Thursday, December 25, 2025
Home Blog Page 456

Achalpur Crime : अचलपुरात ‘त्या’ रात्री हिंदू मुस्लिम वाद का चिघळला? भाजप असो वा काँग्रेस दोघंही एकाच माळेचे मणी?

Achalpur Hindu Muslim Dispute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनंत चतुर्थीच्या दिवशी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधीपुल भागात शुल्लक कारणावरून तणाव (Achalpur Crime) निर्माण झाला आणि दोनशेच्या जवळपास जमावाने पोलीस व गणपती मंडळावर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी व काही गणपती मंडळाचे सदस्य जखमी झाल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनने गणेशोत्सवाला गालबोट लागलं. ऐन सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दगडफेकीचे वातावरण का आणि कशासाठी निर्माण करण्यात आले? यामागे कोणतं राजकीय षडयंत्र होते का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असतानाच सोशल मीडियावर एक व्हायरल मेसेज फिरत आहे. अचलपूरचा एक हिंदू तरुण नावाने फिरणाऱ्या या मेसेजच्या माध्यमातून अचलपुरात ‘त्या’ रात्री हिंदू -मुस्लिम वाद (Hindu Muslim Dispute) का चिघळला? याचे कारण आणि त्यामागील राजकीय स्वार्थ सांगण्यात आला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात…

काय आहे व्हायरल मेसेज-

नमस्कार, २-४ दिवसांपूर्वी आपल्या अचलपूर मध्ये रात्रीच्या अंधारात हिंदू मुस्लिम वादाची जी घटना घडली याबद्दल मला तुमच्याशी जरा सविस्तर बोलायचं आहे. एक नागरिक म्हणून मी या गोष्टींना वैतागून गेलो आहे. मी ना भाजपवाला आहे ना काँग्रेसवाला आहे. पण संत गाडगे महाराज यांच्या भूमीत जन्माला आलेला आणि अचलपूरचा रहिवासी असल्याचा गर्व असलेला एक हिंदू आणि राष्ट्रभक्त नक्की आहे. मात्र रात्रीच्या त्या घटनेनंतर मला एक अचलपूरकर म्हणून जे काही वाटतंय ते इथे लिहितो आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. दुटप्पी राजकारण्यांनी तुम्हाला लावलेल्या पट्टीमुळे तुम्ही मला ऐकून तरी घेणार आहेत का मला माहिती नाही. पण तरी चार शब्द बोलण्याचे धाडस करतोय..

निवडणूका तोंडावर आल्या की अचानक हिंदू मुस्लिम वाद कसा उफाळून येतो?

अगदी एखाद्या शुल्लक कारणावरून माणसामाणसात वणवा पेटवून कोण आपली पोळी भाजून घेतो? घटनेनंतर लगेच एका विशिष्ट पक्षाचे लोक तिथं कसे जमा होतात? भाजप हिंदू खतरे मे है म्हणत वातावरण तापवतं तर दुसरीकडे काँग्रेसवाले संविधान खतरे मे है असं म्हणत दलित, मुस्लिम व्होट बँक खिशात भरायचा प्रयत्न करतात. आम्ही मात्र वेड्यासारखे या राजकारण्यांच्या जाळ्यात अडकतो, अन पुन्हा पाच वर्ष विकासाच्या नावाने बोंबा मारत बसतो. आता मात्र असं नीच राजकारण करणाऱ्यांच्या विष कालावण्याच्या प्रवृतींना आम्ही बळी पडणार नाही.

🤔सर्वात अगोदर अचलपुरात त्या रात्री नक्की काय घडलं ते समजून घेऊयात…

अचलपुरात सगळीकडे उत्साहात गणेशविसर्जन मिरवणूक वाजत गाजत सुरु होत्या. गांधी पुलावरही अर्ध्या भागापर्यंत गणेशमंडळाचं लाइटिंग तर अर्ध्या भागात उरूसचं डेकोरेशन होतं. डेकोरेशन पाहायला आलेली २-३ लहान मुल एकमेकाला चेष्ठा मस्करीत दगड मारत होती. त्यांचा एक दगड उरूसच्या कमानीला लागला अन डेकोरेशचं पोस्टर खाली पडलं. अगदी शुल्लक असलेल्या या गोष्टीवरून काही मिनिटांतच दोन्ही बाजूचा मोठा समूह जमा झाला अन लहानश्या गोष्टीचा इशू करून छोटा वाद विकोपाला जाऊन मोठी ठिणगी पडली. शेवटी पोलिसांना कर्फ्यू लावावा लागला अन जमाव पांगला.

