Monday, December 22, 2025
Home Blog Page 495

बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नारायण कुचेंची अशी गोची झालीय

Badnapur Ambad assembly constituency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिन्धे व भाजपचा मस्तवालपणा गाडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणा… शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे स्टेटमेंट… बदनापूर अंबड हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला… पण 2014 ला भाजपचे नारायण कुचे इथून निवडून आले यानंतर शिवसेना येथून बॅक फुटला फेकली गेली… सध्याही कुचेच इथले विद्यमान आमदार आहेत… तर दुसरीकडे त्यांचे विरोधक माजी आमदार संतोष सांबरे हे शिवसेना ठाकरे गटात तर बबलू चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत… लोकसभा निवडणुकीतही सारी ताकद लावूनही बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात निकाल हा महायुतीच्या म्हणजेच नारायण कुचे यांच्या विरोधात गेला आहे… त्यामुळे कुचे हे कमळावर स्वार होत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी मशालीच्या उजेडात बदनापूर उजळण्याची शक्यता सध्या तरी दाट दिसतेय… बदनापूर अंबडमध्ये विधानसभेला नेमकं काय घडेल? नारायण कुचे यांची हॅट्रिक आरामात मारतील? की त्यांना क्लीन बोल्ड करत बबलू चौधरी किंवा संतोष सांबरे यांपैकी एक जण आमदारकीवर ठाण मांडून बसेल? याच बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी पाहुयात

प्रस्थापितांच्या विरोधात निकाल देण्याची परंपरा म्हणून तशी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी ओळख… 1990 पर्यंत इथं कुठल्याच एका फिक्स चेहऱ्याला किंवा पक्षाला जनतेनं निवडून दिलं नाही… इथला आमदारकीचा चेहरा आणि त्यांचा पक्ष हा नेहमी फिरताच राहिला… अशातच उजाडली 1990 ची विधानसभा निवडणूक… 1990 ते 1999 अशा सलग तीन टर्म इथून शिवसेनेच्या नारायण चव्हाण यांनी निवडून जाण्याचा रेकॉर्ड केला… 2004 लाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त होते, मात्र शिवसेनेने उमेदवारीचा चेहरा बदलला आणि भानुदास घुगे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… 2004 ला झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अरविंद चव्हाण यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेत इथून घड्याळाची टिकटिक सुरू केली…

मात्र 2009 ला मतदारसंघाची बांधणीच नव्याने झाली… जालना भोकरदन जाफराबाद अंबड अशा चार तालुक्यातील गावांचा मिळून नवा बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ तयार झाला… आणि विशेष म्हणजे तो अनुसूचित जातीसाठी राखीवही झाला… या नव्या कोऱ्या मतदारसंघाची निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना आसमान दाखवत शिवसेनेचे संतोष सांबरे इथून पुन्हा आमदार झाले… बदनापूर मतदारसंघ शिवसेनेचाच हे जणू ठासूनच या निकालातून स्पष्ट झालं… या मधल्या काळात शिवसेना मतदारसंघातील गावागावात रुजली… मोठी झाली… तळागाळात जाऊन पोहोचली पण 2014 ला राजकारणाचे सगळे डायनॅमिक्स बदलून गेले होते… भाजपच्या बाजूनं वारं होतं… अशातच युती आणि आघाडी या निवडणुकीत स्वतंत्र लढली… तेव्हा मतदार संघात पहिल्यांदाच भाजपच्या नारायण कुचे यांनी आमदारकीचं मैदान मारलं… राष्ट्रवादीचे बबलू चौधरी दुसऱ्या क्रमांकावर राहिले.. तर तत्कालीन शिवसेनेचे आमदार संतोष सांबरे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले… 2019 लाही याच निकालाचा रिपीट टेलिकास्ट झाला… कॅबिनेट मंत्रीपद… राज्यमंत्रीपद आणि रावसाहेब दानवेंचा मोठा फोर्स नारायण कुचे यांच्या पाठीशी असल्याने 2019 लाही राष्ट्रवादीच्या बबलू देशमुख यांच्या विरोधात नारायण कुचे निवडून आले…तेव्हा कुचे यांचे लीड होतं 18612 इतकं…

सद्यस्थितीत नारायण कुचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत… बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केलय… तर संतोष सांबरे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रति असणारी निष्ठा कायम ठेवत शिवसेनेची मशाल हातात घेतलीय… या सगळ्यात बदनापूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला काँग्रेसला 13742 इतकं लीड मिळालय… हा आकडाच स्पष्ट सांगतोय की, नारायण कुचे यांची आमदारकी धोक्यात आहे… पण खरा संघर्ष हा निवडणुकीआधी तिकीट वाटपाच्या वेळेस होणार आहे… तब्बल तीन टर्म निवडणूक लढवून यश पदरात जरी पडलं नसलं तरी बबलू चौधरी यंदाही तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत… तर दुसऱ्या बाजूला ही मूळ जागा शिवसेनेची असल्याने संतोष सांबरेंसह उद्धव ठाकरेंनीही इथून तगड्या प्रचाराला सुरुवात केलीये… त्यामुळे जागा कुणाला सुटणार? बंड होण्याचे काही चान्सेस आहेत का? मनोज जरांगे फॅक्टर मतदारसंघात कसा वर्कआउट करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जितकी क्लियर होतील तितकं मतदारसंघाच्या संभाव्य आमदाराबाबत आपल्याला भाष्य करता येईल…

विकासकाम निधीचा आपण पुरेपूर फायदा मतदार संघातील जनतेसाठी केला असल्याचं आमदार साहेब कुचे हे अगदी ठामपणाने सांगतात… अनेक योजना राबवण्यापासून ते पायाभूत सुविधांची संथ गतीने का होईना पण काम चालू असल्याचं मत स्थानिक पत्रकारांकडून समजतं… स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपची मजबूत पकड असल्याने आणि लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीला दुसरे मुद्दे महत्त्वाचे ठरत असल्याने इथून संतोष सांबरे यांना प्रचारात आणखीन आक्रमकपणा आणावा लागणार… एवढेच नाही तर विद्यमान आमदारांना डॅमेज करण्याचं कौशल्यही सांबरेंना अंगात भिनवता आलं तरच बदनापूर मतदारसंघात मशालीच्या उजेडाची वाट पाहायला मिळेल… रहदारी, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली चाळण, पाण्याचा ज्वलंत प्रश्न, अस्मानी आणि सुलतानी संकट यात पिळून गेलेला आणि प्रशासनाचे उंबरठे झिजवून त्रस्त झालेल्या शेतकरी याला तोंड विद्यमान आमदारांना तर याची दखल इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रचारात घ्यावी लागणार आहे…

त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार कोण होतोय? भाजपकडून नारायण कुचे, मविआत शरद पवार गटाकडून बबलू चौधरी, ठाकरे गटाकडून संतोष सांबरे की डॉ. संजय पगारे यांच्यात आमदारकीचा गुलाल कुणाला लागतोय? शिवसेना आपला पारंपारिक बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी बळ लावणार का? की लोकसभेच्या निकालाला रिव्हर्स फिरवत नारायण कुचेच आमदारकीची हॅट्रिक साधणार? तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

6 चेंडूत 6 सिक्स, संघाच्या 300 पार धावा; दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये धुमाकूळ

priyansh arya 6 sixes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली प्रीमियर लीगमध्य (Delhi Premier League) आज दक्षिण दिल्ली सुपरस्टार विरुद्ध उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स सामन्यात अनेक मोठमोठे इतिहास रचले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण दिल्ली सुपरस्टारने २० ओव्हर मध्ये 308 धावांचा डोंगर उभारला आहे. सलामीवीर प्रियांश आर्य आणि आयुष बडोनी यांनी शानदार शतके झळकावली. यावेळी प्रियांश आर्यने (priyansh arya 6 sixes) ६ चेंडूत ६ षटकार ठोकत नवा विश्वविक्रम केला आहे. फिरकीपटू मनन भारद्वाजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत हा कारनामा केला.

आजच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टारने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर सार्थक रॉय स्वस्तात बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आयुष्य बडोनीच्या साथीने प्रियांश आर्यने संघाचा धावफलक हलता ठेवला. प्रियांश आर्यने अवघ्या ५० चेंडूत १२० धावांची विक्रमी केली केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १० गगनचुंबी षटकार ठोकले. डावाच्या 12 व्या षटकात त्याने फिरकीपटू मनन भारद्वाजच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले. आश्चर्याची बाब म्हणजे डावखुऱ्या मनन भारद्वाजने काही चेंडू उजव्या हाताने टाकले, तरीही त्याला आपली धुलाई रोखता आली नाही. या लीगमधील प्रियांशचे हे दुसरे शतक आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुष बडोनीनेही तुफानी फलंदाजी करत फक्त 55 चेंडूंत 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्याने आठ चौकार आणि 19 षटकार ठोकले. आयुष बडोनी आणि प्रियांश आर्यच्या शतकांच्या जोरावर दक्षिण दिल्ली सुपरस्टारने 20 षटकांत 4 गडी गमावून 308 धावा केल्या. या लीगमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी कोणत्याही संघाने 300 चा टप्पा ओलांडला नव्हता. प्रत्युत्तरात उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सने सध्या ७ षटकात ३ बाद ५१ धावा केल्या आहेत. उत्तर दिल्लीसाठी आजच्या सामन्यातील विजय खूपच दूर आहे.

Indian Railways : लाल, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या ट्रेनमध्ये काय फरक असतो? प्रवाशांनो, तुम्हाला हे माहिती हवंच

Indian Railways Colours

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे (Indian Railways) हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी खर्चात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. भारतात दररोज सुमारे 23 दशलक्ष लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले असून कोणत्याही ठिकाणावरून कुठेही तुम्ही रेल्वेने आरामात जाऊ शकता. परंतु तुम्ही प्रवास करत असताना नेहमी निळया, लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची ट्रेन बघितली असेल. रेल्वेचा असा वेगवेगळा रंग असण्यामागे नेमकं काय कारण आहे? या सर्व ट्रेनमध्ये कोणता फरक आहे? हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत सगळं काही सविस्तर सांगतो.

लाल रंग-

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) लाल रंगाच्या बोगींना लिंक हॉफमन बुश म्हणतात. भारतीय रेल्वेने 2000 साली अशा प्रकारचे कोच आयात केले होते. आता हे डबे पंजाबमधील कपूरथला येथे तयार करण्यात आले आहेत. खास करून लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी लाल रंगाच्या ट्रेनचा वापर करतात. भारतात राजधानी किंवा शताब्दी सारख्या गाड्यांमध्ये लाल डबे वापरले जातात. इतर डब्यांच्या तुलनेत हे डबे हलके असतात त्यामुळे या रेल्वेगाड्या जलद पद्धतींने म्हणजेच ताशी दोनशे किलोमीटर वेगाने धावू शकतात.

निळा रंग- Indian Railways

या रंगाच्या डब्याला इंटिग्रल कोच म्हणतात. इंटिग्रल कोच फॅक्टरीत हे तयार केले जातात. मेल एक्सप्रेस किंवा इंटरसिटीमध्ये साधारणपणे निळ्या रंगाचे डबे वापरले जातात. या रेल्वेगाड्यांचा वेग हा साधारणतः 70 ते 140 किमी प्रति तास असतो. एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट गाड्यांमध्ये निळ्या रंगांच्या रेल्वेचा समावेश असतो.

हिरवा रंग-

गरीब रथमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. हिरव्या रंगाच्या डब्यांवर विविध प्रकारची पेंटिंग्ज केली जातात. कधी कधी हायस्पीड ट्रेनमध्येही हिरव्या रंगाचा कोच वापरला जातो.

पिवळा रंग –

भारतातील काही रेल्वेगाड्या या पिवळ्या रंगाच्या सुद्धा असतात. खास करून कमी अंतराच्या रेल्वेगाड्यांमध्ये पिवळ्या रंगाचे डबे वापरले जातात. या डब्यांच्या खिडक्या उघड्या असतात . अनेक वेळा शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवाशांसाठीही पिवळ्या रंगाचे डबे वापरले जातात. कोरोना काळात तर असे कोच आयसोलेशन वॉर्ड म्हणून चालवले जात होते.

तब्बल एक एकर जागेवर स्थापन करणार ‘मातृ वन’; कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली माहिती

Matru Van

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्यासाठी आपले पर्यावरण खूप जास्त महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची वाढ करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रयत्न केले जातात. सरकार देखील आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच पुढचे पाऊल टाकत असतात. अशातच आता आपल्या या पर्यावरणासाठी कृषी मंत्रालय पर्यावरण रक्षणासाठी मातृवन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जवळपास एक एकर जमिनीवर झाडे लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी ‘एक पेड मा के नाम’ ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याच मोहिमेच्या अंतर्गत हे मातृवन कार्यक्रम चालू करण्यात येणार आहे. मंत्रालयाने या योजनेअंतर्गत दिल्लीच्या पुसा कॅम्पसमध्ये देखील रोपे लावलेली आहेत.

याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे. याबद्दल ते म्हणाले की, मंत्रालय सुमारे आता एक एकर जमिनीवर मातृवन तयार करणार आहेत. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आणि त्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी सरकारमार्फत हा एक मोठा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम एक पेड मा के नाम या जागतिक उपक्रमाचा भाग असल्याचे देखील कृषिमंत्र्यांनी सांगितलेले आहे. या उपक्रमांतर्गत कृषी मंत्रालयाने सुमारे 800 संस्थांनी देशभरात 3 हजार ते 4 हजार रोपांची लागवड केलेली आहे.

केंद्र सरकारच्या या एक पेड मा के नाम या मोहिमेचे उद्दिष्ट हे सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्या संपूर्ण देशामध्ये 80 कोटी रोपे आणि मार्च 2025 पर्यंत 140 कोटी रुपये लावण्याचे आहे. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार अतोनात प्रयत्न देखील करत आहे. आपले पर्यावरण जपावे यासाठी सरकारकडून हे मोठे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधानांनी याबाबत आव्हान केल्याने त्यानंतर मंत्रालयाने वृक्षरोपणाला जन चळवळ म्हणून स्वीकारले आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकुल उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी अनेक लोकांनी भाग देखील घेतलेला आहे.

अनुभव नसणारा कॉन्ट्रॅक्टदार ते आमदाराकडून झालेली तोडफोड; राजकोट किल्ल्यावरचं प्रकरण काय?

shivaji maharaj statue fell down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर, अवघ्या आठ महिन्यांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सोमवारी कोसळला.. या घटनेमुळे, महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जातोय.. भारतीय नौदलाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती.. ज्याचं उद्घाटन, लोकसभेपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महायुतीतील, सर्वप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं.. खरतर मागील काही दिवसात, बदलापूरसारख्या गंभीर प्रकरणाचा उपयोग, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात असताना, आता या दुर्दैवी नव्हे, तर लाजिरवाण्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचही, राजकारण करायचं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सोडलं नाही… हा पुतळा नेमका काय आहे?, तो नेमका कोणी बनवला?, पुतळा बनवणाऱ्या कारागिराचं, ठाणे कनेक्शन नेमकं काय आहे?, पुतळा बनवण्यापासून, उभारण्यापर्यंत.. आणि अगदी उद्घाटनापासून , ते कोसळण्यापर्यंत झालेल्या राजकारणाचा प्रकरणातील, दोषींचा, आणि यातल्या अनेक मुख्य , माध्यमांसमोर न आलेल्या घडामोडींचा , हा ए टू झेड घटनाक्रम..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शौर्याला सलाम’ म्हणून, 4 डिसेंबर 2023 रोजी , नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला.. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे, कामाच्या दर्जावरून ,आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी , केलेल्या घाईवरून , आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय.. राज्यभर आंदोलन छेडण्याचा, इशाराही दिला.. नौदल दिन, हा साधारणपणे मुंबईत साजरा केला होता.. मात्र, मागील वर्षी , सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ, आणि मालवण किनाऱ्यावर, नौदल दिन साजरा करण्यात आला होता.. त्याच निमित्ताने , राजकोट किल्ला, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हा नौदलाच्या वतीने, उभारण्यात आला होता.. पण हा पुतळा उभारताना, अत्यंत घाईगडबडीने तो उभारण्यात आला होता.. हा पुतळा , शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्यात न आल्याने, त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचंही, बोललं जातंय.. यात सर्वात संतप्त गोष्ट अशी, की, हा पुतळा उभारण्याचे कंत्राट, ठाण्यातील जयदीप आपटे , या अवघ्या 25 वर्षांच्या तरुणाला देण्यात आलं होतं..

जयदीपचं वय लहान आहे म्हणून त्याला विरोध नाही, पण हा पुतळा उभारण्यापूर्वी, जयदीप आपटे, याला फक्त, दीड ते दोन फुटांचे पुतळे बनवण्याचा अनुभव होता.. त्यानं स्वत:च , एका मुलाखतीत अशी माहिती दिली होती.. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या, तरुण शिल्पकाराला, शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचं कंत्राट, का देण्यात आलं, असा सवाल आता निर्माण झालाय.. याप्रकणी, पोलिसांनी जयदीप आपटे, आणि Structural Consultant चेतन पाटील, या दोघांवर गुन्हा दाखल केलाय.. चेतन पाटील, यांनी, त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही.. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं.. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होतं, असं आता, त्याने स्पष्टीकरण दिलंय.. त्यामुळे हा पुतळा उभारणारा, ठाण्याचा 25 वर्षीय जयदीप आपटे नेमका कोण?, हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल..

जयदीप आपटे , हा कल्याणमधील अवघ्या 25 वर्षांचा तरुण आहे.. जयदीप आपटे, यानेच राजकोट किल्ल्यावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, 28 फूट उंचीचा, ब्राँझचा पुतळा उभारला होता.. 28 फूट उंचीचा, ब्राँझचा पुतळा बनविण्यास, साधारण 3 वर्षांचा काळ लागतो.. पण हा पुतळा , जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली, आणि तो डिसेंबर 2023 पर्यंत, म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये, पुतळ्याच काम पूर्ण झालं.. अशी माहिती, जयदीप आपटे, याने सनातन प्रभात, या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.. याच सनातन प्रभात नावाच्या, दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले होते…या मुलाखतीत, त्याने या कामाबद्दल, अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं.. त्याने या मुलाखतीत म्हटले होते , की, या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं, तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला.. संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले, तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं, काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही…कदाचित हे काम होणार होते म्हणूनच की काय या कामाच्या आधी 3 – 4 शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती.. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करताना अभ्यास होत होता.. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती ‘एखादा पुतळा तयार करणार का?’, अशी.. भारतीय नौदल काम करून घेणार.’ ‘त्यात, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की काम करायचे..

एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान मॉडेल बनवले.. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले, असे जयदीप आपटेने, मुलाखतीत सांगितले होतं.. महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, यांच्यासह अनेकांनी , या पुतळ्याच्या कामाबाबत , प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.. तसेच या कामाच्या चौकशीची मागणी केली होती.. त्यामुळे आता काही प्रश्न , स्वाभाविकपणे सर्वांच्याच समोर येतात.. पहिलं म्हणजे, अनुभव नसतानाही, ठाण्याच्या जयदीप आपटे, याला हे कॉन्ट्रॅक्ट, कोणत्या आधारावर देण्यात आलं? खरंतर पुतळ्याच्या कामाला , दोन वर्षांहून अधिकचा वेळ लागलं असताना, त्यानं ते अवघ्या, सात महिन्यात कसं पूर्ण केलं?, पंतप्रधान मोदी, आणि शिंदे फडणवीस सरकारनं, या भव्यदिव्य पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई कशासाठी केली? बाकी या प्रश्नांची उत्तरं, तपास जसा पुढे सरकेल, तस आपल्याला मिळतीलच, पण सरकारकडून, एकामागून एक घडत असणाऱ्या चुकांमुळे, विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झालेत..

यावर सगळ्यात पहिली, आणि संतप्त प्रतिक्रिया उमटली , ते कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, वैभव नाईक यांची.. वैभव नाईक, थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, ऑफिसमध्ये दाखल झाले.. हातात रॉड घेऊन , त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये , सिनेस्टाईल तोडतोड केली. .. दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात , आंदोलनाचा इशारा , वैभव नाईक यांनी दिला.. संजय राऊत यांनीही, या सगळ्या प्रकरणावरून , एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं.. राऊत म्हणाले , की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला.. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या सरकारने बनवला होता तो कोसळला.. त्यांनी चांगल्या मनाने पुतळा बनवला नव्हता, तर राजकीय मनाने बनवला होता.. महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी, त्यांनी यावेळी केली..

तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका बसला, अशा संताप्त शब्दात, सरकारवर टीका करण्यात आलीय. चूक झाली असेल, तर शासनाने माफी मागितली पाहिजे.. सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील, यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलताना दिली.. दुसऱ्या बाजूला सरकारने या सगळ्या प्रकरणाचं राजकारण न करता या दुर्दैवी घटनेवर आपली बाजू स्पष्ट केलीय… छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. या पुतळ्याची उंची 28 फूट होती. परंतु नागरिकांची मागणी होती की, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूटांचा पुतळा उभारण्यात यावा. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल…तो राष्ट्राचा सन्मान असेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे मजबूत पुतळा उभारला जावा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धरतीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. यावेळी भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलय…

राज्य सरकारने मात्र झालेल्या घटनेत सरकारचा काहीच संबंध नसून याची जबाबदारी नौदलावर ढकललीय… छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आलय…

थोडक्यात श्रेय घेण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेतात… मात्र जेव्हा दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्याची जबाबदारी त्यांना नको असते, हेच यातून उघडपणे स्पष्ट होतय… महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इतकं किळसवाणं राजकारण कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल… त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण? शिंदे फडणवीस सरकार, भारतीय नौदल, कॉन्ट्रॅक्टदार की या सगळ्यांना सत्तेच्या पदावर बसवणारी तुम्ही आम्ही जनता, तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय काढा पैसे; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

UPI ATM Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे तंत्रज्ञानाचे जग असून आर्थिक व्यवहार सुद्धा डिजिटल झाले आहेत. आजकाल पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभा राहण्याची गरज भासत नाही, कारण ठिकठिकाणी ATM मशीन उपलब्ध असून अवघ्या काही सेकंदात आपण एटीएम कार्डच्या मदतीने पैसे काढू शकतो. मात्र कधी कधी असेही होते कि आपल्याला पैशाची नितातं गरज असते आणि आपल्या खिशात ATM कार्डच नसते. परंतु तुम्हाला माहितेय का? तंत्रज्ञानाने इतकी मोठी प्रगती केली आहे कि तुम्ही खिशात एटीएम कार्ड नसताना तुम्हीच एटीएम मधून पैसे काढू शकता. होय, UPI ATM असं या टेक्निकचे नाव आहे.

UPI ATM ही एक अशी सुविधा आहे जी तुम्हाला कार्डशिवाय देखील ATM मधून पैसे काढण्याची परवानगी देते. UPI एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला फक्त UPI ॲपसह स्मार्टफोन आणि रजिस्टर UPI आयडी आवश्यक असेल. तसेच तुम्हाला असं ATM शोधावं लागेल जे UPI द्वारे कॅश काढण्याची सेवा देते. अशा एटीएमवर UPI सपोर्टिव्ह एटीएम म्हणून लेबल लावले जातात. तुम्हाला सुद्धा UPI ATM मधुन पैसे काढायचे असतील तर ते कसे काढावे? कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील याबाबत आम्ही अगदी सोप्प्या भाषेत तुम्हाला सांगणार आहोत.

ATM शिवाय पैसे कसे काढायचे? UPI ATM

तुमचा नंबर UPI रजिस्टर असेल तर तुम्ही UPI-ATM वापरू शकता.
ATM मशिनमधील UPI कॅश विहड्रॉल/कार्डलेस कॅश किंवा क्यूआर कॅश पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे तो आकडा त्याठिकाणी टाकावा लागेल.
रक्कम एंटर केल्यानंतर, एटीएम मशीनवर सिंगल यूज डायनॅमिक QR कोड दिसेल.
तुम्ही हा कोड कोणत्याही UPI ॲपद्वारे (PhonePe, Paytm, GooglePay इ.) स्कॅन करू शकता.
कोड स्कॅन केल्यानंतर, तुमचा UPI पिन टाका आणि तुमचे काम पूर्ण होईल.
आता एटीएममधून पैसे बाहेर येतील.

CISF Bharti 2024 | CISF अंतर्गत तब्बल 1130 पदांसाठी भरती सुरु; 12 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

CISF Bharti 2024

CISF Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. ती म्हणजे आता केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF Bharti 2024) यांच्या अंतर्गत कॉन्स्टेबल फायर या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 1130 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी आता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच 30 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण महिना आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव |CISF Bharti 2024

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल फायर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या

कॉन्स्टेबल फायर या पदाच्या एकूण 1130 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरतीत अंतर्गत भरती झाल्यानंतर उमेदवाराला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा ? | CISF Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Covid 19 | Covid 19 चा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; रुग्णांमध्ये आढळतात ही लक्षणे

Covid 19

Covid 19 | गेल्या तीन वर्षांपूर्वी कोरोना (Covid 19) या विषाणूने जगभर थैमान घातलेले दिसत आहे. covid-19 हा एक साथीचा आजार आहे. त्यामुळे एकापासून दुसऱ्याला देखील या आजाराचे संक्रमण झाले. या आजारात कितीतरी लोकांना या विषाणूची लागण झालेली होती. परंतु आता कोविड-19 होण्यासाठी जो व्हायरस कारणीभूत आहे तो व्हायरस आता मेंदूला देखील संक्रमित करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. संशोधनात याबद्दलची सविस्तर माहिती काढण्यात आलेले आहे. कोविड-19 झालेल्या जवळपास 19 रुग्णांमध्ये याची निरोलॉजिकल लक्षणे दिसली आहेत. उंदरांवर देखील याबाबत संशोधन करण्यात आलेले आहे. आणि या व्हायरसचा मेंदूवर कसा परिणाम होतो याविषयी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे.

नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. या माहितीनुसार स्पाईक प्रोटीनच्या विशिष्ट भागावर फॉरेन साईटवर केंद्रित आहे. हा व्हायरस पेशींच्या मागच्या दरवाजातून मेंदूवर आघात करताना दिसत आहे. ज्यावेळी ही साईट बदलली जाते. त्यावेळी व्हायरसला आपल्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी मागचा दरवाजा मोकळा असतो. हा विषणू मेंदूच्या पेशींमध्ये अधिक संक्रमित करतो. त्यामुळे ज्या रुग्णांना covid-19 झालेला आहे. त्यांना चक्कर येणे स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवत आहे. न्यूरोलॉजिकल दृष्ट्या या सगळ्या गोष्टी सत्य देखील मानल्या गेलेले आहेत.

उंदरांवर संशोधन | Covid 19

संशोधकांनी उंदरांवर देखील याबाबत प्रयोग केलेले आहे. जे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करतात. ते फुफुस आणि मेंदूच्या दोन्ही उतीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मेंदूच्या पेशींना संक्रमित करण्यात ते अधिक यशस्वी होतात. आणि त्यामुळेच मानवी मेंदूवर काहीसा नकारात्मक परिणाम झालेला दिसत आहे. या कोविड-19 च्या विषाणूच्या प्रभावामुळे हिपोकॅम्पस आणि प्रीमोटर यांसारखे आजार होत आहे. त्यामुळे वारंवार चक्कर येणे आणि स्मृतीभंश होणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

संभाव्य उपचार

या मे कोविड-19 चा मेंदूवर जो काही परिणाम होत आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी नवनवीन शक्यता वर्तवण्यात येतील. त्यामुळे आता मेंदूच्या पेशींना संक्रमित करण्यासाठी हा विषाणू नक्की कोणता मार्ग वापरतो. या गोष्टीचे संशोधन अजून चालू आहे. आणि त्यानंतर तशा प्रकारची औषधे देखील विकसित केली जाणार आहे
न्यूरोलॉजिकल गोष्टी टाळण्यासाठी हे उपचार घेणे खूप गरजेचे आहे.

Revas Bhaucha Dhakka | गणपतीसाठी बिनधास्त बोटीने जा गावाला ! रेवस भाऊचा धक्का 1 सप्टेंबरपासून सुरु

Revas Bhaucha Dhakka

Revas Bhaucha Dhakka | यंदा सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे ओसांडून वाहिली आहेत. तसेच समुद्राच्या पाण्याची पातळी देखील यावर्षी जास्त प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे समुद्रातून होणारे दळणवळण देखील बऱ्यापैकी कमी झालेले आहे. या पावसामध्ये रेवस भाऊचा धक्का या सागरी जलावरील बोटसेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद होती. परंतु आता ही बोटसेवा पुन्हा एकदा चालू करण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळे सण उत्सव आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर आता 1 सप्टेंबर पासून ही बोट सेवा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या आधी उरण भाऊचा धक्क्याची तिकीट दरात वाढ झालेली होती. परंतु आता पुन्हा एकदा या तिकीट दरात 15 रुपये कमी करण्यात आलेले आहेत..

अगदी आठवड्या भरावर गणपती सण तोंडावर आलेला आहे. अशावेळी अनेक लोक हे शहरातून त्यांच्या गावी जात असतात. मुंबईवरून अनेक लोक हे कोकणात गणपतीसाठी जात असतात. आता त्याच लोकांसाठी ही एक खूप मोठी दिल्यास देणारी बातमी आहेत. कारण आता ही बोट सेवा चालू झालेली आहे. आणि तिकीट दर देखील 15 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे. दरवर्षी पावसाळ्याचा हंगाम आला की, भाऊचा धक्का उरण या मार्गावरील बोटीतील प्रवास तिकिटात वाढ केली जाते.

यावर्षी देखील या बोटीच्या दरात वाढ केलेली होती. 26 मे पासूनच या मार्गावरील तिकीट दरात वाढ केलेली होती. आधी तिकिटाचे दर हे 80 रुपये होते. त्यानंतर ते 105 रुपये करण्यात आले. म्हणजेच या प्रवासाचे तिकीट 15 रुपयांनी वाढवण्यात आलेले होते. परंतु आता एक सप्टेंबर पासून पुन्हा एकदा हे 15 रुपयांनी वाढवलेले तिकीट कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता 1 सप्टेंबर पासून या मार्गावर जे प्रवास करतील त्यांना प्रौढांसाठी 80 रुपये, तर लहान मुलांसाठी 39 रुपये एवढे तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

पावसाळी हंगामामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये सारखा बदल होत असतो. तसेच वादळी वारे, हवामान खराब असते. समुद्रात उंच लाटा येत असतात. या सगळ्याची खबरदारी घेऊनच दरवर्षी पावसाळ्यामध्ये रेवस भाऊचा धक्का या सागरी जल मार्गावरील वाहतूक जून ते ऑगस्ट या महिन्यात बंद केली जाते. यावर्षी देखील ही वाहतूक बंद केली होती. परंतु आता सगळ्या सणांचा विचार करता आणि पावसाची शक्यता देखील कमी झाल्यानंतर या बोट सेवेचा आनंद 1 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा प्रवासी घेऊ शकतात.

Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा भारतीय संघात; आता कांगारुंची खैर नाही

Samit Dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू आणि द वॉल ही खास पदवी मिळवलेल्या राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला 9Samit Dravid) भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारताचा अंडर-19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यासाठी समित द्रविडची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत समितने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्याच कामगिरीचे फळ म्हणून समित आता भारतीय संघात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सप्टेंबरमध्ये, भारताचा 19 वर्षाखालील संघ ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 2 चार दिवसीय सामने खेळणार आहेत. या मालिकेसाठी निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला दोन्ही संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. एकदिवसीय सामन्यासाठी निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे असून त्यात मोहम्मद अमानला कर्णधारपद देण्यात आले आहे. चार दिवसीय सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली असून, त्यांची धुरा सोहम पटवर्धनच्या खांद्यावर आहे.

कधी आहेत सामने –

ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्ध 19 वर्षांखालील भारतीय संघ एकूण ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना 21 सप्टेंबर, दुसरा सामना 23 सप्टेंबर आणि तिसरा एकदिवसीय सामना 26 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हे तिन्ही सामने पुद्दुचेरी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेत. तर ४ दिवसीय २ सामनेही खेळले जाणार असून यातील पहिला सामना 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा सामना ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईत खेळवले जातील.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ:

रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन.

ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ:

वैभव सूर्यवंशी, नित्या पांड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), चेतन शर्मा. , समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.