Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 475

Indian Railway : अवैधरित्या AC आणि फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्यांची खैर नाही ; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

railway news

Indian Railway : सरळ, सोपा आणि सोयीस्कर प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाला प्रधान्य दिले जाते. मात्र बऱ्याचदा विशेषत: लांब पल्ल्याच्या गाडयांमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः एसी किंवा फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनधिकृतरित्या डब्ब्यात शिरणाऱ्या प्रवाशांचा त्रास होतो. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली असून तुम्ही प्रवासातील समस्या आणि तक्रारी थेट रेल्वे विभागाला व्हाट्स अँप करू शकता. यासाठी एक नंबर सुद्धा जारी करण्यात आला आहे. याबाबतचे (Indian Railway) ट्विटही शेअर करण्यात आले आहे.

रेल्वेमधून प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला अडचण असेल किंवा काही तक्रार द्यायची असेल तर हा प्रवासी थेट व्हाट्सअप द्वारे तक्रार देऊ शकतो. म्हणजेच मध्य रेल्वे कडून आता व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे . व्हाट्सअप (Indian Railway) हेल्पलाइन मुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासी एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

काय आहे हेल्पलाईन नंबर ? (Indian Railway)

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांनी सोमवारी संध्याकाळी एक हेल्पलाइन नंबर शेअर केला असून. हा नंबर आहे 720881997. एसी किंवा फर्स्ट क्लास डबल मध्ये प्रवास करणारे प्रवासी आता या मोबाईल नंबर वर अनधिकृत प्रवासा संबंधीच्या तक्रारीसाठी व्हाट्सअप करू शकतात. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “व्हॉट्सॲप हेल्पलाइन ही सेवा तिकीट नियमांचे पालन (Indian Railway) सुनिश्चित करण्यासाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.”

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतीकडे?

Uddhav Thackeray (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असल्याने नेहमीच त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं.. मात्र सध्याच्या राजकारणात ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतींकडे जात असल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे मागील काही वर्षात आणि खास करून २०१९ नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथी… 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपा महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा असे 161 जागांचे बहुमत महायुतीला मिळाले. पण परिस्थितीचा अचूक फायदा घेत उद्धव ठाकरेंनी ठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी संधान साधले आणि थेट मुख्यमंत्री बनले. उद्धव यांना ना धड सरकार चालवता आले, ना पक्ष टिकवता आला. पण महाराष्ट्राच्या राजकारणात चिरंतन टिकणारी अस्थिरता ठाकरेंनी निर्माण केली.

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर करण्यात आला. मात्र आज त्याच दगाबाजीची फळे उद्धव ठाकरेंना भोगावी लागत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने उद्धव ठाकरेंना अपमानित करण्यात येत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका करत परतीचे दोर कापून टाकलेत. आणि हाच मुद्दा पकडून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून ठाकरेंना आणखी कोंडीत पकडलं जात आहे. उद्धव ठाकरेंना सुद्धा नाईलाजाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. सरकार तर त्यांना चालवता येत नव्हतेच, शिवाय उद्धव यांना संसदीय शिष्टाचार देखील माहिती नव्हते. प्रश्नावर त्यांची अजिबात मांड नव्हती. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे अवघे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते. विधिमंडळात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचे सौजन्य देखील उद्धव यांनी कधी दाखवले नाही. उद्धव यांच्या मर्यादांवर शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकात मार्मिक भाष्य केले आहे. “दोन वर्षात उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले. ही बाब आमच्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती” अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांची शाळा घेतली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे. या निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच स्पष्ट होते की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतःच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर करून घेतला आहे. एकीकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंपेक्षा कमी जागा लढवून सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर दुसरीकडे ठाकरेंना मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते म्हणावी तशी ठाकरेंच्या उमेदवाराला ट्रान्सफर झालीच नाही. त्याउलट शिवसैनिकांनी मात्र आघाडी धर्म पाळून काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली आणि त्यांचे जास्तीत जास्त खासदार निवडून सुद्धा आणले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीने जी दगाबाजी केली त्याचीह्क पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे चिंतेत आहेत.

त्यामुळेच कि काय उद्धव ठाकरें मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावायला निवडणुकीआधीच दिल्लीत गेले मात्र तिथेही त्यांना अपशय आल. कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असे थेट सांगून उद्धव यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. ज्याच्या पक्षाला जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनीही उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तशीच भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार) गटात वाहत असलेल्या वार्यांची दिशा पाहून संजय राऊत यांनीही आपली तलवार म्यान केली आहे.

सत्ता मिळण्याची आशा होती तेव्हा उद्धव हे कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी महत्वाचे होते. पण आता मात्र उद्धव ठाकरेंचा महत्व न देण्याचे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीने ठरवल्याचे दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव यांनी आपल्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील निवडून देखील आले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून आले. शरद पवार यांच्या उमेदवाराला त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. पवार यांनी घडल्या प्रकारावर जाहीर नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने न मिळणारी सत्ता तब्बल अडीच वर्षे उपभोगली. आपापले पक्ष भक्कम केले. रसद जोडली. उद्धव यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना पालख्या वाहाव्या लागल्या. पक्ष उद्धव ठाकरे यांचा फुटला. लोकसभा निवडणुकीत उद्धव यांची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीने खेचून नेली. बदल्यात उद्धव यांना कटोरा दिला. आता विधानसभेच्या तोंडावर उद्धव यांना अधिकाधिक कमजोर करून जास्तीच्या जागा पदरात पाडून घ्यायच्या हा कॉंग्रेसचा डाव आहे आणि त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव यांना अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही असच सध्याचे राजकीय चित्र आहे.

कृषी क्षेत्रातही होणार AI चा वापर, कृषी विद्यापीठाने B.sc Agri विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल कृषी शिक्षणात खूप मोठे बदल झालेले आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग शिकवले जातात त्याचप्रमाणे शेतीतील गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ पद्धतीने करता येईल. अशातच आता B.sc Agri विद्यार्थी यांना AI, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सचा अभ्यास देखील शिकवला जाणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठांमध्ये पदवीचे पर्याय देखील मिळणार आहेत. कृषी शिक्षणात आता भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक नवीन गोष्ट आणली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात भव्य करियर करण्याच्या विद्यार्थ्यांना खूप स्कोप मिळणार आहे. कारण आता बीएससी एग्रीकल्चरचे विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत विषयांचा देखील अभ्यास करणार आहेत. जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची देखील माहिती मिळेल आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना शेती करता येईल.

भविष्यातील गरजा पाहता कृषी शिक्षणात एक मोठा परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आता मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पोलिसीचा देखील लाभ मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत सहजपणे बदली करता येणार आहे. तसेच पदवीचे स्वरूप देखील बदलण्यात येणार आहे. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षानंतर बाहेर पडणारे विद्यार्थी आता दहा आठवड्याच्या इंटरशिप नंतर UG प्रमाणपत्र देखील प्राप्त करू शकतील. तर दुसऱ्या वर्षानंतर पदवी सोडणारे विद्यार्थी हे UG डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी देखील सक्षम असतील.

रोजगाराच्या नवीन संधी

उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर.सी. अग्रवाल म्हणाले की, कृषी शिक्षण हे केवळ पारंपारिक पद्धतींवर आधारित नसून विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि रोजगाराच्या नवीन संधींशी जोडले जावे, अशी आमची इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य सुधारले जाणार असून, त्यांना नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

आधुनिक विषयांचा अभ्यास आवश्यक आहे

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी, कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थी आता स्वत: प्रकल्प तयार करतील आणि ICAR कडून त्यांना आवश्यक मदतही पुरविली जाईल. यासोबतच कृषी क्षेत्रातील विविध क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि मशिन लर्निंग यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करणे बंधनकारक असणार आहे.

हे नवे बदल कृषी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल ठरतील आणि तरुण शेतकऱ्यांना नव्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करतील. कृषी शिक्षणाला नवी दिशा देण्याचे आश्वासन देणाऱ्या या उपक्रमांना कृषी मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच या अधिवेशनापासून या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Jiophone Prima 2 : दिवाळीपूर्वी Jio चा धमाका; स्वस्तात लाँच केला 4G मोबाईल

Jiophone Prima 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुकेश अंबानी यांच्या जिओने दिवाळीपूर्वीच मोठा धमाका करत ग्राहकांना एक गिफ्ट दिले आहे. जिओने ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत नवा 4G मोबाईल लाँच केला आहे. Jiophone Prima 2 असं या मोबाईलचे नाव असून मागच्या वर्षी लाँच झालेल्या JioPhone Prima 4G चे अपडेटड व्हर्जन आहे. या मोबाईल मध्ये व्हिडीओ कॉल, UPI पेमेंट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारखे अनेक दमदार फीचर्स मिळतात. कंपनीने 2,799 रुपयांत हा मोबाईल बाजारात आणला आहे.

काय फीचर्स मिळतात? Jiophone Prima 2

जिओच्या या स्वस्तात मस्त मोबाईल मध्ये 2.4 इंचाचा QVGA कर्व्ह डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 320 x 240 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. कंपनीने या मोबाईल मध्ये क्वॉलकॉम चिपसेट वापरली आहे. फोनमध्ये 512MB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. . कंपनीने या फीचर फोनच्या फ्रंटमध्ये 0.3MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे, या कॅमेराद्वारे तुम्ही एकमेकांना व्हिडिओ कॉल करू शकता. जो व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जाऊ शकतो. कंपनीने फोनमध्ये LED टॉर्चसह रियर कॅमेराही दिला आहे. या कॅमेऱ्याद्वारे QR कोड स्कॅन करून UPI ​​पेमेंटही करता येते. पॉवरसाठी जिओने या मोबाईल मध्ये 2,000mAh ची बॅटरी बसवली आहे.

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईल मध्ये JioTV, JioCinema, JioSaavn, JioPay सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. यूजर्स या मोबाईल वरून फेसबुक सह अन्य शोष मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा वापरू शकतात. . जिओच्या या फोनवर युजर्स युट्युब व्हिडिओही पाहू शकतात. याशिवाय फोनमध्ये एफएम रेडिओ आणि इनबिल्ट गेम्स आणि गुगल व्हॉईस असिस्टंटची सुविधाही उपलब्ध आहेत. Jiophone Prima 2 ची किंमत 2,799 रुपये आहे. हा मोबाईल फक्त लक्स ब्लू रंगात लाँच करण्यात आला असून प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon तसेच JioMart आणि Reliance Digital वरून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकतात.

RBI | RBI ने ‘या’ दोन मोठ्या बँकांना ठोठावला कोट्यावधी रुपयांचा दंड; जाणून घ्या कारण

RBI

RBI | RBI म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सगळ्या बँकांवर खूप काटेकोरपणे लक्ष असते. अशातच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून देशातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक यांच्यावर RBI ने कारवाई केलेली आहे. नियमांचे पालन केल्यामुळे या दोन बँकांना आरबीआयने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आणि याबद्दल प्रसिद्ध पत्रक देखील जारी दिलेले आहे.

एचडीएफसी बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी बँक आहे. त्याचप्रमाणे ॲक्सिस बँक देखील खूप मोठी बँक आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमांचे या दोन बँकांनी पालन केलेले नाही. त्याचप्रमाणे नियमांमध्ये हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे RBI ने या दोन बँकांवर मोठी कारवाई केलेली असेल आहे. जर तुमचेही या बँकेमध्ये खाते असेल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही बातमी आहे.

2.91 कोटी रुपयांचा दंड

RBI ने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या दोन्ही बँकांना 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे या बँकांनी पालन केलेले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये देखील या बँकांकडून निष्काळजीपणा झालेला आहे. यामध्ये केवायसी ठेवीवरील व्याजदर आणि इत्यादी इतर बाबींचा समावेश आहे.

