हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Jio Recharge Plan) किमतीत पुन्हा एकदा वाढ करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात जिओने रिचार्ज प्लॅन महाग केले होते, आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत ग्राहकांचे कंबरडं मोडले आहे. मात्र हे बदल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत दिल्या जाणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आले आहेत. रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती Jio वेबसाइट आणि My Jio ॲपवर ग्राहक पाहू शकतात.
कोणकोणते रिचार्ज प्लॅन महागले – Jio Recharge Plan
जिओने आपल्या २ रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत त्यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे १०९९ रुपयांचा.. या प्लॅनमध्ये २०० रुपयांची वाढ झाली असून आता तुम्हाला १२९९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मोफत, दररोज २ gb इंटरनेट डेटा यांसारख्या सुविधा मिळतात. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच ८४ दिवस ग्राहकांना नेटफ्लिक्स चा लाभ घेता येतोय.
जिओचा दुसरा प्लॅन (Jio Recharge Plan) आहे तो म्हणजे १४९९ रुपयांचा…. या प्लॅनच्या किमतीत तब्बल ३०० रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहकांना आता १७९९ रुपये मोजावे लागतील. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मोफत, दररोज ३ gb इंटरनेट डेटा यांसारख्या सुविधा मिळतात. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच ८४ दिवस ग्राहकांना नेटफ्लिक्स चा लाभ घेता येतोय.
दरम्यान, Jio ने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ केली होती. रिचार्जच्या किमती १२-२७ टक्के वाढवून कंपनीने ग्राहकांना दणका दिला होता. तसेच काही प्लॅनमध्ये असे बदल करण्यात आले होते की यूजर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकत नाहीत. यासोबतच एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅनही महाग करण्यात आले आहेत. रिचार्ज महाग झाल्यानंतर यूजर्सना मोठा धक्का बसला आहे.अशा परिस्तिथीत देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL च्या सिमकार्डला ग्राहकांची मागणी वाढली आहे. स्वस्तात मस्त आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत बीएसएनएलचे रिचार्ज उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग तिकडे आकर्षित होऊ लागला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अश्मयुगापासून मानवाच्या उत्क्रांतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. आणि आता एक आधुनिक माणूस विकसित झालेला आहे. माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली. आपण शाळेत असताना देखील शिकलेलो आहे की, माणसाचा जन्म एका माकडापासून झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला माणसाच्या अंगावर खूप केस होते. तसेच शेपूट देखील होते. परंतु या गोष्टीचा वापर जास्त होत नसल्याने हळूहळू अंगावरील अतिरिक्त केस आधी माणसाचे शेपूट देखील गळून पडले. आणि एक आधुनिक माणूस तयार व्हायला लागला. याबद्दल डार्विनचा एक सिद्धांत देखील आहे आणि त्यांच्या सिद्धांतानुसार मानवाच्या उत्क्रांतीची ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे.
या आधुनिक मानवामध्ये ही अनेक वेगवेगळे शारीरिक बदल होताना दिसत आहे. यामध्ये लोकांची आहार शैली त्यांच्या दातांची रचना यांसारख्या गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत. तसेच संशोधकांनी आता एक असे म्हणणे मांडलेले आहे की, भविष्यात जाऊन मानवाच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला चोच देखील येऊ शकते. वयस्कर लोकांची वाढती लोकसंख्या तसेच इतर काही कारणांमुळे भविष्यात जाऊन मानवाला चोच येण्याची शक्यता आहे. असा देखील दावा करण्यात आलेला आहे. परंतु हा दावा काही नवीन नाही कारण चोच सिद्धांत हा पूर्वीपासूनच प्रचलित झालेला आहे.
