Monday, December 22, 2025
Home Blog Page 494

Mukesh Ambani | मुकेश अंबानी सर्व सामान्यांना देणार होमलोन; अशी आहे कंपनीची योजना

Mukesh Ambani

Mukesh Ambani | आपला एक स्वतःच अस हक्काचं घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक बँका देखील कर्जाच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांना मदत करत असतात. परंतु आता स्वतःचे घर बनवण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातील जनतेला मदत करणार आहे. त्यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सर्वसामान्य लोकांना होम लोन देण्याचा एक मोठी योजना आणत आहे. या कंपनीने याबाबतचे कामाची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. त्यामुळे लवकरच आता लोकांना रिलायन्स कंपनीकडून मिळणार आहे. मुकेश अंबानींनी मागील वर्षीच एनबीएफसी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सुरू केली होती. आता या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांसाठी कशाप्रकारे योजना आखली आहे. याची सविस्तर माहिती आपण जाणून.

जिओ फायनान्शिअल सर्विसेस ही एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. याबाबत त्यांनी सांगितलेले आहे की, लवकरच ते होम लोन सुरू करणार आहेत. त्यांनी टेस्टिंग म्हणून बीटा सुरू केलेले आहे. त्याशिवाय कंपनी ही प्रॉपर्टीवर लोन आणि सिक्युरिटीवर लोन यांसारखे दोन प्रोजेक्ट देखील लाँच करणार आहे.

याबाबत वार्षिक मीटिंग देखील पार पडलेली आहे. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ हितेश शेट्टी यांनी सांगितले आहे की, लोकांना आम्ही होम लोन देणार आहोत आणि या होम लोन सेवेचा पहिला टप्पा आम्ही चालू केलेला आहे. चाचणी म्हणून देखील आम्ही काही गोष्टी करत आहोत. यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीवर लोन आणि सिक्युरिटीजवर लोन देखील मिळणार आहे.

या कंपनीच्या शेअरचा भाव काय आहे. जिओ फायनान्शिअल सर्विसेसच्या शेअरमध्ये शुक्रवारी 1% पेक्षा जास्त घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार 1.21% घसरण सह हा शेअर321.75 रुपयांवर बंद झालेला आहे. या कंपनीचा शेअर हा दिवसभरात 320 पॉईंट 50 रुपये या लोअर लेव्हलला सुद्धा गेलेला होता. सध्या या कंपनीचा मार्केट कॅप दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक; संजय राऊतांनी सगळंच काढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, फडणवीसांच्या काळाइतका शिवरायांचा अपमान मोगल, ब्रिटीशांच्या काळातही झाला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आज मुंबईत हुतात्मा स्मारक चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडी कडून सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. त्यापूर्वी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राचा खलनायक म्हणूनच राहील. यापूर्वी भाजपच्या राज्यपालांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं त्यावेळी फडणवीस शांत बसले, त्यांचे मंत्री म्हणतात कि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, यातून नक्कीच काहीतरी चांगले घडेल असं म्हणतात यावर फडणवीस काय बोलले का? असा सवाल संजय राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचं शिवाजी महाराजांवरील प्रेम हे राजकीय प्रेम आहे, ते पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना कधीही शिवाजी महाराजांविषयी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रेम वाटणार नाही. जेव्हा हे सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना शिवरायांचा महाराष्ट्रा तोडण्याचा विदर्भ वेगळा करायचा होता, त्यासाठी लग्न न करण्याची घोषणा सुद्धा फडणवीसांनी केली होती. ते फडणवीस आज आम्हाला सांगतात का? खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शिवाजी महाराजांचा जितका अपमान झाला तितका अपमान तर मोगल, ब्रिटीशांच्या काळातही झाला नसेल असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रातील जनता नामर्द नाही. आम्ही शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरतोय. लोकशाही मध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावी लागते. आम्ही आज फक्त जोडो मारो आंदोलन करत आहोत, शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आम्ही आंदोलन करतोय म्हणून तिकडे भाजपची लोक सुद्धा आंदोलन करत आहेत हे हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. यांची डोकी फिरविली आहेत. भाजपचे मूर्ख लोक आमच्या विरोधात म्हणजे शिवरायांच्या विरोधात आंदोलन करत आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं.

Bachchu Kadu On Tanaji Sawant : … तर शेतकरी तुम्हाला तुमची औकात दाखवेल; बच्चू कडू तानाजी सावंत यांच्यावर संतापले

Bachchu Kadu tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलं आहे. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांशी बोलताना ज्याप्रकारची भाषा वापरली त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही तानाजी सावंत यांच्यावर संताप व्यक्त करत आता शेतकरी तुम्हाला तुमची औकात दाखवेल असा इशारा दिला आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्याची औकात काढणे एवढं काय सोप्प नाही. त्यामुळे अशा पद्धतीने बोलून कोणताही मंत्री शेतकऱ्यांची औकात काढण्याचे धडक करत असेल तर शेतकरी त्याना त्यांची औकात दाखवेल. यापूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हंटल होते, तर शेतकऱ्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत पाडलं. त्याचप्रमाणे तानाजी सावंत यांनाही परिणामांना सामोरे जावं लागेल असं म्हणत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?

धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. मात्र तानाजी सावंत हे संतापल्याचे पाहायला मिळालं. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत. सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना म्हणाले. त्यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ते या विडिओनंतर ते टीकेचे धनी बनले आहेत.

SmilePay : फक्त एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश किंवा कार्डची झंझट संपली

SmilePay FEDEREL BANK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान इतके पुढे गेलं आहे कि, आपण आजकाल खिशात पैसे घेऊन न फिरता एटीएम कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करतो. परंतु तुम्हाला जर कोणी म्हंटल कि आता फक्त एका स्माईलने (SmilePay) तुमचं पेमेंट होईल तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. फेडरल बँकेने स्माईल पे लाँच केले आहे, या पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून ग्राहक फक्त आपण चेहरा दाखवून आणि स्माईल करू पेमेंट करू शकतात. त्यामुळे एटीएम कार्ड किंवा पैसे घेऊन कुठे जाण्याची गरज नाही.

फेडरल बँकेने 29 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, SmilePay हे भारतातील पहिल्या प्रकारचे पेमेंट सोल्यूशन आहे जे UIDAI च्या BHIM आधार पे वर तयार केलेले प्रगत फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान वापरते. SmilePay ग्राहकांना फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून पेमेंट करण्यास सक्षम करते. ग्राहकांना पेमेंट करताना अधिक सोप्प आणि सुलभ व्हावं यासाठी बँकेने हि नवीन सिस्टीम आणली आहे. ग्राहक एकूण २ टप्यात सर्व प्रोसेस करू शकतात. याबाबत फेडरल बँक सीडीओ इंद्रनील पंडित यांनी म्हंटल कि, “कॅशपासून कार्ड, क्यूआर कोड, वेअरेबल आणि आता फक्त हसत हसत पैसे देण्याची संकल्पना यामुळे ग्राहकांना एक रोमांचक अनुभव येईल.

SmilePay चे फायदे काय? SmilePay

स्माइल पेच्या माध्यमातून तुम्ही कॅश, कार्ड किंवा मोबाईल डिवाइस नसतानाही पैशांचा व्यवहार पूर्ण करु शकता.
यामुळे पेमेंट करणं अतिशय सोप्प होणार आहे तसेच काउंटर वरील गर्दीपासून सुटका होईल.
हि नवी सिस्टीम सुरक्षित UIDAI फेस ऑथेंटिकेशन सेवेद्वारे समर्थित असल्याने सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहार करता येणार आहे.

मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ‘स्माइलपे’ सुरुवातीला फक्त फेडरल बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, यासाठी सदर व्यापारी आणि ग्राहक दोघांचे सुद्धा फेडरल बँकेत खाते असणे आवश्यक आहे. फेडरल बँक आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

स्माईल पे वरून कसं पेमेंट होईल?

ग्राहक आणि दुकानदार या दोघांच्याही मोबाईलमध्ये फेड मर्चंट अॅप असणं आवश्यक आहे.
तुम्हाला बिलिंग करायचे असेल तर चेकआऊट करताना स्माइल पेचा पर्याय निवडा. दुकानदार कॅमरावरून ग्राहकाचा चेहरा स्कॅन करेल आणि यूआयडीएआय सिस्टिमच्या आधारे रिकग्नेशन डेटाशी जोडेल. चेहऱ्याची ओळख पटताच तुमच्या बँक खात्यातून पेमेंट ऑटोमॅटिक केले जाईल .

किती रुपयांची मर्यादा?

आधार-सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) आणि BHIM आधार पे सेवांसाठी मानक मर्यादा एकत्रितपणे 5,000 रुपये प्रति व्यवहार आहे तसेच ग्राहक दर महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतील.

Weather Update | यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कोसळणार जास्त पाऊस; IMDकडून मोठी अपडेट

Weather Update

Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होता. परंतु त्यानंतर पावसाने थोडे विश्रांती घेतली आहे. परंतु आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस येणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितलेले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसाची (Weather Update) शक्यता वर्तवण्यात आलेली होती. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात 2 टक्के एवढा पाऊस नोंदवल्या गेलेला आहे. तसेच मराठवाडा पूर्व विदर्भ आणि कोकण विभागात देखील 12 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला. परंतु आता सप्टेंबर महिना देशातील बहुतांश भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

देशातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ईशान्येकडील राज्य लढाख हा भाग वगळता इतर सगळ्या राज्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात पुढील तीन आठवड्यात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात जास्त पाऊस पडेल आणि परतीच्या पावसाचा प्रवास देखील थोडा उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आलेले आहे. परंतु या परतीच्या पावसाचा परिणाम शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांवर होणार आहे. परंतु रब्बी हंगामातील हरभरा, वाटाणा, मसूर यांसारख्या पिकाला ओलावा मिळाल्याने या पिकांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. आता आपण ऑगस्ट महिन्यात किती पाऊस (Weather Update) पडला हे जाणून घेणार आहोत.

ऑगस्ट महिन्यातील पाऊस | Weather Update

ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशाच्या सरासरीच्या 146 टक्के पाऊस पडलेला आहे. यातील कोकण विभागामध्ये 97 टक्के पाऊस पडलेला आहे. मध्य महाराष्ट्रात 53% पाऊस पडलेला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ यांच्यामध्ये अनुक्रमे 85 आणि 77 टक्के पाऊस पडलेला आहे.

1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंतचा पाऊस

देशात 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 107% पाऊस पडलेला आहे. तसेच राज्यात 126 टक्के पाऊस पडलेला आहे. यामध्ये कोकण विभागांमध्ये सरासरीपेक्षा 30 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 51 टक्के पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस पडलेला आहे. तर विदर्भामध्ये देखील सरासरीपेक्षा 16 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. यावर्षी संपूर्ण देशात जास्त पाऊस पडलेला आहे. आणि आता दिवाळी, दसरा आणि गणपतीच्या सणांच्या तोंडावर देखील संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

LPG Price Hike : गॅस सिलिंडर महागला; सर्वसामान्यांना मोठा झटका

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ (LPG Price Hike) झाली आहे. मात्र हि दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढलेल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी हि नवीन दरवाढ लागू केली आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढले होते, आता या किमती आणखी महाग झाल्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडणार नाही.

कोणत्या शहरात किती दर ? LPG Price Hike

IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई पर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत. नवीन भाववाढीनंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1652.50 रुपयांवरून 1691.50 रुपये झाली आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. म्हणजेच येथे 38 रुपयांनी गॅस सिलेंडर महागला आहे. तर, मुंबईत या 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1644 रुपये झाली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 1855 रुपयांना उपलब्ध झाला आहे.खरं तर आपण बघितलं तर जुलैनंतर सातत्याने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहे. (LPG Price Hike)

घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर –

एकीकडे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दीर्घकाळापासून कायम ठेवली आहेत. 14 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये आणि कोलकात्यात 829 रुपयात मिळत आहे.

TCIL Bharti 2024 | टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्समध्ये 225 रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

TCIL Bharti 2024

TCIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अगदी दहावीपासून ते ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोकरीचे संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. कारण आता टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट ज्युनिअर, रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, असिस्टंट फिजिओथेरपीस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ओकेशनल थेरपीस्ट, असिस्टंट पोस्टमार्टम, टेक्निशियन, शवगृह, सहाय्यक ड्रेसर प्लास्टर सहाय्यक या पदांची भरती होणार आहे. या पदांच्या तब्बल 225 जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तसेच 13 सप्टेंबर 2024 करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | TCIL Bharti 2024

या भरती अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट ज्युनिअर, रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, असिस्टंट फिजिओथेरपीस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ओकेशनल थेरपीस्ट, असिस्टंट पोस्टमार्टम, टेक्निशियन शवगृह सहाय्यक, ड्रेसर प्लास्टर सहाय्यक इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत 225 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 32 वर्ष असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा ? | TCIL Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 13 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

खळबळजनक ! 2 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेला सोडले निर्जनस्थळी

Sexualy Assulted

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे पूर्ण झालेली आहेत. एकीकडे आपला भारत देश मोठ मोठी प्रगती करत आहे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करत आहे. परदेशामध्ये शिक्षण घेत आहे. भारतामध्ये मुलगा मुलगी समान हे मानले जाते. परंतु आजही देशांमध्ये महिलांचे अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अल्पवयीन मुलींवर ती तसेच चिमुकल्या मुलींसोबत देखील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. बदलापूरमध्ये चार वर्षीय एका लहान मुलीवर शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच अत्याचार झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नसताना दुसरीकडे एका दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार घडण्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण खरंच स्वतंत्र देशात राहतो का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.

कल्याण जवळील टिटवाळा दहागाव परिसरात ही घटना घडलेली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या आसपास घडलेली आहे. अंगणात खेळत असलेल्या एका दोन वर्ष ही घटना घडली. त्यानंतर ती पिढीत मुलगी घरी रडत गेली. आणि आई वडील विचारपूस करत असताना, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. ही पिढीत मुलगी घराबाहेर अंगणात खेळत होती. त्याचवेळी त्यांच्याजवळ राहणाऱ्या एका पुरुषांनी तिला पाहिले. आणि तिला थेट निर्जनस्थळी नेऊन तिच्या अत्याचार करण्याचे प्रयत्न केले. आणि त्याच ठिकाणी तिला सोडून दिले. त्यानंतर ती दोन वर्षाची मुलगी रडत घरी आली. तिला या अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांना देखील धक्का बसला. तिला नक्की काय झाले आहे सांगता आले नाही. परंतु संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर तिच्या पालकांनाही धक्कादायक माहिती समोर आली. आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक देखील केलेली आहे. परंतु आता या एका नवीन घटनेमुळे कल्याणमध्ये देखील संतापजनक वातावरण निर्माण झालेले आहे.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये या गोष्टींची मोठ्या प्रमाणात पुनरावृत्ती होताना दिसत आहेअगदी लहान दोन वर्षाच्य मुलींपासून ते सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या आजीबाईपर्यंत कोणती स्त्री आपल्या भारत देशात सुरक्षित नसल्यासची घटना समोर येत आहे. या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे. परंतु या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे आणि लवकरच त्यांना ठेचून काढणे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपला हा देश फक्त पुरुषप्रधान देश म्हणूनच उदयास येईल.

Livestock Census | राज्यात या तारखेपासून होणार पशुगणनेला सुरुवात; पहिल्यांदाच मोबाईलद्वारे होणार गणना

Livestock Census

Livestock Census | दर 5 वर्षांनी राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून पशु गणना (Livestock Census) करण्यात येते. यामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये नक्की किती पशु आहेत? याची संख्या मोजली जाते. आताही पशु गणना पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण राज्यात उद्या म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. यावर्षीची ही 21 वी पशु गणना आहे. ही पशु गणना एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबवली जाते. यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना होणार आहे. ही पशु गणना तब्बल चार महिने चालणार आहे. त्यामुळे पशु विभागाकडून आता चांगली तयारी देखील चालू आहे. याबद्दलची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी ही राज्यामध्ये पशुगणना केली जाते. ज्याप्रमाणे देशातील जनतेची जनगणना केली जाते. त्याचप्रमाणे पशु गणना मोहीम देखील राबवली जाते. यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये एक सप्टेंबर ते 31 डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत ही पशु गणना होणार आहे. ही पशु गणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्मार्टफोनच्या माध्यमातून ही जनगणना केली जाणार आहे.

यावर्षी राज्यातील 21 वी पशुगणना (Livestock Census) आहे. याआधी 2019 मध्ये 20 वी पशु गणना झाली होती. यासाठी प्रगनाकारणा टॅबलेट देण्यात आलेले होते. तर त्याआधी पशु गणना ही नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीमध्ये संपूर्ण माहिती नोंदवताना त्यात बराच वेळ देखील जात होता. आता या जनगणने सूत्रता आणण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी एका ॲपची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पशुधनाची माहिती भरू शकता.

या पशुगणनेमध्ये (Livestock Census) गाई वर्ग, म्हशी वर्ग, शेळी, मेंढी, कुकुट अश्व, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाते आणि याच्या आधारावरच शासनाकडून विविध योजना आखल्या जातात. आणि निधी देखील उपलब्ध होतो. त्यामुळे यासाठी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी सांगितले आहे की, नागरिकांनी खरी माहिती द्यावी. आणि या माहिती नुसार पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. औषधांचा पुरवठा केला जातो. याची माहिती दिल्यानंतरच पुढील सहकार्य करता येईल.

शेतजमिन खरेदी विक्रीच्या फसवणुकीला बसणार आळा, राज्य सरकार चालू करणार नवा प्रकल्प

Land

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे जमिनींमध्ये गुंतवणूक करत असतात. इतर कुठल्याही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक ही त्यांना फायद्याची वाटते. कारण काळानुसार त्या जमिनीचे भाव वाढत जातात. तसेच आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण त्या जमिनीवर करू शकतो. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु आजकाल यामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार देखील समोर आलेले आहे. अनेक लोक एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकतात आणि त्यातून फसवणूक होते. यातून लोकांची आर्थिक नुकसान तर होतेच. परंतु यासोबत मानसिक त्रास आला देखील सामोरे जावे लागते.

शेतीच्या या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे या प्रकारांना आळा बसवण्यासाठी एक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना खूप जास्त मदत होणार आहे. आता राज्यामध्ये ॲग्री स्टॅग नावाचा एक प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या शेतीला देखील जोडले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये भू आधार क्रमांक जोडले असल्याने व्यवहाराच्या माध्यमातून जी काही फसवणूक व्हायची ती फसवणूक आता पूर्णपणे बंद होणार आहे. कारण आधार कार्ड लिंक केल्यामुळे जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे, याची माहिती मिळणार आहे.

ॲग्रीस्टॅक प्रकल्प

संपूर्ण राज्यात हा ॲग्री स्टॅग नावाचा एक प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो आधार क्रमांक आहे. तो त्यांच्या शेतीशी लिंक केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भू आधार क्रमांक जोडले जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे आता शेतकऱ्यांची माहिती आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होणार आहे. यामुळे कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. याची माहिती अगदी काही मिनिटातच तुम्हाला समजणार आहे.

त्यामुळे जेव्हा त्या जमिनीची विक्री केली जाईल. तेव्हा त्या शेतकऱ्याचा यूआयडीएआय म्हणजेच विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून पडताळणी केली जाईल आणि नंतरच त्या जमिनीची विक्री केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आता ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये शेतीची विक्री होणे शक्य होणार नाही. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील बंद होणार आहेत. जमीन परस्पर विकण्याचे जे प्रकार घडतात. त्याला देखील आळा बसणार आहे तसेच एका शेतकऱ्याचा आधार क्रमांक लिंक असल्याने एकापेक्षा जास्त व्यक्तीला ती जमीन विकता येणार नाही.

या प्रकल्पामध्ये आता कृषक तसेच अकृषक जमीन म्हणजे नॉन अग्रिकल्चर झोनमधील जमीन देखील असणार आहे. या संदर्भात भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यावर देखील लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर शेतकऱ्याला त्याची जमीन विकायची असेल तर ती जमीन विकताना त्याच्याकडे वैयक्तिक आधाराने आधार क्रमांक असणे गरजेचे आहे. याची पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला जमीन विक्री करता येणार आहे.