ॲक्सिस बँकेला दंड ठोठावला

आरबीआयने ऍक्सिस बँकेवर जास्त दंड ठोठावला आहे. जो 1.91 कोटी रुपये एवढे आहे बँकिंग रेगुलेशन 1949 बी आरच्या कलम 19 A या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. या शिवाय ठेवींवरील व्याजदर आणि केवायसी सहकृषी अर्जाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्यामुळे हा थंड ठेवण्यात आलेला आहे.

एचडीएफसी बँकेवर का कारवाई केली

रिझर्व बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड छोटावला आहे एचडीएफसी बँकेवर ठेवींवरील व्याजदर आणि बँकेची संबंधित वसुली एजंट निर्धारित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे हा दंड आकारण्यात आलेला आहे.

Free Toll : ‘या’ गाड्यांना 20 KM पर्यंत फ्री टोल; प्रवाशांना मोठा दिलासा

Free Toll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्याकडे जर चारचाकी असेल आणि तुम्ही रोज हायवे किंवा एक्सप्रेसवर वरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. . रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार 20 किमीपर्यंत अंतरावर प्रवास करताना टोल (Free Toll) भरावा लागणार नाही. मात्र यासाठी तुमच्या गाडीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सेटेलाइट सिस्टीम असणे आवश्यक आहे.

वाहनधारकांना मोठा दिलासा – Free Toll

देशात एकीकडे रस्त्यांचे जाळे दिवसेंदवस वाढत आहे तर दुसरीकडे गाड्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे टोल नाक्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते नाही प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पाऊले उचलली जातायत. GNSS सिस्टीम हा त्याचाच एक भाग आहे. GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे जी वाहनाच्या स्थानाबद्दल माहिती देते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, तुम्ही कोणताही टोल न देता २० किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता. मात्र वाहनाने दररोज 20 किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही हायवेवर 30 किलोमीटरचा प्रवास केला तर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री (Free Toll) असेल आणि तुमच्याकडून फक्त 10 किलोमीटरसाठीच टोल शुल्क आकारले जाईल. या नियमामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जुलैमध्ये सांगितले होते की काही निवडक महामार्गांवर लवकरच नवीन प्रकारची टोल टॅक्स प्रणाली वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. हे ते GNSS तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान फास्टॅगसोबत काम करेल. म्हणजेच तुमच्याकडे फास्टॅग असला तरी तुम्ही हे नवीन तंत्रज्ञान वापरू शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी एक नवीन पद्धत आणली आहे, ज्यामुळे टोलनाक्यांवर वाहने थांबवण्याची गरज कमी होईल.

ECGC Limited Bharti 2024 | ECGC लिमिटेड अंतर्गत मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

ECGC Limited Bharti 2024

ECGC Limited Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भंडार संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Limited Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 40 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 13 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे उमेदवारांनी अजिबात उशीर न करता लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ECGC Limited Bharti 2024

या भरती अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या एकूण 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

वयोमर्यादा | ECGC Limited Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असते गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासारख्या अगोदर अर्ज करा.

वेतन श्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर उमेदवाराला 90 हजार 630 रुपये ते 1 लाख 2 हजार 90 रुपये एवढा पगार मिळेल

अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता.
  • 13 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Air India Express | एअर इंडिया एक्सप्रेसच्या ग्राहकांसाठी खूशखबर, केवळ 932 रुपयात करू शकता फ्लाईटचे तिकीट बुक

Air India Express

Air India Express | एअर इंडिया एक्सप्रेस त्यांच्या कस्टमरसाठी नेहमीच वेगवेगळ्या ऑफर देत असते. अशातच आता एअर इंडिया एक्सप्रेसने एक नवीन ऑफर जारी केलेली आहे. या ऑफर मध्ये तुम्हाला केवळ 932 रुपयांपासून फ्लाईट टिकिट बुक करता येणार आहे. ही एअर इंडियाची ऑफर केवळ 16 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच तुम्ही या ऑफरमध्ये 31 मार्च 2025 पर्यंतच प्रवास करू शकता. आपल्या देशात साजरे होणारे सण उत्सव भविष्यातील ट्रीप या सगळ्याचा विचार करून आता एअर इंडियाने (Air India Express) मल्याळी प्रवासी कोची बेंगलोर, बेंगलुरु चेन्नई, दिल्ली गुवाहाटी यांसारख्या ठिकाणी कमी पैशावर फ्लाईट टिकिट ऑफर केलेले आहेत.

