Sunday, December 21, 2025
Home Blog Page 508

Pune To Konkan Flight : पुणे ते कोकण अवघ्या 1 तासांत; सुरु झाली नवी विमानसेवा

Pune To Konkan Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवासाठी कोकणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कोकणातील अनेक नोकरदार कामानिमित्त मुंबई- पुण्याला जात असतात. मात्र गणपती उत्सवासाठी काहीही करून गावी म्हणजेच कोकणात जायचंच असा विचार प्रत्येकाचा असतो. मग एसटी बस कितीही फुल्ल असली आणि रेल्वे बुकिंग झालं नसलं तरी त्याला पर्वा नसते. याच चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे ते सिंधुदुर्ग आणि पुणे ते गोवा प्रवास तुम्ही आता अवघीय १ तासांत पूर्ण करू शकता. त्यासाठी नवी विमानसेवा येत्या ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.

Fly91 एअरलाइनने हि नवी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून शनिवार आणि रविवारी ती उपलब्ध आहेत. पुणे-सिंधुदुर्ग मार्गासाठी, फ्लाइट IC 5302 पुणे विमानतळावरून सकाळी 8:05 वाजता निघेल आणि सकाळी 9:10 वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचेल. यानंतर परतीची फ्लाइट IC 5303 सकाळी 9:30 वाजता सिंधुदुर्गहून निघेल आणि पुण्यात सकाळी 10:35 वाजता पोहोचेल. म्हणजेच पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार आहे. या प्रवासासाठी 1,991 रुपयांचा खर्च येणार आहे. या नवीन विमानसेवेमुळे कोकणच्या पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल आणि कमी वेळेत कोकण फिरता येईल.

तर दुसरीकडे गोव्याला सुद्धा पुण्याहून अगदी कमी वेळेत जाता येणार आहे. गोव्याला जाणाऱ्यांसाठी, फ्लाइट IC 1376 गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 6:35 वाजता निघेल आणि पुण्याला सकाळी 7:40 वाजता पोहोचेल. यानंतर पार्टीची फ्लाइट IC 1375 पुण्याहून सकाळी 10:55 वाजता निघेल आणि दुपारी 12:10 वाजता गोव्यात पोचेल. येत्या ३१ ऑगस्ट नंतर हि विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. या दोन्ही मार्गावरील विमानसेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कारण मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती काही ठीक आहे. संपूर्ण रस्ता हा खड्ड्यांची भरलेला असून प्रवास करणं खूपच अवघड बनलं आहे.

FLY91 चे संस्थापक, MD, आणि CEO मनोज चाको यांनी म्हंटल कि, आमचे उद्दिष्ट भारतातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवणे आहे आणि हि नवी विमानससेवा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. गोवा आणि सिंधुदुर्गला पुण्याशी जोडल्याने केवळ प्रवासच सुकर होणार नाही तर या प्रदेशांमधील पर्यटन आणि व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. FLY91 गोवा आणि पुणे दरम्यान दैनंदिन कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी म्हंटल.

सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली; नव्या दाव्याने खळबळ

ravikumar gowda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या शेजारील राज्य कर्नाटकातून (Karnataka Government) एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटक मध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून सिद्धरमैया हे मुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपकडून कर्नाटकात ऑपरेशन लोटसचा (Operation Lotus) प्रयत्न सुरु आहे आणि सरकार पाडण्यासाठी आपल्याला १०० कोटींची ऑफर देण्यात आली आहे असा दावा मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा (Ravikumar gowda) यांनी केलं आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे असून योग्यवेळी ते बाहेर काढेन असा इशाराही गौडा यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

रविकुमार गौडा (Ravikumar gowda) म्हणाले, राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे. मात्र भाजपने आता ५० कोटी रुपयांची ऑफर १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. परवा कोणीतरी फोन करून १०० कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. परंतु मी त्यांना नकार दिला. त्यांना 50 आमदार विकत घ्यायचे आहेत. भाजपचे लोक 50 कोटींवरून 100 कोटींवर पोहोचले आहेत, ते रोज आमचे सरकार पाडण्याचे ठरवत आहेत, पण आमचे सरकार स्थिर आहे. मुख्यमंत्रीही कणखर आहेत. मला ज्या कोणी फोन केला होता त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू, आम्ही पुरावे गोळा करत आहोत, आम्ही ते ईडी (ED), सीबीआयला (CBI) देऊ, आम्हाला त्यांना रोख रकमेसह पकडायचे आहे असंही रविकुमार गौडा यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही गौडा यांनी केला होता आरोप –

ऑपरेशन लोटसबाबत गौडा यांनी केलेला आरोप हा काय नवीन नाही, यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा आरोप भाजपवर केला होता एका टीमने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्री पदाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी चार आमदारांसोबत संपर्क साधला होता आणि त्याचे आमच्याकडे पुरावेदेखील आहेत असं म्हणत गौडा यांनी काही दिवसांपूर्वी खळबळ उडवली होती. रविकुमार गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एच डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.

Diabetes Control Tips | जीवनशैलीत हे बदल केल्यास मधुमेहावर राहील नियंत्रण; जाणून घ्या सविस्तर माहिती

Diabetes Control Tips

Diabetes Control Tips | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार होतात. अशातच आजकाल मधुमेह (Diabetes Control Tips) होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना मधुमेहाची समस्या उद्भवत असते. मधुमेहामध्ये आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. आणि आपल्याला इन्सुलिनची कमतरता पडते. या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. हा आजार आपण केवळ नियंत्रणात ठेवू शकतो, जर आपण योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले तर या गंभीर समस्येला आपण नक्कीच सामोरे जाऊ शकतो. यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही मधुमेह नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे. आता मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, तर आपल्या जीवनशैलीत काय बदल करावे ? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

संतुलित आहार | Diabetes Control Tips

तुम्ही दैनंदिन जीवनात संतुलित आहार घेतला पाहिजे. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फॅक्ट्स यांसारखे सगळे पोषक तत्वे योग्य प्रमाणात असले पाहिजे. तरच तुमच्या मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

जास्त फायबर

तुमच्या शरीरातील फायबर हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असतो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्य ही फायबरचे खूप चांगले स्त्रोत आहेत. त्यामुळे तुम्ही आहारात फायबरचा समावेश करणे गरजेचे आहे.

साखरेचा मर्यादित वापर

जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे मिठाई, ज्यूस त्याचप्रमाणे इतर गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. नैसर्गिकरित्या ज्या फळांमध्ये साखर असते. ती फळे खाल्ली तर चालतात. परंतु अतिरिक्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास जास्त वाढतो.

जेवणाची वेळ

तुम्ही जर वेळेवर जेवण केले, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. रात्री जर तुम्ही कोणत्याही वेळी जेवण केले, तरीदेखील तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता असते.

व्यायाम | Diabetes Control Tips

आपल्या शरीरासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा. तुम्ही चालणे, पोहणे, सायकलिंग, योगा या प्रकारे कोणताही व्यायाम करू शकता.जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास असेल तर व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांची संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या शरीराला पाहिजे तेवढ्याच कॅलरीचे सेवन करा. जर तुमच्या शरीरातील अधिक कॅलरी तुम्हाला कमी करायची असेल, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्रिय असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे. जिने चढणे. सायकलिंग करणे या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या मधुमेहावर नियंत्रित राहील.

Vasantrao Chavan Passed Away : नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन; 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vasantrao Chavan Passed Away

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन (Vasantrao Chavan Passed Away) झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. वसंतराव चव्हाण मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

श्वास घेताना त्रास – Vasantrao Chavan Passed Away

वसंतराव चव्हाण याना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता, तसेच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आधी त्यांना नांदेडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ते या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक वसंतराव चव्हाण यांची तब्येत खालावली. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. Vasantrao Chavan Passed Away

यंदा लोकसभेत दमदार विजय –

वसंतराव चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे. नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वसंतराव चव्हाण यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दमदार विजय मिळवला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला. ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वसंतराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला आणि नांदेडमध्ये काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला.

वेटिंग तिकिट असताना जनरल कोचमध्ये प्रवास करत असाल तर होते ही शिक्षा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वेचे तिकीट देखील कमी असते आणि प्रवास देखील अत्यंत आरामदायी असतो. परंतु आजकाल रेल्वेने प्रवास करणे खूप कठीण झालेले आहे. रेल्वेमध्ये (Train) खूप जास्त गर्दी असते. त्याचप्रमाणे तिकीट जरी कन्फर्म केले, तरी रेल्वेमध्ये जागा मिळत नाही. यासाठी प्रवाशांना जवळपास प्रवासाच्या कन्फर्म करावे लागते. दोन ते तीन मधून आधी तिकीट बुक करून देखील त्यांना वेटिंगमध्ये थांबावे लागते. लवकर त्यांना तिकीट मिळत नाही. परंतु हे वेटिंग तिकीट फिक्स होण्यासाठी प्रवासामध्ये खूप जास्त वाट पाहावी लागते. कितीतरी अनेक असे प्रवासी आहे जे वेटिंग तिकिटावर देखील प्रवास करतात.

अनेक लोक हे वेटिंग देखील घेऊन रिझर्व कोचमध्ये (Researve Coch) चढतात आणि असेच एक प्रकरण सुद्धा समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील असे करत असाल तर तुम्ही खूप जास्त अडचणी देऊ शकता. नियमानुसार जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल आणि तुम्ही जनरल कोचमध्ये चढत असाल, तर रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही असा प्रवास करू शकत नाही. पण हे खूप नियमांच्या विरुद्ध आहे. तुम्ही जर वेटिंग तिकिटावर प्रवास करत असाल, आणि जर तुम्हाला पकडले. तर त्यासाठी तुम्हाला खूप मोठा दंड भरावा लागू शकतो.

तुम्ही जर वेटींग तिकीटवर एसी कोच प्रवास करत, असाल तर ते कायदेशीर कारवाईनुसार अनुचित आहे. यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला 440 रुपयांचा दंड भरावा लागतो. तसेच तुम्हाला त्याच क्षणी ट्रेनमधून तुम्हाला खाली उतवले जाऊ शकते. त्याच प्रमाणे तुम्ही जर स्लीपर कोचमध्ये वेटींग तिकिटावर प्रवास करत असाल, तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आणि ट्रेनमधून खाली उतरावे लागेल.

Elora waterfall | पावसामुळे वेरूळ लेण्यांकडे गर्दी; धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची हजेरी

Elora waterfall

Elora waterfall | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यभर जोरदार पाऊस कोसळला. परंतु त्यानंतर एक ते दोन आठवडे पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली होती. परंतु आता गेल्या चार-पाच दिवसापासून पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन करत महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. अगदी या दोन-तीन दिवसाच्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहे. आणि पुन्हा एकदा पर्यटकांची पावले हळूहळू निसर्गाकडे वळायला लागलेली आहेत. अनेक लोक हे लेण्यांमध्ये देखील जात आहे. खुलताबाद या परिसरात देखील अनेक धबधबे वाहायला लागलेले आहेत. मराठवाड्यात वेरूळचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी वेरूळचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे पर्यटक देखील हळूहळू पुन्हा एकदा निसर्गाकडे वळायला लागलेली दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि या डोंगरदर्‍यातील झरे, धबधबे वाहायला लागलेली आहेत. या ठिकाणी अनेक लोक खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ या ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत.

वेरूळचा धबधबा | Elora waterfall

गेल्या दोन-तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वेरूळचा धबधबा देखील मोठ्या प्रमाणात वाहायला लागलेला आहे. वेरूळच्या धबधब्याचे दर्शन घेणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणी असते. अशातच आता शनिवार रविवारी अनेक पर्यटकांनी वेरूळचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे. परंतु या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे कारण या आधीच अनेक कड्यांवरून किंवा दरीमध्ये कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची तैनात देखील वाढवण्यात आलेली आहे.

श्रावण महिना सुरू झाल्यामुळे आता खुलताबादमधील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी देखील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येत आहे. परंतु या पावसामुळे लोकांची तारांबळ उडताना पाहायला दिसत आहे. घृन्हेश्वराच्या मंदिरा येथे देखील खूप मोठी गर्दी दिसत आहे. त्यात शनिवार रविवार आल्याने पर्यटक आणि भावीक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.

Adhar Card Update | तुमचे आधारकार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने असेल तर फ्रीमध्ये करा अपडेट; UIDAI ने वाढवली मुदत

Adhar Card Update

Adhar Card Update | आपले आधार कार्ड हे आपले एक महत्त्वाचे असे ओळखपत्राचा पुरावा आहे. आजकाल शैक्षणिक किंवा सरकारी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही काम करायचे असेल, तरी आपले आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. कारण आपल्या आधार कार्डवर (Adhar Card Update) आपली संपूर्ण माहिती असते. आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन देखील असते. त्यामुळे आपली ओळख पटण्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकवेळा आपण आधार कार्ड काढताना त्याबाबत खूप चुका करत असतो. त्याचप्रमाणे अनेक लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात त्यामुळे आधार कार्डवरील माहिती देखील बदलावी लागते. जसे की पत्ता बदलावा लागतो, अनेक वेळा मोबाईल नंबर देखील बदलावा लागतो. परंतु आता जर तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती चुकली असल्यास तर ती अपडेट करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण UIDAI यांनी आधार कार्ड (Adhar Card Update) धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख देखील वाढवण्यातआलेली आहे. तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत अगदी मोफत तुमचे हेआधार कार्ड अपडेट करू शकता. यामध्ये जर तुमचा फोटो बदलायचा असेल, त्याचप्रमाणे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन बदलायची असेल, तरी देखील तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांच्या आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहे. त्यांनी ती माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड असेल तर त्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. आधार कार्ड अपडेटबाबत मुदत देखील दिली होती. आता ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी देखील द्यावी लागणार नाही.

मुदतवाढ बाबत मोठी घोषणा | Adhar Card Update

UIDAI यांनी आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला मोफत हे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टलवर जावे लागेल. आणि तिथे जाऊन माहिती अपडेट करावी लागेल. यात तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड द्यावे लागते. आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड द्यावे लागते. आधार अपडेट करण्याची मुदत ही तिसऱ्यांदा वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आधार कार्ड अपडेट करून घ्या.

आधार कार्ड अपडेट कसे करायचे?

  • सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • ते पेज ओपन झाल्यावर तुम्हाला अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तिथे तुमचा आधार नंबर एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी नंबर तेथे एंटर करा.
  • त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करून अपडेट करावा लागेल.
  • तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल.

Mumbai Railway | मुंबईहून या शहरासाठी सुरु झाली खास एक्सप्रेस ट्रेन; असे असेल वेळापत्रक

Mumbai Railway

Mumbai Railway | मुंबई म्हटलं की सगळ्यात आधी लोकांना आठवते, ते खूप जास्त गर्दी भरलेल्या लोकल ट्रेन, वाहनांची झालेली तुंबड. परंतु आता अशातच मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. कारण आता मुंबईहून (Mumbai Railway) एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये अनेक लोक दुसरीकडून येऊन स्थलांतर करत असतात. आणि तिथेच नोकरी वगैरे करत असतात. परंतु सणासुदीच्या काळात हे लोक त्यांच्या गावी जात असतात आणि त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना खूप गर्दी होते. त्यामुळे दरवर्षी सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वेची संख्या देखील वाढवली जाते. यावर्षी देखील तेच करण्यात आलेले.

गणपती आणि पुढील तोंडावर येणाऱ्या सण लक्षात घेता, आता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आज सुट्टी असल्यामुळे अनेक लोक हे यावर्षी आयोध्येला भेट देत आहेत. त्यामुळे आता मुंबईहून (Mumbai Railway) श्रीरामाच्या हा दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील अधिक आहे. म्हणून मुंबई ते आयोध्या दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे. डिसेंबरमध्ये श्रीराम प्रभूच्या मंदिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर अनेक लोक हे आयुध्येला सतत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. परंतु ट्रेनची संख्या कमी पडल्याने या ठिकाणी खूप गर्दी होत असते. म्हणूनच या विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. आता या ट्रेनचे वेळापत्रक आपण जाणून घेणार आहोत.

वेळापत्रक | Mumbai Railway

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आयोध्या विशेष गाडी क्रमांक 01019 ही विशेष गाडी रविवारी सोडण्यात येणार आहे म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी ही गाडी सीएसटी मुंबई येथून 11: 20 मिनिटांनी सोडली जाणार आहे तरीही गाडी तिसऱ्या दिवशी आयोध्या या रेल्वे स्थानकावर सकाळी 9 : 30 वाजता पोहोचणार आहे.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 01020 ही आयोध्या सीएसएमटी गाडी 31 ऑगस्ट रोजी आयोध्या छाननी येथून रात्री ते 11 : 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर ती छञपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 8 : 15 वाजता पोहोचणार आहे. यातून विशेष ट्रेन मुंबईकरांसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये आयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही आता कोणत्याही टेन्शन शिवाय जाऊ शकता. तसेच जाताना येताना गर्दी देखील होणार नाही.

Thane Home Guard Bharti 2024 | ठाणे होमगार्ड अंतर्गत 700 रिक्त पदांची भरती सुरु; येथे करा अर्ज

Thane Home Guard Bharti 2024

Thane Home Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेला आहोत. त्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी फायदा होणार आहे. ही भरती ठाणे होमगार्ड (Thane Home Guard Bharti 2024 )
यांच्या अंतर्गत आहे. या अंतर्गत होमगार्ड या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 700 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील थेट अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | Thane Home Guard Bharti 2024

या भरती अंतर्गत होमगार्ड या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ठाणे होमगार्ड यावरती अंतर्गत 700 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शिक्षण कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 20 ते 50वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाचे कागदपत्र

  • रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत पत्र
  • तीन महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र.

अर्ज कसा करावा ? | Thane Home Guard Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 25 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा

DTP Maharashtra Bharti 2024 | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे आजपर्यंत अनेक लोकांना नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक मोठी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र शासन नगर शासनाने मूल्या निर्धारण (DTP Maharashtra Bharti 2024) विभागाअंतर्गत पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागातील अनेक रिक्त पदे आहेत. या विभागातील रचना सहाय्यक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 259 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 ऑगस्ट 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 29 ऑगस्ट 2024 ही रद्द करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | DTP Maharashtra Bharti 2024

  • पदाचे नाव – रचना सहाय्यक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक
  • पदसंख्या – 289 जागा
  • नोकरीच्या ठिकाण – पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती
  • वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष
  • अर्ज शुल्क – राखीव प्रवर्ग 900 रुपये, राखीव प्रवर्ग 1000 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024

वेतनश्रेणी

  • रचना सहाय्यक – 38 हजार 600 ते 1 लाख 22800 रुपये
  • उच्च श्रेणी लघुलेखक – 41 हजार 800 रुपये ते 1 लाख 32 हजार 300 रुपये
  • निम्न श्रेणीलेखक – 38 हजार 600 रुपये ते 1 लाख 22 हजार 800 रुपये.

अर्ज कसा करा | DTP Maharashtra Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता
  • 29 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा