Monday, December 22, 2025
Home Blog Page 485

Punjab And Sind Bank Bharti 2024 | पंजाब आणि सिंध बँकेत अधिकारी पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

Punjab And Sind Bank Bharti 2024

Punjab And Sind Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणारे विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळते. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीचे संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पंजाब आणि सिंध बँके अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात उशीर न करता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव |Punjab And Sind Bank Bharti 2024

विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV)

वयोमर्यादा

20 ते 40 या दरम्यान वय असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज भरू शकतात.

अर्जशुल्क

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी 850 रुपये अर्ज भरावी लागेल. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Punjab And Sind Bank Bharti 2024

15 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त जागा

या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या 213 रिक्त जागा आहेत.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Electric Scooter Safety Features | बाजारात आलीये सेन्सर असलेली इलेक्ट्रिक स्कूटर, अपघातापूर्वी मिळणार अलर्ट

Electric Scooter Safety Features

Electric Scooter Safety Features | गाडी ही प्रत्येकासाठी खूप फायद्याची असते. आणि तरुणांसाठी गाडी म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. चाकाचा शोध लागल्यानंतरच दळणवळणाच्या सोयी खूप जलद गतीने झाल्या आहेत. आज काल प्रत्येक लोक गाडीचा वापर करतो. प्रत्येक घरात एक तरी गाडी असते. परंतु ही गाडी आपण वापरताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. जर गाडीमध्ये काही बिघड असेल किंवा रस्ता खराब असेल, तर इत्यादी आणि कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यासाठी कंपनी त्यांच्या वाहनांना वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षा वैशिष्ट्ये जोडत असतात. जेणेकरून त्यांना त्यांच्या ग्राहकांची सुरक्षितता जपता येईल. अशातच आता सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची जास्त प्रमाणात भर पडली आहे. अनेक इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter Safety Features) सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आता अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटरची आपण माहिती जाणून घेणार आहोत.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये | Electric Scooter Safety Features

एथर एनर्जीने आपल्या स्कूटरमध्ये सुरक्षा वैशिष्ट्य समाविष्ट केले आहे, जे वाहनाला निसरड्या पृष्ठभागावर पडण्यापासून वाचवू शकते. यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्याने वाहनात ARAS (Advanced Rider Assistance System) बसवले आहे. स्कूटरमधील ही नवीन प्रणाली रायडरची सुरक्षा वाढवणारी आहे.

ARAS-A सुरक्षा वैशिष्ट्य काय आहे?

Ather म्हणतात की ARAS मध्ये स्किड कंट्रोल आणि फॉल सेफ फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. याच्या स्किड कंट्रोल फीचरबद्दल सांगायचे तर, यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल बसवण्यात आले आहे जे मोटरला दिलेला टॉर्क नियंत्रित करते. हे वैशिष्ट्य स्कूटरचा वेग आपोआप ट्रॅक करेल आणि कमी करेल जेव्हा चाकाचे कर्षण गमावले आहे. रस्त्यासोबत चाकाचा तोल गेला तर स्कूटरचा वेग आपोआप कमी होईल.

हे वैशिष्ट्य ज्या ठिकाणी जास्त निसरडे भाग आहेत, जसे की रस्त्यावरील पाणी साचलेल्या भागात, खडकाळ रस्त्यावर किंवा वाळूवर असलेल्या ठिकाणी लोकांना मदत करू शकते. कंपनीने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीलाच स्कूटरमध्ये या नवीन सेफ्टी फीचरची चाचणी घेण्यात आली आहे.

फॉल सेफ वैशिष्ट्य कसे कार्य करेल? | Electric Scooter Safety Features

त्याच वेळी, फॉल सेफ वैशिष्ट्य देखील लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या फीचरद्वारे, स्कूटरला वाहन घसरणार असल्याचे समजताच, हे वैशिष्ट्य कार्यान्वित होते आणि चाकांची शक्ती परत घेते. यामुळे वाहन लांब अंतरापर्यंत ओढण्यापासून वाचू शकते.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2000 रुपये देऊ; काँग्रेस अध्यक्षांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana Mallikarjun Kharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या योजनेला मतदानावर फरक पडू नये यासाठी विरोधकांनी सुद्धा आम्ही सत्तेत आल्यास या १५०० रुपयांमध्ये आणखी वाढ करू असं म्हंटल होतं. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणांना २००० रुपये देऊ असं खर्गे यांनी म्हंटल आहे.

2 हजार रुपये देणार – Ladki Bahin Yojana

दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आज मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत आले आहेत. यावेळी आपल्या भाषणात राहुल गांधी यांच्या समोरच खर्गे यांनी हि घोषणा केली. आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, ⁠मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश आम्ही जिंकू आणि भाजपच सरकार जाईल असा विश्वास सुद्धा खर्गे यांनी व्यक्त केला.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ तुकडे केले, दोन्ही पक्ष फोडण्यात आलेत त्यावरूनही मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधकांवर टीका केली. खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे आणि खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे असं खर्गे यांनी म्हंटल. मोदींनी छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला हात लावला तो पडला, ⁠राम मंदीराला हात लावला ते मंदिर तिकडे गळत आहे, मोदींनी गुजराच्या पुलाचं उद्घाटन केल आणि तो पुल पडला, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात मोदींवर निशाणा साधला. राज्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. त्यानंतर मोदींनी माफी मागितली. परंतु पंतप्रधानांनी कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण शिवरायांच्या मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून मोदींनी माफी मागितली, असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

BSNL साठी सरकारने केला TATA सोबत करार; 4G नेटवर्कला येणार गती

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएल या कंपनीकडे मिळालेले आहेत. बीएसएनएल (BSNL) ही एक सरकारी कंपनी आहे. आणि या सरकारी कंपनीचे जाळे सर्वत्र पसरवण्यासाठी सरकार देखील विविध प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आता बीएसएनएलसाठी (BSNL) वेगळ्या गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधत आहेत. तसेच त्यांनी यासाठी 6 हजार कोटींचा अतिरिक्त निधी आणण्याची देखील योजना केलेली आहे. सध्या इतर सगळ्या कंपन्यांनी 4G नेटवर्क लॉन्च केलेले आहेत. परंतु बीएसएनएलने अजूनही 4G नेटवर्क लॉन्च केलेले नाही. आणि याच कारणामुळे त्यांचे अनेक ग्राहक कमी देखील होत आहे. आता त्यांच्या ग्राहकांची कमी होणारी संख्या पाहता सरकारने गुंतवणूक करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला.

लोकल स्टॅकचा वापर केला आहे. त्यामुळे या निधीच्या मदतीने 4G नेटवर्क आता लवकर सुरू होण्यास देखील मदत होणार आहे. दूरसंचार विभाग आता ही फाईल कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. मागील वर्षी बीएसएनएलला या 4G नेटवर्कसाठी 19000 कोटी मोजावी लागले होते. यासह 1 लाख 4 जी साईटचे काम पूर्ण झाले आहे. अशातच आता टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी (TATA) सर्विसेस आणि आयटीआय कडून बीएसएनएलसाठी अनेक उपकरणे देखील तयार केली जात आहेत. आणि यासाठी या दोन्ही कंपन्यांना सरकारकडून 13000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. अजूनही सरकारकडे या कंपन्यांचे सहा हजार कोटी रुपये थकबाकी आहे. सरकारने आतापर्यंत bsnl साठी 3.22 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. परंतु आता यातून नक्की काय फायदा होणार आहे? हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

मागील वर्षी BSNL कंपनीने आयटी कंपनी टीसीएस आणि सरकार दूरसंच संशोधन संस्था सीडी चे नेतृत्वाखाली पंजाबमध्ये फोरजी सेवा सुरू केली आणि याद्वारे आठ लाख ग्राहक जोडले गेले होते. त्यानंतर बीएसएनएलचे नेटवर्क संपूर्ण पंजाबमध्ये सुरळीत चालू झालेले आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. बीएसएनएल लवकरच त्यांचे 4 जी आणि 5 जी सेवा त्यांच्या ग्राहकासाठी लवकरच लॉन्च करणार आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या (BSNL) सेवेत देखील सुधारणा होणार आहे. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील पूर्वीपेक्षा चांगली असते, असे सांगितले जात आहे.

Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा: मंत्रिमंडळ बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय

Maharashtra Cabinet Meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार कडून १० मोठे निर्णय घेण्यात आलेत. अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणे असो किंवा औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते, शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले – Maharashtra Cabinet Meeting

पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देणार
अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार


औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय स्थापन करणार
हिंगोलीत स्वतंत्र न्यायिक जिल्हा स्थापन करणार

Jio Recharge Plans | रिलायन्स जिओच्या वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर; जाणून घ्या नवे रिचार्ज प्लॅन्स

Jio Recharge Plans

Jio Recharge Plans | रिलायन्स जिओ या कंपनीने त्यांच्या रिचार्जच्या दरात जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली होती. त्यामुळे त्यांच्या अनेक ग्राहक नाराज झालेले होते. परंतु अशातच रिलायन्स जिओनने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. यावर्षी रिलायन्स जिओचा आठवा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या निमित्त त्यांनी जिओच्या (Jio Recharge Plans) युजरसाठी एक खास ऑफर आणलेली आहे. ही ऑफर ग्राहकांना खास प्लॅनवर मिळणार आहे. या ऑफरनुसार आता ग्राहकांना 899, 999 रुपयांच्या तीमाही आणि 3599 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर तब्बल 700 रुपयांचा फायदा होणार आहे. ही ऑफर 10 सप्टेंबर पर्यंतच मिळणार आहे. आता या ऑफरमध्ये नक्की कोणते फायदे मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊया.

ऑफरवर कोणते फायदे मिळणार | Jio Recharge Plans

रिलायन्स जिओच्या या ऑफरमध्ये तुम्हाला 175 रुपयांच्या 10 ओटीटी प्लॅन ॲप्स 28 दिवसांची असेल.
त्याचप्रमाणे या प्लॅनवर झोमॅटोच्या ग्राहकांना तीन महिन्यांचा गोल्ड सबस्क्रीप्शन देखील फ्री मध्ये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिओ कडून 2999 पेक्षा जास्त खरेदी केली तर त्या ग्राहकांना 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. या ऑफरचा फायदा केवळ 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या काळातच मिळणार आहे

899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सह 100 SMS मिळणार आहे. तसेच ग्राहकांना 2 जीबी डेटा आणि 20 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडच्या ॲक्सेस देखील मिळणार आहे.

999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

999 रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन 98 दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सह दररोज 100 एसएमएस फ्री मिळणार आहे. तसेच दररोज दोन जीबी डेटा फ्रीमध्ये मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचा ऍक्सेस मिळणार आहे.

3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | Jio Recharge Plans

जिओचा हा 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सह 100 एसएमएस फ्री मिळणार आहे. तसेच ग्राहकांना दररोज 2.5 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. तसेच तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा ॲक्सिस मिळणार आहे.

कृषी स्टार्टअपला सरकारकडून प्रोत्साहन; मंजूर केला 750 कोटींचा निधी

Agriculture startup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे.देशात अनेक लोक हे शेती करत असतात त्यामुळे सरकार देखील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात. तसेच शेती व्यवसायात प्रगती व्हावी. यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा, यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. अशातच आता सरकारकडून शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि या निर्णयासाठी सरकारने तब्बल 750 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध केलेला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे. आता कृषी स्टार्टअपला मदत करण्यासाठी कृषी फंड देखील सुरू करण्यात आलेला आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कृषी स्टार्टअप प्रोत्साहन देण्यासाठी 750 कोटी रुपयांचा ॲग्री शहर निधी स्थापन केलेला आहे. ॲग्रोटेक स्टार्टअपला मदत करणार आहे. सरकारने 14000 कोटी रुपयांच्या सात कृषी योजनांना मंजुरी दिलेली आहे. यासाठी आता खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न देखील चालू आहे. हा 750 कोटी रुपयांचा ऍग्रीशसुअर फंड स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना इक्विटी आणि कर्ज भांडवल प्रधान करणार.

