Monday, December 22, 2025
Home Blog Page 480

बाप रे ! डॉक्टरांनी चक्क Youtube वर बघून केले ऑपरेशन; 15 वर्षीय मुलाने गमावला जीव

Doctor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या प्रत्येकासाठी डॉक्टर हा देवाचे दुसरे रूप असतो. जेव्हा कोणतेही पेशंट हे बेडवर असते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त डॉक्टरांकडे असतात. परंतु सध्या डॉक्टरांकडून इतक्या बेजबाबदार प्रकारच्या घटना घडत आहेत की, लोकांचा डॉक्टर वरचा विश्वास देखील हळूहळू आता उडताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलेली आहे. बिहारमध्ये एका डॉक्टरने चक्क युट्युबवर बघून एका 15 वर्षाच्या मुलाचे ऑपरेशन केले आहे. या मुलाचे पोट सारखे दुखत होते. तसेच त्याला उलट्या देखील होत होत्या. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मुलाचे youtube वर बघून ऑपरेशन केले. ऑपरेशन नंतर त्या मुलाची परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखीनच बिघडली आणि दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे.

त्याचप्रकारे या डॉक्टरने त्या मुलाच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता त्याचे ऑपरेशन केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. मौढर ठाणे क्षेत्रातील धर्मबाळगी येथील गणपती सेवासदंच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे. सध्या मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरलेली आहे. आणि अत्यंत संतप्त आणि आक्रमक असे वातावरण तयार झालेले आहे. त्या डॉक्टरांनी केलेले ऑपरेशन अयशस्वी झाल्याने मुलाला त्याचे प्राण गमवावे लागलेले आहे. तसेच ते डॉक्टर आणि त्याच्यासोबत असणारे साथीदार देखील फरार झाले होते. परंतु त्या मृत मुलाच्या कुटुंबीयाने त्याची त्या डॉक्टरांची तक्रार केली. आणि अखेर पोलिसांनी त्या डॉक्टरांना त्याच्या साथीदारांना पकडून अटक देखील केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार मृत झालेल्या मुलाचे नाव गोलू असे होते. आणि तो 15 वर्षाचा होता. तो भूवालपुर या गावचा रहिवासी होता. त्या मुलाचे सातत्याने पोट दुखत होते आणि उलट्याही होत होत्या. त्याचे वडील चंदन हे त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. परंतु त्यावेळी त्या मुलाला उपचारासाठी डॉक्टरांनी दाखल केले. हे हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर अजित कुमार पुरी यांनी कुटुंबीयांना न सांगताच गोलूचे ऑपरेशन केले, असा आरोप देखील त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलाची तब्येत जास्तच घालवली त्याचा मृत्यू झाला.

त्या डॉक्टरांनी मोबाईलवर youtube वर पाहून गोलूची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी लावलेला आहे. तसेच गोलूवर शस्त्रक्रिया सुरू करत असताना डॉक्टरांनी गोलूच्या वडिलांना कंपाउंडरसोबत डिझेल आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी रुग्णालयात फक्त गोलूचे आजोबा आणि आजी तिथे उपस्थित होते.

ऑपरेशन दरम्यान गोलूची तब्येत जास्त बिघडली. त्यानंतर त्या डॉक्टरांनी स्वतः त्या रुग्णाला आणि आजीला रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेलं. परंतु त्या रुग्णालयात जाण्या आधीच त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा जीव गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी मृतदेह तिथेच सोडला आणि बॅग घेऊन फरार झाला. त्यानंतर त्या मुलाचे आजी त्याचा मृतदेह घेऊन कशीबशी परतली. सध्या हे प्रकरण खूप हिंसक असे वळण घेत आहे. परंतु त्या डॉक्टरला त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आहे.

Nagar-Parli Railway Line : आली महत्वाची अपडेट ! परळी रेल्वे स्थानकातून बीड आणि नगर मार्गे थेट मुंबई, पुणे गाठता येणार

nagar parali railway line

Nagar-Parli Railway Line : भारतामध्ये सर्वत्र रेल्वेचे जाळे विखुरलेले आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर सध्या रेल्वे गाड्या वाढवणे, नवीन मार्ग तयार करणे, याशिवाय राज्यातील इतर भाग मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांशी रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम केले जात आहे. देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने ही पावले उचलली जात आहेत. अशातच आता अहमदनगर मुंबई , पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. याबाबत अपडेट (Nagar-Parli Railway Line) समोर आली आहे चला जाणून घेऊया …

कधीपासून धावणार रेल्वे ?