तुम्हाला एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) वेबसाईटवरून यासाठी बुकिंग करता येणार आहे. तसेच तुम्ही जर प्री बुकिंग केले, तर तुम्हाला तीन किलो अतिरिक्त केबिन बॅगेज पूर्णपणे मोफत असणार आहे. या प्रवासात तुमच्या पैशांची देखील बचत होणार आहे. त्यामुळे ही ऑफर तुमच्यासाठी अत्यंत चांगली ऑफर आहे. तसेच जास्त सामानाची आवश्यकता असलेल्यांना चेक इन पर्याय देखील उपलब्ध आहे. देशांतर्गत फ्लाईटमध्ये तुम्हाला 15 किलो अधिक सामान घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ 1000 रुपये द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये तुम्हाला 20 किलो जास्त सामान घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ 1300 रुपये खर्च येणार आहे.

या फ्लाईटमध्ये तुम्हाला अनेक लोकप्रिय ठिकाणी जाता येणार आहे. ज्या ठिकाणी लोक वारंवार प्रवास करतात कोची ते बेंगळूरु असा एक छोटा प्रवास असणार आहे. तसेच दिल्ली ते ग्वाल्हेर असा लांबचा प्रवास तसेच सवलतीच्या खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत त्याचप्रमाणे मित्रांसोबत फिरायला जाणे अत्यंत सोपे होणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसची ही ऑफर केवळ 16 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फ्लाईट बुक करा आणि या ऑफरचा फायदा घ्या. यासाठी अत्यंत कमी खर्च येणार आहे. तसेच एक सर्वसमावेश पॅकेज देखील तुम्हाला मिळेल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या अंतर्गत प्रवास करू शकता. तुम्ही केवळ 932 रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांसह तुमची फ्लाईट बुक करू शकता. सणासुदीच्या काळात भारतीयांना परवडणाऱ्या दरात एअर इंडियाने ही एक खास ऑफर उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या ठिकाणी फ्लाईटने भेट द्यायची असेल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. तुम्ही लवकरात लवकर एअर इंडियाच्या एक्सप्रेस वेबसाईटला किंवा मोबाईल ॲपद्वारे फ्लाईट बुक करू शकता.

Indian Railway : दिवाळीसाठीही रेल्वे विभागाची प्रवाशांसाठी खास सोय ; अतिरिक्त गाड्या सोडणार

railway for diwali

Indian Railway : भारतात रेल्वे हे दळणवळणाचे सोयीस्कर आणि प्रमुख साधन मानले जाते. विविध सण आणि उत्सवाच्या निमित्ताने गाडयांना होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाकडून जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात. गणेशोत्सवासाठी सुद्धा अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. आता दिवाळीकरिता सुद्धा रेल्वेने खास नियोजन केले असून अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला (Indian Railway) आहे. चला जाणून घेऊया …

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून नागपूर हजरत निजामुद्दीन दानापूर गोरखपूर आणि सावंतवाडी या पाच मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या एकूण 88 फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

काय असेल वेळापत्रक? (Indian Railway)

पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल

या गाडीच्या बद्दल सांगायचे झाल्यास २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेलआणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहचेल. हजरत निजामुद्दीनहून ही गाडी दर शनिवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पुण्याला (Indian Railway) पोहचेल.

या स्थानकानावर घेणार थांबे

पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट स्पेशल या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक

२६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दर शनिवारी नागपूरहून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तसेच ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. पुण्याहून दर रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी गाडी सुटेल. ती (Indian Railway) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहचेल.