कृषीमंत्र्यांनी या स्टेटसला निधीचा वापर करण्यास सांगितलेले आहे. ॲग्रीसाठी निधीची कमतरता भासणार नाही. असे देखील आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढे शेतीमध्ये केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी गुंतवणुकीची देखील गरज आहे. तसेच कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची देखील गरज असल्याचे त्यांनी सांगितलेले.

मोठ्या प्रमाणात शेती करायची असेल, तर लहान शेतकऱ्यांचे गट तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. असे देखील कृषिमंत्र्यांनी सांगितलेले आहे. तसेच रासायनिक कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतो. हे देखील त्यांनी सांगितलेले आहे तसेच मातीचे आरोग्य जपले पाहिजे. आपल्या मातीचा पोत खराब होऊ नये. असे देखील कृषीमंत्र्यांनी सांगितलेले आहे तसेच कृषी गुंतवणूक पोर्टलचे महत्व त्यांनी सांगितलेले आहे.

37 लाख रेल्वे कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! ‘हे’ कार्ड दाखवा आणि थेट AIIMS, PGI मध्ये उपचार घ्या

भारतीय रेल्वेने आपले कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी आरोग्य सेवा धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. रेल्वे आता सर्व कर्मचारी, त्यांचे अवलंबित आणि पेन्शनधारकांना युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन (UMID) कार्ड जारी करणार आहे , ज्याद्वारे ते रेल्वेच्या पॅनेलमधील रुग्णालये आणि देशातील सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये मोफत उपचार घेऊ शकणार आहेत. हे कार्ड 100 रुपयांमध्ये बनवले जाईल. या नवीन व्यवस्थेचा फायदा सुमारे 12.5 लाख रेल्वे कर्मचारी, 15 लाखांहून अधिक पेन्शनधारक आणि सुमारे 10 लाख आश्रितांना होणार आहे.

25 AIIMS सारख्या राष्ट्रीय संस्थांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर त्यांच्या आवडत्या रुग्णालयांना रेफरल देतात, असा आरोप कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार आता रेफरलशिवाय उपचार शक्य होणार आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडथळ्याविना वैद्यकीय सुविधा मिळणार असून डॉक्टरांच्या रेफरलबाबतच्या तक्रारीही दूर होणार आहेत. PGIMER चंदीगड, JIPMER पुद्दुचेरी, NIMHANS बेंगळुरू आणि देशातील 25 AIIMS सारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये उपचारांसाठी रेफरलची आवश्यकता नाही. या संस्थांमध्ये केवळ उपचारच नाही तर अत्यावश्यक औषधेही दिली जाणार आहेत.

कोणाला घेता येणार लाभ ?

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (परिवर्तन) प्रणव कुमार मलिक यांनी सोमवारी युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन (UMID) कार्ड जारी करण्याचे आदेश दिले. हा निर्णय तात्काळ लागू झाला आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (HMIS) द्वारे UMID कार्ड डिजीलॉकरमध्ये संग्रहित केले जाईल. कर्मचारी-पेन्शनधारकांच्या प्रोफाइलवरही हे उपलब्ध असेल.

