हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Petrol Pump । पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येतेय. पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी ७ नंतर बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. रविवारी रात्री भैरोबा नाल्यात इंडियन ऑइल पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर काही लोकांनी हल्ला केल्यानंतर पेट्रोल डीलर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. यापूर्वी, येरवडा येथील इंडियन ऑइल कंपनी (आयओसी) पेट्रोल पंपावरही अशीच घटना घडली होती.
कर्मचाऱ्यांमध्ये भीती- Pune Petrol Pump
पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दोन्ही हल्ल्यांचा निषेध केला आहे . तसेच त्यांनी हे प्रकरण पुणे शहराच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. शिवाय पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरा वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पुणे पेट्रोल पंपांवर (Pune Petrol Pump) रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
आमचे परिचारक हे फक्त कामगार नाहीत, तर ते शहराला दररोज इंधन (Pune Petrol Pump) पुरवठा करणारे आघाडीचे सेवा प्रदाते आहेत. त्यांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण या बाबींवर तडजोड करता येणार नाही. त्यांच्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला एकत्रित आणि निर्णायक कारवाई केली जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी म्हंटल. जर योग्य कारवाई केली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवू. त्यानंतर एक थेंबही पेट्रोल मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.










