Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4614

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि अंशतः लॉकडाऊन याबाबत संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली.

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवणे, शासकीय रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

आज सायंकाळी साडेचार वाजता पालकमंत्री पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार की उपाययोजना अजून कठोर करण्यात येईल याबाबत घोषणा करतील, असे असले तरीही जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चाना पेव फुटले असल्याचे ऐकायला मिळत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

पोलीस ऍक्शन मोड मध्ये; नियम मोडणाऱ्या हॉटेल,सलून, पानटपरी सह टवाळखोरावर गुन्हे दाखल

औरंगाबाद | कोरोनाच्या पर्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल चालक, सलून, पान टपरी, सह विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई करीत थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक स्वरूपाचे नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेल, सह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. अशा ठिकाणी पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. हर्सूल भागात फिरणाऱ्या काझी मुजजमिल, आरिफ अहेमद खान मोहम्मद अन्वर खान, आसिफ पठाण शब्बीर पठाण, उमर महोम्मद हुलेन चौधरी,शेख रशीद शेख काशीद शेख कासीम, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीतील बारापुल्लागेट जवळ संतोष बद्रीनारायन जैस्वाल वय-45 हे नियमांचे उल्लंघन करून सलून चालविताना मिळून आला तर मुजीब हबीब यार खान या किराणा दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सिडको पोलीस ठाणे हद्दीतील रोहिदास शामराव बनसोड वय-29 (गोकुळनगर, जाधववाडी) हा विनामस्क फिरताना आढळला तर शरद बाबासाहेब घोरपडे,विशाल वसंत अंबाडे, शेख फाईम शेख करीम, सह हॉटेल चालक आकाश काकासाहेब इंगोले 25 यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला तर जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर विशवंभर कोठुळे, व्यंकटेश जितेंद्र सोनवणे हे नियमांचे उल्लंघन करून पान टपरी चालविताना मिळून आले तर पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात संतोष केशवराव लवटे वय-45 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विविध भागांतील झालेल्या या कारवाई पाहता शहर पोलीस दल आता ऍक्शनमोड मध्ये आल्याचे पाहायला मिळत असून या कारवाया मुळे नियम मोडणाऱ्याचे चांगलेच धाबे दनांनल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा हा नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून सोशल मीडियावर चर्चेच असतात. त्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तो नेहमी निशाण्यावर घेत त्याच्यांची थट्टा करत असताना दिसतो. तर आता त्याने ट्वीट करत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात असा टोला कामराने लगावला आहे.

कुणाल कामराने एक ट्विट केलं असून त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केलाय. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं आहे. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केलाय.

यापूर्वी देखील कुणाल ने फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हंटल होत की देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही याची मला खात्री आहे. दरम्यान, कुणाल कामरांसारखे अनेक काॅमेडियन राजकीय मुद्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या एका ट्विटमुळे मध्यंतरी मोठा खळबळ उडाली होती. न्यायालयावर केलेल्या आक्षेपार्य ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

SEBI आज अनेक नियम बदलू शकते, Start-ups आणि कंपन्यांना मिळू शकेल मोठा फायदा !

नवी दिल्ली । स्टार्टअप्ससाठी (Start-ups) सेबी (SEBI) लवकरच मोठा दिलासा देऊ शकेल. यासह, IPO सह इतर पब्लिक इश्यू लाँच करण्याचे नियम सुलभ बनवू शकतात. रिपोर्ट नुसार सेबी लवकरच नियमांमध्ये बदल करणार आहे. स्टार्ट-अप्सना पब्लिक होण्यासह आणि अर्ली स्टेज इंवेस्ट्सना एक्झिट विंडोज देण्यासह इनोव्हेटर्स ग्रोथ प्लॅटफॉर्मवर स्टार्ट-अपची लिस्ट तयार करण्याचे नियम बदलतील. याद्वारे कंपन्यांसाठी डिलिस्टिंग प्रक्रियासुद्धा सुलभ करण्यात येणार आहे.

कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने यादीतील नियम बदलण्याची घोषणा केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सेबी आज होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेऊ शकते.

हे बदल होऊ शकतात
अहवालानुसार, आज होणाऱ्या बैठकीत सेबी कंपन्यांना Delisting करण्यात इंडिपेंडेट डायरेक्टर्सच्या मोठ्या भूमिकेस ग्रीन सिग्नल देऊ शकते. याशिवाय लिस्टेड कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट कारभाराला बळकटी देण्यासाठी LODR च्या नियमातही बदल करता येतील.

स्टार्टअपसाठी ‘हा’ बदल केला जाऊ शकतो
स्टार्टअपमध्ये 25 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक भागभांडवल असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी सेबी शेअरहोल्डिंग कालावधी एक वर्षासाठी कमी करू शकते. त्याची वेळ 2 वर्ष आहे. या व्यतिरिक्त, इंवेस्टमेंट डील्ससाठी ओपन ऑफर जारी करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते आणि अँकर इंवेस्टर्सना पब्लिक इश्यूदरम्यान अधिक शेअर्सचे वाटप करता येतील आणि प्रमोटर्स आणि सध्याच्या गुंतवणूकदारांना विशेष अधिकार दिले जाऊ शकतात.

सेबीची योजना काय आहे ते जाणून घ्या ?
या रिपोर्ट नुसार सेबीची योजना अशी आहे की, पब्लिक इश्यू आणणारी कोणतीही कंपनी आयजीपीवर लिस्ट केली जाईल, त्या कंपनीचा प्रमोटर किंवा स्टार्टअपला DVR किंवा सुपीरियर वोटिंग राइट देण्यात येईल. या महिन्यात प्रमोटर्सना DVR शेअर्सचे वाटप करणे एक मोठे पाऊल असेल, कारण लिस्टिंग तयार करुनही तो फाउंडर्सचा प्रभाव स्टार्टअपवर ठेवेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

कोरोनाबरोबरच शहरातील किराणा, औषधी दुकानेही वाढली

औरंगाबाद | कोरोनामुळे शहरातील औषधी दुकानांचा व्यवसायही तेजीत चालला आहे. लॉकडाऊन असो वा नसो औषधी दुकाने सुरूच असतात. यामुळे फार्मसी झालेल्या युवकांनी आपली औषधी दुकाने सुरू केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आधी शहरात २,२०० औषधी दुकाने होती, त्यात मागील वर्षभरात ७० नवीन औषधी दुकानांची भर पडली आहे.

संघटनेचे विनोद लोहाडे यांनी सांगितले की, दरवषी २०० विद्यार्थी फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र, सर्वच विद्यार्थी व्यवसाय सुरू करत नाही; परंतु गेल्या वर्षभरात स्वतःचा औषधी व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

उठाव कमी; पण दुकाने वाढताहेत…
सोने-चांदीच्या भावात मागील वर्षभरात अस्थिरता असताना व उठाव कमी असतानाही शहरातील काही भागांत दागिन्यांचे नवीन दालने सुरू झाली आहेत. सुमारे ३० पेक्षा अधिक नवीन दालने उघडली आहेत. यात जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, उस्मानपुरा आदी भागांत ही दुकाने मागील तीन महिन्यांत उघडली आहेत.

शहराच्या आसपासच्या गावांतील ज्वेलर्सनी शहरात आपली दालने सुरू केल्याचे सराफा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ?? ; युपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने साधला निशाणा

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच युपीएच अध्यक्ष व्हावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. दरम्यान राऊतांच्या या मागणीवरून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. अस म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली.

हुसेन दलवाई म्हणाले, ” संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, अशी खरमरीत प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

घाटीत गंभीर रूग्णांसाठी खाटा वाढवा, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या सूचना

औरंगाबाद | घाटीत प्रत्येक गंभीर रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. येथे गंभीर रुग्णांना नाकारले जाते, असे होता कामा नये. घाटीची प्रतिमा मलीन होऊ नये. यासाठी खाटांची संख्या वाढवा. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना मनपाच्या काेविड केअर सेंटरला पाठवा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटी प्रशासनाला केली.

घाटीत अधिष्ठातांच्या कक्षात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत केंद्रेकर यांनी या सूचना केल्या. बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, प्रभारी अधिष्ठाता डाॅ. कैलास झिने, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती.
बैठकीनंतर सुनील केंद्रेकर, अस्तिक कुमार पाण्डेय यांनी पीपीई किट घालून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये पाहणी केली.

याठिकाणी जास्तीचे बेड कसे वाढविता येईल, यासंदर्भात सूचना केल्या. घाटी प्रशासनास मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी व त्यांचे सहाय्यक म्हणून एक तहसीलदार यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला थेट 700 रुपये कॅशबॅक मिळेल. तर मग या ऑफरचा कसा फायदा घ्यावा ते जाणून घ्या…

Paytm वर तुमचा एलपीजी सिलेंडर बुक करुन तुम्ही 700 रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळवू शकता. सबसिडीनंतर देशातील बहुतेक ठिकाणी एलपीजी सिलेंडर 819 रुपये आहे, पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेऊन आपण ते फक्त 119 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

ऑफर कशी मिळवायची ते जाणून घ्या …
>> तुमच्या फोनमध्ये Paytm App नसेल तर पहिले ते डाऊनलोड करा.
>> नंतर पेटीएम वर जा आणि Show more वर क्लिक करा.
>> आता ‘recharge and pay bills’ वर जा.
>> आता ‘बुक सिलिंडर’ पर्याय उघडा.
>> भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस प्रोव्हायडर निवडा.
>> रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा तुमचा LPG ID एंटर करा.
>> यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल.
>> आता पेमेंट देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफर टाका.

नियम आणि अटी
पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार्‍या ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतची ही कॅशबॅक मिळू शकेल. ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 रोजी समाप्त होईल. म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 दिवसच शिल्लक आहेत. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

‘अ‍ॅमेझॉन पे’ वर 50 रुपये कॅशबॅक मिळेल
याशिवाय अ‍ॅमेझॉन पेच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडर बुक करून इंडेन एलपीजी ग्राहकांना 50 रुपये कॅशबॅक मिळू शकेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

‘त्या’ 12 आमदारांवर राज्यपालांना पीएचडी करायची आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत आम्ही टीका करतच राहणार, असंही ते म्हणाले

विरोधकांना भेटायचंच असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. राज्यपालांना कशाला भेटता? राज्यपाल काय राज्य चालवतात का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना भेटा. तुमचं म्हणणं त्यांच्यापुढे मांडा. चर्चा करा. त्यातून संवाद निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार, माजी आमदार सुभाष झांबड यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे, आता अध्यक्ष पदाबाबत आपण चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी बुधवारी सांगितले.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण हे माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी विकास पॅनल बराेबर सामील झाले हाेते. दरम्यान हरिभाऊ बागडे हे संचालक पदासाठी निवडून आले नाही आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल उभे केले होते.

हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडून या अगोदर मंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील हेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान आता काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच चंद्रकांत खैरे यांचे पॅनल आता काय निर्णय घेणार यावर सर्वच राजकीय तसेच विश्वेश्लक देखील राजकीय आखाडे बांधत होते. माजी आमदार सुभाष झांबड यांनी अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जशी विधानसभा निवडणुकीनंतर एक झाली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले तसा बॉम्ब फोडणार का, असाही अंदाज काही राजकीय विश्लेशकांनी व्यक्त केला आहे. आणि असे नाही झाले तर भाजप आणि शिवसेना हे देखील एकत्र येवून निवडून आलेल्या संचालकांची पळवापळवी करुन पुन्हा अध्यक्ष करते की काय, अशी परिस्थिती देखील होवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group