Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4613

‘या’ सरकारी बँका केल्या आहेत शॉर्टलिस्ट, लवकरच होणार खासगीकरण ! RBI गव्हर्नरने केले ‘हे’ मोठे विधान

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणा बाबत (privatisation) सरकार बरोबर चर्चा करीत आहोत. या संदर्भातील ही प्रक्रिया पुढे केली जाईल. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात शक्तीकांत दास म्हणाले की,”आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) खाजगीकरणाबाबत सरकारशी चर्चा करीत आहोत आणि या संदर्भातील ही प्रक्रिया लवकरच पुढे नेली जाईल.

ही प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आहे
सूत्रांच्या माहिती नुसार, सरकारी बँकांचे खासगीकरण आता फास्ट ट्रॅकवर आहे. नीति आयोगाने बँकांच्या खासगीकरणाचा अहवाल तयार केला आहे. यात पहिल्या टप्प्यातील खासगीकरणासाठी बँकांची नावे निवडणे शक्य आहे. अन्य माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने 4 सरकारी बँकांना शॉर्टलिस्ट केले आहे, असे म्हटले जात आहे की, यापैकी दोन बँकांचे पुढील आर्थिक वर्षात खाजगीकरण केले जाईल. खासगीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओवरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावाची चर्चा आहे. परंतु, अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.

खासगीकरणाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली
सरकारने अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या लिस्ट मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाया नावांची चर्चा आहे. खाजगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण प्रस्तावित केले.

बँक संघटना संपावर आहेत
सरकारवर या प्रस्तावापासूनच बँक संघटना आणि विरोधी पक्षातील विविध नेत्यांकडून याबाबत बरीच टीका केली जात आहे. बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक संघटनांनी 15 आणि 16 मार्च रोजी अलीकडेच दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला होता आणि पुढील संपाचा धोकाही होता. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी करून ग्राहकांवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. बँकेच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत”.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव – चंद्रकांत पाटील

chandrakant dada anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉंब मुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावरुन, विरोधकही महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी हप्त्याचे टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला.

परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे पत्र सोपवलं असून त्यासंबंधीचं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप- एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??” अस ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले.

दरम्यान यापूर्वीच अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले.

कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकारमुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Fitch ने GDP च्या वाढीचा अंदाज बदलला, आर्थिक वर्ष 22 मध्ये वेगाने होणार विकास

नवी दिल्ली । फिच रेटिंग्सने पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या वाढीचा अंदाज 12.8 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. यापूर्वी या रेटिंग एजन्सीने पुढील आर्थिक वर्षात 11 टक्के वाढीचा अंदाज लावला होता. फिचने आपल्या ताज्या जागतिक आर्थिक परिस्थितीत (जीईओ) नमूद केले आहे की,’ लॉकडाऊनमुळे आलेल्या मंदीमुळे भारत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे.’ फिच म्हणाले, “पूर्व-परिणाम, वित्तीय आघाडी आणि संक्रमणाची चांगली रोखण यामुळे याने भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजानुसार बदल केले आहेत.”

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की,”2020 च्या उत्तरार्धात पुनरुज्जीवन झाल्यामुळे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) कोरोना महामारीच्या आधीच्या पातळीवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत आम्ही 2021-22 च्या विकास दराचा अंदाज 11 टक्क्यांवरून 12.8 टक्क्यांपर्यंत सुधारित केला आहे.”

यासह फिच म्हणाले, “आमचा अंदाज आहे की, भारताचा जीडीपी आमच्या पूर्व-साथीच्या अंदाजापेक्षा कमी असेल. डिसेंबरमध्ये जीडीपी वाढीचा दर पूर्व-साथीच्या पातळीपेक्षा पुढे गेला. तिमाहीत वार्षिक आधारावर जीडीपी 0.4 टक्क्यांनी वाढली. यामुळे मागील तिमाहीत जीडीपीमध्ये 7.3 टक्के घट झाली.”

अर्थव्यवस्थेत भरभराट होत आहे
रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की,” 2020 च्या कॅलेंडर वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली होती, परंतु त्यानंतर ती आमच्या अपेक्षेपेक्षा वेगवान झाली.” फिच म्हणाले की,”सन 2020 च्या शेवटच्या महिन्यांत अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा झाली आहे. संसर्ग प्रकरणांमध्ये घट आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विश्रांती घेण्यात आली आहे.”

चीन आणि अमेरिकेची वाढ
भारतासह फिचने अंदाज व्यक्त केला आहे की,”अमेरिकेचा जीडीपी विकास दर आर्थिक वर्ष 22 मध्ये 6.2 टक्के राहील. एजन्सीने यापूर्वी अमेरिकेचा आर्थिक विकास दर 4.5 टक्के राहण्याची शक्यता वर्तविली होती. त्याच वेळी चीनची आर्थिक वाढ 8.4 टक्के आणि युरोपियन युनियनच्या जीडीपीत 4.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एजन्सीने पूर्वी चीनच्या 8% आर्थिक वाढीचा अंदाज लावला होता. त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या आर्थिक वाढीच्या अंदाजांमध्ये सुधारणा केली गेली नाही.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

जि.प. शिक्षकांची 4 कोटींची देयके निधीअभावी धूळखात, देयके कालबाह्य होण्याची शिक्षकांमध्ये भीती

औरंगाबाद | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 4 कोटींची देयके निधी अभावी धूळखात पडून असून ही देयके न मिळाल्यास देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेवर सुमारे 1250 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी दोनशे ते अडीशे शिक्षक- शिक्षिका यांचे सन 2019 पासूनचे मेडिकल परिपूर्तीचे, अर्जित रजा, दीर्घ मुदतीच्या आजारी रजा, वेतन तफावत फरक देयके, चटोपाध्याय फरक देयके असे विविध प्रकारचे पुरवणी देयके बजेट अभावी पंचायत समितीला प्रलंबित आहे.

पुरवणी देयकासाठी आवश्यक निधीची मागणी शिक्षण विभागाने करूनही वरिष्ठ कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा करून बजेट प्राप्त करणे अपेक्षित असताना असे होताना दिसत नसल्याने देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये झाली आहे, देयके कालबाह्य झाल्यास नव्याने जिल्हा परिषद सभेत मंजुरी घेऊन मुदत वाढ घ्यावी लागते. त्यानंतर त्यास लेखाधिकारी मंजुरी देतात याकामी अधिक विलंब लागतो.

त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने अन्य हेड मधून शिक्षकांच्या थकीत देयकांसाठी पंचायत समितीला निधी 31 मार्चपूर्वी उपलब्ध करून द्यावा व थकीत संपूर्ण देयके निकाली काढावीत, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

भाजप सोबत राहावे म्हणून ‘या’ आमदारावर रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

jitendra awhad rashmi shukla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड  गंभीर आरोप केला आहे. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले.

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

मावशीकडे राहणाऱ्या मुलीचे अपहरण करून अत्याचार, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाळूज महानगर | १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहात होती. तिची मावशी व काका हे दोघे १६ मार्चला कामासाठी घराबाहेर पडले होते. घरमालकाने तिच्या मावशीला संपर्क साधून, मुलगी घरी नसल्याचे सांगितले.

मावशी व तिच्या पतीने घरी येऊन तिचा शोध सुरू केला. ती न सापडल्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार ठाण्यात दिली. पोलीस तपासात, तिला पवन दुगमोगरे (२१, रा. रांजणगाव परिसर) याने आमिष दाखवून पळवून नेल्याचे समोर आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का??; नाना पटोलेंनी राऊतांना फटकारले

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युपीए अध्यक्षपदावरून राज्यातील महाविकास आघाडी मधेच बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

नाना पटोले म्हणाले , मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते संजय राऊत

यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावं असं संजय राऊत म्हणाले होते. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. या मुरमावरून हा ट्रक घसरत दुभाजकाला धडकला असल्याचे ट्रकचे चालक अरुण दहिफळे यांनी सांगितले.

दहिफळे हे गेल्या बारा वर्षांपासून घोडेगाव (ता. नेवासा, जि. नगर) येथे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते सिल्लोड येथील बाजार समितीतून मका घेऊन पुण्याकडे निघाले होते.
दरम्यान दीड वाजेच्या सुमारास जळगाव रस्त्यावरील वोखार्ड चौकात आल्यानंतर ट्रक हा महापालिकेने टाकलेल्या मुरमावरून ट्रक घसरत दुभाजकाला भिडला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group