बीड आणि अहमदनगर हे दोन महत्वाचे जिल्हे मुंबई आणि पुणे शहराशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे 132.92 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झालेले असून हा रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे. साधारणपणे 25 डिसेंबर 2025 पर्यंत हा लोहमार्ग पूर्ण करण्याचे रेल्वेच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले असून डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेने रेल्वे धावणार आहे.

अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांकरिता हा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी रेल्वे स्टेशन वरूनच जे प्रवासी दक्षिणेकडे जातील किंवा येतील अशा प्रवाशांना थेट याच नगर- बीड- परळी रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाणे देखील शक्य होणार आहे.

ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी (Nagar-Parli Railway Line)

मागील सात वर्षाच्या कालावधीपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू होते. या रेल्वेमार्गाच्या निमित्ताने या परिसरामध्ये प्रथमच रेल्वे मार्गाचे आगमन झालेले आहे. या रेल्वे मार्गावर नगर ते नारायणगाव, नारायणगाव ते सोलापूर वाडी व सोलापूर वाडी ते आष्टी आणि आष्टी ते अमळनेर दरम्यान चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये ऑगस्ट महिन्यात अमळनेर ते विघनवाडी दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आलेली होती. साधारणपणे घेण्यात आलेल्या चाचण्या बघितल्या तर 95 किलोमीटर अंतरावरील चाचण्या पूर्ण करण्यात आलेले आहेत व संपूर्ण 132 किलोमीटर अंतराचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. या रेल्वे मार्गाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या परळी (Nagar-Parli Railway Line) रेल्वे स्थानकातून बीड आणि नगर मार्गे मुंबई व पुणे थेट रेल्वे सुरू होणार आहे.

रेल्वेमार्गे गाठता येणार मुंबई, पुणे

मिळालेल्या माहितीनुसार परळी स्थानकातून नांदेड तसेच हैदराबाद, छत्रपती संभाजी नगर, बेंगलोर, तिरुपती, सिकंदराबाद, बिदर, गुंटूर आणि लातूर या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याला जाणे शक्य होणार आहे. या रेल्वे मार्गावर पाचशे मीटर लांबीचे 18 मीटर उंचीचे नऊ पूल उभारण्यात (Nagar-Parli Railway Line) आलेले आहेत.

कधीपर्यंत काम होणार पूर्ण ?

यासोबतच अहमदनगर ते बीड हा जो काही तीस किलोमीटर रेल्वेमार्ग आहे तो नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे व त्यासोबतच बीड ते वडवणी 32 किमीचा रेल्वे मार्ग आहे तो (Nagar-Parli Railway Line) मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नगर- बीड परळी रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा का काढली? राहुल गांधींनी सांगूनच टाकलं

Bharat Jodo Yatra Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नेहमीच चर्चेत असते. कन्याकुमारी ते काश्मीर असा एकूण ४००० किलोमीटर प्रवास पायी करत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) थेट देशातील जनतेचा संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि लोकांना आपलं प्रेम दिले. आता याच भारत जोडो यात्रेबद्दल राहुल गांधींना अमेरिकेत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टपणे या यात्रेचा हेतू आणि उद्देश सांगितला. तसेच भारत जोडो यात्रेदरम्यान आलेला अनुभव सुद्धा राहुल गांधींनी व्यक्त केला.

राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी डॅलस, टेक्सास येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. या कार्यक्रमात त्यांना भारत जोडो यात्रेबद्दल विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रा काढण्याचे मुख्य कारण म्हणजे जनतेशी माझ्या संवादाचे सर्व मार्ग बंद झाले होते. आम्ही संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते टीव्हीवर दाखवलं जात नव्हते. मी माध्यमांशी संपर्क साधला, पण त्यांनी आमचे ऐकले नाही. “आम्ही कायदेशीर संस्थांना कागदपत्रे देखील सादर केली, परंतु कोणताही परिणाम झाला नाही. अशाप्रकारे सर्वच मार्ग बंद झाल्याने मग जनतेपर्यंत पोहचायचं कस हेच आम्हाला कळत नव्हतं. मग त्यांचा मनात विचार आला कि, जर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेशी जोडलं जात नसेल तर आता आपल्याला स्वतःहून थेट जनतेपर्यंत जावे लागेल. त्यासाठी देशभरात पायी प्रवास करणे हाच उत्तम मार्ग होता.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, सुरुवातीला गुडघ्याच्या त्रासामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पहिल्या 3-4 दिवसांतच वाटलं कि आपण कशाला भारत जोडो यात्रा काढली. मात्र त्यानंतर शरीराला चालण्याची सवय होत गेली. राहुल गांधी यांच्या मते भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींचे राजकारण, लोक आणि संवादाचा मार्ग पूर्णपणे बदलला. भारत जोडो यात्रेमुळे राजकारणात प्रेम’ या संकल्पनेची ओळख झाली. राजकारणात सामान्यतः ‘प्रेम’ सारखे शब्द वापरले जात नाहीत, उलट द्वेष, राग, अन्याय आणि भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी प्रमुख असतात. पण, भारत जोडो यात्रेने या नव्या कल्पनेला भारतीय राजकारणात स्थान दिले आहे आणि प्रेमची ही कल्पना चांगलीच कामी आली आहे. भारत जोडो यात्रा हा काही फक्त भौतिक प्रवास नव्हता, तर हा एक आध्यात्मिक आणि राजकीय प्रवास होता ज्याने त्यांचा आणि त्यांच्या टीमचा दृष्टिकोन बदलला असेही राहुल गांधी यांनी सांगून टाकलं.

