Youtube Subscription Price | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सोशल मीडियावर आपल्याला विविध चांगली माहिती देखील मिळते. त्याचप्रमाणे करमणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या सगळ्यांमध्ये हल्ली युट्युब मोठ्या प्रमाणात वापरले जाते. youtube वर आपल्याला सगळ्या प्रकारचा कंटेंट पाहता येतो. त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला youtube ची गरज लागते. परंतु अनेकदा youtube चे व्हिडिओ पाहताना आपल्याला खूप जाहिराती येतात. परंतु जर आता तुम्हाला या जाहिराती नको असतील, तर यावर एक खूप मोठा तोडगा निघालेला आहे. तो म्हणजे युट्युब प्रीमियम या youtube प्रीमियमचा (Youtube Subscription Price) लाभ घेऊन तुम्ही जाहिराती नसलेले व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड प्लेबॅक आणि हाय डेफिनेशन व्हिडिओ कॉलिटी देखील पाहता येईल. youtube प्रीमियम सध्या खूप लोकप्रिय आहे. आणि अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत. परंतु आता youtube प्रीमियमच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर युट्युब प्रीमियमच्या किमती किती वाढलेल्या आहेत. आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेऊया.
युट्युब प्रीमियमच्या किमती किती वाढल्या | Youtube Subscription Price
Youtube च्या प्रीमियममध्ये इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि स्टुडन्ट प्लॅनचा समावेश आहे. प्रत्येकजण त्याच्या गरजेनुसार प्लॅन घेत असतो. आता आपण जाणून घेऊया या प्लॅस्टिकची किंमत किती वाढलेली आहे.
इंडिव्हिज्युअल प्लॅन्स
आधी या इंडिव्हिज्युअल प्लॅनची किंमत ही 129 रुपये होती. परंतु आता तीच किंमत वाढून 149 रुपये झालेली आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये जाहिरात नसलेले व्हिडिओ पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड प्लेबॅक आणि खास कंटेंट देखील पाहायला मिळेल.
फॅमिली प्लॅन
हा प्लॅन आधी 189 रुपयांना मिळत होता. परंतु आता त्याची किंमत वाढलेली आहे. आणि हा प्लॅन 299 मिळतो या प्लॅनमध्ये एकाच सबस्क्रीप्शनवर पाच जणांना youtube चा फायदा घेता येतो. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला कोणत्याही जाहिराती दिसत नाहीm आणि चांगली कॉलिटीमध्ये व्हिडिओ पाहायला मिळतात.
स्टुडन्ट प्लॅन
यूट्यूबच्या प्रीमियम प्लॅनमधील हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. आधी या प्लॅनची किंमत 79 रुपये होती. परंतु आता तीच वाढून 89 रुपये एवढी झालेली आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये ऍड फ्री व्हिडिओ पाहण्याची संधी मिळते.
नवीन सबस्क्रिप्शनसाठी फ्री ट्रायल | Youtube Subscription Price
जर तुम्ही youtube प्रीमियम वापरायचे की नाही, अशा प्रश्नात असाल तर तुम्हाला युट्युब एक महिना फ्री ट्रायल ऑफर करत असते. तुम्हाला यामध्ये सर्व फायद्यांचा अनुभव घेत आहे. तो आणि त्यानंतरच तुम्ही सबस्क्रिप्शनचा फायदा घ्यायचा की नाही याचा निर्णय घेऊ शकता. तसेच युट्युब प्रीमियममध्ये प्रीपेड प्लॅन्सह आहेत. हे प्लॅन स्वतःहून रीन्यू होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांचे मॅन्युअल रीन्यू करावे लागते. या प्लॅस्टिकच्या किमती देखील आता वाढलेले आहेत.परंतु आता युट्युब प्रिमियमच्या किमती वाढल्यामुळे अनेक युजर्स झालेले आहे.
Mahada Lottery : सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी घरं उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’ अशी म्हाडाची ख्याती आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईसाठी घोषित करण्यात आलेल्या सोडतीमधील घरांच्या किमती बघता तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. या घरांची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांनी म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळेच एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. म्हाडाच्या घराच्या किमतींमध्ये दहा ते पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात (Mahada Lottery) आला असून याबाबत मंत्री अतुल असावे यांनी मुंबई येथे घोषणा केली.
याबाबत माहिती देताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, म्हाडाच्या घराच्या किंमती या 10 ते २५ टक्क्यांनी कमी होतील. विविध पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील याचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या गृह खरेदीदारांना याचा मोठा (Mahada Lottery) फायदा होणार आहे.
कोणत्या घरांच्या किमती होणार कमी? (Mahada Lottery)
मिळालेल्या माहितीनुसार 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनेतील घरं विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत. या घरांच्या किमती कमी होणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी किमती दहा टक्के कमी होणार आहेत तर मध्यम गटासाठी पंधरा टक्के रक्कम कमी होणाऱ आहेत तर अल्पगटासाठी 20% रक्कम कमी होणार आहे. शिवाय अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किमतीमध्ये 25 टक्क्यांनी घसरण (Mahada Lottery) होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस तयार होणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या हा महामार्ग चार पदरी असून आत्ताचा महामार्ग हा पूर्णपणे खराब झालेला आहे.
सध्याच्या मार्गाबाबत बोलायचं झालं तर सध्याचा मार्ग हा पुणे ते शिरूर शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजी नगर असा आहे. यातील पुणे ते शिरूर हा चौपदरी मार्ग चांगल्या स्थितीत आहे. यावरून जलद गतीने वाहतूक सुरुये परंतु शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा मार्ग हा अत्यंत खराब झालेला आहे. या मार्गावर खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय खराब रस्ते म्हणजे अपघाताला आमंत्रण. हा मार्ग व्यवस्थित होणे गरजेचे आहे.
अडीच तासांत पूर्ण होणार प्रवास
शिरूर ते छत्रपती संभाजी नगरचा प्रवास कधी कधी आठ तास आणि त्यापेक्षा आधीक काळचा होऊन जातो. मात्रता केंद्र सरकारने नवीन ग्रील्फिड एक्सप्रेस वे ची घोषणा केली आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही शहरां दरम्यानचा प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार असा दावा करण्यात येत आहे.
काय आहे स्टेट्स ?
या महामार्गाची घोषणा होऊन बरेच दिवस उलटले तरीही त्याच्या सर्वेक्षणाबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसते. त्यामुळे या महामार्गासाठीची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार असा सवाल सामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो आहे. एकंदरीतच घोषणा झाल्यानंतर या महामार्ग संदर्भात कोणतीच हालचाल झाली नाही पण आगामी काळात या महामार्गासाठी सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यानंतरच संरक्षण आणि डीपीआर रेडी होईल अशी आशा आहे संरेखान आणि डीपीआर रेडी झाल्यानंतर मग या रस्त्यासाठी भूसंपादन केलं जाईल आणि भूसंपादनानंतर या रस्त्यासाठी टेंडर काढले जाईल मग जी कंपनी टेंडर घेईल त्या कंपनीकडे प्रकल्पाचे काम सुपूर्द केलं जाणार आहे
Swadhar Yojana | सरकारने आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणली आहे. त्यातही सर्वसामान्य नागरिकांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकारने योजना आणलेल्या आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील चांगले शिक्षण घेता यावे. त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी देखील सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि यातीलच एक योजना म्हणजे स्वाधार योजना. (Swadhar Yojana) ही योजना खास विद्यार्थ्यांसाठी सरकारने आणलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असते. सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आता या योजनेची आपण संपूर्ण माहिती घेऊन जाणून घेऊया.
स्वाधार योजना काय आहे ? | Swadhar Yojana
ही स्वाधार योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे देखील म्हणतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे संपूर्ण शिक्षण घेता येत नाही. त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळेच अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता इत्यादी खर्चासाठी 51 हजार रुपये सरकारकडून दिले जातात.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
सरकारच्या या स्वाधार योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. दहावी आणि बारावी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना जर 60% पेक्षा जास्त मार्क्स असतील, तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी संबंधित विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच स्वतःचे बँक अकाउंट देखील असावे. स्वाधार योजनेअंतर्गत सुरुवातीला बोर्डिंगच्या सुविधेसाठी 28 हजार रुपये दिले जातात. तसेच राहण्यासाठी 15 हजार रुपये दिले जातात. तसेच मेडिकल आणि इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 5 हजार रुपये दिले जातात.
योजनेचा अर्ज कसा करायचा ? | Swadhar Yojana
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होम पेजवर असलेला स्वाधार योजनेचा फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक असणारी माहिती आणि कागदपत्र जोडावे लागतील. आणि ती माहिती जवळील समाज कल्याणच्या कार्यालयात जमा करावी लागेल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. बहुतांश लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून असतात. परंतु शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना उत्पन्न देखील मिळत नाही. भारतात एकीकडे असा शेतकरी वर्ग आहे, जे कसेबसे कमावून खातात. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी शेतीच्या जीवावर मोठमोठे व्यवसाय चालू केलेले आहेत. आता असाच भारतातील एक शेतकरी आहे. ज्याने एक ट्रेनच खरेदी केलेली आहे . ट्रेनचा मालक असलेला हा भारतातील एकमेव व्यक्ती आहे. तसेच या शेतकऱ्याला त्या ट्रेनची कायदेशीर मालकी देखील मिळालेली आहे. आपल्या देशात अनेक श्रीमंत लोक आहेत. मुकेश अंबानी गौतम आदानी. परंतु भारतातील या सर्व श्रीमंत असणाऱ्या लोकांकडे देखील स्वतःच्या मालकीची रेल्वे नाही. परंतु या शेतकऱ्याने एक पूर्ण रेल्वेत विकत घेतलेली आहे. परंतु त्यांनी हा एवढा मोठा प्रवास कसा केला. याबद्दलची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांनाच असेल. आणि आज त्याचीच एक कहानी आपण जाणून घेणार आहोत.
या शेतकऱ्याचे नाव संपूर्ण सिंग असे आहे. हा शेतकरी पंजाबच्या लुधियाना येथे रहिवासी आहे. त्यांनी दिल्ली ते अमृतसर येथे जाणारी पूर्ण ट्रेन स्वर्ण शताब्दीची मालकी विकत घेतलेली आहे. त्यांनी लुधियाना ते चंदिगड रेल्वे मार्गासाठी 2007 मध्ये रेल्वे शेतकऱ्यांच्या काही जमिनी देखील खरेदी केल्या होत्या. रेल्वेने 25 लाख रुपये देत त्यांनी जमिनीची मालकी मग मिळवल. परंतु त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण सिंग यांना समजले की, तितकी जमीन शेजारच्या गावात 71 लाख रुपये प्रति एकर मध्ये खरेदी केली .
त्यांना असे समजले की, त्यांच्या आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली आणि त्यांची नुकसान भरपाई म्हणून 25 लाखाचे 50 लाख रुपये देण्यात यावेत. असे देखील त्यांनी सांगितले. कोर्टाने ही रक्कम वाढवून 1.47 कोटी रुपये इतकी केली. तसेच 2015 मध्ये संपूर्ण तितकी रक्कम देण्यात यावी असे देखील आदेश निघाले. परंतु त्यांना केवळ 42 लाख रुपये दिले गेले.
त्यानंतर 2017 मध्ये सत्र आणि जिल्हा न्यायाधीश जसपाल वर्मा यांनी लुधियाना स्थानकावर ट्रेन जप्त करण्याचा आदेश काढले. कार्यालय जप्त करण्याचे देखील आदेश दिले होते. त्यावेळी तिथे संपूर्ण पोहोचले आणि उपस्थित असलेली अमृतसर स्वर्ग शताब्दी एक्सप्रेस ट्रेन त्यांनी जप्त केली. आणि त्या ट्रेनचे मालक झाले. त्यामुळे ते देशातील एकमेव असे व्यक्ती आहेत. ज्यांची स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. अनेक मोठ मोठ्या उद्योगपतींना जमले नाही. ते या एका शेतकऱ्याने करून दाखवलेले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याची चर्चा चालू आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर ही तशी सहकाराची पंढरी… त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्ह्यातल्या घराघरात जाऊन पोहोचली.. अपवाद फक्त अहमदनगर शहराचा… सर्वांना आश्चर्य वाटेल पण नगर शहर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.. तब्बल 25 वर्ष अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मध्ये कायम भगवा फडकवत ठेवला… पण 2014 ला राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी फाटाफुटीच्या राजकारणाचा फायदा घेत अहमदनगर शहर मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं… ते आमदार झाले… हीच गोष्ट 2019 लाही रिपीट झाली… त्यामुळे मागील एक दशक या मतदारसंघावर होल अँड सोल फक्त आणि फक्त संग्राम जगताप पॅटर्नच चालतोय… जगतापांचे पारंपारिक विरोधक अनिल राठोड यांचे निधन झाल्यामुळे त्यांना विधानसभेला म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही… पण राष्ट्रवादीच्या फुटीत संग्राम जगतापांनी धाकल्या पवारांची वाट धरल्यामुळे आता जगतापांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार – जयंत पाटील मैदानात उतरलेत… त्यांनी तुतारीकडून एका नव्या नावाला मतदार संघासाठी बळ द्यायला सुरुवात केलीय…
यासोबतच जवळपास विसच्या घरात काही नवखे तर काही अनुभवी राजकीय मंडळीही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत… त्यामुळे अहमदनगर शहरमधून संग्राम जगतापांना आमदारकीची हॅट्रिक करण्यासाठी नेमकं कोणत्या आव्हानांना सामोर जावं लागणार आहे? किरण काळे – अभिषेक कळमकर – भगवान फुलसुंदर – राणी लंके यापैकी नेमकी कुणाच्यात जगतापांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याची धमक आहे? अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कशी होईल? मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत? आघाडी युती नगरमध्ये कशी वर्क करते? आमदार साहेब जगतापांचं दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड काय सांगतय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
तसं बघायला गेलं तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना एके शिवसेना… अन् शिवसेना दुणे शिवसेना… असंच वातावरण होतं… अनिल राठोड इथले पर्मनंट आमदार म्हणून ओळखले जात होते… पण त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला… राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी राठोडांचा टांगा पलटी घोडे फरार करत राष्ट्रवादीला शहरामध्ये बस्तान बांधून दिलं… ते आमदार झाले… 2019 लाही संग्राम जगतापांनी राठोड यांना जड जात आमदारकी आपल्याजवळच ठेवली… विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभेला संग्राम जगताप भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते… लोकसभेला पराभव झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी आपलं राजकारण पुन्हा एकदा स्टेबल केलं… मधल्या काळात त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या बऱ्याच वावड्याही उठल्या.. पण ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले… खरंतर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी सगळं काही ऑल ओके चाललं होतं… पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि स्थानिक समीकरणा ध्यानात घेऊन संग्राम जगतापांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला… मधल्या काळात अनिल राठोड यांचं निधन झाल्यानं जगतापांच्या विरोधात तोडीच तोड द्यावा असा उमेदवारच महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नाहीये, असं बोललं जाऊ लागलं… पण वेळ जशी पुढे सरकत गेली तशी अनेक नावं समोर येऊ लागली… लोकसभा निवडणुकीचा निकाल आघाडीच्या बाजूने लागला असला तरी अहमदनगर शहर विधानसभेतून लीड हे सुजय विखेंना मिळालय… पण यात संग्राम जगताप यांच्या इतकाच स्थानिक भाजप नेत्यांचाही मोठा वाट असल्याने कमळानेही नगरवर क्लेम करायला सुरुवात केलीये… दुसऱ्या बाजूला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट अहमदनगरच्या जागेसाठी आग्रही आहेत…
यात भाजपकडून अभय आगरकर, महेंद्र गंधे यांनी उमेदवारासाठी दंड थोपटलेत.. माजी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या उमेदवारीची मागणीही स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार उचलून धरली जात आहे… त्यात भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष्या प्रिया जानवे यांनी पक्षाने संधी दिल्यास विधानसभेसाठी तयार असल्याचं बोलून दाखवल्याने महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून संघर्षाची ठिणगी पडू शकते… लोकसभेला सुजय विखेंना मिळालेल्या मताधिक्यामध्ये जितका आमदार साहेब जगतापांचा वाटा आहे अगदी तितकाच भाजपचा देखील… त्यामुळे अनेक दशकांपासून अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याची इच्छा भाजप यंदा पूर्ण करेल का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
दुसऱ्या बाजूला उमेदवारीची खरी चुरस आहे ती महाविकास आघाडीमध्ये… संग्राम जगताप अजितदादा गटात गेल्याने शरद पवार गटातील… तर त्यांचे पारंपारिक विरोधक दिवंगत आमदार अनिल राठोड हे शिवसेनेत असल्याने ठाकरे गट… उमेदवारीसाठी एकमेकांवर तुटून पडलेत… यात शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे… शिवसेनेतून शरद पवारांची तुतारी हाती घेणारे अभिषेक कळमकर तसे मूळ राष्ट्रवादीचेच… त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर हे शरद पवारांचे अत्यंत कडवे एकनिष्ठ म्हणून समजले जातात… 2019 ला अभिषेक राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेसाठी इच्छुक होते… मात्र जगताप आणि कळमकर यांच्यात राजकीय खटके उडाल्याने तेव्हा त्यांनी तडकाफडकी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती बांधलं… मात्र राष्ट्रवादीच्या फुटीत जगताप अजितदादा गटात गेल्याने शरद पवार गटातील स्पेस भरून काढण्यासाठी कळमकर यांनी जयंत पाटलांच्या हातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला… त्यामुळे घड्याळ विरुद्ध तुतारी… राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी… जगताप विरुद्ध कळमकर अशी तगडी लढत 2024 ला मतदारसंघात पाहायला मिळू शकते… पण यात एक अडथळा आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुकांच्या गर्दीचा…
शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे यांची नावं यात सर्वाधिक चर्चेत आहेत.. यातील फुलसुंदर आणि बोराटे हे माळी समाजातून येत असल्याने या समाजाचे एकगठ्ठा मतदान लक्षात घेऊन या दोघांच्या नावाचाही महाविकास आघाडी गांभीर्याने विचार करू शकते… मात्र अहमदनगर हा सर्व जातींचा संमिश्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… त्यामुळे तिथे जातीय समीकरण हा फॅक्टर महत्त्वाचा असला, तरी तो निर्णायक मात्र कधीच नसतो… पण लोकसभेला मुस्लिम आणि दलित समाजाकडून मतदानाची वाढलेली टक्केवारी ही जगतापांना नगरमध्ये मायनस मध्ये घेऊन जाऊ शकते… बाकी लोकसभेला जगतापांनी सुजय विखेंचं काम केल्याने… आणि जगताप – विखे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असल्याने विखे पाटलांची मोठी ताकद विधानसभेला संग्राम जगतापांच्या पाठीशी राहणार आहे…
उरला प्रश्न तो विकास कामांचा… तर एमआयडीसी परिसरात वाढलेली गुंडगिरी – अवैध धंदे यामुळे मोठे प्रोजेक्ट किंवा लहान सहान स्टार्टपही यायला इथे खीळ बसलीय… अनेक ठिकाणी चालता येतील असे अजून धड रस्ते देखील नाहीयेत…. बेरोजगारी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आजही मोठा प्रश्न शहरापुढे आहे… बाकी संग्राम जगताप यांनी मागील काही वर्षात भरीव निधी मतदार संघासाठी आणलाय… यामध्ये रस्त्यांची काम, उड्डाणपूल, सौर ऊर्जा प्रकल्प आणि उद्यानांची काम जवळपास पूर्णत्वास आली आहेत… त्यामुळे जगतापांच्या तब्बल एक दशकाच्या राजकीय वर्चस्वाच्या काळानंतर त्यांना आव्हान द्यायला नेमका कोणता भिडू मैदानात उतरेल? मशाल की तुतारी चिन्हावरून लढत दिल्यास जगतापांसाठी सामना अटीतटीचा होऊ शकतो? अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
Stock Market Fraud | अनेक लोक हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या मार्केटमध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.भारतीय अनेक लोक हे शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. परंतु आता याचाच फायदा घेऊन अनेक फसवणूक देखील करत आहे. यामध्ये अनेक गुंतवणूकदार हे बाजारातील चांगल्या परताव्याचे लोकांना आश्वासन देतात आणि त्यांची फसवणूक (Stock Market Fraud) करतात. यामध्ये ते गुंतवणूकदारांचे सगळे पैसे काढून त्यांना गुंतवणूक करायला सांगतात. आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. आता बाजार नियमक सेबी वारंवार गुंतवणूकदारांना अशा फसवणुकीपासून लांब राहण्याचा सल्ला देत असतात. परंतु तरीही अनेक लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात.
मुंबई पोलिसांनी जवळपास 355 गुंतवणुकी संबंधित फसवणुकीच्या केसची माहिती दिलेली आहे. यातील 91 लोकांना अटक देखील करण्यात आलेले आहे. तर बाकीच्या लोकांचे तपासणी सुरू झालेली आहे. माहितीनुसार याचा वर्षांमध्ये केवळ चार महिन्यातच सायबर फसवणुकीमुळे (Stock Market Fraud) देशातील जवळपास 7, 061, 51 कोटी रुपये गमावलेले आहेत. यातील 1420 . 48 कोटींचा वाटा हा केवळ शेअर फसवणुकीचा आहे म्हणजे. शेअर बाजारात लोकांची फसवणूक करून इतक्या कोटींचा तोटा झालेला आहे.
यातील भौतिक घोटाळे हे पीच बुचरीनचे आहेत. यामध्ये अनेक लोक हे स्टॉक मार्केटचे तज्ञ असल्यासारखे लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांना चांगला परतावा मिळेल सांगतात. आणि त्यांची फसवणूक करतात. ही फसवणूक सहसा सोशल मीडिया त्याचप्रमाणे व्हाट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून होत असते. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदाराशी संबंधित माहिती मिळवतात. त्यांच्याशी संपर्क साधतात. आणि गोड बोलून त्यांची आर्थिक फसवणूक करतात.
याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की विलेपार्ले येथील पण 54 वर्षीय इस्टेट सल्लागाराची पुण्यातील सीए रचना रानडे यांचे नाव वापरून कोणीतरी 2.25 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही बनावट व्हिडिओ पाहिले होते. आणि त्या व्हिडिओला त्या बळी पडल्या आणि त्यांची एवढी मोठी फसवणूक झालेली आहे. याबाबत एका अहवालात तसे सांगण्यात आलेली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसव्या जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. केवळ व्हाट्सअँप वरच यासंबंधीत 81000 पेक्षा जास्त बनावट ग्रुप बनवलेले आहेत.
तसेच पत्रकार आणि अर्थशास्त्रज्ञ उदय मुखर्जी यांनी सांगितलेली की, माझ्या नावाने फसवणूक होत असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी कुलाबा पोलिसांशी संपर्क साधला तसेच मी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही याची माहिती माझ्या मित्रांना दिली. अशाप्रकारे अनेक लोक हे नामांकित माहिती गोळा करून त्यांच्या नावाने लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे.
