Sunday, December 21, 2025
Home Blog Page 509

Sunita Williams | या दिवशी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार; नासाने दिली मोठी माहिती

Sunita Williams

Sunita Williams | काही महिन्यांपूर्वी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात गेले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा अंतराळामधला प्रवास वाढला आहे. आणि ते अंतराळातच अडकले आहेत. केवळ दोन आठवड्यांसाठी हे दोघं अंतराळात गेले होते. परंतु आता दोन महिने उलटून झालेले आहे, तरी देखील त्यांनी अजून परतीचा प्रवास सुरू झालेला केलेला नाही. परंतु आता पृथ्वीवर नक्की ते कधी येणार आहेत. याबाबतची चर्चा सर्वत्र चालू आहे. यासोबतच सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्या डोळ्याला कोर्नियाचा आजार देखील समोर आलेला आहे. अशातच आता सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर कधी आणणार आहे? त्याची एक मोठी घोषणा केलेली आहे. नासाने केलेल्या घोषणेनुसार सुनीता विल्यम्स पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्थेने याबद्दलची माहिती दिलेली आहे.

नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांनी सांगितलेले आहे की, नासाने ठरविले आहे की, बुच आणि सुनिता यांना फेब्रुवारीमध्ये क्रू लाइनसोबत पृथ्वीवर आणणार आहेत. बुच आणि सुनीता (Sunita Williams) यांना आंतरराष्ट्रीय स्थानकावर ठेवण्याचा आणि कृषी वाय बोर्डिंग स्टारलाईनवर पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय सुरक्षेच्या कारणांमुळे घेण्यात आला होता. या दोघांनाही 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलेले होते. ते दोघेही एक आठवडा अंतराळ स्थानकात थांबणार होते. परंतु दोघांनाही आता आठ महिने राहावे लागणार आहे.

बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्या स्टार लाइनर मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास उशीर होत आहे. स्पेस स्टेशनमध्ये सहा पेक्षा अधिक बेडरूम साठी जागा आहे. यात सहा झोपण्याचे हॉल आहेत. आणि एक व्यायाम शाळा देखील आहे. अंतराळवीर या अंतराळातील प्रवेश करतात, हे त्याच्याशी जोडलेले राहतात नुकतेच अंतराळात साहित्य पाठवण्यात आले आहे. त्यामुळे अंतराळवीरांना खाण्यापिण्याची टंचाई कोणत्याही प्रकारे भासणार नाही.

Dhanashree Verma : एका दिवसात नोटबंदी, लॉकडाउन होतं, मग फाशी का नाही? चहलच्या पत्नीची संतप्त पोस्ट

Dhanashree Verma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांत देशातील अनेक ठिकाणी मुलींवरील अत्याचार, बलात्कार आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगाल येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणाने (Kolkata Rape Case) तर संपूर्ण देश हादरला. नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. या प्रकरणामुळे कायद्यात बदल करून आरोपीना लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे.

काय आहे धनश्री वर्माची पोस्ट –

धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. धनश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात आवाज उठवला आहे. बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, असे तिचे रोखठोक मत आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते, लॉकडाऊन एका रात्रीत लागू होऊ शकते, मग एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला फाशी का दिली जाऊ शकत नाही. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

यापूर्वी युझवेंद्र चहलनेही या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चहलने म्हंटल होते, फाशी द्यावी का? नाही, त्याचे पाय ९० अंशाच्या कोनात मोडले पाहिजेत. त्यांची कॉलरबोन्स तुटली पाहिजे आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टलाही इजा झाली पाहिजे. बलात्काराच्या आरोपींना असह्य वेदना होईपर्यंत जिवंत ठेवा आणि शेवटी त्यांना फाशी द्या. मात्र, काही वेळाने त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली ही स्टोरी काढून टाकली. पण त्याचा स्क्रीनशॉट त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दरम्यान, या दोघांपूर्वी सौरव गांगुली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला होता.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यंदा ‘हे’ फॅक्टर ठरवणार जिंकणार कोण

