Monday, December 22, 2025
Home Blog Page 484

Central Bank Of India Recruitment | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार 30,000 रुपये पगार

Central Bank Of India Recruitment

Central Bank Of India Recruitment | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांचे बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. आणि ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank Of India Recruitment) विविध पदांसाठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत आता इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती सायकलची ऑफिस असिस्टंट, वॉचमन आणि गार्डनर या पदांसाठी होणार आहेत. या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 15 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | Central Bank Of India Recruitment

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी ऑफिस असिस्टंट, अटेंडर वॉचमन, गार्डनर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 13 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेणे गरजेचे आहे. तसेच त्या उमेदवाराला कम्प्युटरची माहिती असावी. स्थानिक भाषेचे नॉलेज असावे. ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवाराला एमएम ऑफिसचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तर वॉचमन आणि गार्डनर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण सातवी पास असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा | Central Bank Of India Recruitment

या भरतीसाठी 22 ते 40 यावर वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील.

वेतनश्रेणी

  • फॅकल्टी- 30000 रुपये दर महिना
  • ऑफिस असिस्टंट – 20,000 रुपये दर महिना
  • अटेंडर – 14000 रुपये दर महिना

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाला? फडणवीसांनी सांगूनच टाकलं

Ladki Bahin Yojana fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरांसाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. हि योजना जरी महायुती सरकारची असली तरी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते स्वतंत्रपणे श्रेय लाटत असल्याच्या चर्चा अधून मधून सुरु असतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर हि दादांची योजना आहे अशी जाहिरात सुद्धा टीव्हीवर दिली. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर लाडक्या बहीण योजनेचे खरे श्रेय कोणाला? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना विचारला असता त्यांनी थेट नावच सांगून टाकलं.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ती मुख्यमंत्र्यांच्या नावानेच आहे. कोणत्याही सरकारच्या निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. कारण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंत्री काम करतो. यामुळे सरकारच्या सर्व निर्णयांचे आणि योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. परंतु लाडकी बहीण योजनेचे श्रेय हे तिन्ही पक्षांना नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आहे, असे म्हणत फडणवीसांनी मोठ्या चतुराईने उत्तर दिले.

योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात – Ladki Bahin Yojana

दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक आधी म्हणाले, या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण आम्ही बजेट मध्ये तरतूद करून ठेवली. आता ही योजना बंद व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते कोर्टात गेले असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. याचिका करणारे अनिल वलपल्लीवार हे आमच्या नागपूरचेच असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख आहेत. फक्त नाना पटोलेच नव्हे तर सुनील केदार, विकास ठाकरे यांचेही इलेक्शन एजंट अनिल वलपल्लीवार आहेत . फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हे तर मुलींच्या शिक्षणाची योजना बंद करा, पिंक रिक्षा योजना बंद करा, शेतकरी अनुदानाची योजना बंद असा अशीही त्यांची मागणी आहे. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात काय आहेत हे यातून समजते असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका कलेची.

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोय

ganesh festival

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोयअवघ्या महाराष्ट्राला आता वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. पुढच्या 24 तासात गेणेश उत्सवाला सुरुवात होणार असून त्याकरिता तयारीची धावपळ सुरु आहे. मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होत असते. म्हणूनच प्रवाशांची गैरसोय होऊन नये याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याकडे (Ganesh Chaturthi 2024) भर दिला जातो आहे.

अनेक जण मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात मात्र अशावेळी रात्री उशीर झाल्यास गणेश भक्तांना खाजगी वाहनांनी जावे लागते. म्हणूनच हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये बेस्ट आणि मेट्रोच्या सेवा वाढवण्यात येणार आहेत. दिवसा बेस्टच्या सेवा नियमित असतात त्यामुळे (Ganesh Chaturthi 2024) वाहतुकीस अडचण येत नाही मात्र रात्रीच्या वेळेस गणेश भक्तांना कोणतीही अडचणी येऊ नये याकरिता अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय बेस्ट न घेतला आहे.

गणेश आगमन हे सात तारखेला होणार असून 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय बेस्ट कडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवा दरम्यान मेट्रोच्या सेवेत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात येणार (Ganesh Chaturthi 2024) असून 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनस वरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी रात्री 11:30 वाजता सोडणार आहेत

कसा असेल बेस्टचा मार्ग

कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक 4 मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, 8 मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – 21 डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -25 बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-42 कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, 44 वरळी व्हिलेज ते एस. यशवंते (Ganesh Chaturthi 2024) चौक (काळाचौकी), 66 इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, 69 डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -51 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे .

कसे असेल मेट्रोचे वेळापत्रक (Ganesh Chaturthi 2024)

दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर ते गोंदवली मेट्रो सात मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर वीस फेऱ्या वाढवण्यात आलया आहेत तर सेवेच्या कालावधीत 30 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. तर रात्री अकरा वाजता बंद होणारी मेट्रो सेवा अकरा ते 17 सप्टेंबर दरम्यान रात्री साडेअकरा वाजता बंद होणार आहे.

मेट्रोचे वेळापत्रक

  • गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री 19:20, 10:39, 10:50 आणि 11 वाजता (4 सेवा)
  • अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री 10:20, 10:40, 10:50 आणि 11 वाजता ( 4सेवा)
  • गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2सेवा)
  • अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2सेवा)
  • दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री 10:53, 11:12, 11:22 आणि 11:33 वाजता (4सेवा)
  • दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री 10:57, 11:17, 11:27 आणि 11:36 वाजता (4सेवा)

Weather Update | पुढील 24 तासात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता; IMD ने दिला ईशारा

Weather Update

Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात जास्त पाऊस पडलेला आहे. मागील काही दिवसापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस येत आहे. विदर्भात यावर्षी खूप जास्त पाऊस पडला. येथील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. अशातच आता गणपतीच्या मुहूर्तावर पाऊस कोकणाच्या दिशेने वळलेला दिसत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांच्या कमी दाबाच्या पट्ट्यांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे आता कोकणाच्या घाट माथ्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे.

याशिवाय सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यांसारख्या ठिकाणी देखील पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि मुंबईत देखील ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गणपतीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक असे वातावरण दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आलेले आहे. तसेच आंध्रप्रदेशपासून ओडिसापर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारण देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिलेला आहे.

Unbreakable Cricket Record : बाब्बो!! एका चेंडूत 286 धावा; क्रिकेटमधील कधीही न तुटणारा रेकॉर्ड

Unbreakable Cricket Record

Unbreakable Cricket Record : क्रिकेट हा आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ… क्रिकेटमध्ये नेहमीच नवनवीन रेकॉर्ड रचले जातात. सध्याच्या काळात T20 क्रिकेटमुळे तर खेळाचा हा प्रकार खूपच रोमांचक बनला आहे. त्यामुळे दररोज कोणता ना कोणता विक्रम तर तुटत असतोच मात्र क्रिकेट इतिहासात असा एक रेकॉर्ड आहे जो तोडणं मुश्किल ही नही नामूमकिन है असं म्हंटल जातंय. होय… हा रेकॉर्ड आहे एका चेंडूत 286 धावा करण्याचा… वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि असं घडलं तरी कस असा प्रश्नही तुमच्या मनात पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात या क्रिकेट मधील या अनोख्या रेकॉर्डची रंजक कहाणी …..

क्रिकेटमधील हा कधीही न तुटणारा (Unbreakable Cricket Record) विक्रम 130 वर्षांपूर्वी रचला गेला आहे. 1894 मध्ये क्रिकेटच्या एका सामन्यात एका चेंडूत २८६ धावा काढण्यात आल्या. फलंदाजांनी एकही षटकार किंवा चौकार न मारता केवळ एका चेंडूवर २८६ धावा केल्या. त्यावेळी आजच्या सारखं सोशल मीडिया किंवा ऑनलाईन मीडिया नव्हती,. परंतु पाल मॉल गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्रात हि बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या वृत्तपत्राचा अहवाल नंतर इतर अनेक देशांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येईल.

काय होती ती घटना? Unbreakable Cricket Record

ही घटना १५ जानेवारी १८९४ रोजी घडली. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि ‘स्क्रॅच-इलेव्हन’ या दोन संघांमध्ये हा सामना खेळला जात होता.बोनबरी मैदानावर खेळण्यात आलेल्या या सामन्यात व्हिक्टोरियाचे फलंदाज फलंदाजी करत होते. त्यावेळीफलंदाजाने चेंडू अशा प्रकारे मारला की तो शेतातील झाडात अडकला. यानंतर फलंदाज धावांसाठी खेळपट्टीवर धावू लागले. चेंडू खूप उंचावर अडकला होता आणि तो काढता आला नाही. फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यासाठी विरोधी संघाने पंचांना चेंडू हरवलेला घोषित करण्याचे आवाहन केले. पण पंचांनी चेंडू सरळ दृष्टीक्षेपात असल्याचे सांगून अपील फेटाळले, त्यामुळे तो हरवला असे घोषित केले जाऊ शकत नाही. अनेक तासांनंतर रायफलने अचूक नेम साधत चेंडू झाडावरुन खाली पाडण्यात यश आलं. पण तोपर्यंत फलंदाजांनी तब्बल 286 धावा पळून काढल्या होत्या. रिपोर्टनुसार फलंदाज तब्बल 6 किलोमीटर धावले होते. त्यावेळी क्रिकेटमध्ये कोणतेही नियम नसल्याने हा रेकॉर्ड बनला, मात्र आजही या विक्रमाची आठवण काढली जाते.

सरकारने पुन्हा बदलला जीआर; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार निधी

Farmer Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत. जे आत्महत्या करतात. याआधी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला होता. राज्य सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही, असे कारण सांगून हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा या जीआरमध्ये मोठा बदल केलेला आहे. आणि सरकारने बदललेल्या या नियमानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना आता पूर्वीप्रमाणेच निधी देखील मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी जे शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून काही निधी मिळत होता. परंतु मध्यंतरी सरकारने हा निधी देण्याचे बंद केले. त्यानंतर आता शेतकऱ्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना निधी देण्याचे जीआर जारी केलेला आहे. सरकारकडे निधी उपलब्ध नाही, असे कारण देत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला निधी देण्याचा रोखला होता. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार देण्याचे निर्णय घेतलेला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे वक्तव्य दिलेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे “सध्या सरकारच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचा ताण नाही. या कल्पना कोणाच्या डोक्यातून येतात माहित नाही. ज्याला महाराष्ट्र समजला नाही, त्याला महाराष्ट्राच्या शक्तीची देखील माहिती नाही, महाराष्ट्राच्या जनतेवर महाराष्ट्राचे शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर उद्योगावर विश्वास नाही. ते लोक अशा गोष्टी करतात त्याचप्रमाणे हा जीआर काढला. त्याचा संबंध लाडकी बहिणी योजनेमुळे निधी कमी पडत असल्याचे देखील जोडले जात आहे.”

त्याचप्रमाणे दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी देखील याबाबत मत मांडले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर दहा लाखांची मदत निधी मिळणार अशी काही योजना आहे का ? शेतकऱ्यांना मदत करताना आम्हाला लाडकी बहीण योजना थांबवण्याची काही गरज नाहीये. कारण या योजनेसाठी सरकारने आधी 46000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.”

Foreign Investment : परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात पहिला; तब्बल 70,795 कोटींची गुंतवणूक

Foreign Investment Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परकीय गुंतवणूकीत (Foreign Investment) महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर असून राज्यात तब्बल 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी म्हंटल. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली असं फडणवीस यांनी म्हंटल आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आकडेवारी सादर केली आहे.

काय आहे फडणवीसांचे ट्विट – Foreign Investment

“अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक (Foreign Investment) एकट्या महाराष्ट्रात !!! गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 7 कल्याणकारी योजना; उत्पन्न वाढण्यास होणार मदत

Schemes for farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. देशातील अनेक नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते आणि बळीराजाला खुश करण्याचा प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांचे जीवमी सोप्प व्हावं, त्यांचं आर्थिक उप्तन्न वाढावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असते. मात्र 2020 मध्ये तीन शेती कायदे लागू केल्यापासून मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिबिंब विरोधकांनी पेरलं. मात्र केंद्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने सात प्रमुख योजनांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे सरकारवर करण्यात आलेला आरोप आणि शेतकरी विरोधी नॅरेटीव्ह नक्कीच उद्धवस्त झाले आहे आणि अनेकांचे म्हणणे, यावरून केंद्राला शेतकऱ्यांची किती काळजी आहे हे दिसून येते.

शेतीविषयक कायद्यांचा वाद: गैरसमज की चुकीची माहिती?

कृषी क्षेत्राचे उदारीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले तीन कृषी कायदे खरं तर शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी उचललेलं पहिले पाऊल होते. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन नियंत्रित बाजाराबाहेर विकण्याची परवानगी देणे, करार शेती सक्षम करणे आणि जीवनावश्यक वस्तूंवरील स्टॉकहोल्डिंग मर्यादा काढून टाकणे हे या कायद्यांचे उद्दिष्ट आहे. या सुधारणांचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक बाजारपेठेतील प्रवेश आणि किंमतींची लवचिकता प्रदान करण्याच्या उद्देशाने होता. मात्र या कायद्याना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. हे कायदे किमान आधारभूत किंमत (MSP) प्रणाली मोडून काढतील आणि शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्यांकडून शोषणास बळी पडतील अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली. विरोधकांनी या कायद्याचे भांडवल करत भाजपवर शेतकरी विरोधी म्हणून ठपका ठेवला. वाढत्या दबावाला प्रतिसाद म्हणून, पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2021 मध्ये कायदे रद्द करण्याचे अभूतपूर्व पाऊल उचलले.

नवीन उपक्रम: शेतकरी समर्थक अजेंडा

शेतीविषयक कायद्यांचा फटका बसूनही, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. याचा पुरावा म्हणजे नुकताच 13 हजार 966 कोटी रुपयांच्या एकत्रित खर्चासह सात महत्त्वाच्या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. हे उपक्रम शाश्वतता आणि बदलत्या हवामानातही उत्पन्न वाढ आणि तांत्रिक प्रगतीपर्यंत कृषी क्षेत्रासमोरील बहुआयामी आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारची वचनबद्धता दर्शवतात.

डिजिटल कृषी अभियान

डिजिटल कृषी मिशन उपक्रमासाठी केंद्र सरकारने 2 हजार 817 कोटींची तरतूद करण्यात आली आहेत. कृषी पद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मोठा डेटा आणि भू-स्थानिक तंत्रज्ञानासह आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. ॲग्री स्टॅकची निर्मिती, कृषी डेटाचे सर्वसमावेशक डिजिटल भांडार, आणि शेतकरी नोंदणी आणि गाव जमीन नकाशे नोंदणीची स्थापना यामुळे शेती व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रिया सुव्यवस्थित आणि वर्धित करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना थेट खरेदीदारांशी जोडून, ​​शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची वाजवी किंमत मिळावी यासाठी मध्यस्थांची भूमिका कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान

अन्न आणि पोषण सुरक्षा योजनेसाठी पीक विज्ञान, ₹3,979 कोटींचे बजेट, सरकारच्या धोरणाचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. अनुवांशिक सुधारणा आणि संसाधन व्यवस्थापनावर भर देऊन कृषी संशोधन आणि शिक्षण मजबूत करण्यावर हा उपक्रम भर देतो. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी शेतकऱ्यांना तयार करून, ही योजना भारताच्या कृषी क्षेत्राची लवचिकता आणि भविष्यातील अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्याची क्षमता सुनिश्चित करते.

कृषी शिक्षण आणि पशुधन आरोग्य बळकट करणे

शेतीमधील शिक्षण आणि पशुधनाचे महत्त्व ओळखून, सरकारने कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान बळकट करण्यासाठी 2 हजार 291 कोटी रुपये आणि शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन योजनेसाठी 1 हजार 702 कोटींची तरतूद केली आहे. कृषी व्यावसायिकांच्या पुढील पिढीला प्रगत कौशल्यांनी सुसज्ज करणे आणि पशुधनाच्या जातींच्या अनुवांशिक सुधारणांना प्रोत्साहन देणे, भारताची शेती स्पर्धात्मक आणि शाश्वत राहण्याची खात्री करणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

फलोत्पादन विकास आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन

फलोत्पादन विकास आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन साठी 860 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या बागायती पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन, हा उपक्रम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आणि कृषी उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न करतो. याव्यतिरिक्त 1 हजार 115 कोटींचे बजेट असलेली नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजना, दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित करताना पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या शाश्वत कृषी पद्धतींबाबत सरकारची वचनबद्धता अधोरेखित करते.

या योजनांच्या माध्यमातून सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सटकली तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे हे सुद्धा अधोरेखित झालं. सरकारचे हे प्रकल्प म्हणजे भरीव आर्थिक खर्च आणि या उपक्रमांचे सर्वसमावेशक स्वरूप शेतकऱ्यांचे जीवन आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकारची स्पष्ट वचनबद्धता दर्शवते. शेतीविषयक कायद्यांच्या वादामुळे सरकारच्या प्रतिमेला तात्पुरता तडा गेला असला तरी, या नवीन योजनांच्या दीर्घकालीन परिणामामुळे भाजप खरे तर शेतकरी समर्थक असल्याचा समज अधिक दृढ होण्याची शक्यता आहे

कमी पटसंख्येच्या शाळांवर नेमणार कंत्राटी शिक्षक; दरमहा मिळणार एवढे मानधन

school department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यामध्ये अनेक इंग्लिश मीडियम तसेच कॉन्व्हेंट स्कूल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजकालचे नवीन पालक हे त्यांच्या मुलांना देखील कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण देत असतात. परंतु याचा परिणाम आता जिल्हा परिषद हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर झालेला आहे. कारण गावातील विद्यार्थी देखील दुसरीकडे जाऊन शिक्षण घ्यायला लागल्यामुळे शाळांचा पट हा 20 किंवा त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे आता या शाळांमध्ये इथून पुढे सेवानिवृत्त शिक्षक, डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरुण-तरुणींना शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने याबाबत गुरुवारी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी या तरुणांना नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच त्यांना दर महिन्याला 15000 रुपये मानधन देण्याचे देखील सांगितलेले आहे.

ज्या शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे. त्या शाळांमध्ये या कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जाणार आहे. या शिक्षकांना वर्षात 12 रजा असणार आहेत. तसेच शाळेचे शिक्षक ज्याप्रमाणे तास घेतात आणि इतर विषय शिकवतात. त्याचप्रमाणे त्यांना शिकवावे लागणार आहे. या शिक्षकांच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन केले जाईल. परंतु त्यात जर त्यांचे काम चांगले नसेल. समाधानकारक नसेल तर त्यांची सेवा तिथेच बंद केली जाईल. तसेच त्या शाळांमधील शिक्षकांची बदली देखील केली जाणार नाही. हे कंत्राटी शिक्षकांवर केंद्र प्रमुख गटात शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निधीकारांचे नियम नियंत्रण असेल, असे देखील या शासन निर्णयात सांगितलेले आहेत.

महत्त्वाच्या गोष्टी

  • ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या ही 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्या शाळांमध्ये म्हणून दोन शिक्षकांपैकी एक जण हा सेवानिवृत्ती किंवा बीएड झालेल्या बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यात येईल.
  • तसेच निवृत्त झालेल्या शिक्षकाचे वय 70 वर्षापर्यंत असावे. तो व्यक्ती कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेला असावा.
  • त्याचप्रमाणे ज्यावेळी निवृत्ती शिक्षकाची नेमणूक केली जाईल. त्याला त्या गटासाठी शिक्षण घ्यायचे आहे. त्या गटाला सेवा काळातच अध्ययन केलेले असावे.
  • निवृत्ती शिक्षका तीन वर्षापर्यंत नेमला जावा. तसेच वय 70 होईपर्यंत त्याची नियुक्ती करावी. तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम असावा.
  • त्याचप्रमाणे ज्या लोकांचे डीएड, बीएड झालेले आहे. त्या उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राती तत्त्वावर त्यांची नियुक्ती केली जाईल.
  • त्याचप्रमाणे डीएड आणि बीएड बेरोजगार तरुणांना एकाच वर्षासाठी नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर त्याची योग्यता तसेच गुणवत्ता पाहून पुढील काळ ठरवला जाईल.

Ajit Pawar On Ideology : भाजपसोबत असलो तरी विचारधारेशी तडजोड नाहीच; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar On Ideology

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीमध्ये आम्ही भाजपसोबत असलो तरी धर्मनिरपेक्ष विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Ideology) यांनी मांडली आहे. तसेच आम्ही फक्त विकासाच्या अजेंड्यावर महायुतीत सहभागी झालो आहोत असेही अजित पवार म्हणाले. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध राजकीय विषयांवर रोखठोक भूमिका मांडली. तसेच महायुतीतील पक्षांसोबतच्या वैचारिक सुसंगततेबाबत वाढत्या प्रश्नांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला.

विचारधारेशी अजिबात तडजोड नाही – Ajit Pawar On Ideology

अजित पवार म्हणाले, जेव्हा आम्ही युतीबाबत चर्चा सुरू केली त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले की आमची विचारधारा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे आणि आम्ही आमच्या विचारधारेशी अजिबात तडजोड करणार नाही. स्वतःचा बचाव करताना अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उदाहरण दिले, महाविकास आघाडीत सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना सारख्या वेगळ्च्या विचाराच्या पक्षासोबत आघाडी केली होतीच या मुद्द्यावर जोर दिला. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) स्थापनेवेळी धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि पुरोगामी विचार कुठे होता? असा सवाल सुद्धा अजित पवारांनी केला.

खरं तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, अल्पसंख्याक, दलित आणि धर्मनिरपेक्ष मतदारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओळखला जात होता, मात्र अजित पवारांनी आता अधिक उजव्या विचारसरणीच्या पक्षांशी युती (Ajit Pawar On Ideology) केली आहे, ज्यामुळे काही निरीक्षकांनी पक्षाच्या वैचारिक सातत्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याबाबत विचारलं असताना अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा दाखला दिला. 2014 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पॅथीमबा दिला होता, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार बाहेरून पाठिंब्यामुळेच स्थापन झाले असं अजित पवारांनी म्हंटल.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न केला असता अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा असेल, पण चेहरा ठरवणे ही सध्याची प्राथमिकता नाही असं अजित पवारांनी म्हंटल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप हे गुणवत्तेच्या आधारावर होईल, ज्याठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या पक्षाला जागा सुटेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करेल अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.