या सिद्धांताबाबत सेल्फीड विद्यापीठातील संशोधकांनी उत्क्रांती सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार या समस्येवर माप मात करण्याच्या हेतूने आपोआप काही बदल घडून येणार आहेत. असे देखील सांगण्यात आलेले आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये केवळ दोन वेळेस दात येतात आणि त्या दातांच्या आयुष्य देखील आता कमी होत चाललेले आहे. लोकांच्या जेवणामध्ये बदल होत आहे. माणसांना दंतरोग वाढत आहे. परंतु जर हे दंतरोग टाळायचे असतील तर त्यांच्यासाठी चोच खूप सोयीस्कर असेल. लाखो वर्ष उत्क्रांती होऊन शेवटी चोच निर्माण होईल. असे देखील सांगण्यात आलेले आहे. याचा उपयोग करून ते गोगल गाईंचे शंख आणि खेकडे देखील पडू शकतात दणकट असते.
याबाबत एका संशोधकांनी गमतीने म्हटले आहे की, आगामी पिढीमध्ये या टूथ फेअर सेल्स नेहमी दात तयार करत राहतील. आणि शार्क माशांमध्ये सतत दात पुन्हा पुन्हा येत राहतील. आणि ही क्षमता पुढे जाऊन माणसात देखील येऊ शकते. परंतु हे सगळे बदल लगेच घडणार नाही. त्यासाठी लाखो वर्ष जावे लागतील. परंतु आता हा संशोधनाचा दावा ऐकून सर्वसामान्य माणसे देखील चिंतेत पडलेली आहे की, जर पुढील आयुष्यात माणसांना दाताऐवजी चोच आली तर अनेक गोष्टी अवघड होतील याची सगळ्यांना भीती आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अस्सल रांगडी भाषा, कार्यकर्त्यांच्या मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, अगळ पगळ राहूनही चाळीस वर्षांचा राजकीय आलेख चढत्या भाजणीचा ठेवणारे आणि विरोधकांना चकवा देण्यात एक्स्पर्ट असणारे रावसाहेब दानवेंनाच यंदा जनतेनं चकवा दिला आणि घरी बसवलं… परमनंट खासदार माजी झाले… अर्थात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हे वेगळ्या भाषेत सांगायचा नको… पण आता दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्या विरोधकांनी मोर्चा वळवलाय तो त्यांच्या सुपुत्रांच्या भोकरदन जाफ्राबाद या विधानसभा मतदारसंघाकडे… मागील दोन टर्म आमदार असणारे दानवेंचे चिरंजीव संतोष दानवे भाजपच्या तिकिटावर इथून निवडून येतायत पण अगदी काठावरच्या लीडने… म्हणूनच दानवेंच्या पॉलिटिकल करिअरला खीळ घालण्यासाठी आता त्यांच्या मुलाला काहीही झालं तरी पाडायचंच, असा जणू चंगच विरोधकांनी बांधलाय… आणि अर्थातच या सगळ्यात फ्रंटला नाव आहे ते राजाभाऊ देशमुख यांचं… वडिलांपाठोपाठ बालेकिल्लातच मुलाला पराभवाचा धक्का देण्याचा करिष्मा विरोध करतील का? वडिलांच्या पराभवाचा वचपा आमदारकीची हॅट्रिक मारून संतोष दानवे पूर्ण करतील का? दानवेंच्या मुलाची आमदारकीसाठी चहुबाजूने विरोधकांनी कोंडी कशी केलीये? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
ज्यांना प्रेमानं दाजी म्हटलं जातं ते जालन्याचे परमनंट आमदार रावसाहेब दानवे यांचा अखेर काँग्रेसच्या कल्याण काळेंनी पराभव केला… अर्थात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दानवेंना पाडण्यासाठी लावलेली फील्डिंग यात महत्त्वाची ठरली… दानवेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच राजाभाऊ देशमुख यांनी विद्यमान आमदार काळे यांच्या मदतीने सध्या आपला मोर्चा वळवलाय तो दानवे सुपुत्र भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाकडे… खरंतर दानवे कुटुंबाची राजकीय पाळमुळच भोकरदनमधून घट्ट रोवली गेली… भाजपचे बहुमत नसताना काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर पंचायत समितीच्या सभापतीची खुर्ची बळकावून रावसाहेब दानवेंनी अगदी सुरुवातीलाच तालुक्याला आपल्या राजकीय ताकतीची चुणूक दाखवून दिली होती… 1985 ला पहिल्यांदाच त्यांनी विधानसभेला सामोरे जाण्याचं धाडस दाखवलं… पण पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला… पण तोही अगदी अल्पशा मताने… या पराभवाची व्याजासहित वसुली दानवेंनी 1990 ला करून घेतली… काँग्रेसच्या रंगनाथ पाटील यांचा 25 हजारांहून अधिकच्या लिडने दानवेंनी पराभव केला… आणि तेव्हापासून 2019 पर्यंत दानवेंच्या विजयाची घोडदौड कुणालाही रोखता आली नव्हती… 1999 पासून दानवे जालन्यातून लोकसभेवर गेले असले तरी भोकरदनवरची आपली करडी नजर त्यांनी कधी हटू दिली नव्हती… दानवे म्हणतील तोच आमदार, अशी या मतदारसंघाची एकूण परिस्थिती होती…
