Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 470

प्रवाशांच्या समस्येचे निवारण होणार मिनिटात; ST महामंडळ सुरु करणार ही सोय

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी महामंडळाने प्रवासाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता एसटीच्या प्रवासाबाबत तसेच सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, तर प्रवासाच्या तक्रारीचे निराकरण आता लगेच होणार आहे. यासाठी आता बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थापन प्रमुखाचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. म्हणजे प्रवास करताना जर प्रवासासंबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यांना लगेच तक्रार करता येईल.

एसटीचा प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो. परंतु या तक्रारी कुठे करायची? यासाठी कोण मदत करेल?असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आता या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. यामुळे आता प्रवाशांना ज्या काही समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी एसटीची सेवा सुधारण्यासाठी एसटी बसमध्ये आगार व्यवस्थापकांनी दूरध्वनी क्रमांक एसटी बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यामध्ये तुम्ही एसटी चालक जर वेगाने एसटी चालवत आहे का? एसटी चालवताना मोबाईल पाहत आहे का? प्रवाशांना सुट्टे पैसे परत केले की नाही? वाहकांशी असणारे वर्तवणूक कसे आहे? योग्य बस स्टॉपवर बस थांबली आहे की नाही! बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे की नाही? अशा तक्रारी तुम्ही आता मुख्यालयाकडे करू शकता. यासाठी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस दूरध्वनी क्रमांक लावण्याचे आदेश महामंडळाने प्रत्येक आगाराला दिलेले आहे.

त्याचप्रमाणे येत्या 21 सप्टेंबरपर्यंत एसटी बसमध्ये दूरध्वनी क्रमांक लावण्याची कारवाई पूर्ण करावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे टेलिफोन जर बंद असतील तर ते लवकरात लवकर सुरू करावेत दूरध्वनीवर आलेला तक्रारीचा फोन हा रेकॉर्ड करण्यात यावा. आणि त्या तक्रारीचे निराकरण करावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच यासंबंधीच्या सूचना उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिलेल्या आहेत.

Bussiness Idea | सणासुदीच्या दिवसात हा व्यवसाय करा सुरु; महिन्याभरातच होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | अनेक लोक हे आजकाल नोकरी सोबत एखादा छोटासा व्यवसाय करत असतात. जे त्यांच्या इतर टाईममध्ये करू शकतील आणि चांगला पैसा देखील कमवतात. अशा अनेक व्यवसाय आहेत. जे अगदी कमी पैशांमध्ये चालू करता येतात. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळते. आजकाल केंद्र सरकार देखील तरुणांना व्यवसाय (Bussiness Idea) करण्यासाठी चालणार येत आहे. अनेक लोकांना व्यवसाय करायचा असतो. परंतु नक्की व्यवसाय कोणता करावा त्यात गुंतवणूक किती करावी? आणि त्यातून किती फायदा होईल हे माहीत नसते. त्यामुळे त्यांना चांगला व्यवसाय करता येत नाही, तर आज आपण अशा काही व्यवसाय बद्दल जाणून घेऊयात. ज्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

सध्या देशभर उत्साहाचे वातावरण चालू आहे. गणपती उत्सव नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशी लागोपाठ अनेक सण भारतात येत आहेत. या काळामध्ये अनेक लोक खरेदी करतात. बाजारपेठांमध्ये देखील खूप गर्दी असते. यावेळी व्यवसाय करण्याची खूप चांगली संधी असते. तुम्ही तुमची नोकरी सांभाळून अर्धवेळ जरी व्यवसाय (Bussiness Idea) केला, तरी तुम्ही खूप चांगल्या पैसा कमावू शकता. यामध्ये तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. आणि अगदी सणांच्या या काळामध्ये तुम्ही खूप चांगला नफा कमवू शकता. दिवाळी आली की सगळी घरे दुकाने सजलेली असतात. आजकाल प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही दिवे साहित्य त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स दिवे फुलांचा व्यवसाय करून खूप चांगल्या पैसा गमावू शकता.

मातीचे दिवे

नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत या काळात संपूर्ण देश रोषणाईने भरलेला असतो. त्यामुळे या दिवसात दिव्यांच्या मागणीत खूप मोठी वाढ झालेली असते. ती विशेषता दिव्यांना खूप जास्ती मागणी असते. अशावेळी तुम्ही मातीचे दिवे बनवून त्याला चांगले रंग देऊन डेकोरेशन करून बाजारात विकू शकता. हा व्यवसाय तुम्ही सुरू केले तर तुम्हाला खूप चांगला नफा होईल.

पूजेचे साहित्य |Bussiness Idea

तुम्ही जर पूजेच्या साहित्याचा व्यवसाय केला, तर त्यातून तुम्हाला खूप नफा मिळेल. सणांच्या दिवसात सगळ्यांच्या घरात पूजा केली जाते. अशावेळी उदबत्ती, कापूर, चंदन या गोष्टी मोठ्या प्रमाणात लागतात. तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर यातून चांगला नफा होईल. तुम्ही यासाठी केवळ दोन हजार ते पाच हजार रुपये गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला दररोज खूप चांगला नफा मिळेल.

इलेक्ट्रॉनिक्स दिवे

आजकाल बाजारात इलेक्ट्रॉनिक्स दिव्यांना खूप जास्त मागणी आहे. अनेक लोक या गोष्टी बाजारात खरेदी करतात. हे दिवे किरकोळमध्ये बाजारात विकले जातात. यामध्ये जर तुम्ही हे विकत घेऊन जर विकले, तर तुम्हाला त्यातून चांगले मार्जिन मिळेल.

मेणबत्ती आणि मूर्ती

दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती खूप लोक विकत घेतात. माती पासून या मूर्ती बनवल्या जातात. तुम्ही या गोष्टीचे विक्री करूनही चांगलं नफा मिळू शकतात. तसेच मेणबत्ती देखील या काळात खूप चांगली मागणी असते.

फुलांचा व्यवसाय | Bussiness Idea

सणासुदीच्या काळात फुलांना जास्त महत्त्व असते. प्रत्येक देवाला फुलवर पण केली जातात. यावेळी तुम्ही फुलांचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळू शकतात. तुम्ही शहरातील मोठ्या फ्लॉवर मार्केटमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करू शकता, तसेच जिथे मंदिर आहे. तिथे एक छोटी रिक्षा उभी करून जरी तुम्ही ही फुले विकली तर त्यातून तुम्हाला खूप चांगला नफा होईल.

दीपक केसरकरांनी घेतला मोठा निर्णय ! जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये लागू होणार CBSE पॅटर्न

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आजकाल जर आपण पाहिले तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आजकाल प्रवेश खूप कमी येतात. आजकाल पालकांचा जास्त ओढा हा सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे आहे. आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात. परंतु आता राज्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नये. यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षापासून राज्यशिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. याबद्दलची माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली.

त्याचप्रमाणे सीबीएससी पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषयाचा अनिवार्य करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आलेले आहेत. या आधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय शिकणे खूप गरजेचे आहे. नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केलेला आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची देखील चर्चा करणार आहेत.

त्याचप्रमाणे आता राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांना एक दोन मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. सध्या राज्यात एकूण 48 हजार अंगणवाडी आहेत. आणि आता त्या अंगणवाडी सेविकांना शालेय शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांची छपाई देखील केली जाणार आहे.

तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन लाईन्स येथे मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषा भवन देखील उभारले जाणार आहे. यासाठी कंत्राटदार मिळाला असून, आता इमारतीचे पूजन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करणार असल्याचे सरकारने सांगितलेले आहे. या साहित्यभावनामध्ये साहित्यकरांना राहण्याच्या व्यवस्थेसोबतच ग्रंथालय साहित्य झाले आणि इत्यादी गोष्टी मिळतील.

त्याचप्रमाणे आता राज्यात इथून पुढे व्यवसायिक शिक्षण देखील बंधनकारक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना एक परदेशी भाषा देखील शिकवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जास्त ज्ञान मिळणार आहे. व्यावसायिक शिक्षणासोबत परदेशी भाषेचे शिक्षण देखील दिले जाणार आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला पुढे उच्च शिक्षण परदेशात घ्यायचे असेल किंवा नोकरीसाठी जायचे असेल तर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे.

जगातील आक्रमक खेळाडूंची Playing XI; गांगुली कर्णधार, पॉन्टिंग, विराटसह हे खेळाडू

Aggressive player XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा तस बघितलं तर जेंटलमॅन खेळाडूंचा गेम आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ऍडम गिलख्रिस्ट सारखे अनेक शांत स्वभावाचे खेळाडू क्रिकेटला मिळाले आणि त्यांनी या खेळाला एका नव्या उंचीवर नेलं. मात्र जसे शांत खेळाडू असतात तसेच काही आक्रमक स्वभावाचे खेळाडू सुद्धा क्रिकेटने पाहिले आहेत. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा आणि नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. आता अशाच काही ११ खेळाडूंची Playing XI भारताचा माजी जलदगती गोलंदाज एस श्रीसंत ने बनवली आहे. या आक्रमक खेळाडूंची धुरा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून ऑस्ट्रेलियन रिकी पॉन्टिंग हा या संघाचा उपकर्णधार आहे.

आक्रमक खेळाडूंच्या यादीत श्रीसंतने गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांना सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. गंभीर आणि विराट यांच्यात आयपीएल दरम्यानचा वाद क्रिकेटप्रेमी अजूनही विसरलेले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंगची निवड करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना स्लेजिंग करण्यात आणि अनेकदा पंचाशी हुज्जत घालताना पंटर दिसला आहे. चौथ्या क्रमांकावर आक्रमण बाण्याचा सौरव गांगुली आहे. आरे ला कारे करण्याची क्षमता असलेला दादा श्रीसंतच्या संघाचा कर्णधार सुद्धा आहे.

पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचं समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंचा चढलेला पारा क्रिकेट रसिकांनी अनेकदा बघितला आहे. पोलार्डने तर एकदा पंचांच्या निर्णयाचा निषेध म्हणून थेट तोंडाला काळी टेप लावली होती, तर एकदा मिशेल स्टार्क च्या दिशेने बॅट फेकून मारली होती. शाकिबची तर औरच तर्हा आहे. अम्पायरचा निर्णय पटला नाही म्हणून थेट स्टंपलाच लाथ मारलेला शाकिबचा व्हिडिओ शोधलं मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता.

गोलंदाजांचा विचार केला तर श्रीसंतने कमेव फिरकी गोलंदाज म्हणून हरभजन सिंगला संघात ठेवले आहे. याच हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारल्याची जोरदार चर्चा एकेकाळी सुरु होती. त्यानंतर शोएब अखतर, आंद्रे नेल आणि स्वतः श्रीसंत असे ३ जलदगती गोलंदाज श्रीसंतच्या संघात असतील. शोएब अख्तर 100 मैल प्रति तास वेगाने चेंडू टाकण्यात सक्षम होता. त्याचा राग यावरून समजू शकतो की एकदा रागाच्या भरात त्याने एमएस धोनीवर धोकादायक बीमर बॉल फेकला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल अनेकदा फलंदाजांची स्लेजिंग करत असे आणि श्रीसंतने शेवटचा गोलंदाज म्हणून स्वत:ला संघात स्थान दिले आहे.

खाद्य तेलावरील आयात शुल्कात 20% ने वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

import duty on edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आणखी एक मोठं निर्णय घेतला आहे. सोयाबीनची (Soybean) 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच मोदी सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क (Import duty on edible oil) 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) सोयाबीनला चांगला भाव मिळेल. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. धंनजय मुंडे यांनी ट्विट करत बद्दल माहिती दिली.

आपल्या ट्विट मध्ये धनंजय मुंडे म्हणतात, राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे . अशावेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी मी केंद्राकडे सातत्याने 3 मागण्या करत आहे.त्यामध्ये सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे. केंद्र शासनाने यापैकी हमीभावाने खरेदी ही मागणी मान्य केली असून 90 दिवस खरेदी केली जाणार आहे. त्यासोबतच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही केलेल्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल मी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय कृषिमंत्री श्री. शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयुषजी गोयल , तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री मा .एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस ,मा. अजितदादा पवार साहेब यांचेही आभार मानतो असं धनंजय मुंडे यांनी म्हंटल. कच्च्या खाद्यतेलावर पूर्वी 5.5 टक्के आयात शुल्क होते. ते आता 27.5 टक्के असणार आहे. तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या 13.75 टक्क्यांवरुन आता 35.75 टक्के इतके वाढवण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फायदा होईल

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने हटवले निर्यात शुल्क

Onion Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) तात्काळ प्रभावाने काढून टाकली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 13 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली आहे. शेतकरी आणि निर्यातदारांचे हित लक्षात घेऊन सरकारचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव भडकले होते. विशेषत: देशाची राजधानी दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत 58 रुपये प्रतिकिलो आहे. तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर 80 रुपये प्रति किलो आहे. अशा स्थितीत सरकारच्या या निर्णयाचा कांद्याच्या दरावरही परिणाम होणार आहे.

