Thursday, December 25, 2025
Home Blog Page 457

White Revoluation 2.0 | सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी सुरु केला हा उपक्रम; अमित शाह यांनी दिली माहिती

White Revoluation 2.0

White Revoluation 2.0 | शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारकडून अनेक विविध उपक्रम राबवले जातात. अनेक योजना देखील केंद्रीय सहकार मंत्री अमित शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहे. देशात दुग्ध सहकार क्षेत्राचा विकास व्हावा. यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहे. अशातच आता अमित शहा यांनी श्वेतक्रांती 2.0 (White Revoluation 2.0)ची घोषणा केलेली आहे. महिला शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच आर्थिक सक्षमीकरण व्हावे. या उद्देशाने हा एक मोठा प्रोजेक्ट सरकार पूर्ण करणार आहे. त्याचप्रमाणे दूध व्यवसायाच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे. आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे या गोष्टींवर भर देणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये सुरू करण्यात आलेला हा तिसरा उपक्रम आहे. नागरिकांकडून देखील या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आज ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय डेरी क्षेत्रात काम करत असतात. गुजरातमध्ये तर 60,000 कोटी रुपयांचा व्यवसाय महिला करत आहेत. हा नवीन उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणावर आणि कुपोषणाविरुद्ध लढ्याला अधिक मजबूत बनवेल, असे अमित शहा यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे अमित शहा यांनी देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये किसान क्रेडिट कार्ड आणि डेअरी सहकारी संस्थांमध्ये मायक्रो एटीएम बसवण्याचे काम देखील चालू केलेले आहे.

आपल्या देशात श्वेतकांती 2.0 (White Revoluation 2.0)अंतर्गत येत्या पाच वर्षात दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी करण्याचे प्रमाण 50% उद्दिष्ट आहे. यासाठी एक कोटी नवीन आणि आधी असलेल्या जिल्हा सहकारी संस्था बहुउद्देशीय पीएसीएसची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी पायाभूत सुविधांचा विकास देखील करण्यात येणार आहे. तसेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या संसाधनामधून या उपक्रमाला आर्थिक मदत देखील केली जाणार आहे.

यात प्रकल्प बाबत संपूर्ण माहिती देताना अमित शहा यांनी सांगितले की, श्वेतक्रांती 2.0 या प्रकल्पाला अर्थसंकल्पीय पाठिंबा मिळेल की नाही याबद्दल अनेक लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परंतु यासाठी मी अर्थसंकल्पीय समर्थनाचे हमी देतो. कारण ते सरकारसाठी प्राधान्याचे क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे अमित शहा यांनी सहकारी संस्थांमध्ये सहकार्य उपक्रमाचा देश आणि विस्तार करण्याची देखील घोषणा केलेली आहे.

औट्रम घाटात 7 किलोमीटरचा बोगदा; महामार्ग प्राधिकरणाची खंडपीठात माहिती

कन्नड ते चाळीसगाव घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आता याबाबतचा निकाल लागला असून कन्नड ते चाळीसगाव या औट्रम घाटात 7 किलोमीटरचा बोगदा बनविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार आहे.

गुरुवारी (ता. १९) प्राधिकरणाचे वकील सुहास उरगुंडे यांनी सहा महिन्यांत डीपीआर तयार केला जाईल, असे निवेदन खंडपीठात केले. न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी डीपीआर तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र वन आणि वन्यजीव विभागाने तीन महिन्यांत द्यावेत, असे आदेश दिले.

घाटात कामासाठी लागणार 2 वर्षे

दरम्यान, डीपीआर तयार केल्यानंतर बोगद्यासाठीची यंत्रसामग्री तयार करून घाटात काम करण्यासाठी आणायला दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे सुनावणीवेळी सांगण्यात आले. कन्नड ते चाळीसगाव घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी जनहित याचिका दाखल झालेली आहे. याचिकेच्या प्रथम सुनावणीत खंडपीठाने सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस घाटातील रस्ता बंद करण्याचे आदेश जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासनास दिले होते. घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी तसेच पर्यायी मार्ग सूचविण्यासाठी खंडपीठाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

वाहतुकीअभावी प्राधिकरणाचे प्रतिदिन 12 लाख रुपयांचे नुकसान

महामार्ग प्राधिकरणाने तोडगा आणि पर्यायी मार्ग सूचविण्यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती केली होती. समितीने तीन पर्याय दिल्ली कार्यालयाकडे सूचविले. खंडपीठात यातील बोगद्याचा पर्याय अंतिम असल्याचे सांगण्यात आले.त्यानुसार सात किलोमीटर बोगदा आणि उर्वरित रस्ता करण्यात येणार आहे. घाटातील वळण रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याचे खंडपीठाला सांगितले. तोपर्यंत जड वाहनांना घाटातून वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी विनंती ॲड. उरगुंडे यांनी खंडपीठाकडे केली. वाहतुकीअभावी प्राधिकरणाचे प्रतिदिन 12 लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

संबंधित रक्कम नागरिकांची असल्याचे निवेदनही यावेळी करण्यात आले. याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल यांनी प्राधिकरणाच्या मागणीला विरोध दर्शविला. ॲम्बर्ग कंपनीने यापूर्वी डीपीआर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी घेतला होता आणि नंतर बोगदा अशक्य असल्याचे म्हटले होते, याची आठवण करून दिली. ॲड. बागूल यांना ॲड. नीलेश देसले यांनी साहाय्य केले. राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व ॲड. महेंद्र नेर्लीकर यांनी बाजू मांडली.

विमानाच्या खिडक्या गोलाकारच का असतात? जाणून घ्या मोठे कारण

Airplane Window

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक सामान्य नागरिकाच्या ड्रीम लिस्टमधील विमानाने प्रवास करणे ही एक इच्छा नेहमी असते. विमानाने प्रवास करताना सगळ्यांना विंडो सीट जवळ बसण्याची देखील खूप आतुरता असते. कारण विमानातून दिसणारे दृश्य हे एक अद्भुत दृश्य असते आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला घ्यायचा असतो. परंतु तुम्ही कधी नोटीस केलय का की, विमानाच्या खिडक्या या गोलाकार का असतात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल, तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात?

एका अहवालानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की, अगदी पूर्वीपासूनच विमानाच्या खिडक्या या गोलाकार नव्हत्या. 1950 पूर्वी विमानाच्या खिडक्या या चौकोनी आकाराच्या होता . परंतु त्यावेळी विमाने अगदी हळू चालत होती आणि आजच्या तुलनेत अगदी कमी गतीने उडत होती.

आता विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? यासंबंधी माहिती देताना स्कॉटची फ्लाईटचे प्रॉडक्ट ऑपरेशन स्पेशलिस्ट विलिस यांनी सांगितले आहे की, विमानाच्या खिडक्या म्हणजे गोलाकार करण्या मागे अनेक कारण आहेत. सुरुवातीला विमानाच्या खिडक्या चौकोनी होत्या. परंतु विमानाच्या सुरक्षिततेसंबंधी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण विमान जेव्हा कशात उडते त्यावेळी हवेचा एक विशिष्ट दाब तयार होतो. गोलाकार खिडक्या असल्यामुळे हवेचा दाब खिडक्यांवर सारखाच राहतो.

त्यामुळे खिडक्या क्रॅक होण्याचा धोका देखील कमी असतो. विमान जेव्हा आकाशात जाते. तेव्हा विमानाच्या आतील आणि बाहेरील हवेचा दाब मोठ्या प्रमाणात असतो. खिडकी जर चौकोनी असेल, तर तो दाब जास्त येतो आणि खिडकी क्रॅक होण्याची किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते. परंतु गोलाकार खिडकी असल्यामुळे हवेचा दाब बदलला, तरी खिडकी क्रॅक होण्याची शक्यता कमी असते. कारण विमानाची गती वाढल्यामुळे तो दाब देखील वाढलेला असतो.

त्याचप्रमाणे असे देखील सांगण्यात आलेले आहे की, जेव्हा 1950 पूर्वी विमाने चालत होती. त्यावेळी विमाने अगदी संथ गतीने चालत होती. त्यामुळे त्यांना अधिक इंधन देखील लागत होते. त्यामुळे विमानाने प्रवास करणे हा सामान्य नागरिकांसाठी अगदी खर्चिक विषय होता. परंतु हळूहळू विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि इंधनाचा खर्च कमी व्हावा. यासाठी विमान कंपन्यांनी वेग वाढवला. विमानाचा वेग वाढल्याने आपोआपच हवेचा दाब जास्त आला. आणि हवेचा दाब कमी करण्यासाठी आणि विमानात असणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये, यासाठी विमानाच्या खिडक्या या गोलाकार बसवल्या गेल्या.

Airtel Recharge Plan : Airtel ने लाँच केला नवा रिचार्ज प्लॅन; 26 रुपयांत 1.5GB इंटरनेट

Airtel Recharge Plan rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवा रिचार्ज प्लॅन लाँच (Airtel Recharge Plan) केलं आहे. हा एक डेटा ऍड ऑन रिचार्ज प्लॅन आहे. म्हणजेच समजा तुमचे रेग्युलर रिचार्जवरील इंटरनेट संपलं असेल तर तुम्ही हा डेटा ऍड ऑन प्लॅन मारून पुन्हा एकदा इंटरनेट वापरू शकता. आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे एअरटेलचा २६ रुपयांचा मोबाईल रिचार्ज .. यामध्ये ग्राहकांना 1.5GB इंटरनेट वापरता येईल. यापूर्वी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला होता, मात्र त्यामध्ये फक्त 1GB इंटरनेट डेटा मिळतो.

व्हॅलिडिटी फक्त 1 दिवसाची- Airtel Recharge Plan

यूजर्स Airtel चा हा प्लान आधीपासून चालू असलेल्या Truly Unlimited प्लॅनसह निवडू शकतात. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणत्याही प्रकारचा फ्री कॉलिंगचा लाभ दिला जात नाही. कंपनीने हा प्लॅन (Airtel Recharge Plan) खासकरून अशा यूजर्ससाठी आणला आहे ज्यांना इमर्जन्सी इंटरनेट डेटाची गरज आहे. 26 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 1 दिवसाची आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1.5GB हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांकडून प्रति एमबी 50 पैसे आकारले जातील. या व्यतिरिक्त, कंपनीकडे आधीपासूनच अनेक डेटा प्लॅन आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना जास्त दिवसांची व्हॅलिडिटी . कंपनीच्या 77 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा आणि 121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 6GB इंटरनेट डेटा मिळतो.

खरं तर यापूर्वीचा 77 रुपयांच्या डेटा प्लॅन 65 रुपयांत मिळत होता. मात्र त्यामध्ये ग्राहकांना 4 जीबी इंटरनेट डेटा आता या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवून 77 रुपये करण्यात आली आहे आणि ग्राहकांना एक जीबी जास्त डेटा देण्यात आलाय. तर दुसरीकडे 121 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये यूजर्सना 6GB डेटा मिळणार आहे, यापूर्वी ग्राहकांना या प्लॅन मध्ये 5GB इंटरनेटचा लाभ घेता येत होता, आता इंटरनेट डेटा वाढवण्यात आलाय. याशिवाय कंपनी एअरटेल थँक्स ॲपवर 2 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. म्हणजेच या प्लॅनवर एअरटेलच्या ग्राहकांना एकूण 8 GB डेटा ऑफर केला जाईल.

Bachchu Kadu : जीभ सांभाळून बोला, बावळट मुलासारखं बोलू नका; बच्चू कडूंनी राऊतांना सुनावलं

Bachchu Kadu Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठीच तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा देशात भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का ? असा सवाल करत जीभ सांभाळून बोला, बावळट पोरासारखं बोलू नका अशा शब्दात बच्चू कडू यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, संजय राऊतांना अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा देशात भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का असा सवाल बच्चू कडू यांनी केला. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर काय तुमचाच हक्क आहे का? लढण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आमच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपला होईल कि काँग्रेसला होईल ते तुम्ही कस ठरवता? त्यामुळे अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही, त्यांनी जीभ सांभाळून बोलत राहावं असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत याना तिसऱ्या आघाडीबाबत सवाल करण्यात आला होता, त्यावेळी ते म्हणाले, तिसरी आघाडी ही कायमच सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचे काम तिसरी आघाडी करत असते. जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतात ते तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात हा आत्तापर्यंतचा इतिहास आणि अनुभव सांगतो. खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विधानसभेची लढत आहे,पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.

बच्चू कडू याना महाविकास आघाडीची ऑफर –

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र बच्चू कडू याना थेट महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं. आम्ही भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात आम्ही एका आघाडी तयार केली आहे. परंतु आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे, आम्हाला बच्चू कडू यांची काहीही अडचण नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी जर महाविकास आघाडीत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हणत जयंत पाटील यांनी बच्चू कडू याना खुली ऑफर दिली आहे.

Weather Update | सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील या जिल्ह्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | यावर्षी संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. तसेच काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नद्यांना पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यंदा दरवर्षीपेक्षा धरणांमध्ये देखील पाणीसाठा भरपूर साठलेला आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभाग दररोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आज म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी देखील हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याचा इशारा दिलेला आहे. आता हा पाऊस नक्की कोणत्या शहरात आणि जिल्ह्यात पडणार आहे ? हे आज आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई तसेच उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच या ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज कमाल तापमान 32°c तर किमान तापमान 26 सेल्सिअस राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास एवढा असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा वेग वाढणार आहे. त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी परभणी, हिंगोली, जळगाव, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा देण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात झालेली आहे.

सोलापूरकरांसाठी खुशखबर ! लवकरच करता येणार हवाई सफर ; 40 ते 70 सीटर विमाने उड्डाण घेणार

solapur news

हवाई प्रवास करायचं सोलापूरकरांचं बऱ्याच वर्षांपासूनच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण डीजीसीए आणि विकास ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी या दोन्ही यंत्रणांच्या परवानगी नंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमान सेवेसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता केवळ अंतिम मंजुरी मिळून मार्ग आणि विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही 40 ते 70 सीटर विमान उड्डाण करतील.

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळासाठी सिद्धेश्वर कारखान्याची 92 मीटर चिमणी ही अडथळा ठरत होती. मात्र 15 जूनला ही चिमणी पाडण्यात आली त्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र वर्ष होऊनही विमानसेवा सुरू झाले नाही. त्यानंतर रनवे, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज अशी कामे देखील तातडीने निविदा काढून पूर्ण करण्यात आली. 2009 मीटर लांबीचा रनवे तयार करण्यात आला असून त्यावरूनच विमान उतरणार आणि उड्डाण देखील करणार आहेत.

दोन महिन्यात सुरू होणार विमान सेवा

खरंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेतून सोलापूरची विमान सेवा सुरू होणार आहे 15 जून 2016 ला या उडान योजनेमधून सोलापूरची निवड करण्यात आली होती मात्र तब्बल आठ वर्षांनी ही सेवा सुरू होणार आहे. देशातल्या सामान्य लोकांनाही माफक दरामध्ये विमानातून प्रवास करता यावा हा त्या योजनेचा उद्देश आहे. सोलापूरची विमानसेवा आता दोन महिन्यात सुरू होईल. तूर्तास विमान कंपन्या व पहिल्यांदा कोणते मार्ग असतील या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणे सुरू असल्याची माहिती होटगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बनोत चंपला यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.

कोणत्या मार्गावर विमानं घेणार उड्डाण ?

दरम्यान तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की सोलापूरहून कोणत्या भागासाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल तर त्यामध्ये सुरुवातीला सोलापूर ते मुंबई हैदराबाद, गोवा या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

नाईट लँडिंग नाही

लवकरच या विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दिवसा विमानसेवा सुरू होणार आहे. विमानसेवेचा प्रतिसाद प्रवासांची संख्या पाहून नाईट लँडिंग ची सोय केली जाणार आहे. त्यापूर्वी विमान कंपन्या, मार्ग निश्चित होणे जरुरी असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून त्या संदर्भात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

बुमराहचा बॉल सोडण्याची चूक अन दांड्या झाल्या गुल (Video)

Bumrah Bowled shadman islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) …. भारताचा नंबर 1 चा गोलंदाज… डावाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद याच बुमराहमध्ये आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs BAN Test Match) हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… आपल्या खतरनाक इन स्विंगच्या जोरावर बुमराहने बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा बोल्ड काढला आणि बांगलादेशला पहिला झटका दिला. सोशल मीडियावर बुमराहचा हा विडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

अशी केली शादमान ची शिकार-

डावाचे पहिले षटक घेऊन आलेल्या बुमराहने अगदी अचूक डोक्याचा वापर करत शदमान इस्लामला आऊट केलं. बुमराहने ओव्हर मधील पहिले पाचही चेंडू ओव्हर द विकेट टाकले. बुमराहने जबरदस्त आऊट स्विंग करत पहिले ५ चेंडू बाहेर काढले. मात्र सहाव्या चेंडूवर बुमराहने शदमान इस्लामला गंडवले. हा चेंडूही बाहेर जाईल असा शदमानचा अंदाज होता. त्यामुळे त्याने चेंडू सोडला.. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि थेट इनस्विंग होत चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. बुमराहाने शदमान इस्लामला अक्षरशा मामा बनवलं.

दरम्यान, भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशच्या संघाला सुद्धा पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. सध्यस्थितीत बांगलादेशची धावसंख्या ९६-७ अशी आहे. मेहंदी हसन मिराज आणि हसन मेहमूद मैदानावर आहेत. शदमान इस्लाम, झाकीर हुसेन, नाजमूल हुसेन शांतो, मुशफिकर रहीम आणि शाकिब अल हसन यांसारखे फलंदाज करिश्मा दाखवू शकले नाहीत. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह , आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले तर सिराजने एक विकेट घेतली.

State Co-Operative Bank | राज्य सहकारी बँकने जाहीर केली आजीवन पेन्शन योजना; निवृत्तीनंतर होणार इतका फायदा

State Co-Operative Bank

State Co-Operative Bank | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (State Co-Operative Bank) कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता या कर्मचाऱ्यांसाठी बँकेने आजीवन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. यावर्षी बँकेला खूप चांगला नफा झालेला आहे. बँकेला 615 कोटींचा नफा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना 10% चा लाभ देखील जाहीर केलेला आहे. याबाबतची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर आनस्कर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नुकतेच 19 सप्टेंबर रोजी राज्य सहकारी बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेली आहे. यावेळी या सभेला माजी खासदार आनंदराव अडसूळ बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे सरव्यवस्थापक आनंद भुईभारी हे सगळे उपस्थित होते.

राज्य सरकारी बँकेने पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी आजीवन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेला बँक कर्मचारी संघटनेचे निवृत्त संघटक सचिव धर्मराज मुंडे यांचे नाव देण्यात आलेले आहे. जाहीर केलेल्या या आजीवन पेन्शन योजने अंतर्गत सध्या काम करत असलेल्या 5007 कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दर महिन्याला 10 हजार रुपये एवढे पेन्शन आजीवन मिळणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक बँकेने केलेली आहे.

राज्य बॅंकेने हे मागील आर्थिक वर्ष 609 कोटींचा नफा कमवलेला आहे. तसेच यावर्षी बँकेला 615 कोटींचा नफा झालेला आहे. म्हणजेच बँकेच्या नफ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आणि ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे असे सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये आता शासनाकडून पोटी प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमांचा समावेश नाही. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर 10 टक्के लाभ कर्मचाऱ्यांना देणे हे बहुमताने मान्य झालेले आहे.

महत्वाची बातमी ! मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद

mumbai -goa

तुम्ही जर मुंबई- गोवा महामार्गात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांपैकी नव्याने वाहतुकीस सुरू करण्यात आलेला एक भुयारी मार्ग आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गाने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर सावध राहा.

मिळालेल्या माहितीनुसार ,अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी आज पासून म्हणजेच दिनांक 20 सप्टेंबर पासून बंद करण्यात येणार आहे. पर्यायी भुयारी मार्गावरील गटार लाईन, दर्शनी भाग, संरक्षण भिंत, सिमेंट काँक्रिटीकरणाची काम अपूर्ण आहे. ती काम पूर्ण करण्यासाठी हा वाहतूक पुन्हा बंद केली जाणार आहे.

हा भुयारी मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबर पासून वाहतुकीस खुला करण्यात आला होता. गेल्या वर्षी गणेश उत्सवात या भुयारी मार्गातून छोटी प्रवासी वाहन सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा तो भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू 25 फेब्रुवारीपासून शिमगा उत्सवापूर्वीच कोकणात ये-जा करण्यासाठी लहान वाहनांना कशेडी घाटाला पर्याय भुयारी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान मुंबईहून अनेक कोकणवासी या मार्गावरून कोकणात जात असतात आणि गणेशोत्सव निमित्ताने इथे जाणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असते म्हणूनच पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीनंतर परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे कशेडी घाट आणि पर्यायी भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली नाही. आता अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी आज पासून म्हणजेच दिनांक 20 सप्टेंबर पासून बंद करण्यात येणार आहे.