या कार्डद्वारे कर्मचारी, पेन्शनधारक किंवा अवलंबितांना रेल्वेच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही हॉस्पिटल किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचार घेता येणार आहेत. हे कार्ड आपत्कालीन किंवा सामान्य उपचारांसाठी वापरले जाऊ शकते. जर कोणाकडे UMID कार्ड नसेल तर त्यांचा UMID क्रमांक देखील उपचारासाठी वैध असेल. विशेष परिस्थितीत, ठराविक रुग्णालयांना रेफरल जारी केले जातील, जे 30 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतील.

Alcohol Export : भारतीय दारूला परदेशात मागणी; निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन काय?

Alcohol Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol Export) जगात मोठी मागणी आहे. भारतीय मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोल ड्रिंकला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानुसार, येत्या काही वर्षात आपली निर्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8,000 कोटी रुपये) पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.

2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मद्यविक्री होईल – Alcohol Export

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत, प्रमुख परदेशी डेस्टिनेशन मध्ये भारतीय मद्याची निर्यात वाढविण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. याबाबत APEDA ने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील काही वर्षांत निर्यात महसूल एक अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. 2023-24 मध्ये देशातुन 2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त मद्यविक्री होईल. भारतातून अरब इमिरात, नेदरलँड्स, केनिया, सिंगापूर, टांझानिया, अंगोला, रवांडा यांसारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त मद्य निर्यात (Alcohol Export) केली गेली. एपीईडीएने सांगितले की, डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड) ब्रिटनमध्ये गोदावन सुरू करण्यास तयार आहे. ही राजस्थानमध्ये बनवलेली सिंगल-माल्ट व्हिस्की आहे.

इंडियन ब्रेव्हर्स असोसिएशनचे महासंचालक विनोद गिरी म्हणाले की, या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. उच्च-गुणवत्तेची व्हिस्की उत्पादक म्हणून भारताची प्रतिष्ठा निर्माण करण्यात सिंगल-माल्ट व्हिस्की मोठी भूमिका बजावेल, परंतु प्रीमियम इंडियन व्हिस्कीसारख्या चव आणि किमतीच्या दृष्टीने अधिक रुचकर असलेल्या पेयांना अधिक मागणी असेल अशी अपेक्षा आहे. अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमध्ये निर्यातीची प्रचंड क्षमता आहे. राज्य उत्पादन शुल्क धोरणांमध्ये निर्यात प्रोत्साहनांचा समावेश करण्यासाठी राज्यांना आग्रह करण्याची सूचना त्यांनी सरकारला केली.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री; या पक्षाचा सदस्य झाला

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजकारणात प्रवेश केला आहे. जडेजा आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जडेजाची पत्नी जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. आता जडेजा सुद्धा भाजपचा सदस्य झाल्याने दोघेही भाजपसाठी काम करताना पाहायला मिळू शकतात. जडेजाने अलीकडेच t20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

रिवाबाने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जडेजाच्या (Ravindra Jadeja) भाजप प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. त्याचा फोटो सुद्धा तिने ट्विट केला आहे. रवींद्र जडेजा अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. दोघांनी मिळून गुजरात मध्ये अनेक रोड शो देखील केले आहेत. आता जडेजा भाजपाच सदस्य झाल्याने पक्षासाठी दोघेंही आणखी वेळ देतील असं वाटतंय. तसेच जडेजाची एकूण लोकप्रियता बघता गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी जडेजा फक्त भाजपचा सदस्य झाला आहे, आता आगामी काळात त्याच्यावर पक्षाकडून कोणती नवीन जबाबदारी सोपवण्यात येतेय का ते सुद्धा पाहायला हवं.

कशी आहे जडेजाची कारकीर्द– Ravindra Jadeja

रवींद्र जडेजा हा भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी आणि लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाजी करणारा जडेजा मागील १५ वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. जडेजाने भारतासाठी आत्तापर्यंत ७२ कसोटी, १९७ वनडे आणि ७४ t20 सामने खेळले आहेत. याशिवाय २४० आयपीएल सामन्यात सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलं आहे. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो आपल्याला राजकीय आखाड्यात दिसू शकेल.