डीजीएफटीने अधिसूचनेत म्हटले आहे की, 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात किंमत (MEP) ची अट तत्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत काढून टाकली आहे शनिवारी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली. परंतु किमान निर्यात किंमत (MEP) 550 प्रति टन निश्चित करण्यात आली.

सरकारने बंदी उठवली

त्यावेळी, परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत म्हटले होते, कांद्याच्या निर्यात धोरणात तात्काळ सुधारणा करण्यात आली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत, प्रति टन 550 च्या MEP अंतर्गत निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचे आदेश गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारताने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले होते. त्याआधी 8 डिसेंबर 2023 रोजी या वर्षी 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारे राज्य आहे. सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणार आहे.

कांद्याचा साठा 38 लाख टन

एनसीसीएफ आणि नाफेडकडे सरकारी साठवणुकीत ४.७ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक असल्याचे सांगण्यात येत आहे. NCCF आणि NAFED च्या सहकार्याने सरकार आपल्या स्टोअर आणि मोबाईल व्हॅनद्वारे कांद्याची किरकोळ विक्री करत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले होते की येत्या काही महिन्यांत कांद्याची उपलब्धता आणि किमतीचा अंदाज सकारात्मक आहे कारण गेल्या महिन्यापर्यंत खरीप (उन्हाळ्यात) पेरणी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे 2.9 लाख हेक्टरपर्यंत, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत हे क्षेत्र 1.94 लाख हेक्टर होते.

Bharat Petroleum Bharti 2024 | भारत पेट्रोलियम मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Bharat Petroleum Bharti 2024

Bharat Petroleum Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती पदवीधर शिकाऊ तंत्रज्ञ, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ यांच्या अंतर्गत केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 175 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Bharat Petroleum Bharti 2024

या भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ तंत्रज्ञान डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 175 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती |Bharat Petroleum Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

रिक्त पदांची संख्या

पदवीधर शिकाऊ – 96 जागा
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 79 जागा

वेतनश्रेणी

पदवीधर शिकाऊ – 25,000 रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – 18,000 रुपये

अर्ज कसा करावा ? |Bharat Petroleum Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Realme P2 Pro 5G : 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह बाजारात आलाय नवा स्मार्टफोन; किंमत किती?

Realme P2 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात Realme P2 Pro 5G नावाचा नवीन 5G मोबाईल लाँच केला आहे. 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला या मोबाईल मध्ये पाहायला मिळतील. रिअलमीचा हा मोबाईल 12GB आणि 8GB अशा स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. आज आपण या स्मार्टफोनचे सर्व डिटेल्स अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात….

डिस्प्ले –

Realme P2 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट मिळतो. तसेच 2000Hz निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून रिअलमीचा हा मोबाईल Android 14 वर आधारित Realme UI 5.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. सिक्युरिटी साठी स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात आला आहे.

कॅमेरा – Realme P2 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme P2 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिकी कॅमेरा, आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5200mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रिअलमीचा हा मोबाईल IP65 रेटिंगसह येत आहे, म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून त्याला कोणताही धोका नाही. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, ड्युअल-फ्रिक्वेंसी GPS/GLONASS/Beidou, USB Type-C पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Realme P2 Pro 5G च्या 8GB/128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे, 12GB/256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे आणि 12GB/512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन पॅरोट ग्रीन आणि ईगल ग्रे कलर मध्ये लाँच करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता Realme.com, Flipkart आणि ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी हा मोबाईल उपलब्ध असेल.

वीज विकून शेतकरी पैसे कमवणार; काय आहे सरकारचा प्लॅन?

devendra fadnavis on farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हि मोठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सरकारचा हा प्लॅन मास्टरस्ट्रोक ठरेल.

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले, त्यावेळी आपल्या भाषणात फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हि गुड न्यूज दिली. सौर कृषिपंपाच्या पॅनेल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविता येईल, अशी योजना लागू करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी हा वीजबिल भरणाऱ्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळविणारा होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90 टक्के सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे असेही फडणवीस यांनी म्हंटल.

सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीजबिल येणार नाही. साडेसात एचपी पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘कुसुम बी’ योजनेच्या आधारे लागू केली असल्याने आपण प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे करार झाले आहेत. आगामी दोन वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा मिळेल. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील. गेल्या अडीच वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. या काळात तीनही वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.