kopargaon vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हा अहमदनगर… मतदारसंघ कोपरगाव… लढत काळे विरुद्ध कोल्हे… पिढी तिसरी… होय, सहकाराची पंढरी म्हणून नगर मधील ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांनी आलटून पालटून आमदारकी मिळवली… इथं तिसऱ्या स्पर्धकाला नो एन्ट्री असते… या दोघांतलं हाडवैर इतकं मोठं. की स्वतः जिंकण्यापेक्षा समोरच्याला पाडण्यावर दोघांचाही भर असतो… 2019 ला स्टॅंडिंग आमदार असणाऱ्या भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आमदार झाले खरे… पण मागील पाच वर्षात काळे – कोल्हे या वादाने टोक गाठलेलं असताना… काळे यांचं अजित पवार गटात येणं… कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातला राजकीय विस्तव… विवेक कोल्हे यांचा शिक्षक मतदारसंघात झालेला पराभव… या सगळ्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो… चालू स्थितीचा विचार करता कोपरगावमध्ये आमदारकीला नेमकं काय होतंय? विवेक कोल्हे – आशुतोष काळे यांच्यात कुणाच्या बाजूने मतदार राजा झुकत माप टाकू शकतो? त्याचाच घेतलेला आढावा…

अहमदनगर जिल्ह्याला देशभरात सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना याच जिल्ह्यात स्थापन झाला… अनेक दिग्गज मंडळी जिल्ह्यात सहकारमहर्षी म्हणून उदयास आले. त्यात विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, आप्पासाहेब राजळे, यशवंतराव गडाख, केशवराव देशमुख, आबासाहेब निंबाळकर, अण्णासाहेब शिंदे यांनी सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. त्यापैकी कोपरगावात शंकरराव कोल्हे व शंकराव काळे यांनी सहकारातून मतदारसंघाची बांधणी करत राजकारणात आपला जम बसवला… एकमेकांच्या विरोधात राजकारण करत सत्ता उपभोगली…थोडक्यात कोपरगाव हे आता सहकारापेक्षा राजकारणासाठी जास्त ओळखलं जाऊ लागलंय… कोल्हे व काळे घराण्याचा वाद हा कोपरगावकराणांसाठी महत्त्वाचा विषय.. या घराण्याच्या वादातून कोपरगावमध्ये नवीन राजकीय नेतृत्व उदयाला साधा स्कोप देखील मिळाला नाही…

खरंतर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे साखर कारखान्याच्या वर्चस्वातून… काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या दोन सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि त्यातून सत्ता संघर्षाला सुरवात झाली… तालुक्यातील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले. सुरुवातीची 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळालं… थोडक्यात शंकरराव कोल्हे यांनी काळेंच्या राजकीय वर्चस्वाला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला… पण 2004 मध्ये सत्तेचा फ्लो पुन्हा उलट्या दिशेने वाहू लागला…2004 आणि 2009 मध्ये शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरवलं… तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली… यावेळेस मात्र अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले…

2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सून स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. तर आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि काळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला… 2019 ला मात्र आशुतोष काळे यांनी शिवसेना टू राष्ट्रवादी असा प्रवास करत वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढत 2019 ला आमदारकी मिळवलीच… पण आमदार काळे यांचं लीड होतं अवघं 800 मतांचं… कट टू 2024…काळे आणि कोल्हे यांच्यातला हा राजकीय संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय… विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली… यामुळे भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मोठी कोंडी झालीय… विद्यमान आमदारकीचा फिल्टर लावला तर आशुतोष काळे यांनाच महायुतीची उमेदवारी मिळणार, हे तर फिक्स झालय… त्यामुळे कोल्हे यांनी मागील काही महिन्यांपासून पक्षविरोधी भूमिका घेत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा जणू निर्धार केल्याचा मतदारसंघातल्या राजकारणातून पाहायला मिळतं… खरंतर विधानसभा निवडणुकीआधीच विवेक कोल्हे यांनी पक्षविरोधी भूमिका घेत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली… मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्याने आता कोल्हे कुटुंबाच्या राजकारणाला जिवंत ठेवायचं असेल तर आगामी विधानसभा निवडणूक त्यांना काहीही करून जिंकावीच लागणार आहे…

त्यात एकाच पक्षात असूनही कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातल्या राजकीय विस्तवाची धग कायम मतदार संघाला पाहायला मिळालीय… 2019 मध्ये विखे पाटलांचे मेहुणे राजेश परजने यांनी 15 हजार मतं घेतली होती… यामुळेच कोल्हेंपासून आमदारकी दूर गेली होती… कदाचित हाच राग डोक्यात ठेवून मागील पाच वर्ष कोल्हे आणि विखे पाटील यांच्यात अगदी टोकाची भांडणही आपल्याला बघायला मिळालीयेत… गणेश कारखाना आणि विखेंच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेऊन विवेक कोल्हेंनी विखेंना चांगलाच दणका दिला होता… त्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने घेतलेली भूमिका – शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांच्याशी कोल्हेंचे असणारे संबंध आणि बेरजेच्या राजकारणावर त्यांचा असणारा भर पाहता यंदा कोल्हे आणि काळे यांच्या राजकारणातल्या तिसऱ्या पिढीचा संघर्ष येणाऱ्या विधानसभेला आणखीनच टोकदार होताना पाहायला मिळेल… दोन्ही गटांची स्वतंत्र ताकद, कारखानदारी, संस्थात्मक जाळं असल्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने झुकेल? याचा अंदाज देखील सांगणं तसं धाडसाचे ठरेल… पण कोल्हे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर कदाचित काळेंना कोल्हे जड जाऊ शकतात, असं मत स्थानिक पत्रकार नोंदवतात…त्यामुळे 2024 या हाय व्होल्टेज मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीत नेमकं कोण जिंकणार? आशुतोष काळे की विवेक कोल्हे? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

शिखर धवनच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची खास पोस्ट; म्हणाला, तू नेहमीच दुसऱ्या बाजूने….

rohit sharma shikhar dhawan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर आणि गब्बर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. शिखरने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज भारताचा कर्णधार आणि शिखर धवनसोबत अनेक वर्ष सलामीवीर म्हणून साथ दिलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) सुद्धा ट्विट करत शिखरबाबत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

काय आहे रोहितचे ट्विट ?

रोहित शर्माने ट्विटरवर शिखर धवनसोबतचे ४ वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल, ‘रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत….. दुसऱ्या बाजूने तू माझे काम नेहमी सोपे केले आहे. द अल्टीमेट जाट…. रोहित शर्माचे हे ट्विट अगदी काही मिनिटातच व्हायरल झाले. अनेकांनी रोहितच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकमेकांसोबत सलामी दिली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडगोळीने २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. दोघांचे बॉन्डिंग चांगलं जमलं होते. एका बाजूला शिखर पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करायचा आणि गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलायचा. त्यामुळे दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या रोहितला अतिरिक्त वेळ घेण्याची संधी मिळायची. 2013 ते 2022 पर्यंत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 115 एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सलामी दिली, ज्यामध्ये त्यांनी 5148 धावा चोपल्या. या दरम्यान त्यांनी 18 वेळा शतकी आणि 15 वेळा अर्धशतकी भागीदारी केली. वनडे फॉरमॅटच्या इतिहासात ही चौथी सर्वाधिक धावा करणारी सलामी जोडी आहे.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

T20 आंतरराष्ट्रीय- 68 सामने, 1759 धावा, 27.92 सरासरी, 11 अर्धशतके
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय- 167 सामने, 6793 धावा, 44.11 सरासरी, 17 शतके आणि 39 अर्धशतके
कसोटी क्रिकेट- 34 सामने, 2315 धावा, 40.61 सरासरी, सात शतके आणि 5 अर्धशतके
आयपीएल- 222 सामने, 6769 धावा, 35.26 सरासरी, दोन शतके आणि 51 अर्धशतके.

Electric Vehicles : इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजारात धुमाकूळ; जुलैमध्ये मागणी वाढली

Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicles) क्रेझ प्रचंड आहे. दिसायला अगदी आकर्षक लूक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलची कटकट नसल्याने पैसे वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्यातच आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात देशभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री झाली आहे. जुलै 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक दुचाकींच्या एकूण 107716 युनिट्सची विक्री झाली आहे. वर्षानुवर्षे ही वाढ सुमारे ९७ टक्के आहे. यापूर्वी जुलै 2023 मध्ये कंपन्यांनी इलेक्ट्रिक दुचाकींच्या 54616 युनिट्सची विक्री केली होती. यामध्ये ओला, tvs, अथर आणि बजाज यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

काय सांगते आकडेवारी- Electric Vehicles

रिपोर्टनुसार, जुलै महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झालेल्या कंपनीचे नाव आहे ओला इलेक्ट्रिक… कंपनीने जुलै महिन्यात एकूण 41624 वाहनांची विक्री केली आहे. जुलै २०२३ मधून हाच आकडा 19406 युनिट्स पर्यंत होता.

दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे टीव्हीएस मोटर्स… टीव्हीएस मोटर्सने जुलै 2024 मध्ये एकूण 19486 युनिट्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी म्हणजे जुलै 2023 मध्ये कंपनीने 10398 गाड्यांची विक्री केली होती.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येत ती म्हणजे बजाज ऑटो…. बजाज ऑटोने गेल्या महिन्यात एकूण 17657 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने जुलै 2023 मध्ये 4131 युनिट्सची विक्री केली होती. Electric Vehicles

चौथा क्रमांक लागतो तो एथर एनर्जीचा … एथर एनर्जीने गेल्या महिन्यात एकूण 10087 वाहनांची विक्री केली. तर गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2023 मध्ये कंपनीने ६६८५ वाहनांची विक्री केली होती.

यात पाचवा नंबर लागतो तो म्हणजे हिरो मोटोकॉर्पचा … अहवालानुसार, Hero Motocorp ने जुलै 2024 मध्ये एकूण 5045 युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या ९९० युनिट इतकी होती.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची खरी लढत थोरात Vs विखे पाटील अशीच

srirampur vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे लोकसभा निवडणुकीत यंदा मात्र आपटले… पण सत्तेत राहण्यासाठी त्यांचा जीव घुसमटतोय की काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय… कारण नगरच्या राजकारणात सर्वात जास्त उठून दिसणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार लोखंडे साहेब, त्यांचे चिरंजीव आणि यासोबतच इच्छुकांची भली मोठी यादी समोर आलीय… बरं इथले विद्यमान आमदार डॉ. लहू कानडे हे काँग्रेसचे… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीचा खासदार जरी काँग्रेसचा झाला असला तरी श्रीरामपूरमधून लीड हे महायुतीच्या उमेदवाराला मिळालंय… त्यामुळे काँग्रेसकडून हेमंत ओगले यांनीही आमदारकीसाठी मतदार संघात तळ ठोकलाय… साध्या भाषेत श्रीरामपूरच्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं वर्णन करायचं म्हटलं तर जाळ अन धूर संगटच… असं म्हणावं लागेल… या सगळ्यात मुलाच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विखे पाटील इथं महायुतीच्या उमेदवाराला जोर देतील यात शंकाच नाही… त्यामुळे श्रीरामपूरचं ग्राउंड विधानसभेला कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतंय… श्रीरामपूरच्या आमदारकीचा गुलाल नेमक्या कुणाच्या कपाळाला लागतोय? त्याचंच केलेलं हे सविस्तर डिकोडिंग…

बेलापूर स्टेशनच्या अवती-भवती पसरलेली वस्ती पुढे श्रीरामपूर शहर म्हणून आकाराला आली… आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करतंय… अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. बॅरिस्टर रामराव आदिक, भानुदास मुरकुटे आणि जयंत ससाणे यांचा हा मतदारसंघ 2009 ला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला… त्यानंतर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे दोन वेळेस प्रतिनिधित्त्व केले… 2019 ला भाऊसाहेब कांबळे यांनी निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला.. तेव्हा बाळासाहेब थोरतांना हा मोठा धक्का समजला जात होता… पण थोरातांनी शेरास सव्वाशेर राहत प्रशासकीय अधिकारी व लेखक असलेले लहू कानडे यांना उमेदवारी देऊन, निवडूनही आणले…. अनेक समाज उपयोगी योजना राबवल्यामुळे कामहाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता.. .

त्यात महत्त्वाची योजना म्हणजे ‘ग्रामस्वच्छता अभियान’ ही योजना राबवून ती योजना यशस्वी करून दाखवली त्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली.. त्यांच्या रुपाने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामाची व मानसिकतेची खडानखडा माहिती असलेला अधिकारी राज्याच्या धोरणात्मक वाटचालीला योग्य दिशा दाखवणारा आमदार मतदारसंघाला मिळाला याची चर्चा कायम श्रीरामपूरमध्ये झाली… पण मागच्या पाच वर्षांचा विचार केला तर काँग्रेसचे आमदार साहेबांचं रिपोर्ट कार्ड म्हणावं इतकं चांगलं नाहीये… त्यात लोकसभेलाही श्रीरामपुरातून काँग्रेसचं लीड मायनसमध्ये गेल्याने कानडे यांची आमदारकी तशी गॅसवरच आहे… त्यामुळे ससाणे गटाचे हेमंत ओगले काँग्रेसकडून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत… मतदारसंघात ससाणे गटाला मानणारा मोठा वर्ग आहे… जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची तालुक्यात निर्णायक वोट बँक आहे… त्यामुळे काँग्रेसमध्ये श्रीरामपूरच्या जागेवरून तिकीट वाटपासाठी मोठा रस्सीखेच होणार हे तर फिक्स आहे… मुळात 2019 लाच या जागेसाठी हेमंत ओगले व आमदार कानडे यांच्यात रस्सीखेच झाली होती… मात्र बाळासाहेब थोरातांनी ससाणे व कानडे यांच्यात काही तडजोडी करून कानडे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. आ. लहु कानडे यांना नियोजनबध्द पध्दतीने विजयी करुन विखे पाटलांची कोंडी केली….

पण सध्या श्रीरामपूरचं जिओ पॉलिटिक्स बदलून गेलय… कानडेंना नको मला उमेदवारी द्या, म्हणून काँग्रेसचेच ओगले अडून बसलेच आहेत… पण दुसऱ्या बाजूला महायुतीतही उमेदवारीचा मोठा झांगडगुत्ता झालाय… माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेत उमेदवारीसाठी आपली जागा कन्फर्म केली नाही तोच लोकसभेला पराभवाचा धक्का बसलेले सदाशिव लोखंडे किंवा त्यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटाकडे सेटिंग लावल्याची चर्चा आहे… या सगळ्या सीनमध्ये अशोक कारखाना निवडणुकीत ससाणे गटाशी युती केलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मात्र आमदारकीची तलवार म्यान केल्याने ते फक्त आपलं एकगठ्ठा मतदान ससाने गटाच्या म्हणजेच ओगलेंच्या पाठीशी कसं लावता येईल? याचा प्रयत्न करताना दिसतील… थोडक्यात श्रीरामपूरच्या निवडणुकीसाठी मोठा गुंता असला तरी सध्या विद्यमान आमदार लहू कानडे, हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, सदाशिव लोखंडे किंवा चेतन लोखंडे अशी नाव आमदारकीच्या रेसमध्ये सध्या फ्रंटला आहेत…

आता येऊयात मतदार संघातील जमिनीवरच्या मुद्द्यांवर… श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊनही अजूनही शहराला जिल्ह्याचा दर्जा न मिळाल्याने हा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट टॉपिक ठरू शकतो… बाकी लोकसभेला महायुतीला मिळालेलं लीड, विखे पाटलांची ताकद, लोखंडे पिता पुत्रांसारखे तकडे उमेदवार प्लस मध्ये असल्याने काँग्रेसच्या उमेदवारासाठी ही लढत सोपी नसणार आहे… काँग्रेसकडून ओगले की कानडे या नावावर शिक्कामोर्तब होणं बाकी असल तरी ओगले यांच्या पाठीशी स्थानिक गट असल्याने त्यांच्या नावाचा आग्रह काँग्रेस हायकमांड कडे केला जाऊ शकतो… 2009 पासून तसा बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा मतदारसंघावर राहिलाय… त्यांचं बारीक लक्ष असल्यामुळेच आतापर्यंत काँग्रेसला इथून हार मिळाली नाही… पण लोकसभेचा निकाल कायम राहिला तर यंदा भाजपाला पहिल्यांदाच श्रीरामपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्यांदाच खातं खोलता येऊ शकतं… मत विभाजन कोणाच्या पथ्यावर पडतंय? विखे पाटील विरुद्ध थोरात त्यांच्यात वरचढ कोण ठरतंय? कांबळे बंड करतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक दबाव गट कुणाच्या पाठीशी राहतील? या सगळ्या फॅक्टरवर श्रीरामपूर चा आमदार कोण? हे ठरणार आहे… बाकी, तुम्हाला काय वाटतं? श्रीरामपूरचा 2024 चा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

