Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 458

Sanjay Raut Warn Congress : काँग्रेसने थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये; संजय राऊतांनी सुनावलं

sanjay raut slam congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) जागावाटप सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला (Congress) सुनावलं आहे. काँग्रेसने आत्तापासूनच थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. तुमच्या काही जागा या आमच्यामुळेच वाढल्या आहेत हे ते विसरले असतील. मात्र राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारचा निर्णय घेणार नाहीत. जर कोणाला वाटत असेल कि आमचा आत्मविश्वास वाढला आहे तर निवडणुकीनंतर तो अभ्यासाचा विषय ठरेल, मोठा भाऊ, लहान भाऊ अशी खुमखमी कोणाच्यात असेल तर महाराष्ट्रात काय चित्र आहे ते भविष्यात कळेल असा इशाराही संजय राऊतांनी काँग्रेसला दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut Warn Congress)

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल. लोकसभा निवडणुकीत ज्या मजबुतीने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लढले त्याच मजबुतीने आम्ही विधानसभा निवडणूक सुद्धा लढू असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. लोकसभेला फक्त ४८ जागा असल्याने जागावाटप करणं सोप्प होते. मात्र विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचा विषय आहे आणि आमचे जे छोटे मित्रपक्ष आहेत त्यांनाही आम्हाला सामावून घ्यायचं आहे. नक्कीच आम्ही यात यशस्वी होऊ असेही संजय राऊत यांनी म्हंटल.

दरम्यान, बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, तिसरी आघाडी हे कायमच सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतात ते तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विधानसभेची लढत आहे,पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.

यावेळी संजय राऊतांनी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूनही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात. आपण नक्की कसलं उद्धाटन केलंय हे देखील त्यांना माहिती नसतं, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खरंतर या राज्याच्या संदर्भात भाजप डळमळीत आणि अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात. उद्योगाचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Term Insurance Policy | भारतातील महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करतात Term Insurance ? जाणून घ्या कारण

Term Insurance Policy

Term Insurance Policy | भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते. पुरुष असो अथवा महिला असो त्यांना आर्थिक नियोजन करावेच लागते. परंतु हे आर्थिक नियोजन करताना आपल्या आरोग्य विमाकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. तुमच्या आर्थिक नियोजनात विमा खूप महत्त्वाचा असतो. आजकाल पुरुषांप्रमाणेच महिला देखील टर्म इन्शुरन्स (Term Insurance Policy) मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि याबाबतची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. अनेक अर्थतज्ञ आपल्या आर्थिक नियोजनात विम्याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगतात. नुकतेच एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे की, पुरुषांपेक्षा महिला या टर्म इन्शुरन्स जास्त प्रमाणात खरेदी करतात त्याचा फायदा त्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनात होतो.

टर्म इन्शुरन्स घेणाऱ्या लोकांची संख्या देखील आजकाल वाढत चाललेली आहे. अनेक महिला या विमा खरेदी करत असतात. आर्थिक नियोजनात इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. जाती एखादी स्त्री घर सांभाळत असली, किंवा ऑफिसमध्ये जाऊन काम करत असली, तरी ती प्रत्येक वेळी कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात सहभाग घेत असते. आणि आर्थिक नियोजनातून योग्य अशा गोष्टींना प्राधान्य देऊन त्या गोष्टी करत असते. ज्या महिला त्यांच्या घरापासून दूर असतात. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेलेल्या असतात. त्या महिला त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी घेतात. त्यामुळे या महिला वर्गामध्ये टर्म इन्शुरन्स पॉलिसी (Term Insurance Policy) खरेदी करण्याची संख्या वाढत आहे. जवळपास टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यामध्ये 55 ते 60% हिस्सा महिलांचा आहे.

नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात विम्याची संबंधित ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ही माहिती दिलेली आहे. गेल्या दोन वर्षात महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याच्या संख्येत 80 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे स्त्रिया फक्त विम्या पुरता मर्यादित न राहता त्या अधिकचे कव्हरेज असलेल्या पॉलिसीची निवड करत आहेत. म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचा जास्त विचार करत आहे. आर्थिक भविष्याचा विचार करून ते जास्त कव्हरेज घेत आहेत. यामध्ये दिल्लीमध्ये जवळपास 8 ते 10 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केला आहे. हैदराबादमध्ये ही संख्या 6 ते 7 टक्क्यावर गेलेली आहे. बेंगलोरमध्ये 6 ते 7 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केलेला आहे. मुंबईमध्ये 4.5 आणि गुंटूरमध्ये देखील 4.5 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केलेला आहे. महिला टर्म इन्शुरन्स घेण्याससोबत जास्त कव्हरेज असलेली रक्कम निवडत आहेत.

आजकाल आपण पाहिले गेले तर, महिलांमध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही कर्करोगाच्या आजारात लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे विमा कंपन्या या त्यांच्या गंभीर आजाराच्या रायडरमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचा देखील समावेश केलेला आहे. जेणेकरून महिलांना या टर्म इन्शुरन्स जास्त फायदा होईल. यामध्ये वार्षिक 36 हजार 500 रुपयांपर्यंत फायदे आहेत. त्याचप्रमाणे यात टेली, ओपीडी, मधुमेह, थायरॉईड लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम आणि रक्त तपासणी यांसारख्या सुविधा देखील समावेश आहे.

खुशखबर ! Mi चा दिवाळी सेल, स्वस्तात घरी आणा मोठा टीव्ही आणि स्मार्ट फोन

shopping

भारतात सणांना खूप महत्व आहे. लवकरच वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी सुरु होत आहे. दिवाळीनिमित्त इ कॉमर्स कंपन्या वेगेवेगळे सेल जाहीर करतात. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. Amazon, Flipkart सहित आता Xiaomi ने देखील ‘Mi सह दिवाळी’ची तयारी केली आहे. विक्रीचे बॅनर अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. कंपनीकडून काही ऑफर्स बाबत माहिती देण्यात आली आहे चला जाणून घेऊया …

कंपनीकडून फोन आणि इयरबड्स जिंकण्याची संधी

खास गोष्ट म्हणजे इथून ग्राहकांना प्रत्येक मिनिटाला मॅजिक रिवॉर्ड्स मिळतील. याशिवाय, हे देखील सांगण्यात आले आहे की जर तुम्ही Notify बटण दाबले तर तुम्हाला कंपनीकडून फोन आणि इयरबड्स जिंकण्याची संधी देखील मिळू शकते. असे सांगण्यात आले आहे की या उत्सवाच्या निमित्ताने ग्राहक 45% पर्यंत सूट देऊन स्मार्टफोन घरी आणू शकतात.सेलमध्ये, Redmi 13 5G 17,999 रुपयांऐवजी 1X,X99 रुपयांना घरी आणता येईल. मात्र अद्याप त्याची पूर्ण ऑफर किंमत अद्याप उघड केलेली नाही. याशिवाय, सेलमध्ये, Redmi Note 13 5G 20,000 रुपयांऐवजी 1X,X99 रुपयांना घरी आणता येईल. या फोन्सची ऑफर किंमत लवकरच कळवली जाईल असे सांगण्यात आले आहे. Redmi Note 13 Pro+ 5G 33,999 रुपयांऐवजी 2X,X99 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, तर Xiaomi 14 79,999 रुपयांऐवजी 5X,X99 रुपयांना विक्रीमध्ये सूचीबद्ध केला जाईल.

स्वस्तात घरी आणा टीव्ही आणि स्मार्ट होम डिव्हाइसेस

सेलमध्ये, Xiaomi तुम्हाला तुमचे घर स्मार्ट बनवण्याची संधी देत ​​आहे. येथून असे समजले आहे की ग्राहक 45% पर्यंतच्या सवलतीत सेलमधून स्मार्ट होम आणि टीव्ही घरी आणू शकतात. Xiaomi Smart TV A Series 2024 Edition Rs 24,999 ऐवजी XX,499 मध्ये आणता येईल. तर सेल दरम्यान, Redmi Smart Fire TV 24,999 ऐवजी XX,499 मध्ये आणला जाऊ शकतो. ग्राहक 34,999 रुपयांऐवजी XX,999 मध्ये Xiaomi रोबोट व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करू शकतात. दुसरीकडे, Xiaomi रोबोट व्हॅक्यूम क्लीनर 59,999 रुपयांऐवजी XX,999 मध्ये आणले जाऊ शकते.

याशिवाय, सेलमध्ये 35% पर्यंत सूट देऊन टॅबलेट घरी आणता येईल. तसेच, तुम्ही स्वत:साठी स्मार्टवॉच किंवा ऑडिओ डिव्हाइस खरेदी केल्यास, तुम्हाला ७०% पर्यंत सूट मिळेल. सेलमधील ॲक्सेसरीजवर 70% पर्यंत सूट देखील उपलब्ध असेल.

Honor 200 Lite 5G मोबाईल 108MP कॅमेरासह लाँच; पहा किंमत

Honor 200 Lite 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने भारतीय बाजारात मजबूत कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor 200 Lite 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये तब्बल 108MP चा सुपर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. खास बाब म्हणजे होणरच्या या स्मार्टफोन मध्ये Magic Capsule फीचर सुद्धा मिळतेय जे आयफोनमधील डायनॅमिक आयलंड फीचर प्रमाणे काम करते. आज आपण या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.7-इंच डिस्प्ले –

Honor 200 Lite 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2,412 x 1,080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 2,000nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो . कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6080 SoC चिपसेट बसवली आहे. Honor चा हा स्मार्टफोन हे Android 14 आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असून यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय दिला आहे.

कॅमेरा- Honor 200 Lite 5G

मोबाईलचाय कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Honor 200 Lite 5G मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 108MP मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा मिळतोय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 35W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.1, OTG आणि USB Type-C पोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

किंमत किती?

या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Honor 200 Lite 5G सायन लेक, मिडनाईट ब्लॅक आणि स्टाररी ब्लू रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहक येत्या 27 सप्टेंबरपासून Honor वेबसाइट आणि Amazon सारख्या प्लॅटफॉर्मवर हा मोबाईल खरेदी करू शकतात. SBI बँकेच्या ग्राहकांना या मोबाईलच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.

Western Railway Apprentice Bharti 2024 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत 5066 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

Western Railway Apprentice Bharti 2024

Western Railway Apprentice Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेकांना होणार आहे. अनेक लोकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु अनेक कारणास्तव ही इच्छा पूर्ण होत नाही परंतु आता ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. कारण आता पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Apprentice Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. हे भरती प्रशिक्षणार्थी या पदांसाठी आहे. आणि या पदांच्या तब्बल 566 रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 22 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

पश्चिम रेल्वे या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या |Western Railway Apprentice Bharti 2024

पश्चिम रेल्वे या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी या पदाच्या 5066 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरतीची अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 ही आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा ?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
22 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Accident News : जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Accident News Bus Truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर येत आहे. जालना बीड मार्गावर बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर जाऊन धडकला. आणि हा मोठा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर गेला- Accident News

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर बस हि गेवराईकडून अंबड कडे जात होती, तर मोसंबी भरून येणारा आयशर ट्रक जालन्याहून येत होता. त्याचवेळी वडीगोद्री महामार्गावर मठ तांडा गावाजवळ बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली. आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला. हि धडक इतकी भीषण होती कि दोन्ही गाड्यांचा पुरता चेंदामेंदा झाला. अपघाता वेळी बस मध्ये 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर १४ जण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले. जखमी प्रवाशांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेनंतर पोलीसांनाही बोलावण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत असून हा अपघात (Accident News) नेमका झाला कसा? याचा तपास करत आहेत. मात्र या भीषण अपघातामुळे मठ तांडा गाव हादरुन गेलं आहे.

Tirupati Balaji : बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर…; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Tirupati Balaji prasad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल होते. यानंतर याबाबत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या रिपोर्टमधून आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर माशांचे ऑइल सुद्धा वापरण्यात आल्याचे अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लाडू बनवण्यासाठी बीफ फॅट, फिश ऑईल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचा दावा सत्ताधारी टीडीपीने केला आहे.

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकारांना कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्यामध्ये दाखवलेल्या तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी झाली आहे. कथित प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे. नमुने स्वीकारण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै चा होता. वेंकट रमण रेड्डी यांनी या रिपोर्टची प्रतही शार केली आहे. परंतु प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकार किंवा तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (TTD) यांच्या प्रयोगशाळेच्या अहवालावर अधिकृत पुष्टी नाही.

भक्तांच्या भावना दुखावल्या- Tirupati Balaji

दरम्यान, तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मंडळाने गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडून तूप खरेदी केलेले नाही, असे कर्नाटक दूध महासंघाने गुरुवारी सांगितले. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) सत्तेत आल्यापासून नंदिनी समूह तूप पुरवत असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. या एकूण सर्व प्रकरणानंतर भाविकांना मात्र मोठा झटका बसला आहे. कारण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे नक्कीच्या त्यांच्या भावना दुखावल्या असतील हे मात्र नक्की….

iPhone 16 ची बातच न्यारी!! खरेदीसाठी दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड (Video)

iPhone 16 Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone बद्दल भारतीयांना मोठं कुतुहूल आहे. प्रत्येकालाच वाटत कि आपल्याकडेही एखादा आयफोन असावा. भारतात आयफोनची क्रेझ किती मोठी आहे हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. iPhone 16 सीरीज आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होताच मुंबईतील आयफोन स्टोअरबाहेर ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. ग्राहक अक्षरशः पळत पळत स्टोअरकडे जात असल्याचे दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो ॲपल बीकेसी – मुंबईचा आहे. सकाळी सातच्या सुमारास ॲपल स्टोअरसमोर मोठी गर्दी दिसून आली. एवढी गर्दी होती की चेंगराचेंगरी झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळावी लागली. यावरून भारतात iPhone 16 ची किती क्रेझ आहे हे स्पष्ट होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

काय आहेत iPhone 16 चे फीचर्स

आयफोन 16 हा एरोस्पेस ग्रेड अल्युमिनियम डिझाईन सह उपलब्ध होणार आहे. हा फोन पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या मोबाईलला काचेच्या सिरॅमिक सील्सह चांगले संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच आयफोन 16 प्लस मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. ॲपलच्या इन हाऊसचा कोर्स सीपीयू आणि पाच कॉल जीपीयूसी तीन एमए तसेच एप्पल इंटेलिजन्स यांसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच गेमिंगसाठी चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडिओसाठी देखील फायदा होणार.

या फोनच्या नवीन कॅमेरा कंट्रोल बटनामुळे आता फोटो क्लिक करणे खूप सोपे झालेले आहे. हे एक बटन क्लिक केल्यावर ती कॅमेरा उघडते आणि जास्त वेळ टॅप केल्यावर थेट व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जातो. या फिचरमध्ये तुम्हाला झूम यांसारखे पर्याय देखील आहे. युजर्सला या बटनासह लाईट प्रेस आणि क्लीन दोन्ही पर्याय मिळणार आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 18 मेगापिक्सल सह फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल सह अल्ट्रावाईड लेन्स सहज 18 मेगापिक्सल फ्युजन कॅमेरा मिळणार आहे. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.

Pune Airlines : पुणेकरांना खुषखबर!! या 2 देशांसाठी थेट विमानसेवा सुरु

Pune Airline dubai and bankok

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे मुख्य स्थान असलेल्या पुण्यातुन आता नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा (Pune Airlines) सुरु होणार आहेत. पुणे ते दुबई आणि पुणे ते बँकॉक अशा या दोन्ही विमानसेवा आहेत. हि दोन्ही विमाने इंडिगो कंपनीची असतील. यातील पुणे-दुबई- पुणे हि विमानसेवा रोज सुरु असेल तर पुणे- बँकॉक- पुणे विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस सुरु राहील. येत्या 27 ऑक्टोबरपासून या दोन्ही विमानसेवा सुरु होतीलपुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी यासंदर्भातील माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटल, पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’… पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे (Pune Airlines) येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सणासुदीच्या काळात एकप्रकारे पुणेकरांना खुशखबरच दिली असं म्हंटल पाहिजे.

प्रवाशांना मोठा दिलासा – Pune Airlines

पुणे आणि दुबई यांच्यातील थेट विमानसेवेमुळे दोन्ही शहरांमधील ‘अंतर’ कमी होईल आणि आर्थिक प्रगतीचे नवे आयाम खुले होतील, तसेच बँकॉकसारखी पर्यटन केंद्रेही थेट पुण्याशी जोडली जातील. सध्या पुणे विमानतळावरून स्पाइसजेटद्वारे संचालित दुबई आणि विस्तारा द्वारे संचालित सिंगापूर अशी २ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु आहेत. सिंगापूर साठीची फ्लाइट डिसेंबर २०२३ पासून सुरु झाली आहे, तर दुबईची फ्लाइट आता वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु , अलीकडे, स्पाइसजेटच्या आर्थिक परिस्थितीला या विमानाचा फटका बसला आहे आणि त्यामुळे वारंवार विलंब होत आहे आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना स्पाईसजेट वर अवलंबून न राहता दुबईला जाण्यासाठी मुंबईला जाण्यास भाग पाडले जात आहे. मात्र आता इंडिगोचे विमान पुण्याहून थेट दुबईला जाणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

PM Asha Yojana | शेतकऱ्यांसाठी काय आहे PM आशा योजना?; सरकारने मंजूर केला 35,000 कोटींचा निधी

PM Asha Yojana

PM Asha Yojana | सरकार मार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी स्त्रियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांमधून नागरिकांना आर्थिक सहकार्य मिळावे. आणि त्यांना सक्षम बनता यावे. यासाठी या योजना आणल्या जातात. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढावे आणि त्यांनी स्वावलंबी बनावे. यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतात. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. सरकारने याआधी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आशा योजना आणली होती. परंतु आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ही पीएम आशा योजना (PM Asha Yojana ) नक्की काय आहे? आणि त्यातून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? हे आपण जाणून घेणार आहोत

काय आहे पीएम आशा योजना? | PM Asha Yojana

मोदी सरकारने पीएम आशा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी सरकारला जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगले संरक्षण देणार आहे
शेतकऱ्यांची पिके ही जसे की तेलबिया, कडधान्य धान्य, भाजीपाला हे उत्पादने एमएसपीच्या खाली गेले तर सरकार त्यांना एमएसपीवर खरेदी करणार आहे.

या योजनेसाठी खर्च किती?

या योजनेसाठी सरकारला एकूण 35 हजार कोटी रुपये एवढा खर्च करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठीच तसेच ग्राहकांना देखील स्वस्त दरात शेतकऱ्यांच्या मध्यस्थ त्यांचा माल विकत घेतला जाणार आहे, आणि ग्राहकांना देखील योग्य दरात विकला जाणार आहे. परंतु ही मर्यादा उडीद आणि मसूर या पिकांवर लागू केली जाणार नाही. यामध्ये शंभर टक्के खरेदी उडीद मसूर या डाळींची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय | PM Asha Yojana

सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आणि त्यांचे प्रोत्साहन देखील वाटते शेतकरी आत्महत्या होतात. तसेच अधिक उत्पादन घेण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशा योजनेसाठी 35000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.