Monday, December 22, 2025
Home Blog Page 488

Petrol Diesel Rate | पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता; समोर आले मोठे कारण

Petrol Diesel Rate

Petrol Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. परंतु आता खाजगी वाहन असणाऱ्या लोकांसाठी पुढील महिन्यात एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Rate) किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्याची झळ सर्वसामान्य लोकांना जास्त बसत आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. देश जगातील सर्वात मोठ्या कच्चा तेल उत्पादक देशांपैकी सौदी अरेबिया हा एक देश आहे. सौदी अरेबियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सौदी अरेबियाने जर हा निर्णय घेतला, तर भारतासाठी ही एक मोठी दिलासा बातमी असणार आहे. कारण देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल डिझेल आणि इतर किमती देखील कमी करू शकतात.

हाती आलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याबाबत सौदी अरेबिया गांभीर्याने विचार करत आहे. अरब लाईट क्रूडची अधिकृत विक्री किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेल्स नगरसरण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतची माहिती अनेक स्त्रोतांकडून आलेली आहे.

सध्या चीनमध्ये क्रूड ऑइलची मागणी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामुळे देखील क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घट होत आहे. चीनमधील रिफायनिंग मार्जिन कमकुवत झालेले आहे. त्यामुळे आता उत्पादनाने रिअल इस्टेटच्या क्षेत्रात देखील मंदी चालू आहे. आणि याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीवर होत आहे. चीनमध्ये तर यापेक्षाही जास्त वाईट परिस्थिती आहे. सप्टेंबरमध्ये तेलाची मागणी जास्त असते. परंतु या वर्षी सप्टेंबरमध्ये या तेलाची मागणी अत्यंत कमी असलेली पाहायला मिळत आहे.

ओपेक देश उत्पादन वाढवण्याच्या तयारी | Petrol Diesel Rate

ओपेक + चा पुरवठा देखील ऑक्टोबर पासून वाढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओपेक या गटातील आठ सदस्य पुढील महिन्यात दररोज 180, 000 एवढे बॅरेल बॅरेल उत्पन्न वाढवण्याची तयारी करत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई बेंच मार्क मजबूत झालेले आहे. त्यामुळे ऑक्टोबर साठी अरब लाईटचा ओएसपी थोडा बदलेला अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आलेली आहे.

E – Shram Card Scheme | ई श्रम कार्ड योजना म्हणजे काय ? जाणून घ्या वैशिष्ट्य आणि फायदे

E - Shram Card Scheme

E – Shram Card Scheme | सरकार हे देशातील विविध वर्गातील लोकांचा विचार करून अनेक योजना आणत असतात. त्यांच्या आर्थिक त्याचप्रमाणे सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्यासाठी काय फायद्याचे आहे. भविष्यात जाऊन त्यांना या गोष्टीचा कसा आर्थिक फायदा होईल? या सगळ्याचा विचार करूनच केंद्र सरकारमार्फत अनेक योजना आणल्या जातात. यातील एक योजना म्हणजे ई श्रम कार्ड (E – Shram Card Scheme) योजना. ही योजना सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मजुरांना एकत्र आणण्यासाठी आणलेली आहे. सरकारच्या या ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत या ई श्रम पोर्टलवर 28.42 कोटी लोकांची नोंदणी झालेली आहे.

सरकारच्या या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदतीसोबतच केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देखील मिळतो. देशातील सर्व मजूर, फेरीवाले, भाजीविक्रेते, घरगुती कामगार हे सगळे या ई श्रम योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक क्षेत्रात असेल, तर त्यांना मात्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ई श्रम कार्ड योजनेचे फायदे | E – Shram Card Scheme

या ई लेबर पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्यासाठी मजूर आणि कामगारांचे कार्ड बनवले जाईल. या पोर्टलच्या अंतर्गत सर्व मजूर एकाच ठिकाणी जोडले जातात. ही योजना सुरू केल्यास भविष्यात नोंदणी झालेल्या कामगार आणि मजुरांना लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत नागरिकांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिले जातो. अपघातात जर कामगारांचा जीव गेला, तर त्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये दिले जातात. परंतु जर कामगार काही अपंग कामगारांना अपंगत्व प्राप्त झाले. तर त्यांना 1 लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाते.

अर्ज कोण करू शकतात ? | E – Shram Card Scheme

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार या ई श्रम कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजदारी कामगार, भूमिहीन शेतमजूर इत्यादी लोक या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योगराज सिंह यांना मेंटल इश्यू आहे? वडिलांबद्दल खुद्द युवराज काय म्हणाला बघा

yograj singh yubraj singh

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. खास करून महेंद्रसिंह धोनीवर ते नेहमी टीका करत असतात. मागील आठवड्यात तर त्यांनी धोनीसह कपी देववर सुद्धा सडकून टीका केली होती. याच दरम्यान युवराच एक जुना व्हिएओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो म्हणतोय कि माझ्या वडिलांना काही मेंटल इशू आहे.

काय आहे व्हायरल विडिओ मध्ये?

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना युवराज म्हणाला होता कि, “मला वाटते माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे आणि ते ते मान्य करू इच्छित नाहीत. मला असे वाटते की त्यांना काहीतरी करण्याची गरज आहे. जसे मी कबूल करतो की मला थेरपीची गरज आहे. होय. त्यांना वाटते की ते बरोबर आहेत पण आम्ही आणि तुम्ही त्यांची समस्या बदलू शकत नाही. युवराजचा वडिलांबद्दलचा व्हिडिओ अशावेळी व्हायरल झाला आहे जेव्हा त्यांनी नुकतंच धोनीवर सडकून टीका केली.

धोनीबद्दल काय बोलले योगराज सिंह?

‘मी महेंद्रसिंह धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात बघावा, तो भलेही खूप मोठा क्रिकेटर असेल , पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे आता समोर येत आहे. धोनीला आयुष्यात कधीच माफ केलं जाऊ शकत नाही मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले असं म्हणत योगराज सिंह यांनी धोनीबद्दल आपला संताप व्यक्त केला. तसेच कर्करोगाने त्रस्त असतानाही युवराजने देशासाठी विश्वचषक जिंकला. यासाठी त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी सुद्धा योगराज सिंह यांनी केली .

दरम्यान, योगराज सिंह यांनी कितीही काही म्हंटल तरी युवराज आणि धोनीची दोस्ती संपूर्ण जगाला माहित आहे. दोघांनी संघ अडचणीत असतां अनेकदा मधल्या फळीत दमदार पार्टनरशिप केली आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट मध्ये युवी- माही जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. धोनीच्या नेतृत्वाखालीच 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत युवराजने सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन बनला. तसेच धोनीच्या नेतृत्वातच युवराजची खेळी आणखी बहरली हे सुद्धा कोणीही नाकारू शकत नाही.

Baba Vanga Predictions | या देशात येणार मुस्लिम राजवट तसेच पृथ्वीचा होणार नाश! बाबा वेंगाचे हृदयद्रावक भाकीत!

Baba Vanga Predictions

Baba Vanga Predictions | आजकाल आपण पाहिल, तर रस्ता रस्त्यावर भविष्यवाणी सांगणारे लोक भेटतात. कधी पोपट घेऊन तर कधी पत्ते घेऊन ते रस्त्यावर त्यांचा ठाण मांडून बसतात. परंतु त्यांची भविष्यवाणी कितपत खरी होते? हा मात्र सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न असतो. परंतु विसाव्या शतकात एक अशी भविष्य सांगणारी व्यक्ती होती. जिने तोंडातून उच्चारलेले प्रत्येक शब्द खरा होत होता. तिचे नाव होते बाबा वेंगा. बाबा वेंगा (Baba Vanga Predictions) ही विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध अशी भाकित सांगणारी व्यक्ती होती. तिला बाल्कनचा नॉस्टर्डेमस या नावाने देखील ओळखले जात होते. परंतु तिचे खरे नाव वांगेलिया पांडव गुश्तेरोवा असे होते. बाबा व्यंगाचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरिया झालेला होता. ती आंधळी होती. परंतु ती भविष्यात घडणाऱ्या घटनाचे आधीच अंदाज लावत होती. ही तिच्याकडे एक अद्भुत अशी शक्ती होती. तिने केलेली प्रत्येक भविष्यवाणी खरी होत होती. तिने तिच्या आयुष्यात अनेक घटनांचा अंदाज लावलेला होता. अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या होत्या ज्या सगळ्या खऱ्या ठरल्या आहेत.

बाबा वेंगाची दृष्टी कशी गेली ? | Baba Vanga Predictions

बाबा व्यंगाही बारा वर्षाची होती. त्यावेळी तिच्या आयुष्यातही खूप मोठ्या संकट आले. एक खूप मोठे वादळ आले आणि त्या वादळामधील धूळ घाण सगळे तिच्या डोळ्यात केली. त्यानंतर हळूहळू त्याची दृष्टी कमी कमी होत गेली. आणि काही दिवसांनी त्याची दृष्टी पूर्णपणे गेली. त्यानंतर तिला समजले की तिच्यामध्ये एक वेगळी अशी शक्ती आहे. तिने ते ओळखली आणि भविष्यवाणी करू लागली. लोकांना असे वाटत होते की, तिला या सगळ्या शक्ती देवाकडून मिळालेल्या आहेत. तिने केलेली सगळी भाकीतही खरी ठरलेली आहे. आज आपण तिने सांगितलेल्या काही प्रमुख भाकितान बद्दल जाणून घेऊया.

बाबा वेंगाची भाकीत

बाबा वेंगा हे दुसरे महायुद्ध आणि सुवेच्च नेते जो फेस स्टॅलिन यांच्या मृत्यूचे भाकीत केले होते. तिचे ते भाकीत खरे ठरलेले आहे. त्याचप्रमाणे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भविष्यवाणी देखील त्यांनी केलेली होती. ज्यामध्ये दोन लोखंडी पक्षी अमेरिकेवर हल्ला करतील असे देखील तिने सांगितलेले होते. नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा संबंध जोडला गेला तसेच बाबा व्यंगाहिणी 2004 रोजी विनाशकारी सुनामीची भविष्यवाणी केली होती ज्यामध्ये हजारो लोकांचा जीव गेला.

बाबा वेंगा हिने असे देखील भाकीत केले आहे की, 2028 पर्यंत माणूस हा मंगळावर पोहोचणार आहे. आणि तिथे गेल्यावर तर नवीन ऊर्जा स्रोत शोधणार आहेत. 2043 पर्यंत युरोप हा इस्लामिक राजवटीचा देश असेल. असे देखील तिने भाकीत केलेले आहे. तसेच तिने केलेल्या भाकितांपैकी एक मोठे भाकीत म्हणजे 3005 रोजी एक मोठे महायुद्ध होणार आहे. आणि त्याचा परिणाम पृथ्वीच्या हवामानावर आणि मानवावरती होणार आहे.

बाबा वेंगाचा मृत्यू कसा झाला ? | Baba Vanga Predictions

बाबा वेंगाचा मृत्यू 11 ऑगस्ट 1996 रोजी झाला. परंतु तिने केलेल्या भविष्यवाणी आणि रहस्यमय शक्ती आजही लोकांसाठी एक गूढ आहे. तिने सांगितलेल्या कथा आजही गूढ केंद्र बनलेले आहे. परंतु आता इथून पुढच्या आयुष्यात सांगितलेल्या त्यांच्या भविष्यवाण्या कशाप्रकारे खऱ्या होतील. याबद्दल सगळ्यांच्या मनात आतुरता निर्माण झालेली आहे.

Ganeshotsav Celebration | गणेशोत्सवासाठी रायगड मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रशासनाने केली खास सोय

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आणि शहरात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आलेले अनेक लोक हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे गावी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढ झालेली असते. खास करून कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते. कारण कोकणामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav Celebration) मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अनेक लोक हे गणपतीसाठी एसटी बस किंवा खाजगी रस्त्याने जात असतात. अनेक लोक शक्य तितक्या पर्यायी मार्गाचा वापर करून लवकरात लवकर गाव गाठण्याचा प्रयत्न करत असतात. आता या लोकांना देखील लवकरात लवकर त्यांच्या घरी जाता यावे आणि प्रवासात त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन देखील मदत करणार आहे.

कोकणात जाणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर घरी जाता यावे. यासाठी रायगड प्रशासनाने विशेष काळजी घेतलेली आहे. प्रशासनाने रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा या महामार्गावर तब्बल दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारली आहेत. म्हणजे प्रवास करताना लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते मदत केंद्राच्या माध्यमातून मदत मदतीसाठी विचारणा करू शकतात. या प्रवासा दरम्यान तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला, तरी ही मदत केंद्र तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

मदत केंद्रावर कोणत्या सुविधा मिळणार | Ganeshotsav Celebration

रस्ते मार्गाने गणेशोत्सवात खूप जास्त गर्दी असते. यावेळी जर अचानक वाहनांना काही झाले. किंवा वैद्यकीय सुविधा आपल्याला पाहिजे असेल, तर या आता प्रशासनाने यासाठी मदत केंद्र दिलेली आहेत. या मदत केंद्रावर टोइंग व्हॅन, वाहन दुरुस्ती, वैद्यकीय सुविधा, बाल आहार कक्ष, महिलांसाठी फीडिंग कक्ष यांसारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आता प्रवाशांना चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस यांसारख्या गोष्टी देखील मोफत पुरवल्या जाणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि 4 सप्टेंबर 2024 पासून ही केंद्र सुरू करण्याचा सूचना दिलेल्या आहेत.

मदत केंद्र कुठे असतील | Ganeshotsav Celebration

मुंबई गोवा महामार्गावर रायगड टप्प्यात येणारा खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर त्यानंतर पुढे टोलनाका पोलादपूर या ठिकाणी ही मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत.या केंद्रांच्या सुविधाचा आता नागरिकांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे

यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आधी दोन दिवसच लोक गावचा प्रवास सुरू करतात. मुंबईवरून देखील मोठ्या संख्येने लोक खाजगी तसेच सरकारी वाहनांमधून गावी जात असतात. त्यामुळे गोवा महामार्गावर खूप जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अनेक बाजारपेठांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे आता नागरिकांनी शक्य तितका मोकळा रस्ता भेटेल त्या ठिकाणावरून जावे

शेतकरी पण लाडका आहे, त्याला नुकसान भरपाई द्या; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी

raj thackeray on maharashtra farmers

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑगस्ट महिन्यात राज्यात धो- धो पाऊस कोसळला असून नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे तब्बल १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Marathwada Rain Damage) झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. शेतकऱ्याचे हातातोंडाचं पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या एकूण सर्व परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच राज ठाकरेंनी सरकारलकडे काही सूचना केल्या आहेत.

राज ठाकरेंचं ट्विट जसंच्या तसं –

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं. तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं

यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल ! या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं.

दरम्यान, मागील काही दिवसांत मराठवाडयात धुव्वाधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे, घरात पाणी शिरले आहे. अनेक गावांचा संप्रर्क तुटला आहे. जवळपास 4 लाख 96 हजार 392 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले असून सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्याने पिकवलेल कष्टाचे पीक त्याच्या डोळ्यासमोर वाहून गेल्याने बळीराजा चिंतेत आहे.

Aadhaar PVC Card | आधार PVC म्हणजे काय? इतके पैसे भरून अशाप्रकारे मिळवा कार्ड

Aadhaar PVC Card

Aadhaar PVC Card | भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. ओळखपत्राची गरज आपल्याला अनेक ठिकाणी लागते. कोणतेही काम करायचे असेल ते शासकीय असो किंवा वैयक्तिक असो. त्यासाठी आधार कार्ड खूप गरजेचे असते. अगदी एसटीमध्ये आपल्याला पास काढायचा असेल, तरी आपले आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. भारतातील अनेक सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर आधार कार्ड क्रमांक खूप गरजेचे असते. आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड इ ई आधार, एम आधार कार्ड हे चार प्रकार आहेत. आता या चार कार्ड पैकी तुम्ही कोणते कार्ड वापरू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या भारतामध्ये आधार पीव्हीसी (Aadhaar PVC Card) हे एटीएम कार्ड सारखे आधार कार्ड मिळते. याची खासियत म्हणजे पाणी पडले तरी हे आधार कार्ड खराब होत नाही. पीव्हीसी आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पीव्हीसी आधार कार्ड काही शुल्क देऊन डाऊनलोड देखील करू शकता. आता हे आधार कार्ड नक्की कसे काढायचे, हे आपण जाणून घेणार आहोत.

आधार पीव्हीसी कार्ड कसे काढायचे? | Aadhaar PVC Card

या आधार पीव्हीसी कार्डची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. या कार्डवर टेम्परप्रूफ क्यूआर कोड असतो. त्याचप्रमाणे होलोग्रम, मायक्रोटेक, घोस्ट इमेज, आधार कार्ड इत्यादी असतात. तसेच छापलेली तारीख, आधार कार्डचा एम बोर्ड लोगो यासारख्या गोष्टी असतात. हे कार्ड तुम्हाला काढायचे असेल, तर स्पीड पोस्ट चार्जेससह तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागते.

तुम्हाला जर आधार पीव्हीसी कार्ड काढायचे असेल, तर तुम्ही माय आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे गेल्यावर तुम्ही आवश्यक ती सगळी माहिती अर्जामध्ये भरा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि आधार नोंदणी क्रमांक दूधवाला लागेल. त्यानंतर आधार कार्डला जो तुमचा फोन नंबर रजिस्टर आहे. त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड मागवता येईल. या आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय त्याचप्रमाणे पेटीएम द्वारे देखील शुल्क भरता येणार आहे. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर केवळ 5 दिवसात असून स्पीड पोस्टाने तुमचे आधार कार्ड तुमच्या घरी येईल.

आधार कार्ड अपडेट करणे | Aadhaar PVC Card

त्याचप्रमाणे UIDAI यांनी आधार कार्ड अपडेट संदर्भात काही माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीवरील ज्या लोकांच्या आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने झालेले आहे. त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगितलेले आहे. हे काम तुम्हाला अगदी फ्रीमध्ये करता येणार आहे. यासाठी 14 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही दुरुस्ती किंवा बदल करायचा असल्यास तुम्ही 14 सप्टेंबर आधीच करा. तसेच ते केल्यानंतर तुम्ही पीव्हीसी कार्ड साठी अर्ज करा.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? पवारांनी फॉर्म्युलाच सांगितला

sharad pawar MVA CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सज्ज झाली असून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात योग्य समन्वय पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरून तिन्ही पक्षाचे अद्याप एकमत झालेलं नाही. एकीकडे निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी अजूनही सावध भूमिका घेत मुख्यमंत्रीपदाबाबत थेट भाष्य केलेलं नाही. आता खुद्द शरद पवारांना (Sharad Pawar) याबाबत विचारलं असता पवारांनी मुरब्बीपणे या प्रश्नाचे उत्तर दिले.

शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार म्हणाले, आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही. सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दीष्ट हे स्थिर सरकार देण्याला असेल, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री कोण ते ठरवलं जाईल असं उत्तर शरद पवारांनी दिले. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिवरायांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे कोसळला असा तर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला होता, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, वाऱ्याच्या वेगामुळे किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं कारण मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक सांगत आहेत. पण अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत.मुंबईत इंडिया गेटच्याजवळ, समुद्रकिनारी जो पुतळा आहे तो कित्येक वर्षांपासून उभा आहे, त्याला काही झालेलं नाही. त्यामुळे मालवणमध्ये जो पुतळा कोसळला,त्याबाबत जी कारण सांगितली जात आहेत, ती योग्य आहेत असं दिसंत नाही, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पुतळ्याचं काम ज्यांनी काम केलं त्यांचा या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता, तेवढं मोठं काम त्यांनी केलेलं नाही असं दिसतंय. हे असताना त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यानं अपघात घडेल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, असं शरद पवार म्हणाले.

Weather Update | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोर्चा कोकणाकडे; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | यंदा राज्यभरात जोरदार पाऊस पडलेला आहे. काही दिवसाचा विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या दोन चार दिवसापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे. या ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे अनेक जनावर देखील दगावली आहेत. परंतु या भागातील पाऊस सध्या काही प्रमाणात कमी झालेला दिसत आहे. परंतु आता येत्या काही दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या भागात माथ्यावर हाच पाऊस कोसळताना दिसणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता पश्चिम महाराष्ट्रमध्ये पावसाचे (Weather Update ) संकट आलेले आहे.

गणेशउत्सव तोंडावर आलेला आहे. आणि कोकणातील परिसरात पावसाने त्याचा मोर्चा वळवल्यामुळे यावर्षी गणपतीमध्ये कोकणात कोसळ मुसळधार पाऊस (Weather Update ) कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काळामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा फार कमी होणार आहे. परंतु सातारा, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सह घाट माथ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या भागांमध्ये देखील पाऊस येणार आहे. त्यामुळे या विभागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा | Weather Update

भारतीय हवामान खाते नेहमीच पावसाचा अंदाज व्यक्त करत असतात. यावेळी देखील त्यांनी काही राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, सिक्कीम, मध्यप्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, मेघालय, नागालँड, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हिमाचल प्रदेशाच्या काही भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी वादळी वारा देखील पाहायला मिळणार आहे. तसेच देशातील विविध भागांमध्ये सध्या पाऊस चालू आहे. आणि येत्या काळामध्ये देखील पाऊस असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस दिसून येणार आहे. आणि त्यानंतर परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

Samsung Galaxy A06 : Samsung ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी अन बरंच काही….

Samsung Galaxy A06 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशा किमतीत नवीन मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy A06 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी यांसारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवरून हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येईल, तत्पूर्वी आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy A06 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा IPS LCD पॅनेल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशनसह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरला आहे. सॅमसंगचा हा मोबाईल One UI 6.1 आधारित Android 14 वर काम करत असून यामध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते. तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा – Samsung Galaxy A06

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy A06 मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या मोबाईल मध्ये पॉवरसाठी ,5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यात ब्लूटूथ v5.3, GPS आणि USB Type-C पोर्ट यांसारखी वैशिष्टये मिळतात.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे किमतीचा, तर जस आम्ही म्हणलं कि हा स्मार्टफोन एकदम स्वस्त आहे त्यानुसार, Samsung Galaxy A06 च्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे तर , 4GB + 128GB व्हेरिएंटचा मोबाईल 11,499 रुपयांना उपलब्ध आहे. सध्या हा हँडसेट सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध असून येत्या काही दिवसात तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट- ऍमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.