Monday, December 22, 2025
Home Blog Page 492

धोनीला माफी नाही, त्याने युवराजचं करिअर संपवलं; गंभीर आरोपाने खळबळ

dhoni yuvraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोनीला (MS Dhoni) माफी नाही, त्याने युवराजचं (Yuvraj Singh) करिअर संपवलं असं म्हणत युवराज सिंगचे वडील आणि भारतचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. युवराज मध्ये अजूनही ४-५ वर्ष क्रिकेट बाकी होते मात्र महेंद्रसिंह धोनीने कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप योगराज सिंह (Yograj Singh) यांनी केला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. झी स्विचच्या यूट्यूब चॅनलवर योगराज सिंह बोलत होते.

‘मी महेंद्रसिंह धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात बघावा, तो भलेही खूप मोठा क्रिकेटर असेल , पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे आता समोर येत आहे. धोनीला आयुष्यात कधीच माफ केलं जाऊ शकत नाही मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले असं म्हणत योगराज सिंह यांनी धोनीबद्दल आपला संताप व्यक्त केला. तसेच कर्करोगाने त्रस्त असतानाही युवराजने देशासाठी विश्वचषक जिंकला. यासाठी त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी सुद्धा योगराज सिंह यांनी केली .

दरम्यान, योगराज सिंह हे जरी धोनीबद्दल काहीही विधाने करत असले तरी युवराज आणि धोनीची दोस्ती संपूर्ण जगाला माहित आहे. दोघांनी संघ अडचणीत असतां अनेकदा मधल्या फळीत दमदार पार्टनरशिप केली आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट मध्ये युवी- माही जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. धोनीच्या नेतृत्वाखालीच 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत युवराजने सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन बनला.

युवराजच्या एकूण कारकिर्दीबाबाबत (Yuvraj Singh Career) सांगायचं झाल्यास, 2000 साली भारतासाठी पदार्पण केलेल्या युवराजने 402 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11178 धावा केल्या, यादरम्यान युवीने 17 शतके आणि 71 अर्धशतके ठोकली. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2002, ICC T20 विश्वचषक 2007 आणि ICC क्रिकेट विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघांचा तो भाग होता. युवराजने मारलेले ६ चेंडूत ६ सिक्स अजूनही क्रिकेटप्रेमी विसरले नाहीत. जून 2019 मध्ये युवीने सर्व फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Sleeping With Mobile | तुम्हीही उशीजवळ मोबाईल ठेवून झोपता का? होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Sleeping With Mobile

Sleeping With Mobile | आजकाल मोबाईल फोन वापरणे ही काळाची गरज झालेली आहे. अगदी प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो आणि या फोनपासून आपण काही मिनिट देखील लांब राहत नाही. एवढंच न अगदी झोपताना देखील आपण मोबाईल लांब ठेवत नाही. झोपले की आपल्या उशी जवळच मोबाईल ठेवतो. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतो. तुम्हाला देखील रात्री झोपताना तुमच्या उशी जवळ मोबाईल फोन ठेवून झोपण्याची सवय असेल, तर ती सवय आजच बंद करा. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. काही लोक हे रात्री अचानक जाग आली, तरी मोबाईल फोन चेक करतो. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक (Sleeping With Mobile) आहे. आज आम्ही तुम्हाला यामुळे काय होते हे सांगणार आहोत.

मोबाईल आरोग्यासाठी हानिकारक | Sleeping With Mobile

मोबाईल हे एक इलेक्ट्रिक गॅजेट आहे. त्यामुळे यामधून नेहमीच रेडिएशन निघत असतात. आणि हे रेडिएशन आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. मोबाईल मधून येणारे रेडिएशन इरेक्टाईल डीसफंक्शनशी जोडलेले असतात. या मधून निघणारा निळा प्रकाश यामुळे झोप आणि आपल्या हार्मोनलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. आणि आपल्याला विविध समस्यांना सामोरे जात जावे लागते.

आरोग्य संबंधित समस्या

फोन मुळे डोकेदुखी, स्नायू दुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या नुसार आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे दुखणे, चिडचिड होणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवावा

मोबाईल मधून जास्त रेडिएशन्स निघतात. त्यामुळे झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा. त्यामुळे आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. अनेक वेळा लोकांना मोबाईल पाहिल्याशिवाय झोप येत नाही. अशावेळी तुम्ही मोबाईल लांब ठेवून पुस्तक वाचायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला झोप देखील येईल आणि त्रास देखील होणार नाही.

