Monday, December 22, 2025
Home Blog Page 487

Brain Cancer | बाप रे ! मोबाईलमुळे होतो मेंदूचा कर्करोग? WHO ने जारी केला रिपोर्ट

Brain Cancer

Brain Cancer | मोबाईल फोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण मोबाईलचा वापर करतात. क्षणोक्षणाला आपल्याला मोबाईलची गरज पडते. त्यामुळे सगळेजण केव्हाही पाहिले तरी मोबाईलच घेऊन बसलेले असतात. बसमध्ये, बस स्थानकावर कुठेही पाहिले तरी, लोक मोबाईल घेऊनच असतात. परंतु आता एक असे संशोधन समोर आले आहे. ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तो म्हणजे मोबाईलच्या अतिवापरामुळे आता मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोबाईलच्या आपल्या जीवनावर किती दुष्परिणाम होतात. हे आपण वारंवार ऐकतच असतो आता जागतिक आरोग्य संघटनेने एका अभ्यासातून याबाबत एक मोठी गोष्ट समोर आणलेली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने एक अभ्यासात अभ्यास केला आणि त्या अभ्यासात असे सांगितले आहे की, मेंदूच्या कर्करोग (Brain Cancer) आणि मोबाईल फोनचा सध्या तरी थेट संबंध येत नाही. परंतु या अभ्यासामध्ये विविध गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यानुसार असे समोर आले आहे की, सध्या वायरलेस तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण मेंदूच्या कर्करोगांच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतु कर्करोगासारखा परिणाम अशा लोकांना होऊ शकतो. जे एका दशकापेक्षा जास्त काळ मोबाईल फोन कॉल करतात. आणि मोबाईल फोन वापरतात. यामध्ये 1994 ते 1922 यादरम्यान 63 अभ्यासाचा समावेश केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने जो अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये मोबाईल फोन, टीव्ही, मॉनिटर, रेडियो फ्रिक्वेन्सी परिणामांचे मूल्यमापन दाखल केले. यावेळी असे म्हणतात की, कोणत्याही प्रमुख प्रश्नांमध्ये सध्या तरी जोखीम वाढलेली नाही. यात प्रौढ तसेच मुलांमध्ये मेंदूचा कर्करोग, लाळ ग्रंथी, लुकेमिया यांच्या कर्करोगात सह मोबाईल फोन वापर यांचे मूल्यांकन केले गेले.

दुष्परिणामांचे पुरावे नाही | Brain Cancer

मोबाईल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. याची तपासणी संशोधकांनी केलेली आहे की, मोबाईल मधून उत्सर्जित होणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन हे कर्करोगास कारणीभूत ठरतात. परंतु यामध्ये आधी संशोधनाची गरज आहे. परंतु मोबाईल फोन वापरणाऱ्यांना मेंदूच्या कर्करोगाचा जास्त धोका नसतो. यामध्ये कर्करोगाच्या इतर प्रकार स्वतंत्रपणे नोंदवले जातात. मोबाईल फोन आपल्याला रेडिएशनचे दुष्परिणामांचे ठोस पुरावे नाही. परंतु यासाठी आणखी संशोधन करणे खूप गरजेचे असते.

मोबाईल फोन सुरक्षितपणे कसा वापरायचा ?

  • तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा.
  • फोनवर बोलताना तुमचा फोन कानाजवळ धरण्याऐवजी स्पीकर हेडसेट किंवा हँड्स वापरा.
  • शक्यतो कॉल करण्याऐवजी मेसेज किंवा whatsapp करा.
  • नेहमी असाच मोबाईल फोन खरेदी करा ज्यातून कमीत कमी रेडिएशन मिळतात.
  • झोपताना फोन तुमच्या शरीरापासून दूर ठेवा.

ST कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ

ST Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ दिवसांपासून सुरु असलेला ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघाला. ST कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना गणेशोत्सवापूर्वी काहीसा दिलासा मिळाला आहे. (ST employees’ strike called off)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचे मान्य केलं आहे. तसेच ज्यांना कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त करत आपला संप मागे घेतला आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांसंवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आमची मागणी होती की, राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतननुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतम मिळावं. किमान त्यांच्या लेव्हलला घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे असं पडळकर म्हणाले.

Southern Railway Bharti 2024 | दक्षिण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आजपर्यंत यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्यांना चांगल्या पदावर नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या अंतर्गत तुम्हाला एका चांगल्या पदावर नोकरी मिळणार आहे. ती म्हणजे आता दक्षिण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती स्पोर्ट्स पर्सन या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 67 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. आम्ही तुम्हाला एक लिंक देणार आहोत. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता. 6 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | Southern Railway Bharti 2024

दक्षिण रेल्वे या भरती अंतर्गत स्पोर्ट्स पर्सन या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

स्पोर्ट्स पर्सन या पदाच्या एकूण 67 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क आहे. त्याचप्रमाणे मागासवर्ग अपंग विद्यार्थ्यांना 250 रुपये एवढे अर्ज शुल्क आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख

7 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

6 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त जागा

  • स्पोर्ट्स पर्सन लेवल 1 – 46 जागा
  • स्पोर्ट्स पर्सन लेवल 2 आणि 3 – 16 जागा
  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल 4 आणि 5 – 5 जागा

वेतनश्रेणी

  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल – 1 : 18000 रुपये
  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल 2 : 19 हजार 900 रुपये
  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल 3 : 21 हजार 700 रुपये
  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल 4 : 25 हजार 500 रुपये
  • स्पोर्ट्स पर्सन लेव्हल 5 : 29 हजार 200 रुपये.

अर्ज कसा करावा ? | Southern Railway Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 6 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महिला अत्याचाराबाबत NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर; दिवसाला होतात 116 महिलांवर अत्याचार

Rape Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. महिलांच्या बाबत अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आजकाल गुन्हेगारी पेक्षा महिलांचा छळ करण्याची वृत्ती वाढताना दिसत आहे. अशातच आता नॅशनल क्राइम रेकॉर्डिंग राज्यामध्ये महिलांच्या अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दर दिवसाला जवळपास 116 महिलांवर अत्याचार होत आहे. महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकार सत्तेत असल्यापासून महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आता कोणत्याही सरकार असल्यास महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.

2019 सालापासून महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते. तेव्हापासून दररोज महिला होण्याच्या घटना वाढत चाललेले आहे. यामध्ये दिवसाला सरासरी 126 घटना घडतात. कोरोना काळामध्ये म्हणजेच 2021 साली राज्यात दिवसाला जवळपास 109 महिला अत्याचाराच्या घटना दिसत होत्या. त्यानंतर 2022 पर्यंत ही संख्या 120 घटनांवर गेली . अठरा वर्षावरील जास्त वय असणाऱ्या मुलींना यामध्ये त्रास होत आहे. 2022 मध्ये 1317 महिला अत्याचाराच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. 2023 मध्ये 12208 गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच 2022 मध्ये महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या ही 116 होती. तर 2023 मध्ये ही संख्या 79 एवढी झाली या गुन्ह्यांमधील आरोपींना पोलिसांकडून अटक केले जाते. तसेच त्यांच्यावर कारवाई होते. परंतु महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

2020 मध्ये राज्यात 31 हजार 701 महिलांवर अत्याचार झाले. म्हणजेच दिवसाला जवळपास 88 घटना घडल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे 2021 मध्ये राज्यात जवळपास 39 हजार 266 महिलांवर अत्याचार झाले. यामध्ये दिवसाला जवळपास 109 घटना घडत असल्याची माहिती समोर आलेली आहे. 2022 मध्ये राज्यात 22843 महिलावर अत्याचार होतो. म्हणजे दिवसाला सरासरी 126 घटना घडत होत्या.

तसेच 2022 जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या काळामध्ये जवळपास 20830 घटना घडलेल्या आहेत. तसेच 2023 मध्ये देखील एवढी सरासरी मानली जात आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये 2021 पासून वाढ झालेली आहे. त्यानंतर ही वाढ असूनही कायम आहे. आपण एका प्रगतशील राज्यात राहतो. या ठिकाणी प्रत्येक युवकाला साक्षर आणि रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. तसेच वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. परंतु आजही कुठेतरी महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपले सरकार हे असमर्थ ठरत असल्याचे चित्र समोर दिसत आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिनने रचला इतिहास; गोळा फेकमध्ये भारताला 40 वर्षांनंतर पदक

Paralympics 2024 Sachin Khilare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिन खिलारीने गोळाफेक मध्ये शॉटपुट F46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे 21 वे पदक असून तब्बल 40 वर्षांनंतर भारताला गोळा फेकमध्ये पदक मिळालेलं आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते. सचिनने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या 0.06 मीटरने हुकले. सचिनने दुसऱ्या प्रयत्नातच 16.32 मीटर फेक केली होती. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

शॉटपुट फायनलमध्ये सचिनचा पहिला प्रयत्न 14.72 मीटर, दुसरा प्रयत्न 16.32 मीटर, तिसरा प्रयत्न 16.15 मीटर, चौथा प्रयत्न 16.31 मीटर, पाचवा प्रयत्न 16.03 मीटर आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता. त्याने 16.32 मीटर फेक करून क्षेत्रविक्रमही केला. या स्पर्धेत एकूण तीन भारतीय सहभागी झाले होते. त्यातील मोहम्मद यासर आणि रोहित कुमार यांना व्यासपीठ पूर्ण करता आले नाही. त्यांनी अनुक्रमे 14.21 मीटर आणि 14.10 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 8 वे आणि 9 वे स्थान पटकावले.

पॅरालिम्पिकच्या इतिहासात शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.

दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत आता पदतालिकेत 21 पदकांसह 19व्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्णपदक, 8 रौप्यपदक आणि 10 कांस्यपदक जिंकली आहेत. मागील पॅरालिम्पिक स्पर्धेत 19 पदके जिंकली होती, त्यामुळे यंदा भारताने गतवेळी पेक्षा चांगली कामगिरी केली आहे असं म्हणता येईल.

Indian Railways | रेल्वेने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणली आरोग्य योजना; संपूर्ण कुटुंबाला मिळणार मोफत उपचार

Indian Railways

Indian Railways | आपल्या भारतात रेल्वेची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेचे जाळे हे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. रेल्वेचा (Indian Railways) प्रवास हा आरामदायी असतो तसेच कमी खर्चात देखील असतो. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या चांगल्या सुविधेसाठी सेमी हाय स्पीड गाड्यांपासून ते आधुनिक रेल्वे स्थानकापर्यंत विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.अशातच आता रेल्वेने नागरिकांच्या आरोग्य सेवा धोरणामध्ये देखील एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार कर्मचारी त्यांचे निवृत्तीवेतनधारकांसाठी रेल्वेकडून युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन नावाचे कार्ड केले जारी केले जाणार आहे. या कार्डद्वारे आता रेल्वेमध्ये रेल्वेने ज्या रुग्णालयाची यादी तयार केली आहे. त्या सर्व रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळणार आहे.

37 लाख लोकांना मिळणार सुविधा | Indian Railways

कर्मचारी आणि पेन्शन धारकांनी या आधी विनंती केली होती. आणि त्या विनंतीनुसारच आता हे कार्ड जारी करण्यात आलेले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेने कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही सुविधा दिल्यानंतर जवळपास 12.5 लाख कर्मचाऱ्यांना आणि 15 लाखापेक्षा अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा मिळणार आहे. रेल्वेचा हा आदेश रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक ट्रान्सफॉर्मेशन प्रणव कुमार मलिक यांनी जाहीर केलेला आहे.

यासंदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाला सूचना देण्यात आल्या होत्या. रेफरलबाबत रेल्वेकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. डॉक्टर त्यांच्या आवडत्या रुग्णालयाच्या नावाने रेफरल देत असल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे. रूग्ण इच्छुक असलेल्या हॉस्पिटलमध्ये रेफर करताना समस्या होत्या. नवीन प्रणालीमुळे हे पूर्णपणे थांबेल अशी अपेक्षा आहे.

मेडिकल कार्ड डिजीलॉकरमध्ये ठेवले जाईल

हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (HMIS) द्वारे रेल्वे कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या विनंतीनंतर कार्ड मिळेल. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डिजीलॉकरमध्ये ते ठेवले जाईल. हे कार्ड एचएमआयएस ॲपवर संबंधित कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या प्रोफाइलवर उपलब्ध असेल. कार्डद्वारे, कोणत्याही रुग्णालयात आणि रेल्वे पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व एम्समध्ये उपचार दिले जाऊ शकतात. आता यासाठी कोणत्याही प्रकारच्या रेफरलची गरज भासणार नाही.

कार्ड नसले तरी उपचार मिळतील | Indian Railways

रेल्वेने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना यूएमआयडी कार्ड दिलेले नसले तरीही त्यांना उपचार नाकारले जाणार नाहीत. संबंधित रुग्णालय किंवा रुग्णालयाशी संपर्क साधल्यास, त्यांच्या माहितीवर आधारित UMID क्रमांक आधीच तयार केला जाईल. यामुळे त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. युनिक कार्डमधील उर्वरित माहितीची पडताळणी केल्यानंतर, ती HMIS डेटाबेसमध्ये प्रविष्ट केली जाईल. याशिवाय 25 AIIMS, PGI चंदीगड, JIPMER पुद्दुचेरी, NIMHANS बेंगळुरू येथील OPD आणि IPD मध्ये मोफत उपचार सुविधा उपलब्ध असेल.

Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची विरोधकांची रणनीती?

mahavikas aghadi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत. राज्यातील शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शिवरायांची माफी मागितली आहे. शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, . तसेच राजकोट येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही केली. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर सरकार म्हणून जे जे करणे आवश्यक होते ते ते सरकारने केले आहे. मात्र विरोधक अजूनही हा मुद्दा उचलून धरत असून या मुद्द्याच्या आधारावर महाराष्ट्रातच काहीतरी वेगळं करण्याचा विरोधकांचा डाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे.

विरोधकांनी विरोध करणे हे लोकशाहीमध्ये मान्य आहेच, पण या घटनेचा अवास्तव बाऊ करून विरोधक राज्यातील राजकारण आणि समाजकारणाला जो जातीय रंग देत आहेत तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी विरोधकांनी जी पातळी गाठली आहे तिला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली हे ठीक आहे. मात्र दुसरीकडे संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने शिवप्रेमींच्या भावना भडकवल्या जात आहेत.

खरं तर राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर यापैकी एकही नेता या शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दर्शनासाठी गेलेला नव्हता. मात्र महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हे नेतेमंडळी जागी झाली आणि राजकोटकडे गेले, तिथेही राणे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये राडा झालाच. राजकोट किल्ल्यावर पक्षाचे मशाल असलेले झेंडे फडकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीवर विरोधकांच्या आततायी वृत्तीमुळे राजकारणाचा फड रंगला, असे सिंधुदुर्ग वासियांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राला विवेकशील, बुद्धिमान आणि दूरदर्शी विरोधी पक्ष नेत्यांची उज्वल परंपरा आहे. मुद्द्यावर बोलून लोकशाही मार्गाने सरकारला स्लो कि पळो कडून सोडणारे विरोधक आपण याच महाराष्ट्रात बघितले आहेत. मात्र आज विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी या उज्वल परंपरेला कलंक लावला आहे. राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये राजकोटवर जो काही राडा सुरु होता त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली परंतु त्यात सरकार वर टीका करण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही मुद्दा नव्हता. तसेच त्यांच्या पत्रकार परिषदेला सपशेल जातीय रंग दिसून येत होता, अशी भावना ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

विरोधकांकडून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना टार्गेट केलं जात आहे. आजपर्यंत कोणत्याही विरोधी नेत्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचा जातीय उल्लेख कधीही केला नव्हता. मात्र “पेशव्यांचे वंशज” अशा शब्दात विरोधकांकडून फडणवीसांची हेटाळणी देखील करण्यात आली. फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी अन्य कोणताही मुद्दा नसल्याने त्यांची जात काढली जात असल्याचे दिसून आले. शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून जे काही राज्यात घडतंय ते पाहता शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर होण्याची केलेली भाषा पुनः एकदा चर्चेत येत आहे. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी भावना पुण्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना गोळा करून स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्राची आज जी काही ओळख आहे ती छत्रपती शिवरायांच्या सर्व समावेशक धोरणामुळे. मात्र त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या विरोधकांनी विद्वेषाची आणि जातीय राजकारणाची बीजे महाराष्ट्रात रोवली आहेत असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

सुकन्या समृद्धी, PPF सह सरकारच्या इतर बचत योजनांचे बदलणार नियम; जाणून घ्या सविस्तर

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होत आहे. सरकारच्या माध्यमातून अल्पबचत योजना देखील सुरू आहेत. त्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना आहेत. त्यात अनेक नागरिक गुंतवणूक करत असतात. आता सुकन्या समृद्धी योजना तसेच यासोबत इतर काही ज्या लहान मोठ्या योजना आहेत. त्याच्याबाबत काही नियम बदललेले आहेत. आणि सरकारकडून याबाबत परिपत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे. या योजनांमध्ये जे काही बदल होणार आहेत. ते सरकारने जाहीर केलेले आहेत. या अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, एमपीएस, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस, किसान विकास पत्र, भविष्य निर्वाह निधी योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ समावेश आहे. ज्याचा लाभ नागरिकांना होत असतो. आता या योजनेबाबत 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

सरकारने या योजनेसाठी श्रेणी निश्चित केलेल्या आहेत. यामध्ये विसंगत एनएसएस खाती अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेली पीपीएफ खाती तसेच एनआरआर एक्सटेंडेड तसेच पालकांसह आजी आजोबांनी उघडलेली सुकन्या समृद्धी योजनेतील खाती यांचा समावेश आहे. आता यात कोणते बदल होणार आहेत हे आपण जा.

सुकन्या समृद्धी योजनेचे नियम

जर कोणत्याही मुलीच्या नावाने आजी आजोबा किंवा कायदेशीर पालकांशिवाय इतर कुणी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले असेल, तर त्याचे पालकत्व चेक केले जाईल. मुलाच्या पालकाची बदली कायदेशीर पालकांकडे केली जाईल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत केवळ एकाच मुलीचे खाते उघडता येते. परंतु पडताळणी नंतर जर एकाच कुटुंबातील दोन मुलींचे खाते उघडले असेल, तर एसएस वाय 2019 च्या परिच्छेद 3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमची खाती बंद केली जाईल.

पीपीएफ संबंधित नियम

पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटवर मॅच्युरिटीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच 18 वर्षेपर्यंत व्याज तर मिळेल. यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा नुसार देखील तुम्हाला या व्याज मिळू शकते. अनेक लोक हे भारतातील रहिवासी नसूनही भारतातील रहिवासी असल्याचे सांगून पीपीएफ खाते ओपन करतात. तोपर्यंत अशावेळी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदराचा लाभ होणार आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल जे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताचे अनिवासी असतील. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असतील, तर तुमच्या पहिल्या खात्यावरच तुम्हाला व्याज दिले जाईल. आणि इतर सर्व खादी पहिल्या खात्यामध्ये विलीन केली जातील आणि त्या रकमेवर एकूण व्याज तुम्हाला दिले जाईल.

कोल्हापूरची रिल्स स्टार मानसी सुरवसेच्या Insta पोस्टने खळबळ; म्हणाली, मी चुकीचे पाऊल…

mansi survase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठमोळी रिल्स स्टार मानसी सुरवसेच्या (Mansi Survase) इन्स्टा पोस्टने खळबळ उडाली आहे. मोहित जाटच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मानसीने सुद्धा आत्महत्या करण्याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. मला माहित आहे कि मी चुकीचे पाऊल उचलत आहे मात्र माझ्याकडे पर्याय नाही असं मानसीने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे. जे झाले ते विसरून पुढे जाण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही असं मानसी सुरवसे हिने म्हंटल आहे. मानसीच्या या पोस्ट नंतर तिच्या चाहत्यांनी असं चुकीचे पाऊल उचलू नको अशी विनंती केली आहे. नंतर काही वेळातच तिने आपली पोस्ट डिलीट केली आहे.

काय आहे मानसीची इन्स्टा पोस्ट –

मला समजत आहे की मी चुकीचे पाऊल उचलत आहे.. पण माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. मी हे सर्व लिहित आहे कारण का आणि काय झाले हे सर्वांना माहीत आहे. मी माझ्या आई, बाबा आणि भावावर खूप प्रेम करते आणि मी मोहित आणि त्याच्या कुटुंबावर देखील प्रेम करते . पण जे झाले ते विसरून पुढे जाण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. जेव्हा मी माझ्या आई आणि वडिलांकडून मला मिळालेल्या प्रेमाचा विचार केला तेव्हा मला अभिमान वाटला. मला जे प्रेम पाहिजे होते ते मिळालं. मी प्रत्येक वेळी कुटुंबाचा मुलगा होण्याचा प्रयत्न केला, पण खरे प्रेम माझ्या आयुष्यात कधीच आले नाही, जरी मला थोडं प्रेम मिळालं असलं तरी काही ना काही घडलंच. मी खूप मित्र कमावले नाहीत परंतु जे काही कमवले ते प्रेमळ होते. . नेहू, पौर्णिमा, सावली, स्मिता, रुक्कय्या, इतक्याच माझ्या मैत्रिणी होत्या आणि मोहित जो माझा होता. मला माहित आहे कि मोहितच्या जाण्याने सर्वांची अवस्था काय झाली हे मला माहित आहे, पण माझ्याकडे आता पर्याय नाही. मला आशा आहे कि माझ्या माघारी माझ्या कुटुंबाची सर्वजण काळजी घेतील.

माझी आई खूप मजबूत आहे, तिने माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे ते मी कधीही विसरणार नाही. असं समजू नका कि मी निघून गेली, तर असं समजा कि मी हारली आहे. मागील २-३ दिवसांपासून माझ्या डोक्यात हा विचार चालला आहे मात्र मी माझ्या घरी नव्हती आणि दुसऱ्यांच्या घरात असं चुकीचे पाऊल उचलणे योग्य वाटलं नाही अशी पोस्ट मानसी सुरवसे हिने केली आहे. मात्र काही वेळातच तिने आपली पोस्ट डिलीट केली आहे.

शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर नाही; मुश्रीफांनी आव्हान स्वीकारले

hasan mushrif sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात मोठी राजकीय कुस्ती पाहायला मिळत आहे. समरजितराजे घाटगे (Samarjit Ghatge) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत तुतारी हाती घेत अजित पवार गटात असलेल्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) याना आव्हान दिले. यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी हे आव्हान स्वीकारत शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर नाही अशी गर्जना केली आहे. त्यामुळे कागलमध्ये यंदाच्या विधानसभेला काटे कि टक्कर पाहायला मिळेल.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेब माझे दैवत आहे. मी अजूनही त्यांचा आदर करतो. मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले आहेत? हे मला माहित नाही. शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. राजा विरोधात प्रजा अशी निवडणूक आहे आणि प्रजा कायमच जिंकत असते. जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? पण तरीही मी एवढच म्हणेन कि शरद पवार साहेब, तुमच्याशी माझं वैर नाही, परंतु समरजित तुझी खैर नाही… एकप्रकारे हसन मुश्रीफ यांनी घाटगेंच आव्हान स्वीकारलं असच म्हणावे लागेल.

पवारांचा मुश्रीफांवर घणाघात-

दरम्यान, कागल येथील जाहीर सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. तुमच्या तालुक्यातील एका व्यक्तीला मी सगळं काही दिले, मंत्री केलं मात्र संकटाच्या काळात आमची साथ सोडून ते भलतीकडे गेले. त्यांच्यावर ईडी काही चौकशी सुरू झाल्यानंतर ते अस्वस्थ झाले . ज्यांनी त्रास दिला त्यांच्याच सोबत जाऊ ते बसले. खरं तर संकटातून पळून जाणे आणि लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम करा आणि धडा शिकवा असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार घणाघात केला.