Sunday, December 21, 2025
Home Blog Page 507

Mhada Mumbai : म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार ? म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

Mhada Mumbai : मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचं घर देणारी संस्था म्हणून म्हाडाचं नाव प्रचलित आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून म्हाडाची घर सुद्धा अल्प उत्पन्न गट किंवा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली दिसून येत आहेत. मात्र एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या घरांची किंमत कमी होणार असल्याची माहिती (Mhada Mumbai) दिली आहे. चला जाणून घेऊयात…

… म्हणून किंमती जास्त (Mhada Mumbai)

मुलाखतीतील प्रश्नाला उत्तर देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाडाच्या घराच्या किमती का वाढल्या आहेत याचे उत्तर जयस्वाल यांनी दिलं. त्यांनी म्हटलं की, म्हाडाच्या 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत सरप्लस टेनमेंट्स म्हणून रिकामी घर भाड्याला प्राप्त होतात. त्यांची किंमत रेडी रेकनरच्या दराच्या 110% आकारणाबाबत जे धोरण आहे त्यानुसार किमती आकारलया आहेत. यातील बरीच घर दक्षिण मुंबई मधील मोक्याच्या ठिकाणी असल्याने तेथील रेडी रेकनर दर जास्त आहेत त्यामुळे किंमत काहीशी जास्त आहे असं त्यांनी (Mhada Mumbai) सांगितलं.

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले रेडी रेकनरशी संबंधित विक्री किंमत निश्चित करण्याचा धोरण आहे. त्यामुळे सरप्लस अंतर्गत मिळालेल्या घरांच्या किमतीत जास्त आहेत तर कमी करण्याबाबतच लवकरच निर्णय घेण्यात येणार (Mhada Mumbai) आहे. म्हाडाला ज्या ठिकाणी नाममात्र दराने जमिनी मिळालया आहेत अशा जमिनीवरील प्रकल्पातील घरांच्या किमती या बिल्डरकडे उपलब्ध असलेल्या घरांच्या 40% ते 50 टक्क्यांहून कमी आहेत. गोरेगाव मधील मध्यम उत्पन्न गटातील 700 चौरस फुटांच्या घरांच्या किमती 1 कोटी 10 लाख आहेत तर प्रत्यक्षात या घराची बाजारभावानुसार किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे नाममात्र दरात मिळालेल्या जमिनीवरील म्हाडाची घरे महाग आहेत असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही. असे जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.

नव्या लॉटरीत या ठिकाणी उपलब्ध होणार घरं (Mhada Mumbai)

सध्या मुंबई येथील घरांची सोडत निघाली असून यामध्ये गोरेगाव आणि इतर भागांचा समावेश आहे. मात्र नव्या लॉटरी मध्ये कोणत्या ठिकाणच्या घरांचा समावेश असणार आहे याची माहिती जयस्वाल यांनी दिली. त्यांनी सांगितलं की कोपरी, पवई, बोरीवली, पहाडे गोरेगाव, वरळी तसेच संक्रमण गाळे व पुनर्रचित गाळ्यातून मिळणाऱ्या घरांची संख्या पाहतात पुढील वर्षीच्या लॉटरीसाठी मुंबईत ३६६० घर उपलब्ध (Mhada Mumbai) असतील. तर कोकण मंडळात शिरढोण, गोठेघर, खोडी येथील योजना प्रगतीपथावर असून तिथे चार हजार 47 घर म्हाडाला मिळणार आहेत. या घरांच्या किमती 18 ते 25 लाख असतील असेही त्यांनी सांगितले.

Balochistan Firing : तुम्ही पंजाबचे आहात का? ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या; पाकिस्तानात काय घडलं?

Balochistan Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाबहून आलेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांना गोळ्या झाडण्यात (Balochistan Firing) आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही पंजाबचे आहात का? याची चौकशी आधी सदर हल्लेखोरांनी केली, आणि एकदा ओळख पटताच सर्व प्रवाशांवर गोळ्यांचा पाऊस पाडला. या घटनेत आतापर्यंत 23 लोक ठार झाल्याची माहिती आहे. पंजाब प्रांताच्या लोकांना टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला हे समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं? Balochistan Firing

याबाबत मुसाखेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त नजीब काकर यांनी माहिती देताना सांगितलं की, सशस्त्र हल्लेखोर राराशम परिसरातील इंटर स्टेट हायवेवर बस आणि ट्रक थांबवत त्यातील प्रवाशांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यानंतर जे प्रवाशी पंजाब प्रांतातील आहेत त्यांच्यावर खुलेआम गोळीबार करण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या २३ जणांपैकी तिघेजण बलुचिस्तानचेच होते, तर उर्वरीत २० जण हे पंजाब प्रांतातून आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली. या हल्लेखोरांनी फक्त नागरिकांवर गोळ्यांचं चालवल्या नाहीत तर 10 गाड्यांना आग सुद्धा लावली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत आहेत. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. ४ महिन्यांपूर्वी सुद्धा असाच काही प्रकार घडला होता. त्यावेळी 9 प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आलं होतं. आणि त्यांचं ओळखपत्र तपासून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

आजच्या या हल्ल्याची जबाबदारी (Balochistan Firing) बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतली आहे. मात्र, आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सैनिकांना लक्ष्य केलं आहे, असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांना गोळ्या घालण्याआधी त्यांची ओळख पटवण्यात आली होती, असंही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला असून मृत्यू पावलेले लोक निरपराध नागरिक होते, असं ते म्हणाले आहेत

Jio Recharge Plan : Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; 3 महिने फ्री कॉलिंग आणि इंटरनेट

Jio Recharge Plan 479 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअरटेल, जिओ यांसारख्या देशातील बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवे रिचार्ज प्लॅन खिशाला परवडणारे नसल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र कंपनीच्या पोर्टपोलियोमध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आहेत जे स्वस्त आहेत. मात्र अनेकांना या रिचार्ज प्लॅन बद्दल माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी तब्बल ८४ दिवस आहे आणि यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि इंटरनेटचा लाभ घेता येईल.

जिओचा 479 रुपयांचा रिचार्ज -Jio Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या मोबाईल रिचार्ज बद्दल सांगत आहोत तो आहे जिओचा 479 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… पण अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही. कारण हा प्लान पेटीएम आणि फोनपेवर देण्यात आला नाहीय. जीओच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळत असल्याने एकदा रिचार्ज केलं कि ३ महिने रिचार्जचे टेन्शन नाही.. या कालावधीत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ तर मिळतोच. याशिवाय एकूण 6 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. तसेच 1000 एसएमएसची सुविधाही मिळेल. Jio Recharge Plan

या प्लानसोबत तुम्हाला जियो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाउडची सुविधा मिळेल. मात्र असे असले तरी या प्लानमध्ये तुम्हाला जियो सिनेमा प्रिमियम मेंबरशिप मिळणार नाही. 84 दिवसांचा रिचार्ज प्लान जियो पोर्टल किंवा माय जियो अॅपच्या प्रिपेड प्लानमध्ये मिळेल. सध्या जिओ कडे जे काही प्लॅन आहेत त्यामध्ये हा ४७९ रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त असा रिचार्ज प्लॅन आहे. ज्या यूजर्सना जास्त इंटरनेटची गरज नसते अशा वापरकर्त्यांसाठी जीओचा हा ४७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात बेस्ट पर्याय ठरेल.

लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! अमित शहांची घोषणा काय?

Ladakh AMIT SHAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये (Ladakh) पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या या जिल्ह्यांची नावे आहेत. यापूर्वी त्याठिकाणी लेह आणि कारगिल असे २ जिल्हे होते.

अमित शाह यांनी ट्विट करत म्हंटल, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.

पंतप्रधान मोदींनी सुद्धा नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे कौतुक केले आणि हे चांगले प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल असल्याचे म्हटले. आता या जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे सेवा आणि संधी लोकांच्या जवळ येतील असं मोदी म्हणाले. तसेच या घोषणेबद्दल पंतप्रधानांनी लडाखच्या जनतेचे अभिनंदन केले.

ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं होते. या कलमांतर्गत पूर्वीच्या आणि तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा होता. मात्र हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.

Ration Card | रेशनकार्ड धारकांना इथून पुढे तांदूळ मिळणे बंद: मिळणार हे 9 पदार्थ

Ration Card

Ration Card | आपले केंद्र सरकार हे देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. ज्याचा फायदा आजपर्यंत सगळ्यांना झालेला आहे. केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत असते. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना (Ration Card ) मोफत राशन पुरवले जाते. परंतु आता या राशन योजनेमध्ये एक मोठा बदल झालेला आहे. या आधी सरकार गरिबांना या योजनेअंतर्गत केवळ तांदूळ देत होते. परंतु आता सरकारने तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. आणि त्या ऐवजी आता सरकारी इथून पुढे 9 जीवनावश्यक वस्तू गरीब जनतेला देणार आहे. नुकतेच त्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

कोणते पदार्थ मिळणार ? | Ration Card

हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या या मोफत राशन योजनेअंतर्गत दर महिन्याला जवळपास 90 कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला केवळ तांदूळ दिले जात होते. परंतु आता इथून पुढे सरकार मार्फत हे तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याऐवजी इतर नऊ महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले इत्यादींचा समावेश असणार आहे. देशातील नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल अशी देखील सरकारची अपेक्षा आहे.

शिधापत्रिका कशी काढायची? | Ration Card

जर तुम्ही रेशन कार्ड अजून बनवले नसेल आणि तुम्ही शिधापत्रिका बनवण्यासाठी पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जवळच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या कार्यालयाला जावे लागेल आणि तिथे जाऊन तुम्हाला वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करता येईल. त्या अर्जामध्ये विचारलेली सविस्तर माहिती तुम्ही भरू शकता. आणि तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे त्या अर्जाला जोडा आणि तुमचा अर्ज कागदपत्र सह तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करा. त्यानंतर अधिकारी तुमच्या या अर्जाची पडताळणी करतील. आणि त्यावर पुढील प्रक्रिया करतील. शिधापत्रिका मिळाल्यानंतर तुम्हाला देखील दर महिन्याला राशन मिळणे चालू होईल.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ गाडयांना वाहतूकबंदी

Mumbai Goa Highway : गणेशोत्सव 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना आता गावाची वाट दिसू लागली आहे. त्यातही कोकणातल्या रहिवासी आधीच आपल्या रेल्वे बसचे बुकिंग करून ठेवतात. तुम्ही देखील मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात या महामार्गावरून जडवाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक जाणून (Mumbai Goa Highway) घेऊया…

‘या’ काळात बंदी (Mumbai Goa Highway)

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी काही उपाययोजना राबवल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पाच सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते आठ सप्टेंबर रोजी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत हे वाहतूक बंद राहणार आहे तसेच पाच सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन गौरी गणपती विसर्जन परतीचा प्रवास यासाठी 11 सप्टेंबर रात्री आठ ते 13 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत सुद्धा वाहतूक वर बंदी असणार आहेत. तर अनंत चतुर्दशी अर्थात अकरा दिवसांच्या गणवेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी 17 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते 18 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत ही वाहतूक बंदी असणार आहे. दिलेल्या काळामध्ये अवजड वाहनांना या मार्गावरून (Mumbai Goa Highway) प्रवास करता येणार नाही.

आजपासून मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा (Mumbai Goa Highway)

26 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. दुपारी बारा वाजता पळस्पे इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीनही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा नियोजित आहे. मागच्या 14 वर्षापासून या महामार्गाचे काम रखडल्यामुळे कोकणवासी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचं (Mumbai Goa Highway) काम सुद्धा केलं जात आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिवसा मिळणार अखंडित वीज

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील खेड्यांमध्ये नेहमीच विजेचा प्रॉब्लेम असतो. दिवसा किंवा रात्रीची अनेक वेळा लाईट जाते. आणि लाईट लवकर येत देखील नाही. परंतु आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसभरात वीज पुरवठा करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी सौर योजना 2.0 चा विस्तार करून त्याचा व्याप्ती वाढवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. या योजनेला मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत मान्यता देखील देण्यात आलेली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. शेतकऱ्यांना कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी ही कृषिमंत्री मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. या बैठकीमध्ये 16000 mw केंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मितीच्या उद्दिष्टांना मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

या मिशन मोडवर योजनेतून 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवण्यात आलेले आहे. 9000 मेगा वॅट अधिक उर्वरित 7 हजार मेगावॅट असे 16000 mw केंद्रित सौर ऊर्जा उद्दिष्टाला मान्यता देखील देण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने 2024-25 ते 2028 -29 या कालावधीसाठी 2891 कोटी रुपये जास्त निधी देखील मंजूर केलेला आहे. 2024 -25 यावर्षीच्या 702 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या तरतूद देखील मान्यता देण्यात आलेली आहे. याद्वारे आता वीज उपकेंद्राची देखभाल सुधारणा आणि ग्रामपंचायत यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय आर्थिक सहाय्य निधीच्या धर्तीवर आता राज्य शासनाकडून उसलेल्या ऊर्जा सौर ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारने आर्थिक साहाय्याने 30 टक्के देण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार 41 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मान्यता देखील देण्यात आलेली आहे. सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना 2024 साली सुरू केली. त्यामुळे त्यानंतर शेतकऱ्यांवर जे अतिरिक्त विजाचा भार येतो. तो उचलण्याचे काम देखील सरकारने केले.आता राज्यातील जवळपास 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत वीज पूर्णपणे मोफत दिली जाते.

ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर सदस्य देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्य सरकार कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी झाल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Rohit Sharma : रोहित शर्मा पंजाबच्या संघात जाणार? कोणी केलं सूचक विधान?

Rohit Sharma KXIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ आधी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) एक मोठी बातमी समोर येत आहे. जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं आणि तो मेगा लिलावात उतरला तर त्याच्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब सुद्धा प्रयत्न करेन असे थेट संकेत पंजाबचे डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर यांनी दिले आहेत. मात्र त्यासाठी आमच्याकडे किती रुपये शिल्लक आहेत ते सुद्धा बघावं लागेल असं संजय बांगर यांनी म्हंटल . RAO पॉडकास्ट यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना बांगर यांनी वरील विधान केलं. संजय बांगर म्हणाले, जर रोहित लिलावात उतरला तर त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आम्ही रोहितला विकत घेतो की नाही हे आमच्याकडे किती पैसे आहेत यावर अवलंबून आहे. जर रोहित लिलावात आला तर मला खरोखरच विश्वास आहे की त्याला खूप जास्त बोली लागेल.

पंजाबला कर्णधाराची गरज –

आयपीएल स्पर्धा २००८ पासून सुरु झाली आहे, मात्र किंग्स इलेव्हन पंजाबला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेलं नाही. पंजाबच्या संघात खेळाडू येऊन गेले मात्र ट्रॉफी जिंकवणार कर्णधार पंजाबला कधीच मिळाला नाही. शिखर धवनने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत निवृत्ती जाहीर केली आहे. तो आयपीएल मध्ये खेळणार कि नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कर्णधाराची गरज पंजाबला नक्कीच आहे. रोहित शर्मा शिवाय दुसरा महान कर्णधार सध्या संपूर्ण जगात नाही याची जाणीव सुद्धा किंग्स इलेव्हन पंजाबला आहे.

दरम्यान, २ दिवसांत अशाही चर्चा सुरु आहेत कि रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) लखनौ सुपरजाईंट आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघानी रोहित शर्माला संघात घेण्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांची तयारी ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत रोहितला आपल्या संघात घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघ आहेत. असं झाल्यास आयपीएल इतिहासातील हा नवा इतिहास असेल. मात्र, या बातमीत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.

रोहितने मुंबईला तब्बल 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकवून दिली- Rohit Sharma

रोहित शर्मा हा आयपीएल मधील दिग्गज खेळाडू आहे. २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहित खेळतोय. सुरुवातीला तो डेक्कन चार्जर्स कडून खेळत होता, त्यानंतर २०११ मध्ये तो मुंबईच्या गोटात आला. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे नातं अतिशय घट्ट जमलं. वानखेडे स्टेडियम फक्त रोहितची फटकेबाजी पाहायला फुल्ल भरते. रोहित शर्माने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. यादरम्यान त्याने अनेक नवीन खेळाडू घडवले. यापूर्वी आयपीएल 2022 पूर्वी मुंबई संघाने रोहितला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पण गेल्या हंगामात मुंबईने हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच सुरु असतात.

Calcium Deficiency | कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीराच्या या भागात होतात सर्वाधिक वेदना; अशाप्रकारे घ्या काळजी

Calcium Deficiency

Calcium Deficiency | आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आपल्याला गरज असते. त्यात कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे असते. आपल्या हाडांच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी कॅल्शियमची खूप गरज असते. तुमच्या शरीरावर कॅल्शियमची (Calcium Deficiency) कमतरता असेल, तर त्याचा सर्वात जास्त परिणाम हाडांवर होतो. हाडांमध्ये वेदना होऊ लागतात. तसेच कमजोरी जाणवते. आज आपण कॅल्शियमचे कमतरतेमुळे कोणत्या भागावर जास्त वेदना होतात? आणि त्या कशा प्रकारे टाळता येईल? हे जाणून घेणार आहोत.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जास्त वेदना होतात | Calcium Deficiency

ज्यावेळी तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यावेळी सगळ्यात आधी तुमच्या हाडांमध्ये वेदना सुरू होतात. यामध्ये कंबर, गुडघे जास्त प्रमाणात दुखतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमची हाडे देखील कमकुवत होतात. त्यामुळे जास्त वेदना होतात तसेच स्नायूंवर ताण येतो आणि कमकुवतपणा देखील येतो.

कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढायची | Calcium Deficiency

कॅल्शियमयुक्त आहार

कॅल्शियमची कमतरता म्हणून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये तुम्ही दही, दूध, चीज आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. हे पदार्थ रोज खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होईल.

विटामिन डी आवश्यक

विटामिन डी कॅल्शियम सोसण्यास मदत करतात. त्यामुळे रोज थोडा वेळ तरी सूर्यप्रकाशात घालवा. कारण सूर्यप्रकाशात विटामिन डीचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. तसेच तुम्ही अंडी, मासे आणि विटामिन डी असलेले पदार्थ देखील खाऊ शकता.

दररोज व्यायाम करा

दररोज जर तुम्ही व्यायाम केला, तर तुमची हाडे मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही धावणे, चालणे, वजन उचलणे यांसारखे व्यायाम हाडांसाठी करत रहा. यामुळे हाडांची दुखण्याची समस्या कमी होते आणि तुम्ही देखील फिट राहता

कॅफिन आणि सॉफ्ट ड्रिंक टाळा | Calcium Deficiency

तुम्ही जास्त प्रमाणात कॅफिन आणि सॉफ्ट ड्रिंक पिल्याने देखील तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्याची सेवन कमी करा तुमच्या आहारात नारळाचे पाणी, ताज्या फळांचा रस यांचा समावेश करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्गाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील ; 8000 कोटींचा निधी मंजूर

Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आधीच मंजुरी मिळाली आहे. शिवाय याला केंद्राकडूनही निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महामार्गामुळे नाशिक -पुणे आंतर अवघ्या तीन तासात गाठता येणार आहे. सध्या हे आंतर पार करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार असून येथील उद्योगांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. या महामार्गावरून राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जून 2023 मध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सादर केला होता. राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला आधीच (Nashik-Pune Highway) मान्यता दिली आहे यानंतर आता केंद्राच्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारने देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वरील नाशिक फाटा ते खेड म्हणजेच राजगुरुनगर दरम्यानच्या एका प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजे एलिवेटेड कॉरिडोर उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 7827 कोटी रुपये खर्च (Nashik-Pune Highway) अपेक्षित आहे. मोदी सरकारने या प्रकल्पासाठी वाढीव खर्च लक्षात घेता 8000 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

कसा असेल मार्ग (Nashik-Pune Highway)

हा मार्ग 213 किलोमीटर लांबीचा असणार असून पुणे ते नाशिक हा प्रवास केवळ तीन तासात पार करता येणार आहे.पुणे नाशिक प्रस्तावित महामार्ग (Nashik-Pune Highway) राजगुरुनगर चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे, शिर्डी तीर्थक्षेत्राला जाणार आहे. हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये जोडला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये पुणे ते शिर्डी असा 135 किलोमीटरचा मार्ग असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिर्डी इंटर चिंच ते नाशिक निफाड इंटरचेंज पर्यंत 60 किलोमीटर असणाऱ्या तर तर तिसरा टप्पा हा सुरत चेन्नई एक्सप्रेस वेला (Nashik-Pune Highway)जोडला जाणार आहे महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा 60 किलोमीटर असणार आहे नाशिक निफाड इंटरचेंज ते नाशिक असा हा मार्ग असणार आहे.

उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार

पुणे ते नाशिक औद्योगिक मार्ग हा लवकरच पूर्णत्वास येणार आहे. पुण्यातील राजगुरुनगर चाकण मंचर मार्गे हा महामार्ग थेट नाशिकला जाणार आहे त्यामुळे पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक (Nashik-Pune Highway) विकासाला चालना मिळणार आहे पुण्याच्या आयटी कंपन्या तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फायदा होणार असून या महामार्गामुळे मुंबई – पुणे -नाशिक ही शहरं द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत त्यामुळे उद्योग धंदे आणि विकासाला चालना मिळणार आहे.