😰हिंदू मुस्लिम दंगलीतून भाजपचा अन काँग्रेस या दोघांचा फायदा?

सकाळी मला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की दोन्ही बाजूची लोकं लगेच कशी काय जमा झाली? विकासाच्या मुद्द्यावर जर अशा वेगाने एकत्र येता आलं तर अचलपूरचे अमेरिका व्हायलाही वेळ लागायचा नाही. पण त्याचवेळी मनात विचार आला हे सगळं ठरवून तर केलं जात नाहीये ना? कारण नेहमी निवडणुका तोंडावर आल्या की हिंदू मुस्लिम दंगली घडवून घाणेरडं राजकारण करायची सवय अनेक महाभागांना आहे. लोकांची कामे करून त्यांची मने जिंकता येत नसतील तर त्यांच्यात भांडण लावून, विष कालवून मत कशी पाडून घ्यायची याची कला या देशातल्या भाजप अन काँग्रेस या दोन्ही लोकांकडे चांगलीच आहे.

😱शांत डोक्याने विचार केल्यावरच पडद्यामागचा खरा गेम लक्षात येतो

सध्या राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. महाराष्ट्रातील सद्य स्थिती बारकाईने पाहिली तर भाजपला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जायला लागू शकते असं चित्र आहे. विकासाच्या कामावर मत मागायला आता जागा उरलेली नसल्याने हिंदुत्वावर निवडणूक लढवून गोरगरीब जनतेला पुन्हा हिंदुत्वावरून पेटवून देऊन निवडणुकीत बाजी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुस्लिम व्होटबँक कशी आपल्याच खिशात पडेल असा कट काँग्रेस कडून आखला जातोय. हिंदू मुस्लिम वाद हा भाजप आणि काँग्रेस अशा दोघांच्याही फायद्याचा आहे. कारण यामुळे दोघांची मत वाढतात आणि यातूनच त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा होतो. इंग्रजांनी जे केले तेच आता हे पण तेच करतायत असं आपण म्हणायला हरकत नाही. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांचीच घाणेरडी नीती सद्याचे हे राजकारणी वापरतायत. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण यांच्या या कारस्थानांना बळी न पडता त्यांचा डाव हाणून पडला पाहिजे.

मी पण एक तरुण आहे. माझेही रक्त सळसळतं आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून मला एकच सांगायचंय की एखाद्याला भिडायला मागे पुढे न पाहणारा मर्द असलो तरी येऱ्या गैऱ्याच्या कुटील राजकारणाचा मी बळी होणार नाही. मला भाजप आणि काँग्रेस अशा दोघांनाही इतकाच सांगायचंय की राजकारण करायचंच असेल तर गरीबाची गरिबी दूर करण्यासाठी करा, दीनदुबळ्याला दवाखान्याची मदत करण्यासाठी करा, व्यवस्थेच्या आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राजकारण करा. माझ्या शेतकरी बापाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव मिळवण्यासाठी खुशाल राजकारण करा. पण तुम्ही आजवर आमच्यासाठी काहीच करू शकलेला नाही हे लपवण्यासाठी आमच्यात भांडणे लावून मूळ मुद्द्यावरचे आमचे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान करू नका.

धन्यवाद.