अशीच फसवणूक रचना रानडे यांच्या नावाने देखील झालेली आहे. त्यांनी एक्स आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करून लोकांना याबाबत चेतावणी दिलेली आहे. त्यांचे नाव आणि फोटो वापरून लोकांची फसवणूक होत असल्याची त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी सायबर पोलिसांकडे देखील तक्रार केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी लोकांशी संपर्क साधून नये. तसेच संशयास्पद असलेल्या लिंकवर देखील क्लिक करू नये. आणि अनाधिकृत ॲप्स डाऊनलोड करू नका. असा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला जर असा कोणत्याही संबंधित प्रकार घडला, तर तुम्ही 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी लखनौ सुपरजाईंटने (Lucknow Super Giant) भारताचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज झहीर खानची(Zaheer Khan) मेंटॉर पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी गौतम गंभीर लखनौचा मेंटॉर होता, त्यानंतर २०२४ च्या आयपीएल मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाला आणि तेव्हापासून हे पद रिक्त होते. जस्टिन लँगर लखनऊ सुपरजाईंटचा प्रशिक्षक झाला, मात्र त्यावेळी लखनौचा संघ संपूर्ण स्पर्धेत गडबडला. आता फ्रेंचायजीने झहीर खानची मेंटॉर पदी निवड केली आहे. लखनऊ सुपर जायट्ंसने आपल्या अधिकृत खात्यावरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आली.
झहीर खान हा आत्तापर्यंत ३ संघाकडून आयपीएल खेळला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून प्रतिनिधीत्व केलं आहे. यपीएल मध्ये झहीर खानने 100 सामने खेळले आहेत. झहीरकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. एकेकाळचा भारतीय संघाचा टॉपचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते.त्यामुळे झहीरच्या अनुभवाचा लखनौ सुपरजाईंटला आणि खास करून लखनौच्या गोलंदाजीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या लखनौ सुपरजाईंटच्या टीम मॅनेजमेन्ट आणि कोचिंग स्टाफबाबत बोलायचं झाल्यास, जस्टिन लँगर हे मुख्य कोच आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आता या स्टाफमध्ये झहीर खानचा समावेश झाला आहे.
झहीर खानची गणना भारतात क्रिकेट खेळलेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, त्याने एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 8 ऑक्टोबर 1978 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या, झहीर खानने 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अगदी कमी वेळेत तो भारतीय क्रिकेट संघात एक प्रमुख गोलंदाज बनला. 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि त्यानंतर 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो प्रमुख सदस्य होता. झहीरने 2011 च्या सामन्यात केवळ 9 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या. नवीन चेंडू स्विंग करण्याची आणि जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात झहीर माहीर आहे. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झहीर खानने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत काम केले. युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची कला झहीरच्या अंगात आहे. लखनौचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्केल टीम इंडिया सोबत जोडला गेल्यानंतर आता झहीर खानच्या अनुभवाचा संघाला फायदा होऊ शकतो.
Indian Railway : संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेला पसंती दिली जाते. आता रेल्वेच्या प्रवाशांकरिता खुशखबर आहे. कारण उद्यापासून मुंबई -गोवा नवी द्विसाप्ताहिक ट्रेन सुरु होणार आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार असून कोकणातल्या महत्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबे घेणार आहे. त्यामुळे अद्याप गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना तिकीट मिळाले (Indian Railway) नसेल तर ही गाडी सुवर्णसंधी ठरेल. चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनविषयी अधिक माहिती…
पश्चिम रेल्वे (WR) वरील वांद्रे टर्मिनस स्थानकावरून महाराष्ट्रातील गोवा आणि कोकण प्रदेशात दोन-साप्ताहिक गाड्या चालवण्यास रेल्वे बोर्डाने मंगळवारी मंजुरी दिली. वांद्रे टर्मिनसऐवजी पश्चिम रेल्वेचे मुख्य स्थानक बोरिवली येथून २९ ऑगस्ट रोजी या गाडीचे उद्घाटन होणार आहे. सध्या मुंबई ते कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सर्व गाड्या मध्य रेल्वे स्थानकांवरून धावतात. वांद्रे टर्मिनस येथून गोव्याकडे जाणारी ट्रेन सुरू झाल्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांना फायदा होणार (Indian Railway) आहे.
याबाबत माहिती देताना पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॉर्ड लाइनच्या अभावामुळे, वसई रोडवर त्यांच्या सिस्टममधून कोकणात जाणाऱ्या गाड्या चालवण्यासाठी त्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशा बदलावी लागेल, ज्यामुळे वेळ लागेल आणि इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो. आहे. वांद्रे टर्मिनस ते मडगाव, गोवा दरम्यान द्वि-साप्ताहिक गाड्या चालवण्याबाबत रेल्वे बोर्डाने अधिसूचना जारी (Indian Railway) केली आहे.
‘या’ वेळेनुसार धावणार
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी मडगावहून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता सुटेल आणि रात्री ११.४० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. त्याचवेळी वांद्रे टर्मिनसवरून ही गाडी दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल.
या स्थानकांवर घेणार थांबे (Indian Railway)
या ट्रेनला 13 स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या गावांचा समावेश आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू- काश्मीर (Jammu- Kashmir)… निसर्गसौंदर्याने नटेलला प्रदेश… पृथ्वीवरचं स्वर्ग अशी या ठिकाणाची ओळख.. मात्र दहशतवाद्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरची प्रतिमा मलीन झाली आहे. परंतु २०१४ पासून केंद्रात मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून जम्मू काश्मीरचा विकास, वाहतूक आणि दळणवळण आणि पर्यटन विकासाचा मोठा कायापालट झाला आहे. या ऐतिहासिकदृष्ट्या विवादित भागात शांतता, समृद्धी आणि विकास आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरने अनेक अभूतपूर्व सुधारणा पाहिल्या आहेत.
श्रीनगरमधील ‘विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमादरम्यान शहीद जवानांच्या कुटुंबीयांना नियुक्तीपत्रे सादर करून मोदींनी जम्मु काश्मीरबद्दल त्यांचा दृष्टीकोन आणि बांधिलकी दाखवली. पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन वाढवण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केल्याने जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. नवीन महामार्ग, विमानतळ आणि रेल्वेच्या बांधकामामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या पर्यटनाला पुनरुज्जीवन मिळाले आहे. पर्यटकांच्या ओघाने नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे हजारो स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जम्मू काश्मीरच्या विकासासाठी मोदी सरकारने मारलेला सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक म्हणजे कलम 370 रद्द करणे… कलम 370 रद्द केल्यामुळे नवीन गुंतवणूक, आर्थिक वाढ आणि उर्वरित भारताशी एकीकरणाचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान मोदींच्या या धाडसी पाऊलाने भारताच्या एकात्मतेची आणि सार्वभौमत्वाची पुष्टी केली. संपूर्ण प्रदेशात भारतीय तिरंगा फडकावून, मोदी सरकारने आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धता दाखवून दिली. यामुळे जम्मू काश्मीर मधील रहिवाशांमध्ये नवीन अभिमानाची भावना निर्माण झाली आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारताच्या समर्पणाची जगाला खात्री दिली आहे.
मोदी सरकारने नवीन शैक्षणिक संस्थांपासून आरोग्य सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रांपर्यंत अनेक विकास प्रकल्प सुरू केले आहेत. कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्याच्या प्रयत्नांमुळे तरुणांची बेरोजगारी कमी होत आहे आणि कट्टरतावादाचा सामना करण्यास मदत होत आहे. सर्वात उल्लेखनीय बदलांपैकी एक म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचारात तीव्र घट. राष्ट्रीय सुरक्षेबाबत भाजपच्या ठाम भूमिकेमुळे सशस्त्र दलांच्या पाठिंब्याने जम्मू काश्मीर मधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे.
सुरक्षा उपस्थिती आणि गुप्तचर ऑपरेशन्समध्ये वाढ झाल्यामुळे जम्मू काश्मीर मधील दहशतवादी नेटवर्क जवळपास नष्ट झाले आहे. परिणामी संपूर्ण प्रदेशात आधीपेक्षा अधिक स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. या नवीन शांततामय परिस्थितीमुळे पर्यटक पुन्हा एकदा मोठया संख्येने जम्मू- काश्मिरात येऊ लागलेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलामोठी चालना मिळाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या प्रसिद्ध दऱ्या, सरोवरे आणि पर्वत पुन्हा एकदा पर्यटकांसाठी जिवंत झाले आहेत. वाढत्या पर्यटनाची लाट या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जीवनदायी ठरली आहे.