Lumpy Skin Disease | महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी जनावरांच्या लंपी रोगाने थैमान घातलेले होते. आता पुन्हा एकदा हा रोग महाराष्ट्रा समोर आलेला आहे. या आजारामुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण होतात. आणि आतून त्या जनावरांना पोखरतात. आता या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे. या रोगाने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याने शेतकऱ्यांना देखील चांगलीच भीती वाटत आहे. त्यामुळे आता पशुवैद्यकीय तज्ञांनी देखील जनावरांना वेळीस उपचार तसेच लसीकरण करून आणण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण आता राज्यातील अनेक गावांमध्ये लंपीची (Lumpy Skin Disease) लागण होण्यास सुरुवात झालेली आहे. गावाकडील अनेक शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत असतात. परंतु लंपी या आजारामुळे दोन वर्षांपूर्वी अनेक दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक जनावरे निकामी झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. या रोगांनी आता पुन्हा एकदा तोंड वर काढल्याने लोकांना लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे खूप गरजेचे आहेत.
लंपी रोगाची लक्षणे | Lumpy Skin Disease
लंपी या रोगाचा संसर्ग सगळ्यात आधी जनावरांच्या डोळ्यांतुत तसेच नाकातून पाणी येते. आणि लसिका ग्रंथींना सूज येते. तसेच जनावरांना सुरुवातीला ताप येतो.bआणि त्यांचे दुधाचे प्रमाण देखील कमी होणे, जनावरे चारा देखील खूप कमी खातात. आणि पाणी देखील पीत कमी पितात. नंतर हळूहळू त्यांचे डोके या भागाच्या त्वचेवर दहा ते पंधरा मिलिमीटर व्यासाच्या गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास देखील त्रास होतो. त्यांची दृष्टी बाधित होते. पायांवर सूज येऊन जनावरांना नीट चालता देखील येत नाही. हा रोग विशेषता गोवंस आणि म्हैस या वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य आहे. परंतु हा आजार मानवांकडे संक्रमित होत नाही. परंतु जनावरांमध्ये हा एक वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
जनावरांमध्ये प्रतिकारक शक्ती क्षमता कमी असते. त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रभाव खूप वेगाने होतो. अशावेळी वासरू दगावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांना दुधाळ जनावरांसह वासरांची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, त्यांना गोचीडपासून मुक्त करावे. तसेच वातावरणासोबत इतर जनावरांना पशूंना संसर्ग होत असतो. त्यामुळे जर बाजारातून काही जनावरे नवीन आणली तर त्यांना काही दिवस इतर गुरांपेक्षा वेगळी ठेवावी. जवळपास महिनाभर त्यांना लांब ठेवावे. लंपीची बाधा झाल्याची लक्षणे दिसला तात्काळ उपचार सुरू करावेत. अन्यथा त्याची त्याचा संसर्ग वाढत जाईल. चिलटे, माशा, गोचीड आणि डास यामुळे रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने चिनी बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y36c असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या तरी चीनमध्ये हा मोबाईल लाँच झाला असला तरी लवकरच तो भारतात सुद्धा येण्याची शकयता आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
फीचर्स –
Vivo Y36c फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 840 nits पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट बसवली असून विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम ते 12जीबी रॅम पर्यंतची मेमरी देण्यात आली आहेत. तसेच स्टोरेजमध्ये 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
कॅमेरा –
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y36c च्या पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. खास बाब म्हणजे विवोच्या या स्मार्टफोनमध्ये IP54 रेटिंग देण्यात आलं आहे जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते.
किंमत किती?
Vivo चा नवीन Vivo Y36c च्या 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 899 युआन (अंदाजे 10,500 रुपये ) आहे. तर टॉप वेरिएंट असलेल्या 12 GB रॅम, 256 GB स्टोरेजची किंमत 1299 युआन (अंदाजे रुपये 15,500) आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मून शॅडो ब्लॅक, डिस्टंट माउंटन ग्रीन आणि डायमंड पर्पल या तीन कलर व्हेरियंटमध्ये आणला आहे.
Cockroach In Cold Coffee | आधी आपल्याला घरात स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला की, लोक सरळ हॉटेलमध्ये जायचे आणि तिथे जाऊन जेवण करायचे. परंतु आता घरात जेवण बनवायचा कंटाळा आल्यावर हॉटेलमध्ये जाण्याची देखील गरज नसते. कारण घर बसून केवळ एक नंबर डायल करून जेवण आपल्या घरी येते. खाण्यापिण्याच्या बाबत लोक नेहमीच लक्ष ठेवून असतात. परंतु कधी कधी ऑनलाईन मध्ये मधून किंवा हॉटेलमधून देखील कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होते. आणि ग्राहकांना मात्र त्याचा खूप मोठा भुर्दंड भोगावा लागतो. काही दिवसांपूर्वी मालाड मधून एक विचित्र घटना समोर आलेली होती. ती म्हणजे एका हॉटेलमध्ये आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळण्याची धक्कादायक घटना समोर होती.
त्यामुळे मुंबईत चांगलाच या गोष्टीवर संताप व्यक्त झाला होता. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे ऑनलाईन फूट डिलिव्हरीवर अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. हे बोट तेथील कर्मचाऱ्यांचे होते. असे काही दिवसांनी देखील समोर आले होते. परंतु आता एक नवीन घटना समोर आलेली आहे. यामध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता नक्की हे काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊया. इव्हेंट मॅनेजर कंपनी चालवणाऱ्या एका 25 वर्षाच्या तरुण आणि ही कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती. परंतु ती कोल्ड कॉफी पाहिल्यावर त्याचे डोके गरम झाले. कारण त्या कोल्ड कॉफीमध्ये त्याला झुरळाचे (Cockroach In Cold Coffee) अवशेष सापडले होते. त्यानंतर त्यांनी त्या संबंधित तक्रार केली.
Health Alert: A customer at Open Shine Sheesha & Restaurant, Solitaire Building, Malad, opposite Infinity 2, allegedly discovered a dead cockroach in his cold coffee after consuming 70% of the beverage. Serious concerns raised over hygiene. Authorities urged to take swift action. pic.twitter.com/6gMmxYvTlP
ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेली आहे. प्रतीक आणि त्याचे मित्र हे मालाड पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या होत्या. आणि कॉफीची चव नेहमीप्रमाणे त्यांना लागली नाही. त्यांना पहिल्या घोटातच ती कॉफी थोडी कडवट लागली. त्यानंतर त्यांनी वेटरला बोलवले आणि कॉफीमध्ये स्वीट टाकण्यास सांगितले.
त्यानंतर देखील वॉटरने त्यास कॉफीमध्ये स्वीट टाकून पुन्हा त्या कॉफीचे ग्लास त्यांना आणून दिले. त्यानंतर त्यांनी कॉफी पिल्यावर शेवटी त्यांच्या लक्षात आले की, कॉफीमध्ये काहीतरी आहे. त्यांनी बारकाईने ते पाहिले तेव्हा लक्षात आले की, त्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ पडलेले आहे. त्यानंतर त्या दोघांच्याही लक्षात ही गोष्ट आली. आणि त्यांनी त्या कॉफीमध्ये असलेल्या झुरळचे फोटो काढले. आणि दोघांनी ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. आता या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर आहे. त्यांनी हॉटेल मॅनेजर बेटर आणि इतर आणि संबंधित कलम 125, 274, 275 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने (Joe Root) कसोटीत 34 वे शतक झळकावून इंग्लंडकडून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. तसेच रूटने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेट मध्ये 12377 धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट ७ व्या क्रमांकावर असून त्याने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. मात्र रूट जर असाच खेळत राहिला तर येत्या काही वर्षात तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड सुद्धा मोडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जो रूट सचिन तेंडुलकरपेक्षा 3544 धावांनी मागे आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत, तर जो रूटच्या नावावर 12377 धावा आहेत. मात्र जो रुट सध्या ज्या तुफान फॉर्मात आहे आणि ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता जो रूट लवकरच सचिनचा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे .
लॉर्ड्स कसोटीतील ३४व्या शतकानंतर, जेव्हा जो रुटला विचारण्यात आले की तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ आला आहे आणि त्याची नजर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे का, तेव्हा तो म्हणाला, मला फक्त माझ्या संघासाठी खेळायचे आहे. मी संघासाठी योगदान देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त धावा करू इच्छितो. शतक झळकावणं ही खूप छान भावना असते, मात्र कसोटीत संघाच्या विजयापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही आणि माझे लक्ष संघासाठी शक्य तेवढे योगदान देण्यावर आहे. यावेळी त्याला ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता रूट म्हणाला, ॲलिस्टर कुकने मला खूप काही दिले आहे. माझ्या कारकिर्दीत त्यांनी खूप साथ दिली.
जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणापासून 2021 पर्यंत, रूट 117 डावांमध्ये केवळ 17 शतके झळकावू शकला होता परंतु 2021 ते 2024 या चार वर्षांपेक्षा रूटने दमदार खेळ दाखवत केवळ 88 डाव खेळताना 17 शतके झळकावली आहेत. सचिन आणि जो रूट यांच्या कारकिर्दीची तुलना करायची झाल्यास,, सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावांमध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतकांच्या मदतीने 15921 धावा केल्या. तर दुसरीकडे जो रूटने 145 कसोटी सामन्यांच्या 265 डावांमध्ये 34 शतके आणि 64 अर्धशतकांच्या मदतीने 12377 धावा केल्या आहेत. म्हणजेच सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रूटला 3544 धावांची गरज आहे. त्यामुळे त्याला आणखी ३-४ वर्ष क्रिकेट खेळावं लागेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्या भल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या.. यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक विद्यमान आमदारांना घाम फुटलाय… विशेष म्हणजे राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का? अशी परिस्थिती आहे … हे बिग बी सात मंत्री कोण आहेत? त्यांना मतदारसंघात पराभवाची धूळ चारणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील? त्याचाच हा आढावा ..
मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्या भल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या.. यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक विद्यमान आमदारांना घाम फुटलाय… विशेष म्हणजे राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का? अशी परिस्थिती आहे … हे बिग बी सात मंत्री कोण आहेत? त्यांना मतदारसंघात पराभवाची धूळ चारणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील? त्याचाच हा आढावा ..सध्या मंत्रीपदावर असणाऱ्या मात्र येणाऱ्या विधानसभेला डेंजर झोनमध्ये असणाऱ्या या सात मंत्र्यात पहिला नंबर लागतो तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा…
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती कुणाची? याचा फैसला झाला तो लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेला अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रियाताईंनी धुव्वा उडवत दीड लाखाहून अधिकच लीड घेत बारामती आमचीच हे ठासून सांगितलं… सर्वात वाईट म्हणजे अजितदादा ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल 47 हजारांहून अधिकच लीड मिळालं… यावरून मुख्यमंत्री पदासाठी पक्षात फूट पाडून शिंदे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजिदादांची येणाऱ्या विधानसभेला आमदारकीच धोक्यात आलीय… पवार कुटुंबात दोन भाग झाल्याने आता युगेंद्र पवार त्यांना बारामतीतून निर्णायक लढत देताना दिसतील.. युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांकडून मतदारसंघात फिल्डींगही लावली जातेय… त्यामुळे गेल्या लोकसभेला मुलाचा… या लोकसभेला पत्नीचा… पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आमदारकीला बारामतीतूनच पराभवाची टांगती तलवार अजितदादांच्या डोक्यावर असल्याचं पाहायला मिळतंय ..
यातले दुसरे मंत्रिसाहेव आहेत ते देवेंद्र फडणवीस… होय.. जे राज्याच्या राजकारणाला आणि भाजप पक्षाला दिशा दाखवण्याचं काम करतात त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये आलाय… सलग पाच वेळा फडणवीस या मतदारसंघातून मोठ्या दिमाखात निवडून येत असले तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे… लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने चांगलाच मार खाल्लाय… हक्काच्या बालेकिल्ल्यातच नितीन गडकरी यांना खासदारकीला अवघं 33 हजारांचंच निसटत लीड मिळालं… त्यामुळे भाजपला डेमेज करायचं असेल तर फडणवीसांना मतदारसंघातच रोखण्याचा डाव विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून केला जाऊ शकतो… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे यांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवला तर फडणवीसांना मतदारसंघात गुलाल उधळण्यासाठी यंदा बरीच धडपड करावी लागेल, असं चित्र आहे…
मंत्र्यांच्या यादीतील तिसरं नाव येतं ते शंभूराज देसाई यांचं… मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅण्ड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण मतदारसंघही यंदा काठावर आलाय… . या मतदारसंघात देसाई गट विरूद्ध पाटणकर गट हे पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात… सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्रीदेखील असणाऱ्या देसाईंनी मतदारसंघात मोठा निधी आणलाय…. परंतु त्याचवेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभुराज देसाईंना धक्का दिलाय… तसेच जिल्हा बँकेतही शंभुराज देसाईंचा पराभव केलाय… महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगरकेन प्रकल्पातून त्यांनी अर्थकारणावर लक्ष केंद्रीत केलय… त्यामुळे यंदा शंभुराज देसाईंपुढे पाटणकरांचे तगडे आव्हान असणारय… यातच पक्षफुटीनंतर शंभुराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या ते रडारवर आहेत. तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरणार हे निश्चित झालंय… थोडक्यात शंभूराज देसाई यांची आमदारकीला ठाकरे – पवार चांगली कोंडी करणार असं दिसतंय…
आता येऊयात छगन भुजबळ यांच्याकडे… राष्ट्रवादीच्या फुटीत छगन भुजबळ यांनी अजितदादांना पाठिंबा दिला.. नुसता पाठिंबाच नाही तर त्यांनी जाहीर सभेतून शरद पवारांच्या विरोधात आक्रमक भाषणं केली यामुळे ते आता शरद पवारांच्याही चांगलेच रडावर आलेत… येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता तो कायमच शरद पवारांसोबत राहिलाय…. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेणेही भुजबळांना महागात पडू शकते. मराठा आरक्षणविरोधी भुमिकेमुळे भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. मनोज जरांगे पाटील यांनी तर छगन भुजबळांना येवला मतदारसंघात पाडणारंच, अशी थेट भिडण्याची भाषा बोलून दाखवलीय… त्यामुळे येवल्यात मनोज जरांगे फॅक्टर प्लस शरद पवार ही गोळाबेरीज आमदारकीला भुजबळांच्या अंगलट येऊ शकते…
या यादीतल्या पाचव्या मंत्र्याचं नाव आहे दादा भुसे यांचं… सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यासाठी आमदारकीचं घोडे मैदान चांगलंच कठीणय… बंडू बच्छाव यंदा त्यांना मालेगाव मध्य मध्ये दादा भुसे यांना कडवं आव्हान उभं करू शकतात… त्यात ठाकरे गटाच्या अद्वय हिरे यांनी भूसेंना काहीही झालं तरी पाडणारच, असा प्रण केल्याने भुसेंच्या विरोधातील राजकारणात हिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात… भुसे यांच्या विरोधातील अँटी इनकबन्सी, शिवसेनेची विभागलेली ताकद, विरोधकांनी दाखवलेली एकजूट यामुळे दादा भुसे यांना आमदारकी भलतीच जड जाणार असं दिसंतय…
सहावे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील…. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्यानं पक्षांतर्गतच विरोधाला चंद्रकांत पाटील. यांना समोर जावं लागतंय… बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर, लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात भाजपात कोथरूडच्या जागेवरून बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर ही बंडाळी पडली तर चंद्रकांत दादा यांची आमदारकीची वाट सध्या तरी बिकट दिसतेय…
या यादितले सातवे आणि शेवटचे मंत्री महोदय आहेत विजयकुमार गावित…. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासाठी यंदा आमदारकीचे मैदान वाटतं तितकं सोप्प नाहीये… नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून गावित परिवाराचं वर्चस्व आहे… परंतु या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसण्यास सुरुवात झाली… माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचं जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील धोक्यात आलय… जिल्ह्यातील संपूर्ण सत्ताकेंद्रे गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्याविरोधात स्वपक्षातील अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराची साथ दिली होती. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावित यांची आमदारकी सर्वात जास्त डेंजर झोनमध्ये आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही…
Whatsapp Scam | WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि सुलभ असल्याने तरुणांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वचजण व्हाट्सअप वापरतात. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, फोटो- विडिओ सेंड करू शकतो. मात्र जस जस तंत्रज्ञान पुढे पुढे जात असत तस तस काही फ्रॉड व्यक्तींकडून त्याचा चुकीचा वापर करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न होतोय. व्हाट्सअप वर सुद्धा अशा च प्रक्रारे काही मेसेज पाठवून ग्राहकांना फसवण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला नोकरी देतो किंवा येथे क्लिक कलेची तर तुम्हाला बक्षीस मिळेल यांसारखे अनेक मेसेज तुमचं बँक अकाउंट खाली करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजला कधीच रिप्लाय देऊ नका.
नोकरी संदेश- Whatsapp Scam
आजकाल बेरोजगारीमुळे अनेक तरुणांच्या हातात नोकऱ्या नाहीत, हीच गोष्ट लक्षात ठेऊन धोकेबाज माणसे व्हाट्सअप यूजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत . व्हॉट्सॲप यूजर्सना नोकरीच्या नावाने मेसेज पाठवला जात आहे. यामध्ये त्यांना अर्धवेळ नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये लिंक सुद्धा देण्यात येते. परंतु खरं बघितलं तर हे सर्व खोट्या जाहिराती असतात आणि अशा प्रकारे नोकऱ्या कोणालाही दिल्या जात नाहीत. त्यामुळे सदर लिंक वर कधीही क्लिक करू नका. जर तुम्हालाही असाच मेसेज आला तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा कारण अशा मेसेजचा थेट अर्थ असा होतो की तो तुम्हाला VPN शी कनेक्ट करणार आहे.
वीज कनेक्शन तोडल्याचा संदेश-
आजकाल वीज कनेक्शनचा विषय सुद्धा गंभीर बनला आहे. याचा फायदा काही धोकेबाज लोक घेत आहेत. अशा फ्रॉड व्यक्तींकडून तुमचे वीज कनेक्शन तोडण्याचे संदेश सेंड केले जातात. तुम्हालाही अशा प्रकारचा मेसेज आला तर सावध व्हा, कारण वीज कंपन्यांकडून असा कोणताही संदेश पाठवला जात नाही. हा पूर्णपणे फेक मेसेज (Whatsapp Scam) आहे, ज्यामध्ये खोटे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा मेसेजला रिप्लाय देऊ नका.
सतर्क कसे राहायचे-
जर तुम्हला अशा प्रकारची फसवणूक टाळायची असेल तर तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार करावी. एक सतर्क नागरिक म्हणून कधीही अशा संदेशांकडे दुर्लक्ष करू शकता.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितली होती, मात्र तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार आहात? असा सवाल ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, महाराष्ट्रात जे काही वातावरण चाललंय ते राजकारण नसून गजकारण आहे. पण या चुकीला माफी नाही, त्यामुळे आज आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे ठिकाणं निवडलंय. गेट वे ऑफ इंडिया… पण आज शिवछत्रपतींच्या साक्षीने बेकायदेशीररित्या बसलेल्या सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया, असे ही जनता म्हणत आहे म्हणूनच आम्ही इथे जमलो आहोत. ४ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागितली. पण माफी मागितली नसती तर या राज्याने तुम्हाला ठेवलं तरी असत का? माफी मागताना सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, ती माफी आम्हाला मान्य नाही. असं ठाकरे यांनी म्हंटल.
मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून माफी मागितली? कि पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली? कि भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी माफी मागितली असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. लोकसभा निवडणुकीआधी तुम्ही घाईघाईत, भ्रष्टाचार करुन महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. निवडणुकीपूर्वी मोदी म्हणायचे ये मोदी गॅरेंटी है.. हीच ती मोदींची गॅरेंटी जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. तुम्ही कशा कशाची माफी मागणार? घाईगडबडीत बांधलेलं संसद भवन आणि राम मंदिर गळतंय त्याची माफी मागणार? असा प्रश्न करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर घणाघात केला. हा शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे, मग्रुरीने माफी मागून चालणार नाही, हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे, आणि छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.
Mumbai Fashion street | मुंबई ही एक स्वप्नांची नगरी आहे. या ठिकाणी आपल्याला सगळ्याच गोष्टींची उपलब्धता होते. त्यातही खास करून अनेक लोक मुंबईमध्ये शॉपिंग करायला जातात. शॉपिंग करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक पर्याय आहेत. परंतु त्यातील चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्या मधोमध असलेले फॅशन स्ट्रीट खूपच फेमस आहे. अनेक लोक या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी येत असतात. परंतु आता या फॅशन स्ट्रीटचे रूप लवकरच बदलणार आहे. म्हणजेच आता नावाप्रमाणे हे फॅशन स्ट्रीट फॅशनेबल होणार आहे. आणि सर्वसामान्य लोकांसोबत अनेक अभिनेत्री देखील या ठिकाणी शॉपिंग करताना दिसत असतात. देश विदेशातील पर्यटक मुंबईला आल्यावर फॅशनची स्ट्रीटला खास भेट देण्यासाठी जातात. आता याच फॅशन स्ट्रीटचा (Mumbai Fashion street) पूर्णपणे काळ्यापालट होणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेला आहेत. आणि त्याआधी शिंदे सरकार भूमिपूजन देखील करणार आहे. आणि यासारखे आता मुंबईला महानगरपालिकेने देखील तयारी सुरू केलेली आहे.
याबाबत मुंबई महानगरपालिकेने अशी माहिती दिलेली आहे की, केवळ एकाच महिन्यांमध्ये या फॅशन स्ट्रीटचे पूर्णपणे रूप बदलणार आहे. या फॅशन स्ट्रीटची नव्याने उभारणी देखील करण्यात येणार आहे. आझाद मैदान ते क्रॉस मैदानातील गार्डन दिसतील. अशा प्रकारे या फॅशन स्ट्रीटचे काम करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी अनेक आधुनिक सोयी सुविधा असणार आहेत. स्वच्छतागृह आणि फर्निचरची व्यवस्था देखील असणार आहे. सध्या फॅशन स्ट्रीटमध्ये 112 दुकाने आहेत आणि आता ती दुकाने फुटपाथला लागून होती. परंतु ही दुकाने आता एकमेकांच्या समोर असणार आहे. त्यात थोडी जागा आणि बसायला बेंचेस देखील उपलब्ध केले जाणार आहेत.
युरोपीय आणि सिंगापूरच्या धर्तीवर आता या फॅशन स्ट्रीटचा मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे. आणि यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामाचे टेंडर देखील झाले जारी केलेली आहे. दक्षिण मुंबईमध्ये अनेक आकर्षण आहेत यासाठी अनेक लोक हे गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह तसेच देश विदेशातील पर्यटक फिरायला येतात आणि फॅशन स्ट्रीटला खरेदी देखील करतात. सणासुदीच्या काळात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गेल्या अनेक वर्षांपासून हे फॅशन स्ट्रीट चालत आहे. या ठिकाणी 112 दुकाने आहेत. या दुकान हे दुकाने जास्तीत जास्त फुटपाथवर मांडण्यात आलेली आहेत. तसेच या ठिकाणी बसायला देखील अजिबात जागा नाही. याचा अनेक नागरिकांना त्रास होतो. तसेच आधुनिक शौचालय देखील नाही. परंतु आता या फॅशन स्ट्रीटचे पूर्ण रूप बदलल्यानंतर या सगळ्या सोयी सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात महाराष्ट्राला सुखरूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यात अनेकांचा वाटा राहिला पण त्यात अगदी ठळकपणे उल्लेख करावा लागेल तो तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा… पत्रकार परिषदा घेण्यापासून टोपेंनी ओन फिल्ड केलेल काम हा त्यांच्याही आयुष्यातला माईल्डस्टोन असावा… पण याच टोपेंचं राजकारण जिवंत राहतं ते त्यांच्या हक्काच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामुळे… सलग पाच टर्म 25 वर्ष घनसावंगीची जनता त्यांच्यावर निखळ प्रेम करत आलीये… पण 2024 उजाडताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच उलटा सुलटा होऊन गेलाय… घनसावंगीत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालेत… त्यातल्या शरद पवारांच्या बाजूने राजेश टोपे आहेत… त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी हिकमत उडान आणि शिवाजी चोथेही महाविकास आघाडीचाच भाग आहेत… त्यामुळे सीनियॉरीटी आणि ज्याचा आमदार त्याला तिकीट हे फिल्टर लावून पाहिले तर मविआकडून टोपे साहेबांचे तिकीट फिक्स आहे… त्यामुळे उडान किंवा चोथे या दोघांनाही सध्यातरी दोनच पर्याय शिल्लक उरतात एकतर निवडणुकीत अपक्ष लढत देणे… किंवा महायुतीतील एखादा झेंडा हाती घेणे… शरद पवारांचे एकनिष्ठ असल्याने आणि अजितदादा ज्यांच्यावर दात ओठ खाऊन असतात, असं बोललं जातं त्या राजेश टोपे यांचं पॉलिटिकल करिअर संपवण्यासाठी दादा घनसावंगीत नेमकं कोणता राजकारण शिजवतायत? त्याचीच ही कहाणी…
घनसावंगी…हा मतदारसंघ हा बघायला गेलं तर जालना जिल्ह्यात मोडत असला तरी लोकसभेला हा परभणीच्या अंतर्गत येतो… ज्यांना शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर पासून या मतदारसंघाचा चहुबाजूने विस्तार झालाय… 2009 च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा नवा घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात आला… त्यापूर्वी त्याचं नाव अंबड असं होतं… राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे स्वतः खासदार होते. ते शरद पवारांच्या जवळचे समजले जायचे. जालना जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचा विकास करण्यातही अंकुशराव टोपे यांचा महत्त्वाचा वाटा होता….
वडिलांनी उभारलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुखपदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली. अंकुशनगर इथला सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपेंनी सांभाळली. या संस्थांच्या माध्यातून राजेश टोपेंनी जिल्हा आणि त्यांचा मतदारसंघ घनसावंगीमध्ये चांगला जनसंपर्क जपला… याच्यात जोरावर त्यांनी 1995 ला विधानसभेला लढत देऊन पाहिली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला… अखेर 1999 ला ते मतदार संघातून आमदार झाले… यानंतर मात्र त्यांनी मतदारसंघावरची आपली पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही… 2009 ला नव्याने तयार झालेल्या घनसावंगी विधानसभेत राष्ट्रवादीकडून राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली… मात्र तब्बल 23 हजार मतांनी टोपेंनी खोतकरांचा निकालात धुव्वा उडवून दिला… 2014 ला घनसावंगीत तिहेरी लढत झाली… राष्ट्रवादीकडून टोपे विरुद्ध भाजपकडून विलास खरात तर तिसरीकडे अगदी ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेले भाजपचे डॉक्टर हिकमत उडान या तिहेरी लढतीतही विजय मिळवला तो राजेश टोपे यांनीच…
मात्र 2019 ला जिल्ह्याचं राजकारण राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने राजेश टोपे यांचे विरोधात गेलं होतं… तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत हिकमत उडान यांनी घनसावंगीत पायाला भिंगरी बांधून काम केल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल 24 हजारांच लीड मिळालं होतं… हा आकडा स्पष्ट सांगत होता की टोपे यांचा पराभव फिक्स आहे… मात्र 2019 लाही टोपे निवडून आले… पण शिवसेनेच्या हिकमत उडान यांच्या विरोधात अवघ 3400 मतांचेच लीड मिळवण्यात टोपेंना यश आलं… हा विजयाचा आकडा त्यांच्या पायाखालची फक्त वाळूच सरकवणारा नाही तर टोपेंच्या राजकारणावर आभाळही आणणार होता…म्हणूनच मागील पाच वर्षात गाव पातळीवरचा कनेक्ट वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे… महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार सांभाळतानाच कोरोनाचं संकट आलं… मात्र या संकटाने अजिबात ना डगमगळता टोपेंनी केलेल्या कामाची संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही दखल घेतली… थोडक्यात आरोग्यमंत्रीपद आणि कोरोनाच्या काळात केलेलं काम यामुळे त्यांची पॉलिटिकल इमेज मोठी झालीच, पण सोबतच पक्षातील वजन वाढायलाही मदत झाली…
खरंतर टोपेंच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर सरकारच्या अनेक निर्णयांमध्ये टोपेंचा धोरणात्मक वाटा राहिलाय… राजेश टोपे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना नवीन विद्यापीठ कायदा संमत झाला होता. या कायद्यामुळे कुलगुरूंची स्वायत्तता कमी करण्यात आली होती. या निर्णयावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती…. यासोबतच नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य, सामान्य प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री पदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी राहिलाय… टोपे हे त्यांच्या वडिलांपासूनच शरद पवारांच्या जास्त जवळचे राहिलेत… त्याच राजकीय आणि कौटुंबिक वारसाला न्याय देत राष्ट्रवादीच्या पक्षफुटीत टोपे हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले… यामुळे त्यांना आगामी विधानसभेला काही अधिक प्रमाणात सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही… त्यासोबतच अजित दादा आणि राजेश टोपे यांच्यात फारसं जमत नसल्याचेही अनेक उदाहरणं राजकीय वर्तुळात चर्चेत असतात… या सगळ्या पक्ष अदलाबदलीच्या कार्यक्रमात मात्र आश्चर्य वाटाव असं राजेश टोपे यांचे दोन प्रतिस्पर्धी एक म्हणजे डॉ. हिकमत उडान आणि दुसरं नाव शिवाजी चोथे हे दोघेही महाविकास आघाडी सोबतच राहिल्याने अजितदादांना मतदारसंघातील नवा कोरा चेहरा किंवा या दोघांपैकी एकाला ऐन टाइमिंगला गळाला लावत टोपेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवावं लागणार आहे, एवढं मात्र नक्की…
बाकी राजेश टोपेंच्या राजकीय ताकदीचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी आपल्याला त्यांच्या संस्थात्मक जाळ्यावर एकवार नजर टाकावी लागते… ज्यामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी सूतगिरणी, समर्थ सहकारी बँक, मत्स्योदरी शिक्षण संस्था असा भला मोठा संस्थांचा पसारा मतदारसंघ आणि मतदारसंघ बाहेरही पसरल्यामुळे एक हक्काची वोट बँक कायमच त्यांच्या सोबत असते… त्यात शिक्षण मंत्री असताना तयार झालेली इमेज, महायुतीच्या विरोधी असणारी लाट, तगडा प्रतिस्पर्धी नसणे, शरद पवारांच्या बाजूची सहानुभूती, संस्थात्मक जाळ या सगळ्यांची बेरीज करून पाहिली तर येणाऱ्या 2024 च्या विधानसभेलाही राजेश टोपे यांचा विजय प्लसमध्ये दिसतो…
टोपेंच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न घनसावंगीत तसा भाजपकडून सुरूच आहे… त्यात मतदार संघातील खाजगी कारखानदार सतीश घाडगे यांचा नुकताच भाजप पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला… त्यांच्या उसाचे कार्यक्षेत्र मोठ असल्यामुळे ते नक्कीच मतांची महायुतीच्या बाजूने गोळा बेरीज करण्यामध्ये प्रभाव पाडू शकतात… त्यातही भाजपचे माजी आमदार विलास खरात हे किंवा त्यांचा मुलगा विश्वजीत खरात हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत… त्यामुळे राजेश टोपेंच्या मतदारसंघातील सलग डबल हॅट्रिक रोखण्यासाठी अजितदादा काही राजकीय पेरणी करतील का? की भाजप आमदार संघ आपल्याकडे खेचून आणत टोपेंना कडव आव्हान उभं करतील? घनसावंगीचा 2024 चा आमदार कोण? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन पार पडलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
खरं तर महाविकास आघडीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही कोणतीही पर्वा न करता महाविकास आघाडीने हे आंदोलन केलं. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा पार पडला. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या भव्य दिव्य मोर्चाची सांगता झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवरायांचा पण गद्दार म्हणेन. आता याना गेट आऊट ऑफ इंडिया असं म्हणायची वेळ आली असं ठाकरेंनी म्हंटल.
दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचयवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे असा थेट आरोप शरद पवार यांनी केला.