांमध्ये मुसळधार स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने आज म्हणजे 24 सप्टेंबर रोजी पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणावरील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देखील दिलेला आहे.
हवामान विभागाला दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये आहे. म्यानमारच्या किनारपट्टीवरील हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बंगालच्या सगळ्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन महाराष्ट्राच्या दिशेने वारे येत, असल्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस (Weather Update) पडणार आहे.
दरवर्षी सामान्यता मान्सून हा 17 सप्टेंबरच्या आसपास माघारी फिरत असतो. परंतु 23 सप्टेंबरपर्यंत किंवा त्यानंतरही कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच आणखी पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये देखील पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली नांदेड या ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे.
त्याचप्रमाणे 25 सप्टेंबरला देखील रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच 26 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Akshay Shinde Encounter) असं सांगण्यात येत आहे. मात्र या अचानक घडलेल्या घटनेनं विरोधकांनी मात्र सरकारवरच आवाज उठवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ट्विट करत राज्य सरकारला ३ सवाल केले आहेत. तसेच या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
नाना पटोलेंचे सवाल काय आहेत? Akshay Shinde Encounter
बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही?
फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का?
हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अक्षय शिंदेच्या एंकॉउंटर वरून (Akshay Shinde Encounter) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला का? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते असं म्हणत अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकाकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातील सर्व पक्षांच्या राजकीय हालचालींनी चांगलाच वेग पकडला आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे आणि असे विविध खात्यांचे 24 महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत चला तर मग जाणून घेऊया.
मंत्रिमंडळाचे 24 निर्णय
सामान्य प्रशासन : सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे
.महिला व बाल विकास : महिला व बाल विकास विभागासाठी बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
अन्न नागरी पुरवठा : अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत .धान उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
इतर मागास बहुजन कल्याण : कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
विधी व न्याय : जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
सार्वजनिक बांधकाम : शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. 1486 कोटीचा प्रकल्प
वित्त : करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा
वस्त्रोद्योग : यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
महसूल : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड
ग्राम विकास : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
ग्राम विकास : राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ (ग्रामविकास)
सार्वजनिक बांधकाम : मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
ऊर्जा : हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार
परिवहन : एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
नियोजन : . ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ , राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
कौशल्य विकास : राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण
उच्च व तंत्रशिक्षण : छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये
क्रीडा : अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा
जलसंपदा : जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी
महसूल : श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार
दूग्ध व्यवसाय विकास : दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान
सांस्कृतिक कार्य विभाग : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर