Sunday, December 21, 2025
Home Blog Page 502

राज्यात 1 सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन; महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार

jodo maro aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा पुन्हा एकदा गरम झालं आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री पुतळा पडण्यामागे काही बेताल कारणे देत आहेत त्यामुळे आणखी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन (Jodo Maro Aandolan) करण्यात येणार आहे. आज मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे , शरद पवार आणि नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत माहिती दिली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले आहे. आता १ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि राज्यभरातील शिवभक्तांनी या निषेध आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. त्याठिकाणी मी स्वतः उभा असेल, पवार साहेब असतील आणि नाना पटोले सुद्धा असतील असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. सरकारने आपल्या बेफिकीरपणामुळे पुतळा उभारला असून त्याचे परिणाम निर्लज्जपणे भोगावे लागणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः शिवाजी महाराजांचा अपमान केला असता. पण कोश्यारीची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Jio New Recharge plan | Jio ने लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन, Netflix चे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

Jio New Recharge plan

Jio New Recharge plan | आजकाल सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यातही नेटफ्लिक्सचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नेटफ्लिक्सवे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट तसेच वेबसिरीज देखील पाहायला मिळतात. परंतु जे नेटफ्लिक्सचा सातत्याने वापर करतात त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण नेटफ्लिक्सचा रिचार्ज महाग होणार आहे. परंतु आता नेटफ्लिक्सच्या ग्राहकांसाठी जिओने एक खूप मोठा दिलासा दिला आहे. तो म्हणजे जिओने दोन नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये फ्री नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. जिओनी 84 दिवसांच्या वैद्यतेस सह दोन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत. या प्लॅनची किंमत 1299 आणि 1799 रुपये एवढी आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये फ्री सबस्क्रीप्शन तर दिले जाईल. आता या दोन प्लॅनमध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया.

जिओचा 1299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Jio New Recharge plan

जिओचा (Jio New Recharge plan) 1299 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्याची किंमत 433 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 480 पिक्सेल रिझोल्युशनसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन दिले जात आहे. ज्यांचे मासिक रिचार्ज 150 रुपयांचे आहे. नेटफ्लिक्सचा हा रिचार्ज प्लॅन स्मार्टफोन आणि टॅबलेटवर पाहता येईल. जिओच्या 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग मिळेल. तसेच, दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातील. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळेल.

जिओचा 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio चा 1799 रुपयांचा प्लॅन देखील 84 दिवसांसाठी वैध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 विनामूल्य संदेशांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन प्लॅन 199 रुपयांचा आहे. तुम्ही स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोनवर 720 पिक्सेलमध्ये व्हिडिओ पाहू शकाल. तुम्ही Jio च्या रु. 1799 पॅकसह हा प्लॅन मोफत पाहू शकाल.

जिओच्या (Jio New Recharge plan) 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. नेटफ्लिक्स मोबाईल पॅकचा मासिक रिचार्ज 149 रुपयांचा आहे, तर नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन 199 रुपयांचा आहे. दोन Netflix योजनांमध्ये थोडा फरक आहे. बेसिक प्लॅनमध्ये, तुम्ही स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबवर 740 पिक्सेल रिझोल्यूशनवर Netflix पाहण्यास सक्षम असाल, तर Netflix मोबाइल पॅक प्लॅनमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि टॅबवर 480 पिक्सेल रिझोल्यूशनवर Netflix पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Pune News : पुणे विभागातील एसटी ताफ्यातून 72 बस होणार बंद

Pune News : श्रावण महिना सुरू झाल्यापासून भारतामध्ये सणासुदीला सुरुवात होते. लवकरच गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जात असतात. शिवाय अनेक लोक आपल्या पाहुण्यांच्या गाठीभेटी घेत असतात. त्यानिमित्ताने सणासुदीच्या दिवसात एसटीचा प्रवास आवर्जून केला जातो. मात्र खेडोपाडी जाणाऱ्या एसटीच्या ताफ्यात आता घट होणार आहे विशेषतः पुणे विभागाच्या बाबतीतली एक महत्त्वाची बातमी आता समोर आली (Pune News) आहे.

उद्यापासून म्हणजे 29 तारखेपासून एसटी महामंडळाच्या ताफ्यातून 72 बसेस बंद होणार आहेत. 72 जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांची नक्कीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाच्या 12 आगारा अंतर्गत ७२ जुन्या बसेस स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे एसटी विभागात सध्या 855 बसेस कार्यरत आहेत. त्यातल्या 64 बसेस या ई बसेस आहेत तर 72 बस आहेत त्यांचं आयुर्मान संपलं असल्या कारणाने या बसेस स्क्रॅप करण्यात येणार (Pune News) आहेत.

72 बसेस स्क्रॅप करण्याचे नियोजन प्रशासनाने 29 ऑगस्ट रोजी केले आहे. त्यामुळे या बसेस स्क्रॅप केल्यानंतर पुणे विभागाच्या ताफ्यामध्ये 783 बसेस शिल्लक राहणार आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे पुणे विभागातील प्रवाशांना आता बसचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. तर प्रवास करताना एसटीच्या प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. महाराष्ट्र मध्ये आजही एसटी ही गाव खेड्यापर्यंत पोहोचते त्यामुळे विशेषतः या गाव खेड्यातील लोकांना शहरापर्यंत आणण्याचं काम या एसटी मार्फत होत असतं आणि अशा प्रवाशांचा आणि सणासुदीच्या (Pune News) दिवसांमध्ये खोळंबा होण्याची शक्यता आहे.

राजकोट किल्ल्यावर मोठा राडा! राणे- ठाकरेंसमोरच समर्थक भिडले

Rajkot fort dispute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा (Rajkot Fort Dispute) पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि नारायण राणे (Narayan Rane) हे किल्ल्याची आणि छत्रपतींच्या पडललेया पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले होते, मात्र दोन्ही नेते समोरासमोर येताच कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. दोन्ही पक्षांचे समर्थक आपापसांत भिडले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे हे सुद्धा पोलिसांशी हुज्जत घालताना दिसले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार,आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वैभव नाईक, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेमंडळी किल्ल्यावर पोचले. मात्र नेमकं त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. दोन्ही नेते एकमेकांसमोर येताच समर्थक एकमेकांसोबत भिडले. तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राणे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची सुद्धा झाली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. असं निलेश राणे यांनी पोलिसाना सांगितलं तर त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही असा दम नारायण राणे यांनी दिला.

या एकूण सर्व राड्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, हे दुर्दैवी आहे. त्यांची बुद्धी तेवढीच आहे. बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे बुद्धी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही. म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ज्या व्यक्तीला छत्रपतींचा पुतळा बनवण्यासाठी कंत्राट दिले तो कुठे फरार झाला? , त्याला पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवन्नाला पळून जायला मदत केली होती. तशीच यालाही केली का? अशी एकामागून एक प्रश्नाची सरबत्ती आदित्य ठाकरेंनी केली तसेच जे मंत्री आहेत, पीड्ब्यूडीएफचे त्यांच्यावर यासाठी एफआयआर झालंय का? असा सवालही ठाकरेंनी केला.

Apple Recruitment 2024 | ॲपल अंतर्गत तरुणांना मिळणार 6 लाख नोकऱ्या; महिलांसाठी 70 % संधी

Apple Recruitment 2024

Apple Recruitment 2024 | देशामध्ये टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे आता या इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची संधी देखील वाढत आहे. अनेक लोकांना यामुळे नोकरी मिळत आहे. आपण जर आता पाहिले तर भारतामध्ये ॲपल (Apple Recruitment 2024) युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक लोक हे ॲपलचे फोन आणि इतर वस्तू वापरतात. खास करून मोबाईलच्या विक्रीमध्ये भारतामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आता आपल्या देशात ॲपल कंपनीच्या माध्यमातून नोकरीच्या संधी देखील निघालेल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार ॲपल कंपनीकडून यावर्षी भारतामध्ये तब्बल 6 लाख नोकरीची भरती निघालेली आहे. या नोकऱ्यांमध्ये महिलांना जास्त संधी आहे

ॲपल (Apple Recruitment 2024) कंपनीने भारतात एक खूप मोठी भरती काढलेली आहे. आणि या कंपनीसोबत जवळपास 2 लाख उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि यातील खास गोष्ट म्हणजे 70 टक्के महिलांना यामध्ये संधी असणार आहे. या आर्थिक वर्षात मार्चपासून या नोकरीच्या भरतीला सुरुवात होऊ शकते. ॲपलकडून चीनमधील उत्पादन कमी झालेले आहे. आणि भारतामध्ये हे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळेच आता भारतामध्ये रोजगाराची संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. देशातील अनेक युवकांना आता नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांमध्ये जवळपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 6 लाख कामगारांना रोजगार मिळणार आहे.

यावर्षी भारतामध्ये ॲपलची (Apple Recruitment 2024) विक्री वाढल्याने भारतात नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. अनेक जॉब देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. ब्लू कॉलर जॉब निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये आता ॲपलचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आहे. त्यामुळे अनेक युवकांना आता नोकरी मिळत आहे. आणि खास करून महिलांना या कंपनीमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, 2020 मध्ये आय स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमनंतर ॲपलचे वेंडर जवळपास 1 लाख 65 हजार एवढ्या नोकऱ्या निर्माण करू शकलेले आहेत. यामुळे आता अनेक नोकऱ्यांची संधी देखील निर्माण होत आहे. आणि याचा फायदा भारतातील तरुणांना नक्कीच होणार आहे.

IRCTC : तिकीट रद्द केल्यास केवळ 2 तासांत मिळणार रिफंड ; लवकरच नेक्स्ट जनरेशन ई-टिकिंग प्लॅटफॉर्म

IRCTC : आता तासंतास रांगेत उभे राहून रेल्वेचे तिकीट काढावे लागत नाही. रेल्वे स्टेशन वरील तिकीट खिडकी सोबतच आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा देखील रेल्वे कडून देण्यात येते. मात्र ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत असताना अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. अनेकदा साईट ला प्रॉब्लेम असतो किंवा मग तिकिटाचे पैसे लवकर रिफंड होण्याचे प्रवाशांना टेन्शन होते. मात्र आता ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना असुविधेचा सामना करावा लागणार नाही.

IRCTC नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करत आहे. नेक्स्ट जनरेशन प्लॅटफॉर्मची नवीन आवृत्ती पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुक करताना कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय इतर सुविधांमध्ये देखील सुलभता येणार आहे चला तर मग जाणून घेऊया …

तिकीट बुकिंगचा वेग वाढणार

आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर अनेकदा तिकीट बुकिंग करत असताना खूप वेळ लागतो. वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे तात्काळ तिकीट मिळणं अवघड होऊन जातं म्हणूनच आय आर सी टी सी कडून तिकीट काढण्याची फॅसिलिटी अपग्रेड केली जात आहे. आय आर सी टी सी चे सीएमडी संजय कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार ई तिकिटिंग प्लॅटफॉर्मचे नवीन व्हर्जन पुढच्या (IRCTC) वर्षी मार्चपर्यंत सुरू होणार आहे. यामध्ये बुक केलेले तिकीट कॅन्सल केल्यानंतर लगेचच पैसे परत मिळणार आहेत.

केवळ दोन तासांत मिळणार रिफंड (IRCTC)

आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटवर ऑटो पे नावाची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांत प्रवाशांना पैसे परत मिळत आहेत. वास्तविक ही प्रणाली आयपीओप्रमाणे काम करत आहे. तिकीट बुक केल्याशिवाय बँक खात्यातून पैसे कापले जात नाहीत. ज्यांची तिकिटे रद्द झाली आहेत किंवा इतर कोणत्याही कारणाने तिकीट बुक होत नाही, त्यांचे पैसे दोन तासांत परत केले जात आहेत. 92 टक्के तिकिटांचे रिफंड दोन तासांत केले जात आहेत. IRCTC लवकरच 100 टक्के टार्गेट पूर्ण करेल. याचा फायदा असा होईल की वेटिंग तिकीट आल्यावर लोक तिकीट बुक करणार नाहीत. ऑटो पे सिस्टम सामान्य गेटवेप्रमाणेच काम करते. त्यामुळे बँक खात्यातून पैसे कापले जात नसून अवघे (IRCTC) दोन तास ब्लॉक केले जात आहेत.

वेटिंग तिकीट नको असेल तर पैसे कापले जाणार नाहीत (IRCTC)

आयआरसीटीसीने या समस्येवरही उपाय शोधला आहे, ज्यामध्ये जर कन्फर्म तिकिटांऐवजी वेटिंग तिकिटे मिळत असतील, तर पर्याय निवडणे तिकीट बुक करणाऱ्यांच्या हातात असेल. याचा फायदा असा होईल की तुमची इच्छा नसेल तर खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत. व्यवहार अयशस्वी झाल्यास, बँक खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत. मात्र पेमेंट कापले जाणार नाही परंतु ब्लॉक केले जाईल आणि काही काळानंतर ते बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.

तक्रार मिळाल्यानंतर IRCTC ॲक्शन मोडवर

प्रवाशांच्या तक्रारींवर आयआरसीटीसी सध्या कारवाई करताना दिसत आहे. IRCTC कडे 24 एप्रिल ते 24 ऑगस्ट दरम्यान 1000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जबाबदारी निश्चित करण्यासाठी, 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 20 प्रकरणांमध्ये एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेतील अन्नाबाबत तक्रारी आल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत 150 हून अधिक बेस किचन सुरू करण्यात आले आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे आणि शिवाजी कर्डीले यांच्यात घासून लढतय

rahuri vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुरी म्हटलं की आठवतं ते सुप्रसिद्ध कृषी विद्यापीठ आणि दुसरं म्हणजे तनपुरे आणि कर्डिले यांच्यातलं राजकीय शीतयुद्ध… 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळेस झालेल्या तनपुरे विरुद्ध कर्डिले यांच्यातील लढतीत तनपुरे यांनी चेहरे बदलले पण निवडून आले ते कर्डिलेच… सलग दोन टर्म पराभवाची सल सहन करत तनपुरेंचे पुत्र प्राजक्त तनपुरे हे 2019 ला निवडणूक रिंगणात उतरले… आणि जिंकले देखील… तनपुरे कुटुंबाचा पंधरा वर्षाचा राजकीय वनवास संपला… आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रूपानं कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणारा चेहरा तनपुरे कुटुंबाला मिळाला…. प्राजक्त तनपुरे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत… तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक शिवाजीराव कर्डिले हे भाजपात… त्यामुळे 2019 प्रमाणेच यंदाही राहुरीत तनपुरे विरुद्ध कर्डिले असाच संघर्ष बघायला मिळणार असला तरी राजू शेटे हे नाव ऐन निवडणुकीत धुमाकूळ घालू शकतं…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीत ही जागा भाजपला सुटणार असली तरी अजितदादांचा राहुरी च्या जागेसाठी असणारा आग्रह आणि शिवाजीराव कर्डिले – अजितदादा भेट हा सगळा सिक्वेन्स पाहता अजितदादा राहुरी मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात… येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कर्डिले अशीच सरळ लढत होईल? की अजितदादांच्या काही वेगळ्या भूमिकेमुळे राहुरीच्या निवडणुकीला नवा राजकीय रंग लागेल? लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पाटील चालू सिच्युएशन बघत राहुरी तू आमदारकीसाठी ट्राय मारतील का? या सगळ्या सीनमध्ये राजू शेटे कितपत प्रभावी राहतील? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

तसं बघायला गेलं तर राहुरी विधानसभा मतदारसंघावर तनपुरे कुटुंबाचा वरचष्मा राहिला… बाबुराव तनपुरे, प्रसाद तनपुरे आणि सध्या प्राजक्त तनपुरे अशी एकाच कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राहुरी विधानसभेवर वर्चस्व गाजवतेय… पण याच तनपुरे कुटुंबाचा राजकीय डाऊन फॉल सुरू झाला तो 2009 साली… मतदार संघाची नव्याने पुनर्रचना झाली… राहुरी – नगर – पाथर्डी अशा तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून सध्याचा राहुरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत एकमेकांना आमने-सामने भिडले ते राष्ट्रवादीकडून प्रसाद तनपुरे विरुद्ध भाजपकडून शिवाजीराव कर्डिले… मात्र मतदारसंघ बदलल्यानंतर कर्डिले यांनी आपल्या नात्यागोत्यांच्या राजकीय गोतावळ्याची बेरीज करत… त्याला शिवसेना आणि भाजप युतीची साथ मिळाल्याने राहुरीमधून कर्डिले यांनी भाजपाला विजय मिळवून दिला… 2014 ला मात्र युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्याने भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे यांनी आपल्या पत्नी उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… मात्र झालेल्या चौरंगी लढतीत मत विभाजनाचा फायदा कर्डीलेंना झाला आणि ते सलग दुसऱ्यांदा राहुरीतून आमदार झाले… मात्र 2019 ला तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी समोरासमोर लढत झाली… यात राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले हे निवडणूक रिंगणात होते… राहुरीतून आमदारकीची हॅट्रिक मारण्याचा चान्स कर्डिलेंसाठी चालून आला होता… मात्र मागील दोन टर्मचा वचपा काढत अखेर तनपुरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या प्राजक्त तनपुरे यांनी आमदारकीवर ठाण मांडलीच…

पण राहुरीची राजकीय विभागणी जाम इंटरेस्टिंग आहे… लोकसभेसाठी राहुरीची 64 गाव अहमदनगर विधानसभा मतदारसंघात येतात… तर देवळाली प्रवरा आणि 32 गावे शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात… हिच गाव विधानसभेला श्रीरामपूर मतदारसंघात मोडतात… थोडक्यात राहुरीला दोन खासदार आणि दोन आमदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, हे मोठं आश्चर्य… लोकसभा निवडणुकीला प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजेच निलेश लंके यांचा फ्रंटला येत प्रचार केला होता… राहुरी इथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं नसलं तरी आपल्या प्रभावक्षेत्राखालील मोठं मतदान त्यांनी निलेश लंकेच्या पाठीशी लावलं… त्यामुळे राहुरीत यंदा लढत कट टू कट होणार असल्याचं बोलले जातय…

दुसरीकडे कर्डिले यांनीही निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या हालचाली करायला सुरुवात केली आहे… श्रीगोंद्या सोबतच आपला पारंपारिक मतदारसंघ राहुरीतूनही निवडणूक लढवण्याची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे… श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे प्रकृतीच्या कारणाने निवडणुकीतून बाजूला गेले तर. श्रीगोंद्यातून लढता यावं, म्हणून त्यांनी आपली टीम तयार ठेवली आहे… सोबतच राहुरीतही ते उमेदवारीसाठी लक्ष देऊन आहेत… या सगळ्यात भाजपाच्या शिवाजीराव कर्डिले यांनी अजितदादा यांची घेतलेल्या भेटीने मतदारसंघात नव्या चर्चांना तोंड फुटलं.. राहुरी तालुक्यातील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संबंधाने ही चर्चा सुरू आहे. हा कारखाना बंद पडल्याने तो थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतला आहे. तो भाडेतत्त्वावर अजितदादांनी चालवण्यास घ्यावा, या संदर्भात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण कर्डिले यांनी दिलं असलं तरी कर्डिलेंच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्याबाबत खलबत्त झाली असल्याची शक्यताही यावेळेस नाकारता येत नाही… त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी… शरद पवार विरुद्ध अजित पवार… घड्याळ विरुद्ध तुतारी… अशी कट टू कट राहुरीची निवडणूक होऊ द्यायची, यावर महायुतीचा.. आणि स्पेसिफिकली कर्डीलेंचा भर दिसतोय…

2014 ला तिकीट वाटपाच्या कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे तनपुरे यांचे तिकीट कापण्यात आलं… आणि अजितदादांनी हट्टाने शिवाजी गाडे यांना तिकडे देऊ केलं… तेव्हा तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर आणि विशेषतः अजितदादांवर नाराज होतं… पुन्हा ते राष्ट्रवादीत आले असले तरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचं शरद पवार गटासोबत राहणं(tanpure with sharad pawar) हेच अजित दादांसोबत असणार त्यांचं अंतर्गत वैरावर शिक्कामोर्तब करतं… राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी अजित दादांनी मोर्चे बांधणी आत्तापासूनच सुरू केली आहे… त्याचाच एक भाग म्हणून कर्डिलेंना राष्ट्रवादीत घेत ते तनपुरे यांचं राजकीय वर्चस्व मोडीत काढू शकतात… पण अगदीच उघड उघड बोलायचं झालं तर राहुरीत सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजेच तनपुरे यांच्या बाजूने वातावरण दिसतंय…जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर कर्डिले मतदारसंघापासून थोडे दुरावले होते… ते कोणत्या पक्षाकडून? कोणत्या मतदारसंघातून? निवडणूक लढवणार याबाबत अद्याप संधीग्धता असल्यामुळे… आपली भूमिका जर लवकर स्पष्ट केली नाही तर याचा मोठा फटका कर्डिलेंना येणाऱ्या विधानसभेला बसू शकतो…

2009 आणि 2014 चा निकाल पाहिला तर तिरंगी किंवा चौरंगी लढतीत मत विभाजनाचा फायदा हा कर्डिलेंना झाल्याचं पाहायला मिळतं.. मात्र 2019 ला कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी फेस टू फेस लढत झाल्यामुळे तनपुरे यांचा विजय सोपा झाला… हे सगळं पाहता मतदार संघातून आघाडीची म्हणजेच तनपुरे यांची 25 ते 30 हजार मत खाणारा भाजप पुरस्कृत तिसरा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू असल्याची सध्या माहिती मिळतेय… त्यात सर्वात फ्रंटला नाव येतं ते रामचंद्र उर्फ राजू शेटे यांचं… धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेटे यांचा मतदारसंघातील तरुण पिढीवर वरचष्मा आहे… त्यातही मराठा मतं शेटे यांच्या पारड्यात पडली तर याचा अर्थातच तनपुरे यांना मोठा लॉस सहन करावा लागू शकतो… मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावाखाली जर शेटे यांना उमेदवारी मिळाली तर राहुरीत एक खमका तिसरा प्रतिस्पर्धी कर्डिले आणि तनपुरे यांना आव्हान देताना दिसू शकतं… त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टर राहुरीत विधानसभेला निर्णायक ठरू शकतो, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही…

यासोबतच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आणि देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे देखील इच्छुक आहेत.. त्यामुळे निवडणूक दुहेरी- तिरंगी की चौरंगी होतेय, मनोज जरांगे फॅक्टर, अजित दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका, संभाव्य बंडखोरी, मतदार संघातील गटातटाच राजकारण हे ज्याच्या बाजूने झुकेल तो राहुरी चा आमदार होईल, एवढं मात्र फिक्स आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? राहुरी विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण होतोय? शिवाजीराव कर्डिले – प्राजक्त तनपुरे – राजू शेटे – सत्यजित कदम यांपैकी विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदारकीचा गुलाल लागतोय? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

Vivo T3 Pro 5G मोबाईल 8GB रॅमसह लाँच; किंमतही अगदी बजेटमध्ये

Vivo T3 Pro 5G Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात Vivo T3 Pro 5G नावाचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा बजेट किमतीत हा मोबाईल लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. 3 सप्टेंबरपासून विवोचा हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

6.77 इंचाचा डिस्प्ले –

Vivo T3 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 120 HZ रिफ्रेश रेट सह 6.77 इंच फुल HD + 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 4,500 nits ची पीक ब्राइटनेस आणि 2000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेटचा सपोर्ट मिळतो. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, अल्ट्रा गेम मोड, सिक्स मोशन कंट्रोल ऑप्शन, 2000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेड आणि 4D गेम व्हायब्रेशन यांसारखे फीचर्स मिळतात. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC चिपसेट बसवली आहे. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा हँडसेट Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Funtouch OS 14 वर काम करते

कॅमेरा – Vivo T3 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T3 Pro 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्या कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 2 वर्षांचे OS अपडेट आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जात आहेत.

किंमत किती?

Vivo T3 Pro 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. HDFC आणि ICICI बँक कार्डवर या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. तसेच 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. येत्या 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टसह अधिकृत Vivo वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.

Unified Pension Scheme | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणली UPS योजना; NPS आणि OPS पेक्षा मिळणार जास्त लाभ

Unified Pension Scheme

Unified Pension Scheme | केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी आणत असतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील सरकारकडून विविध योजना लागू केल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. आणि या योजनेला मंजुरी देखील दिलेली आहे. या नवीन योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) (Unified Pension Scheme). असे आहे. या आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अस्तित्वात होती. परंतु ही योजना सुधारणा करण्यात येत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे.

आता या नवीन यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शेवटी जेवढा पगार असेल, त्या पगाराच्या जवळपास 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेली ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. सुरुवातीला सुमारे 2 लाख 30 हजार एवढ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु नंतर जर राज्य सरकारने ही योजना स्वीकारली तर जवळपास लाभार्थ्यांची संख्या 9 लाखांपर्यंत जाणार आहे.

या योजनेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना यूपीएससी प्रत्येक राज्यासाठी अनिवार्य नसल्याचे देखील सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे या योजनेची तुलना ओपीएस आणि एनपीएससी देखील करू शकतात. आणि नंतर निर्णय घेऊ शकतात. ही योजना सध्या केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे. परंतु हळूहळू प्रत्येक राज्य ही योजना स्वीकारून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करू शकतात.

युनिफाईड पेन्शन योजनेचा उद्देश काय ? | Unified Pension Scheme

ही योजना सरकारी कर्मचारी त्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10 टक्के जास्त योगदान देते. त्याचप्रमाणे सरकार हे 18.8 टक्के एवढे योगदान देणार आहे. आता सरकारने दिलेल्या अतिरिक्त 8.5% रकमेतून पूल कॉपर्स देखील तयार करण्यात येणार आहे. या योजनेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या 50% इतकी पेन्शन दिली जाणार आहे.

फॅमिली पेन्शनची तरतूद

सरकारच्या या नवीन यूपीएस पेन्शन योजनेमध्ये फॅमिली पेन्शनची देखील तरतूद करण्यात येणार आहे. जर त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला त्या व्यक्तीच्या पगाराचा 60 टक्के पेन्शन मिळणार आहे . अशी माहिती देखील आलेली आहे. सरकारच्या या नवीन योजनेमुळे सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता आनंद झालेला आहे. कारण त्यांना यातून चांगला फायदा होणार आहे. सरकारची ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे.

UPS, NPS आणि OPS मध्ये फरक

सरकारने सध्या UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे. या स्कीमनुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जसा वाढेल, तसा त्याचा लाभ देखील जास्त मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार असेल. यामध्ये तुम्ही 10 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला कमीत कमी 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. याआधी दोन योजना लागू झाल्या होत्या. यातील पहिली योजना ओल्ड पेन्शन योजना म्हणजे OPS आणि दुसरे म्हणजे न्यू पेन्शन योजना NPS होती. आता सरकारने तिसरी युनिफाईड पेन्शन योजना UPS लागू केलेली आहे.

नवी पेन्शन योजना ही जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच काम करणार आहे. परंतु यात काही अतिरिक्त फायदे देखील असणार आहे. 10 ते 25 वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेवढ्या कालावधीच्या प्रमाणातच पेन्शन मिळणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी महागाई भत्ते देखील दिले जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षापेक्षा जास्त काम केले असेल, तर सहा महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता त्यांना एक रकमी दिला जाणार आहे.

Tajmahal : ताजमहाल पाहण्यासाठी द्यावे लागणार जादा पैसे ? कधी लागू होणार दरवाढ ? जाणून घ्या

Tajmahal : जगातील आठ आश्चर्य पैकी एक असलेल्या ताजमहाल ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. यामध्ये केवळ भारतीयच नव्हेतर परदेशी पर्यटकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र आता ताज पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागणार असून थोड़े जादा पैसे ताज चे सौंदर्य पाहण्यासाठी द्यावे लागणार आहेत. ताजामहाल म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. 17 व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल अद्यापही पर्यटकांच्या आकर्षणाचा (Tajmahal) केंद्रबिंदू आहे.

किती द्यावे लागतील पैसे ?

आग्रा डेव्हलपमेंट अथॉरिटी (ADA) च्या प्रस्तावानुसार, ताजमहाल पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या तिकिटाच्या दरात 30 रुपयांनी तर परदेशी पर्यटकांसाठी 100 रुपयांनी वाढ होणार आहे. जर सरकारने ADA प्रस्ताव मंजूर केला, तर तुम्हाला ताजमहालच्या तिकिटासाठी वाढीव किंमत मोजावी लागेल. भारतीय पर्यटकांसाठी 80 रुपये, तर परदेशी पर्यटकांसाठी 1200 रुपये तिकीट असेल. सध्याच्या (Tajmahal) किमतीवर नजर टाकल्यास, ताजमहालच्या प्रवेश तिकीटाची किंमत एका भारतीय पर्यटकासाठी 50 रुपये आहे. तर विदेशी पर्यटकांना 1100 रुपये मोजावे लागतात.

कधी लागू होणार दरवाढ ? (Tajmahal)

टोल टॅक्स वाढीचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना एडीए बोर्डाच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त रितू माहेश्वरी यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावर एडीएच्या उपाध्यक्षा अनिता यादव यांनी टोल टॅक्स वाढविण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर ताजमहालमध्ये नवीन तिकीट प्रणाली लागू (Tajmahal) केली जाईल.