Soyabin Farmer | अखेर धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश ! महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन केंद्र सुरु करण्यास मान्यता

Soyabin Farmer

Soyabin Farmer | आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तसेच इतर गोष्टी देखील आणत असतात. अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन (Soyabin Farmer ) या पिकाला 90 दिवसासाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावेत अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होता. अखेर धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश आलेले आहे. ते म्हणजे आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमी भावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. याबाबतची माहिती धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे.

या योजनेअंतर्गत आता सोयाबीनसोबत (Soyabin Farmer ) उडीद देखील खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची आधारभूत किंमती 4892 रुपये प्रति क्विंटल केलेली आहे. आणि आता त्यानुसार या 90 दिवसात यानुसार खरेदी होणार आहे. महाराष्ट्रमध्ये हवामान सातत्याने बदलत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस दिसत आहे. आणि यामुळे सोयाबीनच्या पिकाचे दर देखील खूप पडलेले आहेत. आणि याचा आर्थिक फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीनचे दर कमी झालेले आहे. मागील वर्षी देखील सोयाबीनचे नुकसान झाले होते आणि त्यासाठीच राज्य सरकारने प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भोगावे लागले होते.

अशातच आता धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी. तसेच त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, असे त्यांनी म्हटलेले आहे. तसेच खाद्यतील, सोयामिल्क उत्पादनावर आयात निर्यात शुल्क लाभावे सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे लागेल. याबाबत देखील धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. आणि केंद्र केंद्रीय कृषिमंत्री देखील याबद्दल सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे.

Attempted Train Accident : रेल्वे घातपाताचा प्रयत्न!! ट्रॅकवर ठेवला सिलेंडर, ट्रेन आली अन…

Attempted train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यात अनेक ठिकाणी रेल्वे डब्बे घसरल्याची घटना घडत आहे, त्यामुळे कुठेतरी घातपात करण्याचा प्रयत्न (Attempted Train Accident) सुरु आहे का? अशी शंका मनात येत होती. तीन आठवड्यांपूर्वी, साबरमती एक्स्प्रेसचे डझनभर डबे रुळावर असलेल्या दगडामुळे घसरले होते, त्यानंतर राजस्थानमध्येही अशाच एका रेल्वे ट्रॅकवर लोखंडी तुकडे आणि सिमेंट ब्लॉक्स ठेवण्यात आले होते. आता तर चक्क गॅस सिलेंडर आणि पेट्रोलची बाटली अज्ञातांनी रुळावर ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे विभागात (Indian Railways) मोठी खळबळ उडाली आहे.

रेल्वे ट्रॅकही उडवण्याचा प्रयत्न- Attempted Train Accident

प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी कुंज एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर एलपीजी सिलिंडर ठेवण्यात आला होता. शिवराजपूर परिसरात हा सिलिंडर ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी अचानक हि ट्रेन सिलिंडरला धडकली. या धडकेमुळे सिलिंडर रुळावरून दूर उडून गेला. सिलेंडर सोबत काडीची पेटी आणि पेट्रोलची बाटली सुद्धा ट्रॅकवर ठेवण्यात आली होती. याचाच अर्थ रेल्वे ट्रॅकही उडवण्याचा सदर आरोपींचा प्रयत्न होता. याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हरीश चंद्र म्हणाले की लोको पायलटने एलपीजी सिलेंडर ट्रॅकवर ठेवल्याचे पाहिले आणि आपत्कालीन ब्रेक लावला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लोको पायलटने तात्काळ गार्ड आणि गेटमनला घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सदर घटनेचा तपास सुरू केला.