या मार्गांचा अवलंब करा | Sleeping With Mobile

तुम्हाला जर मोबाईलचे व्यसन सोडायचे असेल, तर तुम्ही काही ठिकाणी मोबाईल वापरायला बंदी करा. जसे की डायनिंग टेबल बेडरूम टीव्ही बघताना इतरांशी बोलताना मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करा. तसेच आठवड्यातला एक दिवस असा निश्चित करा की, त्या दिवशी मोबाईल तसेच टीव्ही सगळे बंद असणार आहे. आणि लहान मुलं देखील मोबाईल पासून दूर राहतील. अशावेळी तुम्ही सगळेजण एकत्र मिळून चांगले क्षण अनुभवू शकता. आणि मुलांना देखील मोबाईलच्या सवयीपासून दूर राहता येईल.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का!! सप्टेंबरपासून नोंदणी केल्यास मिळणार नाहीत 2 महिन्याचे पैसे

Ladki Bahin Yojana aditi tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत कलेची जात आहे/ आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि आगस्ट महिन्याचे मिळून असे ३००० रुपये जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना तांत्रिक कारणाने अजूनही पैसे मिळाले नाहीत. तर काही महिलांनी अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नाही. अशा महिलांसाठी चिंतेची बातमी आहे. कारण 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.

गडचिरोली दौऱ्यावर असताना अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. मात्र या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्याने महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अनेक महिलांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांची लिंक नसल्याने अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर या योजनेचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची बँक सीडींग स्टेटस जाणून घेणे आणि बँक खाते आधार क्रमांकला लिंक करणे खूप गरजेचे आहे.

बँक सिडींग असं चेक करा- Ladki Bahin Yojana

तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस टाक तपासायचे असेल, तर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला हवी ती भाषा निवडायची आहे.

त्यानंतर तुम्हाला आधार सर्विस हा पर्याय दिसत आहे.

पर्यावर क्लिक करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस हा पर्याय दिसेल.

हा पर्याय दिसल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल.

त्यावर बँक सिडींग स्टेटस हा पर्याय देखील दिसेल.

त्यानंतर त्या क्रमांकावर क्लिक करावे आणि तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेल्या कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.

त्यानंतर आधार कार्ड सिलिंग असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल हा ओटीपी तुम्ही त्या वेबसाईटवर टाकावा त्यानंतर लॉगिन होईल.

यानंतर तुमचे बँक सीडींग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकशी कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्हाला लगेच समजेल

शिवरायांनी सुरत लुटलीच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सुनावलं

devendra fadnavis indrajit sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर यावर बराच वाद- विवाद झाला. या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांनी खरी- खोटी सांगत फडणवीसांना (Devendra Fadnavis) चांगलंच सुनावलं आहे. सुरतेची लूट हे शिवरायांनी मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी टाकलेलं पाऊल होते. तुम्ही राजकारणासाठी इतिहास बिघडवू नका असं इंद्रजित सावंत यांनी म्हंटल आहे. याबाबतचा एक विडिओ त्यांनी शेअर केला आहे.

इंद्रजित सावंत यांनी म्हंटल कि, सूरत या शहराला मुघली साम्राज्यात बंदर-ए-मुबारक म्हटले जायचे. सूरत हा मुघली साम्राज्याच्या गालावरचा तीळ आहे, असेही म्हटले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 अशा दोन वेळेस औरंगजेबाचे बंदर असलेल्या सुरतेवर छापा (Surat Loot) टाकला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी वीरजी व्होरा, हाजी बेग, हाजी सय्यद या बड्या व्यापाऱ्यांना लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती. सुरतच्या पहिल्या लुटीवेळी इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. त्याने शिवाजी महाराजांकडे एक दूत पाठवला होता. त्याच्यासोबत इनायत खानाने एक मारेकरी पाठवत शिवाजी महाराजांना धोका दिला. त्यामुळे शिवरायांच्या मावळ्यांनी सुरतेला आग लावून सुरत बेचिराख केली होती, हा आपला इतिहास आहे.

