Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 471

मोदी सरकार कोसळणार, चंद्राबाबू- नितीशकुमार साथ सोडणार

prithviraj chavan on modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडतील आणि केंद्रातील सरकार देखील पडेल असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मोदींची खुर्ची डळमळीत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्रातील मोदींचं सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पर्टीच्या पाठिंब्यावर उभं आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोघेही भाजपाला सोडून जातील. मोदींची खुर्ची डळमळीत असून वाजपेयींच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल . अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यांत कोसळलं होतं. त्याचप्रमाणे मोदींचं सरकारही कोसळेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असा दावा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. बदलापुरात झालेली घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे असं चव्हाणांनी म्हंटल. काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपा महायुती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पोर्ट ब्लेअरचेही नाव बदलून ठेवले श्री विजयपुरम

Port Blair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने शुक्रवारी म्हणजेच आज 13 सप्टेंबर रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. असे मानले जाते की हे नामकरण बेटांच्या समृद्ध इतिहासाला अधिक ठळक करेल.

अमित शहा यांनी घोषणा केली

गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते.”

त्यांनी पुढे लिहिले की, “या बेटाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यापर्यंतचे ठिकाणही हे बेट आहे. “

पोर्ट ब्लेअर: भारताचे बेट रत्न

पोर्ट ब्लेअर म्हणजेच श्री विजयपुरम ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि साहसी क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध असलेले शहर. हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 1,200 किलोमीटर अंतरावर आहे.

इतिहासाचा साक्षीदार

पोर्ट ब्लेअरचा इतिहास ब्रिटिश राजवटीशी जोडलेला आहे. ब्रिटिशांनी या बेटाचा वापर तुरुंग म्हणून केला होता. आजही येथे सेल्युलर जेल आहे, ज्याला काला पानी असेही म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांना कैद करण्यासाठी या तुरुंगाचा वापर करण्यात आला.

नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

  • पोर्ट ब्लेअर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, चित्तथरारक जंगले आणि रंगीबेरंगी मासे पाहायला मिळतील.
  • रादनगर बीच: हा भारतातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही पोहणे, सनबाथिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता.
  • चिरिया टापू: हे एक छोटेसे बेट आहे जे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी ओळखले जाते.
  • सेल्युलर जेल: हे तुरुंग भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
  • समुद्रिका नौदल सागरी संग्रहालय: येथे तुम्ही सागरी जीवनाविषयी जाणून घेऊ शकता.

Vivo T3 Ultra 5G भारतात लाँच; 50MP कॅमेरा, 12GB रॅम अन बरंच काही…

Vivo T3 Ultra 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी विवोने आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo T3 Ultra 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅम, 5500mAh बॅटरी यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. विवोचा हा मोबाईल 8GB आणि 12GB रॅम मध्ये लाँच झाला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात….

Vivo T3 Ultra 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 1.5K रिझोल्यूशन आणि 4500Nits पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रॉसेसर बसवला असून विवो चा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतो. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा- Vivo T3 Ultra 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T3 Ultra 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आणि + 8MP चा सेकंडरी कॅमेरा बसवण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. धूळ आणि पाणीपासून संरक्षण करण्यासाठी हा मोबाईल IP68 रेटिंग सह येतो. तसेच डिव्हाइसच्या संरक्षणासाठी मोबाईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. मोबाईल सोबत ग्राहकांना दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईलच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे तर 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 35,999 रुपये आहे. हो मोबाईल ग्रे आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. तुम्ही 19 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट वरून, कंपनीच्या वेबसाइट वरून किंवा इतर ऑफलाइन स्टोअरमधून हा मोबाईल खरेदी करू शकता.

IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ई-मेल द्वारे करू शकता अर्ज

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. अशातच आता अनेक लोकांना बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु त्यांना नोकरी करता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांसाठी एक बँकेत नोकरी करण्याची संधी घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आता आयडीबीआय (IDBI Bank Bharti 2024) बँके अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रमुख डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी या पदांच्या 59 रिक्त जागा आहेत. आणि उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करा आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव |IDBI Bank Bharti 2024

प्रमुख डेटा विश्लेषण, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डिजिटल आणि डेटा संरक्षण अधिकारी

पदसंख्या

या भारती अंतर्गत 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी अर्ज करावा लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराच्या वय 45 ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्थ तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ईमेलच्या माध्यमातून भरावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज कसा करावा? |IDBI Bank Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
  • तुमचा अर्ज जर अपूर्ण असाल तर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल
  • 27 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Crime News : डॉक्टरकडून बलात्काराचा प्रयत्न, नर्सने थेट गुप्तांगच कापलं

bihar doctor rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच आता बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका डॉक्टरनं त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं एका नर्सवर सामूहिक बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. मात्र खंबीर नर्सने सर्जिकल ब्लेडने थेट डॉक्टरच्या गुप्तांगावर वार करत आपला बचाव केला. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील मुसरीघरारी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी जखमी डॉक्टर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. डॉ संजय कुमार संजू, सुनील कुमार गुप्ता आणि मंगरा भागातील अवधेश कुमार अशी सदर आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी डॉक्टरने आपल्या सहकाऱ्यांसह मद्यप्राशन केलं होतं. त्यावेळी नर्स आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होती. मात्र दारूच्या नशेत नर्सचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी नर्सने थेट डॉक्टरच्या गुप्तांगावर सर्जिकल बेडनं वार केले आणि ती रुग्णालयातून पळून गेली. यानंतर सुनील आणि अवधेश यांनी नर्सचा पाठलाग करत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत नर्स पळून जाण्यात यशस्वी झाली होती. नर्स शेतात जाऊन लपली. तिथून तिनं ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांना स्वतःवर आलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. पीडित नर्सला पोलीस ठाण्यात आणलं. नर्सच्या जबाबानुसार, डॉक्टर आणि त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जखमी डॉक्टरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बाकीचे दोन्ही आरोपी डॉक्टर सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेल्या बेडशीट, तीन मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्यांसह अनेक पुरावे जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी हि सगळी घटना घडली त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज बंद करण्यात आले होते.

Edible Oil Price | सणासुदीत ढासळणार सर्वसामान्यांचे बजेट; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil Price

Edible Oil Price | महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक अगदी कोलमडून गेलेला आहे. हातात मिळणारा पगार आणि महिन्याची बजेट यात खूपच जास्त तफावत जाणवत आहे. अगदी स्वयंपाक करताना गृहिणींचे बजेट देखील महागाईमुळे कोलमडलेले आहे. दर महिन्याला येणारा पगार हा घर खर्चातच निघून जातो. त्यामुळे त्यांना गुंतवक करणे किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी महिन्याच्या शेवटी पैसे पुरत नाही. यामुळे सगळीकडे संतप्त असे वातावरण आहे.

त्यातच आता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या खिशाला जास्त कात्री लागणार आहे. कारण की आता महागाईने पुन्हा एकदा तोंड वर काढलेले आहे. सध्या महाराष्ट्रात सणासुदीचा काळ चालू झालेला आहे. आणि इथून पुढे बरेच सण येतात. आणि अशातच आता खाद्यतेलाच्या (Edible Oil Price) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. ऐन सणासुदीच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला हा एक मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरवर्षी सणासुदीचा काळ आला की, खाद्य तेलाला खूप जास्त मागणी वाढते. त्यामुळेच खाद्यतेलाची किंमत देखील वाढलेली आहे.

त्यामुळे यावर्षी देखील या खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या किमती या 10 ते 15 रुपयांनी वाढलेल्या आहेत. एकीकडे खाद्यतेलाच्या किमती तर वाढलेल्या आहे, परंतु दुसरीकडे तेलाचा तुटवडा देखील जाणवायला लागलेले आहे. जास्त तेल उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेला याचा खूप जास्त त्रास होत आहे. कारण त्याच खाद्यतेसाठी आता त्यांना जास्त पैसे जावे लागणार आहे. बाजारात देखील खाद्यतेलाचे साठे खूपच कमी झालेले आहेत. त्यामुळे तेल कमी पडत आहे. आता किमती वाढल्यानंतर तेलाचे भाव नक्की कसे असणार आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

खाद्यतेलाचे नवीन दर | Edible Oil Price

  • सरकी – 125 ते 130
  • शेंगदाणा तेल – 182 ते 188
  • सोयाबीन तेल – 115 ते 12p
  • पामतेल – 115 ते 120
  • सूर्यफूल तेल – 120 ते 125

सगळ्या खाद्य तेलाच्या किमतीमध्ये किलोमागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झालेली आहे. काही दिवसापूर्वी या किमती नियंत्रणात होत्या. परंतु श्रावण महिना संपल्यानंतर या किमती पुन्हा एकदा वाढलेले आहेत. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर लगेच गणेशोत्सव चालू झाला. त्यानंतर आता पितृपंधरावडा, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येणार आहेत. हे सण महाराष्ट्रात खूप जल्लोषात साजरे केले जाते. आणि नेमके याच सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये संतप्त असे वातावरण निर्माण झालेले आहे.

शेतीचे शिक्षण घेऊन घडवू शकता एक उज्वल भविष्य; जाणून घ्या करिअरचे पर्याय

Agriculture Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुलांची दहावी आणि बारावी झाली की, ते आपल्याला कशात करिअर करता येईल? याबद्दल माहिती मिळवत असतात. आजकाल कृषी क्षेत्रात देखील अनेक लोक शिक्षण घेत आहे. परंतु ते शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्यात काय करिअर करता येईल? कशा पद्धतीने आपल्याला पैसे कमावता येईल? या गोष्टीची माहिती अनेक लोकांना नसते. आज आम्ही तुम्हाला या लेखांमधून कृषी क्षेत्राशी संबंधित असणारी शिक्षण तसेच नोकरीचे पर्याय त्यातून मिळणारे इन्कम आणि यातून तुम्ही कसे एक यशस्वी करिअर घडू घडू शकता याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था ही कृषी या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आजकाल अनेक तरुण हे कृषी क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. आणि नवीन वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी प्रकारे शेती करत आहेत. परंतु ही शेती करताना त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ते म्हणजे शिक्षण. तुम्ही कृषी क्षेत्राचा खूप चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी बारावी सायन्समध्ये पास झालेले आहेत ते विद्यार्थी बॅचलर स्तरावर या कृषी क्षेत्रात प्रवेश करू शकता. यासाठी तुम्ही कृषी क्षेत्र शास्त्र फलोत्पादन किंवा इतर क्षेत्रात देखील पदवी घेऊ शकता. कोणत्याही स्तरावरील संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना आधी त्यांची प्रवेश परीक्षा पास करावी लागते. आता प्रत्येक संस्थेसाठी वेगळे नियम असतात. परंतु तुम्ही त्यांची मुख्य परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जाईल.

इथून कोर्स करू शकता

  • तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईम्बतूर
  • पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना
  • कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड
  • पुसा समस्तीपूर येथील राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाचे डॉ
  • चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर
  • चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसार
  • राजमाता विजयराजे सिंधिया कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर.
  • सुरुवातीला, त्यांच्या आवडीनुसार, उमेदवार बीएससी इन फॉरेस्ट्री, बीएस्सी इन ॲनिमल हसबंडरी, बी.एस्सी इन जेनेटिक प्लांट ब्रीडिंग आणि बी.एस्सी इन सॉइल अँड वॉटर मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

स्पेशलायझेशन महत्वाची पायरी

यूजी, पीजी किंवा रिसर्च लेव्हल, तुम्हाला ज्या लेव्हलचा अभ्यास करायचा आहे ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही एकाच वेळी विशिष्ट क्षेत्रात स्पेशलायझेशन देखील करू शकता. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे तुम्ही ठरवले असेल, तर पीक विज्ञान, मृदा विज्ञान, कीटकशास्त्र, कृषी अभियांत्रिकी अशा काही क्षेत्रात प्राविण्य मिळवून तुम्ही भविष्यासाठी चांगली वाटचाल करू शकता.

अनुभव महत्वाचा

अभ्यास पूर्ण केल्यानंतर आणि स्पेशलायझेशन केल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे अनुभव मिळवणे. कोणत्याही कंपनीत सामील होण्यापूर्वी, कृषी संघटना किंवा शेतात किंवा संशोधन केंद्रांवर जाऊन काही दिवस इंटर्न किंवा स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि अनुभव मिळवणे चांगले.

प्रमाणपत्र देखील घेऊ शकता

या व्यतिरिक्त, तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये प्रमाणपत्र देखील मिळू शकते जे तुम्हाला भविष्यात नोकरी मिळविण्यात मदत करेल. तुम्ही प्रमाणित पीक सल्लागार म्हणजेच सीसीए किंवा प्रमाणित कृषी सल्लागार म्हणजेच सीसीए सारखी प्रमाणपत्रे घेऊन तुमचा सीव्ही आणखी मजबूत करू शकता.

या क्षेत्रात तुम्हाला काम मिळू शकते

यानंतर तुम्हाला यापैकी कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. जसे शेती व्यवस्थापन, संशोधन आणि विकास, विस्तार सेवा, कृषी शिक्षण धोरण आणि वकिली किंवा खाजगी उद्योग जसे की बियाणे कंपनी किंवा शेती उपकरणे उत्पादक इ.

या पदांवर काम करू शकतात

कृषी क्षेत्रातील तुमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, जेव्हा करिअर बनवण्याचा विचार येतो, तेव्हा तुम्ही कृषीशास्त्रज्ञ, हॉर्टिकल्चर थेरपिस्ट, कृषी अभियंता, शाश्वतता विशेषज्ञ, कृषी अर्थशास्त्रज्ञ, फार्म मॅनेजर, पीक सल्लागार आणि कृषी संशोधक अशा पदांवर काम करू शकता.

किती पगार मिळेल?

तुम्ही कोणत्या संस्थेत काम करत आहात, तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात, तुमचे स्थान काय आहे आणि तुमचा अनुभव आणि पात्रता काय आहे यानुसार तुम्हाला पगार मिळतो. थोडक्यात, अर्थशास्त्राच्या पदासाठी वेतन दरमहा 30000 ते 70000 पर्यंत असते. हॉर्टिकल्चर थेरपिस्टच्या पदावर काम करून, एखादी व्यक्ती दरमहा 20000 ते 50000 रुपये कमवू शकते. जर तुम्ही कृषी अभियंता झालात तर कमाई चांगली आहे, यामध्ये तुम्ही दरमहा 30-40 हजार रुपये ते 90000 ते 100000 रुपये कमवू शकता. त्याच प्रकारे, कृषी अर्थतज्ज्ञ आणि कृषी संशोधक या पदांसाठी निवड झाली तरी, वेतन जास्तीत जास्त 1 लाख रुपये प्रति महिना असू शकते.

मीच साहेब म्हणणाऱ्या अजितदादांना अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, म्हणाले महाराष्ट्रात दोनच साहेब, एक शरद पवार आणि ..

amol kolhe ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत, एक शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. तसेच स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही असा टोलाही अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला. अमोल कोल्हे यांची हि टीका अजित पवारांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आपणच साहेब हे अजित पवारांचे विधान चेष्ठेने केलं असावं. राज्यात साहेब दोनच आहे. एक बाळासाहेब आणि दुसरे शरद पवार साहेब याची जाणीव अजित पवारांना असेल. फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होणं होत नाही. त्यासाठी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळं छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सर्व गोष्टी करणं म्हणजे शरद पवार साहेब होणं असा अर्थ होतो. अजित पवारांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने हि गोष्ट सांगण्याची गरज नाही असेही अमोल कोल्हे म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते?

खेड येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की “उमेदवारी कोणाला द्यावी, कोणाला नाही, याबाबत वारंवार कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही, कारण आता राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे मीच निर्णय घेणार असं म्हणत अजित पवारांनी दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. तसेच दिलीप मोहितेंना तुम्ही निवडून द्या, मी त्यांना लाल दिव्याची गाडी देतो असं म्हणत थेट मंत्रिपदाचे संकेत अजित पवारांनी खेडवासीयांना दिली.

Shreyas Iyer : काळा चष्मा घालून बॅटिंग, शून्यावर आऊट; श्रेयश अय्यर झाला ट्रोल

Shreyas Iyer black goggle batting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत अ आणि ड संघांमध्ये सामना आहे . या सामन्यात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या अनोख्या स्टाईलने ट्रॉलर्सचा शिकार बनला. श्रेयश अय्यर चक्क कला गॉगल घालून फलंदाजीला आला. मात्र अवघ्या ७ चेंडूंतच तो शून्यावर बाद झाला. खालील अहमदने त्याची विकेट घेतली .

आज इंडिया ड ची पहिली विकेट अवघ्या ४ धावांवर पडल्यानंतर कर्णधार श्रेयश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र त्याच्या एंट्रीनेच तो सर्वांच्या नजरेत जास्त उठून दिसला, कारण चक्क काळा गॉगल घालून श्रेयश मैदानात उतरला. आपण अनेकदा खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना गॉगल घातलेले बघितलं आहे, मात्र श्रेयश फलंदाजी साठी गॉगल घालून आल्याने सर्वानाच धक्का बसला. आज श्रेयश मोठी काहीतरी कमाल करेल असं प्रत्येकाला वाटलं. मात्र श्रेयश खेळ अवघ्या ७ चेंडूंतच संपला. खलील अहमदने त्याला बाद करत पॅव्हेलियन मध्ये माघारी पाठवलं.

बाद झाल्यानंतर श्रेयश ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आला. अनेक यूजर्सनी श्रेयशची फिरकी घेतली आहे तर काही चाहत्यांनी मात्र त्याचं समर्थन केलं आहे. फलंदाजी करताना सूर्यप्रकाश थेट डोळ्यावर येत असल्याने काळा चष्मा घातला होता, असं काही जणांचं म्हणणं आहे. मात्र काळा गॉगल घालून सुद्धा श्रेयसला खातेही उघडता आलं नाही आणि शून्यावर आऊट व्हावं लागलं यामुळे त्याला अजूनही ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, भारत अ आणि भारत ड यांच्यातील या सामन्यात भारत ड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत अ संघ 84.3 षटकांत सर्वबाद 290 धावांवर आटोपला. शम्स मुलानी याने 89 आणि तनुष कोटियनने 53 धावा केल्या. याशिवाय रियान परागने 37 धावा केल्या. तर भारत डीकडून हर्षित राणाने 4, अर्शदीप सिंग आणि विद्वत कविरप्पाने 2-2 विकेट घेतल्या. सरांश जैन आणि सौरभ कुमार यांनी 1-1 विकेट घेतली. तर भारत ड चा संपूर्ण संघ अवघ्या १८३ धावांत माघारी परतला.

केंद्राकडून महाराष्ट्राला झुकतं माप; अनेक प्रकल्पांना मंजुरी, गुंतवणुकीतही वाढ

projects in maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून लोकसभेप्रमाणेच विरोधकांनी प्रादेशिक अस्मिता आणि गुजरातच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असा सामना लावून भाजपला आणि महायुतीला बॅकफूटवर ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर याच सरकारने महाराष्ट्राला झुकत ,माप देत अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्राच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक सुद्धा वाढली असून अवघ्या तीन महिन्यात केंद्र सरकारने “महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम” हेच आपले ब्रीद असल्याचे सिद्ध केले आहे.

वाहन, ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक

उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार केले. जलविद्युत निर्मिती क्षेत्रात यातून क्रांती घडणार असून पंप स्टोरेजसाठी 2.14 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या माध्यमातून 40 हजार 870 मेगाव्हॅट अतिरिक्त वीज निर्माण होणार असून रोजगाराच्या 72 हजार संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने नुकतीच एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी ग्रुप तळोजा पनवेल येथे सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार आहेत. यातून 5 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर ओरिक सिटी येथे इलेक्ट्रिक व्हेहिकल प्लांट उभारणार आहेत यातून जवळपास 9000 रोजगाराच्या साठी निर्माण होणार आहेत.

मनमाड – इंदूर रेल्वेमार्ग ठरणार उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर

मनमाड आणि इंदूर दरम्यान रेल्वे लाईन साठी केंद्राने अलीकडेच 18 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पात 30 नवी स्थानके उभारली जाणार आहेत. 1000 हून अधिक खेडी आणि तीस लाखाहून अधिक लोकसंख्या रेल्वेच्या जाळ्यात येणार आहे. रेल्वे सेवेच्या विस्तारामुळे या अविकसित भागात उद्योगांचे जाळे विणले जाणार आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास सुद्धा सुखकर आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे.

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा बूस्टर डोस

नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकारने 7000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या माध्यमातून गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी महाराष्ट्रात वळविलेजाणार आहे. सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा या प्रकल्पामुळे मिळणार आहे.

कोकण, मराठवाडा, विदर्भाला समान न्याय

राज्य सरकारने अलीकडेच सात मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यातील गुंतवणूक 81 हजार कोटी रुपये इतकी आहे. यातून रोजगाराच्या २० हजार संधी निर्माण होणार आहेत. अत्याधुनिक वाहने, सेमीकंडक्टर चिप्स, लिथियम बॅटरी अशा उत्पादनांचा त्यात समावेश आहे. या माध्यमातून कोकण मराठवाडा आणि विदर्भाचा विकास वेगाने दृष्टीपथात येणार आहे. कोणत्याही विभागात भेदभाव न करता सर्वाना सामान न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

वाढवण बदलणार महाराष्ट्राचा चेहरामोहरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व्यतिरिक्त आणखी चार राज्य स्पर्धेत होती. मात्र केंद्राने महाराष्ट्राला हिरवा कंदील दाखवला. देशाच्या विदेश व्यापारात वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. समृद्धी महामार्गाशी थेट जोडले गेल्यामुळे संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था या बंदरामुळे पूर्णतः बदलणार आहे.

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती

महायुती सरकारने राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे. महायुती सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे लाखो नवीन रोजगार राज्यात निर्माण होणार आहेत. पाणी, उद्योग, शेती, रस्ते अशा विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पोषक वातावरण निर्माण केले आहे.यातून होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील शेती आणि औद्योगिक उत्पादने वेगाने अन्य राज्यात तसेच विदेशात जाऊ शकणार आहेत. “महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम” हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे