Thursday, December 25, 2025
Home Blog Page 455

विमान प्रवास महागला ! ऐन सणासुदीत प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

flight booking

विमानाचा प्रवास हा जलद आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखला जातो. हल्ली अनेक लोक वेळेची बचत करण्यासाठी विमानाने प्रवास करणे पसंत करतात. तुम्ही सुद्धा काही कामानिमित्त किंवा आगामी सणाच्या निमित्ताने विमान प्रवास करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एअरलाइन बुकिंगमध्येही जवळपास दुपट्टीने वाढ झाली आहे.

फ्लाइट बुकिंगमध्ये जवळपास 85 टक्के वाढ

वर्ल्ड ऑन हॉलिडेचा हवाला देत एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीसाठी फ्लाइट बुकिंगमध्ये सुमारे 85 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोक 27 दिवस अगोदर तिकिटे बुक करत आहेत. शिवाय तिकीट भाड्यातही सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या एक आठवडा आधी विमान भाडे दुप्पट झाले होते. यंदाही भाडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, गुवाहाटी, जयपूर, चेन्नई, लखनौ, पोर्ट ब्लेअर आणि पाटणा यांसारख्या ठिकाणांहून एअरलाइन्सला जास्तीत जास्त बुकिंग मिळत आहे.

कोणत्या शहरांचा समावेश ?

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीसाठी सर्वाधिक बुकिंग ३८६ टक्क्यांनी वाढले आहे. यानंतर जयपूरसाठी बुकिंग 306 टक्के आणि पटनासाठी 271 टक्क्यांनी वाढले आहे. इतर शहरांमध्येही बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अग्रगण्य प्रवासी वेबसाइट MakeMyTrip ने ऑगस्टपासून दिवाळीच्या फ्लाइटच्या बुकिंगसाठी विशेष मोहीम सुरू केली होती. लवकरच भाडे वाढणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Bachchu Kadu : राज्यात महाशक्तीचाच मुख्यमंत्री होणार; बच्चू कडूंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

Bachchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. जागावाटप, सभा आणि मेळाव्यांचे आयोजन केलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल असं वाटत असतानाच तिसऱ्या आघाडीमुळे राजकारणातील रंगत आणखी वाढली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना करून महाविकास आघाडी आणि महायुतीला आव्हान दिले आहे. परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीचे नाव आहे. आता तर आम्ही सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असून मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारला ललकारल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने जे निर्णय घ्यायला हवे होते ते घेतले नाहीत. मी १८ मागण्या घेऊन सरकारकडे गेलो होतो, मात्र त्यातील एकही मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार केला नाही. आम्ही तर म्हंटल होते कि तुम्ही आमच्या अर्ध्या मागण्या जरी पूर्ण केल्या तरी मी माझा स्वतःचा मतदारसंघ शिंदे गटाला देईन. मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही. ही एकप्रकारे सरकारची मग्रुरी आहे. अखेर आम्ही दगड ठेऊन ही परिवर्तन महाशक्ती उभी केली आहे. किंबहुना आम्ही जे बोलतो ते पत्थर की लकीर आहे. हि महाशक्ती सरकारला लढा देण्याचे काम करेल असं म्हणत बच्चू कडू यांनी महायुती सरकारला इशारा दिला. आम्ही जनतेला मजबूत पर्याय देऊ, दुसऱ्या कोणाला पाठिंबा देण्याची गरज आम्हाला पडणार नाही. महाराष्ट्रात महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल. संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असं राज्य आम्ही उभं करू असं बच्चू कडू यांनी म्हंटल.

भाजपमुळेच शिंदेंचे 4 खासदार पडले-

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हस्तक्षेपामुळेच शिंदे गटाच्या ४ खासदारांचा पराभव झाला असा गंभीर आरोप सुद्धा बच्चू कडू यांनी केला. भाजपने हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान ४ खासदार आणखी वाढले असते. मित्र म्हणून मानेवर सूरी ठेवण्याचे काम भाजपने केलं असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली. तसेच संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे. ते फक्त ब्रेकिंग न्यूज देतात पण अभ्यास काहीच करत नाहीत, त्यांनी अभ्यास करावा, महाराष्ट्र म्हणजे त्यांची जहागिरी नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी राऊतांवरही हल्लाबोल केला.

महत्वाची बातमी ! 3 दिवस पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द ; काय आहे कारण ?

pune railway news

आजपासून पुढचे 2 दिवस जर तुम्ही पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दौंड ते मनमाड सेक्शन च्या दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे दिनांक 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांचे रेल्वेपत्रक विस्कळीत होणार असून याचा फटका थेट प्रवाशांना बसणार आहे.

या गाड्या रद्द

  • दिनांक 21 : आज दिनांक 21 रोजी दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस ,निजामाबाद -दौंड -पुणे हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस, हुजूर साहेब नांदेड- पुणे एक्सप्रेस
  • दिनांक 22 : रोजी पुणे हरंगुल एक्सप्रेस, हरंगुल-, पुणे एक्सप्रेस, साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस, दौंड निजामाबाद जबलपूर -पुणे विशेष रेल्वे.
  • दिनांक 23 : रोजी पुणे हरंगुल एक्सप्रेस, हरंगुल-पुणे एक्सप्रेस आणि पुणे जबलपूर विशेष ट्रेन या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्यांचे मार्ग बदलले

जम्मू तावी पुणे झेलम एक्सप्रेस : मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे रेल्वे धावेल

पुणे हजूर साहेब नांदेड एक्सप्रेस : दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परळी वैजनाथ, परभणी मार्गे रेल्वे धावेल.

हजुर साहेब नांदेड पुणे: परभणी, परळी वैजनाथ, लातूर, कुर्डूवाडी ,दौंड मार्गे ही रेल्वे धावेल.

वास्को-द-गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस : पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण ,इगतपुरी आणि मनमाड मार्गे रेल्वे धावणार आहे.

यशवंतपूर अहमदाबाद एक्सप्रेस : दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड आणि सुरत मार्गे ही रेल्वे धावणार आहे.

हजरत निजामुद्दीन हुबळी एक्सप्रेस : मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड मार्गे रेल्वे धावणार आहे

हजरत निजामुद्दीन वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस : मनमाड, इगतपुरी, कल्याण ,पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे ही रेल्वे धावणार आहे

निजामाबाद दौंड : परभणी, परळी, वैजनाथ, लातूर, कुर्डुवाडी, दौंड मार्गे रेल्वे धावणार आहे.

दौंड निजामाबाद : दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परळी वैजनाथ, परभणी मार्गे रेल्वे धावेल.

मधमाशीचे विष ठरले प्रभावी; केवळ 1 तासात नष्ट करणार कर्करोगाच्या पेशी

Cancer Cells

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यात कर्करोग हा अत्यंत झपाट्याने वाढत चाललेला एक आजार आहे. दरवर्षी कर्करोगामुळे अनेक लोकांचे बळी जातात. कॅन्सरचे विविध टप्पे असतात. परंतु सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला कॅन्सर झालेले समजते. तेव्हा मात्र त्याचा प्रसार संपूर्ण शरीरात झालेला असतो. आणि त्यावर नियंत्रण ठेवणे त्यावेळी खूप कठीण जाते. आता या कर्करोगावर कशाप्रकारे मात करता येईल. याबाबतचे संशोधन संपूर्ण जगभरात चालू झालेले आहे. त्याबाबत अभ्यास देखील केला जात आहे. आणि अशातच एक महत्वाचे संशोधन समोर आलेके आहे. ते म्हणजे मधमाशीचे विषय कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करू शकते. असा दावा एका अभ्यासात करण्यात आलेला आहे.

मधमाशीच्या विषाचे हे संशोधन हॅरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या संशोधकांनी 2020 मध्ये केले होते. या अभ्यासानुसार त्यांनी असे सांगितले होते की, मधमाशीच्या विषाने कर्करोगाचे पेशी नष्ट करू शकता. मधमाशीच्या विषामध्ये असलेले मेलिटिन हे घटक निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आणि HER2 कॅन्सरच्या पेशींचा नाश करू शकते. या संशोधकाचे प्रमुख संशोधक डॉक्टर सियारा डफी यांनी या अभ्यासामध्ये सांगितले आहे की, आज पर्यंत कॅन्सरवर कोणत्याही प्रकारचे प्रभावी औषध मिळालेले नाही. परंतु मधमाशीचे विष किंवा मेलिटिन विविध प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सर आणि सामान्य पेशींवर होणाऱ्या परिणामांची तुलना केलेली नाही. या संशोधनाच्या सामान्य पेशी किंवास्तनाच्या कर्करोगाच्या विविध उपप्रकारांवर मधमाशीच्या विषाची चाचणी केलेली आहे.

संशोधनात काय आढळले

या संशोधनात असे आढळून आले आहे की, मेलिटिन हे एक लहान आणि अत्यंत शक्तिशाली पॅप्टाइड आहे. यामध्ये मधमाशीच्या विषयाच्या जवळपास 50 टक्के विष आहे. हे कर्करोगाच्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि संशोधनात असे आढळून आले आहे की, हे कर्करोगाच्या पेशींमधील रासायनिक संदेश कमी करतात. कर्करोगाच्या पेशी जास्त वाढत नाही. त्यांचे विभाजन होते आणि काही कालांतराने त्या नष्ट देखील होऊ शकतात. आणि हा परिणाम केवळ वीस मिनिटात दिसून आलेला आहे. एका तासाच्या आत कर्करोगाच्या पेशींचा पडदा पूर्णपणे नष्ट झाल्याचे देखील या अभ्यासात सांगितलेले आहे. ही चाचणी जर पूर्णपणे यशस्वी झाली, तर आता इथून पुढे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी हा अभ्यास खूप परिणामकारक ठरणार आहे. यामुळे कितीतरी लोकांचे जीव देखील वाचणार आहे.

संशोधनात अशी देखील सांगण्यात आलेली आहे की, मेलिटीनमध्ये केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता नाही, तर त्यात जबरदस्त अँटी इम्प्लिमेंटरी अँटिव्हायरस आणि अँटोमाइक्रोबियल यांसारखे गुणधर्म असतात. परंतु या गोष्टीचा वापर केवळ वैद्यकीय देखरेखी खालीच केला जातो.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ; ग्राहकांच्या खिशाला झळ

Gold Price Today 21st sept

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) विक्रमी वाढ बघायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार, आज २१ सप्टेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याच्या किमतीत 593 रुपये वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात मात्र किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन दसरा, दिवाळी सारखे सण समोर असताना मागील काही दिवसात ज्याप्रमाणे सोन्याच्या दरात वाढ होत आहे ते पाहता सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. मागणी वाढूनही सोन्याचे भाव (Gold Price Today) वाढतच चालले आहेत. गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६९६०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७५९३० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ९३००० रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. भारतात वेगवगेळ्या शहरानुसार सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 69, 600 रुपये
मुंबई – 69, 600 रुपये
नागपूर – 69, 600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 75, 930 रूपये
मुंबई – 75, 930 रूपये
नागपूर –75, 930 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? आकडाच आला समोर

Maha Vikas Aghadi Seat Sharing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने( Maha Vikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार घालवायचंच असा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी १०० जागा लढवेल, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ८४ आणि मित्रपक्षांना ४ जागा सोडण्यात येतील. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

महाविकास आघाडीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघातील जागावाटपावर चर्चा करण्यात आली आहे. यातील 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच २०१९ मध्ये ज्या मतदारसंघात जो उमेदवार जिंकला आहे ती जागा तशीच कायम ठेवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ मतदारसंघ आहेत. सध्या पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे (Congress) सर्वाधिक आमदार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsen And NCP) हे दोन्ही पक्ष फुटल्याने महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असं काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठीही जास्त जागांची मागणी करत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही लोकसभेत कमी जागा घेतल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही होता. त्यामुळे महाविकास आघडीत जागावाटपावरून तिढा पडण्याची शक्यता होती. मात्र महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास ठरल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे.

MPSC PSI Bharti 2024 | MPSC अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरु; भरल्या जाणार 615 जागा

MPSC PSI Bharti 2024

MPSC PSI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोक हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (MPSC PSI Bharti 2024) 2024 साठी आहे. या पदाच्या एकूण 615 जागा आहे. त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 7 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MPSC PSI Bharti 2024

या भरती अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागा

पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या एकूण 615 रिक्त जागा आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

अर्ज शुल्क

अमागास उमेदवारांना 844 रुपये अर्ज शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांना 544 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी फुले आपल्या वर्गातील उमेदवारांसाठी 35 वर्षे एवढी वयोमर्यादा आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 40 वर्षे एवढी वयोमर्यादा आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

23 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

7 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतनश्रेणी | MPSC PSI Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला 38 हजार 600 रुपये ते 1 लाख 22 हजार आठशे रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
  • सात ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

अजितदादांच्या हातून घड्याळ जाणार? पवारांनी टाकला मोठा डाव

NCP Logo Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडखोरी नंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणुकीसाठी देण्यात आलं आहे. सध्या यावरून सुप्रीम कोर्टात केस सुद्धा सुरु आहे. मात्र जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह (NCP Logo) गोठवण्यात यावं आणि अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे चिन्हच गोठवण्यात यावं, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट नक्की सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या प्रकरण यादीवरुन स्पष्ट होईल. खरं यापूर्वी सुद्धा २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावर सुनावणी झाली नाही.

तुतारी वरूनही पवारांनी दाखवली पॉवर –

दरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यानंतर सुद्धा अगदी कमी वेळेत पवारांनी राजकीय डावपेच दाखवत पक्षाला मोठं यश मिळवून दिले. लोकसभा निवडणुकीत नवीन चिन्ह असूनही शरद पवारांनी आपली पॉवर दाखवत १० पैकी ८ खासदार निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह आणि अनेक दिग्गज नेते असूनही त्यांना लोकसभेला अवघी एकच जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणुकही अजित पवार आणि महायुती सरकारला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी आपले डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. अनेक बडे नेते तुतारीच्या वाटेवर आहेत. जस जस निवडणूक जवळ येत आहे तस तस शरद पवार आपले पत्ते उघडत आहेत.

Weather Update | राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Weather Update

Weather Update | गणपती नंतर महाराष्ट्रात पावसाने थोडासा आराम केल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे वातावरण संपूर्ण राज्यभर पसरलेले आहे. काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात देखील झालेली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सर्वत्र पाहायला मिळत आहे. परंतु आज पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळणार मिळालेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभाग पावसाबद्दलचा अंदाज नेहमीच व्यक्त करत असतात. त्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात देखील पाऊस (Weather Update) पडणार आहे. विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड यासह आजूबाजूच्या परिसरात आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

परभणीत देखील अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा पाऊस बरसलेला आहे. तसेच आजूबाजूच्या शहरांमध्ये एक तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. या पावसामध्ये वादळीवारा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. सध्या सोयाबीन पिकाचे काढण्याची सुरुवात होणार आहे. आणि त्या काळातच पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. परंतु जर सोयाबीन पीकाला पावसाचा मारा बसला, तर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःचे त्याचप्रमाणे पिकांचे रक्षण करावे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

AFG Vs SA : अफगाणिस्तानने रचला इतिहास!! आफ्रिकेला हरवून सिरीज जिंकली

AFG Vs SA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीज (AFG Vs SA) जिंकण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे. काल शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून अफगाणिस्थान क्रिकेटने अनेक मोठमोठ्या संघाना पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता थेट आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात घालून इतर संघांनाही अफगाणिस्तानने इशारा दिला आहे.

शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्थानचा कर्णधार हशमतुल्लाह शहीदीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अफगाणी फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजने 105 धावा करत खणखणीत शतक मारले. गुरबाजने वनडे करियरमधील सातव शतक झळकावलं. या खेळीत गुरबाजने १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. गुरबाज शिवाय अजमतुल्लाह ओमरजईने 86 आणि रहमत शाहने ५० धावांची खेळी केली. या सर्वांच्या कामगिरीच्या जोरावर ५० षटकात ३११ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज अफगाणी फलंदाजासमोर निष्प्रभ ठरले.

३१२ धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे आव्हान पेलवले नाही. कर्णधार टेम्बा बावुमा आणि टोनी डी जॉर्जीच्या या सलामीवीरांनी 73 धावांची सलामी दिली, मात्र ते दोघे आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या १३४ धावाच करू शकला. दिग्गज फिरकीपटू राशिद खान आणि नांगेलिया खरोटेने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं. दोघांच्या फिरकीपुढे आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी गुडघे टेकले. राशिदने 9 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा देऊन 5 विकेट घेतल्या तर. नांगेलियाने 6.2 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट मिळवल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा डाव 134 धावात आटोपला आणि अफगाणिस्थानने 177 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्थानने क्रिकेट इतिहासात नवा रेकॉर्ड केला आहे. सुरुवातीला लिंबू- तिंबू वाटणारा अफगाणिस्थानचा संघ आता इतर संघासाठी चांगलाच धोकादायक ठरत आहेत.