सुरतेची लूट हे मध्ययुगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी टाकलेले पाऊल होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी या संपत्तीचा वापर करण्यात आला, पण देवेंद्र फडणवीस आता खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी. तुम्ही राजकारण करा पण इतिहास बिघडवण्याचे काम करु नका, असे इंद्रजीत सावंत यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? असं फडणवीस यांनी म्हंटल होते. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सुरत लुटीचा मुद्दा काढला होता, मात्र आता खुद्द इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीच फडणवीस यांचे हे विधान खोदून काढल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.

Psoriasis | महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोरायसिसचा धोका दुप्पट; जाणून घ्या लक्षणे

Psoriasis

Psoriasis | सोरायसिस हा एक त्वचारोग आहे. हा रोग पुरुषांना तसेच महिलांना देखील होत असतो. परंतु महिलांच्या तुलनेत पुरुषांना या रोगाची लागण होण्याची शक्यता दुप्पट असते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग झाल्यावर कोरडी त्वचा बाहेर येऊ लागते. आणि पाठीवर तसेच कोपऱ्यावर पायावर लाल खवलेयुक्त फोड येतात. आणि तेथील त्वचा एका वेगळ्या प्रकारे दिसू लागते.

सोरायसिस म्हणजे काय ? | Psoriasis

सोरायसिस हा खूप काळापर्यंत चालणार आहे. हा एक त्वचारोग आहे. यामध्ये त्वचेच्या पेशींच्या जलद वाढीमुळे जाड लाल खवलेयुक्त त्वचा निर्माण होते. हा आजार सहसा कोपरे, गुडघे, पाठीच्या खालचा भाग डोक्याला लागून असलेले भाग या ठिकाणी येतात. आलेली नवीन त्वचा म्हणजे कोरडे त्वचेच्या पेशींचा एक समूह असतो. आता या रोगाची आपण नक्की लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात.

या रोगाची लक्षणे

  • खाज सुटणे किंवा जळजळ होणे.
  • नखे सुजतात आणि कोरडी होतात.
  • त्वचा तुटल्यासारखी दिसते तसेच त्वचेला लाल लाल फोड येतात.
  • या आजारावर अजूनही कोणता इलाज उपलब्ध नाही. तरीही तुम्ही योग्य औषधे आणि जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करून या रोगाचे व्यवस्थापन करू शकता. आणि जास्त होण्यापासून टाळू शकतात.

सोरायसिसचा इलाज नाही

सोरायसिस हा त्वचेशी संबंधित असणारा एक आजार आहे. हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. खास गोष्ट म्हणजे कोणत्याही वयामध्ये हा आजार होऊ शकतो. परंतु त्यावर कोणताही जालीम असा उपाय उपलब्ध नाही. हा कधीही न संपणारा आजार आहे. परंतु त्याला तुम्ही काळजी घेऊन नियंत्रित करू शकता. ज्या लोकांना आधी कोणता त्वचारोग आहे. त्यांना या आजाराचा धोका होऊ शकतो.

सोरायसिसचे कारण | Psoriasis

तुमच्या रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड झाल्यामुळे सोरायसिस होतो. असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. या आजारात रोगप्रतिकार शक्ती अतिक्रियाशील असते. त्यामुळे शरीरातील चांगल्या पेशी नष्ट होऊ लागतात. यावर ज्याचा त्वचेवर परिणाम होतो. सुरुवातीला तुमच्या त्वचेवर खाज येते. परंतु जर तुम्ही वेळीच काळजी घेतली नाही, तर हा आजार वाढत जातो. त्वचेवर खवले तयार होतात आणि जखमा देखील होतात. कधी कधी सोरायसिसचे कारण आनुवंशिक देखील असू शकते.

सोरायसिसचा जास्त परिणाम हा हात पाठीवर दिसून येतो. आणि त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. वाढत्या वयानुसार हा आजार अधिकच धोकादायक बनतो. तुम्ही जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेऊन घेतली, तर हा आजार तुम्ही नियंत्रणात आणू शकता. या सोरायसिसच्या आजारामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही बऱ्याच वेळा परिणाम होते. यामुळे लोक बाहेर जाणे टाळतात. लोकांना भेटत नाही त्यांना कमीपणा वाटतो त्यामुळे चिंता आणि नैरास्य देखील वाढू शकते.

सोरायसिस कसे टाळावे ?

तुमच्या त्वचेला कधीच कोरडी ठेवू नका. सतत त्यावर मॉइश्चरायझर वगैरे लावा. त्याचप्रमाणे जर खाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त दारू पिऊ नका. त्वचेवर रोज मॉइश्चरायझर वापरा.

Ramraje Naik Nimbalkar : रामराजे निंबाळकर तुतारी घेणार? साताऱ्याच्या राजकारणात काय घडतंय?

ramraje naik nimbalkar tutari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. खास करून शरद पवार हे सध्या चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून भाजप महायुतीचे अनेक बडे नेते आपल्याकडे वळवत आहेत. कोल्हापूरचे राजे समरजित घाटगे हे पवारांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबरला तुतारी हातात घेणार आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके यांच्यासह अनेक नेते पवारांच्या पक्षात जाण्यास इच्छुक असल्याचे बोललं जातंय. त्यातच आता सातारा जिल्ह्यातही मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकेल, कारण अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी थेट तुतारी वाजवण्याचे संकेत दिले आहेत. असं झाल्यास बालेकिल्ल्यातच अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र जिल्ह्यातच त्यांचे भाजप नेते जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी असलेलं वैर सर्वश्रुत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार असूनही रामराजेंनी त्यांना मदत केली नाही, उलट विरोधच केला. एवढच नव्हे तर हा उमेदवार जर हरला तर आम्ही जबाबदार नसेल असेही महायुतीच्या वरिष्ठाना सांगितलं होते. याच दोन्ही नेत्यांशी असलेल्या वादामुळे रामराजे निंबाळकर पुन्हा एकदा पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. फलटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सूचक असं भाष्य केलं आहे.

रामराजे काय म्हणाले?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना रामराजे म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीची चर्चा सुरू केली, मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यांची (रणजीत नाईक निंबाळकर व त्यांचे साथीदार) दहशत रोखली पाहिजे. आपलं भारतीय जनता पार्टीशी कोणत्याही प्रकारचं भांडण नाही. आपण हिंदू-मुस्लिम वाद करत नाही, कोणी गाय मारली तर आपण त्याला संरक्षण देत नाही. आपली तक्रार एकच आहे, रणजीत सिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या साथीदारांनी फलटणमधल्या गल्लोगल्ली जी दहशत निर्माण केली आहे, त्यांचे जे प्रकार चालू आहेत, त्याविरोधात आपण तक्रार केली आहे. त्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी”. जर वरिष्ठानी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, किंवा आपल्या तक्रारीमुळे कोणताही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय. अजून काही बोलायचं बाकी राहिलं आहे का? असा रामराजे म्हणाले. रामराजेंच्या तोंडात तुतारी हा शब्द पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे आगामी काळात रामराजे तुतारी हातात घेऊन शरद पवारांना साथ देणार का ते पाहावं लागेल. असं झाल्यास साताऱ्याचे राजकारण बदलण्याची शक्यता आहे.

Vande Bharat Sleeper Train | वंदे भारत स्लिपचे अनावरण; पाहा ट्रेनची आतील दृश्ये

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train | रेल्वेने प्रवास करणे हे सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत परवडणारे आहे. रेल्वेने प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि सुखकर होतो. त्याचप्रमाणे अत्यंत स्वस्तात असा हा प्रवास होतो. अशातच आता वंदे मातरम ट्रेनमधून प्रवास करणे आणखी आरामदायी होणार आहे. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. आता लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून वंदे मातरम स्लीपर फ्रेंड सुरू केला जाणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर गाडीच्या प्रोटो टाईप मॉडेलचे रविवारी अनावरण केलेले आहे. याची झलक तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहू शकता.

आता वंदे मातरम ट्रेनसोबत वंदे भारत स्लीपर ट्रेनही (Vande Bharat Sleeper Train) धावणार आहे. बीईएमएल यांनी वंदे भारत ट्रेनच्या कोचीबांधणी देखील सुरू केलेली आहे. आणि या मॉडेलचा पहिला लूक देखील समोर आलेला आहे. आणि याची दृश्य देखील सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. त्यामुळे आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवास करण्याची अनुभूती येणार आहे. असे देखील सांगण्यात आलेले आहे.

अनावरण केलेल्या या वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper Train) एक्सप्रेसला डबे असणार आहेत. या प्रोटो टाईप मॉडेलमध्ये 11 एससी तीन टीयर कोच, चार एसी दोन टीयर कोच आणि एक एसी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. तसेच 188 सेकंड 24 फर्स्ट असणार आहे. हे वंदे मातरम स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवास करता येणार आहे. या ट्रेनमध्ये ज्या लोकांना वाचन करणे करायचे आहे. त्यासाठी लाईट देखील आहे. तसेच यूएसबी चार्जिंगची सुविधा दिलेली. आहे प्रवाशांसाठी विशेष टॉयलेटचे सुविधा केलेली आहे. त्यामुळे आता जर नागरिकांना लांबचा प्रवास करायचा असेल, तर ही वंदे मातरम ट्रेन खूप उपयोगाची ठरणार आहे.

Pan Card And Adhar Card Link | घरबसल्या मोबाईलवरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना करा लिंक; वापरा या सोप्या स्टेप्स

Pan Card And Adhar Card Link

Pan Card And Adhar Card Link | आजकाल आधार कार्ड इतर गोष्टींना लिंक करणे खूप गरजेचे असते. खास करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे गरजेचे असते. आणि आता हे लिंक करणे खूप सोपे झालेले आहे. तुम्ही जर नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करत असाल, तर त्यासाठी आधार कार्ड देणे आजकाल अनिवार्य आहे. परंतु आता यासाठी तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एसएमएसद्वारे एकमेकांना लिंक करू शकता.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक (Pan Card And Adhar Card Link) करणे. ही आता भारतातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे लिंक करण्यामागे अनेक कारणे आहेत. तुम्ही जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले, तर सरकार कर चोरी रोखण्याचा देखील प्रयत्न करते. तसेच एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड देखील काढू शकत नाही. दोन्ही पण लिंक करून पारदर्शकता येते. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे खूप गरजेचे असते. यासाठी बचत खाते उघडणे गुंतवणूक करणे यासाठी आधार कार्ड आणली पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे आवश्यक असते.

आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक कसे करायचे? | Pan Card And Adhar Card Link

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 5676878 किंवा 56161 यापैकी एका नंबरवर तुम्हाला एसएमएस पाठवायचा आहे.
  • यासाठी तुम्हाला UIDAI PAN < तुमचा 12 अंकी आधार क्रमांक > < तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक >
  • त्यानंतर सेंट हे बटन दाबा
  • तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांची लिंक झाले आहे की नाही. हे तपासण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • तुम्ही जर आधीच विवरणपत्र दाखल करत असेल, तर तुमचे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असण्याची गरज आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या सोप्या स्टेप्सनुसार एसएमएसद्वारे लिंक करू शकता.

Monsoon Travel | पावसाळ्यात लोणावळ्याला फिरायला जात असाल; तर या 3 ठिकाणांना नक्की भेट द्या

Monsoon Travel

Monsoon Travel | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. आणि पाऊस पडल्यावर ती पर्यटकांची पावले ही अलगतच निसर्गाकडे वळली जातात. हिरवा डोंगर तसेच सर्वत्र पसरणारी हिरवाई अनेकांना आवडते. त्यामुळे अनेक लोक हे पावसाळ्याच्या दिवसात फिरायला जात असतात. त्यातही महाराष्ट्रातील लोणावळा हे ठिकाण पावसाळ्यातील पर्यटन स्थळांपैकी एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक लोक हे पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला भेट नक्की देतात. आता तुम्ही देखील या वीकेंडला जायचा प्लॅन करायचा असेल. परंतु तिथे जाऊन नक्की काय पाहायचे? तुम्हाला हे कळत नसेल तर तर आज आम्ही तुम्हाला लोणावळ्यातील ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच छान वाटेल. आणि तुमची सहल देखील चांगली होईल. आता या तीन ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

राजमाची पॉईंट | Monsoon Travel

Rajmachi

राजमाची पॉईंट हा लोणावळ्यावरील एक लोकप्रिय पॉइंट आहे. येथील आजूबाजूला हिरवे गार डोंगराईचे सुंदर असे दृश्य दिसते. त्यामुळे तुम्ही जर लोणावळ्याला फिरायला जात असेल, तर या ठिकाणी नक्की जा निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण एक मेजवानीच असणार आहे. कारण तिथून तुम्हाला उंच उंच डोंगर डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहायला मिळतील. तसेच ट्रेकिंगचा अनुभव देखील तुम्हाला घेता येईल. लोणावळा हे शहर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून जवळच्या अंतर आहे. या ठिकाणावरून तुम्हाला शिवाजी किल्ला देखील पाहायला मिळेल. किल्ल्याचे तटबंदी वरून आजूबाजूच्या परिसराचे तुम्हाला दर्शनही घेता येईल.

भुशी डॅम

Bhushi Dam

पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक जातात या धरणाच्या बाजूला तुम्हाला विविध सुंदर धबधबे पाहायला मिळतील. पावसाळ्यामध्ये भुशी धरण हे एक पर्यटकांचे आकर्षण आहे. अनेक लोक भुशी डॅमला भेट देण्यासाठी लांबून लांबून येतात. परंतु या ठिकाणी जाताना काळजी घेणे खूप गरजेचे असते अन्यथा नुकसान होऊ शकते.

लोहगड किल्ला | Monsoon Travel

Lohgad Killa

या पावसाळ्यात जर तुम्ही लोणावळ्याला गेलात, तर लोहगड हा किल्ला नक्की बघा. या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. पर्यटकांची गर्दी पावसाळ्यासोबत इतराने ऋतूमध्ये देखील असते. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला भेट देणार असाल, तर लोहगड या किल्ल्याला नक्की भेट द्या

द्राक्षपिकांना मिळणार शेतमालाचा दर्जा आणि विमासंरक्षण; अजित पवारांनी दिली माहिती

Grapes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सततचा पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत असते. यातील द्राक्षाचे पीक हे एक असे पीक आहे. ज्याला पावसाचा मारा लागल्याने ते लगेच खराब होतात. आता द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषी मालाच्या यादीत करण्यासंदर्भात आता नाबार्ड सह यंत्रणेसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. आता द्राक्ष पिकाचे नुकसान टाळण्यासाठी द्राक्षांना प्लास्टिक अच्छादन लावण्यासाठी अनुदान मिळावे. यासाठी राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाकडे देखील मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. ही बैठक शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर जो काही निर्णय झाला. त्याच्या दृष्टीने कार्यवाही लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.

राज्यातील जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. त्यांच्याबाबत अनेक समस्या येत आहेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक करण्यात आली. या बैठकीला अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष नरहर झिरवाळ नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ राजगोपाल देवरा यासोबत अनेक लोक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, द्राक्षापासून जो बेदाणा तयार केला जातो. त्यात कोणत्याही प्रकारची यांत्रिक पद्धत वापरली जात नाही. हे बेदाने केवळ सूर्यप्रकाशातच वाळवले जातात आणि नंतर तयार होतात. यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होत नाही.bत्यामुळे हळद आणि गुळाप्रमाणे त्याचाही समावेश शेतमालामध्ये होणे गरजेचे आहे. या बैठकीमध्ये देखील शेतमालाचा दर्जा मिळावा, यासाठी निर्णय घेण्यात यावा. हा निर्णय झाल्यानंतर बेदानाला शेतीमाल म्हणून जीएसटीतून सवलत पाऊस गारपीटनेसर्गिक आपत्ती नुकसान झाल्यावर त्यांना भरपाई मिळेल. तसेच संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानाचा देखील त्यांना फायदा होणार आहे.

या बेदाण्यावरील पाच टक्के जीएसटी रद्द करण्याचे मागणी देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून केंद्रीय जीएसटी कौन्सिलकडे पत्र पाठवण्यात येईल, असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष पिकाला होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्षांना प्लास्टिक अच्छादनाचे अनुदान मिळावे. यासाठी देखील पत्र पाठवण्यात आलेले आहेत. तसेच द्राक्षांच्या कॉल्ड स्टोरेजसाठी सोलर पॅनल अनुदानातून उपलब्ध करून देण्यात आलेले मॅग्नेट प्रकल्पाच्या भरतीवर काय करता येईल? याबाबतची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे.