Thursday, December 25, 2025
Home Blog Page 451

Kas Pathar : कास पठार बहरलं ! पर्यटकांची गर्दी , प्रशासनाचीही दमछाक

Kas Pathar : सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होते आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठार आता फुलांनी बहरून गेले आहे. त्यामुळे विकेंडला कास पठार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे पाहायाला मिळाले. २१ आणि २२ तारखेला कसा पठार पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी (Kas Pathar) केली होती.

बघ्यांची गर्दी अन प्रशासनाची दमछाक (Kas Pathar)

जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेलं कास पठार आता सध्या फुलांनी भरून गेल्यामुळे पर्यटकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. मात्र कास पठाराला जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी येथे झाली होती. या गर्दीला आवरताना मात्र प्रशासनाची मोठी दमछाक होताना पाहायला मिळाली. दुसरीकडे पर्यटकांना बुकिंग मशीन बंद करून ठेवून तुम्ही कुठेही जा पण पठारावर प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका घ्यावी लागल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाइन बुकिंग करून साधारणपणे तीन हजार लोक इथे येतात. तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या 5000 च्या वरती होती. एकूण 10 हजारांपेक्षा अधिक पर्यटक एकाच दिवशी कास पठारावर आल्यानं नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि व्यवस्थापन समितीने ऑफलाईन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्यामुळे आणि पार्किंगची जागा फुल्ल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाड्या लावत पठारावर चालत जाणं अनेकांनी पसंत केलं. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीच्या (Kas Pathar) समस्येला सामोरे जावं लागलं.

अजूनही फुले पाहण्याची संधी

सध्याची परिस्थिती पाहता कास पठारावर जिथे तिथे फुलांचे गालीचे तुम्हाला पाहायला मिळतील अजूनही ही फुलं तुम्हाला पाहण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस पाहून अनेक (Kas Pathar) पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. कास पठारावर एका व्यक्तीसाठी 150 रुपये इतका प्रवेश शुल्क आकारला जातो.

कसे कराल बुकिंग? (Kas Pathar)

कास पठाराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर http://www.Kas.ind.in या वेबसाईटवर बुकिंग करणं गरजेचं आहे. तसंच जास्तीत जास्त ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करून जावे.

कास पठार साताऱ्यापासून 25 किलोमीटर, महाबळेश्वर पासून 37 किलोमीटर आणि पाचगणी पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. इथं फुलांच्या 800 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. तर हे पठार तब्बल 1000 हेक्टर क्षेत्रामध्ये (Kas Pathar) पसरलेले आहे.

फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ (Kas Pathar)

कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणांपैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदांसमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले. त्यातलं कास हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक (Kas Pathar) वारसा स्थळ आहे.

मनोज जरांगेंची मागणी योग्य; आरक्षणाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा

sharad pawar jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण (Maratha Aarakshan) मिळावे हि मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगेंची मागणी योग्यच आहे असं म्हणत पवारांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर मत मांडलं. आमच्या पक्षाची भूमिका नेहमी हीच आहे कि आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र हा पाठिंबा देत असताना इतर जे लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाज आरक्षण मागत आहे त्यात काही चुकीचे नाही. मराठा समाजाचे वैशिष्ट हे आहे कि हा समाज इतर सर्व जाती- धर्माना सोबत घेणारा समाज आहे. शिवछत्रपतींनी १८ पगड जातीच्या जनतेला सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं, तीच भूमिका आज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका हि योग्य आहे, पण हे करत असताना इतर समाजाचा सुद्धा विचार करावा अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडल्याचे शरद पवारांनी सांगितलं. हाच आमचाही आग्रह असल्याचे शरद पवार यांनी म्हंटल.

यावेळी शरद पवार याना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा सवाल केला असता त्यांनी १९७७ च्या राजकारणाचे उदाहरण दिले. विधानसभा निवडणुकीत आम्ही निवडून आलो तर एकत्र बसून निर्णय घेऊ आणि एक सक्षम नेता राज्याला देऊ असं म्हणत शरद पवारांनी १९७७ सालचं उदाहरण दिले. १९७७ साली आणीबाणीनंतर देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेने समविचारी पक्ष एकत्र आले आणि निवडणुकीला सामोरे गेले. लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. आम्ही जेव्हा लोकांकडे मतं मागितली तेव्हा मोरारजी देसाई हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते. आम्ही कधीही लोकांना सांगितलं नव्हतं की अमुक नेता आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल. तरीदेखील लोकांनी आम्हाला शक्ती दिली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी देश चालवला. असा अनुभव पवारांनी सांगितला.

राज्यातील 14 ITI कॉलेजचे नाव बदलणार; मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

ITI College

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक वेगवेगळ्या नियम बदलताना आपल्याला दिसत आहे. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आणि बैठकीमध्ये राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता सगळ्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. तसेच या बैठकीत घेतलेला एक सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे राज्यातील 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयचे नाव बदलण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. या महाविद्यालयांना महापुरुषांचे आणि जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

शासन या 14 आयटीआय कॉलेजला 14 महान व्यक्तींची नावे देण्यात येणार आहेत, असे सांगितलेले आहे. यामध्ये त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिलेले आहे. तर बीडमध्ये आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे यांचे नाव देण्यात आलेले आहे.

आज मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीमध्ये घेण्यात आलेला हा एक मोठा निर्णय आहे. राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. आयटीआय कॉलेजला नाव देताना त्यांनी आज सामाजिक आणि जातीय गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि त्यानुसार हे नाव दिलेले आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एलफिंटन्स महाविद्यालयातील आयटीआयला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव दिलेले आहे. तसेच कोल्हापूरच्या आयटीआय राजश्री शाहू महाराजांचे नाव दिलेले आहे. तसेच बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव दिलेले आहे.

कोणत्या आयटीआयला कोणाचं नाव दिलं ?

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव – आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड – कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. – भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक – पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती – संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव – कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा – दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. – महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

म्युच्युअल फंडात केवळ 100 रुपयाची करता येणार गुंतवणूक; LIC आणणार खास SIP योजना

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भविष्याचा आणि महागाईचा विचार करून आजकाल प्रत्येकजण काही ना काही रक्कम गुंतवणूक करून ठेवत असतात. अनेक लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यामुळे अनेकांना यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. परंतु आता याबाबत चिंता करण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही लवकरच एक स्वस्तात एसआयपी चालू करू शकता. आणि LIC लवकरच याबाबत एक नवीन योजना देखील आणणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. 2024 मध्ये म्युच्युअल फंडामध्ये जवळपास 23 हजार कोटींपेक्षा जास्त लोकांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे आजकाल लोकांना गुंतवणुकीचे महत्त्व देखील चांगलीच समजलेले आहे. परंतु कमी उत्पन्न असूनही अनेक लोकांना गुंतवणूक करता येत नाही. परंतु आता छोट्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगली बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एलआयसी म्युच्युअल फंड यांनी लहान रकमेची एसआयपी आणण्याची योजना केलेली आहे. ही कंपनी दररोज 100 रुपयांची एसआयपी सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. तसेच फंड हाऊसमध्ये सध्याची मर्यादा 300 रुपये आहे. याबाबतची माहिती कंपनीचे एमडी आणि सीईओ यांनी दिलेली आहे.

LIC हे लहान एसआयपीचे समर्थन करत आहे. लहान रकमेची एसआयपी सुरू केल्यावर जास्तीत जास्त लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि त्याचा फायदा तळागळातील अगदी कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना देखील करता येईल. आणि भविष्यासाठी ते काही ना काही गुंतवणूक करू शकतात. एलआयसी म्युच्युअल फंडाचे सध्याचे किमान एसआयपी रकमेची मर्यादा ही दैनिक 100 रुपये आणि मासिक 200 रुपये करण्याची योजना करत आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला जावा. हाच या योजनेमागील खरा उद्देश आहे.

एसआयपी म्हणजे काय ?