-अचलपूरचा एक हिंदू तरुण

Diabetes | मधुमेहामुळे कायमची गमावू शकता दृष्टी ; अशाप्रकारे घ्या काळजी

Diabetes

Diabetes | आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार देखील होताना दिसत आहे. त्यातील मधुमेह (Diabetes) हा एक अत्यंत सामान्य पण अनेक लोकांना होणारा आजार आहे. अगदी कमी लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मधुमेहाचा त्रास होत असतो. परंतु हा आजार तुम्हाला आटोक्यात ठेवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजे. आजकाल अनेक लोक मधुमेह टाईप 2 चे बळी होत आहेत. अगदी घराघरांमध्ये मधुमेहाचे रुग्ण आढळतात. परंतु जर तुम्ही या मधुमेहावर वेळीच उपचार केले नाही, तर एक धोकादायक रूप हा मधुमेह धारण करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, तर त्या रुग्णांच्या डोळ्यांवर देखील त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे या रुग्णांना डायबेटिक रेटीनोपॅथीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. आणि पर्यायाने त्या व्यक्तीला अंधत्व प्राप्त होते.आता या आजाराची नक्की लक्षण कोणती आहे. त्यावर कशाप्रकारे मात करता येईल याची माहिती आपण जाणून घेऊया.

डायबेटिक रेटीनोपॅथी काय आहे ? | Diabetes

डायबिटीस (Diabetes) झालेल्या एखाद्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली, तर हा डायबेटिक रेटीनोपॅथी आजार होतो. हा आजार पुढे जाऊन इतके भयानक रूप धारण करतो की त्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या दृष्टी देखील जाऊ शकते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की या कारणामुळे त्या व्यक्तीला कायमचे अंधत्व देखील येऊ शकतो. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे तसेच त्यांचा रक्त उच्च रक्तदाब आहे, आणि ते जर सतत धूम्रपान करत असतील, तर तुम्ही त्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डायबेटिक रेटीनोपॅथी हा डोळ्यांच्या विविध आजारानंतर जगभरात अंधत्वचे दुसरे मोठे कारण बनत आहे. हा आजार झाल्यावर दृष्टी गमावण्याचा धोका हा 50 टक्के पर्यंत असतो.

डायबेटिक रेटीनोपॅथीची कारणे

नेत्ररोग तज्ञांच्या त्यांच्या मते मधुमेह (Diabetes) हा एक जुनाट स्वरूपाचा आजार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या जगातील इतर भागांवर देखील होतो. जर रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, तर हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हा आजार थेट रेटिनावर हल्ला करतो आणि त्याचे कार्य बिघडवतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार घेतले पाहिजे.

डायबेटिक रेटिनोपॅथी रोगाचे लक्षणे

अंधुक आणि कमी दिसणे
अचानक चक्कर येणे
सतत डोकेदुखीची समस्या जाऊ नये.

डायबेटिक रेटीनोपॅथीपासून संरक्षण कसे करावे

तुम्ही जर सहा महिन्यांनी तुमचे डोळे तपासा.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा
जास्त समस्या निर्माण झाल्या तर डॉक्टरांची संपर्क साधा.

Tirupati Balaji : तिरुपती मंदिराला तूप पुरवलंच नाही; अमूल कंपनीचे स्पष्टीकरण

Tirupati Balaji Amul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) लाडू प्रसादाची चर्चा सुरु आहे. बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत होतं. सर्वत्र अशी चर्चा सुरु होती कि रुमला तिरुपती मंदिराला तूप पुरवण्याचे काम अमूल कंपनी करत आहे. मात्र कप्पणीने एक परिपत्रक जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमूल कंपनीने तिरुपती देवस्थानाला कधीच तूप पुरवठा केला नाही असं स्पष्टकरीण देण्यात आलं आहे.

अमूलने नेमकं काय म्हंटल? (Tirupati Balaji)

तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirupati Balaji) ला अमूल तूप पुरवले जात असल्याचा उल्लेख करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात हे आहे. आम्ही हे कळवू इच्छितो की आम्ही कधीही TTD ला अमूल तूप पुरवठा केला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते.

अमूल तूप 50+ वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात विश्वासार्ह तूप ब्रँड आहे आणि भारतीय घरांचा अविभाज्य भाग आहे. अमूलविरोधातील ही चुकीची माहिती देणारी मोहीम थांबवण्यासाठी ही पोस्ट जारी करण्यात येत आहे. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, कृपया आमच्या टोल-फ्री नंबर 1800 258 3333 वर कॉल करा असं स्पष्टीकरण अमूलने दिले आहे.