पण दानवेंच्या वर्चस्वाला पहिला धक्का बसला तो 2003 साली… भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या विठ्ठलराव सपकाळ यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे सुपुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीकडून उभे राहिले… तेव्हाही काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुख यांनी त्यांना निवडून आणण्याचा शब्द दिला… आणि राष्ट्रवादी भोकरदनमधून निवडून आली देखील… हाच तो क्षण होता जेव्हापासून भोकरदनमध्ये दानवे विरुद्ध दानवे या संघर्षाला तोंड फुटलं… यानंतर एक ट्रेंड कायम बघायला मिळाला… भाजपकडून दानवेंच्या कुटुंबातील व्यक्ती विरुद्ध राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे अशी सरळ लढत होऊनही रावसाहेब दानवे हे अवघ्या एक दोन हजारांच्या लीडने भोकरदनची आमदारकी जिंकत आले… थोडक्यात खासदारकीला दानवे निवडणूक वन साईड मारत असले तरी भोकरदनची जागा जिंकण्यासाठी त्यांना भारी धडपड करावी लागत होती…
2009 च्या निवडणुकीत दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरवलं… यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांनी निर्मला दानवे यांचा एक हजार 639 मतांनी पराभव करत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला पुन्हा आव्हान दिलं… पत्नीचा पराभव दानवेंच्या चांगलाच जिव्हारी लागला असणार म्हणूनच 2014 दानवेंनी आपला मुलगा संतोष दानवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं… आणि भाजपच्या लाट असूनही अवघ्या साडेसात हजार मतांच्या निसटत्या लीडने संतोष दानवे यांचा विजय झाला… 2019 लाही निवडणूक घासून होणार याची रावसाहेब दानवेंना कल्पना होती… त्यामुळे लोकसभेचा गड जिंकून देखील मुलाच्या विजयासाठी मागच्या टर्मला दानवे मतदारसंघात तळ ठोकून होते… या रे या सारे या म्हणत दानवे साहेबांनी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचं भाजपात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग घडवून आणलं… प्रचारात ते महिनाभर भोकरदन मध्ये तळ ठोकून होते… या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय तब्बल 32 हजारच्या लीडने संतोष दानवे यांचा विजय झाला… चंद्रकांत दानवेंसाठी हा पराभवाचा सलग दुसरा धक्का होता…
कट टू 2024. राज्याच्या राजकारणात ज्या काही उलथापालथी झाल्याचे परिणाम भोकरदन जाफराबाद मतदारसंघातही पाहायला मिळतायत… महायुती सरकारच्या विरोधातील वातावरण, मराठा आरक्षणाची लाट आणि त्याचा सेंटर पॉईंटच जालना असल्यामुळे परमनंट खासदार दानवेंना पराभवाचा धक्का बसला… लोकसभेच्या पराभवानं किमान भोकरदनमध्ये तरी आपला निभाव लागेल का? असा प्रश्न पडून दानवे कुटुंब सध्या सेल्फ डाऊट मध्ये असणार… त्यामुळे आपण पडलो तरी मुलाचं राजकारण जिवंत ठेवायचं, यासाठी दानवे धडपड करत असताना त्यांच्या मुलाला काहीही केल्या पाडायचंच, यासाठी विरोधकांनी आता मोर्चे बांधणी केलीय…इंटरेस्टिंग गोष्ट अशी की विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम होण्याच्या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानसभेचा आपला पहिली उमेदवारी मयूर बोर्डे यांना डिक्लेअर करून भोकरदनच्या विधानसभेसाठी मोठी रंगत आणलीय… शेतीप्रश्न आणि त्या संबंधित आंदोलनांचा बोर्डे यांचा इतिहास असल्याने ते इथून संतोष दानवेंना कितपत फाईट देतील? ते पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे…
दुसऱ्या बाजूला लोकसभेला दानवेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातला आपला वावर वाढवला आहे… पारंपारिक लढत राष्ट्रवादी देत असल्याने शरद पवार गटाकडे महाविकास आघाडीत ही जागा जाणार असल्यामुळे तुतारीकडून चंद्रकांत दानवे यंदाही इच्छुक असतीलच… पण काँग्रेसच्या राजाभाऊ देशमुखांनी या जागेची आग्रही मागणी केल्यामुळे यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तिकीट वाटपात मोठा संघर्ष उभा राहू शकतो…
राजाभाऊ देशमुख आणि त्यांचे देशमुख कुटुंब हे सुरुवातीपासूनच काँग्रेसचे एकनिष्ठ समजले जातात… त्यांचे वडील एडवोकेट भाऊसाहेब देशमुख यांचे थेट गांधी घराण्याशी संबंध असणारे ते एकमेव माजी खासदार होते… त्यांचाच वारसा राजाभाऊ पुढे चालवतायेत… तसं बघायला गेलं तर रावसाहेब दानवे हे देशमुखांचे कट्टर राजकीय विरोधक… म्हणूनच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या पाठीशी सारी ताकद देशमुख यांनी लावली होती… दानवेंचा हा ऐतिहासिक पराभव राजाभाऊ देशमुख यांच्या ताकदीमुळेच शक्य झाला होता… आता तेच राजाभाऊ विधानसभेला थेट रावसाहेब दानवेंच्या मुलालाच भिडणार असल्यामुळे भोकरदन जाफराबाद ही जागा हाय व्होल्टेज लढतीमध्ये सर्वात फ्रंटला असणार आहे… त्यातही लोकसभा निवडणुकीत आपल्या वडिलांनाच संतोष दानवे भोकरदन मधून लीड देऊ शकले नाहीयेत… याचा अर्थ विद्यमान आमदार संतोष दानवे हे गॅसवर आहेत… विरोधकांची झालेली एकजूट पाहता निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार, ते तर कन्फर्म आहे… पण संतोष दानवे यांच्या विरोधात पारंपारिक प्रतिस्पर्धी चंद्रकांत दानवे की काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांना तिकीट मिळतंय, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेतेमंडळी तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. कालच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी ३ आमदार काँग्रेसला (Congress) सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. स्वता अजित पवारांनीच याबाबत माहिती देत सदर आमदारांची नावेच जाहीर केली आहेत. त्यामुळे काँग्रेस मध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आगामी प्लॅनयाबाबत सांगितलं. अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपल्याला ६० जागांवर तयारी करायची आहे. आपल्याकडे सध्या ५४ जागा आहेत, त्या तर आपण लढायच्याच आहेत. मात्र इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके हे सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत असं अजित पवारांनी म्हंटल. याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, करमाळ्याचे संजयमामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे लवकरच हे सर्व नेते जाहीररीत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
दरम्यान, महायुतीत आपल्याला ज्या काही जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असेही अजित पवारांनी म्हंटल. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या, डोळ्यात तेल घालून काम करा, हलगर्जी पणा करु नका, लोकसभेचं नरेटीव आपल्याला बदलायचं आहे अशा सूचना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बाहेर येऊन स्टेटमेंट द्या असं अजित पवारांनी सांगितलं आहे. अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेवर असून त्यांची गुलाबी थीम चांगलीच चर्चेत आहे.
RBI Warns | आजकाल सगळेच आर्थिक व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होतात. डिजिटल पद्धतीने सगळे व्यवहार झाल्याने लोकांना खूप जलद गतीने व्यवहार करता येतात. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आजकाल मोठ्या प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. अनेक लोकांचे पैसे लुबाडले जात आहेत. लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचे आम्हीच दाखवून त्यांच्याकडून अनेक स्कॅम करणारे लोक पैसे घेत आहेत. अशातच आता आरबीआयने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI Warns) लोकांना फसवणूक करण्यापासून सावध राहण्याचे सांगितले आहे. आरबीआयने लोकांना त्यांच्या बँक खात्याचे लॉगिन डिटेल्स, ओटीपी आणि केवायसी कागदपत्र कोणत्याही अनोळखी व्यक्तीला करू नये असे सांगितलेले आहे.
नुकतेच आरबीआयने (RBI Warns) गुरुवारी एक निवेदन जारी केले. आणि त्यात त्यांनी लोकांना आरबीआयचे नाव वापरून लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. याबाबतची माहिती दिली आहे. आणि फसवणूक करणारे यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. तुम्ही या कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. असे देखील सांगण्यात आलेले आहे. जे लोक फसवणूक करतात ते आरबीआय बँकेचे खोटे लेटर हेड्स, बनावट ई-मेल आयडी तसेच आरबीआय बँकेचे ऑफिसर असल्याचे सांगतात. यानंतर ते लोक लोकांना त्यांना लॉटरी मिळालेली आहे. तसेच मनी लॉन्ड्रीग, देशात पैसे पाठवणे सरकारी योजना यांसारख्या विविध ऑफर देतात आणि त्यांना पैशाचे आम्हीच दाखवून त्यांना फसवता. आणि या सामान्य लोकांकडून मनी ट्रान्सफर फीच्या स्वरूपात पैसे घेतात.
आरबीआयने (RBI Warns) सांगितले की, फसवणूक करणारे लोक हे लहान किंवा मध्यम व्यवसायिक आरबीआय बँकेचे अधिकारी म्हणून तुमच्याशी संपर्क साधतात. तुम्हाला वेगवेगळ्या पेमेंटचे आश्वासन देऊन हा एक सरकारी करार आहे सरकारी योजना आहे .असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगतात. हे लोक आयव्हीआर कॉल, एसएमएस किंवा ईमेल द्वारे लोकांशी संपर्क साधतात. तसेच काही वेबसाईट आणि ॲप्सद्वारे देखील लोकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये काही अनाधिकृत डिजिटल लोन देणाऱ्या ॲप्स देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही ॲप्स किंवा वेबसाईटवर क्लिक करू नका.
आरबीआयने सांगितलेले आहे की, तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. या ही माहिती कोणालाही देऊ नका जसे की, तुमचे क्रेडिट कार्ड नंबर ,यूपीआय पिन या सगळ्या गोष्टी सिक्रेट ठेवा. याबद्दलची माहिती कोणालाही देऊ नका. कोणतीही बँका किंवा वित्तीय कंपनी तुमच्याकडून कधीच अशा गोष्टींची विचारणा करत नाही. तसेच ग्राहकाचे नाव आणि पासवर्ड देखील विचारला जात नाही. त्यामुळे इतर कोणालाही तुमची ही माहिती शेअर करू नका. तसेच तुम्हाला कोणताही मेसेज किंवा इमेल संशयास्पद वाटत असेल, तर त्याला उत्तर देऊ नका. तसेच अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या मेलवर किंवा मेसेजवर लिंक करू नका. तसेच सार्वजनिक ठिकाणी वायफाय नेटवर्कचा वापर करू नये. असे देखील आरबीआयकडून सांगण्यात आलेले आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलावर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र तुम्ही कधी लाडकी सुनबाई योजना ऐकली आहे? गंमत नाही हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील हॉटेल राजवाडा पार्क येथे हे ‘लाडकी सुनबाई योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सासुबाईच्या जेवणावर सुनबाईला फ्री मध्ये जेवण मिळत आहे. या योजेनबाबतचे बॅनर सुद्धा शहरात फिरत असून सर्वांचे लक्ष्य वेधलं जात आहे.
काय आहे व्हायरल बॅनरवर –
सोशल मीडियावर या लाडकी सुनबाई योजनेचा बॅनर व्हायरल होत आहे. तुम्ही बघू शकता कि एका रिक्षावर हा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामध्ये लिहिले आहे कि, “हॉटेल राजवाडा पार्क, ‘लाडकी सुनबाई योजना’ सासुबाई च्या जेवणावर सुनबाई चे जेवण फ्री.
आवश्यक गोष्टी १) सासूबाईला जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे २) सासुबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार ३) कमीत कमी घरामधील पाच लोकांना जेवायला आणणे.
हे जेवण कुठे मिळणार याचा पत्ता सुद्धा सदर बॅनरवर देण्यात आला आहे. त्यानुसार, “हॉटेल राजवाडा पार्क, भिगवन रोड, टाटा मोटर्स समोर, श्रीनाथ ट्रान्सपोर्ट शेजारी बारामती. याठिकाणी जाऊन सासू आणि सुनबाई जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेलला भेट द्यावी आणि जेवण करावं यासाठी हॉटेल मालकाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेच बघायचं राहिलं होतं. टॅग करा सासू सुनेच्या जोडीला. या अनोख्या ऑफर बद्दल अनेक यूजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हंटल, “म्हणजे पाच थाळींवर एक थाळी फ्री” तर काही वापरकर्त्यानी हसण्याची इमोजी शेअर केली आहेत. आत्तापर्यंत ऐक हजार हुन अधिक लोकांनी हि पोस्ट लाईक केली आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते खरंच आहे. पुणेरी पाट्यांप्रमाणे आता पुणेरी बॅनर सुद्धा चर्चेत आले आहेत हे मात्र नक्की.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढली आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. तसेच सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही असा दम सुद्धा दिला. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांसोबतच (Farmers) अशा प्रकारची भाषा वापरल्याने याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
नेमकं घडलं काय?
धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. मात्र तानाजी सावंत हे संतापल्याचे पाहायला मिळालं. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत. सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना म्हणाले.
अमोल मिटकरींची टीका –
तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्यांचीच औकात काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर चौफेर टीका केली. बैलपोळा सणाच्या तोंडावर बळीराजाला औकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या करणे म्हणजे तानाजी सावंत यांनी स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे. तानाजी सावंत यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना आता तरी त्यांची औकात दाखवणार आहेत का? मुख्यमंत्र्यांनी सावंतांवर कारवाई केली नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी सावंतांना त्यांची औकात दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा तानाजी सावंत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान होईल असं कोणतेही वक्तव्य करू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत याना समज दिली असेल असं मुनगंटीवार यांनी म्हंटले.
Weather Update | मागील आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे. परंतु सध्या संपूर्ण राज्यात ऊन सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. तर काही ठिकाणी मात्र ऊन आहे. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत बहुतांश ठिकाणी पाऊस पडलेला आहे. परंतु आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आज म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 रोजी आणि ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे.
हवामान विभाग हे पावसाबद्दल रोजच माहिती देत असतात. आज देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस (weather Update) पडणार आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील असणार आहे वाऱ्याचा वेग 30 ते 40 प्रति तास एवढा असणार आहे. तसेच आज विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता |Weather Update
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी परतीचा मान्सून हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पडण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामध्ये ला निनोमुळे कमी दाबाचा पट्टा होऊन तयार होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परतीचा मान्सून प्रवास असणार आहे. यावेळी ला निनाच्या प्रभावामुळे मान्सून जास्त काळ राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
यावर्षी नेहमीपेक्षा जास्त पाऊस (weather Update) झालेला आहे आत्तापर्यंतच्या सरासरी पेक्षा 7 टक्के पाऊस हा देशात जास्त झालेला आहे. परंतु जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहिला, तर सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांवर मात्र त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तसेच जमिनीत ओलावा राहिल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना मात्र फायदा होणार आहे. त्यामुळे या पावसाचा एकीकडे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर दुसरीकडे तोटा देखील सहन करावा लागणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खास करून कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. लैंगिक छळाच्या तक्रारी सुद्धा अनेकदा समोर आल्या आहेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने SHe-Box पोर्टल लाँच केलं आहे. हे पोर्टल म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंदणी आणि देखरेख करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठच म्हणता येईल. हे नवीन शी-बॉक्स पोर्टल सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांसह देशभरात स्थापन झालेल्या अंतर्गत समित्या आणि स्थानिक समित्यांशी संबंधित माहितीचे केंद्रीकृत भांडार म्हणून काम करते.
महिलांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि अंतर्गत समित्यांकडून तक्रारींवर वेळेवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी हे पोर्टल खूपच उपयुक्त ठरणार आहे. हे पोर्टल सर्व तक्रारींचे खात्रीशीर निवारण आणि सुव्यवस्थित प्रक्रिया प्रदान करते. नियुक्त नोडल ऑफिसर मार्फत तक्रारींचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सोप्प करेल. येत्या २५ वर्षांत भारत आपल्या स्वातंत्र्याची शंभरी गाठणार असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार २०४७ पर्यंत “विकसित भारत” साठी वचनबद्ध आहे. विकसित भारतासाठी सरकारने गेल्या दशकभरात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर महत्त्वपूर्ण भर दिला आहे आणि सर्वसमावेशक आर्थिक वाढीसाठी महिला नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका ओळखली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटत असेल तर निश्चितच महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्य करतो. याच अनुषंगाने, नवीन शी-बॉक्स पोर्टल (She-Box Portal) हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण आणि व्यवस्थापन करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारच्या या उपक्रमाचा फायदा देशभरातील करोडो महिलांना होईल.
आपल्यापैकी अनेकांना च्युइंग गम आवडते, पण ही च्युइंगम केसांना किंवा कपड्यांना चिकटली तर त्यातून सुटका होणे कठीण होते. जर च्युइंगम कपड्यांवर चिकटली तर कपडे पुन्हा वापरण्याच्या स्थितीत राहत नाहीत आणि ते केसांना चिकटले तर केस कापावे लागतात, परंतु आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की च्युइंगम घरामध्ये असलेल्या वस्तूंच्या मदतीने देखील काढता येते केस आणि कपड्यांमधून सहजपणे काढले जाऊ शकते.चला जाणून घेऊया…
बटर
बटरच्या मदतीने आपण केस किंवा कपड्यांमध्ये अडकलेला च्युइंगम सहजपणे काढू शकता. यासाठी तुम्हाला थोडे बटर घेऊन च्युइंगमने चिकटलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करावे लागेल, त्यानंतर ते सध्या पाण्याने धुवावे. च्युइंगम सहज बाहेर येईल.
बर्फ
बर्फ हा च्युइंगम काढून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. बर्फाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या केसांतूनच नव्हे तर शूज, कपडे आणि घरातील कार्पेटमधून च्युइंगम सहज काढू शकता. यासाठी तुम्हाला बर्फाचा तुकडा घ्यावा लागेल आणि तो च्युइंगमने चिकटलेल्या भागावर घासावे लागेल. तुम्हाला दिसेल की काही वेळातच ही च्युइंगम कडक होऊन बाहेर पडेल.
बेकिंग सोडा
तुम्ही तुमच्या कपड्यांमधून आणि केसांमधून च्युइंगम काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला 2 चमचे बेकिंग सोडा एका ग्लास पाण्यात मिसळून च्युइंगम चिकटलेल्या भागावर लावावे लागेल. च्युइंगम निघेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा.
व्हिनेगर
केस आणि कपड्यांमधून च्युइंगम काढण्यासाठी व्हिनेगर तुम्हाला मदत करू शकते. व्हिनेगर लावण्यापूर्वी, मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट गरम करा. आता च्युइंगम अडकलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळ तसाच राहू द्या. काही वेळाने, हलक्या ब्रशने हळू हळू घासून घ्या आणि च्युइंगम सहज निघून जाईल.
हेअर ड्रायर
हेअर ड्रायरच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांमधून आणि कपड्यांमधून च्युइंग गम काढू शकता, परंतु हेअर ड्रायर वापरताना, गरम हवेमुळे तुमचे कपडे किंवा केस जळणार नाहीत याची काळजी घ्या. गरम हवेमुळे च्युइंगमची कपड्यांवरील किंवा केसांवरील पकड सैल होईल आणि ती सहज बाहेर पडेल.