Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4612

शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला विसरलेले राऊत, राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानाने करतायत – प्रवीण दरेकर

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत हे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखी वक्तव्य करत आहेत. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, बंजारा समाज त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं केलं. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्य आहे, त्या विषयी दुमत असण्याची काहीच कारण नाही. परंतु त्यावेळेला चौकशीसाठी राजीनामा आवश्यक वाटला, म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षचा नेता, त्याचा राजीनामा घेतला जातो तेव्हा संजय राऊत याचं वक्तव्य येत नाही, की चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून, मग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? की कशासाठी माहिती नाही.

परंतु त्याचवेळेला शिवसेनेच्या कार्यकर्त्याची, नेत्याची पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची भलामन पाठराखण अत्यंत इमानदारीने करताना दिसतात. म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसतात.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

अजितदादांच्या सभेला कोविडचा नियम नाही मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियम : राजू शेट्टी

raju shettty ajitdada

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे. आम्हांला कोविडचा नियम अन्‌ परवा पंढरपूरला अजितदादांची सभा झाली, त्याला कोविडचा नियम नाही. जनरल मिटिंग होणार त्याला कोविडचा नियम नाही. आम्ही आम्हांला कोविडचा नियम, आम्हांला जमावबंदी. आम्ही काय गुन्हा केला आहे. कराडला येताना आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच काय कारण होतं. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी म्हणाले, कुपनंच शेत खायला लागलंय, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कारखान्यांची एफआरपी जाहिर करा. राज्यातील सगळ्या कारखान्यांनी एफआरपी नाही दिली, तर काय कारवाई करणार ते सांगा. माझं आणि सहकारमंत्र्यांचा भांडण नाही. तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळाला हवा.

पुढे श्री. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे ४० हजार कोटी येण आहे, ते सरकारने वसूल करून द्यायचे आहे. आज कुणाचं २ हजार, ५ हजार लाईटबिल थकित आहे, त्याला १८ टक्के पठाणी व्याज चालू आहे. ऐन उन्हाळ्यात पीक वाळतं चाललं आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी २ हजार रूपये थकितसाठी आत्महत्या केली. आमचं पैसे येण आहे, ते तुम्ही वसूल करू देत नाही. आम्ही वसूल करायला गेल की ताब्यात घेता. बुडवणाऱ्यांना पाठीशी घालता. आमचं वीज कनेक्शन मात्र तोडता म्हणजे राज्य सरकारचे नेमकं चाललंय काय? असा सवाल त्यांनी केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

नाथनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर हडको येथील ६५ वर्षीय स्त्री, पडेगावं येथील ७८ वर्षीय स्त्री, नवनाथनगर हडको येथील ६५ वर्षीय पुरुष, पडमपुरा भागातील ६३ वर्षीय पुरुष, रांजणगाव, शेंपुंजी येथील ६५ वर्षीय स्त्री, छत्रपतीनगर रांजणगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, शताब्दीनगर औरंगाबाद येथील ५५ वर्षीय स्त्री, रोशन गेट येथील ६२ वर्षीय स्त्री तर लेबर कॉलनी भागातील ८३ वर्षीय स्त्री अशा एकूण दहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद घाटी रुग्णालयात करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. दोन वेळा सरकारने आकृतीबंध पालिका प्रशासनाकडे परत पाठवला. सरकारने काढलेल्या त्रुटींची पुर्तता केल्यावर अखेर तीन महिन्यांपूर्वी आकृतीबंध मंजूर झाला. आकृतीबंधासोबतच महापालिकेने नवीन सेवाभरती नियम सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले होते. हे नियम मात्र सरकारने अद्याप मंजूर केले नाहीत. सेवाभरती नियमात सरकारने काही त्रुटी काढल्याची माहिती खुद्द प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. त्रुटींची पुर्तता करण्याचे काम सुरु आहे. त्रुटींची पुर्तता झाल्यावर सेवाभरती नियम पुन्हा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. सरकारची मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नोकरभरती करण्यासाठी पालिकेला सेवाभरती नियमांच्या मंजुरीची गरज आहे. सरकारने हे नियम मंजूर केल्याशिवाय महापालिकेला नोकरभरती करता येत नाही. आकृतीबंध मंजूर झाल्यावर पालिका प्रशासनाने मे अखेरपर्यंत आवश्यक त्या पदांची भरती करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे कामात सुसूत्रता येईल, असे मानले जात होते. परंतु सेवाभरती नियमांची मंजुरी लांबणीवर पडल्यामुळे नोकरभरतीही आता लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

कारखान्यांची आरआरसी केली नाही तर “धमाका” करणार ; राजू शेट्टी यांचा इशारा

raju shetty 1

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ५ एप्रिल पर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमीकाव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे दिला.

थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात राजू शेट्टी यांनी आज सह्याद्री कारखान्यावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. सह्याद्री कारखान्यांवर पोहोचणे अगोदरच पोलिसांनी राजू शेट्टी यांना महामार्गावर ताब्यात घेऊन कराडच्या शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात बैठक होऊन चर्चा झाली.

योवळी राजू शेट्टी म्हणाले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १ एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहेत. १५ मार्च अखेर साखर कारखान्यांकडे २८८५ कोटी एफआरपी थकीत होती. १५ दिवसांत ५०० कोटी थकित वसुल झाली असल्याचा सहकार मंत्र्यांचा दावा आहे. आम्ही ५ एप्रिल ला साखर आयुक्तालयात जाऊन तू किती एक तारखेची साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत. तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही, तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करू. तसेच साखर आयुक्तांना घेराव घालू.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते रायगड ला पोहचतील, असे धाडस ग्रुपने नियोजन केले आहे. आज दुपारी औरंगाबाद मध्ये हे तरुण सायकलवर येताच औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी  असोसिएशनचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजीतसिंग संघा, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, सोनम शर्मा, विवेक मसलेकर, राहुल अग्रवाल, डॉ. प्रशांत अवसरलमल यांनी धाडस ग्रुपच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांना शीतपेय वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला.

सामाजिक संदेश देत नागपूर ते रायगड अनोखा प्रवास…
धाडस ग्रूपच्या वतीने मुले व मुलींनी सायकल वर प्रवास नागपूर येथून सुरू केला असून आज ते औरंगाबाद मध्ये पोहचले आहेत. यात सायकलिंग करताना नागपूर ते रायगड दरम्यान जे गावे लागतात त्या गावात विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत अनोखा सायकलवर प्रवास करत आहेत. त्यात स्त्री सशक्तीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, गडकिल्ल्यांचे महत्व पटवून दिले जात आहे.  याशिवाय वाढत असलेली महागाई त्यात पेट्रोलचे वाढते दर यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सायकलचा वापर करावा, इंधन बचाव व निरोगी आरोग्यासाठी जनजागृती देखील सायकलवर प्रवास करताना युवक करत आहेत. यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. दररोज १०० ते १५९०  प्रवास पूर्ण करणार असून  या उपक्रमात वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे,  सुमित शरणागत, अविनाश कटरे,  शुभम मुंडले, निशांत निंदेकर अनिरुद्ध सोलत, राज मुंने, शरद अमगावकर यांचा सहभाग आहे. त्यांना या अनोख्या उपक्रमासाठी दत्ताजी शिर्के, महेश महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Gold Price Today: सोन्यात आज किंचितशी वाढ झाली तर चांदी अजूनही स्वस्त आहे, नवीन दर लवकर पहा

नवी दिल्ली । आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 25 मार्च 2021 रोजी सोन्याच्या किंमती (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम अवघ्या 44 रुपयांनी वाढल्या. अनेक दिवसांच्या गदारोळात सोन्याचा भाव अजूनही 44,000 रुपयांवर आहे. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) स्थिर वाढ झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,303 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 64,747 रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घट नोंदली गेली, तर चांदी स्थिर राहिली.

सोन्याचे नवीन दर
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 44 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. राजधानी दिल्ली येथे 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे नवीन भाव आता प्रति 10 ग्रॅम 44,347 रुपये झाले. यापूर्वीच्या व्यापार सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 44,303 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत किरकोळ घसरून 1,733 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीचे नवीन दर
चांदीच्या किंमती आज प्रतिकिलो 637 रुपयांनी घसरल्या. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचा दर घटून 64,110 रुपये प्रतिकिलो राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही आणि तो प्रति औंस 24.97 डॉलर होता.

सोन्यामध्ये तेजी का आली ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांच्या घसरणीसह 72.62 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. त्याच वेळी, किंचित चढउतारांसह न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने मजबूत स्थितीत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

“कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विकास दरावर परिणाम होणार नाही, त्यात 10.5% नेत्रदीपक वाढ होईल “- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी गुरुवारी आत्मविश्वास व्यक्त केला की, कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन लाट (COVID-19) आर्थिक वृद्धीच्या प्रगतीच्या गतीवर परिणाम करणार नाही आणि रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंतचे लक्ष्य ठेवले आहे. जीडीपीमध्ये 10.5 टक्के वाढ. कोविड -19 विषाणूची लागण वेगाने वाढेल आणि अनेक शहरांमध्ये ते लॉकडाउन लादण्याची शक्यता आहे या भीतीने RBI गव्हर्नर यांचे हे आश्वासन महत्त्वपूर्ण आहे.

दास म्हणाले -” वाढीचा अंदाज कमी करण्याची गरज नाही”
टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये दास म्हणाले की,” आर्थिक क्रियाशीलतेचे पुनरुज्जीवन अविरत सुरू राहिले पाहिजे आणि आर्थिक वर्ष 2021-22 मधील आरबीआयच्या 10.5 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज कमी करण्याची मला गरज नाही.” त्याच वेळी ते म्हणाले की,”यावेळी गेल्यावर्षीप्रमाणे लॉकडाऊन कोणालाही भीती वाटत नाही.”

संक्रमणास सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त उपाय आहेत
ते म्हणाले की,”किंमत आणि आर्थिक स्थिरता राखताना आरबीआय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या सर्व धोरणात्मक उपायांचा वापर करण्यास वचनबद्ध आहे. देशातील कोविड -19 संसर्गाची वाढती प्रकरणे ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले, परंतु या प्रकरणाला सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे अतिरिक्त उपाययोजना आहेत.” त्याच वेळी ते म्हणाले की,”गेल्यावर्षीप्रमाणे यावेळी कोणालाही लॉकडाऊनची भीती वाटत नाही.”

फिचने विकास दराच्या वाढीचा अंदाज केला
फिच रेटिंग्जने पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या वाढीचा अंदाज वाढवून 12.8 टक्के केला आहे. यापूर्वी रेटिंग एजन्सीने पुढील आर्थिक वर्षात विकास दर 11 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. फिचने आपल्या ताज्या जागतिक आर्थिक परिस्थितीत (जीईओ) नमूद केले आहे की, लॉकडाऊनमुळे आलेल्या मंदीमुळे भारत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे.

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की,” 2020 च्या उत्तरार्धात पुनरुज्जीवन झाल्यामुळे सकल देशांतर्गत उत्पाद (GDP) महामारीच्या आधीच्या पातळीवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आम्ही 2021-22 च्या विकास दराचा अंदाज 11 टक्क्यांवरून 12.8 टक्क्यांपर्यंत सुधारित केला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

मलकापूर शहरात फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी कराड शहरात

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी

कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणाऱ्या गोकाक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. पाईपलाईन फुटल्याने मलकापूर शहराच्या हद्दीतील पाणी कराड शहराच्या हद्दीत कोल्हापूर नाका येथील रस्त्यावरून वाहत असल्याने लोकांनी पाहण्यास गर्दी केली होती. अचानक रस्त्यांवर आलेल्या पाण्याने रस्त्याला ओढ्याचे रूप आले होते.

मलकापूर हद्दीतील शास्त्रीनगर येथील श्री पाटील टायर्स दुकानामागून गोकाक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. सदरच्या पाणीपुरठा संस्था १९६६ सालची असून दोन किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेण्यात आलेली आहे. पूर्वी २ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र या योजनेमुळे ओलीताखाली येत होते. सध्या ११०० हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येत आहे. गोकाक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन यापूर्वी १३ वर्षापूर्वी फुटलेली होती. यानंतर आज पाईप फुटल्याने रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणीपातळी वाहत होती. त्यामुळे वाहनचालकांना तसेच व्यापारी लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.

गोकाक पाणीपुरठा संस्थेची पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच संस्थेचे सुरेश जाधव व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाईप फुटली त्यावेळी लाईट गेल्याने पाणी वाहण्याची क्षमता कमी होती, अन्यथा अजून लोकांचे नुकसान झाले असते. पाईपलाईन दुरूस्तीसाठी लाखांत खर्च असून संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तर लोकांनी रस्त्यांवरून वाहणारे पाणी बघण्यासाठी श्री पाटील टायर्स येथे गर्दी केली होती.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LIC कडून लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता 6 महिन्यांपर्यंत नाही द्यावा लागणार Home Loan चा EMI

नवी दिल्ली । LIC हाउसिंग फायनान्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. जर तुम्ही देखील होम लोन घेतले असेल तर तुम्हाला 6 महिन्यांचा ईएमआय द्यावा लागणार नाही. म्हणजेच कंपनीने आपल्या ग्राहकांचा 6 महिन्यांचा ईएमआय माफ केला आहे. Griha Varishtha योजनेंतर्गत लोन घेणार्‍या ग्राहकांसाठी कंपनीने गुरुवारी ही सुविधा दिली आहे. पगारदार तसेच पेन्शनधारकांसाठी ही योजना डिफॉल्ट बेनिफिट पेंशन स्कीम (DBPS) अंतर्गत आहे.

कोणकोणत्या EMI वर मिळेल सूट?
कंपनी 37 व्या, 38 व्या, 73 व्या, 74 व्या, 121 व्या आणि 122 व्या ईएमआय वर ग्राहकांना सवलत देईल. जेव्हा हे ईएमआय देय असतील तेव्हा ग्राहकांना सूट मिळण्याचा लाभ मिळेल.

कोण कोण लोन घेऊ शकेल?
गृह वरिष्ठ मार्केटमध्ये उपलब्ध असलेला एक वेगळा होम लोन प्रोडक्ट आहे. या योजनेद्वारे कर्ज घेणार्‍याचे वय 65 वर्षांपर्यंत असू शकते. निवृत्तीवेतनधारकांसाठी कंपनीने एक खास होम लोन प्रोडक्‍ट ‘गृह वरिष्ठ’ देखील जारी केले आहे. याअंतर्गत, कर्जाची मुदत ग्राहकाचे वय 30 वर्षे किंवा जास्तीत जास्त 80 वर्षे होईपर्यंत ठेवली जाईल, त्यापैकी आधीचे जे असेल त्यामध्ये

6 ईएमआय वर मिळेल ही सूट
या योजनेअंतर्गत तयार घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 ईएमआयवर सूट आणि बांधकाम सुरु असलेल्या घरांच्या हप्त्यापोटी 48 महिन्यांच्या मोरेटोरियमसारखी सुविधा देखील मिळेल.

कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
एलआयसी हाउसिंग फायनान्सचे (LIC Housing Finance) मुख्य कार्यकारी अधिकारी वाई विश्वनाथ गौर म्हणाले,” गृह वरिष्ठच्या फीचर्समुळे जुलै 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून त्याची चांगली वाढ झाली आहे. कंपनीने 3000 कोटी रुपयांची सुमारे 15,000 कर्जे वितरित केली आहेत. यावेळी ग्राहकांना कंपनीकडून सहा-ईएमआयवर सूटही देण्यात येत आहे.

सिबिल स्कोअर किती असावा?
कंपनीने म्हटले आहे की, सध्या सिबिल स्कोअर 700 आणि त्यावरील ग्राहकांसाठी 15 कोटी पर्यंतच्या होम लोनवर 6.90 टक्के व्याजदर सुरू होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group