यानंतर खराब झालेले सिलिंडर जप्त करण्यात आले असून, पोलीस जबाबदार असलेल्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मागील काही काळात अनेक ठिकाणी रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याच्या घटना घडललेया आहेत. त्यामागे सुद्धा अशाच प्रकारचे घाणेरडे कृत्य केल्याचा संशय (Attempted Train Accident) आणखी बळकावला आहे. हे एकूण सर्व प्रकरण म्हणजे देशविरोधी कृत्य म्हणता येईल.

Calcium Deficiency | कॅल्शिअमची कमतरता असल्यास शरीर देते हे संकेत; या पदार्थांचा करा जेवणात समावेश

Calcium Deficiency

Calcium Deficiency | आपल्या निरोगी आरोग्यासाठी शरीरात वेगवेगळ्या घटकांची गरज असते. त्यात कॅल्शियम आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे पोषकतत्व आहेत. आपली हाडे तसेच दात मजबूत होण्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. स्नायूंना आकुंचन प्राप्त करण्यासाठी देखील कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळे आपल्या शरीराचे ठोके सुरळीतपणे पार पडतात. आणि कॅल्शिअममुळे (Calcium Deficiency) रक्त गोठण्यास देखील मदत होते. म्हणजे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी कॅल्शियमची गरज असते. परंतु जर या कॅल्शियमची तुमच्या शरीरात कमतरता निर्माण झाली, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता (Calcium Deficiency) निर्माण होऊ लागते. तेव्हा आपल्याला शरीराकडून काही संकेत मिळतात .

कारण आपल्या आहारातून जेव्हा कॅल्शियमचा पुरवठा होत नाही. तेव्हा आपले शरीर हे आपल्या हाडांमध्ये असलेले कॅल्शियम घेण्यास सुरुवात करतात. आणि त्यामुळे आपल्या हाडांना देखील त्रास होतो याची आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात. कॅल्शियमच्या कमतरतेच्या (Calcium Deficiency) स्थितीला हायपोकॅल्सेमिया असे म्हणतात. आता कॅल्शियमच्या कमतरत्यानंतर कोणती चिन्ह दिसू लागतात. आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया.

कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत |Calcium Deficiency

  • कॅल्शियमची कमतरता असल्याने आपल्या स्नायूंवर ताण येतो आणि वेदना होतात.
  • त्याचप्रमाणे आपल्या हात आणि पायांमध्ये सतत वेदना जाणवतात.
  • शारीरिक हालचालीन नंतर वेदना वाढतात.
  • त्याचप्रमाणे आपले बोटांमध्ये सून्नपणा जाणवतो आणि मुंग्या येतात.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
  • त्याचप्रमाणे तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत बनते.
  • तुमच्या नखांची वाढ बंद होते आणि नखेत तुटतात.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मासिक पाळी पूर्वी देखील लक्षणे दिसू लागतात. यामध्ये मूड बदलणे, चिडचिडेपणा, तीव्र वेदना, शरीर दुखणे, थकवा अशा अशी लक्षणे दिसतात.
  • शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर झोप पूर्ण होत नाही त्यामुळे चिडचिडेपणा येतो.
  • कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे तुमची हाडे कमकुवत होतात. आणि तुम्हाला किरकोळ दुखापत झाली तरी फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

कॅल्शियमची कमतरता असल्यास काय करावे ? | Calcium Deficiency

तुम्हाला जवळील कोणतीही लक्षणे सतत जाणवत असतील. तर सगळ्यात आधी रक्त तपासणी करून कॅल्शियमच्या कमतरते बद्दलची टेस्ट करा. कॅल्शियमसोबत तुम्ही विटामिन डी देखील पुरेशा प्रमाणात घेतले पाहिजे. विटामिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम सोसण्यासाठी मदत करते कॅल्शियमचा पुरवठा फक्त दूध आणि दह्याने होत नाही. तर या सोबत तुम्ही तूप, दही, चीज यांसारख्या गोष्टींचे देखील सेवन केले पाहिजे. खसखस, ब्रोकोली, पालक, बीन्स, मसूर, चणे यांसारख्या पदार्थांचा देखील जेवणामध्ये समावेश करू शकता.

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला; नात- जावई सोबतीला

Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण देशभरातून भाविक मुंबईतील लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाला येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि बाप्पासमोर नतमस्तक होत असतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे उपस्थित होत्या. शरद पवारांनी अनेक वर्षानंतर लालबागच्या राजाला आले. त्यापूर्वी त्यांनी सकाळी चिंचपोकळी चिंतामणीचेही दर्शन घेतलं.

आज सकाळी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले आणि गणरायाचा आशीर्वाद घेतला. . यापूर्वी मुख्यमंत्री असताना शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते, त्यानंतर आज त्यांनी लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतले.कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं.

दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा मुंबईत असून आज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होणार आहेत. आज दुपारी १२ वाजता अमित शाह लालबागच्या राजाच्या दरबारात जाणार आहे. त्यांच्याआधीच शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुद्धा आधीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

SSC GD Constable Bharti 2024 | SSC GD अंतर्गत होणार 39,482 पदांसाठी भरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी अतिशय भन्नाट अशी नोकरीची संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आजपर्यंत आम्ही नोकरीच्या अशा अनेक संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक तरुणांना झालेला आहे. आपल्या भारतामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. ज्यांच्यापर्यंत नोकरीच्या अनेक संधी पोहोचल्या जात नाही. त्यांच्यासाठी आम्ही विविध नोकरीच्या माहिती देत असतो. आज देखील आम्ही विशेष नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC GD Constable Bharti 2024) एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या तब्बल 39 हजार 481 रिक्त जागा आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 5 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत तब्बल 39 हजार 481 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता | SSC GD Constable Bharti 2024

दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

ज्या व्यक्तींचे वय 18 ते 23 दरम्यान आहे ते व्यक्ती यावे भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

5 सप्टेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला महिन्याला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये एवढा पगार मिळेल

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला 100 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.

अर्ज कसा करावा ? | SSC GD Constable Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 14 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

PN Gadgil Jewellers IPO : उद्या लाँच होणार पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा IPO; किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल?

PN Gadgil Jewellers IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्वेलर ब्रँड पैकी एक असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा IPO उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला बाजारात लिस्ट (PN Gadgil Jewellers IPO) होणार आहे. IPO हा 850 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचे संयोजन आहे. 10 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि 12 सप्टेंबर रोजी बंद होईल असं कंपनीने सांगितलं आहे. हा आयपीओ ११०० कोटींचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय.

किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल? PN Gadgil Jewellers IPO

पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी IPO च्या माध्यमातून 22,916,667 इक्विटी शेअर्स विकणार आहे. यातील 850 कोटी रुपयांचे 17,708,334 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 250 कोटी रुपयांचे 5,208,333 इक्विटी शेअर्स विकले जातील. किरकोळ गुंतवणूकदारांना हा आयपीओ खरेदी करायचा असेल तर कमीत कमी 31 शेअर्सचा एक लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच सुमारे 14,880 रुपयांचे शेअर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतील. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप १३ सप्टेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील. (PN Gadgil Jewellers IPO)

सध्या, PN गाडगीळ ज्वेलर्समध्ये SVG बिझनेस ट्रस्टचा 99.9 टक्के हिस्सा आहे. ब्रोकरेज हाऊसेसने इश्यूनंतर कंपनीचे बाजार भांडवल 6,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ताज्या इश्यूमधून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे 393 कोटी रुपये महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी खर्चासाठी खर्च केले जातील, 300 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि काही भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल असं बोललं जातंय. दरम्यान, पु.ना.गाडगीळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑर्गनाईज्ड ज्वेलर्स आहेत. डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार त्यांचे महाराष्ट्र आणि गोव्या ३३ स्टोअर्स आहेत. तसंच अमेरिकेतही एक स्टोअर आहे.

AAI Bharti 2024 | पदवीधरांना भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नोकरीची मोठी संधी; भरली जाणार 840 पदे

AAI Bharti 2024

AAI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. आता ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत होणार आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक सहाय्यक, व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 840 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता.

पदाचे नाव | AAI Bharti 2024

या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक सहाय्यक, व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत तब्बल 840 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

रिक्त पदांची संख्या

  • महाव्यवस्थापक – 103 पदे
  • वरिष्ठ व्यवस्थापक – 137 पदे
  • व्यवस्थापक – 171 पदे
  • सहाय्यक व्यवस्थापक – 214 पदे
  • कनिष्ठ कार्यकारी – 215 पदे

अर्ज कसा करावा ? | AAI Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील थेट अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • अर्ज करताना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.