या स्थाकांवर घेणार थांबे

पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक या विशेष गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आदी स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

पुणे-दानापूर-पुणे विशेष

25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत दररोज धावणारी ही ट्रेन पुणे आणि दानापूरला जोडेल. पुण्याहून दुपारी 3.30 वाजता निघून तिसऱ्या दिवशी पहाटे 2:00 वाजता दानापूरला पोहोचेल.
परतीचा प्रवास दानापूर येथून पहाटे 5:30 वाजता सुरू होतो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:15 वाजता पुण्यात पोहोचतो.

या स्थाकांवर घेणार थांबे

जबलपूर आणि प्रयागराजसह विविध स्थानकांवर ही गाडी थांबेल.

पुणे-गोरखपूर-पुणे विशेष

22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत नियुक्त केलेली ही विशेष गाडी दररोज सकाळी 6.50 वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.00 वाजता गोरखपूरला पोहोचेल. परतीची ट्रेन गोरखपूरहून संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 3.15 वाजता पुण्यात पोहोचेल.

या स्थाकांवर घेणार थांबे

पुणे-गोरखपूर-पुणे विशेष ही गाडी इटारसी, झाशी आणि लखनौ या मुख्य स्थानकांवर थांबे घेणार आहे.

पुणे-सावंतवाडी रोड-पुणे एसी स्पेशल

22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालणारी ही साप्ताहिक एसी स्पेशल पुण्याहून दर मंगळवारी सकाळी 9.35 वाजता निघेल आणि रात्री 10:30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.परतीचा प्रवास बुधवारी रात्री ११.२५ वाजता सावंतवाडी येथून सुरू (Indian Railway) होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्यात पोहोचेल.

या स्थाकांवर घेणार थांबे

पुणे-सावंतवाडी रोड-पुणे एसी स्पेशल ही गाडी रत्नागिरी, कणकवलीसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

PM Awas Yojana | PM आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल ! जाणून नवीन नियम आणि अटी

PM Awas Yojana

PM Awas Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देखील होत असतो. सरकारने बेघर असलेल्या नागरिकांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. त्यांना हक्काचे घर मिळावे. म्हणून सरकारने अनेक घरकुल योजना सुरू केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून देखील या योजना राबवल्या जातात. अशातच आता मोदी सरकारने देखील घरकुलासाठी एक विशेष योजना राबवली आहे. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम आवास योजना (PM Awas Yojana) असे आहे. सरकारची ही योजना दोन भागात विभागलेली ती म्हणजे पीएम आवास योजना शहरी आणि पीएम आवास योजना ग्रामीण असे दोन प्रकार पडतात. आता या दोन्ही प्रकारांचे वेगवेगळे नियम आहेत. ते कोणते नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

याबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केलेली आहे. शिवराज सिंग चौहान यांनी 10 सप्टेंबरंचा 24 रोजी नवी दिल्लीमध्ये याबाबत एक मोठी घोषणा केलेली आहे. शिवराज सिंग यांनी घोषणेनुसार आता पीएम आवास (PM Awas Yojana) योजनाचे काही नियम बदलणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांची संख्या देखील लाभ वाढ होणार आहे. आता कोणते नियम बदललेले आहेत. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पीएम आवास योजना ग्रामीणमध्ये कोणते बदल केले जाणार |PM Awas Yojana

  • केंद्र सरकारने आता पीएम आवास योजना ग्रामीणमध्ये काही अटी शिथिल केलेल्या आहेत. आता या निर्णयानुसार ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित बोट, लँडलाईन फोन फ्री असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत होता
  • याआधी ही सगळी सगळ्या गोष्टी असलेल्या लोकांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता या वस्तू घरात असतील तरी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • सरकारच्या या योजनेमुळे आणि नियमांच्या बदलांमुळे जास्तीत जास्त लोकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • याआधी या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे 10 हजार रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे होते परंतु आता ही अट बंद करून कुटुंबाचे जास्तीत जास्त उत्पन्न 15 हजार रुपये असणे गरजेचे आहे.
  • ज्या नागरिकांचे मासिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना मैदानी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये आणि डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार रुपये एवढे अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.