महिला अत्याचारावर मोदी स्पष्टच बोलले; म्हणाले कोणीही दोषी असो, त्याला ….

Modi on oppression of women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि देशात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बदलापूर, नागपूर, कोळपर, अकोला त्याठिकाणच्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विरोधक यावरून सरकारला धारेवर धरत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) प्रथमच महिला अत्याचाराविरोधात भाष्य केलं. कोणीही दोषी असो, त्याला कडक शिक्षा होणार अशी ग्वाही मोदींनी दिली. ते जळगाव येथील जाहीर सभेत बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. मी प्रत्येक राज्य सरकारला आवाहन करतो महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे. त्यामुळे कोणीही दोषी कुणीही असला तरी तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता कामा नयेत. रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. आपल्या महिला आणि मुलींच्या वेदना, त्यांचा राग मला समजत आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत. आधी अशी तक्रार यायची कि, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशीरा सुरू होतो. निर्णय सुद्धा उशिरा येतो. मात्र आता भारतीय न्याय संहितेतून या सर्व अडचणी दूर करण्यात आल्यात. नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे”, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

Jayant Patil Meet Madan Bhosale : साताऱ्यातील भाजपचा नेता ‘तुतारी’च्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत कमराबंद चर्चा

jayant patil madan bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका जस जस जवळ येत आहेत तस तस शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. महायुतीतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट फासे टाकत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कागल मतदारसंघात भाजप नेते समरजित घाटगे यांनी तुतारी घेण्याची घोषणा केली होती. आता कोल्हापूरनंतर सातारा भाजपची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे. वाई मतदार संघातील भाजप नेते मदन भोसले (Madan Bhosale) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद कमराआड चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हास्य जणू काय भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याचेच संकेत देत होते.

मदन भोसले हे वाई तालुक्यातील भाजपचे बडे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सध्या अजित पवार गटात असलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना दारुण पारभाव पत्करावा लागला. सध्या अजित पवार गट हा भाजपसोबत महायुतीत आहे. त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघाची जागा सुद्धा विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनाच सुटण्याची दाट शक्यता आहे. हाचधोका कदाचित मदन पाटील याना असू शकतो. त्यामुळे वाईतील एकूण सर्व समीकरणे बघता मदन पाटील हे उमेदवारीसाठी शरद पवार गटात जाणार का अशा चर्चाना बळ आले आहे.

जयंत पाटील यांच्यासोबत मदन भोसले यांनी बंद कमराआड बराच वेळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील दोन्ही नेत्यांनी उघड केलेला नाही. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत असं म्हणत जयंत पाटील यांनी जास्त बोलणं टाळलं. परंतु जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगत होते. गुपचूप पणे साताऱ्यात जयंत पाटलांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला का? अशा चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. सर्वात आधी कोल्हापूरचे राजे समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार हे जाहीर केलं आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सुद्धा पवारांची तुतारी हाती घेतील असं बोललं जात आहे कारण त्याठिकाणी सुद्धा अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आज दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतल्याने ते सुद्धा लवकरच घड्याळ सोडून तुतारी वाजवतील असं बोललं जातंय. त्यातच आज जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतल्याने पवारांनी आणखी एक नेता आपल्याकडे वळवला का अशा चर्चाना उधाण आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतील असं बोललं जातंय.

RRB Technician Recruitment 2024 | भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 14,298 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. आज काल अनेक तरुण आहेत ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. तरी देखील त्यांना नोकरी मिळत नाही. अशातच आम्ही भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय रेल्वेमध्ये (RRB Technician Recruitment 2024) एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती रेल्वे तंत्रज्ञ या पदांसाठी आहे. या भरती अंतर्गत तब्बल 14,298 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. आता या भरतीची जाणून घेऊया.

निवड कशी होईल ? | RRB Technician Recruitment 2024

या भरतीसाठी उमेदवारांना अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यासाठी उमेदवारांना सगळ्यात आधी सीबीटी संगणक आधारित परीक्षा द्यावी लागेल. त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होईल. आणि तुमची वैद्यकीय चाचणी होईल त्यानंतरच तुम्ही पुढच्या टप्प्यावर जाऊ शकता.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. ही लिंक केवळ 15 दिवसांसाठी सक्रिय असणार आहे. त्यामुळे उमेदवार केवळ पंधरा दिवसातच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज फी

या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर सीबीटी चाचणी दिल्यानंतर त्यातील 500 रुपये त्यांना परत मिळणार आहेत. तसेच आरक्षित सेनेतील उमेदवारांना 250 रुपये फी भरावी लागेल. परंतु cbt चाचणीत त्यांची ही संपूर्ण फी परत दिली जाईल.

वेतन | RRB Technician Recruitment 2024

उमेदवारांना लेवल 5 नुसार 29 हजार रुपये ते 92 हजार 300 रुपये पगार दिला जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Unified Pension Scheme | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंजूर केली यूनिफाईड पेन्शन स्कीम; असा होणार फायदा

Unified Pension Scheme

Unified Pension Scheme | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिलेली आहे. सरकारच्या या योजनेचे नाव आता युनिफाईड स्पेशल स्कीम (Unified Pension Scheme) असे आहे. आज कॅबिनेटची बैठक भरवण्यात आलेली होती. आणि या बैठकीत या नव्या पेन्शन योजनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार आता या योजनेनुसार जर एखाद्या व्यक्तीने 25 कमीत कमी 25 वर्ष काम केले, तर त्याला त्याच्या निवृत्तीच्या आधी नोकरीमध्ये बारा महिन्यांपर्यंत बेसिक पेवर 50% पेक्षा अधिक पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीने दहा वर्ष नोकरी केली. आणि त्यानंतर सोडली तर त्याला दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे एखाद्या पेन्शन धारकाचा जर मधेच मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही पेन्शनची रक्कम मिळणार आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 60% रक्कम दिली जाणार आहे. जर एखाद्या कर्मचारी 10 वर्ष नोकरी करून नोकरी सोडत असेल, तर त्याला महिन्याला 10 हजार रुपये एवढी पेन्शन देण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिलेली आहे. या एका मोठ्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारच्या जवळपास 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. आता कर्मचाऱ्याकडे एमपीएस किंवा यूपीएस यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा मार्ग असणार आहे. तसेच त्यांना या योजनेअंतर्गत महागाई भत्त्याचा देखील लाभ होणार आहे.

लवकरच स्कीम लागू होणार | Unified Pension Scheme

सरकारने या योजनेला मंजुरी दिली असली, तरी अजूनही योजना लागू झालेली नाही. येत्या काळात लवकरच ही योजना देखील लागू झालेली आहे. या योजनेचे पाच खांब असणार आहे. यामध्ये 50% सुनिश्चित पेन्शन मिळणार आहे. तसेच सुनिश्चित कौटुंबिक पेन्शन असणार आहे. तसेच दहा वर्षाच्या नोकरी नंतर दहा हजार रुपये महिना पेन्शन त्या व्यक्तीला मिळणार आहे.

सरकारने या नव्या पेन्शन योजनेला मंजुरी दिल्यामुळे सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. कारण या योजनेतून त्यांनाही खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची पेन्शन रक्कम देखील ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे किती वर्ष काम करावे आणि किती काम करावे. या गोष्टीचा निर्णय आता कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.