Salt Water | मिठाच्या पाण्याने करा दिवसाची सुरुवात; शरीराला होतील अनेक फायदे

Salt Water

Salt Water | मीठ हे आपल्या जीवनाचे अमृत आहे. मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. हे मीठ आपल्याला चवीला किती चांगले असले, तरी त्याचा वापर मर्यादितच करावा लागतो.अन्यथा आपल्याला उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मिठाच्या वापर केवळ अन्नाला चव येण्यासाठीच नाही, तर इतर अनेक कारणांसाठी मिठाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तर जाणून घेऊयात मीठ पाण्याचे नक्की कोणते फायदे होतात.

मीठ पाण्याचे फायदे | Salt Water

मीठ पाण्याला मीठ पाण्याचा (Salt Water) फ्लश असे देखील म्हणतात. आपले आतडे फ्लश करण्याचे हे एक जुने तंत्र आहे. मिठाच्या पाण्यामुळे आपल्या आतडे फ्लश केले जाते. आणि इलेक्ट्रॉनिक्स देखील संतुलन राहतात. त्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुरळीत चालते आणि इतर सगळे कार्य देखील नीट होतात. जेव्हा आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा बिघाड होतो. त्यावेळी जर तुम्ही मीठ पाणी पिले, तर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर अत्यंत हलके होतो. तसेच अनेक आजारांपासून देखील मीठ पाण्यामुळे फायदे होतात. आता या नीट पाण्यामुळे कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेऊया.

  • सकाळी मिठाचे पाणी (Salt Water) प्यायल्याने किंवा कुस्करल्याने हॅलिटोसिसपासून आराम मिळतो. हे तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे हॅलिटोसिसपासून आराम मिळतो.
  • खारट पाणी घशातील श्लेष्मा आणि जळजळ देखील धुवून टाकते, ज्यामुळे घसा खवखवणे आणि खाज सुटते. कोमट मिठाच्या पाण्यानेही घशाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. अशाप्रकारे, श्वसनमार्गाच्या संसर्गामध्ये मीठ पाणी खूप फायदेशीर आहे.
  • मिठाच्या पाण्यामुळे निर्जलीकरण झालेल्या शरीरात सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण वाढते आणि शरीर हायड्रेटेड राहते.
  • खारट पाणी पचनासही मदत करते.
  • जर रॉक मीठ वापरले तर ते रेचक म्हणून काम करते आणि आतड्याची हालचाल सुधारते.
  • सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी अनेक खनिजे मीठामध्ये आढळतात जे स्नायूंच्या आकुंचन प्रक्रियेस मदत करतात. त्यामुळे मांसल क्रॅम्पमध्ये मीठाचे पाणी खूप फायदेशीर ठरते.

तुळस वारंवार सुकून जाते ? फॉलो करा टिप्स , होईल टवटवीत

तुळस हि अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. जवळपास प्रत्येकाच्या घराच्या अंगणात तुळस असतेच. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळस आरोगयासाठी तर गुणकारी आहेच पण तुळस हवा शुद्धही करते. पण बऱ्याचदा आपण घरी तुळशीचे रोप लावले की ते चांगले वाढत नाही. बऱ्याचदा तुळस सुकते केवळ काड्याच उरतात. तुळस चांगली उगवायची असेल तर काय करायचे चला पाहुयात…

तुळशीचे रोप लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे रोप चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीच्या बिया तुम्ही ज्या कुंडीमध्ये घालणार आहात त्या कुंडीच्या आकारानुसार तुळशीच्या बिया पेरा.
तुळशीच्या रोपाला पाणी घालणं ही महत्त्वाची पायरी आहे. तुळशीच्या रोपाला थोडं थोडं नियमित पाणी घालावे लागतं.
कुंडीतल्या तुळशीची सुकलेली पान बाजूला काढून टाका.
तुळशीचे रोप लावत असताना मातीमध्ये ३० टक्के रेती असेल अशा मातीत रोप लावा.
तुळशीला पाणी जास्त घालू नका. नाहीतर बुरशी येण्याची शक्यता असते.

तुळशीचे फायदे

तुळशी एक नैसर्गिक डोकेदुखी कमी करणारी आहे जी मायग्रेनच्या वेदना देखील आराम करू शकते.

तापावर उपचार करण्यासाठी तुळशी हा एक जुना घटक आहे. विविध आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपचारांच्या निर्मितीमध्ये हा एक प्रमुख घटक आहे.

तुळशी एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आणि तोंडी जंतुनाशक आहे. Ocimum Sanctum देखील तोंडाचे व्रण बरे करू शकते. पवित्र तुळस दातांच्या पोकळी, प्लेक, टार्टर आणि दुर्गंधी यासाठी जबाबदार असलेल्या जीवाणूंचा नाश करते, तसेच दातांचे संरक्षण करते.

वाढवण बंदराजवळ उभारण्यात येणार टेक्सटाईल पार्क; 1200 एकरात होणार प्रकल्प

Vadhvan port

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारच्या माध्यमातून आता राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांची देखील उभारणी होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार सरकार पालघर तालुक्यातील डहानूमधील वाढवन हे बंदर उभारण्यासाठी तयारी करत आहे. सरकार आता या वाढवण या बंदरासाठी रस्ता आणि रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया करणार आहे. आणि याबद्दलच महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे या बंदराजवळ एक मोठं वस्त्र उद्योग म्हणजे टेक्स्टाईल पार्क भरण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. आणि यासाठी पालघर जिल्ह्यातील जवळपास 1200 एकर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सरकार आता पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे या गावातील जमीन भूसंपादन करण्यासाठी वापरणार आहे. तसेच आता बांधकाम विभागाकडून देखील याच सर्वे करण्यात आलेला आहे. वाढवण या बंदराजवळ प्रकल्प उभा केल्याने खूप फायदे होणार आहे. निर्यातीसाठी देखील अत्यंत सोपे होणार आहे. परंतु आता हा उद्योग नक्की कोण चालवणार? खाजगी उद्योजक चालवणार की सरकारी याबद्दल कोणतीही माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये. परंतु आता टेक्स्टाईल पार्कसाठी मोठे रस्ते बांधण्यात देखील येणार आहेत. आणि या प्रकल्पासाठी त्यांना 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन पाण्याचे बंधारे देखील बांधले जाणार आहेत.

पालघर तालुक्यात आता दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे येथील अनेक सर्वे नंबर हे या जागांच्या लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्सटाईल पार्क भरण्यासाठी घेतले जाणार आहे. या संदर्भात त्याचप्रमाणे मुंबईतील कोस्टल रोड देखील आता वाढवण्या बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. पालघरमध्ये विमानतळ बांधण्यासाठी जमिनीचा अहवाल देखील मागवण्यात आलेला आहे वाढवण बंदराची विमानतळ आणि कोस्टल रोड यांच्याशी जोडला, तर येथील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि या भागाचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

महाराष्ट्र सध्या मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बद्दल ही दोन मोठी बंदरे आहेत. मुंबई शहराचा विकास तसेच इतर भौगोलिक कारणांमुळे या बंदरातून जास्त वाहतूक करणे आता शक्य होत नाही. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची कंटेनर हाताळण्याची क्षमता देखील कमी होत चाललेली आहे, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील आयात आणि निर्यात क्षेत्रात वाढ करण्यासाठी आता आणखी एका बंदराची गरज लागणार आहे. आणि त्यामुळेच वाढवण बंदर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.

ISRO HSFC Bharti 2024 | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत 103 पदासांठी भरती सुरु; असा करा अर्ज

ISRO HSFC Bharti 2024

ISRO HSFC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहे. ती म्हणजे आता मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (ISRO HSFC Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी मेडिसिन, स्पोर्ट्स मेडिसिन, वैद्यकीय अधिकारी एसटी, शास्त्रज्ञ अभियंता एससी, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक तंत्रज्ञ बी, ड्राफ्ट्स मॅन बी, सहाय्यक राजभाषा या पदांच्या रिक्त जागा आहेत.

या पदांच्या एकूण 103 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे 9 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ISRO HSFC Bharti 2024

वैद्यकीय अधिकारी SD (एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ,ड्राफ्ट्समन B, सहाय्यक (राजभाषा)

पद संख्या

या भरती अंतर्गत 103 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 35 वर्षेपर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

9 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा ? | ISRO HSFC Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 9 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

VI चा ग्राहकांना झटका; या 2 रिचार्जची व्हॅलिडिटी झाली कमी

Vodafone Idea Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागड्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींनी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाप लागला असतांनाच आता वोडाफोन- आयडियाने आपल्या ग्राहकांना (Vodafone Idea Recharge Plan) आणखी एक मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या २ लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना याच्यापेक्षा थोडे कमी दिवस रिचार्ज प्लानचा लाभ घेता येईल. वोडाफोन आयडियाने ज्या २ रिचार्जची व्हॅलिडिटी कमी केली आहेत त्यातील एक आहे तो म्हणजे 666 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणि दुसरा आहे तो म्हणजे 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… चला तर या दोन्ही प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

Vodafone Idea च्या 479 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना यापूर्वी 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. परंतु आता मात्र ग्राहकांना फक्त 48 दिवसांची वैधता मिळणार आहे. इंटरनेटच्याबाबतीत सांगायचं झाल्यास आधीसारखंच यामध्ये दररोज 1GB इंटरनेट डेटा वापरता येईल. याशिवाय, 479 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 100 SMS चा आनंद सुद्धा घेता येईल. रोजचे इंटरनेट संपल्यानंतर यूजर्स 64Kbps वेगाने इंटरनेट वापरू शकतात.

666 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

666 रुपयांच्या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी सुद्धा Vodafone Idea ने कमी केली आहे. खरं तर यापूर्वी हा रिचार्ज प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येत होता, मात्र आता यामध्ये मोठी घट करण्यात आली आहे. त्यानुसार इथून पुढे यूजर्सना 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 64 दिवसांचीच व्हॅलिडिटी मिळेल. या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB पर्यंत इंटरनेट डेटा चा आनंद घेता येईल. Vodafone Idea ने आपल्या रिचार्जची व्हॅलिडिटी कमी केल्याने ग्राहकांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार हे निश्चित.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अशा पद्धतीने होतोय फ्रॉड

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात डिजिटल क्रांती झालेली आहे. त्यामुळे जवळपास सगळेच आर्थिक व्यवहार हे डिजिटल ऑनलाइन पद्धतीने व्हायला लागलेली आहेत. लोकांसाठी ही अत्यंत सोयीची गोष्ट झालेली आहे. त्यांना घर बसल्या अनेक गोष्टींची माहिती मिळते. परंतु या डिजिटलायजेशनचा काही प्रमाणात तोटा देखील सहन करावा लागत आहे. ते म्हणजे आजकाल फ्रॉड फेक एसएमएस मोठ्या प्रमाणात फिरत आहे. लोकांना फ्रॉड करून लोकांच्या अकाउंट मधले पैसे गायब होतानाच्या अनेक घटना घडताना दिसत आहे. यातही जर तुमचे इंडिया पोस्टाट खाते असेल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. कारण अनेक वेळा इंडिया पोस्टच्या नावाने तुमचा पत्ता अपडेट करायला सांगितला जातो. आणि त्यासाठी तुम्हाला एक एसएमएस देखील येतो. परंतु हा एसएमएस पूर्णपणे खोटा आहे. याबाबतची माहिती PIB fact check यांनी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक खोटा एसएमएस आहे. आणि त्यापासून सगळ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे.

PIB FACT CHECK यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. आणि सांगितलेले आहे की, सावध रहा फसवणूक करणारे लोक डिलिव्हरीमध्ये अडचणीचे कारण पुढे करून भारतीय डाकच्या ग्राहकांची फसवणूक करत आहे. अशावेळी तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही लिंकवर शेअर करू नका. कोणताही संवाद तर तुम्हाला संशयास्पद वाटत असेल, तर तुम्ही चक्षु पोर्टलवर तक्रार करा. कोणत्याही मेसेज किंवा ई-मेलला उत्तर देऊ नका.

इंडिया पोस्टच्या ग्राहकांना याबद्दल एसएमएस क्री. पत्ता अपडेट करायला सांगतात. यामध्ये ते सांगतात की, आम्ही डिलिव्हरी करण्यात असे यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे तुमच्या पत्त्याची गरज आहे, असे सांगतात. आणि माहिती अपडेट करायला सांगतात. तसेच 24 तासांच्या आत पॅकेज देण्याचा प्रयत्न करू असे देखील सांगितले जाते. परंतु हा एसएमएस पूर्णपणे फ्रॉड आहे. त्यामुळे जर तुम्हाला अचानक एखाद्या अनोळखी नंबर वरून असा काही एसएमएस आला, तर त्याबाबत सावधगिरी बाळगा. तुमची वैयक्तिक माहिती कोणी विचारत असेल, तर ती माहिती देऊ नका. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करणे सांगत असेल, तर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

अशा फ्रॉडपासून कसे वाचाल ?

तुम्हाला जर असा कोणताही एसएमएस आला तर त्यामधील टायपिंग तसेच व्याकरण संबंधित चुका याकडे भाषेकडे लक्ष द्या. कारण हे मेसेज चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. फसवे असतात अनोळखी नंबर वरून एसएमएस आल्यावर कोणतीही लिंक क्लिक करू नका. चुकीच्या वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जातात आणि अशी वेबसाईट तुमची वैयक्तिक माहिती चोरतात. अनोळखी व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती एसएमएसद्वारे शेअर करू नका. त्याचप्रमाणे तुमचे बँक डिटेल क्रेडिट कार्ड नंबर पासवर्ड यांसारखी महत्त्वाची माहिती देखील कोणाला देऊ नका. त्याचा चुकीचा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो.

तुमचे ऑनलाईन अकाउंट जास्त स्ट्रॉंग करण्यासाठी वेगवेगळे पासवर्ड तयार करा. वेगवेगळ्या अकाउंटसाठी एकच पासवर्ड वापरू नका. तसेच डबल सिक्युरिटी दोन तयार करा. म्हणजे तुमच्या ऑनलाईन अकाऊंटवर टू फॅक्टर व्हेरिफिकेशन सुरू करा.

काय सांगता ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात विकसित होणार 3 रेल्वे स्टेशन ?

raigad

देशभरात रेल्वेचे जाळे मजबूत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वेची मोठी महत्वपूर्ण भूमिका आहे. राज्याचा विचार करता अद्यापही राज्यात असे काही भाग आहेत जिथे रेल्वे पोहचली नाहीये. मात्र राज्यातल्या एका जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या जिल्यात एक नाही तर 3 रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती…

रायगड जिल्ह्यात उभी राहणार 3 नवी रेल्वे स्थानके ?

रायगड जिल्ह्यातील रेल्वे समस्यांचे निराकरण व्हावे या हेतूने खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक पार पडली.या बैठकीत जिल्ह्यामध्ये नवीन रेल्वे स्थानके विकसित करण्यात यावेत अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या मार्गावर तीन नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याच्या सूचना खासदार महोदयांनी दिल्यात.

महत्त्वाचे म्हणजे तटकरे यांनी आपण स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावू अशी मोठी ग्वाही देखील दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात 3 नवीन रेल्वे स्थानक आगामी काळात तयार होऊ शकतात आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

‘या’ ठिकाणी होणार रेल्वे स्थानके

पनवेल ते रोहा या मार्गावर खारपाडा, गडब, आमटेम येथे नवीन स्टेशन विकसित करण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. खरे तर खारपाडा रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव याआधीच दिलेला पाठवण्यात आला होता. परंतु, जिते स्टेशन आणि खारपाडापर्यंतचे अंतर कमी होत असल्याने तो प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला नाही. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला होता.

पण आता ही अडचण दूर होणार आहे. खारपाड़ा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे, अशा सूचना खासदार तटकरे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली आहे. त्यामुळे आता खारपाडा स्टेशनसह गडब, आमटेम या तीन स्टेशनांचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.