एसआयपीचा फुल फॉर्म सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असा आहे. हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. एसआयपी द्वारे गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. ती रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा होते. परंतु यातून तुम्हाला खूप चांगला नफा मिळतो.

Cibil Score | नकळत केलेल्या ‘या’ चुकांमुळे सिबिल स्कोर होतो खराब; जाणून घ्या सविस्तर

Cibil Score

Cibil Score | आर्थिक व्यवहार करताना आपला सिबिल स्कोर (Cibil Score) चांगला असणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर सिबिल स्कोरकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आपल्याला कधी कधी पूर्ण माहिती नसल्यामुळे कळत न कळत आपल्याकडून अशा काही चुका होतात. ज्यामुळे आपला सिबिल स्कोर खरा होतो. त्यामुळे कोणतीही बँक आपल्याला कर्ज देत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज हवे असेल, तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे.खूप गरजेचे आहे यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे ईएमआय आहे. अगदी वेळेत भरले पाहिजे. तुमचे जर ईएमआय भरला नाही किंवा तो भरण्यास उशीर झाला. तरी देखील तुमचा सिबील स्कोर खराब होऊ शकतो.

त्याचप्रमाणे जर तुम्ही एखादे खूप मोठी कर्ज घेतले, तरी तुमच्या सिबिल स्कोर(Cibil Score) खराब होतो. तुमच्याकडे जर अगोदरच एखादी कर्ज आहे. आणि तुम्ही जर आणखी एखादे कर्ज मागितले, तर ते तुम्ही फेडू शकत नाही. असे बँक गृहीत धरते आणि तुमचा आपोआपच खाली होऊ लागतो. त्यामुळे एका वेळी एकच कर्ज घ्यावे आणि ते कर्ज पूर्णपणे सुटल्यावर दुसऱ्या कर्जासाठी अप्लाय करा.

त्याचप्रमाणे अनेक लोक आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग देखील करतात. परंतु याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर देखील होतो. तुम्ही जर तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तरी देखील तुमच्या सिव्हिल स्कोर कमी होतो. तुम्ही जर सतत क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अर्ज करत असाल, तरी देखील तुमच्या सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही जर अनेक वेळा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला, तर बँक तुमच्या खात्याची हार्ड इन्क्वायरी करते आणि तुमचा कमी सिबिल स्कोर कायमस्वरूपी तसाच राहतो.

त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या क्रेडिट कार्ड घेतले असेल, आणि ते मध्येच बंद केले, तरी देखील सिबील स्कोर कमी होतो. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आपोआप कमी होते. आणि क्रेडिट युटीलायझेशन रेशो वाढतो. तुम्ही जर योग्य कालावधीमध्ये तुमच्या कर्जाची परतफेड केली नाही, तर तुमचा सीबील सकोर कमी होतो. परंतु हा सिबिल स्कोर एका ठराविक मर्यादेपर्यंत कमी होतो. आणि पुन्हा एकदा तो सिबील स्कोर वाढतो.

मुंबईची कोंडी फुटणार ! ‘मिनिटांत मुंबई’, 7 रिंग रोड, काय आहे MMRDA चा मास्टर प्लॅन ? जाणून घ्या

mumbai ring road

देशाची आर्थिक राजधानी, कधीही नं झोपणारं शहर, चंदेरी दुनिया, अशी अनेक बिरुदं मिरवलेलं मुंबई हे शहर आता गर्दीने गच्च भरलेलं, तासंतास वाहतूक कोंडीमध्ये अडकणारं शहर ही मुंबईची विरोधी ओळख होऊ लागली आहे. काही कामानिमित्त्त बाहेर पडायचे झाल्यास २ तास आधी बाहेर पडले तरच व्यक्ती दिलेल्या वेळेत पोहचू शकतो अशी मुंबईची अवस्था झाली आहे. मुंबईची हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने खास योज़न तयार केली असून यासाठी MMRDA ने तब्बल ५८,५१७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे चला जाणून घेऊया…

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नेमकं काय ?

आता तूम्हालाही प्रश्न पडला असेल कोंडी फोडणार म्हणजे नेमके काय ? तर मुंबईतील ट्राफिक कमी करण्यासाठी या योजनेअंतर्गत मुंबईत 90 किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार असून यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भूयारी मार्गांचा समावेश असणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत. हे सातही रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर 59 मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकणार आहेत. याबरोबरच मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे.

याबाबत माहिती देताना एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की , या प्रकल्पांद्वारे मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. मुंबईकर एका तासाच्या आत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. आम्ही ही योजना मांडताना ‘मिनिटांत मुंबई’ असं म्हणतो याचा अर्थ मुंबईकरांना कुठेही जाण्यासाठी ५९ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लगता कामा नये.

रिंग रोड आणि मार्ग

  • पहिला रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – कोस्टल रोड – वरळी – शिवडी कनेक्टर – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल –नरीमन पॉईंट असा असेल.
  • दुसरा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड – पश्चिम द्रुतगती महामार्ग
    -पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल
  • तिसरा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – पश्चिम द्रुतगती महामार्ग – जेव्हीएलआर – कांजुरमार्ग जंक्शन – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • चौथा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – गोरेगाव मुलुंड लिंक रोड – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • पाचवा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – भायंदर फाउंटेन कनेक्टर – गायमुख घोडबंदर टनल – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर – साकेत फायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • सहावा रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – मीरा भायंदर लिंक रोड – अलिबाग विरार कॉरिडोर – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर साकेत फ्लायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.
  • सातवा (आऊटर) रिंग रोड नरीमन पॉईंट येथून सुरु होऊन नरीमन पॉईंट – वर्सोवा दहिसर भयंदर लिंक रोड – उत्तण लिंक रोड – वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे – अलिबाग विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर – अटल सेतू जेएनपीटी – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट असा असेल.

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी!! लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी पैसे जमा होणार

Ladki Bahin Yojana 3rd Installation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये अजूनही महिलांना मिळाले नाहीत. परंतु आता येत्या २९ तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्या महिलांना ४५०० रुपये देण्यात येतील – Ladki Bahin Yojana

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. ज्या महिलांनी सप्टेंबर पर्यंत अर्ज केले आहेत त्यांना त्या दिवशी १५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्यामुळे त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता . त्या महिलांनाही एकूण ३ महिन्यांचे ४५०० रुपये देण्यात येतील असं आदिती तटकरे यांनी सांगितले. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे. आत्तापर्यंत करोडो महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे, या योजनेमुळे राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं वेगळं पाऊल उचलले आहे, त्यानुसार आता फक्त अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे.

धारणी तालुक्यात नाल्यात बस कोसळून झाला भयावह अपघात ; 6 जण जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण रोज अपघाताच्या बातम्या ऐकत असतो. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे धारणी तालुक्यातील एका गावात नाल्यामध्ये खाजगी ट्रॅव्हल बस उलटली आहे. आणि त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून हाती आलेला आहे. यामध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश होता तसेच या अपघातात काही महिला शिक्षिका जखमी झालेले आहेत. माळ घाटातील विविध शाळांमध्ये हे शिक्षक शिकवत होते. सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेत जाण्यासाठी ते खाजगी बस मधून प्रवास करत होते.

ही बस सकाळी 5:15 वाजता अमरावती अमरावती वरून निघाली होती. परंतु या बसला जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी बस चालकाने ही बस अत्यंत वेगाने पुढे नेली. परंतु सकाळी आठच्या सुमारास गावाजवळील नाल्यात ही बस कोसळली. आणि यामध्ये अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत.यामध्ये धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांचा देखील समावेश आहे.

त्यांचा देखील या अपघातात मृत्यू झालेला आहे. जर लोक जखमी आहेत, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार चालू असल्याची माहिती हातात आलेली आहे. त्याचप्रमाणे या अपघातात सहा जण जागीच ठार झालेले आहे. त्यामुळे सर्वत्र तारांबळ उडालेली आहे. तेथील स्थानिक लोकांनी या कोसळलेल्या बसमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच बसमधील सगळ्या लोकांनाही बाहेर काढले.जे लोक जखमी होते त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ 2 तासांत ! कधीपासून रस्ते कामांना सुरुवात ?

देशभरात मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची मोठी महत्वाची भूमिका आहे. परिणामी उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे. राज्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आता पुण्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. याच्या अंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ही माहिती दिली आहे.

कधी होणार रस्त्याच्या कामांना सुरुवात ?

गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पुण्यातील अनेक कामांचा समावेश असणार आहे. पालखी महामार्गसमवेत विविध रस्त्यांची कामे अन नद्यांवरील पुलांची जवळपास दीड हजार कोटी रुपयांची कामे डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.यासोबतच गडकरी यांनी पुणे रिंग रोड प्रकल्प, एलिव्हेटेड रोड, मुंबई-बेंगलोर, नाशिक रस्ता, पुणे छत्रपती संभाजी नगर रस्ता या कामांच्या निविदा प्रक्रिया सुद्धा अंतिम झाल्या असल्याची माहिती दिली आहे.

पुण्यातून केवळ 2 तासांत संभाजीनगर

प्रस्तावित मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि संभाजीनगर या दोंन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शिवाय हा मार्ग दोन्ही शहरातल्या औद्योगिक, शेती, आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे साहजीकच या दोन्ही शहरातल्या अर्थकारणावर याचा परिणाम होणारआहे.

AI करणार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये मदत; अशाप्रकारे होणार उपचार

AI In Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांचे जीवन शैली बदललेली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत आहे. त्यातही आजकाल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होणे, खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशातच आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील उपचाराबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या मदतीने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देणे आणि त्यावर उपचार करणे खूप सोपे होणार आहे. यासाठी आता इतर देशांना मदत केली जाणार आहे.

कर्करोग हा आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जगभरातील मृत्यूचे मुख्य कारण हे कर्करोग आहे. कॅन्सरचा अंदाज घेतला तर 2024 मध्ये दोन दशलक्ष होऊन जास्त नवीन प्रकरणे आहे. यातील 6 लाख 11 हजार 720 कर्करोगामुळे मृत्यू होतो. कर्करोगचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. परंतु हा कर्करोग वेळेतच ओळखणे आणि त्यावर उपचार घेणे खूप गरजेचे आहे. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ओळखणे खूप सोपे होणार आहे. आता यामध्ये नक्की कोणत्या प्रकारे मदत करणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

कर्करोग काय आहे ? | AI In Cancer

कर्करोग हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरातील काही पेशी वेगाने वाढू लागतात. हा जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे होणारा अनुवांशिक रोग आहे. ट्यूमर उपचारांना कसा प्रतिसाद देतील हे सांगणे कठीण आहे. ट्यूमर असलेल्या कर्करोगाच्या रूग्णांमध्ये समान उपचारांना भिन्न प्रतिसाद असू शकतात.

वैयक्तिक उपचारांमध्ये AI ची भूमिका

कर्करोगाच्या वैयक्तिक उपचारांना गती देण्यासाठी AI खूप उपयुक्त ठरत आहे. कर्करोग शोधणे आणि उपचार करण्यापासून ते ट्यूमर आणि त्यांचे वातावरण, लक्षणे, औषधांचा शोध आणि उपचारांच्या प्रतिसादाचा आणि परिणामांचा अंदाज या सर्व गोष्टींमध्ये AI चा वापर केला जात आहे. ऑन्कोलॉजीच्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे.

भविष्यात कर्करोगाच्या उपचारात AI ची भूमिका

ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. तथापि, सध्या ते कर्करोगाचे निदान आणि तपासणीसाठी वापरले जाते. कर्करोगासाठी स्क्रीनिंग हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि AI या दिशेने खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संपूर्ण शरीर स्कॅन वैद्यकीय प्रतिमा वाढविण्यात आणि विश्लेषणानंतर अहवाल तयार करण्यात AI खूप मदत करत आहे.