आपल्या सोबतही असे अनेकदा होत असेल की दुपारचे जेवण ऑफिसमध्ये झाल्यानंतर सुस्ती येते , कामी करण्याचा कंटाळा येतो. दुपारी जेवण केल्यानंतर ऑफिसला येताना जो फ्रेशनेस असतो तो कुठेतरी ढळून गेल्यासारखा वाटतो. शिवाय थकवा देखील जाणवू लागतो. मात्र अशा पद्धतीने ऑफिसमध्ये दुपारनंतर सुस्ती येणे ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही फंडे सांगणार आहोत ज्यामुळे दुपारी ऑफिसच्या जेवणानंतर सुस्ती येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया…
फॉलो करा टिप्स
रात्री उशिरा झोपायची सवय असेल तर ती तुम्हाला आधी बंद करावी लागेल. रात्री दहा ते दहा : तीस यादरम्यान नियमितपणे सक्तीने झोपा. म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवसभर फ्रेश वाटेल.
ऑफिसमध्ये तुम्ही डब्बा घेऊन जात असाल तर दुपारी डब्बा खाताना तुम्ही जास्त जेवण तर करत नाही ना? याकडे लक्ष द्या. दुपारच्या जेवणात जास्तीत जास्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असते याकडे लक्ष द्या. खूप जास्त खाऊ नका पोट थोडे रिकामे ठेवा.
शरीरामध्ये जर पुरेसे पाणी नसेल तरीसुद्धा झोप येते. म्हणून पुरेसे पाणी शरीरात गेलं पाहिजे याची दक्षता घ्या.
सकाळी किती घाई गडबड असली किती तुम्हाला लवकर आवरायचं असेल तरीसुद्धा दहा मिनिटं का होईना पण व्यायाम करा शांत बसून ध्यान करा त्यामुळे मन शांत होईल आणि दिवसभर उत्साह वाटेल.
दुपारी ऑफिसमध्ये जेवण झाल्या झाल्या लगेच कामाला बसू नका. दहा ते बारा मिनिटे ऑफिसच्या परिसरात चाला त्यानंतर पाणी प्या आणि मग कामाला सुरू करा म्हणजे सुस्ती येणार नाही.
पुणे ते थेट जम्मू तवीला पोहोचणारी ‘झेलम एक्सप्रेस’ अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहेत. या एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना भारतातील विविध राज्यांमधून विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर आणि पंजाब मधून देखील प्रवास करण्याचा आनंद मिळतो. मात्र 1977 पासून सुरू असलेल्या झेलम एक्सप्रेस चा गरेक बदलण्याची अनेक प्रवाशांची मागणी होती. मात्र अखेर आता ही मागणी पूर्ण होत असून मध्य रेल्वे कडून झेलम एक्सप्रेसला नवीन रेक जोडण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे झेलम एक्सप्रेस ला नवीन एलएचबी म्हणजेच (लिंक हॉफमन पुश) प्रकारचा रेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. झेलम एक्सप्रेसचे पाच रेक असून त्याच्या पाचही रेक मध्ये हा बदल करण्यात येणार आहे.
मिळालेलय माहितीनुसार, हा बदल 25 ऑगस्ट पासून सुरू होणार असून या तारखेपासूनच नवीन रेक जोडायला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या आयसीएफच्या जुनाट डब्यातून प्रवाशांची सुटका होणार आहे. एल एच बी रेक मध्ये एकूण 22 डबे जोडण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी झेलम एक्सप्रेसचा रेक बदलण्याची मागणी करत होते. मात्र मध्य रेल्वे ला रेक उपलब्ध होत नसल्यामुळे रेक मध्ये बदल झाला नाही. मात्र आता रेक उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रशासनाने नवीन बरेक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र लोकलची गर्दी म्हणजे जोखीम बनली आहे. लोकलची वाढती गर्दी पाहता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र लवकरच लोकलच्या गर्दीवर तोडगा निघण्याची आशा आहे. रेल्वे प्रशासनही मागच्या काही दिवसांपासून लोकांच्या गर्दीचा प्रश्न मिटवण्याच्या (Mumbai Local) प्रयत्न करत आहे.
खरंतर मागच्या काही दिवसांपासून मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल सतत रखडत धावत आहे. काही लोकं उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना कामावर जायला उशीर होतो आहे. शिवाय लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक अपघात मागच्या काही दिवसांमध्ये झालेले आहेत. म्हणूनच लोकलच्या कारभारावर काही प्रवासी लोकलच्या संघटनांनी निषेध नोंदवला (Mumbai Local) होता. एवढेच नाही तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी प्रवासी संघटना काळ्याफिती लावून प्रवास करणार आहेत.
मध्य रेल्वे कडून सर्वेचे काम हाती (Mumbai Local)
कल्याण पासून कर्जत आणि कसारा पर्यंत 15 डब्याची लोकल थांबवता यावी म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढवण्यात यावा अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. यावर रेल्वे कडून सकारात्मकता दर्शवण्यात आली असून प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा सर्वे मध्य रेल्वे कडून करण्यात येणार आहेत प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यास कर्जत कसारा हून भरून येणाऱ्या लोकलमधील गर्दी कमी (Mumbai Local) होण्यास मदत होणार आहे.
लोकल मधील वाढती गर्दी आणि लोकल पकडताना होणारे अपघात ही गोष्ट लक्षात घेऊन लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याबरोबरच लोकलच्या मार्गावरून मेल एक्सप्रेस ऐवजी फक्त (Mumbai Local) लोकल सोडण्यात याव्यात अशी ही मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवावी याची चाचणी करण्यात येत आहे.
काय आहेत मागण्या? (Mumbai Local)
टिटवाळा आणि बदलापूरहून 15 डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात.
कळवा व मुंब्रा स्थानकात सकाळ-संध्याकाळ काही जलद लोकांना थांबा मिळावा.
लोकलच्या मार्गावरून मेल एक्सप्रेस ऐवजी लोकलच सोडण्यात याव्यात
प्लॅटफॉर्मची रुंदी वाढावी.
प्रवासी संघटनांचे आंदोलन (Mumbai Local)
लोकल प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे स्थानकातून लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास प्रवाशांना करावा लागतो. परिणाम म्हणून प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात म्हणूनच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रवासी संघटनांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी काळ्या फिती (Mumbai Local) लावून प्रवास करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
Success Story | आजकाल शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कधी अवकाळी पाऊस येतो, तर अचानक दुष्काळ पडतो. अशा परिस्थितीत उत्पन्न कसे घ्यावे आणि खर्च कसा भागवावा? हे शेतकऱ्यांना कळत नाही. परंतु आजकालच्या अनेक शेतकरी आहेत. जे पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहे. ज्यामध्ये त्या वेगवेगळ्या आयडिया (Success Story) करून आधुनिक शेती करत आहेत. अशातच आजकाल तरुण वर्ग देखील आधुनिक शेती करत आहे. साताऱ्यातील एका तरुणाने शेतीचा एक आगळावेगळा प्रयोग केलेला आहे. आणि त्यातून त्याला खूप चांगले यश मिळालेले आहे आणि उत्पन्न देखील मिळालेले आहे.
आजकाल अनेक तरुण हे नोकरी न करता शेतीमध्ये नवनवीन व्यवसाय करायला लागलेले आहेत. आणि ते व्यवसाय त्यांचे यशस्वी देखील होत आहे. अशातच साताऱ्यातील पाडळी गावातील ऋषिकेश ठाणे या शेतकरी तरुणाने नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे. त्याने शेतात कोरफडची लागवड केलेली आहे. सध्या कोरफडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होत आहे. केवळ कोरफडीची शेती करूनच या शेतकर्यांनी वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल केलेली आहे. कोरफड हे खूप औषधोपचारी आहे अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे औषधांमध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो. त्यामुळे कोरफडीला देश-विदेशातून मोठी मागणी आहे.
ऋषिकेश ढाणे या शेतकऱ्याने तब्बल तीन एकराच्या शेतात कोरफडीची लागवड केली होती. त्यांनी शेताच्या बांधावर कोरफडीची लागवड केलेली होती. कोरफड तो वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवत होता. त्याप्रमाणे स्वतः देखील कोरफडीपासून वेगवेगळी उत्पादन घेत होता. यातून त्याला खूप चांगला नफा झाला जिद्दी आणि चिकाटीचा वापर करून त्याने खूप चांगले आर्थिक प्रगती केलेली आहे. यात त्याच्या कुटुंबांनी देखील त्याला खूप जास्त मदत केली.
यावेळी ऋषिकेश धाणे यांनी सांगितले की, मी 2000 सालापासून शेती करत आहे. मी सुरुवातीला ज्वारी सोयाबीन मला चांगला पैसा मिळत नव्हता. परंतु पूर्ण खर्च भागत नसल्याने मी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार केला आणि कोरफड लावायचा विचार केला की रोप कोणाला तरी विकायची या उद्देशाने मी लागवड सुरू केली. किंवा तिला मला उसाच्या शेतीपेक्षा जास्त पैसे यायचे. नंतर कालांतराने कमी पैसे परंतु चांगल्या पद्धतीने कोरफडीची लागवड करायला लागलो.
Supreme Court of India Bharti 2024 | अनेक लोक नोकरीच्या शोधात असतात. परंतु कितीही शोध घेतला, इंटरव्यू दिले तरी, त्यांना नोकरी मिळत नाही. कारण त्यांना नोकरीची पूर्ण माहिती मिळालेली नसते. आम्ही नेहमीच आमच्या लेखांमधून तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी देत असतो. ज्यातून तुम्हाला फायदा होत असतो. आजपर्यंत अनेक लोकांना चांगली नोकरी मिळालेली आहेत. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत.
ती म्हणजे आता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कनिष्ठ न्यायालय परिचर स्वयंपाकाचे ज्ञान या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 80 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. 23 ऑगस्ट 2024 पासून हे अर्ज सुरू होतील तर 12 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे तुम्ही या तारखेला अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची माहिती | Supreme Court of India Bharti 2024
पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय परिचय स्वयंपाकाचे ज्ञान
पदसंख्या – 80 जागा
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
अर्जापद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024
शैक्षणिक पात्रता किमान – दहावी पास
वेतनश्रेणी – 21 हजार 700 ते 46 हजार 210 रुपये
अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
23 ऑगस्टनंतर ही वेबसाईट चालू होणार आहे
12 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
Kisan Vikas Patra Scheme | आजकाल आपण पाहिले, तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. भविष्याचा विचार करता ही महागाई वाढतच जाणार आहे. त्यामुळे आजकाल सगळ्यांनाच गुंतवणुकीचे महत्त्व खूप चांगले कळलेले आहे. पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या पैशाची बचत करणे आणि ते भविष्यसाठी उपयोगाला येतील असे ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अनेक लोकांच्या कमाईतील काही ना काही हिस्सा गुंतवत असतात. आजकाल बाजारामध्ये गुंतवणुकीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहे. बँकांमध्ये त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये लोक गुंतवणूक करत असतात.
परंतु पोस्ट ऑफिस ही सरकारी योजना (Government scheme) तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. पोस्ट ऑफिस ही दीर्घ काळापासून एक विश्वासहार्य योजना आहे. ही एक सरकारी योजना असल्याने त्यातून परतावा देखील खूप चांगला मिळतो. त्यामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केट प्रमाणे पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर काही काळाने हे पैसे तुम्हाला दुप्पट होऊन मिळतील.
पोस्ट ऑफिस हे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक योजना देत असते. अशातच पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये दुप्पट नफा मिळतो. त्यामुळे अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करत असतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे महिन्यातच दुप्पट होतात. या योजनेमध्ये तुम्ही 100 रुपयांच्या पटीत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. कमाल गुंतवणूक करावयाला कोणत्याही मर्यादा नाही. अशा प्रकारे तुम्ही हवे तितके पैसे यामध्ये गुंतवू शकता.
या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्ही एक किंवा डबल खाते देखील उघडू शकता. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना हे खाते उघडता येते. म्हणजेच एखादी व्यक्ती या योजनेमध्ये किती खाते उघडू शकतात. याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. तुम्ही जास्त खाते देखील उघडू शकता. या योजनेअंतर्गत तिमाही आधारावर ठरलेली असते. या योजनेत तुम्हाला सध्या 7.5 टक्के दराने व्याजदर दिले जाते.
जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर म्हणजेच 115 महिन्यानंतर त्या व्यक्तीला 7.5 टक्के दराने व्याज मिळते. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या मुदतीनंतर 10 लाख रुपये मिळतात. म्हणजे जर तुम्ही 5 लाख गुंतवले तर तुम्हाला त्याचा दुप्पट फायदा मिळतो. म्हणून अशी योजना अत्यंत फायद्याची अशी योजना आहे. तुम्हाला जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही या योजनेत नक्कीच गुंतवणूक करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या आर्थिक राजधानीतील उच्चभ्रू वस्तीचा, मोठे उद्योजक, व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल… राजभवन, सह्याद्री अतिथीगृह , पेडर रोड ते शहरी श्रीमंत झगमगाट पाहायचा असेल तर साउथ बॉम्बे मधील मलबार हिल हा सेंटर पॉईंट ठरतो… पण अशा या हाय फाय मतदारसंघात राजकारण टिकवून ठेवून तशी अवघड गोष्ट… पण तब्बल पाच टर्म, तीस वर्ष, एकाच पक्षातून ग्लॅमरस मलबार हिल सारख्या मतदार संघात आमदार म्हणून… मंत्री म्हणून… भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचा दबदबा कायम आहे… पण शिवसेनेने ती एक चूक केली नसती, तर या साउथ बॉम्बेच्या मलबार हिलवर आजही भगवा फडकला असता… नेमके शिवसेनेने केलेली ती चूक भाजपच्या कशा पथ्यावर पडली? मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो? मंगल प्रभात लोढा यांच्या विजयाचा वारू यंदा तरी ठाकरे रोखू शकतील का? आणि मलबार हिलच्या जनतेचा सध्याचा ट्रेंड कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने दिसतोय? त्याचाच हा आढावा…
1995 साली बी. ए देसाई यांना हरवून पहिल्यांदा मंगलप्रभात लोढा आमदार झाले. 1995 पासून ते 2009 पर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली. 2014 साली भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली. पण तरीही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत मलबार हिल इज इक्वल टू मंगल प्रभात लोढा अस जणू नवीन राजकीय समीकरणच सेट केलं…तसं पाहायला गेलं तर शिवसेनेलाही युतीच्या काळामध्ये या मतदारसंघावर क्लेम करण्याचा एक चान्स आला होता… पण तो ठाकरेंनी हाताने घालवला… तर झालं असं होतं की गिरगाव, ग्रँड रोड, ताडदेव आणि आजूबाजूच्या परिसरातून बनलेला ऑपेरा हाऊस मतदारसंघ 2009 ला मतदार संघाच्या पुनर्रचनेत मलबार हिलमध्ये मर्ज झाला… या ऑपेरा हाऊस मतदार संघावर कायम शिवसेनेचाच भगवा फडकत होता… त्यामुळे 2009 ला मुंबईतील पक्षाची स्ट्रॉंग पोझिशन पाहता… मुंबईवरील वर्चस्व पाहता… युतीमध्ये ही जागा खेचून आणण्याची संधी शिवसेनेला होती… पण मातोश्रीने शिवसेनेतीलच स्थानिक नेत्यांचा विरोध जुगारून मलबार हिल मतदार संघ भाजपासाठी सोडला… आणि स्वतःच्या हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेतला…
कारण यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या वर्चस्वाच्या राजकारणाला आणखीन धार दिली… म्हणूनच 2014 ला जेव्हा युतीत काडीमोड होत स्वतंत्र निवडणूक लढली गेली…. तेव्हा देखील शिवसेनेच्या भगव्यावर भारी पडत मंगल प्रभात लोढा यांनीच मलबार हिलवर भाजपचा झेंडा फडकवला… यानंतर राज्यात भाजपची सत्ता येणं आणि मुंबईतून शिवसेना बॅक फुटला जाणं यामुळे आपसूकच मंगल प्रभात लोढा हे नाव मलबार हिलमध्ये आणखीन स्ट्रॉंग बनत गेलं… आणि 2019 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हिरा देवासी यांना धूळ चारत लोढा सलग पाचव्यांदा आमदार झाले… आणि महायुती सरकारमध्ये मंत्रीपदावर ठाणही मांडून बसले… तसं पाहायचं झालं तर एक राजकारणी सोडून राज्यातील उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक, उद्योगपती म्हणूनही लोढा यांचं नाव परिचित आहे… ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट या एका रिपोर्टनुसार लोढा यांच्या संपत्तीचा आकडा तब्बल 31,960 कोटी इतका भरभक्कम होता… याच मनी, मसल आणि भाजपसोबत असल्यामुळे पॉलिटिकल पॉवरमुळे मंगल प्रभात लोढा यांचा पराभव करनच सोडा… पण त्यांना विरोधकही सापडणंही तशी ठाकरे गटासाठी अडचणीची गोष्ट असणार आहे…
उदाहरणच घ्यायचं झालं तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीच वार होतं… अगदी साउथ बॉम्बे सारख्या हायफाय मतदारसंघातही ठाकरे गटाचाच खासदार झाला… पण मलबार हिलने मात्र आपलं लीड हे महायुतीच्या म्हणजेच अप्रत्यक्षपणे मंगल प्रभात लोढा यांच्याच पारड्यात टाकलं… थोडक्यात आकडा सांगतोय मलबार हिलमधून 2024 ला लोढा आरामात आमदारकीचा सिक्सर मारतायत…मलबार हिल परिसरातील घसरलेला मराठी टक्का, मराठी मतदारांची वाढलेली संख्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाढलेली ताकद आणि प्रमोद नवलकर, चंद्रकांत पडवळ, विलास अवचट यानंतर मतदार संघात लोढांच्या तोडीचा राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या तगडा उमेदवार सध्या तरी ठाकरे आणि काँग्रेसकडे दिसत नाही… त्यामुळे मलबार हिलमध्ये पुन्हा लोढा जिंकून आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसणार आहे… त्यामुळे शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना… असं जे म्हटलं जातं त्यातून मलबार हीलला वगळावं लागतं… कारण मनी, मसल आणि पॉलिटिकल पॉवर या सगळ्याच बाबतीत लोढा यांना अप्पर हॅण्ड मिळतो… बाकी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मलबार हीलमधून कोण आमदार होतंय? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
ITBP Bharti 2024 | आजकाल अनेक अशी लोक आहेत. ज्यांच्याकडे खूप चांगले शिक्षण आहे. परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही. अनेक जणांना तर नोकरीच्या संधी नक्की कुठे आहेत, हेच माहीत नसते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक महत्त्वाची नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडो तिबेट सीमा पोलीस दलाअंतर्गत (ITBP Bharti 2024 ) एक मोठी भरती जाहीर झालेली आहे.
या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल (ITBP Bharti 2024) म्हणजे स्वयंपाक घरसेवा या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच 2 सप्टेंबर पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखेला अर्ज करायचे आहेत आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
महत्त्वाची माहिती
पदाचे नाव – कॉन्स्टेबल स्वयंपाक घर
पदसंख्या – 819 जागा
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2024
वेतनश्रेणी – 21 हजार 700 ते 59 हजार 100 रुपये
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा ? | ITBP Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
1 ऑक्टोबर 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मांडल्यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असताना त्यांनी प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच उत्तर देत मनोहर भिडे यांची लायकीच काढली. तसेच काहीही प्रश्न विचारता का? असा उलट सवाल पत्रकारांना केला.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांना संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार चांगलेच भडकले. तसेच संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी केला. प्रश्न पूर्ण होण्याआधीच शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक, असे सांगत शरद पवार यांनी अधिक बोलणं टाळलं.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?
काल सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोहर भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत म्हंटल कि, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ती प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने OPPO A3 5G नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. 6GB रॅम असलेल्या या मोबाईलची किंमत कंपनीने 15,999 रुपये ठेवली आहे. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा बजेट किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आला आहे. यामध्ये 50MP कॅमेरा, 5,100mAh बॅटरी सारखे भन्नाट फिचर देण्यात आले आहेत. आज आपण ओप्पोच्या या नव्या हॅण्डसेटचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….
डिस्प्ले-
OPPO A3 5G मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा LCD HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1604 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1000 nits पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 Soc चिपसेट बसवण्यात आली आहे. मोबाईल मध्ये 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Color OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
कॅमेरा – OPPO A3 5G
प्रत्येकवेळी मोबाईल खरेदी करत असताना आपण त्याची कॅमेरा क्वालिटी बघत असतो. OPPO A3 5G मध्ये पाठीमागील बाजूल 50MP चा मुख्य कॅमेरा आणि LED फ्लॅशसह 2MP पोर्ट्रेट कॅमेरा बसवण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,100mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झालयास या मोबाईल मध्ये साइड-माउंट, फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ल्टिपल लिक्विड रेझिस्टन्स, SGS ड्रॉप-रेझिस्टन्स सर्टिफिकेशन, SGS मिलिटरी स्टँडर्ड सर्टिफिकेशन, ड्युअल-सिम, 5जी, वाय-फाय, यूएसबी टाइप सी पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
Oppo A3 5G च्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, 6GB+128GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे. Oppo India e-store वर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असून बँक ऑफ बडोदा आणि SBI बँक कार्डवर ग्राहकांना 10% इन्स्टंट सूट मिळतेय. ओप्पोचा हा मोबाईल लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे.